१२ नोव्हेंबर २०१९

मंदीचा फेरा; मूडीजकडून भारताला निगेटीव्ह दर्जा

📌देशात आर्थिक मंदीमुळे चिंतेचे वातावरण आणखी दाट होत असताना  या आंतरराष्ट्रीय इन्व्हेस्टर सर्व्हीस संस्थेने भारताला दिलेला 'स्थिर' हा दर्जा हटवून आना 'निगेटीव्ह' असा दर्जा दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून भारताचा विकासदर धिमा राहील असेही या संस्थेने म्हटले आहे.

📌कॉर्पोरेट करात कपात आणि सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) वाढीचा मंदावलेला वेग पाहता, मार्च २०२० मध्ये संपणाऱ्या वित्तीय वर्षादरम्यान अर्थसंकल्पीय तूट ३.७ टक्के इतकी राहू शकते असा अंदाज मूडीजने व्यक्त केला आहे. या वर्षासाठी अर्थसंकल्पीय तुटीचे लक्ष्य ३.३ इतके ठेवण्यात आले होते.

📌ऑक्टोबर २०१९ मध्ये मूडीजने २०१९-२० मध्ये सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या विकासाच्या अंदाजात घट करून तो ५.८ टक्के इतका धरला होता. यापूर्वी मूडीजने जीडीपी ६.२ असेल असा अंदाज व्यक्त केला होता.

📌भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीची गती आणि संबंधित संभाव्य धोके लक्षात घेत मूडीजने भारताच्या रेटींगमध्ये घट केली आहे, असे मूडीज या संस्थेने आपल्या निवेदनात म्हटले आहे. याचाच अर्थ मागील वाढीच्या तुलनेत आता भारताची अर्थव्यवस्थेचा धीम्या गतीने मार्गक्रमण करेल असा आहे.

📌केद्र सरकारने मंदीशी दोन हात करण्याबाबतच्या धोरणांची योग्य अंमलबजावणी न होणे हेच या मागे कारण असल्याचे मूडीजने म्हटले आहे. देशावरील कर्जाचा भारही हळूहळू वाढत जाईल, असाही मूडीजचा अंदाज आहे.

📌मंदीशी लढण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम पडेल,असे मूडीजला वाटते. शिवाय यामुळे मंदीचा कालावधी देखील कमी होऊ शकतो, असे मूडीजला वाटते.

📌मंदीमुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले असून रोजगाराच्या संधीही कमी झाल्या आहेत. इतकेच नाही, तर गैर बँकिंग वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) देखील संकटात सापडल्या असल्याचे मूडीजने म्हटले आहे.

📌उद्योगधंद्यांमध्ये गुंतवणूक आणि विकासाचा दर वाढवण्यासाठी करावयाच्या सुधारणा आणि करप्रणालीचा पाया मजबूत बनवण्याच्या प्रयत्नांनाही खिळ बसली असल्याचे मूडीजचे म्हणणे आहे.

📌एप्रिल ते जून अशा तिमाहीच्या कालावधीत भारतीय अर्थव्यवस्था ५.० टक्के दराने पुढे सरकत आहे. हा दर २०१३ च्या नंतरचा सर्वात कमी दर आहे.

📌मागणीत झालेली घट आणि वाढता सरकारी खर्च ही या मागची कारणे असल्याचे मूडीजने म्हटले आहे. हे लक्षात घेत भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केली. याबरोबरच सरकारने देखील कॉर्पोरेट करात कपात करण्याचे पाऊल उचलले.

भारत 2023 पुरुष हॉकी विश्वचषक आयोजित करेल..

🔰भारत 1323 ते 29 जानेवारी दरम्यान 2023 पुरुष हॉकी विश्वचषक आयोजित करेल.

