Wednesday, 20 November 2019

IMD जागतिक प्रतिभा क्रमवारी २०१९: भारत ५९ वा

👉International Institute for Management Development कडून जाहीर IMD जागतिक प्रतिभा क्रमवारी,२०१९ जाहीर

👉भारताची क्रमवारी :-

1.६३ देशांमध्ये ५९ वा

2.२०१८: ५३ व्या क्रमांकावर

3.२०१९ मध्ये ६ स्थानांनी घसरण

👉शिक्षणावरील खर्च आणि कमी दर्जाची जीवनशैली यामुळे भारताची कामगिरी निकृष्ट

📌आयएमडी (IMD) वर्ल्ड टॅलेंट रँकिंग
दरवर्षी International Institute for Management Development (IMD), स्वित्झर्लँड स्थित बिझिनेस स्कूल द्वारा प्रकाशन

📌देशांची क्रमवारी तीन मुख्य विभागातील कामगिरीवर आधारित :-

1 गुंतवणूक आणि विकास

2.तत्परता

3.आवाहन

👉या ३ श्रेणींमध्ये खालील मुद्द्यांधारे मूल्यांकन :-

1.शिक्षण

2.भाषा कौशल्ये

3.देश जगण्याची किंमत

4.जीवनशैली

5.मोबदला आणि कर दर

6.कामाची प्रशिक्षण जागा

👉२०१९ क्रमवारीतील ठळक वैशिष्ट्ये :-

१० अव्वल देश -

1.स्वित्झर्लंड

2.डेन्मार्क

3.स्वीडन

4.ऑस्ट्रिया

5.लक्झेंबर्ग

6.नॉर्वे

7.आइसलँड

8.फिनलँड

9.नेदरलँड

10.सिंगापूर

📌आशियाई अव्वल देश :-

1.१५ वे स्थान: सिंगापूरसह हाँगकाँग SAR

2.२० वे स्थान: तैवान

📌ब्रिक्स देश क्रमवारी :-

-भारत ब्रिक्स देशांच्या तुलनेत मागे

-चीन ४२ व्या स्थानी

-रशिया ४७ व्या स्थानी

-दक्षिण आफ्रिका ५० व्या स्थानी

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) अचूक विधाने निवडा.

   अ) च, ना, पण, मात्र हे शब्द शब्दयोगी अव्यये आहेत.
   ब) च, ना, पण, मात्र हे कैवल्य वाचक शब्दयोगी अव्यये आहेत.

   1) फक्त अ अचूक    2) फक्त ब अचूक   
   3) दोन्ही अचूक      4) दोन्ही चूक

उत्तर :- 3

2) उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. – ‘विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली.’

   1) विकल्पबोधक    2) समुच्चयबोधक   
   3) न्युनत्वबोधक      4) परिणामबोधक

उत्तर :- 2

3) चुप, चिंग, गप, गुपचित, बापरे
      वरीलपैकी किती मौनदर्शक अव्यये आहेत.

   1) चार      2) पाच      3) तीन      4) एक

उत्तर :- 1

4) ‘मी निबंध लिहितो’ अपूर्ण भविष्यकाळ करा.

   1) मी निबंध लिहिला    2) मी निबंध लिहित जाईन
   3) मी निबंध लिहित असेन  4) वरील एकही पर्याय योग्य नाही

उत्तर :- 3

5) ‘विव्दान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

   1) पंडिता    2) विदुषी      3) हुषार      4) यापैकी काहीही नाही

उत्तर :- 2

6) पुढील शब्दाचे अनेकवचनी रुप ओळखा. – आज्ञा

   1) आज्ञे    2) आज्ञा     
   3) आज्ञी    4) आज्ञाने

उत्तर :- 2

7) ‘देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ?

   1) प्रथमा    2) व्दितीया   
   3) तृतीया    4) सप्तमी

उत्तर :- 3

8) ‘कोणीही गडबड करू नका’ हे वाक्य होकारार्थी करा.

   1) शांत बसणारे गडबड करीत नाहीत    2) गडबड करणारे शांत बसतात

   3) काय ही गडबड !        4) सर्वांनी शांत बसा

उत्तर :- 4

9) ‘पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात’ या वाक्यातील अधोरेखित शब्द .................. चे काम करतात.

