०९ डिसेंबर २०१९

तुम्हाला हे माहितीच हवे - भारतातील सर्वात मोठे 10 चर्चित घोटाळे

⭐️ देशाच्या स्वातंत्र्यापासून ते आतापर्यंत देशात अनेक मोठे घोटाळे झाले आहे. परंतु आज आम्ही आपणास अशा घोटाळ्यांची माहिती देत आहोत ज्याची जगभरात चर्चा झाली.

1⃣ जीप घोटाळा : हा देशातील सगळ्यात पहिला घोटाळा होता. भारताला स्वांतत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारने लंडनमधील एका कंपनीसोबत 2000 जीपचा करार केला होता. हा करार 80 लाखांचा होता. मात्र 155 जीपच मिळू शकल्या. या घोटाळ्यात भारतीय उच्चायुक्त व्ही.के.मेनन यांचा हात असल्याचे वृत्त समोर आले होते.

2⃣ कोळसा घोटाळा : या घोटाळ्यात कोळशाचे चुकीच्या पद्धतीने वाटप झाले. कोणतीही सनदी प्रक्रिया न करता कोळशाच्या ब्लॉकचा लिलाव करण्यात आला, ज्यामुळे 1.86 लाख कोटींचे नुकसान झाले. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात हा घोटाळा झाला.

3⃣ तेलगी स्टॅम्प घोटाळा : बनावट मुद्रांक शुल्क घोटाळ्यात अब्दुल करीम तेलगीने देशाला जवळपास 20 हजार कोटींचा चुना लावला होता. अब्दुल करीम तेलगीने बनावट स्टॅम्प पेपर छापले होते. या बनावट स्टॅम्प पेपरची बँका आणि अनेक संस्थांना त्याने विक्री केली होती.

4⃣ बोफोर्स तोफ घोटाळा : 1987 मध्ये स्वीडनची एक कंपनी बोफोर्स एबी कडून लाच घेतल्याप्रकरणी राजीव गांधीसकट अनेक मोठे नेते अडकले होते. प्रकरण असे होते की भारतीय 155 मिमी च्या फिल्ड हॉवीत्जरच्या बोलीवर या नेत्यांनी जवळपास 64 कोटींचा घपला केला होता.

5⃣ 2जी स्पेक्ट्रम घोटाळा : 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा भारतातील सर्वात मोठा घोटाळा आहे. हा एकूण 1.76 लाख करोड रुपयांचा घोटाळा झाला. माजी दूरसंचार मंत्री ए राजा आणि कनिमोळी यांना या घोटाळ्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

6⃣ कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा : कॉमनवेल्थ घोटाळ्यामध्ये जवळपास 70 हजार कोटींचा घोटाळा उघड आला होता. घोटाळ्याचे सूत्रधार होते आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी आणि त्यांचे सहकारी.या घोटाळ्यात यंत्रसामग्री निश्चित किमतीपेक्षा दुपटीने खरेदी करण्यात आली होती.

7⃣ सत्यम घोटाळा : सत्यम घोटाळा कॉर्पोरेट जगतातील आतापर्यंतचा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. आयटी कंपनी 'सत्यम कंम्प्यूटर सर्विस'ने रियल इस्टेट आणि शेअर मार्केटच्या माध्यमातून जवळपास 14 हजार कोटींची आफरातफरी केली होती.

8⃣ चारा घोटाळा : 1996 मध्ये चारा घोटाळ्यात 900 कोटींचे नुकसान झाले, जी त्या काळची सर्वात मोठी रक्कम होती. या घोटाळ्यात बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव मुख्य आरोपी आहेत.

9⃣ हवाला स्कँडल : हवाला स्कँडल 1996 मध्ये जनतेसमोर आले. यात ज्यांची नावे समोर आली ते सरकार चालवत होते. अनेक नेत्यांवर आरोप लागले की, ते हवालाच्या दलालांकडून लाच घेत होते. या घोटाळ्यात भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण अडवाणी यांचे नाव समोर आले होते.

🔟 स्टॉक मार्केट घोटाळा : स्टॉक ब्रोकर केतन पारेखने स्टॉक मार्केटमध्ये 1,15,000 कोटींचा घोटाळा केला होता. डिसेंबर, 2002 मध्ये त्याला अटक करण्यात आले होते.