🔰आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) आज जाहीर केले की भारत पुरुषांच्या स्पर्धेचे आयोजन करेल तर स्पेन आणि नेदरलँड्स या संघांचे सह-यजमान म्हणून निवड करण्यात येणार आहे. २०२२ महिला विश्वचषक स्पर्धा १ ते २२ जुलै या कालावधीत होणार आहे.  .  .

🔰स्वित्झर्लंडच्या लॉझने येथे एफआयएच कार्यकारी मंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.

🔰एफआयएचने पुढे सांगितले की पुरुष व महिला वर्ल्ड कप या दोन्ही ठिकाणांची घोषणा यजमान देशांनी नंतरच्या तारखेला केली जाईल.

महाराष्ट्रातील महामंडळे.


१) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - दिनांक १ ऑगस्ट, १९६२

२) महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ - ३१ मार्च, १९६६

३) महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ - दिनांक १ एप्रिल, १९६२

४) महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ - १९६२

५) महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन - १९७८

६) महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ - १९६२

७) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ - १९७५

८) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ -१९६१

९) महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ (मर्यादित) - १९६३

१०) महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ - १९६५

११) मराठवाडा विकास महामंडळ - १९६७

१२) कोकण विकास महामंडळ (मर्यादित) - १९७०

१३) विदर्भ विकास महामंडळ (मर्यादित) - १९७०

१४) महाराष्ट्र कृष्ण खोरे महामंडळ - १९९६

१५) विदर्भ सिंचन विकास महामंडळ - १९९७

१६) कोकण सिंचन विकास महामंडळ - १९९७

१७) तापी सिंचन विकास महामंडळ - १९९७

१८) गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ - १९९८

१९) महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ - १९७८

२०) म्हाडा - १९७६

संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीवर मनमोहन सिंग नियुक्त


माजी पंतप्रधान व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांची संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी काँग्रेसचे आधीचे सदस्य दिग्विजय सिंह यांच्या जागी डॉ. मनमोहन सिंग यांची नियुक्ती केली आहे.

दिग्विजय सिंह यांची नागरी विकास खात्याच्या स्थायी समितीवर सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. ही नियुक्तीही नायडू यांनीच केली आहे. मनमोहन सिंग यांच्यासाठी दिग्विजय सिंह यांनी संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीचा राजीनामा दिला होता.

मनमोहन सिंग हे १९९१ ते १९९६ दरम्यान देशाचे अर्थमंत्री होते, तसेच सप्टेंबर २०१४ ते मे २०१९ दरम्यान ते अर्थविषयक स्थायी समितीचे सदस्य व राज्यसभेचे सदस्य होते.

नंतर जूनमध्ये त्यांची राज्यसभेची मुदत संपली व ऑगस्टमध्ये राजस्थानातून ते राज्यसभेवर पुन्हा बिनविरोध निवडून आले.

मागील काळात अर्थविषयक स्थायी समितीने वस्तू व सेवा कर, निश्चलनीकरण म्हणजे नोटाबंदी हे विषय हाताळले होते. दरम्यान, आता नवीन बदलात दिग्विजय सिंह यांना नागरी विकास खात्याच्या स्थायी समितीचे सदस्यपद देण्यात आले आहे.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न


1) ‘क्षुध्+ पीडा’ याची योग्य संधी कोणती?
   1) क्षुत्पीडा    2) क्षुतपीडा    3) क्षुत्पिडा    4) क्षुत्‍पिडा

उत्तर :- 1

2) पुढीलपैकी कोणत्या उदाहरणात भाववाचक नामांचा विशेषनामासारखा उपयोग केला आहे  ?

   1) मी आत्ताच नगरहून आलो    2) आमची बेबी आता कॉलेजात जाते
   3) माधुरी उद्या मुंबईला जाईल    4) शेजारची तारा यंदा बी.ए. झाली

उत्तर :- 3

3) ‘ज्याला कर नाही त्याला डर कशाला ?’ सर्वनामाचा अधोरेखित प्रकार सांगा.

