१७ नोव्हेंबर २०१९

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) माणसाने स्वार्थ व ............... चा विचार करावा. स्वार्थ शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ?

   1) आप्पलपोटी      2) प्रपंच     
   3) परमार्थ      4) पोटार्थ

उत्तर :- 3

2) समानार्थी म्हण शोधा. ‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’

   1) खाऊ जाणे तो पचवू जाणे    2) जशी कुडी तशी पुडी
   3) यापैकी नाही        4) अंथरुण पाहून पाय पसरावे

उत्तर :- 3

3) ‘धिंडवडे निघणे’ या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ कोणता ?

   1) फजिती होणे      2) मिरवणूक निघणे 
   3) वडे तळणे      4) बोबडी वळणे

उत्तर :- 1

4) ‘हालअपेष्टा सहन करण्याचा गुण’ चा शब्दसमूहासाठी एक शब्द शोधा.

   1) तितिक्षा      2) गरीब     
   3) दयाळू      4) मायाळू

उत्तर :- 1

5) शुध्द शब्दाचा पर्याय निवडा.

   1) महात्म्य      2) माहात्म्य   
   3) माहात्म      4) महात्म

उत्तर :- 2

6) पुढीलपैकी स्पर्श व्यंजने कोणती आहेत?

   1) अ – आ    2) च – छ   
   3) य – र    4) श – ष

उत्तर :- 2

7) नाविक शब्दाचा विग्रह करा.

   1) नौ + इक = नाविक    2) ना + विक = नाविक   
   3) नाव + इक = नाविक    4) नावी + क = नाविक

उत्तर :- 1

8) एकाच जातीच्या पदार्थामधील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला काय म्हणतात ?

   1) सर्वनाम    2) विशेषनाम   
   3) सामान्यनाम    4) भाववाचकनाम

उत्तर :- 3

9) ‘ज्याच्या हाती ससा तो पारधी’ – यामध्ये आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत ?

   1) सामान्य      2) संबंधी व दर्शक   
   3) पुरुषवाचक व दर्शक    4) संबंधी व सामान्य

उत्तर :- 2

10) ‘व्दिगुणित आनंद’ या शब्दातील ‘व्दिगुणित’ शब्द ................. संख्याविशेषण आहे.

   1) क्रमवाचक    2) आवृत्तीवाचक   
   3) अनिश्चित    4) गणनावाचक

उत्तर :- 2

Bhopal gas tragedy: पीडितांच्या न्यायासाठी लढणारे अब्दुल जब्बार यांचं निधन

🔰भोपाळ : भोपाळ वायू दुर्घटनेतील पीडितांच्या न्यायासाठी लढणारे अब्दुल जब्बार यांचे गुरुवारी खासगी रुग्णालयात निधन झालं. 2 डिसेंबर 1984 ला मध्य प्रदेशातील भोपाळ येथे वायुगळतीची घटना घडली. यात कित्येक हजार लोकांचा मृत्यू तर, 1 लाखांपेक्षा अधिक लोक आजारी पडले होते. या पीडितांना कंपनीने केलेली मदत तुटपुंजी असल्याने अब्दुल जब्बार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तेव्हापासून ते पीडितांच्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढत राहिले.

🔰अब्दुल जब्बार यांच्यावर काही महिन्यांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. ते स्वतः देखील भोपाळ वायू दुर्घटनेतील पीडित होते. या घटनेत त्यांची 50 टक्के दृष्टी आणि फुफ्फुसातही संसर्ग झाला. जगभरातील औद्योगिक क्षेत्रातील सर्वात मोठा अपघातात याची गणना होते. कारण घटनेनंतरच्या आठ-दहा दिवसांत अडिच हजारांच्या वर माणसे मृत्युमुखी पडली. गेल्या 30 वर्षांत किती माणसे अपंग झाली अथवा जिवास मुकली त्याची गणनाच नाही.

🔰अब्दुल जब्बार यांनी पीडितांच्या न्याय हक्कासाठी भोपाळ गॅस पीडित उद्योग संघटना स्थापन केली. ही संघटना औद्योगिक क्षेत्रातील दुर्घटनेतील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करत आहे. गुरुवारी मध्य प्रदेश सरकारने अब्दुल जब्बार यांच्या होणाऱ्या उपचाराचा खर्च सरकार करेल, अशी घोषणा केली होती. ही मदत जब्बार यांच्यापर्यंत पोहचण्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला.

