*Q.1] भारतातील व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोण आहेत?*
A] पंडित नेहरू
B] सलीम अली
C] जिम कोर्बेट
D] कैलास सांकला
*उत्तर: D] कैलास सांकला*
________________________________
*Q.2] नवाश्मयुगात खालीलपैकी कोणता धातू मानवाला परिचित होता?*
A] लोखंड
B] तांबे
C] चांदी
D] यापैकी नाही
*उत्तर: D] यापैकी नाही.*
________________________________
*Q.3] भारतातील मॅंगनीजच्या मोठ्या साठ्यांपैकी एक साठा महाराष्ट्रात कोठे आहे?*
A] गडचिरोली
B] भंडारा
C] यवतमाळ
D] वर्धा
*उत्तर: B] भंडारा.*
________________________________
*Q.4] सुर्यसेनला पकडून देण्यास इंग्रजांची मदत कोणी केली?*
A] गणेश द्रविड
B] वांची अय्यर
C] नेत्रसेन
D] रामचंद्र यादव
*उत्तर: C] नेत्रसेन.*
________________________________
*Q.5] भारतातील पहिला रेयॉन प्रकल्प १९५० साली कोणत्या राज्यात उभारला गेला?*
A] उत्तर प्रदेश
B] केरळ
C] तामिळनाडू
D] महाराष्ट्र
*उत्तर: B] केरळ.*
________________________________
*Q.6] महिला राष्ट्रीय संघ कोणी स्थापन केला?*
A] लतिका घोष
B] सरोजिनी नायडू
C] कृष्णाबाई राव
D] उर्मिला देवी
*उत्तर: A] लतिका घोष.*
________________________________
*Q.7] जगप्रसिद्ध पंचमहासरोवरे कोणत्या देशात आहेत?*
A] भारत
B] रशिया
C] अमेरिका
D] जपान
*उत्तर: C] अमेरिका.*
________________________________
*Q.8] अलाहाबाद येथील स्तंभालेख खालीलपैकी कोणाशी संबंधीत आहे?*
A] महापद्म नंद
B] समुद्रगुप्त
C] चंद्रगुप्त मौर्य
D] सम्राट अशोक
*उत्तर: B] समुद्रगुप्त.*
________________________________
*Q.9] सरहिंद कालवा कोणत्या राज्यात आहे?*
A] पंजाब
B] जम्मू काश्मीर
C] हिमाचल प्रदेश
D] उत्तराखंड
*उत्तर: A] पंजाब.*
________________________________
*Q.10] भारताला भेट देणारा 'मार्को पोलो' हा प्रवासी कोणत्या देशाचा होता?*
A] चीन
B] पोर्तुगाल
C] इटली
D] फ्रांस
*उत्तर: C] इटली.*
________________________________
*Q.11] 'निलम' जातीच्या आंब्याचे भारतातील प्रमुख उत्पादक राज्य कोणते?*
A] महारष्ट्र
B] आंध्रप्रदेश
C] उत्तर प्रदेश
D] पश्चिम बंगाल
*उत्तर: B] आंध्रप्रदेश.*
________________________________
*Q.12] राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अध्यक्षाने १९४२च्या क्रिप्स आणि वेव्हेल योजनेसंबंधी वाटाघाटी घडवून आणल्या?*
A] मौलाना आझाद
B] पंडित नेहरू
C] जे.बी.कृपलानी
D] सी.राजगोपालाचारी
*उत्तर: A] मौलाना आझाद.*
________________________________
*Q.13] 'गोंडवाना कोळसा क्षेत्र' खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते?*
A] छत्तीसगढ
B] महाराष्ट्र
C] कर्नाटक
D] मध्यप्रदेश
*उत्तर: C] कर्नाटक.*
________________________________
*Q.14] लोकमान्य टिळकांची चतुःसूत्री > स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि _ _ _ _ _ _ _ ?*
A] असहकार
B] जहालवाद
C] राजकारण
D] राष्ट्रीय शिक्षण
*उत्तर: D] राष्ट्रीय शिक्षण.*
________________________________
*Q.15] तौला शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?*
A] नाशिक
B] पुणे
C] धुळे
D] नंदुरबार
*उत्तर: A] नाशिक.*
Saturday, 16 November 2019
पोलीस भरती प्रश्नसंच 17/11/2019
चालू घडामोडी प्रश्नसंच १६/११/२०१९
que.1 : कोणत्या राज्य सरकारने ई-गन्ना अॅप, वेब पोर्टल सुरू केले?
