Sunday, 24 November 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) पुढील पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा.

     लहानपण दे गा देवा | मुंगी साखरेचा रवा | ऐरावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार |

   1) उपमा    2) दृष्टांत     
   3) उत्प्रेक्षा    4) अतिशयोक्ती

उत्तर :- 2

2) परभाषी शब्द ओळखा.

   1) बक्षीस    2) इनाम      3) भेटवस्तू    4) दान

उत्तर :- 2

3) धन्वन्यर्थ करणे ......................

   1) ‘अभिधा’ शक्तीमुळे जाणवणारा अर्थ    2) ‘व्यंजना’ शब्दशक्तीमुळे सुचित होणार अर्थ
   3) ‘लक्षणा’ शब्दशक्तीमुळे जाणवणारा अर्थ    4) भाषेतील मूलध्वनीचा अर्थ

उत्तर :- 2

4) ‘वारा’ या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता ?

   1) शैल      2) अनल     
   3) अनिल    4) सलील

उत्तर  :- 2

5) ‘आवक’ या शब्दाला विरुध्दार्थी शब्द सांगा.

   1) श्रावक    2) भावक     
   3) जावक    4) वाहक

उत्तर :- 3

6) योग्य तो पर्याय निवडून खालील म्हण पूर्ण करा.

     शहाण्याला .................. मार.
   1) काठीचा    2) हंटरचा   
   3) चाबकाचा    4) शब्दांचा

उत्तर :- 4

7) ‘अतिशय गर्व होणे’ या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.

   1) दोडक्यावानी फुगणे    2) दोन बोटे स्वर्ग उरणे
   3) दोन हात करणे    4) दगडाखालून हात काढून घेणे

उत्तर :- 2

8) अनेक गोष्टीत एकाचवेळी लक्ष देणा-यास ....................... म्हणतात.

   1) कामसू    2) अष्टावधानी   
   3) कार्यरत    4) चौकस

उत्तर :- 2

9) खालील पर्यायी उत्तरातील शुध्द पर्यायी शब्द सांगा.

   1) अग्नीहोत्री    2) अग्निहोत्री   
   3) आग्नीहोत्री    4) आग्निहोत्री

उत्तर :- 2

10) संयुक्त स्वर म्हणजे -

   1) सर्व स्वर एकत्र करणे        2) सर्वांनी मिळून आवाज काढणे
   3) दोन स्वर एकत्र येऊन निर्माण झालेले    4) –हस्व उच्चार असलेले

उत्तर :- 3

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच २५/११/२०१९

प्रश्न १) गोपाळ बाबा वलंगकर यांनी कोणती संस्था स्थापन केली?
१) आर्यन दोष परिहार समाज (१८९०) दापोली
२) ब्राह्मो समाज (१९२८) मुंबई
३) सत्यशोधक समाज (१८७३) कोल्हापूर       
४) आर्य समाज (१८७५) ठाणे

प्रश्न २) किसन फागुजी बनसोड यांच्या विषयी अयोग्य पर्याय ओळखा?
१) त्यांचा जन्म नागपूर जिल्ह्यात झाला     
२) त्यांनी आर्थिक प्रगतीसाठी सन्मान बोधक निराप्रीतसमाज समाज स्थापन केली.
३) त्यांनी प्रथम अपृश्यता निवारण परिषद मुंबई येथे भरवली.      
४) त्यांनी चोखामेळा सुधारणा मंडळ व वाचनालयाची स्थापना केली.

