Wednesday, 11 December 2019

गंगा: मोठ्या नद्यांच्या श्रेणीमध्ये जगातल्या 10 सर्वात स्वच्छ नद्यांपैकी एक


गंगा नदी ही मोठ्या नद्यांच्या श्रेणीमध्ये जगातल्या 10 सर्वात स्वच्छ नद्यांपैकी एक बनली आहे.

ठळक बाबी

🔸गेल्या पाच वर्षांमध्ये स्वच्छ गंगा अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे आणि ज्यामुळे गंगामधील पाण्याची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात सुधारली आहे. त्यामुळे जलजीवनात वाढ झालेली आहे.

🔸पाच वर्षांपूर्वी केवळ दहापटच गंगेटीक डॉल्फिन पाहिल्या गेल्या होत्या, परंतू यावेळी 2 हजाराहून अधिक डॉल्फिन आढळल्या आहेत आणि इतरही जलचर जीवनात सुधारणा झाली आहे. कचर्‍यामध्येही मोठ्या प्रमाणात सुधारणा पाहिली गेली आहे.

🔸या उपक्रमामध्ये ‘सी-गंगा’ (सेंटर फॉर गंगा रिव्हर बेसिन मॅनेजमेंट अँड स्टडीज), IIT, NIT, NEERI या शैक्षणिक संस्थांची भूमिका उल्लेखनीय आहे. तसेच युरोपीय संघ, जर्मनी, डेन्मार्क, इस्त्राएल, जापान आणि कॅनडा या देशांचे सहकार्य देखील लाभले.

🔸जगात उपलब्ध असलेल्या पिण्याच्या पाण्यापैकी केवळ 4 टक्के पाणी भारताकडे आहे तर जगातली 18 टक्के लोकसंख्या आणि समतुल्य पशुधन भारतात आहे. सर्वाधिक धरणे असलेल्या देशांमध्ये आज भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे.

भारत सरकारचा पुढाकार

भारत सरकारच्या पुढाकाराने 2016 साली राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाला सुरुवात झाली. या अभियानाच्या अंतर्गत सांडपाणी, कचर्‍याची विल्हेवाट याच्यासंबंधित जवळपास 305 प्रकल्प हाती घेण्यात आले. त्यालाच जलशक्ती अभियानाची जोड मिळाली.

दिनांक 9 ऑक्टोबर 2018 रोजी काढलेल्या अधिसूचनांनुसार, भारत सरकारने गंगा नदीच्या उगमापासून ते उन्नाव (उत्तरप्रदेश) पर्यंत किमान पर्यावरण-विषयक प्रवाह राखण्यासाठी अधिसूचित केले आहे.

गंगा नदी

गंगा नदी ही दक्षिण आशियातली भारत व बांग्लादेश या दोन देशातून वाहणारी एक प्रमुख नदी आहे. ब्रह्मपुत्रा नदीनंतर ही भारतातली सर्वात मोठी नदी आहे. गंगा नदीची लांबी 2,525 किलोमीटर आहे आणि तिचा उगम भारतातील उत्तराखंड राज्यात हिमालय पर्वतातल्या गंगोत्री येथे होतो. तेथून ती आग्नेय दिशेला वाहत येते व उत्तर भारतातल्या गंगेच्या खोऱ्यातून वाहत बांग्लादेशात प्रवेश करते. बांग्लादेशात ती बंगालच्या उपसागराला मिळते.

दिवान हाऊसिंग फायनॅन्स कॉर्पोरेशन लिमिटेड (DHFL): NCLT कडे जाणारी पहिली वित्तीय सेवा कंपनी


-  भारतीय रिझर्व्ह बँकेनी दिवान हाऊसिंग फायनॅन्स कॉर्पोरेशन लिमिटेड (DHFL) या आर्थिक अडचणीत आलेल्या कर्जदात्या कंपनीला दिवाळखोरीच्या प्रक्रियेसाठी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायपीठ (NCLT) याकडे पाठविले, ज्यामुळे ती राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायपीठ (NCLT) याकडे जाणारी पहिली वित्तीय सेवा कंपनी ठरली आहे.