   1) दर्शक सर्वनाम  2) संबंधी सर्वनाम    3) अनिश्चित सर्वनाम  4) आत्मवाचक सर्वनाम

उत्तर :- 2

4) विशेषण ज्या नामबद्दल, विशेष अशी माहिती सांगते त्या नामाला ...................... असे म्हणतात.

   1) विशेष्य    2) अव्यय सदृश्य सर्वनाम
   3) धातुसाधित    4) अव्ययसाधीत

उत्तर :- 1

5) पुढे दिलेल्या वाक्यांमधील भावकर्तृक क्रियापद असलेले वाक्य ओळखा.

   1) आई बाळाला हसविते        2) आईच्या आठवणीने प्रज्ञाचे डोळे पाणावले
   3) आई घरी पोचण्यापूर्वीच सांजावले    4) आईने स्वत:च जेवण बनविले

उत्तर :- 3

6) ‘जेव्हा तू जन्माला आलास तेव्हा भरपूर पाऊस पडत होता’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

   1) स्थलवाचक क्रियाविशेषण वाक्य      2) कालवाचक क्रियाविशेषण वाक्य
   3) रीतिवाचक क्रियाविशेषण वाक्य      4) कार्यकारणदर्शक क्रियाविशेषण वाक्य

उत्तर :- 2

7) दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.

     स्तव

   1) तुलनावाचक      2) हेतुवाचक    3) दिक्वाचक    4) विरोधवाचक

उत्तर :- 2

8) पुढील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता ?
    ‘अभ्यासात सातत्य म्हणजे हमखास यश’

   1) परिणामबोधक    2) स्वरूपबोधक    3) कारणबोधक    4) विकल्पबोधक

उत्तर :- 2

9) पुढील शब्द कोणत्या शब्दजातीतील ओळखा. – ‘फक्कड’

   1) उभयान्वयी      2) केवलप्रयोगी    3) सर्वनाम    4) ‍क्रियापद

उत्तर :- 2

10) ‘तो नेहमीच लवकर येतो’ या वाक्यातील काळ ओळखा.

   1) वर्तमानकाळ      2) अपूर्ण वर्तमानकाळ
   3) पूर्ण वर्तमान काळ    4) रीतिवर्तमान काळ

उत्तर :- 4

उत्पन्नात स्टॅच्यू ऑफ युनिटीने अव्वल

◾️ताजमहालाचे उत्पन्न ५६ कोटी रु. मात्र, पर्यटकांची संख्या पहिल्या स्थानी

◾️लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंचीचा पूर्णाकृती पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यटकांचे आकर्षणकेंद्र ठरला आहे.

◾️ सरदार पटेल यांची जयंती ३१ ऑक्टोबर रोजी झाली. याच दिवशी स्टॅच्यू ऑफ युनिटीचे लोकार्पण होण्यास एक वर्ष पूर्ण झाले.

◾️वर्षभरात तिकिटांचा हिशेब ठेवणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय एकता ट्रस्टला विक्रमी ६३.३९ कोटी रुपयांचे उत्पन्न झाले.

◾️ तिकिटांच्या उत्पन्नाबाबत ही आकडेवारी ताजमहालासह देशातील पाच ऐतिहासिक स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या स्मारकांपेक्षा जास्त आहे.

◾️ ताजमहाल पाहण्यास ६४.५८ लाख लोक आले. ही संख्या सर्वाधिक आहे.

◾️तर एका वर्षांत स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी २४ लाख लोक आले आहेत. मात्र, ताजमहाल देश-विदेशातील पर्यटकांना आजही आकर्षित करतो.