प्रश्न ३) स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना आंबेडकरांनी केव्हा केली?
१) १५ ऑगस्ट १९३६     २) १५ ऑगस्ट १९३७
३) २५ ऑगस्ट १९३३     ४) ३६ जाने. १९३०

प्रश्न ४) भारतातील पूर्वेकडील पर्यटन स्थळे कोणती आहेत?
अ) इटानगर.        ब) काजिरंगा
क) तवांग.            ड) इफाळ
१) अ,ब, क           २) ब, क, ड
३) अ, क, ड          ४) वरील सर्व

प्रश्न ५) प्रदूषणामुळे पुढील कोणत्या घटकाची गुणवत्ता कमी होते?
अ) खडक               ब) हवा
क) मृदा                  ड) पाणी

१)  अ, ब, क        २) ब, क
३) अ, ब               ४) वरील सर्व

===========================
उत्तरे :- प्रश्न १ -१, प्रश्न २- ३, प्रश्न ३ -१, प्रश्न ४- ४, प्रश्न ५ -३.
===========================

प्रश्न ६) मनरेगा आणि सरळ लाभ हस्तांतर ह्या दोन योजना जोडल्यानंतर मनरेगा योजनेखालील किती जिल्हे व्यापलेले आहेत? (२०१६)
१)  १८० जिल्हे           २) २०९ जिल्हे
३) २८७ जिल्हे.            ४) ३१० जिल्हे

प्रश्न ७) राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम (नरेगा २००५)अंतर्गत किती टक्के मूल्यांचे कार्य ग्रामपंचायतीने कार्यान्वित केले पाहिजे? (२०१६)
१) ३०%             २) ३३%
३) ३५%             ४) ५०%

प्रश्न ८) पूर्वीच्या कामगार हिताच्या योजना पेक्षा मनरेगा ही महिलांसाठी अधिक अनुकूल अशी योजना म्हटली जाते कारण: (२०१५)
१) एकूण कामगारांच्या किंमत एक-तृतीयांश कामगार महिला असाव्यात असे ही योजना नमूद करते.     
२) कामाच्या ठिकाणी बालसंगोपनाचे सुविधा या योजनेद्वारे उपलब्ध केली जाते.
३) अर्जदाराच्या रहिवासीपासून पाच कि.मी. अंतराच्या आत या योजनेद्वारे कामाची उपलब्धता करून दिली जाते.           
४) वरील सर्व

प्रश्न ९) मनरेगाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? (२०१४)
१) काल मर्यादित रोजगाराची हमी   
२) रोजगाराभिमुख काम
३) ग्रामसभेने शिफारस केलेले काम        
४) कंत्राटदाराकरावी हजेरी पटाची सुस्थितीत नोंद ठेवणे.

प्रश्न १०) महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून कोणत्या कामांना सर्वोच्च महत्त्व दिले आहे?(२०१३)
अ) फळझाड लागवड
ब) जलसंधारण
क) वनीकरण
ड) वैयक्तिक लाभाच्या योजना
पर्यायी उत्तरे:-
१) अ, ब, क             २) फक्त ब
३) फक्त क                ४) ब, क, ड

=============================
उत्तरे :- प्रश्न ६ - ३, प्रश्न ७ - ४, प्रश्न ८ -४, प्रश्न ९ - ४, प्रश्न १० -२.
===========================

प्रश्न ११) सहकारी संस्था अपयशी ठरल्या पण सहकार यशस्वी व्हायला च हवा हे इतिहासिक वाक्य कोणी काढले? (२०१४)
१)  ग्रामीण पत सर्वेक्षण समिती (१९५४)
२) ग्रामीण पत आढाव समिती (१९६६)
३) मॅक लॅगन सहकार भारत समिती (१९१५)     ४) कृषी पतपुरवठा सल्लागार समिती (२००४)

प्रश्न १२) सूक्ष्मवित्त म्हणजे खालील क्षेत्रातील गरिबांना वित्तीय सेवा पुरवणे होय. (२०१४)
१) ग्रामीण व नागरी     २) शहरातील उद्योगधंदे
३) महिला बचतगट     ४) ग्रामीण उद्योग

प्रश्न १३) राज्यशासनाने २०१० साली कृषी संजीवनी योजना अमलात आणली. भारतीय शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सुरू केलेल्या या योजनेचे मूळ उद्दिष्ट काय? (२०१३)
१) कृषी क्षेत्रामध्ये संशोधन आणि प्रयोग
२) शेतकऱ्यांना कर्जमाफी
३) कमी किमतीत कीटकनाशके सहज उपलब्ध करणे       
४) शेतकऱ्यांवरील वीजबिलाचा बोजा कमी करणे