- दिवान हाऊसिंग फायनॅन्स कॉर्पोरेशन लिमिटेड (DHFL) या कंपनीवर 83,873 कोटी रुपयांचे कर्ज आहे.

- आर. सुब्रमण्यकुमार हे DHFL यकंपन RBIने नियुक्त केलेले प्रशासक आहेत. एकदा का NCLT द्वारे त्यांची नियुक्ती मंजूर झाल्यावर ते या प्रकरणाची सूत्रे स्वीकारतील.

▪️राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायपीठ (NCLT) बाबत

- राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायपीठ (National Company Law Tribunal -NCLT) ही भारतातली अर्ध-न्यायिक मंडळ आहे जी भारतीय कंपन्यांच्या संबंधित प्रकरणाचा न्यायनिवाडा करते. त्याचे पीठ नवी दिल्लीत आहे.

- NCLT याची स्थापना ‘कंपनी कायदा-2013’ अन्वये केली गेली आणि भारत सरकारच्या वतीने 1 जून 2016 रोजी त्याची स्थापना करण्यात आली. मंडळाची स्थापना न्यायमूर्ती जैन समितीच्या शिफारसीवर आधारित आहे.

General Knowledge

1) अॅम्बेसेडर्स चॉइस: स्क्रीनिंग ऑफ फिल्म्स” हा कार्यक्रम कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला?
उत्तर : रियाध

2) चौथी ‘भारत जल प्रभाव शिखर परिषद’ कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली?
उत्तर : नवी दिल्ली

3) नागरी संरक्षण दिन कोणत्या दिवशी पाळला जातो?
उत्तर : 6 डिसेंबर

4) 17 व्या ‘हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप’ शिखर परिषदेचे उद्घाटन कधी झाले?
उत्तर : 6 डिसेंबर 2019

5) कोणत्या संशोधन संस्थेनी मधुमेहावर उपचारासाठी औषध विकसित केले?
उत्तर : वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन मंडळ

6) ‘भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन’ कधी साजरा केला जातो?
उत्तर : 7 डिसेंबर

7) कोणत्या क्रिकेट संघाने 2019 या वर्षाचा ‘CMJ स्पिरिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड’ जिंकला?
उत्तर : न्युझीलँड

8) औरंगाबाद येथे खेळवल्या गेलेल्या राष्ट्रीय शालेय बुद्धीबळ स्पर्धेत कुणी सुवर्णपदक जिंकले?
उत्तर : शशिनी पुवी

9) कोणत्या विमा कंपनीने "माय:हेल्थ वुमन सुरक्षा पॉलिसी" सादर केली आहे?
उत्तर : HDFC एरगो

10) WHO ने कोणते वर्ष ‘परिचारिका व सुईणी यांचे वर्ष’ म्हणून पाळण्याची घोषणा केली आहे?
उत्तर : वर्ष 2020

मानव विकास निर्देशांक 2019 [Human Development Index 2019]

- जारी करणारी संस्था - UNDP
- निकष: दीर्घ आणि निरोगी जीवन, ज्ञानाची सुगमता, योग्य राहणीमान

- भारताचा क्रमांक - 188 देशांच्या यादीत 129 वा (2018 साली 130 वा)
- भारताचा HDI - 0.647 
- भारताचा समावेश - मध्यम मानव विकास गटात

2019 च्या HDI नुसार प्रथम 5 देश
1. नॉर्वे (HDI - 0.954)
2. स्वित्झर्लंड (HDI - 0.946)
3. आयर्लंड (HDI - 0.942)
4. जर्मनी (HDI - 0.939)
5. हँगकाँग (HDI - 0.939)

