Saturday, 14 December 2019

महत्त्वाचे सराव प्रश्न 15/12/2019

1. दोन रेखावृत्तातील सर्वात जास्त अंतर विषुववृत्तावर ----- कि.मी. असते.
1. 110
2. 115
3. 105
4. 120
उत्तर : 110

2. भूऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र ------ येथे आहे.
1. पेंच
2. मणिकरण
3. कोयना
4. मंडी
उत्तर : मणिकरण

3. 'स्पीड पोस्ट' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
1. मुल्क राज आनंद
2. शोभा डे
3. अरुंधती राय
4. खुशवंत सिंग
उत्तर : शोभा डे

4. नियोजित आलेवाडी बंदर ------ जिल्ह्यात आहे.
1. सिंधुदुर्ग
2. ठाणे
3. रत्नागिरी
4. रायगड
उत्तर : ठाणे

5. ----- शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात.
1. मुंबई
2. बंगलोर
3. कानपूर
4. हैदराबाद
उत्तर : बंगलोर

6. ताशी 36 कि.मी. वेगाने धावणारी आगगाडी एक खांब 20 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती?
1. 20 मीटर
2. 200 मीटर
3. 180 मीटर
4. 360 मीटर
उत्तर : 200 मीटर

7. मुंबई उच्च न्यायालयाची ----- खंडपीठे आहेत.
1. दोन
2. तीन
3. चार
4. एक
उत्तर : तीन

8. राज्याचा आकस्मिक निधी ------ च्या अखत्यारीत असतो.
1. राज्यपाल
2. मुख्यमंत्री
3. मंत्रीपरिषद
4. राज्यविधानमंडळ
उत्तर : राज्यपाल

9. स्पायरोगायरा ----- शेवाळ आहे.
1. नील-हरित
2. हरित
3. लाल
4. रंगहीन
उत्तर : हरित

10. ------ वायु-57°से. पर्यंत थंड केल्यास तो स्थायूरूपात जातो, तेव्हा त्याला शुष्क (कोरडा) बर्फ म्हणतात.
1. नायट्रोजन
2. अमोनिया
3. हेलियम
4. कार्बन डाय-ऑक्साइड
उत्तर : कार्बन डाय-ऑक्साइड

11. हिर्याचा अपवर्तनांक किती?
1. 1.5
2. 1.6
3. 2.42
4. 1.33
उत्तर : 2.42

12. महाराष्ट्राच्या विधानसभेत निर्वाचित सभासदांची संख्या ------ आहे.
1. 250
2. 266
3. 288
4. 278
उत्तर : 288

13. 60 आणि दुसरी एक संख्या यांचा म.सा.वि. 12 आहे आणि त्यांचा ल.सा.वि. 240 आहे. दुसरी संख्या शोधा.
1. 4
2. 48
3. 720
4. 20
उत्तर : 48

14. इ.स. 1920 साली रेल्वे मार्गाच्या विस्ताराच्याबाबतीत भारताचा जगात ------ क्रमांक होता.
1. 4
2. 7
3. 2
4. 5
उत्तर : 4

15. ------ हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते.
1. दिनबंधु
2. दिन मित्र
3. दलित मित्र
4. दलित बंधु
उत्तर : दिनबंधु

16. गोपाल गणेश आगरकर यांनी कोणत्या विचारांचा पुरस्कार केला?
1. मानवतावाद
2. समाजवाद
3. बुद्धीप्रामाण्यवाद
4. सर्वकषवाद
उत्तर : बुद्धीप्रामाण्यवाद

17. गोपाल गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत?
1. मराठा
2. केसरी
3. ज्ञानप्रकाश
4. दर्पण
उत्तर : केसरी

18. शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला?
1. आर्य समाज
2. सत्यशोधक समाज
3. प्रार्थना समाज
4. ब्राम्हो समाज
उत्तर : सत्यशोधक समाज

19. 'सार्वजनिक सत्यधर्म' हे पुस्तक कोणी लिहिले?
1. लोकहितवादी
2. आगरकर
3. विठ्ठल रामजी शिंदे
4. महात्मा फुले
उत्तर : महात्मा फुले

20. महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते होते -----
1. अॅनी बेझंट
2. लोकमान्य टिळक
3. बॅरिस्टर खापरडे
4. डॉ. बी.एस. मुंजे
उत्तर : लोकमान्य टिळक
____________________________

1] कोणता दिवस भारतात ‘शहीद दिन’ म्हणून पाळला जातो?

