२९ नोव्हेंबर २०१९

महत्वाच्या घटनादुरुस्त्या व त्यांचे विषय

क्र.:-घटना दुरूस्ती:-वर्ष:-घटना दुरूस्तीचा विषय

1.:-1 ली घटना दुरूस्ती:-1951:-नवव्या परिशिष्टामध्ये जमीन सुधारण्याचा विषय समाविष्ट करण्यात आला.

2.:-5 वी घटना दुरूस्ती:-1955:-राज्यांची सीमा, नावे, आणि क्षेत्रफळ यात बदल करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला.

3.:-15 वी घटना दुरूस्ती:-1963:-उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची निवृत्तीचे वय 60 वरून 62 करण्यात आले.

4.:-26 घटना दुरूस्ती:-1971:-संस्थानीकांचे तनखे बंद करण्यात आले.

5.:-31 वी घटना दुरूस्ती:-1973:-लोकसभेचा सभासदांची संख्या 545 करण्यात आली.

6.:-36 वी घटना दुरूस्ती:-1975:-सिक्कीमला घटक राज्याचा दर्जा बहाल करण्यात आला

7.:-42 वी घटना दुरूस्ती:-1976;-मूलभूत कर्तव्यांचा समावेश, लोकसभा आणि विधानसभेचा कार्यकाल पाच वर्षांचा करण्यात आला. मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला. घटनेच्या सरनाम्यात धर्मनिरपेक्ष व समाजवाद या दोन शब्दांचा समावेश करण्यात आला.

8.:-44 वी घटना दुरूस्ती:-1978:-संपत्तीचा अधिकार मूलभूत हक्कातून वगळण्यात आला.

9.:-52 वी घटना दुरूस्ती:-1985:-पक्षांतर बंधी कायदा आणि 10 व्या परिशिष्टाची निर्मिती

10.:-56 वी घटना दुरूस्ती:-1987:-गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला.

11.:-61 वी घटना दुरूस्ती:-1989:-मतदारांची वयोमर्यादा 21 वरून 18 करण्यात आली.

12.:-71 वी घटना दुरूस्ती:-1992:-नेपाळी, कोकणी व मणिपुरी भाषांना घटनात्मक दर्जा देण्यात आला.

13.:-73 वी घटना दुरूस्ती:-1993:-पंचायत राज, घटनात्मक दर्जा व अकरावी सूची

14.:-74 वी घटना दुरूस्ती:-1993:-नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, घटनात्मक दर्जा व बारावी सूची

15.:-79 वी घटना दुरूस्ती:-1999:-अनुसूचीत जाती-जमातीच्या राखीव जागांमध्ये कालावधीत वाढ 2010 पर्यंत

16.:-85 वी घटना दुरूस्ती:-2001:-सरकारी नोकर्‍यांमध्ये अनुसूचीत जाती-जमातींना बढतीमध्ये आरक्षण

17.:-86 वी घटना दुरूस्ती:-2002:-6 ते 14 वयोगटांतील मुलामुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण

18.:-89 वी घटना दुरूस्ती:-2003:-अनुसूचीत जाती जमातीसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना

19.:-91 वी घटना दुरूस्ती:-2003:-केंद्रीय मंत्रिमंडळ आणि घटक मंत्रिमंडळात एकूण सभासदांच्या 15% मंत्र्यांची संख्या निर्धारित करण्यात आली.

20.:-97 वी घटना दुरूस्ती:- -:-सहकारचा विकास

21.:-108 वी घटना दुरूस्ती;- -:-महिलाना लोकसभा व विधानसभेमध्ये 33% आरक्षण

22.:-109 वी घटना दुरूस्ती:- -:-मागासवर्गीयांची राजकारणातील आणि शासकीय नोकर्‍यांमधील आरक्षणाची मुदत 10 वर्षानी वाढवण्यात आली.