प्रश्न १४) बलवंतराव मेहता समिती ने त्री- सूत्री पद्धतीमध्ये या शिफारसी मांडल्या पंचायतराज असे कोणी संबोधले? (२०१८)
१) महात्मा गांधी            २) डॉ.राजेंद्र प्रसाद
३) जवाहरलाल नेहरू     ४) बलवंतराय मेहता

प्रश्न १५) पंचायत राजचे मूल्यमापन करण्यासाठी केंद्र शासनाने कोणाच्या अध्यक्षतेखाली १९७७ मध्ये एक समिती नेमली होती?(२०१६)
१) एस.के.राव             २) अशोक मेहता
३) वसंतराव नाईक       ४) वसंतदादा पाटील

=============================
उत्तरे- प्रश्न ११ -१, प्रश्न १२- १, प्रश्न १३ -४, प्रश्न १४ -३, प्रश्न १५ -२.
===========================

प्रश्न १६) दलित पँथरची स्थापना केव्हा झाली?
१) ९ जुलै १९७२           २) ९ जुलै १९७०
३) ११ डिसेंबर १९७३    ४) ११ एप्रिल १९७०

प्रश्न १७) बाल हत्या प्रतिबंधकगृहाच्या स्थापनेचा उत्तर सांगा?
१) मुलींच्या हत्येविरोधात जनजागृती करणे
२) अविवाहित स्त्रिया व विधवा यांना आधार देणे
३) भारतातील महिला शिक्षणाचा प्रसार करणे   
४) भ्रूण हत्त्या व बालहत्या प्रथा रोखणे

प्रश्न १८) अ) विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना लोकहितवादी यांनी केली.
ब) लोकहितवादी हे स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते
१) अ योग्य            २) अ, ब योग्य
३) फक्त ब योग्य     ४) दोन्ही चूक

प्रश्न १९) खालीलपैकी कोणत्या प्रदूषणामुळे मानसिक संतुलन बिघडते ?
१) जलप्रदूषण           २) ध्वनी प्रदुषण
३) मृदा प्रदूषण          ४) हवा प्रदूषण

प्रश्न २०) पृथ्वीबद्दल खालीलपैकी अचूक विधाने ओळखा?
अ)  पृथ्वीचा विषुवृत्तीय व्यास १२७५६ किलोमीटर आहे.
ब) पृथ्वीची ध्रुवीय व्यासाची लांबी १२७१४ किमी आहे.
१)  फक्त अ               २) फक्त ब
३) दोन्ही बरोबर         ४) यापैकी नाही
===========================
उत्तरे :- प्रश्न १६ -१, प्रश्न १७-२, प्रश्न १८ -३, प्रश्न १९-२, प्रश्न २० -३.
===========================

प्रश्न २१) आदिवासी म्हणजे?
१) सरोज स्थलांतर करणारे होय
२) त्या त्या ठिकाणाचे मूळ रहिवासी होय
३) नदीच्या काठी वसलेली टोळी   
४) लुटारूंची किंवा तस्करांची टोळी म्हणजे

प्रश्न २२) भारतात आदिवासीची सुधारणा करण्यासाठी कोणी प्रथम प्रयत्न केले?
१) ख्रिस्ती मशिनरी       २) फ्रेंच
३) पोर्तुगीज                 ४) लॉर्ड डलहौसी

प्रश्न २३) ठक्कर बाप्पा यांना भिल्लाचे धर्मगुरू असे कोणी म्हटले?
१) म.गांधी                     २) अनुताई वाघ
३) ताराबाई मोडके          ४) पांडुरंग साबळे