1⃣. बिहार
2⃣. पंजाब
3⃣. आंध्र प्रदेश
4⃣. उत्तर प्रदेश✅✅✅
उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील ऊस उत्पादकांसाठी समर्पित वेब पोर्टल आणि मोबाइल अनुप्रयोग, ई-गन्ना अॅप सुरू केला आहे.
que.2 : हार्ट केअरसाठी योगावरील आंतरराष्ट्रीय परिषद कोठे आयोजित केली जाईल?
1⃣. केरळ
2⃣. नवी दिल्ली
3⃣. कोलकाता
4⃣. कर्नाटक✅✅✅
Explanation :
आयुष मंत्रालय 15-16 नोव्हेंबर 2019 रोजी कर्नाटकातील म्हैसूर येथे योगा विषयी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करीत आहे. परिषदेची थीम ‘हार्ट केअरसाठी योग’ / आहे.
que.3 : बालदिनानिमित्त खालील पैकी कोणते अॅप बाल हक्कांचे संरक्षण आसाम राज्य आयोगाने सुरू केले?
1⃣. शिशु सुरक्षा✅✅✅
2⃣. इंद्रधनुष
3⃣. टॉडल्स सेफ्टी
4⃣. मुलांचे संरक्षण
que.4. मॅच फिक्सिंग प्रकरणांना गुन्हेगारीच्या श्रेणीत आणणारा पहिला दक्षिण एशियाई देश कोणता देश बनला आहे?
1⃣. बांगलादेश
2⃣. पाकिस्तान
3⃣. श्रीलंका✅✅✅
4⃣. भारत
que .5 : सन २०२० साठी भारतातील कोणत्या स्मारकाची वर्ल्ड स्मारक वॉच लिस्ट म्हणून निवड केली गेली आहे?
1⃣. सुरंगा बावडी✅✅✅
2⃣. तुशेती राष्ट्रीय उद्यान
3⃣. सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम
4⃣. अजिंठा लेणी
दाल तलाव ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ घोषित केला जाणार
जम्मू व काश्मीर सरकारने श्रीनगरचे प्रसिद्ध दाल तलाव आणि त्याच्याजवळच्या आसपासच्या भागांना इको सेन्सिटिव्ह झोन (ESZ) म्हणून घोषित करण्यासाठी दहा सदस्यांची समिती गठीत केली आहे.
🅱दाल तलाव "लेक ऑफ फ्लॉवर्स", "ज्वेल इन द क्राऊन ऑफ कश्मीर" किंवा "श्रीनगर्स ज्वेल" या नावानेही ओळखले जाते. यात झेलम नदीचे पाणी साठते.
🅱2017 साली केलेल्या अभ्यासानुसार, प्रदूषण आणि अतिक्रमणांमुळे दाल तलाव त्याच्या मूळ क्षेत्रफळापासून म्हणजेच 22 चौरस किलोमीटर क्षेत्रापासून सुमारे 10 चौरस किलोमीटरपर्यंत कमी झाले आहे.
🅱तलावाची क्षमता सुमारे 40 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे आणि पाण्याची गुणवत्ता खालावली आहे. तलावाच्या आरोग्यास धोका तयार झाल्याने तिथले पर्यावरण दूषित झाले आहे. हे स्थळ पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. तिथे 800 ते 900 हाऊसबोटी देखील आहेत.