23.:-110 वी घटना दुरूस्ती:- -:-महिलांना स्थानिक स्वराज्य संस्था/ पंचायत राजमध्ये 50% आरक्षण

24.:-113 वी घटना दुरूस्ती:- -:-ओडिशा राज्यातील नावातील बदल

25.:-115 वी घटना दुरूस्ती:-2011:-जिएसटी कराच्या संदर्भात

विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसणारे उद्धव ठाकरे हे सातवे मुख्यमंत्री

🅱विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना म्हणजेच आमदार नसताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे उद्धव ठाकरे हे सातवे
मुख्यमंत्री ठरले आहेत.

🅱 तर वडील मुख्यमंत्री व मुलगा आमदार हे चित्रही महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रथमच दिसणार आहे.

🅱आता ते विधान परिषदेवर जाणार की
विधानसभा निवडणूक लढवणार
याबाबत उत्सुकता आहे.

📌बॅरिस्टर ए. आर. अंतुले,
📌वसंतदादा पाटील (१९८३),
📌शिवाजीराव पाटील निलंगेकर,
📌शरद पवार (१९९३),
📌सुशीलकुमार शिंदे,
📌पृथ्वीराज चव्हाण या काँग्रेसच्या सहा
नेत्यांवर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली तेव्हा हे नेते विधान परिषद किंवा विधानसभा या उभय सभागृहांचे सदस्य नव्हते.

🅱नंतर ही नेतेमंडळी विधानसभा किंवा विधान परिषदेचे आमदार म्हणून निवडून
आले..

🅱उद्धव ठाकरे हे आता विधान परिषदेवर निवडून जाणार की विधानसभेवर याबाबत उत्सुकता आहे.

🅱विधान सभेवर निवडून जायचे झाल्यास शिवसेनेच्या एखादा आमदाराला त्यांच्यासाठी राजीनामा द्यावा लागेल आणि पोटनिवडणुकीत उद्धव यांना
विधानसभेवर निवडून जाता येईल.

🅱पुढील सहा महिन्यांत
विधानसभेच्या १२ जागांसाठी
निवडणूक होणार आहे. या वेळी
ठाकरे यांना वरिष्ठ सभागृहात प्रवेश
करता येईल.

विष्णुबुवा ब्रह्मचारी (विष्णू भिकाजी गोखले)

जन्म: शिरवली गावी, जिल्हा कुलाबा १८२५
कार्यकाळ: १८२५ - १८७१
गुरु: दत्तात्रय
समाधी: १८ फेब्रुवारी १८७१
विशेष: क्रांतीकारी समाज सुधारक 

विष्णुबुवांना पाच भाऊ आणि पाच बहिणी. विष्णुबाबा भावंडांमध्ये दहावे. ते पाच वर्षांचे असतांना वडील गेले. तरीदेखील एक वर्ष वेदाध्ययन करता आले. त्याच काळात लेखन, वाचन, हिशेब करणे असे जीवनावश्यक शिक्षणही मिळाले. त्यात अक्षर अतिशय सुंदर! ह्या एवढया शिदोरीवर अवघ्या नवव्या वर्षी त्यांना त्या काळांत जमीन-महसूल खात्यात नोकरी मिळाली. पण आईने नोकरी सोडावयास लावून त्यांना पुन्हा घरच्या शेतीत आणि गाईगुरांना रानात चारण्यासाठी नेण्याचे काम करण्यास सांगितले. मात्र विष्णुबुवा फार काळ ह्या कामात रमले नाही. कोणाला न सांगता घर सोडून ते महाडला एका किराणा दुकानात नोकरी करु लागले. त्याच काळात सरकारी नोकरीसाठी आवश्यक ती परीक्षा देऊन साष्टी तालुक्यात कस्टम खात्यात रुजू झाले. सात वर्षांच्या नोकरीच्या काळात ते अनेक ठिकाणी फिरले.