मानव विकास निर्देशांकात ब्रिक्स राष्ट्रे 
1. चीन 85 वा क्रमांक
2. ब्राझील 79 वा क्रमांक
3. दक्षिण आफ्रिका 113 वा क्रमांक
4. रशिया 49 वा क्रमांक
5. भारत 129 वा क्रमांक

भारताच्या  शेजारील राष्ट्रे व त्यांचा HDI नुसार क्रमांक
1. नेपाळ 147
2. पाकिस्तान 152
3. बांग्लादेश 135
4. श्रीलंका 71

HDI मध्ये जगातील शेवटचे राष्ट्र 
1. नायजर - 189 वा
2. मध्य आफ्रिकन रिपब्लिक - 188 वा
3. चाड - 187 वा
4. दक्षिण सुदान - 186 वा
5. बुरुंडी - 185 वा

शस्त्र कायदा 1969, मध्ये सुधारणा करणार्‍या विधेयकाला लोकसभेची मंजुरी

2 पेक्षा जास्त बंदूक जवळ बाळगण्यास या विधेयकामुळे प्रतिबंध बसणार आहे. कायद्यातील सध्याच्या तरतुदीनुसार एका व्यक्‍तीस तीन बंदुका जवळ बाळगता येतात.

काही अपवाद वगळता नागरिकांना यापुढील काळात दोनपेक्षा जास्त बंदुका जवळ ठेवता येणार नाही.

शस्त्र सुधारणा कायद्याचे उल्‍लंघन करणार्‍यांना 10 वर्षाच्या तुरुंगवासाची आणि दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे.

लष्कर किंवा पोलिसांची शस्त्रे लुटल्यास, संघटित गुन्हेगारी टोळ्यांसाठी शस्त्रांचा वापर केल्यास, अवैधरित्या शस्त्रांची तस्करी तसेच बेदरकारपणे शस्त्रांचा वापर केल्यास दोषींना जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेला सामोरे जाण्याची तरतूदही विधेयकात करण्यात आली आहे.

लग्‍नसमारंभ वा इतर कार्यक्रमांच्या ठिकाणी गोळीबार केल्याचे सिध्द झाल्यास दोन वर्षाच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली असून एक लाख रुपयांचा दंडही भरावा लागणार आहे.

कायद्यातील नव्या तरतुदीमुळे खेळाडुंना शस्त्र बाळगण्यावर मर्यादा येणार नाहीत.

अवैधरित्या शस्त्रांची निर्मिती वा त्याची विक्री करणार्‍यांना सात वर्षे ते जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली असून अशी शस्त्रे बाळगणार्‍यांसाठी सात ते चौदा वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

चालू घडामोडी प्रश्नसंच

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 दरवर्षी _______ या दिवशी नागरी संरक्षण दिन पाळला जातो.

(A) 1 मार्च
(B) 6 डिसेंबर✅✅
(C) 4 डिसेंबर
(D) 26 नोव्हेंबर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 _____ या शहरात चौथी ‘भारत जल प्रभाव शिखर परिषद’ आयोजित करण्यात आली.

(A) नवी दिल्ली✅✅
(B) मुंबई
(C) लखनऊ
(D) चेन्नई

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 ‘एकलव्य मॉडेल निवासी शाळा अखिल भारतीय क्रिडा स्पर्धा’ _______ येथे आयोजित करण्यात आली आहे.

(A) भोपाळ✅✅
(B) मुंबई
(C) चेन्नई
(D) लखनऊ

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणी ‘मिस युनिव्हर्स 2019’चा किताब जिंकला?

(A) मॅडिसन अँडरसन
(B) झोजिबिनी टुंझी✅✅
(C) वर्तिका सिंग
(D) सोफिया अरागॉन

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 दरवर्षी ______ हा दिवस आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो.

(A) 7 डिसेंबर
(B) 9 डिसेंबर✅✅
(C) 26 नोव्हेंबर
(D) 1 ऑक्टोबर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणती व्यक्ती भारताचे प्लॉगमॅन म्हणून प्रसिद्ध आहे?

