Friday, 6 December 2019

Super - 30 Question 7/12/2019

1.  संविधान दिन कधी साजरा केला जातो?
✅.  26 नोव्हेंबर

2.   “मिलन 2020” नावाचा बहुपक्षीय नौदल सराव कुठे होणार आहे?
✅.   विशाखापट्टनम

3.    उत्तरप्रदेश राज्य सरकारने कोणत्या रोगासाठी लसीकरण मोहीम राबवविण्यास सुरुवात केली?
✅.   फायलेरिया

4.    कोणत्या राज्याने भ्रष्टाचाराच्या तक्रारींसाठी 14400 हा मदत क्रमांक सेवेत चालू केला आहे?
✅.  आंध्रप्रदेश

5.  राष्ट्रीय प्रतिकांचा गैरवापर केल्यास किती दंड ठोठावला जाऊ शकतो?
✅.   : रु. 500

6.   ‘मुत्सद्देगिरी निर्देशांक 2019’ याच्या यादीत भारताचा क्रमांक कोणता आहे?
✅     12 वा

7.    कोणत्या राज्यात रॉकेट लॉन्चिंग पॅड उभारण्याचा प्रस्ताव सरकारने मांडला आहे?
✅.   तामिळनाडू

8.  ‘युवाह’ नावाचा युवा कौशल्य उपक्रम कोणाच्या वतीने राबवण्यास सुरूवात झाली?
✅.   : संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF)

9.    NuGen मोबिलिटी शिखर परिषदेचे उद्घाटन कुठे झाले?
✅.   हरयाणा

10.  कोणत्या पत्रकाराने या वर्षीचा ‘CPJ आंतरराष्ट्रीय पत्र स्वातंत्र्य पुरस्कार’ जिंकला?
✅.    नेहा दिक्षित

11.   भारतीय अन्नपदार्थ महामंडळाचे (FCI) अधिकृत भांडवल किती रुपयांपर्यंत पर्यंत वाढविण्यात आले आहे?
✅.  : 10,000 कोटी रुपये

12.    15 वी उच्च शिक्षण शिखर परिषद कोणातर्फे भरविण्यात आली?
✅.   FICCI

13.    “ISROने ‘कार्टोसॅट-3’ उपग्रह कोणत्या केंद्रावरून प्रक्षेपित करण्यात आला?
✅.   सतीश धवन अंतराळ केंद्र

14.    भारत-श्रीलंका यांच्यादरम्यान ‘मित्र शक्ती’ नावाचा संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम कुठे होणार आहे?
✅.    पुणे

15.   नागालँडमध्ये कितव्या ‘हॉर्नबिल महोत्सव’चा शुभारंभ झाला?
✅.  20 व्या

16.    पहिली ‘भारत-जापान 2+2 परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री बैठक’ कुठे आयोजित करण्यात आली?
✅.   नवी दिल्ली

17.   "सेल इंडिया 2019" हा नौकानयन कार्यक्रम कुठे आयोजित करण्यात आला?
✅.  मुंबई

18.   कामगार मंत्रालयाद्वारे कोणत्या काळात निवृत्तीवेतन आठवडा पाळला जात आहे?
✅.  30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर

19.    फास्टॅगची सक्ती करण्यासाठी त्याच्या अंमलबजावणीसाठी वाढीव मुदत किती आहे?
✅.   15 डिसेंबर 2019

20.    कोणत्या दिवशी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो?
✅.  1 डिसेंबर

21.   सोन्याच्या दागिन्यांसाठी “हॉलमार्किंग” कधीपासून अनिवार्य करण्यात येणार आहे?
✅.  सन 2021

22.    नोव्हेंबर 2019 मध्ये कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींना 20 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली?
✅.  सुरिनम

23.   कोणत्या दिवशी पॅलेस्टिनी लोकांसह एकनिष्ठता विषयी आंतरराष्ट्रीय दिन पाळला जातो?
✅.    29 नोव्हेंबर