A.   31 मार्च

B.   21 मार्च

C.   23 मार्च

D.   29 मार्च

💁‍♂ स्पष्टीकरण : (C) 23 मार्च
क्रांतीकारक भगतसिंग, शिवराम राजगुरू आणि सुखदेव थापर यांना श्रद्धांजली देण्यासाठी भारतात दरवर्षी 23 मार्चला ‘शहीद दिन’ पाळला जातो.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

2] कोणती व्यक्ती 2019 सालासाठी ‘100 मोस्ट इन्फ्लुएन्शियल पीपल इन क्लायमेट पॉलिसी’ या जागतिक यादीत समाविष्ट केले गेलेले केंद्रीय मंत्री आहेत?

A.   राजनाथ सिंग
B.   पियुष गोयल
C.   डॉ. हर्ष वर्धन
D.   (B) आणि (C)

💁‍♂ स्पष्टीकरण :(D) - (B) आणि (C)
‘100 मोस्ट इन्फ्लुएन्शियल पीपल इन क्लायमेट पॉलिसी’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध करण्यात आलेल्या हवामानविषयक बदलांमुळे उद्भवलेल्या समस्यांना हाताळणार्‍या जगातल्या 100 प्रभावशाली लोकांच्या यादीत सात भारतीयांचा समावेश केला गेला आहे.

अॅलेक्झांड्रिया ओकासिओ-कोर्टेझ (अमेरिकेच्या काँग्रेसच्या सदस्या) या यादीत अग्रस्थानी आहे.

तर यात समाविष्ट केल्या गेलेल्या सात भारतीयांची नावे - पियुष गोयल (रेल्वेमंत्री), डॉ. हर्ष वर्धन, मुक्ता तिलक, ज्योती किरीट पारीख, सुनिता नरैन, वंदना शिव, उपेंद्र त्रिपाठी.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

3] ……. रोजी ‘जागतिक क्षयरोग दिन’ पाळला जातो.

A.   29 मार्च
B.   24 मार्च
C.   23 मार्च
D.   25 मार्च

💁‍♂ स्पष्टीकरण : (B) 24 मार्च
दरवर्षी 24 मार्च या दिवशी जगभरात ‘जागतिक क्षयरोग दिन (World TB Day)’ पाळला जातो.

या दिनानिमित्त क्षयरोगाचे (TB) जागतिक ओझे प्रदर्शित केले जाते तसेच प्रतिबंधात्मक व निगा राखण्याचे प्रयत्न याविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली जाते.

यावर्षी हा दिवस “इट्स टाइम” या संकल्पनेखाली पाळण्यात आला.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

4] कोणत्या देशाने ‘SAFF महिला फुटबॉल अजिंक्यपद 2019’ या स्पर्धेचे जेतेपद जिंकले?

A.   भारत
B.   बांग्लादेश
C.   पाकिस्तान
D.   भुटान

💁‍♂ स्पष्टीकरण : (A) भारत
नेपाळमध्ये ‘SAFF महिला फुटबॉल अजिंक्यपद 2019’ या स्पर्धेचे जेतेपद भारताने जिंकले आहे.

स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान नेपाळचा पराभव करून सलग पाचव्यांदा जेतेपद पटकावले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
5] 18 मार्च 2019 रोजी मोझांबिकमध्ये भारतीय नौदलाने मानवतावादी सहाय्य पुरविण्यासाठी एक मोहीम सुरू केली. त्यामागचे कारण काय आहे?

