Sunday, 15 December 2019

40 महत्त्वाचे प्रश्न

1. BVSC : YEHX :: MRCP : ?

 NJXK

 LKXM

 NIXK

 OIVM

उत्तर : NIXK

 

2. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा?

 पेटी

 शेत

 हॉल

 खोली

उत्तर :शेत

 

3. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा?

 ब्रोमीन

 पारा

 तांबे

 चांदी

उत्तर :ब्रोमीन

 

4. 98,72,?,32,18,8

 42

 46

 50

 54

उत्तर :50

 

5. मराठी भाषेची वर्णसंख्या किती आहे?

 35

 20

 48

 56

उत्तर :48

 

6. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर गादीवार कोण बसले?

 राजाराम

 संभाजी महाराज

 बाजीराव

 माधवराव

उत्तर :संभाजी महाराज

 

7. पृथ्वीवरील वातावरणामध्ये ऑक्सीजनचे प्रमाण किती टक्के असते?

 30.84

 20.94

 18.94

 21.94

उत्तर :20.94

 

8. भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत?

 10

 11

 12

 9

उत्तर :12

 

 

9. भारतीय राज्यघटनेतील आठवे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधीत आहे?

 केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या जबाबदार्‍या

 राज्यभाषा

 पंचायत राज्य

 नगरपालिका

उत्तर :राज्यभाषा

 

10. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांच्या समावेश खालीलपैकी कोणत्या घटना दुरूस्तीन्वये करण्यात आला?

 41 व्या

 42 व्या

 44 व्या

 50 व्या

उत्तर :42 व्या

 

11. भारतामध्ये किती किती केंद्रशासित प्रदेश आहेत?

 5

 7

 8

 9

उत्तर :9

 

12. मराठी साम्राज्याचे पाचवे पेशवे कोण होते?

 बालाजीराव

 नारायणराव

 बाजीराव

 सवाई माधवराव

उत्तर :नारायणराव

 

13. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीबद्दल नमूद केले आहे?

 अनुच्छेद 19

 अनुच्छेद 14

 अनुच्छेद 22

 अनुच्छेद 21

उत्तर :अनुच्छेद 21

 

14. साखर हे —– आहे?

 प्रोटीन

 अॅमिनो अॅसिड

 व्हिटॅमिन

 ओलीगोसॅकॅराईडस  

उत्तर :ओलीगोसॅकॅराईडस 

 

15. व्हिटॅमिन ‘डी’ च्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता आजार उदभवतो?

 रातआंधळेपणा

 मुडदूस

 अॅनेमिया

 बेरीबेरी

उत्तर :मुडदूस

 

16. पूर्ण वाढ झालेल्या मानवी शरीरात एकूण हाडांची संख्या किती?

 201

 204

 206

 210

उत्तर :206

 

17. महाराष्ट्रातील स्त्री-पुरुष प्रमाण खालीलपैकी कोणते?

 935

 948

 958

 यापैकी नाही

उत्तर :यापैकी नाही

 

18. पंजाब राज्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली?

 1 नोव्हेंबर 1966

 1 डिसेंबर 1965

 1 मे 1960

 15 ऑगस्ट 1947

उत्तर :1 नोव्हेंबर 1966

 

19. द्रोणाचार्य पुरस्कार केव्हापासून देण्यास सुरुवात झाली?

 1991

 1985

 1954

 1960

उत्तर :1985

 

20. नुकतेच भारताचे पंतप्रधान यांनी खालीलपैकी कोणत्या देशाला भेट दिली?

 चीन

 नेपाळ

 भुतान

 बांग्लादेश

उत्तर :भुतान

1. 0.01+1.01+1.001+0.0001=?

 2.0211

 2.0111

 2.1111

 1.0211

उत्तर : 2.0211

 

2. पुष्पाचे लग्न 6 वर्षापूर्वी झाले, तिचे सध्याचे वय लग्नाच्या वेळेच्या वयाच्या सव्वा पट (1.25) आहे तर तिचे लागच्या वेळी वय किती वर्षे होते?

 25 वर्षे

 36 वर्षे

 28 वर्ष

 24 वर्षे

उत्तर :24 वर्षे

 

3. एका पदार्थाची 1/4 (एक चतुर्थाश) किलोग्रामची किमत रुपये 0.60 इतकी आहे तर 200 ग्रॅमची किंमत किती?