(A) नारायणन किशोर
(B) रिपू ​​दमन बेवली✅✅
(C) राम सिंग यादव
(D) नितेंद्र सिंग रावत

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) खालीलपैकी किती संमतिदर्शक अव्यये आहे.

     हां, जी, जीहां, ठीक, बराय, हाँ, अच्छा

   1) सर्व      2) सहा      3) पाच      4) चार

उत्तर :- 1

2) ‘मी निबंध लिहीत असे’ या वाक्यातील काळ ओळखा.

   1) अपूर्ण भूतकाळ    2) रीती वर्तमानकाळ 
   3) रीती भूतकाळ    4) रीती भविष्यकाळ

उत्तर :- 3

3) “हंस” या शब्दाचा विरुध्दलिंगी शब्द शोधा.

   1) हंसी    2) हंसा      3) हंसीण      4) हंसीका

उत्तर :- 1

4) रामाहून गोविंदा मोठा आहे.
     अधोरेखित शब्दातील विभक्ती प्रत्ययाचा कारकार्थ खालीलपैकी कोणता आहे ?

   1) कर्ता    2) संप्रदान    3) अपादान    4) करण

उत्तर :- 3

5) वाक्यप्रकार ओळखा.
     आई वडिलांचा मान राखावा.

   1) आज्ञार्थी    2) विध्यर्थी   
   3) संकेतार्थी    4) वरीलपैकी कोणतेही नाही

उत्तर :- 2

6) ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ या वाक्यात विधेय कोणते आहे?

   1) गावा    2) आमुच्या   
   3) आम्ही    4) जातो

उत्तर :- 4

7) ‘तुम्ही कामे केलीत’, हे वाक्य कोणत्या प्रयोग प्रकारातील आहे ?

   1) कर्तृ – कर्मसंकर  2) कर्मकर्तरी   
   3) कर्तृ – भावसंकर  4) कर्मृ – भावसंकर

उत्तर :- 1

8) खालील शब्दाचा समास ओळखा. – ‘सादर’

   1) विभक्ती – तत्पुरुषस      2) सहबहुव्रीही   
   3) व्दंव्द        4) नत्र बहुव्रीही

उत्तर :- 2

9) वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास खालीलपैकी कोणत्या विरामचिन्हाचा वापर कराल.

   1) पूर्णविराम    2) अर्धविराम   
  3) स्वल्पविराम    4) अपूर्णविराम

उत्तर :- 4

10) पुढील शब्दातील तद्भव शब्द ओळखा.

   1) जल      2) गाव     
   3) एजंट    4) मंजूर

उत्तर :- 2

ज्वालामुखी चे प्रकार

ज्वालामुखीचे वर्गीकरण पुढील मुद्द्याच्या आधारे केले जाते एक उद्रेकाचे स्वरूप उद्योगाचा कालखंड व त्याची क्रियेचे स्वरूप
*1】 उद्रेकाच्या स्वरूपानुसार*

*अ】मध्यवर्ती केंद्रीय प्रकार*  [Central Type]
जेव्हा ज्वालामुखी मध्यवर्ती नलिका किंवा एक नलिकेद्वारे लावारस बाहेर पडतो त्याला मध्यवर्ती प्रकार असे म्हणतात अशा प्रकारचे ज्वालामुखी प्रक्षोभक व विध्वंसक असतात.
उदाहरण इटलीमधील *व्हेसूव्हिएस* , जपानमधील *फुजियामा* पर्वत .

*१】ज्वालामुखी स्तंभ :*
ज्वालामुखीच्या अंतिम अवस्थेमध्ये या नलिकेत लाव्हारसाचे निक्षेपण होते आणि ती थंड होऊन लाव्हास्तंभाची निर्मिती होते त्याला ज्वालामुखी स्तंभ असे म्हणतात.

