२७ नोव्हेंबर २०१९

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न


1) खालीलपैकी कोणती दोन नामे तिन्ही लिंगामध्ये आढळते.

   अ) हरीण      ब) पोर      क) नेत्र      ड) मूल
   1) अ आणि ब      2) क आणि ड   
   3) ब आणि ड      4) अ आणि क

उत्तर :- 3

2) पर्यायी उत्तरांत ‘चतुर्थी विभक्तीचे अपादन कारकार्थ’ असलेले वाक्य कोणते ?

   1) मी नदीच्या काठाने गेलो    2) तो घरातून बाहेर पडला
   3) तू रामाला पुस्तक दे      4) तो दिवसाचा चालतो

उत्तर :- 3

3) तू जबाबदारीने काम केले नाहीस – पुढील पर्यायातून होकारार्थी वाक्य निवडा.

   1) तू जबाबदारीने काम करतोस    2) तू बेजबाबदाराने काम केलेस
   3) तू जबाबदारी ओळखली नाहीस    4) तू जबाबदारीने काम करणारा आहेस

उत्तर :- 2

4) ‘माझ्या नणंदेच्या सासूने तिला उभ्या वर्षात एकदाही माहेरी पाठविली नाही’ या वाक्यातील विधेय ओळखा.

   1) नणंद      2) उभ्या वर्षात एकदाही माहेरी
   3) पाठविली नाही    4) सासूने

उत्तर :- 3

5) कर्मणीप्रयोगात कर्ता
........................... विभक्तीत असतो.

   1) तृतीया    2) प्रथमा     
   3) चतुर्थी    4) पंचमी  

उत्तर :- 1

6) ‘गडी गायरानात गुरे घेऊन गेला आहे.’ वरील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारात येतो?

   1) सामासिक शब्द    2) अभ्यस्त शब्द   
   3) तत्सम शब्द      4) तद्भव शब्द

उत्तर :- 1

7) योग्य विरामचिन्हे दिलेले वाक्य ओळखा..

   1) सोड, मला ! तो जोराने ओरडला      2) ‘सोड मला’, तो जोराने ओरडला
   3) “सोड मला !” तो जोराने ओरडला    4) “सोड मला”, तो जोराने ओरडला

उत्तर :- 2

8) देशी शब्द शोधा.

   1) धडधड    2) धोंडा     
   3) धाक    4) धोरण

उत्तर :- 2

9) ‘अभिधा शक्तीचे’ उदाहरण असलेले वाक्य पर्यायी उत्तरांतील कोणते आहे ?

   1) काय गाढव आहे !        2) मला फार भूक लागली
   3) शेजारच्या गावी आम्ही नदीवरून जातो    4) ‘मुलांनो, आता दिवे लागणीची वेळ झाली.’

उत्तर :- 2

10) ‘अचूक’ या शब्दाला समानार्थी पर्यायी शब्द शोधा.
   1) अगम्य    2) नेमका     
   3) अचानक    4) नीट

उत्तर :- 2

चालू घडामोडी प्रश्नसंच 27/11/2019

📍 कोणती महिला पायलट भारतीय नौदलाची प्रथम महिला पायलट बनली आहेत?

(A) भावना कांत
(B) अवनी चतुर्वेदी
(C) मोहना सिंग
(D) लेफ्टनंट शिवांगी✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 ऑक्सफोर्ड डिक्शनरीने कोणत्या शब्दाची 'वर्ड ऑफ द इयर' म्हणून निवड केली?

(A) Climate Emergency✅✅
(B) Climate Resilient
(C) Climate Activist
(D) Action for Environment

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण (NSS) याच्या 76 व्या फेरीतून केलेल्या सर्वेक्षणानुसार, ग्रामीण भागात ____ घरांमध्ये स्नानगृह आहे.