चालू घडामोडी प्रश्न:-
* IIT मद्रासने विकसित केलेले RISC-C इंस्ट्रक्शन सेट आर्किटेक्चरवर आधारीत असलेली भारताची प्रथम स्वदेशी इलेक्ट्रॉनिक प्रोसेसर चीप – शक्ती प्रोसेसर.
* 'गगनयान' अंतराळ मोहिमेसाठी भारताच्या अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्याकरिता भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) या देशाच्या कंपनीसोबत करार केला – रशिया (ग्लॅवकोसमोस कंपनी).
* या कंपनीने भारतात 'डिजिटल उडान' नावाचा डिजिटल साक्षरता उपक्रम जाहीर केला - जियो.
* नासाची कोणती अंतराळ दुर्बीण २० जानेवारी २०२० रोजी बंद पडणार आहे:- स्पीटझर
* इस्रोच्या चांद्रयान २ या प्रकल्पाचे नेतृत्व करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या महिला शास्रज्ञाची नेमणूक करण्यात आली आहे:- रितू करीधल व मुथय्या वनिथा
* जगातील सर्वात लांब पूल कोणता :-हाॅगकाॅग-झुहाई पूल
* रुस्तम काय आहे:- संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केलेले मानवरहित हवाई वाहन आहे
* दस्तक अभियान काय आहे:- उत्तर प्रदेश राज्य शासनाने युनिसेफच्या सहकार्याने घरोघरी पोहचणारे दस्तक नामक अभियान आहे. त्याचे उद्दिष्टे हे जपानी मेंदुज्वाराचे राज्यातून उच्चाटन करणे हा आहे.
* मंत्रालयातील महिला कर्मचारी तसेच मंत्रालयात स्तनदा मातांना आपल्या बाळांना स्तनपान करणे सुलभ व्हावे यासाठी मंत्रालयात स्थापन करण्यात आलेल्या कक्षाचे नाव काय आहे:- हिरकणी कक्ष
१ डिसेंबरपासून टोलच्या नियमांमध्ये होणार ‘हा’ मोठा बदल
🅾१ डिसेंबरपासून टोलच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंटसाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांवरील सर्व टोल प्लाझांमध्ये फास्टॅगद्वारे टोलची रक्कम भरता येणार आहे.
🅾केंद्र सरकारनं १ डिसेंबरपासून संपूर्ण देशात सर्व वाहनांना फास्टॅग लावणे अनिवार्य करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत घोषणा केली होती.
🅾नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियानं देशभरतील सर्व टोल प्लाझांवर इलेक्ट्रॉनिक टोल घेण्यास सुरूवात केली आहे. यासाठी वाहन चालकांना आपल्या गाड्यांवर फास्टॅग लावावं लागणार आहे. हा फास्टटॅग अधिकृत टॅग विक्रेते किंना बँकेतून विकत घेता येऊ शकतो. काही ठिकाणी पेट्रोल पंपांवरदेखील हा टॅग विकत घेता येणार आहे.
🅾टोल प्लाझावर ऑटोमॅटिक ट्रान्झॅक्शनसाठी विंडस्क्रिनवर फास्टॅक लावावा लागणार आहे. यामध्ये रेडियो फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन (RFDI) देण्यात येते. वाहन टोल प्लाझावर पोहोचल्यावर त्या ठिकाणी लावण्यात आलेला सेन्सर फास्टॅक स्कॅन करतो. त्यानंतर फास्टॅगच्या अकाऊंटमधून पैसे वजा होतील.
बाळाची गर्भावस्था व पोषण
◾मानव 'मॅमल' या गटात मोडतात. म्हणजेच सस्तन प्राणिमात्र असल्याने एकपेशीय.सुरुवातीपासून जन्म होईपर्यंत आईच्या पोटात त्यांची पूर्ण वाढ होते जाते.