प्रश्न २४) हवामानावर परिणाम करणारे घटक कोणते?
अ) समुद्रसपाटीपासूनची उंची
ब) समुद्रसानिध्य, सागरी प्रवाह
क) पर्वतरांगा आणि जमिनीचा प्रकार
ड) रेखावृत्तीय स्थान
१) अ व ब  बरोबर        २) अ व क बरोबर
३) अ,ब, क बरोबर       ४) अ, ब, क, ड बरोबर

प्रश्न २५) खालीलपैकी जिल्ह्याचा तापमान कक्षेनुसार योग्य चढता क्रम लावा.
अ) रत्नागिरी      ब) अकोला
क) पुणे.            ड) औरंगाबाद
१) अ, ब, क, ड         २) ब, क, ड, अ
३) अ, ड, ब, क         ४) अ, क, ड, ब
===========================
उत्तरे :- प्रश्न २१ -२, प्रश्न २२-१, प्रश्न २३ -१, प्रश्न २४- ३, प्रश्न २५ -४.

प्रश्न २६) भारतामध्ये पंचायतराज व ग्रामीण विकासावर आधारित महिला सशक्तीकरण, स्वास्थ, स्वच्छ पेयजल, मानवाधिकार आणि सत्तेचे विकेंद्रीकरणाच्या बाबतीत २० वर्षांच्या कालावधीत सतत प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे? (२०१३)
१) महाराष्ट्र             २) गुजरात
३) तमिळनाडू               ४) केरळ

प्रश्न २७) खालील विधान कोणी केले? (२०१२)
प्राचीन काळापासून आपली गावे ही पायाभूत अशी स्वयंपूर्ण शासन व्यवस्था आहे. गावातील लोक हे पंचायतीचे सदस्य आहेत व त्यांनी पंचायतीचा ताबा घेतला पाहिजे.
१) महात्मा गांधी        २) जवाहरलाल नेहरू
३) इंदिरा गांधी           ४) अटलबिहारी वाजपेयी

प्रश्न २८) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या महिलांनी आपली नेतृत्वक्षमता वाढवून ग्रामविकासात योगदान द्यावे यासाठी राज्यात निवडणूक आयोग.....प्रकल्प हाती घेतला आहे. (२०१२)
१) समृद्धी             २) क्रांतिज्योती
३) राजमाता          ४) जिजाऊ

प्रश्न २९) देशातील पहिले स्मार्ट डिजिटल व्हीलेज होण्याचा मान महाराष्ट्रातील कोणत्या गावाला मिळाला? (२०१८)
१) हिसार           २) हिवरेबाजार
३) हरीसाल         ४) राळेगणसिद्धी

प्रश्न ३०) पुढील कोणते विधान योग्य आहे?(२०१४)
अ) आंध्र हे समर्पित ई- शासन निती लागू करणारे प्रथम राज्य आहे.
ब) महाराष्ट्र राज्याच्या ई- शासन नीतीचा रचना डॉ. व्ही.पी. भटकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली
पर्यायी उत्तरे:-
१) केवळ अ               २) केवळ ब
३) कोणतेही नाही        ४) दोन्हीही

=============================
उत्तरे :- प्रश्न २६ -४, प्रश्न २७ -३, प्रश्न २८ -३, प्रश्न २९ -३, प्रश्न ३० -२.
═════════════════════

प्रश्न ३१) महात्मा फुल्यांनी १८४८ मध्ये पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली?
ब) मुंबईत पहिली मुलींची जगन्नाथ शंकरशेठ यांनी काढली.
१) अ योग्य           २) ब योग्य
३) ब, क, ड       ४) वरील सर्व

प्रश्न ३२) १९१९ मध्ये सरकारने कैसर ई- हिंद हे सुवर्णपदक देऊन कोणत्या व्यक्तीचा गौरव करण्यात आला?
१) रमाबाई रानडे
२) डॉ. आनंदाबाई जोशी
३) सावित्रीबाई फुले
४) पंडिता रमाबाई