(A) 54 टक्के
(B) 45.1 टक्के
(C) 46 टक्के
(D) 50.3 टक्के✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणता राज्य क्रिकेट संघ त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेट खेळाडूंसाठी करार पद्धतिची घोषणा करणारा पहिला राज्य क्रिकेट संघ ठरला?

(A) उत्तरप्रदेश
(B) कर्नाटक
(C) महाराष्ट्र
(D) उत्तराखंड✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 ____ वी राज्यपाल आणि उपराज्यपालांची परिषद दिल्लीत राष्ट्रपती भवनात संपन्न झाली.

(A) 49
(B) 50✅✅
(C) 45
(D) 51

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (AIIA) याने आधुनिक औषधीसोबत आयुर्वेद तत्त्वांना एकात्मिक करण्यासाठी _____ सोबत सामंजस्य करार केला.

(A) कॉर्नेल विद्यापीठ
(B) हार्वर्ड विद्यापीठ
(C) वेस्टर्न युनिव्हर्सिटी ऑफ कॅनबेरा
(D) वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटी✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 ___ वी ‘डिफेन्स पेंशनर्स अदालत’ याचे उद्घाटन संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते झाले.

(A) 170
(B) 172✅✅
(C) 169
(D) 173

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 भारतीय रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार, ___ एवढा भारताचा परकीय चलन साठा आहे.

(A) 448.249 अब्ज डॉलर
(B) 450 अब्ज डॉलर
(C) 480.969 अब्ज डॉलर
(D) 400.5 अब्ज डॉलर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘चंद्रोदय’ या जोडशब्दात एकत्र येणारे स्वर व संधी बनलेला वर्ण ओळखा.

   1) आ + उ = ओ    2) द्र + ओ = द्रो    
   3) अ + उ = ओ      4) र + ओ = रो

उत्तर :- 3

2) नामाच्या उपप्रकारांपैकी फक्त ......................... अनेकवचन होते.

   1) विशेषनामाचेच    2) धर्मवाचक नामाचेच  
   3) भाववाचक नामाचेच    4) सामान्य नामाचेच

उत्तर :- 4

3) खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. – हा माझा वर्गबंधू आहे.

   1) दर्शक सर्वनाम    2) संबंधी सर्वनाम    
   3) आत्मवाचक सर्वनाम    4) पुरुषवाचक सर्वनाम

उत्तर :- 1

4) ‘कडक ऊन पडले आहे’ अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा.

   1) धातुसाधित      2) संख्यावाचक    
   3) गुणवाचक      4) सार्वनामिक

उत्तर :- 3

5) ‘मला दोन मैल चालवते.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ?

   1) प्रयोजक क्रियापद    2) संयुक्त क्रियापद    
   3) शक्य क्रियापद    4) अनियमित क्रियापद

उत्तर :- 3 

6) भजन करा सावकाश | तुला झालासे कळस. यांतील सावकाश हे .......................... अव्यय आहे.

   1) गतिदर्शक क्रियाविशेषण    2) स्थितीदर्शक क्रियाविशेषण
   3) रीतिवाचक क्रियाविशेषण    4) कालवाचक क्रियाविशेषण

उत्तर :- 3

7) योग्य विधाने निवडा.

   अ) काही शब्दयोगी अव्यये विभक्ती प्रत्यययाची कामे करतात.
   ब) व ती लागण्यापूर्वी त्याचे बहुधा सामान्यरूप होते.

   1) अ योग्य    2) ब योग्य    3) दोन्ही योग्य    4) दोन्ही अयोग्य

उत्तर :- 3

8) खालील उभयान्वयी अव्यये व त्यांचे उपप्रकार यांच्या जोडया जुळवा.

  अव्यये      उपप्रकार

         अ) स्वरूपदर्शक    I) म्हणून
         ब) समुच्चय बोधक    II) पण
         क) उद्देश दर्शक    III) आणि
         ड) न्यूनत्वबोधक    IV) म्हणजे

    अ  ब  क  ड

           1)  IV  III  I  II
           2)  III  I  IV  II
           3)  II  IV  III  I
           4)  IV  II  I  III

उत्तर :- 1

9) खालीलपैकी किती तिरस्कारदर्शक अव्यये आहेत.