◾माणसाची गर्भावस्था ही अडतीस आठवड्यांची असते. हाच काळ छत्तीस ते चाळीस आठवडे येथपर्यंत मागे पुढे होऊ शकतो. या काळातील अवस्थेलाच 'गर्भावस्था' म्हणतात व आईच्या गर्भाशयात ही सर्व वाढ होते.
◾गर्भाशयाला आतील बाजूने तळहाताएवढय़ा पसरट भागात जोडलेल्या अस्तराला 'प्लासेंटा' असे म्हणतात.
◾याचे दुसरे टोक गर्भाच्या नाभीतून गर्भाला पोषणद्रव्ये रक्ताद्वारे पूरवत असते. पुरवठा करणाऱ्या रक्तनलिकांच्या या समुच्चयास 'नाळ' असे म्हणतात. बाळाची नाळ आईच्या गर्भाशयाशी आतील बाजूस जोडलेली असल्याने आईच्या रक्तातील पोषणद्रव्ये जशीच्या तशी बाळाला मिळत राहतात.
◾दहाव्या आठवडय़ाच्या सुमारास बाळाचे अवयव स्पष्ट होऊ लागतात,
t.me/nirmitiacademypune
◾बाविसाव्या आठवड्यात त्याच्या हृदयाच्या स्पंदनांचे ठोकेही ऐकू येऊ शकतात, तर बत्तीसाव्या आठवड्यात बाळ गर्भाशयात पूर्णपणे स्थिर स्थिती घेऊ शकते .
◾या सर्व गोष्टी हल्ली अल्ट्रासाऊंड तपासणीद्वारे नीट दिसूही शकतात.
◾ गर्भावस्थेतील काही दोष असल्यास वरील तपासण्यांचा हल्ली उपयोग केला जातो.
◾त्यावरून बाळाची वाढ, आकारमान यांचा नक्की पत्ता लागू शकतो.
◾पूर्ण वाढ झाल्यावर अडतिसाव्या आठवड्यात एके दिवशी गर्भाशयाचे आकुंचन सुरू होते व गर्भावस्थेतील बाळ योनीमार्गे आईच्या पोटातून जगात जन्म घेते.
◾बाळाचा जन्म झाल्यावर लगेच त्याची नाळ बांधून कापून टाकतात. याच जागी बाळाची बेंबी व नाभी काही दिवसांनी तयार होते.
स्पर्धा परीक्षा तयारी उपयुक्त महत्वपूर्ण सराव प्रश्नावली स्पष्टीकरण
विषय : चालू घडामोडी प्रश्नावली स्पष्टीकरण
प्र.१) यंदाच्या प्रतिष्ठित हिंदी रत्न पुरस्कारासाठी निवड झालेल्या प्रसिद्ध पत्रकाराचे नाव काय आहे?
अ) बोरिया मुजुमदार
ब) रामबहादूर राय ✅
क) रुबिका लियाकत
ड) स्वेता सिंग
स्पष्टीकरण: यंदाच्या प्रतिष्ठित हिंदी रत्न पुरस्कारासाठी निवड झालेल्या प्रसिद्ध पत्रकाराचे नाव रामबहादूर राय आहे.
प्र.२) संगीत अकादमीकडून दिल्या जाणाऱ्या ‘संगीत कलानिधी’ सन्मानासाठी २०१९ या वर्षासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे?
अ) एम. एस. शीला
ब) राजकुमार भारती
क) एस. सौम्या ✅
ड) सीता नारायणन
स्पष्टीकरण : संगीत अकादमीकडून दिल्या जाणाऱ्या ‘संगीत कलानिधी’ सन्मानासाठी २०१९ या वर्षासाठी एस. सौम्या यांची निवड करण्यात आली आहे.
प्र.३) ‘डिफएक्सपो इंडिया’ याची २०२० मध्ये होणारी ११ वी द्विवार्षिक आवृत्ती पहिल्यांदाच .............. येथे आयोजित करण्यात आली आहे.