 42 पैसे

 50 पैसे

 48 पैसे

 40 पैसे

उत्तर :48 पैसे

 

4. अतुल आज रोजी त्यांच्या काकापेक्षा 30 वर्षे लहान आहे, 5 वर्षापूर्वी त्याचे वय त्याच्या काकाच्या वयाच्या 1/4 (एक चतुर्थाश) होते, तर अतुलच्या काकाचे 5 वर्षांनंतरचे वय किती असेल?

 50 वर्षे

 60 वर्षे

 70 वर्षे

 40 वर्षे

उत्तर :50 वर्षे

 

5. 5000 रूपयावर दोन वर्षासाठी 8 टक्के प्रतिवर्ष व्याज दराने चक्रवाढ व्याज किती?

 5842 रुपये

 832 रुपये

 1832 रुपये

 1932 रुपये

उत्तर :832 रुपये

 

6. एका कारला 300 कि.मी. अंतर कापण्यासाठी 5 तास लागतात. त्या कारला तेच अंतर पूर्वीच्या वेळेच्या 4/5 पट वेळेत कापण्यासाठी किती वेग ठेवावा लागेल?

 60 कि.मी. प्रति तास

 75 कि.मी. प्रति तास

 85 कि.मी. प्रति तास

 70 कि.मी. प्रति तास

उत्तर :75 कि.मी. प्रति तास

 

7. लक्ष्मणला 6 कि.मी. अंतर जाण्यासाठी 45 मिनिटे लागतात, तर त्याच वेग किती आहे?

 5  कि.मी. प्रति तास

 8 कि.मी. प्रति तास

 10 कि.मी. प्रति तास

 9 कि.मी. प्रति तास  

उत्तर :8 कि.मी. प्रति तास

 

8. एक डझन पेनची किंमत 540 रुपये आहे, तर 319 पेनची किंमत किती?

 14,355 रुपये

 15,455 रुपये

 14,555 रुपये

 14,655 रुपये

उत्तर :14,355 रुपये

 

9. 35 चे 60 टक्के करून येणारी संख्या ही 400 च्या किती टक्के आहे?

 5.25

 10.5

 12.5

 6

उत्तर :5.25

 

10. ए हा एक रेडियो बी ला दहा टक्के नाफ्याने विकतो. ब तो रेडियो सी याला पाच टक्के नफ्याने विकतो. जर सी याला तो रेडियो घेण्यासाठी 462 रुपये द्यावे लागले असतील, तर ए ने रेडियो किती रुपयात खरेदी केला होता?

 420

 400

 380

 500

उत्तर :400

11. 1/2 चे 3/4 टक्के म्हणजे किती?

 0.00075

 0.00375

 0.00475

 0.00275

उत्तर :0.00375

 

12. अडीच वर्षांनंतर 5 टक्के व्याज दराने मुद्दलासह एकूण 720 रुपये मिळाले तर मुद्दल किती?

 540 रुपये

 640 रुपये

 600 रुपये

 700 रुपये

उत्तर :640 रुपये

 

13. एका प्लॉटची लांबी 40 फुट व रुंदी 50 फुट आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती?

 20 चौरस फुट

 2000 चौरस फुट

 200 चौरस फुट

 2000 चौरस फुट

उत्तर :2000 चौरस फुट

 

14. एक इंच म्हणजे किती मिलीमीटर?

 28 मि.मि.

 25.4 मि.मि.

 26.4 मि.मि.

 30.48 मि.मि.

उत्तर :25.4 मि.मि.

 

15. 55556666+8888+2222-130000000+600=?

 14439488

 15539488

 14339488

 14539488

उत्तर :14439488

 

16. (500-33)(500+33)=?

 247911

 248911

 246911

 248811

उत्तर :248911

 

17. घडांचा द्राक्षांची जो संबंध आहे तोच संबंध व्होडकाचा खालीलपैकी कशाशी आहे?

 सफरचंद

 बटाटा

 बार्ली

 ओट

उत्तर :बटाटा

 

18. इंग्लंड : अटलांटिक महासागर :: ग्रीनलँड : ?