24.    कोणत्या व्यक्तीला 2019 सालाचा 55वा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला?
✅.   अकीथम अचुथन नामबूथीरी

25.     भारताच्या पंतप्रधानांनी श्रीलंका या देशासाठी किती पतमर्यादा निश्चित केल्याची घोषणा केली?
✅.    450 दशलक्ष डॉलर

26.    “अर्ली इंडियन्सः द स्टोरी ऑफ अवर अ‍ॅन्सेस्टर्स अँड व्हेअर वूई केम फ्रॉम” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
✅.   टोनी जोसेफ

27.    अंदमान निकोबार कमांडचे 14 वे कमांडर-इन-चीफ कोण आहेत?
✅.   पोडाली शंकर राजेश्वर

28.    अलीकडेच मेघालायमध्ये आढळून आलेल्या नव्या मत्स्यप्रणालीचे नाव काय आहे?
✅.    शिस्टुरा सींगकई

29.    ‘2019 अबू धाबी ग्रँड प्रिक्स’ ही मोटार शर्यत कोणी जिंकली?
✅.   लुईस हॅमिल्टन

30.    “आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिन” कधी साजरा केला जातो?
✅.   3 डिसेंबर

भारतीय सशस्त्र सेना झेंडा दिवस-7 डिसेंबर

👉आज आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. म्हणजेच भारतीय सशस्त्र सेना झेंडा दिवस. यानिमित्त जाणून घेऊया भारतीय सशस्त्र सेना झेंडा दिवसाबद्दल सर्व काही... 

👉भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर सैनिक कल्याणाच्या व्यवस्थापनेसाठी 1949 ला 7 डिसेंबर हा दिवस सशस्त्र दल ध्वजदिन म्हणून साजरा करण्यात आला.

✅ संकल्पना काय? :

👉नागरिकांना सैनिकांचे स्मरण म्हणून एक छोटा ध्वज भेट द्यायचा आणि त्याच्या बदल्यात नागरिकांकडून देणगी स्वीकारायची.

✅ध्वजनिधी कोण जमा करते? :

👉देशातील जनता, जिल्हा सैनिक बोर्ड शाळा, कॉलेज व सामाजिक संस्था. निधी देणारांना लाल, निळा व गडद निळ्या रंगांमध्ये असलेले फ्लॅग दिले जातात.

✅ दिवस का साजरा केला जातो?:

👉 भारतीय सैनिकांच्या परिवाराच्या कल्याणासाठी.

👉 देशसेवेत असणाऱ्या सैनिकांपैकी निवृत्त होणाऱ्या सैनिकांसाठी.

👉 युद्धांमध्ये शहीद होणाऱ्या सैनिकांच्या परिवाराच्या मदतीसाठी.

👉 देशातील शहीद वीरांच्या श्रद्धांजलीसाठी.

✅ निधी कोठे वापरतात? :

👉 सैनिकी विद्यार्थ्यांचे वसतीगृहे या निधीतून चालविली जातात.

👉 नैसर्गिक आपत्तीच्यावेळी या निधीचा उपयोग केला जातो.

👉 युद्धात अपंगत्व आलेल्या जवानांसाठी या निधीचा उपयोग केला जातो.

👉माजी सैनिकांच्या पुनर्वसनाच्या योजना राबविण्यासाठी ही रक्कम वापरतात.

👉 फ्लॅगचे तीन रंग म्हणजे : जिल्हा सैनिक बोर्ड,
राज्य सैनिक बोर्ड व
केंद्रिय सैनिक बोर्ड यांचे प्रतीक.

✅ दिवस कसा साजरा होतो? :

👉सशस्त्र सेना झेंडा दिवसानिमित्त सैन्यासाठी विशेष कार्यक्रम असतात.

👉 या कार्यक्रमात तीनही सैन्यदल आपापले कौशल्य दाखवतात.

👉 अनेक सैनिकांच्या कारकिर्दीतील शौर्याचा गौरव केला जातो.

👉 शहिदांची आठवण ठेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते.