*२】क्रेटर /कुंड :*
ज्वालामुखी शंकूच्या शिरोभागात तयार होणाऱ्या गर्त किंवा विस्तृत खोलगट भागाला क्रेटर असे म्हणतात.
उदाहरण *आलास्का* मधील मृत ज्वालामुखी *अँनिअँकचॅक* या क्रेटरचा व्यास 11 किमी आहे.

*३】 घरट्याकार /क्रेटर /निडाभ कुंड:*
ज्वालामुखीचा पुन्हा उद्रेक झाल्यास क्रेटर मध्येच लहान-लहान शंकू तयार होतात या भुरूपाला घरट्याकार क्रेटर असे म्हणतात. उदाहरण *व्हेसूव्हिएस* ज्वालामुखी, *फिलिपिन्समधील मऊताल*
.
*४】 कँलडेरा /महाकुंड :*
भूगर्भातील शीलारसाचा कोठीमधून जेव्हा भयंकर विस्पोट होतो तेव्हा ज्वालामुखीच्या शिरोभागाचा बराचसा भूभाग अंतराळात फेकला जातो आणि तेथे विस्तीर्ण काहिलीसारखा खोल खड्डा निर्माण होतो याला कॅलडेरा असे म्हणतात.
उदाहरण *इंडोनेशियामधील* *क्राकाटोआ* , *वेस्टइंडीज* मधील *पिली पर्वत* , *अलास्का* मधील *कॅटमई* पर्वत.

*ब】 भेगी उद्रेकाचे ज्वालामुखी(Fissure type of Volcanoes)*
अशाप्रकारचे उद्रेक प्रस्तरभंग ,भ्रंश आणि भेगीमध्ये आढळतात.

*१】लाव्हा शंकू:* ज्वालामुखीच्या नलिकेभोवती लाव्हा रसाचे निक्षेपण होते व त्यास शंक्वाकृती आकार प्राप्त होतो म्हणून त्याला लाव्हा शंकू असे म्हणतात .
त्याचे दोन उपप्रकार पाडले जातात

*a) ॲसिड लाव्हा शंकु:*
ॲसिड लाव्हारस घट्ट असल्याने त्यापासून निर्माण होणाऱ्या ॲसिड लाव्हा शंकू जास्त उंचीचा व कमी विस्ताराचा असतो ,या शंकूचा उतार तीव्र स्वरूपाचा असतो.

*b) बेसिक लाव्हा शंकु:*
लाव्हा पातळ असल्याने या पासून तयार होणाऱ्या बेसिक लाव्हा शंकूची उंची कमी असते आणि त्याचा विस्तार जास्त असतो ,या शंकुचा उतार मंद स्वरूपाचा असतो.

*२】 राख किंवा सिंडर शंकु:*
ज्वालामुखीचा उद्रेक होऊन ज्वालामुखीय राख मोठ्या प्रमाणात बाहेर पडते ,ज्वालामुखीय राखेमध्ये धुळे राख खडकाचे लहान-मोठे तुकडे वगैरे पदार्थाचा समावेश होतो ,हे पदार्थ ज्वालामुखी भोवती असतात यापासून तयार होणाऱ्या शंक्वाकृती रुपाच राख व सिंडर संकु म्हणतात

*३】 संमिश्र शंकु:*
एखाद्या उद्रेकाच्या वेळी फक्त लाव्हारस बाहेर पडतो व त्याचे ज्वालामुखी भोवती निक्षेपण होते आणि काही काळ उद्रेक  होण्याचे थांबते पुन्हा काही दिवसांनी ज्वालामुखी जागृत होऊन उद्रेकाच्या वेळी ज्वालामुखी राख बाहेर पडते त्या मधून धूळ ,खडक ,खडकांचे तुकडे इत्यादी पदार्थ बाहेर पडतात आणि त्यांचे निक्षेपण होते अशा रीतीने आलटून-पालटून लाव्हारस आणि ज्वालामुखीय राखेचे थर जमा होऊन तयार होणार्‍या ज्वालामुखीस *संमिश्र शंकु* असे म्हणतात.