 पॅसिफिक महासागर

 अटलांटिक महासागर

 आर्क्टिक महासागर

 अंटार्क्टिक महासागर

उत्तर :आर्क्टिक महासागर

 

19. MASTER चा OCUVGT जो संबंध आहे तोच संबंध BRING चा खालीलपैकी कशाशी आहे?

 ETKPB

 DTKPI

 DTKPB

 KTKPI

उत्तर :DTKPI

 

20. NUMBER : UNBMRE :: GHOSTS : ?

 HGOSTS

 HOGSTS

 HGSOST

 HGSOTS

उत्तर :HGSOST

पनवेलच्या प्रणित पाटील यांची ‘नासा’मध्ये सहअन्वेषक पदी निवड

🎆 शास्त्रज्ञ आणि अस्ट्रोनॉट कँडिडेट असलेल्या पनवेलच्या प्रणित पाटीलची ‘नासा’च्या मानव संसाधन प्रकल्पात सहअन्वेषक म्हणून निवड करण्यात आली आहे.

🎆 मंगळावरील वाळवंटातील अनुसंधान प्रक्रियेसाठी लोकांच्या हालचालींचा शोध घेऊन मानवी सहभागाच्या झोपेच्या निर्णयक्षमतेबाबत अभ्यास या संशोधन प्रकल्पात केला जाणार आहे.

🎆 अमेरिकेतील युटा प्रांतात एमडीआरएस या संशोधन केंद्रावर हे संशोधन केले जाणार आहे.

🎆 चंद्रावरील वातावरण या केंद्रावर कृत्रिमरीत्या तयार केलेले आहे.

🎆 तर या संशोधनाला जानेवारी महिन्यात सुरु वात होणार आहे. याकरिता प्रणित पाटील हा जानेवारी महिन्यात अमेरिकेला रवाना होणार आहे. प्रणित पाटीलसह 60 जण या संशोधनाचा भाग असणार आहेत.

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA) विधेयक-2019’ संसदेत मंजूर


भारतातल्या आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांमध्ये (IFSC) होणार्‍या सर्व आर्थिक क्रियाकलापांचे नियमन एकाच जागी करण्याच्या उद्देशाने एका प्राधिकरणाची स्थापना करण्याची परवानगी देणारे विधेयक 12 डिसेंबर 2019 रोजी संसदेच्या राज्यसभेत मंजूर केले गेले. लोकसभेत 11 डिसेंबर रोजी प्रस्तावित कायद्यास मान्यता दिली गेली होती.

कायद्यांमध्ये केल्या गेलेली दुरूस्ती

सध्या, IFSC संस्थांमधले बँकिंग, भांडवली बाजारपेठ आणि विमा हे क्षेत्र अनेक नियामकांद्वारे नियमित केले जात आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI), भारतीय रोखे व विनिमय मंडळ (SEBI), निवृत्तीवेतन निधी नियंत्रण व विकास प्राधिकरण (PFRDA) आणि भारतीय विमा नियंत्रण व विकास प्राधिकरण (IRDAI) या संस्थांकडून हा कारभार व्यवस्थापित केला जात आहे.

या विधेयकाद्वारे SEBI कायदा, IRDA कायदा आणि PFRDA कायद्यासह एकूण 14 कायद्यांमध्ये दुरूस्ती करण्यात आली आहे.

प्राधिकरणाचे स्वरूप

🔸आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (International Financial Services Centres Authority –IFSCA) हे भारतातल्या आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांमध्ये (IFSC) चालणार्‍या सर्व आर्थिक क्रियाकलापांमध्ये समन्वय राखणार, नियंत्रण राखणार व त्यांचे व्यवस्थापन करणारी संस्था असणार आहे.

🔸या प्राधिकरणात अध्यक्षांसह एकूण नऊ सदस्यांचा समावेश असणार आहे आणि त्या सर्वांची नियुक्ती केंद्र सरकार करणार. हे सदस्य RBI, SEBI, IRDAI व PFRDA यांचे प्रत्येकी एक आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे दोन अधिकारी कर्मचारी असणार आहेत. उर्वरित दोन सदस्यांची नेमणूक शोध समितीच्या शिफारशीवरून केली जाणार.