👉 नागरिक आपल्या इच्छेनुसार ध्वजदिन निधी देतात.

👉 देणगी देणाऱ्या व्यक्तीला आभार म्हणून एक छोटा ध्वज देतात.

भारताची राज्यघटना प्रश्नसंच 7/12/2019

१) खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळते ?

   1) एका विशिष्ट धर्माच्या उत्तेजनासाठी : अनुच्छेद – 26 कर देण्याचे स्वातंत्र्य
   2) धार्मिक व्यवहारांच्या व्यवस्थापनाचे : अनुच्छेद – 27 स्वातंत्र्य

   3) ठराविक शैक्षणिक संस्थामध्ये धार्मिक : अनुच्छेद – 28 शिक्षण किंवा धार्मिक उपासनांना उपस्थित राहण्याचे स्वातंत्र्य

   4) शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा : अनुच्छेद – 29 आणि त्याचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्याकांचा हक्क

उत्तर :- 3

२) ‘कायद्यापुढील समानता’ (Equality before Law) हा नियम अनिर्बंध नाही. त्याबाबतीत घटनात्मक आणि अन्य अपवाद   आहेत. खालीलपैकी कोणते अनुच्छेद 14 ला अपवाद आहेत ?

   अ) भारताचे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना काही विशेष हक्क आहेत.

   ब) संसद सदस्य आणि राज्याच्या विधीमंडळाचे सदस्य यांच्याविरुध्द त्यांनी संसदेत अथवा राज्य विधीमंडळात केलेल्या  भाषणाबद्दल कोणत्याही न्यायालयात खटला चालविता येत नाही.

   क) परदेशी दूत आणि राजनीतीज्ञ यांना फौजदारी दाव्याबाबत विशेष हक्क नाहीत तर केवळ दिवाणी दाव्याबाबत आहेत.

   ड) अनुच्छेद 31 – C हा अनुच्छेद 14 ला अपवाद आहे.

    1) अ, ब आणि क
    2) ब, क आणि ड
   3) अ, ब, क आणि ड 
   4) अ, ब आणि ड

उत्तर :- 4

३).  भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्यात आला आहे ?

    1) तिस-या भागात
    2) पहिल्या भागात 
   3) चौथ्या भागात   
   4) दुस-या भागात

उत्तर :- 3

४) भारत सरकार अधिनियम, 1935 मधील ‘सूचनापत्राचा’ समावेश 1950 च्या भारतीय संविधानात कसा केला आहे ?

   1) मूलभूत हक्क   
  2) मार्गदर्शक तत्त्वे   
  3) मूलभूत कर्तव्ये   
  4) केंद्र सूची

उत्तर  :- 2

५) भारतीय राज्यघटनेच्या IV थ्या विभागात 42 व्या घटनादुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणती उपकलमे समाविष्ट करण्यात आली?

   अ) कलम 39 – समान न्याय आणि मोफत कायदेविषयक सहाय्य

   ब) कलम 43 – उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांना सहभाग

   क) कलम 48 – पर्यावरणात सुधारणा आणि जंगले व वन्यजीव यांचे संरक्षण

   1) फक्त अ  
   2) फक्त ब आणि क
   3) फक्त अ आणि क
   4) वरील सर्व

उत्तर :- ४

6) खालीलपैकी कोणते उद्दिष्ट राज्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समाविष्ट नाही ?

   1) गो हत्या थांबविणे.    

   2) कुटिरोद्योगांची स्थापना करणे.

   3) आंतरराष्ट्रीय शांतता वृध्दिंगत करणे.

      4) देहांताची शिक्षा रद्द करणे.

उत्तर:- 4

7) खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्वाचे मूलभूत अधिकारात रूपांतर झाले आहे ?

   1) काम करण्याचा अधिकार 
    2) माहितीचा अधिकार
   3) चांगल्या पर्यावरणाचा अधिकार         4) शिक्षणाचा अधिकार

उत्तर :- 4

8) ‘मार्गदर्शक तत्त्वे को-या चेकप्रमाणे आहेत त्यांचे वटविणे बँकेच्या इच्छेवर सोडलेले आहे.’ असे कोणी म्हटले आहे ?