A. मोझांबिकमध्ये विक्रमी अत्याधिक पाऊस पडला.
B. मोझांबिकला ‘इदाई’ चक्रीवादळाने तडाखा बसला.
C. मोझांबिकमध्ये त्सुनामीने धडक दिली
D. यापैकी नाही

💁‍♂ स्पष्टीकरण :  (B) मोझांबिकला ‘इदाई’ चक्रीवादळाने तडाखा बसला मोझांबिक या आफ्रिकी देशाच्या किनाऱ्याला दिनांक 15 मार्च 2019 रोजी ‘इदाई (Idai)’ चक्रीवादळाने तडाखा दिल्यानंतर स्थानिकांना मानवतावादी सहाय्य पुरविण्यासाठी भारतीय नौदलाची जहाजे पोहचली.

भारतीय नौदलाच्या पहिल्या ट्रेनिंग स्क्वाड्रनमधली ‘INS सुजाता’, ‘INS सारथी’ आणि ‘INS शार्दुल’ ही तीन जहाजे बैरा बंदराकडे वळवण्यात आली.

ही जहाजे दक्षिण हिंद महासागरात तैनात होती.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

[प्र.१] सरहिंद कालवा कोणत्या राज्यात आहे?

१] पंजाब  ✅✅
२] जम्मू काश्मीर
३] हिमाचल प्रदेश
४] उत्तराखंड

------------------------------------------------------------

[प्र.२] कोणत्या नदीच्या वायव्येस पंजाब हिमालय पसरला आहे?

१] सिंधू
२] सतलज ✅✅
३] चिनाब
४] रावी

----------------------------------------------------------

[प्र.३] हेमवती, सिरपा, लोकपावनी, सुवर्णावती या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?

१] कावेरी✅✅
२] कृष्णा
३] गोदावरी
४] इरावती

------------------------------------------------------------

[प्र.४] जारवा हि जमात कोठे आढळते?

१] निकोबार
२] छोटे अंदमान✅✅
३] अरुणाचल प्रदेश
४] लक्षद्वीप

------------------------------------------------------------

[प्र.५] खालील नद्यांचे खोरे त्यांच्या क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने लावा.
अ] गंगा नदी खोरे
ब] महानदी खोरे
क] कृष्णा नदी खोरे
ड] नर्मदा नदी खोरे

पर्याय
१] अ-ब-क-ड
२] अ-क-ब-ड ✅✅
३] अ-क-ड-
४] ड-ब-क-अ

-------------------------------------------------------------

[प्र.६] खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य पर्याय निवडा.
अ] ऑस्ट्रेलियाकडून भारताला खाद्यतेलाची आयात करावी लागते.
ब] महाराष्ट्र व पश्चिम बंगाल हे वृत्तपत्रांच्या कागद निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत.

१] फक्त अ योग्य
२] फक्त ब योग्य
३] दोन्ही योग्य ✅✅
४] दोन्ही अयोग्य

------------------------------------------------------

[प्र.७] खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य पर्याय निवडा.
अ] रावतभाटा हा औष्णिक विद्युत प्रकल्प राजस्थान राज्यात आहे.
ब] कुदनकुलम प्रकल्पाला अमेरिकेचे सहाय्य लाभले आहे.

१] फक्त अ योग्य
२] फक्त ब योग्य
३] दोन्ही योग्य
४] दोन्ही अयोग्य ✅✅

----------------------------------------------------------

[प्र.८] खालीलपैकी कोणते वृक्ष हिमालयात आढळत नाहीत?
अ] फर
ब] महोगनी
क] स्प्रुस

१] फक्त अ
२] फक्त ब✅✅
३] फक्त क
४] वरील सर्व

-----------------------------------------------------------

[प्र.९] कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या वनांशी संबंधित आहे?
१] उष्णकटिबंधीय आर्द्र वने
२] उष्ण निम वाळवंटी वने
३] उष्णकटिबंधीय शुष्क वने
४] उष्णकटिबंधीय उपआर्द्र वने ✅✅

----------------------------------------------------------

[प्र.१०] उष्णप्रदेशीय पानझडी वनांच्या बाबतीत अयोग्य विधान निवडा.
अ] या वनांत साग, साल, पळस हे वृक्ष आढळतात.
ब] २०० सेमी पर्यंत पाउस पडतो.
क] यांना "मौसमी वने" असेही म्हणतात.
ड] जहाजबांधणीसाठी यांचा उपयोग होतो.