हे करीत असतानाही त्यांची धार्मिक वृत्ती सतत सजग होती. एवढया लहान वयातही कीर्तन-प्रवचनें, पूजा-अर्चा नेमाने करीत असत. कधी ना कधी आपल्याला आध्यात्मिक ज्ञान देणारा गुरु मिळेल अशी त्यांना आशा वाटत असे. आत्मज्ञानाची त्यांची भूक काही शमेना. दुसरीकडे धार्मिक ग्रंथाचे वाचन, पठण, मनन चालूच होते. ह्या विषयातील त्यांची प्रगती एकलव्याप्रमाणे होत होती. अखेर व्यावहारिक जीवनाचा कंटाळा येऊन त्यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षी नोकरी सोडली. घर त्यागले. पुन्हा गुरुप्राप्तिसाठी पुष्कळ हिंडूनही निराशाच पदरी आली. शेवटी सप्तशृंगीच्या डोंगरावर स्वतःच्या मनानेच घोर तपश्चर्या केली. त्यावेळी त्यांना आत्मसाक्षात्कार झाला.

ह्या आत्मसाक्षात्काराचा लाभ सर्व समाजालाही व्हावा, संपूर्ण हिंदु समाजाचा उत्कर्ष व्हावा म्हणून आपण काहीतरी केले पाहिजे असे त्यांना वाटू लागले. ख्रिश्चनांच्या धार्मिक अतिक्रमणाने ते अस्वस्थ झाले. त्यांनी ह्या धर्मांतरविरोधात लढा देण्यास सुरुवात केली. लेख लिहून आणि भाषणे करून ते ख्रिस्तीधर्मातील दोष लोकांना दाखवून देऊ लागले. त्यांच्या ह्या कार्याला उदंड प्रतिसाद मिळत गेला. उदंड म्हणजे किती? तर त्यांना व्याख्यानाला जागा कमी पडू लागली. 'कुठलीही शंका घेऊन या, मी त्या शंकांचे निरसन करण्यास समर्थ आहे' ह्या त्यांच्या आश्वासकतेमुळे लोकांना धीर आला.

समाजाची उन्नती होण्यासाठी स्त्री मुक्तीची आवश्यकता आहे. त्याचवेळी स्त्रीशिक्षणाची जोडही दिली जाणे गरजेचे आहे. हा विचार समाज मनावर त्यांनी प्रथम बिंबविण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबरीनेच स्त्रीचा विवाह तिच्या अनुमतीने व्हावा, तो योग्य वयात व्हावा. पती-पत्नींमध्ये वयाचे अंतर फार नसावे, तीस वर्षांवरील गृहस्थाने विधवेशीच लग्न करावे. सतीप्रथा पूर्णतः बंद होणे गरजेचे आहे, विधवा विवाह होणे आवश्यक आहे. जाती किंवा वर्ण जन्मावरुन न ठरविता कर्मावरुन ठरविणे योग्य ठरेल, अस्पृश्यतेचे निर्मूलन व्हावयास हवे. असे अनेक क्रांतिकारक विचार त्यांनी सतत सोळा वर्षें आपल्या व्याख्यानांमधून समाजासमोर मांडले.

१८७१ मध्ये ह्या जगाचा निरोप घेतला.

पंडित मोतीलाल नेहरू

🌿हे पंडित जवाहरलाल नेहरूंचे वडिल होते.

🌿मोतीलाल नेहरू हे अलाहाबाद येथील एक नामवंत वकील होते. पुढे त्यांनी वकीली सोडून दिली व भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लक्ष घातले.

🌿 १९२२ साली त्यांनी देशबंधू चित्तरंजन दास व लाला लजपत राय ह्यांच्या बरोबर काँग्रेस पक्षांतर्गत स्वराज पक्षाची स्थापना केली. १९२८ साली कोलकाता येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.

🌿 तसेच १९२८ मध्ये काँग्रेस पक्षाने भारताचे भावी संविधान बनवण्यासाठी नेमलेल्या समितीचे ते अध्यक्ष होते. ह्या समितीने नेहरू रिपोर्ट सादर केला.

🌿मोतीलाल नेहरू ह्यांच्या पत्नीचे नाव स्वरूप राणी असे होते. पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यांचे एकमेव पुत्र होते. तसेच त्यांना दोन कन्या होत्या. त्यांच्या ज्येष्ठ कन्येचे नाव विजयालक्ष्मी होते, ज्या पुढे विजयालक्ष्मी पंडित म्हणून नावारूपाला आल्या.