भारतातले पहिले IFSC केंद्र गुजरात राज्यात गांधीनगर या शहरातल्या GIFT सिटी येथे उभारण्यात आले आहे. हे केंद्र ‘विशेष आर्थिक क्षेत्र कायदा-2005’ अन्वये स्थापन करण्यात आले आहे.

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये भारतीय वंशाचे १५ खासदार

🔺 ब्रिटनमध्ये आताच्या निवडणुकीनंतर हाऊस ऑफ कॉमन्समध्ये भारतीय वंशाचे १५ खासदार प्रवेश करणार आहेत.

👉 पीटीआय | December 14, 2019

हुजूर पक्षाच्या भारतीय वंशाच्या नेत्या आणि गृहमंत्री प्रिती पटेल.

◾️लंडन : ब्रिटनमध्ये आताच्या निवडणुकीनंतर हाऊस ऑफ कॉमन्समध्ये भारतीय वंशाचे १५ खासदार प्रवेश करणार आहेत. सत्ताधारी हुजूर व विरोधी मजूर पक्षाकडून काही भारतीय वंशाचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यात अनेक खासदारांनी आपले मतदारसंघ राखण्यात यश मिळवले असून भारतीय वंशाचे एकूण १५ खासदार नव्या सभागृहात असणार हे उघड  झाले आहे.
पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आताच्या निवडणुकीत नेत्रदीपक विजय संपादन केला असून आतापर्यंत सर्वात जास्त विविधता असलेले सभागृह अस्तित्वात येत आहे. त्यात वांशिक अल्पसंख्याक असलेले १० खासदार आहेत. आधीच्या संसदेतील सर्वच खासदार पुन्हा यशस्वी झाले आहेत. गगन मोहिंद्रा व श्रीमती क्लेअर काँटिन्हो यांनी हुजूर पक्षाच्या वतीने बाजी मारली तर लिबरल डेमोक्रॅटसचे मुनिरा विल्सन व नवेंद्रु मिश्रा प्रथमच निवडून आले आहेत. विल्सन यांनी सांगितले की, आताच्या सभागृहात विविधता असणार आहे. त्यातून सर्वाचा आवाज उमटेल. मूळ गोवेकर असलेल्या काँटिन्हो यांनी सांगितले की, ब्रेग्झिट पूर्ण करण्याची ही वेळ आहे. त्याचबरोबर शाळा, रुग्णालये, पोलीस दल यात गुंतवणूक वाढवणे गरजेचे आहे. काँटिन्हो यांनी सरे पूर्व भागातून विजय मिळवला तर मोहिंद्रा यांनी हर्टफोर्ड शायर (नैऋत्य) मतदारसंघातून विजय संपादन केला. सत्ताधारी पक्षाच्या खासदार व माजी गृहमंत्री प्रीती पटेल यांनी आरामात विजय मिळवला त्या नवीन मंत्रिमंडळात पुन्हा गृहमंत्री राहतील अशी शक्यता  आहे.
पटेल यांनी सांगितले की, अतिशय अटीतटीच्या या निवडणुकीत आम्हाला कार्यात्मक बहुमत गरजेचे होते. आम्ही आमच्या अग्रक्रमांबरोबरच ब्रेग्झिटच्या पूर्ततेला महत्त्व देतो. इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई व आधीच्या मंत्रिमंडळातील मंत्री ऋषी सुनाक, आंतरराष्ट्रीय विकास मंत्री आलोक शर्मा हे विजयी झाले. शैलेश वारा यांनी वायव्य केंब्रिजशायरमधून विजय मिळवला. गोवेकर वंशाच्या सुएला ब्रेव्हरमन यांनी फेअरहॅममधून मिळालेल्या यशाबद्दल मतदारांचे आभार मानले.

स्टॉकपोर्ट येथून नवेंद्रु मिश्रा निवडून आले तर गेल्या निवडणुकीत पहिल्या महिला ब्रिटिश शीख खासदार ठरलेल्या प्रीती गौर गिल यांनी पुन्हा विजय मिळवला. पहिले पुरूष शीख खासदार तन्मनजीत सिंह धेसी यांनीही पुन्हा यश मिळवले. ज्येष्ठ खासदार वीरेंद्र शर्मा, लिसा नंदी, कीथ वाझ यांची बहीण व्हॅलेरी वाझ विजय झाल्या.