१] अ अयोग्य
२] ब अयोग्य
३] अ, ब आणि क अयोग्य
४] वरीलपैकी एकही नाही. ✅✅

------------------------------------------------------------

१) खालील पैकी कोणाचा अखिल भारतीय कांग्रेस पक्षाच्या स्थापनेत सहभाग होता ?
अ) श्री. डब्ल्यू . सी. बॅनर्जी
ब)  श्री. दिनशॉ वाच्छा
क) श्री. विल्यम वेडेरबर्न
ड) वरील सर्व.✅

२) खालीलपैकी कोणती संघटना कांग्रेस प्रणित नाही?
अ) कांग्रेस सेवा दल
ब)  युक्रांद✅
क) एन एस यू आय
ड) आय एन टी यू सी

३) कांग्रेस पक्षातील हाय कमांड म्हणजे खालीलपैकी कोण असते?
अ) पक्षाध्यक्ष
ब) पक्ष उपाध्यक्ष
क) कांग्रेस कार्यकारी समिती ✅
ड) यापैकी नाही

४) खालीलपैकी योग्य विधाने निवडा.
१) राष्ट्रीय कॉंग्रेस ही लोकशाही तत्वावर आधारित असलेली संघटना होती.
२) १८८५ साली राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना झाली.
३) राष्ट्रीय सभेवर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव असला तरी दुसऱ्या महायुद्धात भारताने इंग्रजांना मदत करावी या गांधीजींच्या निर्णयाविरुद्ध राष्ट्रीय सभेने ठराव संमत केला होता.

अ) फक्त १ व ३
ब) फक्त १ व २
क) फक्त २ व ३
ड) वरील सर्व ✅

५) कॉंग्रेसमधील जहाल व मवाळ गटातील प्रमुख पूरक असलेले पर्याय निवडा ? 
१) विचारसरणीत  भिन्नता 
२) आंदोलन मार्गातील भिन्नता 
३) मागण्यात  भिन्नता 
४) स्वराज्य व स्वातंत्र्य मुद्यावर मतभेद 

अ) १, ३ व ४
ब) २, ३ व ४
क) १, २ व ३✅
ड) १, २ व ४

६)  खालीलपैकी कोणते उद्दिष्ट कॉंग्रेसच्या स्थापनेशी संबंधित नाही ?
   
अ) भारतीय लोकाचा असंतोष कमी करणे.
ब) इंग्रज प्रशासनाच्या चुका दुरुस्त करणे 
क) विविध प्रश्नावर लोकमत तयार करणे 
ड) जहाल व मवाळामध्ये समन्वय प्रस्थापित करणे✅

७) भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर राष्ट्रीय सभा बरखास्त करण्यात यावी असे खालीलपैकी कोणाचे मत होते ?

अ) सी. राजगोपालाचारी  
ब) आचार्य कृपलानी 
क) महात्मा गांधी ✅
ड) जयप्रकाश नारायण 

८) खालीलपैकी कोणती योजना कांग्रेस कार्यकाळातील नाही ?
अ) मनरेगा
ब) किसान विकास पत्र
क) सुकन्या समृद्धी✅
ड) अन्न सुरक्षा

९) २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला पूर्ण भारतात किती जागा मिळाल्या ?
अ) ४४ ✅
ब) ४८
क) ५२
ड) ६१

१०) खालीलपैकी कोणत्या कॉंग्रेस नेत्याने भारत देशाचे गृहमंत्रीपद भूषवले नाही?
अ) पी. चिदंबरम
ब) पी.व्ही. नरसिंहाराव
क) इंदिरा गांधी
ड) पृथ्वीराज चव्हाण ✅

_____________________________

स्पर्धा परीक्षा तयारी उपयुक्त महत्वपूर्ण सराव प्रश्नावली

विषय : चालू घडामोडी प्रश्नावली स्पष्टीकरण

प्र.१) कोणत्या संस्थेने भारतात प्रथमच नॅनो तंत्रज्ञानावर आधारित असलेली खते सादर केली आहेत?
अ) नॅनोधान       ब) कजरी       क) राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था
ड) भारतीय शेतकरी खते सहकारी मर्यादित (IFFCO) ✅
 
स्पष्टीकरण :  भारतीय शेतकरी खते सहकारी मर्यादित (IFFCO)  संस्थेने भारतात प्रथमच नॅनो तंत्रज्ञानावर आधारित असलेली खते सादर केली आहेत.