प्रश्न ३३) विधवाच्या विवाहाला संमती देणारा कायदा .....मध्ये करण्यात आला?
१) १८२८          २) १८५६
३) १८२९           ४) १९४०

प्रश्न ३४) हवेच्या भौगोलिक वैशिष्ट्यांविषयी योग्य विधाने ओळखा
अ) ध्रुवाकडे जातांना तापमानात घट होते.
ब) ध्रुवाकडे जातांना वायुभार घट होत जाते
क) ध्रुवाकडे जातांना हवेचा दाब वाढतो
१) अ, ब               २) अ, क
३) ब, क               ४) अ, ब, क

प्रश्न ३५) वायुदाबाविषयी योग्य विधाने ओळखा
अ) उंचीनुसार वायूदाबात घट होत जाण्याला उधर्ववायू दाब म्हणतात
ब) उंचीनुसार वायूदाबात वाढ होत जाण्याला क्षितिजसमांतर दाब म्हणतात.
१) अ, ब               २) फक्त ब
३) फक्त अ            ४) दोन्ही चूक
===========================
उत्तरे :- प्रश्न ३१-३, प्रश्न ३२-४, प्रश्न ३३ -२, प्रश्न ३४-२, प्रश्न ३५ -३.

महाराष्ट्रातील जनरल नॉलेज

महाराष्ट्राची स्थापना कधी झाली?
👉 १ मे १९६०

महाराष्ट्राची राजधानी कोणती?
👉 मुंबई

महाराष्ट्राची उपराजधानीचे नाव?
👉 नागपूर

महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग?
👉 ६

महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग?
👉 ५

महाराष्ट्रातील एकुण जिल्हे?
👉 ३६

महाराष्ट्रातील महानगरपालिका?
👉 २७

महाराष्ट्रातील नगरपालिका?
👉 २३४

महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत?
👉 १२४

महाराष्ट्रातील  जिल्हापरीषदा?
👉 ३४

महाराष्ट्रातील एकुण तालुके?
👉 ३५८

महाराष्ट्रातील पंचायत समित्या?
👉 ३५१

महाराष्ट्राची लोकसंख्या किती?
👉 ११,२३,७४,३३३

स्त्री : पुरुष प्रमाण किती?
👉 ९२९ : १०००

महाराष्ट्रातील एकुण साक्षरता?
👉 ८२.९१%

महाराष्ट्रातील सर्व साक्षर जिल्हा?
👉 सिंधुदुर्ग

सर्वांत जास्त साक्षरतेचा जिल्हा?
👉 मुंबई उपनगर (८९.९१% )

सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा?
👉 नंदुरबार (६४.४% )

सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा?
👉 रत्नागिरी

सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा?
👉 मुंबई शहर

क्षेत्रफळाने मोठा जिल्हा?
👉 अहमदनगर

क्षेत्रफळाने लहान जिल्हा?
👉 मुंबई शहर

जास्त लोकसंख्येचा जिल्हा?
👉 ठाणे

कमी लोकसंख्येचा जिल्हा?
👉 सिंधुदुर्ग

भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण?
👉 ९३%

महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते?
👉 आंबा

महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते?
👉 मोठा बोंडारा

महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता?
👉 हारावत

महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?
👉 शेकरु

महाराष्ट्राची राज्य भाषा कोणती?
👉 मराठी

महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर?
👉 कळसुबाई (१६४६ मी.)

महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी?
👉 गोदावरी

🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗

भारतातील जनरल नॉलेज
👇👇👇👇👇👇👇

सर्वांत जास्त उष्ण ठिकाण?
👉 गंगानगर ( राजस्थान )

सर्वांत जास्त जिल्ह्यांचे राज्य?
👉 उत्तरप्रदेश

सर्वाधिक लोकसंख्येचे शहर?
👉 मुंबई (१,८४,१४,२८८ )

सर्वाधिक साक्षर असलेले राज्य?
👉 केरळ

सर्वांत मोठा धबधबा कोणता?
👉 गिरसप्पा धबधबा

सर्वांत मोठी मशीद कोणती?
👉 जामा मशीद

सर्वांत लांब नदी कोणती?
👉 ब्रह्यमपुत्रा

सर्वांत मोठी घुमट कोणती?
👉 गोल घुमट

सर्वांत मोठे वाळवंट कोणते?
👉 थरचे वाळवंट

सर्वांत उंच पुतळा कोणता?
👉 गोमटेश्वर ( बाहुबली )

सर्वांत मोठे धरण कोणते?
👉 भाक्रा नांगल

सर्वांत उंच धरण कोणते?
👉 टिहरी

सर्वांत लांब धरण कोणते?
👉 हिराकुड

सर्वांत लांब बोगदा कोणता?
👉 जवाहर बोगदा

सर्वांत मोठे स्टेडियम कोणते?
👉 युवा भारती

सर्वांत उंच मनोरा कोणता?
👉 दुरदर्शन मनोरा

सर्वांत उंच झाड कोणते?
👉 देवदार

क्षेत्रफळाने मोठा जिल्हा?
👉 कच्छ

लोकसंख्येने मोठा जिल्हा?
👉 ठाणे

सर्वाधिक पावसाचे ठिकाण?
👉 मावसनिराम

🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
जगाचे जनरल नॉलेज
👇👇👇👇👇👇

सर्वांत मोठे वाळवंट कोणते?
👉 सहारा ( आफ्रिका )

सर्वांत मोठे बेट कोणते?
👉 ग्रीनॅलंड

सर्वाधिक लोकसंख्येचा देश?
👉 चीन

क्षेत्रफळाने मोठा देश कोणता?
👉 रशिया

सर्वांत मोठा खंड कोणता?
👉 आशिया

सर्वांत मोठी गर्ता कोणती?
👉 मरियना

सर्वांत मोठा पक्षी कोणता?
👉 शहाम्रुग

सर्वांत मोठा त्रिभुज प्रदेश?
👉 सुंदरबन

सर्वांत मोठी नदी कोणती?
👉 अॅमेझॉन

सर्वांत मोठे बंदर कोणते?
👉 सिडनी

सर्वांत मोठा महासागर कोणता?
👉 पॅसिफिक महासागर

सर्वांत मोठी मशीद कोणती?
👉 जामा मशीद ( दिल्ली )

सर्वांत मोठा धबधबा कोणता?
👉 व्हेनेझुएला

सर्वांत लहान खंड कोणता?
👉 ऑस्ट्रेलिया

सर्वांत लहान महासागर कोणता?
👉 आर्क्टिक महासागर

सर्वांत लहान पक्षी कोणता?
👉 हमिंग बर्ड

सर्वांत लहान दिवस कोणता?
👉 २२ डिसेंबर

सर्वांत लांब नदी कोणती?
👉 नाईल

सर्वांत जास्त पावसाचे ठिकाण?
👉 मावसनिराम ( मेघालय )

सर्वांत जलद उडणारा पक्षी?
👉 हमिंग बर्ड

सर्वांत लांब सामुद्रधुनी कोणती?
👉 मलाक्काची सामुद्रधुनी

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

पोलीस भरती प्रश्नसंच

*🔹 कोकण रेल्वेमधील सर्वात मोठा बोगदा कुठे आहे?*
Ans : कुरबुडे
 
*🔹 काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह कोणी केला?*
Ans : डॉ. बि. आर. आंबेडकर

*🔹 आर्ध लष्करी व नागरी सुरक्षा दलाची स्थापना- होमगार्ड-*
Ans : 1946

*🔹 भारतातील सर्वात मोठे पदक?*
Ans : परमवीरचक्र

*🔹 राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान दिवस कोणता?*
Ans : ११ मे