     इश्श, छत, छी, शीड, हुड, छे
   1) पाच      2) सर्व      3) चार      4) तीन

उत्तर :- 1

10) पुढीलपैकी अपूर्ण वर्तमानकाळाचे उदाहरण कोणते ?

   1) मी निबंध लिहिला आहे      2) मी निबंध लिहीत आहे
   3) मी निबंध लिहीत असतो    4) मी निबंध लिहितो

उत्तर :- 2

चालू घडामोडी 27/11/2019

🌺💐चंदीगड हे रॉकेलच्या वापरापासून मुक्त झालेले देशातले पहिले शहर आहे. केंद्र सरकार 2020 सालापर्यंत रॉकेलला दिले जाणारे अनुदान पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गांधीनगर हा रॉकेलच्या वापरापासून मुक्त झालेला गुजरात राज्यातला पहिला जिल्हा ठरला आहे. 2018 सालापर्यंत देशातली 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश रॉकेलच्या वापरापासून मुक्त झाली आहेत, त्यात पुडुचेरी, दमन व दीव, दादरा नगर हवेली, आंध्रप्रदेश, चंडीगड, दिल्ली, पंजाब आणि हरियाणा यांचा समावेश आहे.

 

🌺💐आंध्रप्रदेशात स्वर्णमुखी नदीकाठी चाललेल्या उत्खननादरम्यान भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) या संस्थेला जवळपास 2000 वर्षापूर्वी बांधलेले सागरी व्यापार केंद्र सापडले आहे. येथे विटांनी बांधलेली एक रचना, भगवान विष्णूचे शिल्प, तुटलेले टेराकोटा पाईप आढळले.
 

💐🌺 दोहा (कतार) येथे जागतिक क्रिडा अजिंक्यपद 2019 या स्पर्धेमध्ये 800 मीटर हेप्टाथलॉन या शर्यतीचे सुवर्णपदक कोणी जिंकले?

अ) कटारिना जॉनसन थॉम्पसन✅✅✅
ब) व्हेरेना प्रीनर
क) नाफिसातौ थियाम
ड) लॉरा मुइर

स्पष्टीकरण : प्र.०१) दोहा (कतार) येथे जागतिक क्रिडा अजिंक्यपद 2019 या स्पर्धेमध्ये 800 मीटर हेप्टाथलॉन या शर्यतीचे सुवर्णपदक कटारिना जॉनसन थॉम्पसन यांनी जिंकले.

🌺💐 भारत आणि कझाकस्तान या देशांचा “KAZIND-2019” नावाचा लष्करी सराव _ येथे आयोजित करण्यात आला आहे.

अ) राजस्थान
ब) उत्तराखंड✅✅✅
क) हिमाचल प्रदेश
ड) केरळ

स्पष्टीकरण : भारत आणि कझाकस्तान या देशांचा “KAZIND-2019” नावाचा लष्करी सराव उत्तराखंड येथे आयोजित करण्यात आला आहे.

🌺🌸चीनच्या “DF-41” संदर्भात खाली दिलेल्यापैकी कोणते विधान चुकीचे आहे?

अ) “DF-41” म्हणजे डॉन्कफेन्क-41 होय.

ब) “DF-41” हे पृथ्वीवरचे सर्वात शक्तिशाली आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असल्याचे मानले जाते.

अ) केवळ अ ✅✅✅
ब) केवळ ब
क) केवळ अ आणि ब
ड) सर्व बरोबर आहेत

स्पष्टीकरण : केवळ अ हे चुकीचे आहे. ब हे बरोबर आहे. ब) “DF-41” हे पृथ्वीवरचे सर्वात शक्तिशाली आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असल्याचे मानले जाते.