प्र.२) खालीलपैकी कोणता देश ‘प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी’चा सदस्य नाही?
अ) म्यानमार        ब) चीन    क) बांगलादेश ✅   ड) कंबोडिया
 
स्पष्टीकरण : खालीलपैकी बांगलादेश देश ‘प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी’चा

प्र.३) .....................मध्ये १६ वी ‘ASEAN-भारत शिखर परिषद’ आयोजित करण्यात आली.
अ) भारत     ब) थायलंड ✅
क) ब्रुनेई     ड) चीन
 
स्पष्टीकरण : थायलंड मध्ये १६ वी ‘ASEAN-भारत शिखर परिषद’ आयोजित करण्यात आली.

प्र.४) .....................या संघाने ‘रग्बी विश्‍वकरंडक २०१९’ जिंकला.
अ) अमेरिका     ब) कॅनडा   
क) जर्मनी    ड) दक्षिण आफ्रिका ✅
 
स्पष्टीकरण : दक्षिण आफ्रिका या संघाने ‘रग्बी विश्‍वकरंडक २०१९’ जिंकला.

प्र.५) ताश्केंत या शहराजवळ चिरचीक येथे भारत आणि उझबेकिस्तान यांचा.....................या नावाने संयुक्त लष्करी सराव सुरू झाला.
अ) इकुव्हेरिन २०१९  
ब) डस्ट्लिक २०१९ ✅
क) शक्ती २०१९          
ड) मैत्री २०१९
 
स्पष्टीकरण : ताश्केंत या शहराजवळ चिरचीक येथे भारत आणि उझबेकिस्तान यांचा डस्ट्लिक २०१९ या नावाने संयुक्त लष्करी सराव सुरू झाला.

प्र.६) कोणती संस्था इस्रोच्या सहकार्याने अंतराळ तंत्रज्ञान कक्ष (STC) याची स्थापना करणार आहे?
अ) आयआयटी हैदराबाद     
ब) आयआयटी दिल्ली ✅
क) आयआयटी मुंबई          
ड) आयआयएस्सी बंगळूर
 
स्पष्टीकरण : आयआयटी दिल्ली संस्था इस्रोच्या सहकार्याने अंतराळ तंत्रज्ञान कक्ष (STC) याची स्थापना करणार आहे.

प्र.७) कुमार झा यांनी _ याचा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदाचा भार स्वीकारला.
अ) कोल इंडिया लिमिटेड  ✅
ब) ऑईल अँड नॅच्यरल गॅस कॉर्पोरेशन
क) ऑईल इंडिया लिमिटेड       
ड) भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड
 
स्पष्टीकरण : कुमार झा यांनी कोल इंडिया लिमिटेड याचा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदाचा भार स्वीकारला.

प्र.८) ASEAN, RCEP आणि पूर्व आशिया शिखर परिषदांमध्ये भाग घेण्यासाठी आपल्या अधिकृत दौऱ्‍यात थायलंडच्या बँकॉक या शहरात भारतीय स्थलांतरितांना संबोधताना पंतप्रधान मोदींनी     .....................यांच्या स्मृतीत एका स्मारक नाण्याचे अनावरण केले.
अ) गुरुनानक देव   ✅   
ब) महात्मा गांधी
क) परमहंस योगानंद    
ड) स्वामी विवेकानंद
 
स्पष्टीकरण : ASEAN, RCEP आणि पूर्व आशिया शिखर परिषदांमध्ये भाग घेण्यासाठी आपल्या अधिकृत दौऱ्‍यात थायलंडच्या बँकॉक या शहरात भारतीय स्थलांतरितांना संबोधताना पंतप्रधान मोदींनी गुरुनानक देव यांच्या स्मृतीत एका स्मारक नाण्याचे अनावरण केले.