✍कोठे किती प्रेक्षक आले, किती उत्पन्न

❗️स्मारक आवक। ❗️  (रुपये) ❗️ पर्यटक❗️
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

◾️स्टॅच्यू ऑफ युनिटी ❗️६३ कोटी❗️ २४.४४ लाख

◾️ताजमहाल ❗️५६ कोटी❗️ ६४.५८ लाख

◾️आग्र्याचा किल्ला❗️ ३०.५५ कोटी ❗️२४.९८ लाख

◾️कुतुबमिनार❗️ २३.४६ कोटी ❗️२९.३३ लाख

◾️फतेपुर सिक्री❗️ १९.०४ कोटी ❗️१२.६३ लाख

◾️लाल किला❗️ १६.१७ कोटी❗️ ३१.७९ लाख

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

झटपट 10 चालुघडामोडी प्रश्न उत्तरे

1) क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी केंद्र सरकारने कोणते वर्ष मुदतनिश्चिती म्हणून ठरवले आहे?
उत्तर : सन 2025

2) बाजारभांडवलाच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड जगातील कितवी मोठी ऊर्जा संस्था बनली आहे?
उत्तर : सहावी

3) आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे नवे महासंचालक कोण आहेत?
उत्तर : राफेल ग्रोसी

4) संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत किती सदस्यदेश आहेत?
उत्तर : 171

5) निर्मल पुरजा कोणत्या देशाशी संबंधित आहेत?
उत्तर : नेपाळ

6) “द अनक्वायट रिव्हर: ए बायोग्राफी ऑफ द ब्रह्मपुत्रा” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर : अरुपज्योती सैकिया

7) लेबनॉन या देशाची राजधानी कोणती आहे?
उत्तर : बैरूत

8) ‘रोडटेक विषयक आंतरराष्ट्रीय परिषद’ कुठे भरली होती?
उत्तर : नवी दिल्ली

9) UNESCOच्या वतीने जागतिक शहर दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 31 ऑक्टोबर

10) आंतरराष्ट्रीय सौर युतीची दुसरी सभा कुठे भरविण्यात आली?
उत्तर : नवी दिल्ली

राज्यसभा

      हे भारतीय लोकशाहीचे वरचे सभागृह आहे . लोकसभा म्हणजे खालचे प्रतिनिधीमंडळ. राज्यसभेत 245 सदस्य असतात. ज्यामध्ये 12 सभासदांना भारतीय राष्ट्रपती नियुक्त करतात . त्यांना 'नामित सदस्य' म्हणतात. इतर सदस्य निवडले जातात. राज्यसभेवर years वर्षे सभासद निवडले जातात, त्यापैकी एक तृतीयांश दर 2 वर्षांनी सेवानिवृत्त होतात.

कोणत्याही संघीय नियमात, घटनात्मक बंधन असल्यामुळे फेडरल विधानसभेच्या वरच्या भागाला राज्य हितसंबंधांचे फेडरल लेव्हल डिफेन्डर बनविले जाते. राज्यसभेची स्थापना या तत्त्वामुळे झाली आहे. या कारणास्तव, राज्यसभेला संसदेचे दुसरे सभागृह म्हणून स्थापन झालेल्या सदनांची समानता म्हणून पाहिले जाते. लोकसभेने मंजूर केलेल्या प्रस्तावांचा आढावा घेण्यासाठी राज्य सभा स्थापन करण्यात आली आहे. मंत्रिमंडळातील तज्ञांची कमतरतादेखील भरून काढू शकते कारण त्यामध्ये किमान 12 तज्ञ नेमलेले आहेत. राष्ट्रपतींपुढे आणीबाणी लागू करण्याचे सर्व प्रस्ताव राज्यसभेनेदेखील मंजूर केले पाहिजेत. जुलै 2018 पासून राज्यसभेचे खासदार सभागृहात 22 भारतीय भाषांमध्ये भाषणे करू शकतात कारण वरच्या सभागृहात सर्व 22 भारतीय भाषांमध्ये एकाचवेळी भाषांतर केले जाते. 

भारताचे उपराष्ट्रपती (सध्या वैकेय्या नायडू ) राज्यसभेचे अध्यक्ष आहेत. राज्यसभेचे पहिले अधिवेशन १ May मे १९५२ रोजी झाले.