📘थोडा इतिहास..

१९३५ नंतर प्रथमच मजूर पक्षाची कामगिरी उत्तर इंग्लंडमध्ये खराब झाली. जून २०१६ मध्ये युरोपीय समुदायातून बाहेर पडण्यासाठी कौल मिळाल्यानंतरची ही दुसरी निवडणूक होती. जॉन्सन यांनी थेरेसा मे यांच्याकडून  याच वर्षी सूत्रे हाती घेतली होती. पण ३१ ऑक्टोबरची ब्रेग्झिट मुदत त्यांना पाळता येत नसल्याने ते अडचणीत आले. ब्रेग्झिटसाठी  त्यांना हाऊस ऑप कॉमन्समध्ये बहुमताची गरज होती त्यामुळे त्यांनी मुदतपूर्व निवडणुका जाहीर केल्या यात पुन्हा त्रिशंकू स्थिती होईल असे अंदाज  होते.

🇮🇳भारतीय समुदायाकडून जॉन्सन यांच्या विजयाचे स्वागत

ब्रिटनमधील सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या यशाचे तेथील भारतीय समुदायाने स्वागत केले आहे. विरोधी मजूर पक्षाने काश्मीर प्रश्नाचे निमित्त करून भारताविरोधात भूमिका घेतल्याने भारतीय समुदायाच्या लोकांनी या निवडणुकीत बरीच क्रियाशीलता दाखवली होती. त्याचा परिणाम म्हणून मजूर पक्षाला भारतीय बहुल मतदारसंघात मोठा फटका बसला आहे.

ब्रिटनच्या संसदेत ब्रेग्झिटच्या मुद्दय़ावरून जो तिढा निर्माण झाला होता तो दूर करण्यासाठी पंतप्रधान जॉन्सन यांनी जुलैच्या सुमारास मध्यावधी निवडणुकांची घोषणा केली होती. ब्रेग्झिटच्या मुद्दय़ावर तोडगा काढण्याचा संदेश भारतीय समुदाय व इतर मतदार यांच्यापर्यंत पोहोचला होता असाच या विजयाचा अर्थ असल्याचे भारतीय समुदायातील लोकांनी म्हटले आहे.

रोहितची स्पेनच्या फुटबॉल स्पर्धेचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त

🔰 रोहितला स्पेनच्या ला लीगा फुटबॉल स्पर्धेचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले. गुरुवारी मुंबईत ला लीगाच्या वतीने ही घोषणा करण्यात आली.

🔰 तर दखल घेण्याची बाब म्हणजे या स्पर्धेच्या 90 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच फुटबॉलव्यतिरिक्त इतर खेळाडूची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडरपदी निवड झाली.त्यात हा मान रोहितने मिळवला असल्याने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला.

जमैकाची टोनी अॅन सिंह 'मिस वर्ल्ड २०१९'

◾️मिस जमैका टोनी अॅन सिंह हिने '' 'मिस वर्ल्ड २०१९ चा किताब पटकावला आहे.

◾️ युकेतील लंडनमध्ये ही ६९ वी मिस वर्ल्ड स्पर्धा पार पडली. एकूण ११४ स्पर्धकांमध्ये टोनीने बाजी मारली.

◾️ माजी विश्वसुंदरी २०१८ वेनेसा पोन्स हिने टोनी हिला मानाचा मुकूट चढवला.

◾️उत्तम गायिका असणाऱ्या २३ वर्षीय मॉडेल टोनी हिनं सुरुवातीपासून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

◾️टोनी-अॅन ही फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी आहे.

◾️ती वैद्यकीय शिक्षण घेत आहे. तिने कॅरेबियन स्टुडंट असोसिएशनची अध्यक्ष म्हणूनही काम केलं आहे.

◾️ ती गायिका देखील आहे.

◾️टोनी महिलांचा अभ्यास आणि मानसिकता याचा अभ्यास करत आहे.

◾️मिस वर्ल्डच्या अधिकृत संकेतस्थळावर लिहिलंय, 'फावल्या वेळेत गाणं, पाककला, व्लॉगिंग करायला टोनीला आवडतं. ती क्लासिकल ऑपेराही गाते.'