🌿त्यांच्या कनिष्ठ कन्येचे नाव कृष्णा होते.

मोतीलाल नेहरूंनी अलाहाबाद येथे एक राजवाड्याप्रमाणे प्रशस्त घर घेतले होते. त्या घराचे नाव आनंद भवन असे होते. पुढे त्यांनी हे घर काँग्रेस पक्षाला देऊन टाकले.

🌿मोतीलाल नेहरूंचे निधन १९३१ साली अलाहाबाद येथे झाले.

*कारगिल टू कोहिमा (K2K) अल्ट्रा मॅरेथॉन- “ग्लोरी रन


21 सप्टेंबर 2019 रोजी कारगिल टू कोहिमा (K2K) अल्ट्रा मॅरेथॉन- “ग्लोरी रन” या अत्यधिक कठीण मोहिमेला सुरुवात झाली. ही 25 सैनिकांच्या एका चमूची शर्यत आहे जे 45 दिवसांमध्ये 4500 किलोमीटरपेक्षा जास्तचे अंतर कापतील.

कारगिल युद्धाचे 20वे वर्ष साजरे करण्यासाठी ही मोहीम भारतीय हवाई दलाच्यावतीने आयोजित करण्यात आली आहे. ही मोहीम कारगिल वॉर मेमोरियल, द्रास (जम्मू व काश्मीर) येथे सुरू झाली आणि ती कोहिमा (नागालँड) येथे संपणार.

कोहिमा आणि कारगिल हे पूर्व आणि उत्तरेकडील भारतीय चौकी आहेत जिथे अनुक्रमे 1944 आणि 1999 साली दोन लढाया लढल्या गेल्या. लद्दाख, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम आणि नागालँड अशा विविध भागांमधून चमुचा प्रवास होणार आहे.

खास PSI/STI/ASO & EX.SI/CLERK/TAX ASST. पूर्व परीक्षेसाठी सराव  प्रश्न 

1. मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्त वाहिन्या असतात?

 1)  97,000   2) 9,700   3) 10,000 4) 21,000  

उत्तर : 97,000

2. एक व्यक्ती 72 किमी अंतराचा प्रवास 4 तासात पूर्ण करतो, तर त्याची सरासरी चाल —— आहे.

 1)  5 km/s    2) 18 km/s    3) 18 m/s    4) 5 m/s

उत्तर : 5 m/s

3. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?

 1) यकृत ग्रंथी    2) लाळोत्पादक ग्रंथी
 3) स्वादुपिंड    4) जठर

उत्तर : यकृत ग्रंथी

4. सकाळी सूर्य प्रकाशामध्ये त्वचेचा खाली कोणते जीवनसत्व तयार होते?

 1)  A    2) B    3) D    4) C

उत्तर : D

5. 100 वॉट व 240 व्होल्ट दिव्याच्या विद्युतरोध —– असेल.

 1) 42 ओहम    2 )576 ओहम
 3) 5760 ओहम    4) 5.76 ओहम

उत्तर : 576 ओहम

6. लहान मुलांमध्ये रातांधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो?

1)  A   2) B    3) C    4) D   उत्तर : A

7. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते?

 1) मुकनायक    2) जनता    3) समता    4) संदेश
उत्तर : संदेश

8. 10 kg वस्तुमान असलेला पदार्थ जमिनीपासून 10 मी. उंच नेला. त्याठिकाणी गुरुत्वीय त्वरण 9.8 असेल, तर त्या पदार्थाला प्राप्त झालेली स्थितिज ऊर्जा किती?

 1) 9800 J    2) 980 J    3) 98 J    4) 9.8 J  
उत्तर : 980 J

9. दिन. 21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सन वर कोणी गोळ्या झाडल्या?

 1) वि.दा. सावरकर       2) अनंत कान्हेरे
 3) विनायक दामोदर चाफेकर   4) गणेश दामोदर चाफेकर
उत्तर : अनंत कान्हेरे

10. गांधीजीनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण काय?