   1) डॉ. बी. आर. आंबेडकर  
   2) प्रो. के. टी. शाह
   3) एन. जी. रांगा    
   4) बी. एन. राव

उत्तर :- 2

9) समान नागरी कायदा निर्माण न होण्यामागील कारणे पुढीलप्रमाणे –
   अ) स्वधर्माचा अवाजवी अभिमान   

   ब) परधर्मियांबाबतची साशंकता

   क) राजकीय इच्छाशक्तीचा अभाव 

    ड) राष्ट्रीय ऐक्यभावनेचा अभाव

   1) अ, ब    2) ब, क  
   3) क, ड      4) अ, ड

उत्तर :- 3

10) राज्यनितीच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या संदर्भात कोणते गुणवैशिष्टय गैरलागू ठरते ?

   1) मूलभूत अधिकारांशी अनुरूप  

2) न्यायालयीन निर्णय योग्य

   3) परविर्तनीय     

  4) कल्याणप्रद

उत्तर :- 2

11) पुढील दोन पैकी कोणते विधान बरोबर आहे ?

   अ) भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 23 मध्ये “प्रदूषण मुक्त, स्वच्छ पर्यावरणाची” हक्क अंतर्भूत आहे.

   ब) जर असे पर्यावरण धोक्यात आले तर नागरिकांना संविधानाच्या कलम 34 खाली ते दूर करण्यास्तव हक्क असेल.

   1) अ   
  2) ब    
3) दोन्ही    
4) एकही नाही
उत्तर :- 4

12) भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावरील मर्यादा आहेत :

   अ) देशाची सुरक्षा
    ब) न्यायालयांचा अवमान
   क) बदनामी   
  ड) भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता

   1) फक्त अ, ब, क  2) फक्त अ, क, ड    3) फक्त अ, ब, ड    4) वरील सर्व

उत्तर :- 4

13). कोणत्या घटनादुरुस्तीनुसार अनु. जाती / जमाती आणि इतर मागास वर्गासाठी खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये   राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत ?

   1) 92 व्या    2) 93 व्या   
3) 94 व्या    4) 95 व्या

उत्तर :- 2

14) स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारामध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याच्या अधिकाराचा समावेश ................. व्या घटनादुरुस्तीने
      करण्यात आला.

   1) 97    
  2) 96    
  3) 95   
  4) 94

उत्तर :- 1

15) खालील विधाने विचारात घ्या :

   अ) ‘राज्य हे सहा वर्षापासून ते चौदा वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देईल’ हा त्यांचा मूलभूत हक्क आहे.

ब) ‘जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या आपल्यास अथवा पाल्यास त्याच्या सहाव्या वर्षापासून ते चौदाव्या  वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे’ हे त्याचे मूलभूत कर्तव्य आहे.

   क) ‘राज्य हे बालकांचे  वय सहा वर्षाचे होईपर्यंत त्यांचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी तरतूद करील’ हे  मार्गदर्शक तत्त्व आहे.
        
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे ?

   1) अ आणि ब    2) ब आणि क 
  3) अ आणि क    4) वरील सर्व

उत्तर :- 4

गोवा हा भारताचा भाग कशाप्रकारे बनला ?

🍀 स्वातंत्र्यानंतर १९६१ पर्यंत गोवा अधिकृतरीत्या भारताचा भाग नव्हता. कारण यावर पोर्तुगीजांची सत्ता होती.

🍀 जेव्हा की गोव्यात राहणारे बहुसंख्य नागरीक हे भारतीयच होते.

🍀 पोर्तुगीजांनी गोव्यावर ४५० वर्षे राज्य केले.

🍀 स्वातंत्र्याच्या वेळेस ५६२ प्रांत भारतात समाविष्ट झाले.

🍀 भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी अथक प्रयत्नाने हे कार्य मार्गी लावले. म्हणूनच वल्लभभाईंना ‘भारताचे लोहपुरुष’ म्हटल्या जाते.

