Friday, 29 November 2019

नव्या सरकारचा "किमान समान कार्यक्रम"

शिक्षण
- राज्यातील शिक्षणाच्या दर्जामध्ये सुधारणा आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणार
- राज्यातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी आणि आर्थिक दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना शून्य टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्जाची सुविधा देणार!!

बेरोजगारी
- राज्यातील बेरोजगारांसाठी त्वरित रखडलेल्या सरकारी नोकऱ्यांची प्रक्रिया मार्गी लावणार
- सुशिक्षित तरुण बेरोजगारांना शिष्यवृत्ती सुविधा राबवणार
- महाराष्ट्रातील नोकऱ्यांमध्ये ८०% आरक्षण हे स्थानिकांसाठी मिळावं याकरिता राज्यात नवा कायदा अमलात आणणार

महिला
- महिला सुरक्षेचा मुद्दा हा या सरकारचा सर्वात महत्वाचा घटक असेल
- आर्थिकरित्या मागास कुटुंबातील विद्यार्थिनींना मोफत शिक्षणाची सुविधा
- नोकरदार तरुण युवतींसाठी तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह उभारणार
- अंगणवाडी सेविकांच्या मासिक भत्यात अथवा मानधनात वाढ करणार आणि त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवणार
- महिला सक्षमीकरणाच्या अंतर्गत महिला बचत गटांच्या सबलीकरणासाठी विशेष प्रयत्न करणार

शेतकरी
- अवकाळी पावसामुळे दुष्काळाने ग्रासलेल्या भागांमध्ये जनतेच्या सेवेसाठी तातडीने आवश्यक ते सहकार्य करणार
- राज्यातील शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमुक्त करणार
- दुष्काळात पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा मिळावा यासाठी संबंधीत यंत्रणेत आवश्यक ते बदल करणार
- पिकाचा हमीभाव ठरवण्यासाठी आवश्यक त्या तरतुदी अमलात आणणार
- दुष्काळग्रस्त भागात पाण्यासाठी शाश्वत जलसाठा मोहीम राबवणार

शहरी विकास
- शहरी भागातील रस्तेबांधणीसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंमलात आणणार तसेच नगरपरिषद,नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या रस्त्यांच्या सुधारणीसाठी अथवा डागडुजीसाठी विशेष आर्थिक अनुदानाची तरतूद करणार
- मुंबईसह सबंध महाराष्ट्रातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत येणाऱ्या गोरगरिबांना ५०० चौ.फूट घरे मोफत दिली जाणार

उद्योग
- महाराष्ट्रातील गुंतवणूक आणि नवीन उद्योगांना चालना देण्यासाठी विशेष सवलती राबवणार तसंच उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठीची प्रक्रिया अधिकाधिक सुलभ आणि सरलीकृत करणार
- महाराष्ट्रात माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नव्या उद्योगाना चालना मिळावी यासाठी त्याच्या योजनांमध्ये आवश्यक सुधारणा करणार

पर्यटनकला आणि संस्कृती
- महाराष्ट्रातील पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या सर्व ठिकाणी पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार

सामाजिक न्याय
- महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आणि जमाती,इतर मागासवर्गीय, धनगर,बलुतेदार आदी जनतेच्या अन्न, वस्त्र,निवारा,शिक्षण,आरोग्य आणि रोजगार या मूलभूत गरजांच्या सोयीसुविधा संविधानातील तरतुदींप्रमाणे अग्रक्रमाने पुरवणार
- महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक वर्गातील सामाजिक,शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणार तसंच त्यांच्या सुरक्षेसाठीही विशेष काळजी घेणार

इतर महत्वाच्या तरतुदी
- जेष्ठ नागरिकांच्या बाबतीत विशेष सुविधा राबवणार
- अन्न आणि औषध या बाबतीतल्या सुरक्षेच्या प्रश्नी दुर्लक्ष कारणाऱ्यांविरुद्ध किंवा नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कडक शिक्षेची तरतूद करणार
- सामान्य नागरिकांना केवळ दहा रुपयात स्वच्छ आणि परवडणारं जेवण/अन्न पुरवणार

झटपट 30 प्रश्न उत्तरे

1) ‘ग्लोबल टेररिझम इंडेक्स’ कोणत्या संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे?
उत्तर : इंस्टीट्यूट फॉर इकनॉमिक्स अँड पीस