🔴 भोपाळ वायुगळती दुर्घटना -

🔰मिक वायूचा वापर करुन सेविन हे कीटकनाशक त्या कारखान्यात तयार करण्यात येत होते. अपघाताच्या पूर्वी दीड महिना अगोदरपासून सेविनचे उत्पादन बंद करण्यात आले होते. मात्र, उरलेला 50 टनांपेक्षा अधिक वायू 2 टाक्यांमध्येच पडून होता. त्या टाकीत पाणी गेल्याने आतील मिक वायूचा दाब तीन किलोग्राम एवढा वाढला. परिणामी टाकीचे तापमान वाढल्याने तिच्यावरची सेफ्टी व्हाल्व्ह उघडली गेली आणि वायू बाहेर सुटला. यात अपरिमित मनुष्य व वित्त हानी झाली. त्यावेळी अपंग झालेले भोपाळमधील लोक आजही त्याचे परिणाम भोगत आहेत. कितीजणांना नुकसान भरपाई मिळाली ते माहीत नाही. कारखाना बंद पडल्याने लोकांच्या नोक‍ऱ्या गेल्या.

न्यूझीलँडने 2050 सालापर्यंत ‘शून्य कार्बन उत्सर्जन’ लक्ष्य ठेवणारा कायदा मंजूर केला..

🍀न्यूझीलँड या देशाने 2050 या सालापर्यंत कार्बनचे होणारे उत्सर्जन निव्वळ शून्यावर आणण्याची योजना तयार केली आहे आणि त्यासंदर्भातला कायदा संसदेने 7 नोव्हेंबर 2019 रोजी मंजूर देखील केला.

🍀पॅरिसच्या हवामान कराराच्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून 2050 या सालापर्यंत ‘मिथेन’ वायू वगळता हरितगृह वायूंच्या (GHG) उत्सर्जनास पुर्णपणे आळा घालण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.त्याच कालावधीत कृषी क्षेत्रातले उप-उत्पादन असलेल्या ‘मिथेन’ वायूच्या उत्पादनात 24-47 टक्क्यांनी कपात करण्याची योजना आहे.

🍀लक्ष्य साध्य करण्यासाठी सरकारला सल्ला देण्यासाठी आणि दर पाच वर्षांनी "कार्बन बजेट" तयार करून किती उत्सर्जन करण्यास परवानगी दिली जावी हे सांगण्यासाठी एक स्वतंत्र ‘क्लायमेट चेंज कमिशन’ची स्थापना करण्यात येणार आहे.

🍀न्यूझीलँड केवळ 50 दशलक्षांपेक्षा कमी लोकसंख्या असलेला देश आहे आणि त्याने 2035 या सालापर्यंत 100 टक्के अक्षय ऊर्जा निर्मितीची वचनबद्धता दर्शविलेली आहे.

शबरीमला’चा वाद सात न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे

🅾शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश द्यायचा की नाही, याचा निर्णय आता सात न्यायमूर्तीचे खंडपीठ घेणार आहे. या संदर्भातील फेरविचार याचिकेवर तीन विरुद्ध दोन अशा बहुमताने सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी हा निकाल दिला. तर धर्माशी निगडित प्रथा-परंपरांचा सखोल आढावा घेण्याची आवश्यकता असल्याचे मत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी मांडले.

🅾शबरीमला येथील अय्यप्पा मंदिरात १० ते ५० वयोगटातील महिलांना प्रवेशबंदी असल्याच्या प्रथेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने संविधानातील समान हक्कांचा आधार घेत सर्व वयोगटांतील महिलांच्या प्रवेशास मुभा दिली. २८ सप्टेंबर २०१८ रोजी बहुमताने दिलेला हा निकाल घटनापीठाच्या पुढील निकालापर्यंत कायम राहणार आहे. शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही.

🅾सर्वोच्च न्यायालयाच्या मूळ निकालाविरोधात ६० फेरयाचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर एकत्रित सुनावणी घेतल्यानंतर गुरुवारी दिलेल्या निकालात सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. अजय खानविलकर आणि न्या. इंदू मल्होत्रा यांनी धर्मप्रथांचा सखोल विचार करून अर्थ लावला पाहिजे, असे मत व्यक्त केले. यापूर्वीच्या निकालामध्ये नोंदवलेले मत न्या. मल्होत्रा यांनी कायम ठेवले आहे. न्या. धनंजय चंद्रचूड आणि न्या. रोहिंग्टन फली नरिमन यांनी संविधान सर्वोच्च असून तोच ‘पवित्र ग्रंथ’ असल्याचे मत मांडून सर्व वयोगटांतील महिलांना मंदिरात प्रवेश देण्यास अनुकूलता दर्शवली होती.