*2】 उद्रेकाचा कालखंड आणि त्यांच्या क्रीयेच्या स्वरूपानुसार*

*अ】 जागृत ज्वालामुखी :*
ज्वालामुखी मधून ज्वालामुखीचा उद्रेक सतत होत असतो तसेच त्यांच्या उद्रेक केव्हाही होऊ शकतो त्यांना जागृत ज्वालामुखी असे म्हणतात जगामध्ये सुमारे 500 जागृत ज्वालामुखी आहेत.
उदाहरण भूमध्य समुद्रातील *सिसिली* बेटा मधील *स्ट्रोम्बोली* हा जागृत ज्वालामुखी असून त्याला *भूमध्य समुद्रातील द्वीपगृह* असे म्हटले जाते कारण ते सातत्याने वायूचे ज्वलन करत आणि प्रकाशमान प्रदीप्त असतात.

*ब】 निद्रिस्त ज्वालामुखी:*
ज्वालामुखी मधून एकेकाळी जागृत ज्वालामुखी प्रमाणे सतत उद्रेक होत असत परंतु सध्या उद्रेक होणे थांबली आहे आणि पुन्हा अचानक पणे उद्रेक होण्याची शक्यता आहे अशा ज्वालामुखीस निद्रिस्त ज्वालामुखी असे म्हणतात.
उदाहरण *इटलीमधील व्हेसूव्हिएस* ज्वालामुखीचा उद्रेक इ.स.79 मध्ये झाला अधून मधून उद्रेक होतात अलीकडे 1944 साली ज्वालामुखीचा उद्रेक झाला, त्यापैकी सर्वात भीषण उद्रेक 1906 साली  झाला , अलास्का मधील कॅटमई पर्वत.

क】 *मृत ज्वालामुखी* :
ज्वालामुखी मध्ये पुर्वी एकेकाळी उद्रेक होत असत ,आता उद्रेक होत नाही त्यास मृत ज्वालामुखी असे म्हणतात .
उदाहरण *जपानमधील* *फुजियामा* पर्वत.

पोलीस भरतीसाठी आजचे महत्त्वाचे प्रश्न

1) नवी दिल्लीत तिसर्‍या ‘राष्ट्रीय सार्वजनिक खरेदी परिषद’चे उद्घाटन कुणाच्या हस्ते झाले?
उत्तर : वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल

2) भारत आणि रशिया या देशांदरम्यानचा संयुक्त त्रैसेवा लष्करी सरावाचे नाव काय आहे?
उत्तर : इंद्र

3) ‘हीट वेव्ह 2020’ या दोन दिवसांच्या कार्यशाळेचे उद्घाटन कोठे झाले?
उत्तर : बेंगळुरू

4) UNICEFच्या ‘डॅनी काय ह्यूमॅनिटेरियन अवॉर्ड’ या पुरस्काराने कुणाला सन्मानित करण्यात आले?
उत्तर : प्रियंका चोप्रा

5) नागालँड राज्याने कोणत्या दिवशी द्वितीय ‘मधमाशी दिन’ साजरा केला?
उत्तर : 5 डिसेंबर

6) देशातला पहिला कॉर्पोरेट बाँड ETF कोणता आहे?
उत्तर : भारत ETF

7) ISRO ने कुठे नवीन ‘स्पेस टेक्नॉलॉजी इंक्युबेशन सेंटर’ उघडले आहे?
उत्तर : तिरुचिरापल्ली

8) द्वितीय ‘स्टार्टअप इंडिया ग्लोबल व्हेंचर कॅपिटल समिट’ या परिषदेचे आयोजन कुठे झाले?
उत्तर : गोवा

9) PACS 2019 हा कार्यक्रम कुठे आयोजित करण्यात आला?
उत्तर : हवाई

10) ‘UNCTAD B2C ई-कॉमर्स इंडेक्स 2019’ याच्यानुसार, भारताचा क्रमांक काय आहे?
उत्तर : 73 वा

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...