2) ‘जागतिक तत्वज्ञान दिन’ कधी साजरा केला जातो?
उत्तर : नोव्हेंबर महिन्याचा तिसरा गुरुवार

3) यावर्षी ‘इंडिया फॉर ह्युमॅनिटी - जयपूर फूट’ कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला?
उत्तर : संयुक्त राज्ये अमेरिका

4) "अरुंधती सुवर्ण योजना" कोणत्या राज्यसरकारद्वारे लागू केली जाणार आहे?
उत्तर : आसाम सरकार

5) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनी कोणत्या व्यक्तीला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले?
उत्तर : किरण मजुमदार-शॉ

6) नॅशनल इंटेलिजेंस ग्रिड प्रकल्प कधीपासून कार्यरत केला जाणार आहे?
उत्तर : 31 डिसेंबर 2020

7) राष्ट्रीय सोवा रिग्पा संस्था (NISR) याची स्थापना कोठे होणार आहे?
उत्तर : लडाख

8) ‘मिस्टर युनिव्हर्स 2019’ हा किताब कोणी जिंकला?
उत्तर : चित्रेश नतेसन

9) "डेस्टिनेशन नॉर्थ ईस्ट" महोत्सवाचे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : वाराणसी

10) ऑक्सफोर्ड डिक्शनरीने कोणत्या शब्दाची 'वर्ड ऑफ द इयर' म्हणून निवड केली?
उत्तर : Climate Emergency

1. तीन वाजता घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती अंशाचा कोन होतो?

 30 अंश

 60 अंश

 90 अंश

 10 अंश

उत्तर : 90 अंश

2. लिप वर्ष दर —– वर्षांनी येते.

 2

 4

 3

 5

उत्तर :4

 3. 1/9+1/12=?

 1/36

 7/36

 2/36

 2/21

उत्तर :7/36

 4. पुढीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातून जात नाही?

 रा.म.3

 रा.म.4

 रा.म.5

 रा.म.6

उत्तर :रा.म.5

 5. महाराष्ट्रात कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत?

 औरंगाबाद

 अमरावती

 पुणे

 कोकण

उत्तर :औरंगाबाद

 6. भारतात खालीलपैकी कोणत्या राज्यात कुरुक्षेत्र आहे?

 पंजाब

 उत्तरप्रदेश

 हरियाणा

 हिमाचलप्रदेश

उत्तर :हरियाणा

 7. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेशातून वाहते?

 तापी

 महानदी

 गोदावरी

 चंबळ

उत्तर :तापी

 8. अंकलेश्वर खनिजतेल क्षेत्र कोणत्या राज्यात आहे?

 महाराष्ट्र

 आसाम

 मध्यप्रदेश

 गुजरात

उत्तर :गुजरात

 9. खालीलपैकी कोणत्या गोष्टीची नोंद सिसमोग्राफव्दारे केली जाते?

 भूकंपाचे धक्के

 पावसाचे प्रमाण

 योग्य वेळ

 हवेचा दाब

उत्तर :भूकंपाचे धक्के

 10. महाराष्ट्रात सर्वात जास्त कापूस पिकाखालील क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?

 परभणी

 यवतमाळ

 अमरावती

 वाशिम

उत्तर :यवतमाळ

 11. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोणत्या दिवशी शपथ घेतली?

 25 ऑक्टोबर 2014

 27 ऑक्टोबर 2014

 31 ऑक्टोबर 2014

 1 नोव्हेंबर 2014

उत्तर :31 ऑक्टोबर 2014

 12. निवडणूक आयोगाने यंदाच्या मतदान प्रक्रियेत नव्याने समाविष्ट केलेला पर्याय NOTA चे विस्तृत रूप लिहा.

 नो टू ऑल

 नन ऑफ द अबोह

 नॉट अलाऊड

 यापैकी नाही

उत्तर :नन ऑफ द अबोह

 13. गुजरातमध्ये नर्मदा नदीवरील साधू बेटावर सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभरला जाणार आहे, त्याचे प्रस्तावित नाव काय आहे?