🍀 याविरोधात तेथील नागरिकांनी १९५५ साली सत्याग्रह केला; मात्र चिडलेल्या पोर्तुगीजांनी क्रूरतेचा अतिरेक करत २२ नागरिकांना गोळ्या घालून ठार केले.

🍀 या घटनेने पंडित जवाहरलाल नेहरु चांगलेच संतापले.

🍀 अखेर नेहरुंनी पोर्तुगीजांच्या विरोधात ‘विजय’ नामक सैन्य ऑपरेशन राबविण्याचा आदेश दिला.

🍀 इतिहासकारांच्या मते, हे ऑपरेशन ३६ तासांपेक्षा जास्त वेळ चालले.

🍀 १९ डिसेंबर, १९६१ रोजी भारतीय सेनेने वीरतेचा परिचय देत गोव्याला भारतीय संघाशी जोडले.

🍀 यावेळी पोर्तुगीज गव्हर्नर जनरल वसाला-इ-सिल्वा याने पोर्तुगीज सैनिकांसह भारतीय सेना प्रमुख पीएन थापर यांच्यापुढे शरणागती पत्करली होती.

🍀 यानंतर ३० मे, १९८७ साली गोव्याला भारतीय राज्याचा दर्जा मिळाला; मात्र ‘गोवा मुक्ती दिवस’ १९ डिसेंबरलाच साजरा केला जातो.

🍀 आजही भारतात पर्यटनाच्या दृष्टिने गोवा राज्य अग्रेसर आहे.

🍀 पूर्वी ब्रिटिश नागरिक आणि मुगल या भागाकडे आकर्षक झाले होते.
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

पोलीस भरतीसाठी चे आजचे महत्त्वाचे प्रश्न

1) ‘ग्लोबल टेररिझम इंडेक्स’ कोणत्या संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे?
उत्तर : इंस्टीट्यूट फॉर इकनॉमिक्स अँड पीस

2) ‘जागतिक तत्वज्ञान दिन’ कधी साजरा केला जातो?
उत्तर : नोव्हेंबर महिन्याचा तिसरा गुरुवार

3) यावर्षी ‘इंडिया फॉर ह्युमॅनिटी - जयपूर फूट’ कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला?
उत्तर : संयुक्त राज्ये अमेरिका

4) "अरुंधती सुवर्ण योजना" कोणत्या राज्यसरकारद्वारे लागू केली जाणार आहे?
उत्तर : आसाम सरकार

5) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनी कोणत्या व्यक्तीला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले?
उत्तर : किरण मजुमदार-शॉ

6) नॅशनल इंटेलिजेंस ग्रिड प्रकल्प कधीपासून कार्यरत केला जाणार आहे?
उत्तर : 31 डिसेंबर 2020

7) राष्ट्रीय सोवा रिग्पा संस्था (NISR) याची स्थापना कोठे होणार आहे?
उत्तर : लडाख

8) ‘मिस्टर युनिव्हर्स 2019’ हा किताब कोणी जिंकला?
उत्तर : चित्रेश नतेसन

9) "डेस्टिनेशन नॉर्थ ईस्ट" महोत्सवाचे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : वाराणसी

10) ऑक्सफोर्ड डिक्शनरीने कोणत्या शब्दाची 'वर्ड ऑफ द इयर' म्हणून निवड केली?
उत्तर : Climate Emergency

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) कर्मकर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा.

   1) गाय गुराख्याकडून बांधली जाते      2) त्त्वा काय कर्म करिजे लघुलेकराने
   3) शिक्षक मुलांना शिकवितात      4) शिक्षकांनी मुलांना शिकवावे

उत्तर :- 1

2) खालीलपैकी ‘गुळांबा’ या शब्दाचा समास ओळखा.

   1) कर्मधारय      2) तत्पुरुष   
   3) मध्यमपदलोपी    4) बहुव्रीही

उत्तर :- 3

3) खालील वाक्यात शेवटी विरामचिन्हे द्या. – अबब ! केवढी मोठी ही भिंत.