प्र.९) सप्टेंबर महिन्यात रशियामध्ये झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या(SCO) संयुक्त लष्करी सरावाचे नाव काय आहे?
अ) सेंटर २०१९  ✅
 ब) SCO मिशन २०१९
क) फँटम फ्युरी    
ड) फायर अँड फ्युरी
 
स्पष्टीकरण : सप्टेंबर महिन्यात रशियामध्ये झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या(SCO) संयुक्त लष्करी सरावाचे नाव सेंटर २०१९ आहे.

प्र.१०) कोणत्या सरकारी रुग्णालयात भारतात प्रथमच ‘रोबोटिक सर्जरी’ची सुविधा सुरू करण्यात आली?
अ) डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालय, नवी दिल्ली
 ब) सफदरजंग सरकारी रुग्णालय, नवी दिल्ली ✅
क) सर जे. जे. हॉस्पिटल, मुंबई
ड) IPGME&R अँड SSKM हॉस्पिटल, कोलकाता

📚 स्पष्टीकरण :  सफदरजंग सरकारी रुग्णालय, नवी दिल्ली सरकारी रुग्णालयात भारतात प्रथमच ‘रोबोटिक सर्जरी’ची सुविधा सुरू करण्यात आली.
 

मराठी प्रश्नसंच

*1】' कवल ' या शब्दाच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा.?*

1) कलह, भांडण
2) *घास, मिठी ☑*
3) मिठी, उडी
4) पाट, नदी

*2】' डांगोरा एक नगरीचा ' या साहित्याचे लेखक कोण ?*

1) *त्र्यं. वि. सरदेशमुख ☑*
2) सदानंद देशमुख
3) माणिक गोडघाटे
4) जयंत पवार

*3】' एखाद्यावर शिव्यांचा वर्षाव करणे ' या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा. ?*

1) भडीमार
2) शीघ्रकोपी
3) *लाखोळी ☑*
4) लब्धबोल

*4】वेगळा पर्याय निवडा.*
*उर्वी, पृथ्वी, धरित्री, यज्ञाची जमीन?*

1) उर्वी
2) यज्ञाची जमीन
3) पृथ्वी
4) *यापैकी नाही ☑*

*5】' नापसंत ' या शब्दाचा समास सांगा.?*

1) अव्ययीभाव समास
2) *तत्पुरुष समास ☑*
3) द्वंद्व समास
4) बहूव्रिही समास

*6】' येडुळ बेडुळ ' या शब्दाचा अर्थ सांगा?*

1) लहानसहान
2) *ओबडधोबड ☑*
3) येरागबाळा
4) येता जाता

*7】' रोराण करणे ' म्हणजे काय?*

1) लबाडी करणे
2) हेळसांड करणे
3) *रीरी करणे ☑*
4) मोठेपणा करणे

*8】'शिळ्या कढीला ऊत आणणे' वाक्प्रचाराचा अर्थ सांगा ?*

1) *मागाहून अवसान आणणे ☑*
2) शिळे अन्न खाणे
3) नको ते उद्योग करणे
4) मानहानी करणे

*9】जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले - प्रयोग ओळखा ?*

1) कर्तरी
2) कर्मणी
3) *भावे ☑*
4) संकर

*10】' पावक ' या शब्दाचा पुढीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही ?*