 स्टॅच्यू ऑफ आर्यन मॅन

 स्टॅच्यू ऑफ सरदार

 स्टॅच्यू ऑफ युनिटी

 स्टॅच्यू ऑफ फ्रिडम

उत्तर :स्टॅच्यू ऑफ युनिटी

 14. अन्नसुरक्षा कायदा भारतात कोणत्या साली लागू करण्यात आला?

 2012

 2013

 2014

 2015

उत्तर :2013

 15. दारिद्ररेषेखालील जन्मलेल्या मुलींकरिता महाराष्ट्र शासनाने जानेवारी 2014 पासून कोणती योजना सुरू केली?

 समृद्धि योजना

 सुकन्या योजना

 बेटी बचाव योजना

 निर्भया योजना

उत्तर :सुकन्या योजना

 16. दुधामध्ये कोणती शर्करा उपलब्ध असते?

 लॅक्टोज

 माल्टोज

 फ्रुक्टोज

 स्रूक्रोज

उत्तर :लॅक्टोज

 17. आहारात लोह खनिजाचे प्रामाण कमी असल्यास कोणता आजार होतो?

 क्षय

 डायरिया

 अॅनिमिया

 बेरीबेरी

उत्तर :अॅनिमिया

 18. पोलिओ लसीचा शोध खालीलपैकी कोणी लावला?

 एडवर्ड जेन्नर

 साल्क

 हरगोविंद खुराणा

 विल्यम हार्वी

उत्तर :साल्क

 19. एखादा माणूस पृथ्वीवरुन चंद्रावर गेल्यास-?

 वस्तुमान वेगळे पण वजन सारखेच राहील

 वस्तुमान व वजन दोन्ही सारखेच राहील

 वस्तुमान सारखे पण वजन वेगळे राहील

 वस्तुमान व वजन दोन्हीही वेगळे राहील

उत्तर :वस्तुमान सारखे पण वजन वेगळे राहील

 20. संगणकामध्ये रॅम याचा अर्थ काय होतो?

 रॅपीड अॅक्शन मेमरी

 रॅन्डम अॅक्सेस मेमरी

 राईल्ट अॅक्सेस मुव्हमेट

 रोल अँड मेमरी

उत्तर : रॅन्डम अॅक्सेस मेमरी

1) कोणत्या राज्यात ‘संगई महोत्सव’ आयोजित केला जातो?
उत्तर : मणीपूर

2) ‘एमिशन्स गॅप रिपोर्ट’ हा अहवाल कोणती संघटना प्रसिद्ध करते?
उत्तर : UNEP

3) IRDAI सुचविलेल्या नव्या टेलिमॅटिक्स मोटर विम्याचे नाव काय आहे?
उत्तर : नेम्ड ड्रायव्हर पॉलिसी

4) 12वा ‘फिल्म लंडन जरमन’ पुरस्कार कोणी जिंकला?
उत्तर : हितेन पटेल

5) 47 व्या आंतरराष्ट्रीय एम्मी पुरस्काराचा सर्वोत्कृष्ट नाटक पुरस्कार कुणी जिंकला?
उत्तर : मॅकमाफिया

6) भारतात ‘राष्ट्रीय दुग्ध दिन’ कधी साजरा केला जातो?
उत्तर : 26 नोव्हेंबर

7)  WATEC 2019 परिषद कुठे आयोजित करण्यात आली?
उत्तर : इस्त्राएल

8) “वॉटर 4 चेंज” नावाचा प्रकल्प कोणत्या राज्यात राबवण्याचा प्रस्ताव मांडला आहे?
उत्तर : केरळ

9) "राष्ट्रीय युवा संसद योजना"च्या संकेतस्थळाचे अनावरण कुणाच्या हस्ते करण्यात आले?
उत्तर : भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद

10) महिलांवरील अत्याचारांच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 25 नोव्हेंबर

जाणून घ्या महत्त्वाच्या घडामोडी

आजपासून विधानसभेचे हंगामी अधिवेशन

⚡ महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन आजपासून मुंबईतील विधानभवनात सुरू होणार आहे.

💁‍♂ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हे अधिवेशन आमंत्रित करण्याचे निर्देश विधिमंडळाच्या सचिवांना दिले आहेत.

👨‍💼 विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांची मंगळवारी नियुक्ती झाली आहे.

📍 नव्या विधानसभेतील 287 आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ देण्याचे काम कोळंबकर करतील.