*🔹 48, 60 आणि 72 या संख्याचा म.सा.वी. किती?*
Ans : 12

*🔹 संविधान दिन ................ या दिवसी साजरा केला जातो?*
Ans : 26 नोव्हेंबर

*🔹 ज्याची किंमत होऊ शकत नाही असे-*
Ans : अनमोल

*🔹 महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा:*
Ans : मुंबई शहर

*🔹 मुंबईचा गवळीवाडा:*
Ans : नाशिक

अनिता आनंद: कॅनडामध्ये कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्त पहिल्या हिंदू


1) कॅनडा मंत्रिमंडळ :-

🚦कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याकडून नवीन मंत्रिमंडळाचे अनावरण

2) मंत्रिमंडळ रचना :-

🚦तीन इतर इंडो-कॅनेडियन (Indo-Canadian) मंत्री

🚦शीख सहभाग

🚦त्यातील प्रत्येकजण मागील सरकारचे सदस्य

3) अनिता आनंद यांचा प्रवास :-

🚦ऑक्टोबरच्या फेडरल निवडणुकीत आनंद यांची पहिल्यांदा सार्वजनिक सेवा व खरेदी मंत्री म्हणून निवड

🚦नवीन ट्रूडो सरकार (Trudeau overnment) साठी मंत्रिमंडळात येणाऱ्या ७ नवीन लोकांपैकी आनंद एक

4) मंत्रिमंडळाबाबत काही महत्वाचे मुद्दे :-

🚦२०१५ पासूनचे चौथे भारत-कॅनडियन मंत्री अमरजित सोही होते

🚦२०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर ते मंत्रिमंडळात परतले नाहीत

🚦मंत्रिमंडळात इतरही महत्वपूर्ण बदल

🚦मावळते परराष्ट्र व्यवहार मंत्री क्रिस्टिया फ्रीलँड (Chrystia Freeland) यांना उपपंतप्रधान पदी बढती

🚦तसेच आंतर सरकारी कामकाज (intergovernmental affairs) मंत्री म्हणून पदोन्नती

गॅस पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी राष्ट्रीय धोरण

🌞पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस नियामक मंडळाकडून (Petroleum and Natural Gas Regulatory board - PNGRB) एक उच्चस्तरीय समिती स्थापन

🎯हेतू :-

🌞पाइप केलेल्या नैसर्गिक वायूच्या पायाभूत सुविधांच्या विकासास गती देणे

🎯महत्वाचे मुद्दे :-

1) समिती कार्ये -

🌞शहर गॅस वितरणासंदर्भात राष्ट्रीय धोरण आखण्यासाठी कार्य

🌞पाईप गॅस नेटवर्कच्या विकासाच्या मुद्द्यांचा सविस्तर आढावा

🌞धोरण राज्य स्तरावर मान्यता मिळण्यास महत्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष

🌞इतर क्षेत्रांच्या तुलनेत महत्त्वपूर्ण प्रगती पाहण्यास अडचणी येणारी भौगोलिक क्षेत्रे ओळखणे

🎯राज्य सरकार भूमिका :-

🌞राज्य सरकारद्वारे नोडल ऑफिसरची नेमणूक

🌞जमीन, पर्यावरण, वाहतूक इ.चा समावेशास वेळोवेळी मंजूरी

🌞सवलतीच्या दरात वेळेवर शासकीय वाटप करण्याच्या प्रक्रियेत शहर गॅस वितरण पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी समावेश

🎯आतापर्यंत प्रगती :-

🌞पेट्रोलियम मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, चांगल्या शहर गॅस वितरणासह भौगोलिक क्षेत्रा संख्येत २०१७ च्या अखेरीस ७८ वरून २०१९ मध्ये २२९ पर्यंत वाढ

स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारे खासगी विधेयक लोकसभेत सादर

📌नवी दिल्ली : गडचिरोली-चिमूर मतदारसंघातील भाजपचे खासदार अशोक नेते यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करणारे खासगी विधेयक शुक्रवारी लोकसभेला सादर केले. लोकसभेतील खासगी विधेयकांच्या यादीत खासदार अशोक नेते यांचे स्वतंत्र विदर्भाचे विधेयकही होते. मात्र, ते सभागृहात उपस्थित नसल्याने हे विधेयक लोकसभेत मांडले गेले नाही.