🌺💐भारताच्या मदतीने कोणत्या देशात उभारण्यात आलेल्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा 8 ऑक्टोबर रोजी पेट्रोलियम व नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला?

अ) मंगोलिया✅✅✅
ब) कंबोडिया
क) लाओस
ड) व्हिएतनाम

स्पष्टीकरण : भारताच्या मदतीने मंगोलिया या देशात उभारण्यात आलेल्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा 8 ऑक्टोबर रोजी पेट्रोलियम व नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला

🌺💐 उत्सवाच्या वेळी वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कोणत्या संस्थेने ‘हरित फटाके’ विकसित केले?

अ) IIT कानपूर
ब) CSIR✅✅✅
क) IISc बेंगळुरू
ड) IIT खडगपूर

स्पष्टीकरण : उत्सवाच्या वेळी वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी CSIR संस्थेने ‘हरित फटाके’ विकसित केले.

🌺💐 भारताने कोणत्या शेजारच्या देशात कोस्टल सर्व्हिलन्स रडार यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे?

अ) श्रीलंका
ब) बांग्लादेश✅✅✅
क) मालदीव
ड) पाकिस्तान

स्पष्टीकरण : भारताने शेजारच्या बांग्लादेश या देशात कोस्टल सर्व्हिलन्स रडार यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

🌺💐 संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी युद्धात मृत्यूमुखी पडलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना दिली जाणारी आर्थिक मदत चार पट वाढविण्यास मान्यता दिली. हा निधी _ अंतर्गत देण्यात येणार.

अ) आर्मी बॅटल कॅज्युएलिटीज
वेलफेयर फंड✅✅✅
ब) राष्ट्रीय संरक्षण कोष
क) लष्कर केंद्रीय कल्याण कोष
ड) यापैकी नाही

स्पष्टीकरण : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी युद्धात मृत्यूमुखी पडलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना दिली जाणारी आर्थिक मदत चार पट वाढविण्यास मान्यता दिली. हा निधी आर्मी बॅटल कॅज्युएलिटीज वेलफेयर फंड अंतर्गत देण्यात येणार.

🌺💐 21 ऑक्टोबर 2019 रोजी _ सर्व महिला असलेल्यांचा स्पेसवॉक आयोजित करणार आहे.

अ) युरोपियन स्पेस एजन्सी (ESA)
ब) जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी (JAXA)
क) NASA (नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिसट्रेशन)✅✅✅
ड) ISA (इस्त्राएल स्पेस एजन्सी)

स्पष्टीकरण : ) 21 ऑक्टोबर 2019 रोजी NASA (नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिसट्रेशन) सर्व महिला असलेल्यांचा स्पेसवॉक आयोजित करणार आहे.

🌺💐 UNESCO ने आदिवासी लोकांसाठीचे राजदूत म्हणून  यांची नेमणूक केली.

अ) कॅमेरून डायझ
ब) युना किम
क) मिली बॉबी ब्राउन
ड) यलिट्झा एपारीसिओ✅✅✅

स्पष्टीकरण : UNESCO ने आदिवासी लोकांसाठीचे राजदूत म्हणून  यांची नेमणूक केली. - यलिट्झा एपारीसिओ

🌺💐 जागतिक अधिवास दिन _ या दिवशी साजरा केला जातो.

अ) 7 ऑक्टोबर✅✅✅
ब) 9 ऑक्टोबर
क) 6 ऑक्टोबर
ड) 8 ऑक्टोबर

चालू घडामोडी प्रश्नसंच

१) भारताने अग्नी-५ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. ५ हजार किलोमीटरपर्यंत क्षेपणास्त्रे सोडू शकणारा भारत हा जगातील ---------देश आहे.
:- सहावा

२) १९५७ पासुन प्रकाशित होत असलेले योजना हे मासिक भारतातील किती भाषेतून प्रकाशित होते:- १३