🙌🏻 शपथविधी : हे अधिवेशन किती दिवसांचे असेल याचा राज्यपालांच्या आदेशात कुठेही स्पष्ट उल्लेख नाही. मात्र सर्व नवनिर्वाचित आमदारांच्या विधानसभा सदस्यत्वाचा शपथविधी होईपर्यंत हे अधिवेशन सुरू राहील, असे अंदाज आहे.

🛰 ‘कार्टोसॅट-3’चे आज श्रीहरिकोटातून प्रक्षेपण

💁‍♂ पृथ्वीच्या प्रतिमा आणि मॅपिंग करणाऱ्या ‘कार्टोसॅट-3’ उपग्रहाच्या प्रक्षेपणाला अवघे काही तास उरले आहेत.

🏢 भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) दिलेल्या माहितीनुसार कार्टोसॅट-3 सोबत अमेरिकेच्या 13 नॅनो उपग्रहांचेही प्रक्षेपण होणार आहे.

⏳ श्रीहरिकोटा अवकाशतळावरील दुसऱ्या लाँचपॅडवरून 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.28 वाजता कार्टोसॅट-3 च्या प्रक्षेपणाचे नियोजन इस्रोने केले आहे.

🗣 पीएसएलव्ही-सी 47 च्या प्रक्षेपण मोहिमेच्या 26 तासांच्या उलटमोजणीला श्रीहरिकोटात सतीश धवन स्पेस सेंटरवर सुरुवात झाली आहे, असेही इस्रोने म्हटले.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न


1) वाक्यात ज्या ठिकाणी स्वल्पविरामापेक्षा अधिक काळ थांबावे लागते, परंतु बोलणे मात्र पूर्ण होत नाही, त्या ठिकाणी..............
     हे चिन्ह वापरतात.

   1) “-”      2) ;      3) ,      4) !
उत्तर :- 2

2) ‘पापणीत गोठविली मी नदी आसवांची’ – अलंकार ओळखा.

   1) अतिशयोक्ती    2) रूपक      3) व्यतिरेक    4) दृष्टांत

उत्तर :- 1

3) अनुकरणवाचक गट निवडा.
   1) बडबड, किरकिर, फडफड    2) अर्ज, इनाम, जाहीर
   3) भाकरी, तूप, कांबळे      4) सायकल, सर्कस, सिनेमा

उत्तर :- 1

4) योग्य पर्याय निवडा.

   अ) अभिधा, लक्षणा व व्यंजना या तीन शब्दशक्ती आहेत.
   ब) यातून अनुक्रमे वाच्यार्थ, लक्ष्यार्थ व व्यंगार्थ असे तीन अर्थ प्रगट होतात.

   1) अ आणि ब बरोबर  2) अ बरोबर ब चूक  3) अ चूक ब बरोबर  4) अ आणि ब दोन्ही चूक

उत्तर :- 1

5) ‘महान’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

   1) सुरेख    2) मोठा      3) छान      4) स्मृती

उत्तर :- 2

6) ‘तो घरी जातो’ या वाक्यातील प्रयोग कोणते ?

   1) सकर्मक कर्तरी    2) अकर्मक कर्तरी   
   3) कर्मणी      4) भावे

उत्तर :- 2

7) ‘जलद’ या सामासिक शब्दाच्या समासाचे नाव सांगा.

   1) विभक्ती – तत्पुरुष समास    2) अलुक – तत्पुरुष समास
   3) उपपद – तत्पुरुष समास    4) नत्र – तत्पुरुष समास

उत्तर :- 3

8) विरामचिन्हाचा वापर करताना एकेरी अवतरण चिन्हाचा वापर करतात.

   अ) एखाद्या शब्दावर जोर द्यावयाचा असल्यास    ब) ओकीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास
   क) दुस-याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना      ड) स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास

   1) फक्त क    2) अ व ड    3) ब व ड    4) अ व क

उत्तर :- 4

9) पुढीलपैकी कोणता शब्द ‘देशी’ आहे ?

   1) गाव      2) दूध     
   3) अत्तर    4) झाड

उत्तर :- 4

10) ‘आपली पाठ आपणास दिसत नाही.’ – या वाक्यातील ध्वन्यार्थ पुढे दिलेल्या पर्यायातून निवडा.