📌स्वतंत्र विदर्भाला शिवसेनेचा तीव्र विरोध आहे. भाजपशी मैत्री तोडून शिवसेना दोन काँग्रेससह राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील असतानाच हे विधेयक सादर केले गेल्याने राजकीय तर्कवितर्क काढले जात आहेत. लोकसभेचे पीठासीन अधिकारी प्रेमचंद्रन यांनी नेते यांचे नाव पुकारले होते. मात्र, नेते सभागृहात गैरहजर होते.

📌डिसेंबर २०१४ मध्ये हिवाळी अधिवेशनातही नेते यांनी स्वतंत्र विदर्भाबाबत खासगी विधेयक मांडले होते. त्यानंतर २०१६मध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये भाजपचे तत्कालीन खासदार नाना पटोले यांनीही स्वतंत्र विदर्भाचे खासगी विधेयक लोकसभेत मांडले होते. त्याचे पडसाद राज्याच्या विधिमंडळातही उमटले होते. विधानसभेत शिवसेनेच्या आमदारांनी स्वतंत्र विदर्भाच्या विधेयकाबाबत आक्रमक भूमिका घेतल्याने सभागृहात गदारोळ झाला होता.

चीनच्या ‘ओबीओआर’ प्रकल्पाला भारताचा विरोध

भारताच्या भूमिकेला अमेरिकेचा पाठिंबा

वॉशिंग्टन : चीनच्या वन बेल्ट, वन रोड (ओबीओआर) प्रकल्पाला भारताने विरोध केला असून भारताच्या या भूमिकेला अमेरिकेने पाठिंबा दर्शविला आहे.

अब्जावधी डॉलरच्या या प्रकल्पामागील आर्थिक गणिताच्या तर्कसंगतीवर प्रश्न उपस्थित करताना भारताने व्यक्त केलेली चिंता योग्य असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे आणि त्यामधून चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिका प्रकल्प जाणार असल्याने प्रांतीय सार्वभौमत्वाच्या मुद्दय़ावर ओबीओआर प्रकल्पाला विरोध करणारा भारत हा एकमेव मोठा देश आहे.

ओबीओआर हा चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचा आवडता प्रकल्प असून त्याद्वारे आशियाई देश, आफ्रिका, चीन आणि युरोप यांच्यातील संपर्कता आणि सहकार्य यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

*‘सीपीईसी’बाबत पाकिस्तानने चीनला प्रश्न विचारावेत; ट्रम्प प्रशासनाची सूचना*

वॉशिंग्टन : चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिकेबाबत (सीपीईसी) पाकिस्तानने चीनला अडचणीत टाकणारे प्रश्न विचारावे, अशी सूचना डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानला केली आहे.

सीपीईसी ही रस्ते, रेल्वे आणि ऊर्जा प्रकल्पांची योजना असून त्याद्वारे चीनमधील नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध असलेला झिनजिआंग उघ्यूर स्वायत्त प्रांत आणि पाकिस्तानमधील गदर बंदर जोडले जाणार आहे.

‘‘कर्ज, विश्वासार्हता, पारदर्शकता याबाबत पाकिस्तान चीनवर अडचणीत टाकणाऱ्या प्रश्नांची सरबत्ती करील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. पाकिस्तानमध्ये चीनच्या विकासाच्या नमुन्याचा पाठपुरावा का केला जात आहे, सीपीईसी प्रकल्पाच्या खर्चाचा आकडा किती आहे याची पाकिस्तानातील जनतेला माहिती का नाही’’, असा सवाल दक्षिण आणि मध्य आशियाच्या प्रधान उपसाहाय्यक परराष्ट्रमंत्री एलीस वेल्स यांनी केला आहे.