   1) उद्देश्यविस्तार  2) उद्देश्य     
   3) क्रियापद    4) विशेषण

उत्तर :- 1

10) खालील वाक्यातील ‘प्रयोग’ ओळखा. – आईने मधुराला बोलावले.

   1) कर्तरीप्रयोग    2) भावे प्रयोग   
   3) कर्मणीप्रयोग    4) संकीर्ण प्रयोग

उत्तर :- 2

पृथ्वीला प्राप्त झालेल्या गती व त्याच्या परिणामांबद्दल माहिती


पृथ्वी सूर्याभोवती तसेच स्वत:भोवती फिरते. यामुळे पृथ्वीला परिवलन आणि परीभ्रमण अशा दोन गती प्राप्त झालेल्या आहेत.

परिवलन गती

पृथ्वीच्या स्वत:भोवतीच्या फिरण्याला परिवलन गती किंवा दैनिक गती असे सुद्धा म्हणतात.

पृथ्वीला स्वत:भोवती एक फेरी पूर्ण करण्यास 23 तास 56 मिनीटे 4 सेकंद लागतात. सापेक्षता हा कालावधी चोवीस तासाचा मानला जातो. पृथ्वी स्वत:भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते.

पृथ्वीचा परिवलन वेग विषुववृत्तावर सर्वात जास्त असून ध्रुवावर सर्वात कमी आहे.

विषववृत्तावर पृथ्वीच्या परिवलनाचा वेग 1665.6 कि.मी. इतका आहे. पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे पृथ्वीवर खालील परिणाम घडून आलेले आहेत.

दिवस व रात्र चक्र – पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र होण्याचे चक्र सुरू झाले असून पृथ्वीच्या ज्या भागावरच सूर्यकिरण पडतात तो भाग प्रकाशमान होवून तेथे दिवस होतो व राहिलेल्या अर्ध्या भागावर अंधार पडतो म्हणजे तेथे रात्र होते. पृथ्वीवरील दिवस रात्र चक्र अखंड चालू आहे.

सागर प्रवाह – पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे सागराच्या पाण्याला वेग प्राप्त होतो. विषवृत्तीय प्रदेशातील पाणी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जाते. यालाच सागर प्रवाह असे म्हणतात.

वार्‍यांना दिशा प्राप्त होते – पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे वार्‍याची दिशा बदलते. याबाबतचा नियम फेरेल या शास्त्रज्ञाने मांडला. त्यांच्या मते पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे उत्तर गोलार्धातील वारे त्यांच्या उजवीकडे आणि दक्षिण गोलार्धातील वारे डावीकडे झुकतात.

झटपट महत्त्वाचे 10 प्रश्न उत्तरे 20/11/2019

1) कोणत्या विषाणूमुळे विषमज्वर होतो?
उत्तर : साल्मोनेला टायफी

2) पिण्याचे पाणी तपासण्यासाठी BISद्वारे कोणते मानक ठरवण्यात आले आहे?
उत्तर : इंडियन स्टँडर्ड 10500:2012

3) आदी महोत्सव 2019 या कार्यक्रमाचे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : नवी दिल्ली

4) कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशात “NISHTHA” ही राष्ट्रीय मोहीम राबवण्यात येत आहे?
उत्तर : जम्मू व काश्मीर

5) कोणत्या शहरात CPR प्रशिक्षणाच्या बाबतीत गिनीज विक्रम करण्यात आला?
उत्तर : कोची

6) कोणते राज्य 14 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत ‘वाळू आठवडा’ पाळत आहे?
उत्तर : आंध्रप्रदेश

7) ‘ब्रह्मपुत्र पुष्करम’ हा कार्यक्रम कोणत्या राज्य सरकारने आयोजित केला?
उत्तर : आसाम

8) राष्ट्रीय नदी गंगा विधेयक-2019 नुसार, गंगा नदी प्रदूषित केल्यास दंड काय असू शकतो?
उत्तर : 50 कोटी रुपये आणि 5 वर्षांचा तुरुंगवास

9) राष्ट्रीय पत्र दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 16 नोव्हेंबर