चालू घडामोडी प्रश्नसंच १२/११/२०१९

📍 कोणत्या देशाने संस्कृत भाषेमध्ये देशाचे राष्ट्रगीत प्रसिद्ध केले?

(A) भारत
(B) बांग्लादेश✅✅
(C) संयुक्त अरब अमिरात
(D) पाकिस्तान
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📍 कोणत्या देशाने सुदान या देशाने तयार केलेला पहिला उपग्रह प्रक्षेपित केला आहे?

(A) भारत
(B) चीन✅✅
(C) दक्षिण आफ्रिका
(D) जापान
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📍 ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे नवे संचालक म्हणून कोणाची नेमणूक झाली?

(A) मेलेनी जोन्स✅✅
(B) बेट्टी विल्सन
(C) कॅथरीन फिट्झपॅट्रिक
(D) मेघन मईरा लेनिंग
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📍 कोणत्या खेळाडूने ‘स्टीपलचेस’ या धावशर्यतीच्या प्रकारात नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला?

(A) माहेश्वरी✅✅
(B) नंदिनी गुप्ता
(C) प्रिया हबथनाहल्ली
(D) पायल वोहरा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 ____ याच्या सोबतीने राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेनी (NEERI) हवेच्या गुणवत्तेच्या संदर्भात पहिले-वहिले संकेतस्थळ आधारित माहिती संकलन मंच खुला केला आहे.

(A) पर्यावरणशास्त्र व ग्रामीण विकास केंद्र
(B) पर्यावरण शिक्षण केंद्र
(C) वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद✅✅
(D) विज्ञान व पर्यावरण केंद्र

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 सन 2019 साठी पत्रकारितेसाठीचा प्रतिष्ठित राजा राम मोहन रॉय पुरस्कार कोणाला दिला गेला?

(A) गुलाब कोठारी✅✅
(B) राज चेंगप्पा
(C) संजय सैनी
(D) क्रिष्णा कौशिक

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 मुख्य माहिती आयुक्तपदी कोण नेमणूक करतो?

(A) पंतप्रधान
(B) राष्ट्रपती✅✅
(C) प्रधान सचिव
(D) भारताचे सरन्यायाधीश

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कर्नाटक राज्याचे प्रसिद्ध लोकनृत्य कोणते आहे?

(A) छाऊ
(B) यक्षगण✅✅
(C) कन्नियार काली
(D) लावणी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 रखडलेल्या गृहबांधणी प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी तणावग्रस्त गृहबांधणी क्षेत्राला किती रक्कम देण्याचे जाहीर करण्यात आले आहे?

(A) 25000 कोटी रुपये✅✅
(B) 15000 कोटी रुपये
(C) 20000 कोटी रुपये
(D) 10000 कोटी रुपये

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 भारतीय भू-बंदरे प्राधिकरण (LPAI) याचे नवे अध्यक्ष कोण आहेत?

(A) आदित्य मिश्रा✅✅
(B) नवीन महाजन
(C) रवी जैन
(D) दिलीप शर्मा

10 झटपट सराव प्रश्न उत्तरे

1) कुणाची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते?
उत्तर : सरदार वल्लभभाई पटेल

2) सौदी अरब भारताचे रुपे कार्ड सादर करणारा पश्चिम आशियातला कितवा देश आहे?
उत्तर : तिसरा

3) 'प्राकृतिक खेती कौशल किसान’ योजना कोणत्या राज्याने तयार केली?
उत्तर : हिमाचल प्रदेश

4) कोणत्या कलमान्वये सरन्यायाधीशांच्या नियुक्तीपत्रावर भारताचे राष्ट्रपती स्वाक्षरी करतात?
उत्तर : कलम 126

5) आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 29 ऑक्टोबर

6) झोझो अजिंक्यपद ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर : गोल्फ

7) ‘मानव-तस्करीविरोधी’ एककांची स्थापना करण्यासाठी केंद्रसरकार कोणत्या निधीची मदत घेणार आहे?
उत्तर : निर्भया निधी

8)  ISROच्या सहकार्याने कोणती संस्था अंतराळ तंत्रज्ञान कक्षाची स्थापना करणार आहे?
उत्तर : IIT दिल्ली

9) कोल इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत?
उत्तर : अनिल कुमार झा

10) ‘IFFI 2019’ या कार्यक्रमाचा ‘आयकॉन ऑफ द गोल्डन जुबली’ पुरस्कार कुणाला जाहीर झाला आहे?
उत्तर : रजनीकांत

आयआयटी दिल्ली इस्रोच्या सहकार्याने अवकाश तंत्रज्ञान कक्ष स्थापन करणार आहे...

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या सहकार्याने एक अंतराळ तंत्रज्ञान सेल स्थापित करेल.

सेल स्पेस टेक्नॉलॉजी डोमेनमध्ये विशिष्ट वितरण करण्यायोग्य प्रकल्पांवर केंद्रित संशोधन प्रकल्प पूर्ण करण्याचे काम करेल.

आयआयटी, एक संस्था म्हणून, दिल्ली कृत्रिम बुद्धिमत्ता, नॅनो-टेक्नॉलॉजी, फंक्शनल टेक्स्टाईल आणि स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग यासारख्या संशोधन क्षेत्रात इस्रोची शैक्षणिक भागीदार होण्याचीही सूचना आहे.

‘टायगर ट्रायम्फ 2019’: भारत आणि अमेरिका यांच्यातला त्रि-दलीय लष्करी सराव

● 13 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर या कालावधीत आंध्रप्रदेशाच्या विशाखापट्टणम आणि काकीनाडा या शहरांच्या जवळ भारत आणि अमेरिका यांच्यातला पहिला त्रि-दलीय लष्करी सराव होणार आहे. 

● ‘टायगर ट्रायम्फ 2019’ हे या सरावाचे नाव आहे.

● या सरावात सुमारे 12 हजार भारतीय आणि 500 अमेरिकेचे भू-सैनिक, नौ-सैनिक आणि हवाई सैनिक भाग घेणार आहेत.

● या सरावात आपत्ती निवारण आणि मानवतावादी मदत या घटकांवर भर दिला जाणार आहे.

● शिवाय दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये सामंजस्य वाढविण्यावर भर दिला जाणार आहे आणि अनुभवांची देवाणघेवाण करण्यात येणार आहे.

★∆★  संयुक्त राज्ये अमेरिका (USA)  ★∆★

▪️उत्तर अमेरिका खंडातला संयुक्त राज्ये अमेरिका (अमेरिकेची संयुक्त संस्थाने किंवा संयुक्त संस्थाने – USA/US) हा देश जगात सर्वत्र केवळ अमेरिका या नावाने ओळखला जातो.

▪️देशातली प्रणाली 'अध्यक्षीय लोकशाही' आहे. केंद्रीय स्तरावरचा राष्ट्राध्यक्ष हा राष्ट्रप्रमुखपद भूषवतो. भौगोलिकदृष्ट्या कॅनडा, मेक्सिको हे अमेरिकेचे शेजारी देश आहेत.

▪️ अमेरिकेची राजधानी 'वॉशिंग्टन डी.सी.' येथे आहे आणि अमेरिकन डॉलर हे राष्ट्रीय चलन आहे.

▪️19 नोव्हेंबर 1493 रोजी ख्रिस्तोफर कोलंबस याला अमेरिकेचा शोध लागला.

▪️त्यानंतर ब्रिटिश आणि फ्रान्स राजवटींनी त्या प्रदेशात आपले वर्चस्व वाढवले. शेवटी 4 जुलै 1776 रोजी अमेरिकेला ब्रिटन पासून स्वातंत्र्य मिळाले.

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...