विज्ञान - शोध व संशोधक

01) विमान – राईट बंधू

02) डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल

03) रडार - टेलर व यंग

04) रेडिओ - जी. मार्कोनी

05) वाफेचे इंजिन - जेम्स वॅट

06) थर्मामीटर - गॅलिलीयो

07) हेलीकॉप्टर - सिकोर्स्की

08) विजेचा दिवा - एडिसन

09) रेफ्रीजरेटर - पार्किन्स

10) वनस्पातींनाही संवेदना असतात - जगदीशचंद्र बोस

11) सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन

12) सायकल - मॅकमिलन

13) डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल

14) रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी

15) टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल

16) ग्रामोफोन - एडिसन

17) टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड

18) पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग

19) उत्क्रांतिवाद - डार्विन

20) भूमिती - युक्लीड

21) देवीची लस - जेन्नर

22) अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस

23) अँटी रेबीज -लुई पाश्चर

24) इलेक्ट्रोन – थॉमसन

25) हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश

26) न्यूट्रोन – चॅडविक

27) आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर

28) विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे

29) कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल

30) गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन

विषय : चालू घडामोडी प्रश्नावली स्पष्टीकरण

प्र.१) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (IMF) प्रभारी व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले आहे?

अ) डेव्हिड लिप्टन ✅    
ब) गीता गोपीनाथ
क) रॉड्रिगो रॅटो    
ड) डॉमिनिक स्ट्रॉउस-कान

स्पष्टीकरण : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (IMF) प्रभारी व्यवस्थापकीय संचालक म्हणून डेव्हिड लिप्टन यांची नियुक्त करण्यात आले आहे.

प्र.२) भारत आणि ......... गुंतवणूक सुलभ करण्यासाठी फास्ट-ट्रॅक व्यवस्था उभारणार आहे.

अ) इटली ✅
ब) फ्रान्स      
क) जर्मन
ड) अमेरिका

स्पष्टीकरण : भारत आणि इटली गुंतवणूक सुलभ करण्यासाठी फास्ट-ट्रॅक व्यवस्था उभारणार आहे.

प्र.३) फिजी या देशाची राजधानी कोणती आहे?

अ) ओस्लो    
ब) हवाना    
क) हेलसिंकी    
ड) सुवा ✅

स्पष्टीकरण : फिजी या देशाची राजधानी सुवा हि आहे.

प्र.४) कोणती व्यक्ती आशियायी क्रीडापटू संघाच्या क्रीडापटू आयोगाची सदस्य आहे?

अ) कर्णम मल्लेश्‍वरी    
ब) पी. टी. उषा ✅
क) अंजली भागवत    
ड) मेरी कोम

स्पष्टीकरण : पी.टी.उषा हि व्यक्ती आशियायी क्रीडापटू संघाच्या क्रीडापटू आयोगाची सदस्य आहे.

प्र.५) ऑक्टोबरमध्ये होणारी ‘ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट २०१९’ ही परिषद कुठे भरणार आहे?

अ) श्रीनगर    ✅
ब) जयपूर      
क) विजयवाडा    
ड) मुंबई

स्पष्टीकरण : ऑक्टोबरमध्ये होणारी ‘ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट २०१९’ ही. परिषद श्रीनगर या ठिकाणी भरणार आहे.

प्र.६) फिजी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर कोणाची नेमणूक झाली?

अ) न्या. चंद्रचूड    
ब) न्या. लोकूर ✅
क) न्या. कमल कुमार    
ड) न्या. ए. के. मिश्रा

स्पष्टीकरण : फिजी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर न्या.लोकूर यांची नेमणूक झाली.

प्र.७) ग्वाटेमाला या देशाचे नवे राष्ट्रपती कोण?

अ) सँड्रा टॉरेस    
ब) जिमी मोरालेस
क) अलेजान्ड्रो मालडोनाडो    
ड) अलेजान्ड्रो गियामॅटी ✅

स्पष्टीकरण : ग्वाटेमाला या देशाचे नवे राष्ट्रपती अलेजान्ड्रो गियामॅटी हे आहेत.

प्र.८) इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकॅडमीच्या (INSA) प्रथम महिला अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली?

अ) चंद्रिमा शहा  ✅
ब) देविका लाल
क) सुब्रत बॅनर्जी    
ड) कविता देसाई

स्पष्टीकरण : इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकॅडमीच्या (INSA) प्रथम महिला अध्यक्ष म्हणून चंद्रिमा शहा यांची निवड झाली.

प्र.९) मोटरस्पोर्ट्सच्या शर्यतीचे विश्‍वकरंडक जिंकणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण आहे?

अ) अरमान इब्राहिम    
ब) आदित्य पटेल
क) ऐश्‍वर्या पिसे    ✅
ड) समीरा सिंग 

स्पष्टीकरण : मोटरस्पोर्ट्सच्या शर्यतीचे विश्‍वकरंडक जिंकणारी पहिली भारतीय व्यक्ती ऐश्वर्या पिसे आहे.

प्र.१०) 39 व्या जागतिक कवी परिषदेचे उद्घाटन ____ येथे झाले.

अ) भोपाळ
ब) नवी दिल्ली
क) भुवनेश्वर ✅
ड) आग्रा

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...