◾️आपलं स्वप्न साकार करण्यात आईचा मोठा हातभार असल्याचं टोनीनं सांगितलं.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘हळद लागणे’ या वाक्प्रचाराचा पुढीलपैकी कोणत्या घटनेशी संबंध आहे?

   1) विवाह    2) बाळाचा जन्म    3) वैधव्य      4) गृहप्रवेश

उत्तर :- 1

2) पुढे दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. – ‘दुस-यावर उपकार करणारा.’

   1) परावलंबी    2) पुरोगामी    3) पराधीन    4) परोपकारी

उत्तर :- 4

3) व्याकरणाच्या नियमानुसार बरोबर शब्द कोणता ते लिहा.

   1) आकुंचन    2) आंकुचन    3) आकूंचन    4) अकुंचन

उत्तर :- 1

4) ‘श’, ‘ष’, ‘स’, ही .................. व्यंजने आहेत.

   1) अर्धश्वर    2) कठोर      3) घर्षक      4) मृदू

उत्तर :- 3

5) ‘यशोधन’ या शब्दाचा संधी प्रकार ओळखा.

   1) स्वरसंधी    2) व्यंजनसंधी    3) विसर्गसंधी    4) पूर्वरूपकसंधी

उत्तर :- 3

6) ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग, वचन, विभक्ती यानुसार कोणताही बदल घडून येत नाही, अशा शब्दांना ............. म्हणतात.

   1) अविकारी    2) विकारी    3) पद      4) यापैकी नाही

उत्तर :- 1

7) खालील शब्दांपैकी ‘भाववाचक नाम’ ओळखा.

   1) माधुर्य    2) फुले      3) हसवणारा    4) सुंदर,

उत्तर :- 1

8) ‘आपण’ या सर्वनामाचा अर्थ जेव्हा ‘स्वत:’ असा होतो, तेव्हा ते ................. सर्वनाम असते.

   1) पुरुषवाचक    2) दर्शक      3) आत्मवाचक    4) प्रश्नार्थक

उत्तर :- 3

9) ‘रस्त्याच्या बाजूने काही मुले चालली होती’ या वाक्यात आलेल्या विशेषणाच्या बाबतीत पुढील कोणते विधान बरोबर आहे.

   1) हे गणनावाचक संख्याविशेषण आहे    2) हे क्रमवाचक संख्याविशेषण आहे
   3) हे पृथकत्ववाचक संख्याविशेषण आहे    4) हे अनिश्चितवाचक संख्याविशेषण आहे

उत्तर :- 4

10) खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही.

   1) पेरणे    2) उपरणे    3) वेचणे      4) उपणणे

उत्तर :- 2

भारतातल्या शिक्षकांना डिजिटल तंत्रज्ञानाविषयी प्रशिक्षण देण्यासाठी UNESCO आणि डेल कंपनीचा नवा उपक्रम


🔰शालेय शिक्षकांना वर्गात तंत्रज्ञान अवलंबण्यास सक्षम करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या डेल इंडिया या कंपनीने UNESCO MGIEP सोबत भारतातल्या शिक्षकांना डिजिटल तंत्रज्ञानाविषयी प्रशिक्षण देण्यासाठी एका नवीन भागीदारीची घोषणा केली आहे.

🔰या भागीदारीद्वारे, डेल कंपनीचा ‘डेल आरंभ - ए PC फॉर एज्युकेशन’ उपक्रम आणि UNESCO MGIEP याचे ‘फ्रेमरस्पेस’ व्यासपीठ एकत्र येऊन निवडक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी सहकार्य करणार आहेत.

🔴उपक्रमाविषयी

🔰UNESCO MGIEP याचे ‘फ्रेमरस्पेस’ व्यासपीठ शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी विश्लेषनाच्या अंतर्ज्ञानासह समृद्ध सामग्री निर्मिती क्षमता असलेल्या शिक्षकांना मदत करते.

🔰हा कार्यक्रम तीन टप्प्यात चालवला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ज्या शिक्षकांनी ‘डेल आरंभ’ फाउंडेशनचे प्रमाणपत्र प्राप्त केलेले आहे, त्यांना सामग्री तयार करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार. द्वितीय टप्प्यात ‘फ्रेमरस्पेस’चे 200 तासांचे प्रशिक्षण दिले जाणार. तिसर्‍या टप्प्यात कार्यक्रमाचे मूल्यांकन केले जाणार आहे.