३)---------------- या राज्य सरकारने आपली सुरक्षा योजना घोषित केली :- गुजराथ

४) गर्व:-२ हे मोबाईल अॅप कोणत्या मंत्रालयाने सुरु केले  :-उर्जा मंत्रालय

५) डिसेंबर २०१६ मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याने कैद्यासाठी टेलीफोन ची सुविधा सुरु केली :- उत्तरप्रदेश

६) जगातील पहिला सोलर हायवे खालीलपैकी कोणत्या देशाने बनवला:-  फ्रांस

-------------------------

१) २०१७ मध्ये होणारी २० वी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद कोणत्या शहरात होणार आहे :- विशाखापट्टणम

२)२०१६ चा ५२ व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली :-शंख  घोष

३)अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ)कडून जाहीर केलेला २०१६ या वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार कोणाला जाहीर झाला :- जेजू लालपेखालू

४) वन खात्यासाठी 24 × 7 हेल्पलाईन सुरु करणारे भारतील पहिले राज्य कोणते  :- महाराष्ट्र

५) खालीलपैकी कोणत्या अभिनेत्याला मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठा तर्फे मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आले  :-शाहरुख खान

६) प्रतिकार हा नेपाळ आणि ----------- या देशातील पहिला संयुक्त लष्करीअभ्यास सराव आहे :-चीन

७) कोणत्या देशांने फीफाचा २०१६ या वर्षातील सर्वोत्कृष्ट टीम चा पुरस्कार जिंकला  :-अर्जेंटिना

८) खालीलपैकी भारतातील कोणत्या बेटाचे नाव "नवीन डेन्मार्क 'असे करण्यात आले होते:- अंदमान-निकोबार बेट

९) २०१८ मध्ये होणाऱ्या महिला हॉकी विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे  :-इंग्लंड

१०) भारतातील कोणत्या राज्याने "दमन" हा एक नवीन मलेरिया कार्यक्रम सुरु केला :-ओडिशा

११) राष्ट्रीय मेल सेवासाठी drones वापरकरणारा जगातील पहिला देश कोणता
फ्रान्स

१२) खालील पैकी--------------- यांनी "डिजिटली सुरक्षित ग्राहक" ही मोहीम भारतात कोणी सुरु केली :- मायक्रोसॉफ्ट

----------------------------

१) -------------- यर राज्य सरकारने अलीकडेच इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती, अनुसूचित आणि EBCs यांना न्यायालयीन सेवे साठी 50% आरक्षण जाहीर केले आहे
बिहार

२)कोणत्या भारतीय वंशाचे ब्रिटिश प्राध्यापकाला राणी एलिझाबेथ- II यांच्या कडून नाइटहून या पुरस्काराने न्मानित केले गेले आहे? :-शंकर बाल्सुब्र्ण्याम

३)भारतातील पहिले लेसर तंत्रज्ञान आधारित प्रगत AVMS आरटीओ चेक पोस्ट-------- या राज्य स्थापन केले आहे? :-गुजरात

४)१०४ वी इंडियन सायन्स काँग्रेस (आय.एस.सी.) परिषद कोणत्या राज्यात सुरु होत आहे :-आंध्र प्रदेश

५) भारतीय प्रशासकीय कर्मचारी महाविद्यालयाच्या (ASCI) मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
१) हैदराबाद

६)रणजी करंडक स्पर्धेत -----------संघाने ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल ६५ वर्षांनंतर स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला :-गुजरात

७) १ जानेवारी २०१७ पासून ----------- या देशाने बेरोजगारांना दरमहा सरकार ५८७ डॉलर म्हणजे जवळपास ४० हजार रुपये भत्ता देण्याचे सरकारने निर्णय घेतला
फिनलँड

८)------------- यर राज्य सरकारने अलीकडेच इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती, अनुसूचित आणि EBCs यांना न्यायालयीन सेवे साठी 50% आरक्षण जाहीर केले आहे
बिहार

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...