1) *पल्लव ☑*
2) वन्ही 
3) अनल
4) विस्तव

*11】तेलगू भाषिक नसलेला शब्द ओळखा.?*

1) बंडी
2) *खलबत्ता ☑*
3) शिकेकाई
4) अनारसा

*12】पोर्तुगीज शब्द ओळखा.?*

1) *तंबाखू ☑*
2) टेबल
3) कामगार
4) मालक

*13】गुजराथी शब्द ओळखा.?*

1) कोहळा
2) *डांगर ☑*
3) कलिंगड
4) आवळा

*14】हिंदी शब्द ओळखा.?*

1) *मिलाप ☑*
2) दुभाषी
3) मेहनत
4) कसाई

*15】तमिळ शब्द ओळखा.?*

1) डबी
2) डबा
3) *टेंगुळ ☑*
4) गुडघा

*16】अनुक्रमे पुलिंगी-स्त्रीलिंगी-नपुसकलिंगी असलेला पर्याय ओळखा?*

1) मन-भाव-भावना
2) वाट-रास्ता-वळण
3) *देश-मातृभूमी-राष्ट्र ☑*
4) पाणी-लाट-समुद्र

*17】खलीलपैकी वेगळा पर्याय ओळखा?*

1) नोटा
2) लाटा
3) *गोटा ☑*
4) वाटा

*18】' रुधिर ' या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा?*

1) पाणी   
2) *रक्त ☑*
3) म्हातारा
4) दारू

*19】कोल्हा : लबाड : : सिंह : ?*

1) चपळ
2) *हिंस्र ☑*
3) राजा
4) आळशी

*20】कपडा शिवताना कडेने सोडलेल्या जागेस काय म्हणतात?*

1) *माया ☑*
2) तट
3) सूत  
4) तीर

*21】अष्टपैलू साहित्यिक म्हणून कोणास ओळखले जाते?*

1) प्र. के.  अत्रे
2) पु. ल. देशपांडे
3) वि. स. खांडेकर #
4) रा. ग. गडकरी

*22】मराठी नवकवितेचे जनक कोणास @ म्हटले जाते?*

1) केशवसुत
2) कुसुमाग्रज
3) *बा. सी. मर्ढेकर ☑*
4) नारायण सुर्वे

*23】अष्टपैलू साहित्यिक म्हणून कोणास ओळखले जाते?*

1) प्र. के.  अत्रे
2) *पु. ल. देशपांडे ☑*
3) वि. स. खांडेकर
4) रा. ग. गडकरी

*24】वेगळा पर्याय निवडा ?*

1) अडककित्ता
2) *चेंडू ☑*
3) बांबू           
4) खिंड

*25】मोरूची मावशी या नाटकाचे नाटककार कोण?*

1) *प्र. के. अत्रे ☑*
2) रा. ग. गडकरी
3) पु. ल. देशपांडे
4) वि. वा. शिरवाडकर

*26】मोठा भाऊ या टोपणनावाने कोणास ओळखले जाते?*

1) *वि. वा. शिरवाडकर ☑*
2) प्र. के. अत्रे
3) कृ. के. दामले  
4) चि. त्र्यं. खानोलकर

महत्वाचे प्रश्नसंच

1) सर्वोच्च न्यायालयाचे 45th सरन्यायाधीश कोण?
>न्या. दीपक मिश्रा.

2) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
> न्या. H. L. दत्तू.

3) महाराष्ट्राचा राष्ट्रीय खेळ कोणता?
> कबड्डी.

4) देशाची पहिली आणि एकमेव महिला राष्ट्रपती कोण?
> प्रतिभाताई पाटील.

5) भारताची कोकिळा कोणाला म्हणले गेले?
>सरोजिनी नायडू.

6) महाराष्ट्रातील सर्वांत उंच धबधबा कोणता?
>ठोसेघर (ठाणे).

7) महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत?
>6.

8) मुहंमद बिन तुघलक ने राजधानी दिल्ली हुन कोठे हलवली?
>दौलताबाद.

9) Peoples education Society ची स्थापना कोणी केली?
>डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

10) Film and Television Institute कोठे आहे?
> पुणे.

11) 2016 संयुक्त राष्ट्रात कोणता भारतीय सण साजरा केला गेला?
> दिवाळी.

12) 1937 साली व्हेनिस चित्रपट महोत्सवात पाठवण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट कोणता ?
> संत तुकाराम.

13) कॅरमवर पावडर कशासाठी टाकतात ?
> घर्षण कमी करण्यासाठी.

14) बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे ?
> औरंगाबाद.

15) महाराष्ट्र केसरी कशाशी संबंधित आहे ?
> कुस्ती.

16) कोणता व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात नाही ?
> कर्नाळा.

17) पैठण कशासाठी प्रसिध्द आहे ?
> पैठणी साडी.

18) 'माझी जन्मठेप' हे पुस्तक कोणाचे आहे ?
> वि. दा. सावरकर.

19) लक्षद्वीप कोठे आहे ?
>अरबी समुद्र.

20) नागपूर कशासाठी प्रसिद्ध आहे ?
> संत्री.