 1) गांधीजींना अटक    2) काँग्रेसचा विरोध
 3) चौरी-चौरा घटना    4) पहिले महायुद्ध
उत्तर : चौरी-चौरा घटना
------------------------------------------------------

केंद्र सरकारी खात्यांमध्ये ६.८३ लाख जागा रिक्त

🅾केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये ६.८३ लाख जागा रिक्त आहेत असे लोकसभेत केंद्र सरकारच्या वतीने बुधवारी सांगण्यात आले. केंद्र सरकारमध्ये १ मार्च २०१८ अखेर ३८ लाख ०२ हजार ७७९ जागा होत्या त्यातील ३१लाख १८ हजार ९५६ भरण्यात आल्या आहेत. उर्वरित जागा रिक्त आहेत.

🅾कार्मिक खात्याचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. खात्यांकडून मागणी आल्यानंतर काही नवीन पदे निर्माणही होतात. जर पद दोन किंवा तीन वर्षे भरले गेले नाही तर ते रद्द होते. अशी पदे कार्यात्मक समर्थनानुसार पुन्हा पुनरुज्जीवित करता येतात. रेल्वे खात्यात मात्र पदे आपोआप रद्द होण्याची कुठलीही व्यवस्था नाही.

🅾कर्मचारी निवड आयोगाने २०१९-२० मध्ये १ लाख ०५ हजार ३३८ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. रेल्वे खात्याने २०१७-१८ मध्ये आगामी दोन वर्षांचा विचार करून एक लाख २७ हजार ५७३ पदांची रोजगार अधिसूचना जारी केली होती ती क व वर्ग १ पदे होती.  २०१८-१९ मध्ये याच प्रवर्गातील १ लाख ५६ हजार १३८ पदांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली होती. टपाल खात्याने १९५२२ पदांसाठी परीक्षा घेतली आहे. कर्मचारी निवड आयोगाच्या माध्यमातून एकूण ४ लाख ०८ हजार ५९१ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्त वय 60 वर्षच!

😍 केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वर्षेच राहणार आहे. निवृत्तीचे वय 60 वरून 58 वर्षे करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

🗣 केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत लेखी उत्तरामध्ये ही माहिती दिली. सध्या तरी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 60 वरून 58 वर्षे करण्यासाठी कुठलाही प्रस्ताव नसल्याचेही, त्यांनी सांगितले.

💁‍♂ 1 एप्रिल 2020 पासून सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वयात काही बदल करण्याचे समजले होते. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम झाला होता.

🧐 दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी हा संभ्रम दूर केला असून, त्यांनी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयाबाबत लोकसभेतच लेखी उत्तरात माहिती दिली आहे.

📍 केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 60 वर्षे असणार हे स्पष्ट झाले आहे.

हरिश्चंद्र-बालाघाट डोंगर रांग

गोदावरी नदीचे दक्षिणी हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग आहे. 

किंवा डोंगर रांगेते गोदावरी नदी व दिमा नदी किंवा दोन नादिक खोल्या व्यासभी छन्. 
हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगलाय पश्चिम भागास हरिश्चंद्र डोंगर घाट आणि पुर्व भागास बालाघाट या दर्शनी ओळखपत्र. 

घड्याळ रांगा आग्नेय दिशेस आणि वेळ आंद्रप्रदेशा हैद्राबाद हो.

 बालाघाट योग्य प्रमाणात सपाट माथेरियन प्रदेश आहे.

सह्याद्री पर्वत / पश्चिम घाट

पश्चिम किनारपट्टीस सह्याद्री पर्वत समांतर आहे. हा डोंगर पठाराची सीमा सीमा आहे. 

क्वेरेस तापी नदीपासुन दक्षिणेस कन्याकुमारी सह्याद्रीचा पर्वत सपाट आहे. सह्याद्री पर्वताची लांबलचक १६०० वर्ग आहे आणि महाराष्ट्रातील लांबलचक ८०० वर्ग प्रवेश आहे. 

सह्याद्रीची सरासरी उंची ० ०० ते १२०० वर्गअढी आहे.

 सह्याद्री पर्तचि उच्छी प्रश्नांची कमविणें। अरबी समुद्रसदून सहिद्री पर्वताची लांबी ते० ते किमी० वर्ग वाढलेली आहे. 

सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेस अंतरावर आहे. या रांगांद अरबी समुद्रास पश्चिम पश्चिम वाहिनी न बंगाल के उपसागरास लखनऊ पूर्व वाहिनी के सामने तैयार हो रहे हैं।

कोकण खाडी

कोकणातल्या सह्याद्रीच्या पर्वतांमध्ये उगम पावण्या पश्चिमे सखल जीवनयात्रा अरबी समुद्रास रहेका। संपूर्ण पाणी पाणी नदीच्या उतारात भागास “खादी” असे म्हणतात. कोकणचा किनारा अनेक खडके बनलेला आहे.

..

१) डहानुची खाडी, जि. राहतात

२) दातीवाडी खादी, जि. राहतात

३) वसईची खाडी, जि. राहतात

४) धरमतरची खाडी, जि. मत दिले

५) रोह खादी, जि. मत दिले

६) राजपुरी खाडी, जि. रत्नागिरी

७) बाणकोट्टीची खाडी, जि. रत्नागिरी

८) दाझलची खाडी, जि. रत्नागिरी

९) जय, जि. रत्नागिरी

१०) विजयदुर्ग, जि. सिंधुदूर्ग

११) तेरेखोलची खाडी, सिंधुदूर्ग

चालू घडामोडी प्रश्नसंच 29/11/2019

📌भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) 2019 साली ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या सुरूवातीस त्याचा रिमोट सेन्सिंग उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. त्या उपग्रहाचे नाव काय आहे?

(A) कार्टोसॅट-1
(B) कार्टोसॅट-2
(C) कार्टोसॅट-3✅✅✅
(D) कार्टोसॅट-4

📌कोणत्या राज्य सरकारने "कलवी तोलाईकाच्ची" नावाने विशेष शैक्षणिक दूरदर्शन वाहिनी सुरू केली?

(A) केरळ
(B) तेलंगणा
(C) आंध्रप्रदेश
(D) तामिळनाडू✅✅✅

📌25 ऑगस्ट 2019 रोजी, द्वैपक्षीय संबंध दृढ करण्यासाठीच्या प्रयत्नांच्या सन्मांनार्थ नरेंद्र मोदी यांना ‘________ ऑर्डर - फर्स्ट क्लास’ हा सन्मान देण्यात आला.

(A) संयुक्त अरब अमिरात
(B) बहरीन✅✅✅
(C) कतार
(D) सौदी अरब

📌कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी 'क्यूआर कोड स्कीम' (हिम्मत प्लस) नावाचा उपक्रम सुरू केला?

(A) पंजाब
(B) जम्मू व काश्मीर
(C) गोवा
(D) दिल्ली✅✅✅

📌कोणते शहर इंडोनेशिया या देशाचे नवे राजधानी शहर असणार आहे?

(A) पूर्व कालीमंतन, बोर्निओ✅✅✅
(B) ग्रेटर सुरबाया
(C) बानदंग
(D) मेदान

📌कोणत्या दोन रेल्वे स्थानकादरम्यान पॅलेस क्वीन हमसफर एक्सप्रेस सुरू करण्यात आली?

(A) दिल्ली आणि मुंबई
(B) आग्रा आणि दिल्ली
(C) मैसूर आणि उदयपूर✅✅✅
(D) उदयपूर आणि बंगळुरू

📌कोणत्या राज्य सरकारने लेमरू हत्ती वन प्रकल्प स्थापनेसंबंधी प्रस्तावाला मान्यता दिली?

(A) मध्यप्रदेश
(B) छत्तीसगड✅✅✅
(C) ओडिशा
(D) उत्तरप्रदेश

📌दिल्ली जिल्हा क्रिकेट संघने (DDCA) _ याचे अरुण जेटली स्टेडियम असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला.

(A) वानखेडे स्टेडियम
(B) आयएस बिंद्रा स्टेडियम
(C) ब्रेबॉर्न स्टेडियम
(D) फिरोज शाह कोटला स्टेडियम✅✅✅

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...