   1) एकाचे दुस-याशी न जमणे        2) आपल्या भावाचे कृत्य आपणास समजत नाही
   3) आपलेच सगे सोयरे आपल्याला ओळखत नाही    4) स्वत:चे दोष स्वत:लाच दिसत नाही

उत्तर :- 4

महत्वाच्या घटनादुरुस्त्या व त्यांचे विषय

क्र.:-घटना दुरूस्ती:-वर्ष:-घटना दुरूस्तीचा विषय

1.:-1 ली घटना दुरूस्ती:-1951:-नवव्या परिशिष्टामध्ये जमीन सुधारण्याचा विषय समाविष्ट करण्यात आला.

2.:-5 वी घटना दुरूस्ती:-1955:-राज्यांची सीमा, नावे, आणि क्षेत्रफळ यात बदल करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला.

3.:-15 वी घटना दुरूस्ती:-1963:-उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची निवृत्तीचे वय 60 वरून 62 करण्यात आले.

4.:-26 घटना दुरूस्ती:-1971:-संस्थानीकांचे तनखे बंद करण्यात आले.

5.:-31 वी घटना दुरूस्ती:-1973:-लोकसभेचा सभासदांची संख्या 545 करण्यात आली.

6.:-36 वी घटना दुरूस्ती:-1975:-सिक्कीमला घटक राज्याचा दर्जा बहाल करण्यात आला

7.:-42 वी घटना दुरूस्ती:-1976;-मूलभूत कर्तव्यांचा समावेश, लोकसभा आणि विधानसभेचा कार्यकाल पाच वर्षांचा करण्यात आला. मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला. घटनेच्या सरनाम्यात धर्मनिरपेक्ष व समाजवाद या दोन शब्दांचा समावेश करण्यात आला.

8.:-44 वी घटना दुरूस्ती:-1978:-संपत्तीचा अधिकार मूलभूत हक्कातून वगळण्यात आला.

9.:-52 वी घटना दुरूस्ती:-1985:-पक्षांतर बंधी कायदा आणि 10 व्या परिशिष्टाची निर्मिती

10.:-56 वी घटना दुरूस्ती:-1987:-गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला.

11.:-61 वी घटना दुरूस्ती:-1989:-मतदारांची वयोमर्यादा 21 वरून 18 करण्यात आली.

12.:-71 वी घटना दुरूस्ती:-1992:-नेपाळी, कोकणी व मणिपुरी भाषांना घटनात्मक दर्जा देण्यात आला.

13.:-73 वी घटना दुरूस्ती:-1993:-पंचायत राज, घटनात्मक दर्जा व अकरावी सूची

14.:-74 वी घटना दुरूस्ती:-1993:-नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, घटनात्मक दर्जा व बारावी सूची

15.:-79 वी घटना दुरूस्ती:-1999:-अनुसूचीत जाती-जमातीच्या राखीव जागांमध्ये कालावधीत वाढ 2010 पर्यंत

16.:-85 वी घटना दुरूस्ती:-2001:-सरकारी नोकर्‍यांमध्ये अनुसूचीत जाती-जमातींना बढतीमध्ये आरक्षण

17.:-86 वी घटना दुरूस्ती:-2002:-6 ते 14 वयोगटांतील मुलामुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण

18.:-89 वी घटना दुरूस्ती:-2003:-अनुसूचीत जाती जमातीसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना

19.:-91 वी घटना दुरूस्ती:-2003:-केंद्रीय मंत्रिमंडळ आणि घटक मंत्रिमंडळात एकूण सभासदांच्या 15% मंत्र्यांची संख्या निर्धारित करण्यात आली.

20.:-97 वी घटना दुरूस्ती:- -:-सहकारचा विकास

21.:-108 वी घटना दुरूस्ती;- -:-महिलाना लोकसभा व विधानसभेमध्ये 33% आरक्षण

22.:-109 वी घटना दुरूस्ती:- -:-मागासवर्गीयांची राजकारणातील आणि शासकीय नोकर्‍यांमधील आरक्षणाची मुदत 10 वर्षानी वाढवण्यात आली.