21) 2016 सालचा कबड्डी विश्वचषक कोणी जिंकला ?
> भारत.

22) पर्जन्यमान कमी होण्याचे कारण कोणते आहे ?
> जागतिक तापमानवाढ

पोलीस भरती भूगोल प्रश्नसंच 14/12/2019

०१. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?
>>> बियास

०२. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
>>>तिरुवनंतपुरम

०३. कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?
>>>मध्य प्रदेश

०४. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
>>>औरंगाबाद

०५. हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?
>>> रांची

०६. फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
>>> जळगाव

०७. मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?
>>> लक्षद्वीप

०८. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
>>> १२ लाख चौ.कि.मी.

०९. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?
>>> दख्खनचे पठार

१०. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
>>> मध्य प्रदेश

११. महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला  सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
>>> उत्तर

१२. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?
>>> निर्मळ रांग

१३. 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?
>>> नदीचे अपघर्षण

१४. दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
>>> Lignite

१५. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
>>> औरंगाबाद

१६. Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
>>> पाचगणी

१७. हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
>>> आसाम

१८. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
>>> मणिपूर

१९. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?
>>> मरियाना गर्ता

२०. गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?
>>> राजस्थान

२१. घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?
>>> दुर्गा

२२. ग्रेट बॅरियर रीफ' कोणत्या महासागरात आहे?
>>> प्रशांत महासागर

२३. या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?
>>> शुक्र

२४. कोणत्या नदीचे गौतमी आणि वशिष्ठ हे दोन प्रकार आहेत?
>>> गोदावरी

२५.  भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते?
>>> आसाम

२६. जगोई, चोलोम व थांग-ता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत?
>>> मणिपुरी

२७. भारतातील कोणत्या राज्यात ड्यूक्स नोज हे शिखर आहे?
>>> महाराष्ट्र

२८. इरुवका हा सण कोणत्या भारतीय राज्यातील शेतकर्यांद्वारे साजरा केला जातो?
>>> आंध्र प्रदेश

२९. पॉपीर आणि चालो नृत्य कोणत्या राज्यातील आहे?
>>> अरूणाचल प्रदेश

३०. वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?
>>> महाराष्ट्र

३१. लावी जत्रा भारतातील कोणत्या राज्यात भरते?
>>> हिमाचल प्रदेश

३२. फिग्रीन ऑफ गोरा देव' (tribal horse God) ही कोणत्या भारतीय प्रदेशातील कला आहे?
>>> गुजरात

३३. पनिहारी भारतातील कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे?
>>> राजस्थान

३४. कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे?
>>> सिक्किम

३५. झाबुआ हा आदिवासी भाग कोणत्या राज्यात आहे?
>>> मध्य प्रदेश

३६. भारतात वनांखालील सर्वाधीक भूभाग कोणत्या राज्यात आहे?
>>> मध्य प्रदेश

३७. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे?
>>> नंदुरबार

३८. कोणत्या राज्यात रबराची सर्वाधीक लागवड होते?
>>> केरळ

३९. महाराष्ट्रातील कोणता प्रदेश 'तलावाचा प्रदेश' म्हणून ओळखला जातो?
> >> पूर्व विदर्भ

४०. राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला ?
>>> अहमदनगर

४१. महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे ?
>>> नर्मदा

४२. 'श्रीशैल्यम जलविद्युत प्रकल्प' कोणत्या नदीवर बांधलेला आहे ?
>>> कृष्णा

४३. महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?
>>> ९%

४४. महाराष्ट्रातील कोणत्या सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे?
>>> उत्तर सीमेला

४५. महाराष्ट्राला किती किमी चा समुद्रकिनारा लाभला आहे?
>>> ७२० किमी

४६. कोल्हापूर हे शहर कोणत्या नद्या च्या काठावर वसले आहे?
>>> पंचगंगा

४७. महाराष्ट्रात सह्य़ाद्री पर्वताची लांबी किती कि.मी. आहे?
>>> ४४० कि.मी.

४८. महाराष्ट्रातील राळेगणसिध्द हे गाव कोणत्या तालुक्यात आहे?
>>> पारनेर (अहमदनगर जिल्हा)

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...