अ) भोपाळ, मध्यप्रदेश
ब) लखनौ, उत्तर प्रदेश ✅
क) कोची, केरळ
ड) चेन्नई, तामिळनाडू
स्पष्टीकरण : ‘डिफएक्सपो इंडिया’ याची २०२० मध्ये होणारी ११ वी द्विवार्षिक आवृत्ती पहिल्यांदाच लखनौ, उत्तर प्रदेश येथे आयोजित करण्यात आली आहे.
प्र.४) भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने राष्ट्रपतींना राज्याचे राज्यपाल नियुक्त करण्याचा अधिकार दिला आहे
अ) कलम १४५
ब) कलम १५५ ✅
क) कलम १६५
ड) कलम १७५
स्पष्टीकरण : भारतीय राज्यघटनेच्या कलम १५५ कलमाने राष्ट्रपतींना राज्याचे राज्यपाल नियुक्त करण्याचा अधिकार दिला आहे.
प्र.५) कझाकिस्तानच्या ‘प्रेसिडेंट चषक’ मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक कोणी मिळवले?
अ) शिव थापा ✅
ब) विजेंदर सिंग
क) मेरी कोम
ड) अखिल कुमार
स्पष्टीकरण : कझाकिस्तानच्या ‘प्रेसिडेंट चषक’ मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक शिव थापा यानी मिळवले.
प्र.६) भारतात कारगिल युद्ध ............ या नावानेदेखील ओळखले जाते.
अ) ऑपरेशन किंग
ब) ऑपरेशन धरोहर
क) ऑपरेशन वतन
ड) ऑपरेशन विजय ✅
स्पष्टीकरण : भारतात कारगिल युद्ध ऑपरेशन विजय या नावानेदेखील ओळखले जाते.
प्र.७) ‘आफ्रिका करंडक २०१९’ फुटबॉल स्पर्धेचा विजेता कोण आहे?
अ) सेनेगल
ब) अल्जेरिया ✅
क) इजिप्त
ड) दक्षिण आफ्रिका
स्पष्टीकरण : ‘आफ्रिका करंडक २०१९’ फुटबॉल स्पर्धेचा विजेता अल्जेरिया आहे.
प्र.८) भारताच्या ६४ व्या ग्रँडमास्टरचे नाव काय आहे?
अ) प्रितू गुप्ता ✅
ब) पेंटला हरिकृष्ण
क) विजित गुजराती
ड) अभिधान
स्पष्टीकरण : भारताच्या ६४ व्या ग्रँडमास्टरचे नाव प्रितू गुप्ता आहे.
प्र.९) ऐतिहासिक सफदरजंग कबर कुठे आहे?
अ) पुणे
ब) लखनौ
क) दिल्ली ✅
ड) सुरत
स्पष्टीकरण : ऐतिहासिक सफदरजंग कबर दिल्ली येथे आहे.
प्र.१०) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) .......... याचे पूर्ण सदस्यत्व तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.
अ) वेस्ट इंडीज
ब) डेन्मार्क क्रिकेट
क) झिंबाब्वे क्रिकेट ✅
ड) केनिया क्रिकेट
स्पष्टीकरण : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) झिंबाब्वे क्रिकेट याचे पूर्ण सदस्यत्व तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.
स्पर्धा परीक्षा तयारी उपयुक्त महत्वपूर्ण सराव प्रश्नावली स्पष्टीकरणासह उत्तरतालिका....
विषय : महाराष्ट्र राज्य भूगोल स्पष्टीकरण....
प्र.1) खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यास 'दक्षिण काशी' म्हणून ओळखले जाते ?
अ) नाशिक
ब) अहमदनगर
क) कोल्हापूर
ड) पुणे
उत्तर : क) कोल्हापूर
प्र.2) सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या किती आहे ?