   1) -      2) ?     
   3) !      4) ”

उत्तर :- 3

4) उपमेय असूनही ते उपमेय नाही, तर उपमानच आहे असे सांगितले जाते तेव्हा .................. हा अलंकार होतो.

   1) श्लेष      2) आपन्हुती   
   3) यमक      4) दृष्टांत

उत्तर :- 2

5) ‘तद्भव’ शब्द निवडा.

   1) ओठ    2) आठव   
   3) आयुष्य    4) आठशे

उत्तर :- 1

6) खालील वाक्यातील विशेषणांचा प्रकार ओळखा.

     ‘माझा आनंद व्दिगुणीत झाला.’
   1) पृथकत्ववाचक संख्याविशेषण    2) अनिश्चित संख्याविशेषण
   3) आवृत्तीवाचक संख्याविशेषण    4) सार्वजनिक विशेषण

उत्तर :- 3

7) ‘येते’ या क्रियापदाला मूळ शब्द .................... हा आहे.

   1) ते      2) येते      3) ये      4) येणे

उत्तर :- 3

8) दिलेल्या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.
     जेवताना सावकाश जेवावे.

   1) स्थिती दर्शक    2) गतिदर्शक   
   3) रितीवाचक    4) निश्चयार्थक

उत्तर :- 3

9) ‘ऐवजी’ या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा.

   1) विरोधवाचक    2) विनिमयवाचक   
   3) कैवल्यवाचक    4) तुलनावाचक

उत्तर  :- 2

10) ‘लांबचा प्रवास बसने करावा की कारने’ या वाक्यातील ‘की’ हे अव्यय खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे ?

   1) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय    2) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
   3) स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय      4) उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 1

महापरीक्षा ने विचारलेले प्रश्न

१) सिटीस्कॅन करण्यासाठी कोणत्या वेव्हस् वापरल्या जातात ?

👉 क्ष-किरण

२)जेट इंजिन कोणत्या तत्वावर काम करते ?

👉 लिनियर विल रिझर्वेशन

३) जर आपण मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये कौचा सहीत असलेले अंडी ठेवले तर काही काळानंतर काय घडण्याची शक्यता आहे ?

👉अंड्याचे कवच तडकेल

४)लाय डिटेक्टर तपासणी कोणत्या उपकरणाच्या साह्याने करतात ?

👉पॉली ग्राफ

५) पाण्याखाली ध्वनि चे मोजमाप करण्यासाठी कोणते साधन वापरतात ?

👉हायड्रोफोन

६) आकाशाच्या निळ्या रंगाच्या संबंधित प्रकाशाचा एक प्रकार म्हणजे ......

👉स्कॅटरिंग

७) राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करतात ?

👉 सर सी व्ही रामन यांची रमन प्रभाव शोध दिवस

८)सरासरी पुरुषाचे रुदय किती वजनाचे असते ?

👉340 ग्रॅम

९)शरीरातील रक्ताचे अभिसरण हे शरीरातील कोणत्या अवयवा द्वारे नियंत्रित केले जाते ?

👉 हृदय

१०) शरीरातील कोणता अवयव रक्तातून शरीरातील नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ काढून नंतर मूत्राद्वारे बाहेर फेकतो ?

👉 मुत्रपिंड

११)स्क्रीन वर प्राप्त केली न जाऊ शकणारी प्रतिमा कोणती  ?

👉 आभासी प्रतिमा

१२) आयोडीन हा संप्रेरकांमधील महत्त्वाचा घटक कशाद्वारे निर्माण केला जातो ?

👉 अवटू ग्रंथी

१३)एक नियंत्रित आण्विक साखळी अभिक्रिया कशाचा पाया तयार करते ?

👉 अणुबॉम्ब

१४) मनुष्य काय उत्सर्जित करतो ?

👉 युरिया

१५)भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवणारे एकमेव भारतीय कोण आहेत| ?