🔰प्रतिबद्धतेच्या पहिल्या वर्षात आंध्रप्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यांमधल्या शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

🔰शाळांमध्ये शिक्षक, पालकांना संगणकाचे महत्त्व आणि त्याचा शिक्षणामधला उपयोग समजून घेण्यासाठी मदत करण्यासाठी ‘डेल आरंभ’ कार्यक्रम आधीपासूनच भारतात चालवला जात आहे. डिजिटल साक्षरता ही भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या विकासास उत्तेजन देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

🔰या भागीदारीमुळे संयुक्त राष्ट्रसंघाचे डिजिटल साक्षरतेचे ‘शाश्वत विकास ध्येय 4.7’ साध्य करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

🔴UNESCO MGIEP विषयी

🔰महात्मा गांधी शांती व शाश्वत विकास शिक्षण संस्था (MGIEP) हा संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) आणि भारत सरकारचा एक संयुक्त उपक्रम आहे. या संस्थेची स्थापना नोव्हेंबर 2012 मध्ये झाली आणि त्याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे. ही भारतातली पहिली UNESCO विशेषज्ञ शिक्षण संस्था आणि आशिया-प्रशांत प्रदेशातली पहिली ‘श्रेणी-1’ची संस्था आहे.

झटपट महत्त्वाचे 10 प्रश्न उत्तरे

१) खालील पैकी कोणाचा अखिल भारतीय कांग्रेस पक्षाच्या स्थापनेत सहभाग होता ?
अ) श्री. डब्ल्यू . सी. बॅनर्जी
ब)  श्री. दिनशॉ वाच्छा
क) श्री. विल्यम वेडेरबर्न
ड) वरील सर्व.✅

२) खालीलपैकी कोणती संघटना कांग्रेस प्रणित नाही?
अ) कांग्रेस सेवा दल
ब)  युक्रांद✅
क) एन एस यू आय
ड) आय एन टी यू सी

३) कांग्रेस पक्षातील हाय कमांड म्हणजे खालीलपैकी कोण असते?
अ) पक्षाध्यक्ष
ब) पक्ष उपाध्यक्ष
क) कांग्रेस कार्यकारी समिती ✅
ड) यापैकी नाही

४) खालीलपैकी योग्य विधाने निवडा.
१) राष्ट्रीय कॉंग्रेस ही लोकशाही तत्वावर आधारित असलेली संघटना होती.
२) १८८५ साली राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना झाली.
३) राष्ट्रीय सभेवर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव असला तरी दुसऱ्या महायुद्धात भारताने इंग्रजांना मदत करावी या गांधीजींच्या निर्णयाविरुद्ध राष्ट्रीय सभेने ठराव संमत केला होता.

अ) फक्त १ व ३
ब) फक्त १ व २
क) फक्त २ व ३
ड) वरील सर्व ✅

५) कॉंग्रेसमधील जहाल व मवाळ गटातील प्रमुख पूरक असलेले पर्याय निवडा ? 
१) विचारसरणीत  भिन्नता 
२) आंदोलन मार्गातील भिन्नता 
३) मागण्यात  भिन्नता 
४) स्वराज्य व स्वातंत्र्य मुद्यावर मतभेद 

अ) १, ३ व ४
ब) २, ३ व ४
क) १, २ व ३✅
ड) १, २ व ४

६)  खालीलपैकी कोणते उद्दिष्ट कॉंग्रेसच्या स्थापनेशी संबंधित नाही ?
   
अ) भारतीय लोकाचा असंतोष कमी करणे.
ब) इंग्रज प्रशासनाच्या चुका दुरुस्त करणे 
क) विविध प्रश्नावर लोकमत तयार करणे 
ड) जहाल व मवाळामध्ये समन्वय प्रस्थापित करणे✅

७) भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर राष्ट्रीय सभा बरखास्त करण्यात यावी असे खालीलपैकी कोणाचे मत होते ?

