1) पाय घसरला आणि पडलो – केवल वाक्य करा.
1) पाय घसरला म्हणून पडलो 2) पाय घसरून पडलो
3) पाय घसरला व पडलो 4) यापैकी नाही
उत्तर :- 2
2) ‘विलासरावांचा थोरला मुलगा आज क्रिकेटचा सामना चांगला खेळला.’ या वाक्यातील उद्देश्य वाक्य ओळखा.
1) विलासरावांचा थोरला 2) मुलगा
3) क्रिकेटचा सामना 4) चांगला खेळला
उत्तर :- 4
3) ‘शिक्षक मुलांना शिकवितात’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
1) कर्मणी प्रयोग 2) कर्तरी प्रयोग 3) भावे प्रयोग 4) संकरित प्रयोग
उत्तर :- 2
4) खालील सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा. – महादेव .............
1) कर्मधारय 2) व्दंव्द 3) व्दिगू 4) अव्ययीभाव
उत्तर :- 1
5) सेलची जाहिरात वाचून हौसने खरेदीला गेलेल्या रमाबाईंच्या गळयातली किंमती माळ गर्दीत चोरीला गेली. बहिणीने विचारले –
‘केवढयाला झाली ही खरेदी ....................’ – या वाक्यातील रिकाम्या जागी कोणते विरामचिन्ह येऊ शकते ?
1) पूर्णविराम वा प्रश्नचिन्ह 2) प्रश्नचिन्ह वा उद्गारवाचक चिन्ह
3) स्वल्पविराम वा पूर्णविराम 4) पूर्णविराम वा उद्गारवाचक चिन्ह
उत्तर :- 2
6) व्याकरणाच्या नियमानुसार बरोबर शब्द कोणता?
1) मूळुमूळु 2) मूळुमूळू
3) मुळूमुळू 4) मुळुमुळु
उत्तर :- 3
7) ‘च’ या वर्गातील च्, छ्, ज्, झ – या वर्णांचा उच्चार ......................... असा दुहेरी होतो.
1) कंठय व तालव्य 2) मूर्धन्य व कंठय
3) तालव्य व दंत तालव्य 4) दंत्य व औष्ठय
उत्तर :- 3
8) पुढीलपैकी ‘पूर्वरूप संधी’ चे योग्य उदाहरण कोणते ?
1) खिडकी + आत = खिडकीत 2) न + उमजे = नुमजे
3) घाम + डोळे = घामोळे 4) एक + एक = एकेक
उत्तर :- 1
9) खालील पर्यायांपैकी सामान्य नाम कोणते ?
1) रस्ता 2) भारत
3) हिमालय 4) गंगा
उत्तर :- 1
10) खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. – आपण गरीबांना मदत करावी.
1) गरीबांना 2) आपण
3) जो 4) करावी
उत्तर :- 2