23.:-110 वी घटना दुरूस्ती:- -:-महिलांना स्थानिक स्वराज्य संस्था/ पंचायत राजमध्ये 50% आरक्षण

24.:-113 वी घटना दुरूस्ती:- -:-ओडिशा राज्यातील नावातील बदल

25.:-115 वी घटना दुरूस्ती:-2011:-जिएसटी कराच्या संदर्भात

विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसणारे उद्धव ठाकरे हे सातवे मुख्यमंत्री

🅱विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना म्हणजेच आमदार नसताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे उद्धव ठाकरे हे सातवे
मुख्यमंत्री ठरले आहेत.

🅱 तर वडील मुख्यमंत्री व मुलगा आमदार हे चित्रही महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रथमच दिसणार आहे.

🅱आता ते विधान परिषदेवर जाणार की
विधानसभा निवडणूक लढवणार
याबाबत उत्सुकता आहे.

📌बॅरिस्टर ए. आर. अंतुले,
📌वसंतदादा पाटील (१९८३),
📌शिवाजीराव पाटील निलंगेकर,
📌शरद पवार (१९९३),
📌सुशीलकुमार शिंदे,
📌पृथ्वीराज चव्हाण या काँग्रेसच्या सहा
नेत्यांवर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली तेव्हा हे नेते विधान परिषद किंवा विधानसभा या उभय सभागृहांचे सदस्य नव्हते.

🅱नंतर ही नेतेमंडळी विधानसभा किंवा विधान परिषदेचे आमदार म्हणून निवडून
आले..

🅱उद्धव ठाकरे हे आता विधान परिषदेवर निवडून जाणार की विधानसभेवर याबाबत उत्सुकता आहे.

🅱विधान सभेवर निवडून जायचे झाल्यास शिवसेनेच्या एखादा आमदाराला त्यांच्यासाठी राजीनामा द्यावा लागेल आणि पोटनिवडणुकीत उद्धव यांना
विधानसभेवर निवडून जाता येईल.

🅱पुढील सहा महिन्यांत
विधानसभेच्या १२ जागांसाठी
निवडणूक होणार आहे. या वेळी
ठाकरे यांना वरिष्ठ सभागृहात प्रवेश
करता येईल.

विष्णुबुवा ब्रह्मचारी (विष्णू भिकाजी गोखले)

जन्म: शिरवली गावी, जिल्हा कुलाबा १८२५
कार्यकाळ: १८२५ - १८७१
गुरु: दत्तात्रय
समाधी: १८ फेब्रुवारी १८७१
विशेष: क्रांतीकारी समाज सुधारक 

विष्णुबुवांना पाच भाऊ आणि पाच बहिणी. विष्णुबाबा भावंडांमध्ये दहावे. ते पाच वर्षांचे असतांना वडील गेले. तरीदेखील एक वर्ष वेदाध्ययन करता आले. त्याच काळात लेखन, वाचन, हिशेब करणे असे जीवनावश्यक शिक्षणही मिळाले. त्यात अक्षर अतिशय सुंदर! ह्या एवढया शिदोरीवर अवघ्या नवव्या वर्षी त्यांना त्या काळांत जमीन-महसूल खात्यात नोकरी मिळाली. पण आईने नोकरी सोडावयास लावून त्यांना पुन्हा घरच्या शेतीत आणि गाईगुरांना रानात चारण्यासाठी नेण्याचे काम करण्यास सांगितले. मात्र विष्णुबुवा फार काळ ह्या कामात रमले नाही. कोणाला न सांगता घर सोडून ते महाडला एका किराणा दुकानात नोकरी करु लागले. त्याच काळात सरकारी नोकरीसाठी आवश्यक ती परीक्षा देऊन साष्टी तालुक्यात कस्टम खात्यात रुजू झाले. सात वर्षांच्या नोकरीच्या काळात ते अनेक ठिकाणी फिरले.

हे करीत असतानाही त्यांची धार्मिक वृत्ती सतत सजग होती. एवढया लहान वयातही कीर्तन-प्रवचनें, पूजा-अर्चा नेमाने करीत असत. कधी ना कधी आपल्याला आध्यात्मिक ज्ञान देणारा गुरु मिळेल अशी त्यांना आशा वाटत असे. आत्मज्ञानाची त्यांची भूक काही शमेना. दुसरीकडे धार्मिक ग्रंथाचे वाचन, पठण, मनन चालूच होते. ह्या विषयातील त्यांची प्रगती एकलव्याप्रमाणे होत होती. अखेर व्यावहारिक जीवनाचा कंटाळा येऊन त्यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षी नोकरी सोडली. घर त्यागले. पुन्हा गुरुप्राप्तिसाठी पुष्कळ हिंडूनही निराशाच पदरी आली. शेवटी सप्तशृंगीच्या डोंगरावर स्वतःच्या मनानेच घोर तपश्चर्या केली. त्यावेळी त्यांना आत्मसाक्षात्कार झाला.