अ) सी. राजगोपालाचारी  
ब) आचार्य कृपलानी 
क) महात्मा गांधी ✅
ड) जयप्रकाश नारायण 

८) खालीलपैकी कोणती योजना कांग्रेस कार्यकाळातील नाही ?
अ) मनरेगा
ब) किसान विकास पत्र
क) सुकन्या समृद्धी✅
ड) अन्न सुरक्षा

९) २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला पूर्ण भारतात किती जागा मिळाल्या ?
अ) ४४ ✅
ब) ४८
क) ५२
ड) ६१

१०) खालीलपैकी कोणत्या कॉंग्रेस नेत्याने भारत देशाचे गृहमंत्रीपद भूषवले नाही?
अ) पी. चिदंबरम
ब) पी.व्ही. नरसिंहाराव
क) इंदिरा गांधी
ड) पृथ्वीराज चव्हाण ✅

_____________________________

झटपट महत्त्वाचे 10 प्रश्न उत्तरे

१) खालील पैकी कोणाचा अखिल भारतीय कांग्रेस पक्षाच्या स्थापनेत सहभाग होता ?
अ) श्री. डब्ल्यू . सी. बॅनर्जी
ब)  श्री. दिनशॉ वाच्छा
क) श्री. विल्यम वेडेरबर्न
ड) वरील सर्व.✅

२) खालीलपैकी कोणती संघटना कांग्रेस प्रणित नाही?
अ) कांग्रेस सेवा दल
ब)  युक्रांद✅
क) एन एस यू आय
ड) आय एन टी यू सी

३) कांग्रेस पक्षातील हाय कमांड म्हणजे खालीलपैकी कोण असते?
अ) पक्षाध्यक्ष
ब) पक्ष उपाध्यक्ष
क) कांग्रेस कार्यकारी समिती ✅
ड) यापैकी नाही

४) खालीलपैकी योग्य विधाने निवडा.
१) राष्ट्रीय कॉंग्रेस ही लोकशाही तत्वावर आधारित असलेली संघटना होती.
२) १८८५ साली राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना झाली.
३) राष्ट्रीय सभेवर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव असला तरी दुसऱ्या महायुद्धात भारताने इंग्रजांना मदत करावी या गांधीजींच्या निर्णयाविरुद्ध राष्ट्रीय सभेने ठराव संमत केला होता.

अ) फक्त १ व ३
ब) फक्त १ व २
क) फक्त २ व ३
ड) वरील सर्व ✅

५) कॉंग्रेसमधील जहाल व मवाळ गटातील प्रमुख पूरक असलेले पर्याय निवडा ? 
१) विचारसरणीत  भिन्नता 
२) आंदोलन मार्गातील भिन्नता 
३) मागण्यात  भिन्नता 
४) स्वराज्य व स्वातंत्र्य मुद्यावर मतभेद 

अ) १, ३ व ४
ब) २, ३ व ४
क) १, २ व ३✅
ड) १, २ व ४

६)  खालीलपैकी कोणते उद्दिष्ट कॉंग्रेसच्या स्थापनेशी संबंधित नाही ?
   
अ) भारतीय लोकाचा असंतोष कमी करणे.
ब) इंग्रज प्रशासनाच्या चुका दुरुस्त करणे 
क) विविध प्रश्नावर लोकमत तयार करणे 
ड) जहाल व मवाळामध्ये समन्वय प्रस्थापित करणे✅

७) भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर राष्ट्रीय सभा बरखास्त करण्यात यावी असे खालीलपैकी कोणाचे मत होते ?

अ) सी. राजगोपालाचारी  
ब) आचार्य कृपलानी 
क) महात्मा गांधी ✅
ड) जयप्रकाश नारायण 

८) खालीलपैकी कोणती योजना कांग्रेस कार्यकाळातील नाही ?
अ) मनरेगा
ब) किसान विकास पत्र
क) सुकन्या समृद्धी✅
ड) अन्न सुरक्षा

९) २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला पूर्ण भारतात किती जागा मिळाल्या ?
अ) ४४ ✅
ब) ४८
क) ५२
ड) ६१

१०) खालीलपैकी कोणत्या कॉंग्रेस नेत्याने भारत देशाचे गृहमंत्रीपद भूषवले नाही?
अ) पी. चिदंबरम
ब) पी.व्ही. नरसिंहाराव
क) इंदिरा गांधी
ड) पृथ्वीराज चव्हाण ✅

_____________________________