👉 डॉ.सी. व्ही .रमण

पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; १००० किलोची स्फोटकं वाहून नेण्याची क्षमता

🔰भारताने जमिनीवरुन जमिनीवर मारा करण्याची क्षमता असणाऱ्या पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची मंगळवारी रात्री यशस्वी चाचणी केली.

🔰ओडिशाच्या बालासोर येथील प्रक्षेपण केंद्रावरुन ही चाचणी करण्यात आली. स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडद्वारे ही चाचणी घेण्यात आली.

🔰२० नोव्हेंबर रोजी पृथ्वी-२ क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते. काल झालेल्या क्षेपणास्त्राची चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली असून त्याने सर्व आवश्यक मानकं पूर्ण केली आहेत. या क्षेपणास्त्रामध्ये ५०० ते १००० किलो वजनाची स्फोटकं वाहून नेण्याची क्षमता आहे.

🔰या क्षेपणास्त्रामध्ये लिक्विड प्रोपल्शन इंजिन वापरण्यात आले आहेत. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ३५० किमीपर्यंत आहे. यामध्ये अडव्हान्स गाईडन्स सिस्टिमही बसवण्यात आली आहे. ही यंत्रणआ आपल्या लक्ष्याचा अचूनकतेने वेध घेते.

मोहम्मद शमीचा ‘TOP 10’ गोलंदाजांमध्ये समावेश..

🔰भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद शमीच्या कसोटी क्रमवारीत सुधारणा झालेली आहे. घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत केलेल्या कामगिरीमुळे शमी क्रमवारीत दहाव्या स्थानावर पोहचला आहे.

🔰तर शमीच्या समावेशामुळे सध्या आयसीसीच्या  क्रमवारीत पहिल्या 10 गोलंदाजांमध्ये 3 भारतीय गोलंदाज आहेत.तसेच जसप्रीत बुमराह पाचव्या तर रविचंद्रन आश्विन सध्या नवव्या स्थानावर आहे.

🔰आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतले सर्वोत्तम 10 गोलंदाज अनुक्रमे : पॅट कमिन्स, कगिसो रबाडा, जेसन होल्डर, निल वेंगर, जसप्रीत बुमराह, वर्नेन फिलँडर, जेम्स अँडरसन, जोश हेजलवुड, रविचंद्रन आश्विन, मोहम्मद शमी.

ठामपाच्या अग्निशमन दलात दिसणार महिला ब्रिगेड..

🔰ठाणे महापालिकेच्या आकृतीबंधाला शासनाने मंजुरी दिल्याने आता त्यानुसार टप्प्याटप्प्याने महापालिकेने भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार, महापालिकेच्या अग्निशमन दलात आता 435 पदांची भरती केली जाणार आहे.

🔰तर त्यानुसार, पहिल्या टप्प्यात 250 पदे भरण्यात येणार असून त्यात महिलांना 30 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, सुमारे 81 महिलांचीही भरती केली जाणार आहे.

🔰तसेच यासंदर्भातील जाहिरात येत्या 15 दिवसांच्या आत प्रसिद्ध होणार असून त्यानंतर पुढील सोपस्कारानंतर साधारणपणे चार महिन्यांच्या आत त्या अग्निशमन दलात सामील होणार आहेत.
अग्निशमन दलात महिलांना स्थान देणारी ठाणे ही देशातील पहिलीच महापालिका ठरणार आहे.

भूगोल प्रश्नसंच

1) योग्य जोडया लावा :
  वायू      वातावरणातील शुष्क प्रमाण भाग प्रती दशलक्ष
         अ) नायट्रोजन (N2)    i) 0.007ppm
         ब) हेलियम (He)    ii)0.5ppm
        क) ओझोन (O3)    iii) 780,840.0ppm
         ड) हायड्रोजन (H2)    iv) 5.2ppm
    अ  ब  क  ड
           1)  ii  i  iii  iv
           2)  iv  iii  ii  i
           3)  i  ii  iv  iii
           4)  iii  iv  i  ii
उत्तर :- 4