10) UNESCOच्या शिक्षण आयोगाच्या प्रमुखपदी कोणत्या देशाची निवड झाली?
उत्तर : पाकिस्तान

चालू घडामोडी प्रश्नसंच 20/11/2019

प्र.१)     भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने ‘अटल भाषांतर योजना’ सुरू केली आहे?
स्पष्टीकरण :  ब) परराष्ट्र कल्याण मंत्रालय 

प्र.२) शीख समुदायाला सेवा देण्यासाठी कोणत्या भारतीय ब्रिटिश व्यक्तीला ‘ऑफ ब्रिटिश एम्पायर (MBE)’चा रॉयल सन्मान देऊन गौरवण्यात आले?
स्पष्टीकरण : ड) जगदेव सिंग वीरदी

प्र.3) दिबांग वन्यजीवन अभयारण्याला व्याघ्र प्रकल्प घोषित करण्याच्या विरोधात असलेला ‘इडू मिश्‍मी’ हा आदिवासी समाज कोणत्या राज्यातल्या आहे?
स्पष्टीकरण : क) अरुणाचल प्रदेश

प्र.4) कोणत्या अग्निबाणाच्या साहाय्याने अमेरिकेच्या वायुदलाचा सर्वांत शक्तिशाली जीपीएस उपग्रह अवकाशात पाठवला?
स्पष्टीकरण : अ) फाल्कन ९

प्र.5) कोणते भारतीय राज्य सार्वभौमिक आरोग्य सेवा पुरविणारे पहिले राज्य बनले आहे?
स्पष्टीकरण : ड) उत्तराखंड

प्र.6) कोणत्या आशियाई देशाच्या संसदेने वैद्यकीय वापरासाठी मारज्युआनाचा वापर करण्यास परवानगी दिली?
स्पष्टीकरण : क) थायलंड

प्र.7) ग्रामीण भागात वैद्यकीय मदत मिळवणे कठीण असताना हजारो बाळंतपणे विनामूल्य करणाऱ्या पद्मश्रीप्राप्त ------------ यांचे २५ डिसेंबर २०१८ रोजी निधन झाले?
 स्पष्टीकरण : ड) सुलागिट्टी नरसम्मा

प्र.8) भारतात दरवर्षी कोणत्या दिवशी सुशासन दिन पाळला जातो?
स्पष्टीकरण : अ) २५ डिसेंबर

प्र.9) __ येथे प्रवेशासाठी चाबहार बंदराला धोरणात्मकदृष्ट्या (व्यापार) महत्त्वपूर्ण म्हणून पाहिले जाते?
स्पष्टीकरण : क) मध्य आशिया

चालू घडामोडी सराव प्रश्न

1) पाचवे भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
उत्तर : कोलकाता

2) ऑस्ट्रेलियात झालेल्या फेड चषक 2019 या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले?
उत्तर : फ्रान्स

3)  ‘फूझौ चाइना ओपन 2019’ या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष गटाचे विजेतेपद कोणी पटकावले?
उत्तर : केंटो मोमोटा

4) NASAचे पहिले संपूर्ण विद्युत चलित विमान कोणत्या प्रयोगासाठी बनवले आहे?
उत्तर : मॅक्सवेल X-55

5) BRICS व्यापार मंत्र्यांची 9 वी बैठक कोठे होणार आहे?
उत्तर : ब्राझिलिया

6) ‘MILAN’ सरावाच्या संदर्भातली मध्य नियोजन परिषद (MPC) कुठे पार पडली?
उत्तर : विशाखापट्टणम

7) मॉरिशस या देशात झालेल्या निवडणूकीत कोणत्या व्यक्तीच्या पक्षाचा विजय झाला?
उत्तर : प्रविंद जुगनाथ

8) 11 वा बाल संगम महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे?
उत्तर : नवी दिल्ली

9) राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) प्रक्रियेचे राज्य समन्वयक कोण आहेत?
उत्तर : हितेश देव शर्मा

10) नवोदय विद्यालय समितीसाठी बनवण्यात आलेल्या डिजिटल व्यासपिठाचे नाव काय?
उत्तर : शाला दर्पण

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...