पोलीस भरती प्रश्नसंच 17/11/2019


*Q.1] भारतातील व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोण आहेत?*
A] पंडित नेहरू
B] सलीम अली
C] जिम कोर्बेट
D] कैलास सांकला
*उत्तर: D] कैलास सांकला*
________________________________
*Q.2] नवाश्मयुगात खालीलपैकी कोणता धातू मानवाला परिचित होता?*
A] लोखंड
B] तांबे
C] चांदी
D] यापैकी नाही
*उत्तर: D] यापैकी नाही.*
________________________________
*Q.3] भारतातील मॅंगनीजच्या मोठ्या साठ्यांपैकी एक साठा महाराष्ट्रात कोठे आहे?*
A] गडचिरोली
B] भंडारा
C] यवतमाळ
D] वर्धा
*उत्तर: B] भंडारा.*
________________________________
*Q.4] सुर्यसेनला पकडून देण्यास इंग्रजांची मदत कोणी केली?*
A] गणेश द्रविड
B] वांची अय्यर
C] नेत्रसेन
D] रामचंद्र यादव
*उत्तर: C] नेत्रसेन.*
________________________________
*Q.5] भारतातील पहिला रेयॉन प्रकल्प १९५० साली कोणत्या राज्यात उभारला गेला?*
A] उत्तर प्रदेश
B] केरळ
C] तामिळनाडू
D] महाराष्ट्र
*उत्तर: B] केरळ.*
________________________________
*Q.6] महिला राष्ट्रीय संघ कोणी स्थापन केला?*
A] लतिका घोष
B] सरोजिनी नायडू
C] कृष्णाबाई राव
D] उर्मिला देवी
*उत्तर: A] लतिका घोष.*
________________________________
*Q.7] जगप्रसिद्ध पंचमहासरोवरे कोणत्या देशात आहेत?*
A] भारत
B] रशिया
C] अमेरिका
D] जपान
*उत्तर: C] अमेरिका.*
________________________________
*Q.8] अलाहाबाद येथील स्तंभालेख खालीलपैकी कोणाशी संबंधीत आहे?*
A] महापद्म नंद
B] समुद्रगुप्त
C] चंद्रगुप्त मौर्य
D] सम्राट अशोक
*उत्तर: B] समुद्रगुप्त.*
________________________________
*Q.9] सरहिंद कालवा कोणत्या राज्यात आहे?*
A] पंजाब
B] जम्मू काश्मीर
C] हिमाचल प्रदेश
D] उत्तराखंड
*उत्तर: A] पंजाब.*
________________________________
*Q.10] भारताला भेट देणारा 'मार्को पोलो' हा प्रवासी कोणत्या देशाचा होता?*
A] चीन
B] पोर्तुगाल
C] इटली
D] फ्रांस
*उत्तर: C] इटली.*
________________________________
*Q.11] 'निलम' जातीच्या आंब्याचे भारतातील प्रमुख उत्पादक राज्य कोणते?*
A] महारष्ट्र
B] आंध्रप्रदेश
C] उत्तर प्रदेश
D] पश्चिम बंगाल
*उत्तर: B] आंध्रप्रदेश.*
________________________________
*Q.12] राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अध्यक्षाने १९४२च्या क्रिप्स आणि वेव्हेल योजनेसंबंधी वाटाघाटी घडवून आणल्या?*
A] मौलाना आझाद
B] पंडित नेहरू
C] जे.बी.कृपलानी
D] सी.राजगोपालाचारी
*उत्तर: A] मौलाना आझाद.*
________________________________
*Q.13] 'गोंडवाना कोळसा क्षेत्र' खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते?*
A] छत्तीसगढ
B] महाराष्ट्र
C] कर्नाटक
D] मध्यप्रदेश
*उत्तर: C] कर्नाटक.*
________________________________
*Q.14] लोकमान्य टिळकांची चतुःसूत्री > स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि _ _ _ _ _ _ _ ?*
A] असहकार
B] जहालवाद
C] राजकारण
D] राष्ट्रीय शिक्षण
*उत्तर: D] राष्ट्रीय शिक्षण.*
________________________________
*Q.15] तौला शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?*
A] नाशिक
B] पुणे
C] धुळे
D] नंदुरबार
*उत्तर: A] नाशिक.*

Latest post

Mpsc pre exam samples questions

1) भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(आनुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना निःशुल्क, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे?  A. ...