2) खालील विधानांचा विचार करा.
   अ) एल. निनो प्रवाहाच्या वेळी दक्षिण प्रशांत महासागरातील पृष्ठाभागावरील तापमानात वाढ होते.
   ब) वर्ष 2013-14 मध्ये भारतामध्ये भीषण दुष्काळ होता आणि त्यावेळी एल निनो प्रवाह प्रबळ होता.
         वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त ?
   1) फक्त अ    2) फक्त ब    3) अ आणि ब दोन्हीही    4) अ आणि ब दोन्हीही नाहीत
उत्तर :- 3

3) स्क्वेल / चंडवात (पाऊस व हिम वर्षाबरोबर येणारी वावटळ) ही महाराष्ट्रामध्ये दुर्मिळ आहे, परंतु कधी – कधी ...............
     प्रसंगी येते.
   1) किनारपट्टीवर मान्सून पूर्व काळात आणि मान्सून काळादरम्यान अंतर्गत प्रदेशात.
   2) मान्सून काळात किनारपट्टीवर आणि मान्सून पूर्व काळात अंतर्गत प्रदेशात.
   3) मान्सून नंतरच्या काळात किनारपट्टीवर आणि मान्सून काळादरम्यान अंतर्गत प्रदेशात.
   4) मान्सून नंतरच्या काळात किनारपट्टीवर आणि अंतर्गत प्रदेशात.
उत्तर :- 2

4) नॅशनल सेंटर फॉर मोडियम रेंज वेदर फोरकास्टींग (NCMRWF) याची स्थापना .................. साली नवी दिल्लीत झाली.
   1) 1985    2) 1988      3) 1992      4) 1994 
उत्तर :- 2

5) पाणलोट क्षेत्र आधारित जमीन व पाणी संवर्धन योजना मुख्यत: कशावर आधारित असते ?
   1) पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन तंत्रज्ञान
   2) जमीन आणि माती संवर्धन
   3) पिकांचे नियोजन
   4) जमिनीच्या वापराच्या क्षमतेनुसार वर्गवारी करणे
उत्तर :- 1 

1) खालील वातावरणाच्या स्तरांची उंचीनुसार मांडणी करा :
   अ) तपांबर    ब) आयनांबर    क) स्थितांबर    ड) बाह्यांबर
   1) ड, क, ब, अ    2) अ, क, ब, ड    3) अ, ब, क, ड    4) क, ब, अ, ड
उत्तर :- 2

2) सर्वसाधरणपणे उत्सर्जीत सूर्यकिरणांपैकी ................. टक्के सूर्यकिरण पिकाच्या पृष्ठभागावरती शोषले जातात.
   1) 75      2) 79      3) 85      4) 73
उत्तर :- 1

3) जर्मन गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसाहाय्याने ग्रामीण पाणी पुरवठा ‘आपलं पाणी’ प्रकल्प पुढील कोणत्या जिल्ह्यात राबविला
      जात आहे ?
   1) नागपूर-अमरावती-अकोला    2) धुळे-जळगाव-नंदूरबार
   3) सांगली-सातारा-कोल्हापूर    4) पुणे-अहमदनगर-औरंगाबाद
उत्तर :- 4

4) पावसाच्या थेंबामुळे जमिनीचे धुपीवर कोणता मुख्य परिणाम होतो ?
   1) जमिनीच्या कणांची अलिप्तता होऊन त्यामुळे जमिनीची घडण बिघडणे.
   2) पाणी साठयास सुरुवात होणे.
   3) जमिनीतील ओलावा कमी करणे.
   4) जोरात वाहणा-या पाण्यामुळे जमिनीच्या कणांची वाहतुक होते.
उत्तर :- 1

5) पाण्याची वाटप करण्यासंबंधी पाणी पंचायत मॉडेल, विलासराव साळुंखेच्या प्रयत्नाने पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात सुरू
     करण्यात आले ?
   1) बारामती    2) खेड      3) पुरंदर      4) मावळ
उत्तर :- 3