ह्या आत्मसाक्षात्काराचा लाभ सर्व समाजालाही व्हावा, संपूर्ण हिंदु समाजाचा उत्कर्ष व्हावा म्हणून आपण काहीतरी केले पाहिजे असे त्यांना वाटू लागले. ख्रिश्चनांच्या धार्मिक अतिक्रमणाने ते अस्वस्थ झाले. त्यांनी ह्या धर्मांतरविरोधात लढा देण्यास सुरुवात केली. लेख लिहून आणि भाषणे करून ते ख्रिस्तीधर्मातील दोष लोकांना दाखवून देऊ लागले. त्यांच्या ह्या कार्याला उदंड प्रतिसाद मिळत गेला. उदंड म्हणजे किती? तर त्यांना व्याख्यानाला जागा कमी पडू लागली. 'कुठलीही शंका घेऊन या, मी त्या शंकांचे निरसन करण्यास समर्थ आहे' ह्या त्यांच्या आश्वासकतेमुळे लोकांना धीर आला.

समाजाची उन्नती होण्यासाठी स्त्री मुक्तीची आवश्यकता आहे. त्याचवेळी स्त्रीशिक्षणाची जोडही दिली जाणे गरजेचे आहे. हा विचार समाज मनावर त्यांनी प्रथम बिंबविण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबरीनेच स्त्रीचा विवाह तिच्या अनुमतीने व्हावा, तो योग्य वयात व्हावा. पती-पत्नींमध्ये वयाचे अंतर फार नसावे, तीस वर्षांवरील गृहस्थाने विधवेशीच लग्न करावे. सतीप्रथा पूर्णतः बंद होणे गरजेचे आहे, विधवा विवाह होणे आवश्यक आहे. जाती किंवा वर्ण जन्मावरुन न ठरविता कर्मावरुन ठरविणे योग्य ठरेल, अस्पृश्यतेचे निर्मूलन व्हावयास हवे. असे अनेक क्रांतिकारक विचार त्यांनी सतत सोळा वर्षें आपल्या व्याख्यानांमधून समाजासमोर मांडले.

१८७१ मध्ये ह्या जगाचा निरोप घेतला.

पंडित मोतीलाल नेहरू

🌿हे पंडित जवाहरलाल नेहरूंचे वडिल होते.

🌿मोतीलाल नेहरू हे अलाहाबाद येथील एक नामवंत वकील होते. पुढे त्यांनी वकीली सोडून दिली व भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लक्ष घातले.

🌿 १९२२ साली त्यांनी देशबंधू चित्तरंजन दास व लाला लजपत राय ह्यांच्या बरोबर काँग्रेस पक्षांतर्गत स्वराज पक्षाची स्थापना केली. १९२८ साली कोलकाता येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.

🌿 तसेच १९२८ मध्ये काँग्रेस पक्षाने भारताचे भावी संविधान बनवण्यासाठी नेमलेल्या समितीचे ते अध्यक्ष होते. ह्या समितीने नेहरू रिपोर्ट सादर केला.

🌿मोतीलाल नेहरू ह्यांच्या पत्नीचे नाव स्वरूप राणी असे होते. पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यांचे एकमेव पुत्र होते. तसेच त्यांना दोन कन्या होत्या. त्यांच्या ज्येष्ठ कन्येचे नाव विजयालक्ष्मी होते, ज्या पुढे विजयालक्ष्मी पंडित म्हणून नावारूपाला आल्या.

🌿त्यांच्या कनिष्ठ कन्येचे नाव कृष्णा होते.

मोतीलाल नेहरूंनी अलाहाबाद येथे एक राजवाड्याप्रमाणे प्रशस्त घर घेतले होते. त्या घराचे नाव आनंद भवन असे होते. पुढे त्यांनी हे घर काँग्रेस पक्षाला देऊन टाकले.

🌿मोतीलाल नेहरूंचे निधन १९३१ साली अलाहाबाद येथे झाले.

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...