अ) ११,२०,५४,६६६
ब) ११,२३,७४,३३३
क) १२,३३,७५६,५४२
ड) २१,११,३३,६६६
उत्तर : ब) ११,२३,७४,३३३ : सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या ११,२३,७४,३३३ईतकी आहे.
प्र.3) महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांची संख्या किती आहे ?
अ) २९ जिल्हे
ब) ३४ जिल्हे
क) ३६ जिल्हे
ड) ३८ जिल्हे
उत्तर : क) ३६ जिल्हे
स्पष्टीकरण : सन २०११ च्या जणगणनेनुसार प्राथमिक निष्कर्षांनुसार भारतात एकूण ६४० जिल्हे होते, त्यांपैकी ३५ जिल्हे महाराष्ट्र राज्यात होते, आता ०१ ऑगस्ट २०१४ रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन 'पालघर' या नवा जिल्ह्याची निर्मिती करण्यात आल्यामुळे राज्यातील जिल्ह्यांची संख्या आता ३६ इतकी झाली आहे.
प्र.४) दगडी कोळशाचे साठे लक्षात घेता, महाराष्ट्र राज्य देशात कितव्या स्थानावर आहे ?
अ) दुसर्या
ब) चौथ्या
क) सातव्या
ड) नवव्या
उत्तर : महाराष्ट्रात देशातील एकूण दगडी कोळशाच्या साठ्यांच्या ३ % टक्के साठे आहेत, दगडी कोळशाचे साठे लक्षात घेता महाराष्ट्र राज्य देशात सातव्या स्थानावर आहे.
प्र.५) उसाच्या उत्पादनात महाराष्ट्र राज्य कितव्या स्थानावर आहे ?
अ) पहिल्या
ब) दुसर्या
क) तीसर्या
ड) चौथ्या
उत्तर : उसाच्या उत्पादनात महाराष्ट्र देशात दुसर्या स्थानावर असला तरी साखरेच्या उत्पादनात मात्र प्रथम स्थानावर आहे.
प्रदूषण विरहित देश
🔸बारबडोस :- सर्वात स्वच्छ हवा असणाऱ्या देशात दुसऱ्या स्थानावर कॅरेबियन देश बारबडोस आहे. इथली हवा 100 टक्के स्वच्छ आहे.
🔸ऑस्ट्रेलिया :- सर्वात स्वच्छ पर्यावरण आणि 100 टक्के स्वच्छ हवा असलेल्या देशांच्या यादीत ऑस्ट्रेलिया प्रथम स्थानी आहे.
🔸जॉर्डन :- हा जगातील सर्वात स्वच्छ हवा असणारा तिसरा देश आहे. इंडेक्सनुसार इथली हवा 99.61 टक्के स्वच्छ आहे.
🔸 कॅनडा :- सर्वात स्वच्छ हवेच्या या यादीत कॅनडा हा देश चौथ्या क्रमांकावर आहे. इथली हवा 99.28 टक्के स्वच्छ आहे.
🔸डेनमार्क :- पर्यावरण कामगिरी निर्देशांकनुसार या देशातील हवा 99.16 टक्के स्वच्छ आहे. सर्वात स्वच्छ हवा आणि पर्यावरणात डेनमार्क देश पाचव्या स्थानावर आहे.
👉भारत :- पर्यावरण कामगिरी निर्देशांकानुसार भारताबद्दल बोलायचे झाले तर आपण 177 व्या स्थानावर आहे. आपल्या देशात हवा फक्त 5.75 टक्के स्वच्छ आहे.
Latest post
BIS Recruitment 2024
BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...
-
१】"खसखस पिकणे" या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ? ~मोठ्याने हसणे . २】"गंगेत घोडे न्हाने "या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? ...
-
1) अलीपूर कट:- 1908 🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष 2) नाशिक कट:- 1910 🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबारा...
-
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादी . न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे इ.स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखि...