Wednesday, 6 November 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) “तुम्ही म्हणालात तर आम्हीदेखील नाटकाला येऊ.” – या वाक्यामध्ये कोणते अव्यय आले आहे  ?

   1) क्रियाविशेषण अव्यय    2) साधित शब्दयोगी अव्यय
   3) शुध्द शब्दयोगी अव्यय    4) केवलप्रयोगी अव्यय

उत्तर :- 3

2) ‘आम्ही हाच साबण वापरतो. कारण की तो स्वदेशी आहे.’ अधोरेखित शब्दाचा अव्यय प्रकार सांगा.

   1) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय    2) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय
   3) कारणदर्शक उभयान्वयी अव्यय      4) स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 3

3) मी आपला गप्पच उभा होतो. या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.

   1) व्यर्थ उद्गारवाची    2) पादपुरणार्थ अव्यये    3) प्रशंसा दर्शक    4) तिरस्कार दर्शक

उत्तर :- 1

4) लाख्यात प्रत्ययावरून कोणता काळ सूचित होतो ?

   1) भूतकाळ      2) वर्तमानकाळ      3) भविष्यकाळ    4) सर्वकाळ

उत्तर :- 1

5) क्रियापदातील ई – आख्यात, ऊ – आख्यात आणि ई – लाख्यांत ह्यांचे मूळ संस्कृतांतील आख्यातप्रत्यांपासूनच आले असल्याने
    त्यांत ................ हा  गुणधर्म आढळतो.

   1) फक्त पुल्लिंगात बदल व इतर लिंगे समान      2) फक्त स्त्रीलिंगात बदल व इतर लिंगे समान
   3) तिन्ही लिंगी समान          4) तिन्ही लिंगात बदल संभवतो

उत्तर :- 3

6) अनेकवचनाच्या प्रकाराबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा.

   1) भाषा – भाषा    2) सभा – सभा    3) फोटो – फोटो    4) घोडा – घोडे

उत्तर :- 4

7) विभक्तीच्या अर्थाने शब्दयोगी अव्यये नामास लागतात व ती लागण्यापूर्वी त्यांचे बहुधा सामान्यरूप होते त्या रूपास काय
     म्हणतात ?

   1) अधिकरण    2) संप्रदान    3) करण      4) विभक्तीप्रतिरूपक अव्यये

उत्तर :- 4

8) ‘राजांनी गनिमी कावा करण्याचे ठरविले, तेव्हाच खानाचा पराभव निश्चित झाला’ – ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ?

   1) संयुक्त वाक्य    2) मिश्र वाक्य    3) केवल वाक्य    4) संकेतार्थी

उत्तर :- 2

9) ‘त्यांचा धाकटा मुलगा काल अतिरेक्यांविरूध्द लढताना शहिद झाला.’ या वाक्यातील उद्देश्य वाक्य ओळखा.

   1) अतिरेक्यांविरूध्द  2) लढताना    3) शहीद झाला    4) त्याचा धाकटा मुलगा

उत्तर :- 4

10) ‘मांजर उंदीर पकडते’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

   1) कर्तरी    2) कर्मणी    3) भावे      4) संकर

उत्तर :- 1    

पॅरिस करारातून अमेरिकेची माघार

पॅरिस हवामान करारातून अमेरिका माघार घेत असल्याची अधिकृत सूचना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांना दिली आहे.

या करारातून माघार घेत असल्याचे त्यांनी पूर्वीच जाहीर केले असले तरी त्यावर अखेर सोमवारी शिक्कामोर्तब करण्यात आले.

या करारातून माघार घेण्याची घोषणा ट्रम्प यांनी जून २०१७ मध्येत केली होती पण त्याची प्रक्रिया सोमवारी संयुक्त राष्ट्रांना अधिकृत सूचना देऊ न सुरू करण्यात आली आहे.

त्यामुळे आता अमेरिका नोव्हेंबर २०२० मध्ये या करारातून मुक्त होणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पियो यांनी सांगितले की, अमेरिकेने पॅरिस हवामान करारातून माघार घेण्याची प्रक्रिया सोमवारी सुरू केली आहे.

या करारातील अटीनुसार अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांना या करारातून बाहेर पडत असल्याची सूचना पाठवली आहे. त्यानंतर एक वर्षांने अमेरिका या करारातून संपूर्णपणे बाहेर पडेल.

न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणिसांना करारातून माघार घेत असल्याबाबत पहिली सूचना ४ नोव्हेंबर २०१९ रोजी दिली होती.

📁पॅरिस करार १२ डिसेंबर २०१५ रोजी झाला होता.

त्यावर अमेरिकेने २२ एप्रिल २०१६ रोजी स्वाक्षरी केली होती व ३ सप्टेंबर २०१६ रोजी कराराचे पालन करण्यास अनुमति दिली होती.

करारातून माघार घेण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयावर डेमोक्रॅटिक पक्षाने टीका केली आहे. फ्रोन्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रान यांनी यांनी सांगितले की, अमेरिकेचा हा निर्णय दुर्दैवी आहे.

हिटमॅन’ने केला धमाकेदार पराक्रम; धोनीला टाकले मागे

🅾भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला टी २० सामना दिल्लीत सुरू आहे. दिल्लीतील प्रदुषणाने धोक्याची पातळी गाठली असूनही भारत-बांगलादेश सामना हलवण्याच्या हाकेकडे दुर्लक्ष करीत उभय संघ हा सामना खेळत आहेत.

🅾पुढील वर्षी होणाऱ्या टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाकडून विविध खेळाडूंची चाचपणी सुरू आहे. या मालिकेत अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे बांगलादेशचा संघ सर्वात अनुभवी खेळाडू शाकिब अल हसन याच्या अनुपस्थितीत ही मालिका खेळत आहे.

🅾या सामन्यात रोहित शर्माने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा विक्रम मोडला. रोहित शर्मा सामन्यासाठी मैदानात उतरला, तेव्हाच त्याने धोनीला मागे टाकले. रोहित शर्माचा हा ९९ वा टी २० सामना आहे. या आधी भारताकडून पुरुष क्रिकेट संघात धोनीने सर्वाधिक ९८ आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेट सामने खेळले होते. तो विक्रम रोहितने मोडला.

🅾भारताकडून सर्वाधिक टी २० क्रिकेट सामने हरमनप्रीत कौर (१००) हिने खेळले आहेत. पुढील सामन्यात रोहितला तिच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे. पुरुष क्रिकेटमध्येदेखील जगात केवळ शोएब मलिक आणि शाहिद आफ्रिदी या दोघांनीच रोहितपेक्षा जास्त टी २० सामने खेळले आहेत.

ISROची अंतरीक्स कॉर्पोरेशन कंपनी भारताच्या ‘NavIC’ या स्वदेशी GPSला व्यवसायिक स्वरूप देणार


📌भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) भारतासाठी ‘NavIC’ नावाने स्वदेशी सुचालन प्रणाली तयार करीत आहे.

📌NavIC म्हणजे नॅव्हिगेशन वीथ इंडियन कॉन्स्टीलेशन (NAVigation with Indian Constellation - NavIC) होय.

📌या प्रणालीच्या उपग्रहांची शृंखला भारताने यशस्वीरीत्या पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित केलेली आहे. आता या सेवेला व्यवसायिक स्वरूप देण्यासाठी त्यादृष्टीने, अंतरीक्स कॉर्पोरेशन (Antrix Corporation) लिमिटेड ही ISROच्या व्यवसायिक शाखा योजना तयार करीत आहे.

🔴‘NavIC’ प्रणाली....

📌‘NavIC’ प्रणाली ही ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम (GPS) सेवेप्रमाणेच आहे. भारताकडून ‘NavIC’ या नावाने ‘भारतीय प्रादेशिक सुचालन उपग्रह प्रणाली (रिजनल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम - IRNSS)’ उभारण्यासाठी एकूण सात उपग्रहांचा वापर केला जाणार आहे. दोन उपग्रह तांत्रिकदृष्ट्या अकार्यक्षम ठरल्यामुळे ते पाठवण्यात आले नाहीत त्यामुळे एकूण नऊ उपग्रह तयार केले गेलेत.

📌IRNSS उपग्रहांना पृथ्वीच्या उप-भौगोलिक समांतर कक्षेत (sub-GTO) प्रस्थापित करण्यात आले आहेत. त्यातला आठवा IRNSS-1H हा खासगी कंपन्यांकडून तयार करण्यात आलेला आणि सक्रियपणे पृथ्वीच्या कक्षेत पाठवण्यात आलेला भारताचा पहिला उपग्रह आहे.

📌IRNSS दोन प्रकारच्या सेवा प्रदान करणार - सर्व वापरकर्त्यांसाठी स्टँडर्ड पोजिशनिंग सर्व्हिस (SPS) आणि केवळ अधिकृत वापरकर्त्यांसाठी रेस्ट्रीक्टेड सर्व्हिस (RS).

📌ही प्रणाली भारताच्या सर्व बाजूंनी सुमारे 1500 किलोमीटरच्या सीमेच्या आत कार्य करणार. ही प्रणाली वापरकर्त्या संस्थेला रस्त्यावर आणि समुद्रात त्यांचे वाहन चालविण्यासाठी योजनेची आखणी करण्यास आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत करणार.

📌आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडनार्‍या मच्छीमारांना याद्वारे सावध केले जाऊ शकते आणि लोकांना त्यांना आवश्यक असलेला पत्ता शोधण्यास मदत होऊ शकणार. शिवाय दूरसंचार आणि पॉवर ग्रीड कार्यामध्येही याची मदत होऊ शकते. एकूणच भारताच्या दळणवळण क्षेत्रात हा अमुलाग्र टप्पा असणार आहे.

🔴ISRO विषयी:-

📌भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे. याचे बंगळुरू येथे मुख्यालय आहे. 1962 साली स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या प्रयत्नांमुळे, 15 ऑगस्ट 1969 रोजी स्थापित ISRO ने 1962 साली स्थापन झालेल्या इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च (INCOSPAR) ला बदलले. ही संस्था विज्ञान विभागाकडून व्यवस्थापित केली जाते.

📌ISRO चा पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’ 19 एप्रिल 1975 रोजी सोव्हिएत युनियनने प्रक्षेपित केला. 1980 साली, भारतीय बनावटीचे प्रक्षेपक SLV-2 द्वारे ‘रोहिणी’ हा उपग्रह पाहिल्यादा प्रक्षेपित करण्यात आला. 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताची ‘चंद्रायान-1’ मोहीम यशस्वी झाली. त्यानंतर ‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ ने 24 सप्टेंबर 2014 रोजी यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश ठरला.

📌अंतरीक्स कॉर्पोरेशन (Antrix Corporation) लिमिटेड, बेंगळुरू ही अंतराळ विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेली भारत सरकारच्या संपूर्णपणे मालकीची कंपनी आहे. ही ISROने विकसित केलेल्या अंतराळ उत्पादने, तांत्रिक व सल्लागार सेवा आणि तंत्रज्ञानाचे हस्तांतरण अश्या सुविधांचे व्यवसायिकीकरण करण्यासाठी ISROची विपणन शाखा आहे. त्याची स्थापना 28 सप्टेंबर 1992 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय बेंगळुरू या शहरात आहे.

नेमबाज दिपक कुमार टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र

📌 दोहा शहरात सुरु असलेल्या १४ व्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या दिपक कुमारने कांस्यपदकाची कमाई केली आहे. या कामगिरीसह दिपकने टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे.

📌टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा दिपक दहावा भारतीय नेमबाजपटू ठरला आहे.

📌 पात्रता फेरीत २२७.८ गुणांची कमाई करत दिपकने अंतिम ८ जणांमध्ये प्रवेश मिळवला. यानंतर पदकांच्या शर्यतीत ६२६.८ गुणांची कमाई करत दिपकने कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं.

📌 २०१८ साली झालेल्या नेमबाजी विश्वचषकात दिपकने कांस्यपदकाची कमाई केली होती.

सुमंत कठपलिया: इंडसइंड बँकेचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी

📌इंडसइंड बँक लिमिटेड याच्या संचालक मंडळाने नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून सुमंत कठपलिया यांची नेमणूक केली आहे.

📌सुमंत कठपलिया यांची निवड सध्याचे CEO रोमेश सोबती यांच्या जागेवर केली गेली आहे. या नियुक्तीचा प्रस्ताव मंजुरीसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे पाठविण्यात आला आहे.

📌गेल्या दशकभरापासून प्रमुखपदी असलेले रोमेश सोबती वयाचे 70 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मार्च 2020 मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत.

📌सुमंत कठपलिया सध्या हिंदुजा उद्योग-समुहाचा पाठिंबा असलेल्या इंडसइंड बँकेत ग्राहक कर्ज विभागाचे प्रमुख आहेत. 55 वर्षांचे कठपलिया हे 2008 सालापासून बँकेसोबत जुळलेले आहेत.

ताश्कंदमध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) च्या प्रमुख प्रमुख (सीएचजी) बैठक..

📌ताश्कंदमध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) च्या प्रमुख प्रमुख (सीएचजी) बैठक

📌बैठकीस उपस्थित नेत्यांनी एससीओ क्षेत्रातील बहुपक्षीय आर्थिक सहकार्याबद्दल चर्चा करणे अपेक्षित आहे.

📌शांघाय सहकार संघटनेचा भारत सदस्य झाल्यानंतर ही शासनाध्यक्षांची तिसरी बैठक होईल.

📌भारतामध्ये द्विपक्षीय गुंतवणूकी देखील असतील

📌द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी भारताने उझबेकिस्तानची बैठक घेतली.

📌 गेल्या दोन सीएचजी बैठकी गेल्या वर्षी ताजिकिस्तानमधील सोची, रशिया आणि दुशान्बे येथे 2017 मध्ये झाली.

भारत आणि जपान यांच्यातील 'धर्मरक्षक' सैनिकी सराव मिझोरममध्ये झाला

📌मिझोरमच्या काउंटर विद्रोह आणि जंगल वॉरफेअर स्कूल (सीआयजेडब्ल्यूएस) वैरंगते येथे भारतीय आणि जपानी सैन्यामधील धर्म संरक्षक म्हणून नियुक्त केलेल्या वार्षिक संयुक्त सैन्य अभ्यासाची दुसरी आवृत्ती आज संपली.

📌या समारंभाचे अध्यक्ष जपानी ग्राऊंड सेल्फ डिफेन्स फोर्सचे चीफ ऑफ स्टाफ जनरल ग्रो युसा आणि भारतीय सैन्य दलाच्या 3 वाहिनीचे जीओसी लेफ्टनंट जनरल राजीव सिरोही होते.

📌या पंधरवड्याच्या संयुक्त सैन्य अभ्यासाचे मुख्य लक्ष डोंगराळ भागातील बंडखोरी व दहशतवादविरोधी कारवाईत प्रतिस्पर्ध्यांना प्रशिक्षण देणे आणि त्यास सुसज्ज करणे हा होता.

📌 या व्यायामाचा एक भाग म्हणून, दहशतवादविरोधी आणि दहशतवादविरोधी कृतींशी संबंधित महत्वपूर्ण व्याख्याने, प्रात्यक्षिके आणि व्यायामांचे आयोजन केले गेले.  अशा परिस्थितींचा सामना करण्यासाठी दोन्ही सैन्याने आपले मौल्यवान अनुभव तसेच अत्याधुनिक ऑपरेशन्स आणि संयुक्त ऑपरेशनची प्रक्रिया देखील सामायिक केली.

📌संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की परस्पर समन्वय आणि विश्वास वाढविण्याशिवाय ही प्रथा द्विपक्षीय सुरक्षेचे एक उपाय आहे आणि…

महराष्ट्रातील महत्त्वाच्या संताची समाधीस्थाने :

1) गाडगे महाराज - अमरावती

2) समर्थ रामदास- सज्जनगड

3) संत एकनाथ - पैठण

4) गजानन महाराज - शेगाव

5) संत ज्ञानेश्वर - आळंदी

6) संत गोरोबा कुंभार - ढोकी

7) संत चोखा मेळा - पंढरपूर

8) मचिन्द्रनाथ - सप्तशृंगी

9) संत तुकडोजी  - मोझरी

10) संत तुकाराम - देहू

11) साईबाबा - शिर्डी

12) जनार्दन स्वामी - कोपरगाव

13) निवृत्तीनाथ - त्र्यंबककेश्वर

14) दामाजी पंत - मंगळवेढा

15) श्रीधरस्वामी - पंढरपूर

16) गुरुगोविंदसिंह - नांदेड

17) रामदासस्वामी - जांब

18) सोपानदेव - आपेगाव

19) गोविंदप्रभू - रिधपुर

20) जनाबाई - गंगाखेड

21) निवृत्तीनाथ - आपेगाव

22) नरसी - हिंगोली

10 महत्त्वाचे चालुघडामोडी प्रश्नउत्तरे

1) ‘ग्लोबल बायो-इंडिया शिखर परिषद’ कुठे आयोजित केली जाणार आहे?
उत्तर : नवी दिल्ली

2) भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली?
उत्तर : अरविंद सिंग

3) ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिन 2019’ कधी साजरा करण्यात आला?
उत्तर : 25 ऑक्टोबर

4) ऑक्टोबर 2019 मध्ये “वन टच ऑटोमॅटिक टिकिट व्हेंडिंग मशीन’ कुठे प्रस्थापित केल्या गेल्या?
उत्तर : मुंबई उपनगर रेल्वे

5) के.के. बिर्ला फाउंडेशनच्यावतीने सन 2018 साठी 28 वा व्यास सन्मान कोणाला दिला गेला?
उत्तर : लीलाधर जगूरी

6) अल्बर्टो फर्नांडिज कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत?
उत्तर : अर्जेंटिना

7) राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना कुणाला लागू होते?
उत्तर : केंद्र सरकार आणि राज्य सरकार कर्मचारी

8) केंद्र सरकार 'एकता पुरस्कार' कोणत्या महापुरुषाच्या नावाने देणार आहे?
उत्तर : सरदार वल्लभभाई पटेल

9) 35 वी ASEAN शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती?
उत्तर :  थायलँड

10) ‘इंडियन ब्रेन अॅटलस’ कोणत्या संस्थेद्वारे तयार करण्यात आले आहे?
उत्तर : आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान संस्था, हैदराबाद

महाराष्ट्रातील व भारतातील मृदेचे वितरण

महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्य़ात आणि सह्य़ाद्रीच्या घाटमाथ्यावर तसेच तेथील डोंगराळ भागात जांभा माती आहे.

✅महाराष्ट्रातील जांभा मृदा :✅

महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्य़ात आणि सह्य़ाद्रीच्या घाटमाथ्यावर तसेच तेथील डोंगराळ भागात जांभा माती आहे. गडचिरोलीच्या पूर्व भागातही जांभा माती आढळते

पिके : जांभा मृदा जरी साधारण सुपीक असली तरी तिची सुपीकता दख्खनच्या पठारावरील काळ्या मातीपेक्षा कमी असते. या मातीपासून कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात प्रामुख्याने फळबागांची लागवड मोठय़ा प्रमाणात केलेली आहे. रत्नागिरीमधील हापूस आंबा जगभरात प्रसिद्ध आहे. त्याची निर्यातीतून परकीय चलन प्राप्त होते. याशिवाय काजू, चिक्कू वगरे फळझाडांचे उत्पादन मिळते.

तांबडी माती :

प्रदेश : तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशचा ईशान्य भाग, महाराष्ट्राचा आग्नेय भाग, ओडिशा, बिहार, राजस्थानातील अरवली टेकडय़ा, पूर्वेकडील खासी, जैतिया, नागा टेकडय़ा या भागांमध्ये तांबडी माती आढळते.

गुणधर्म :  तांबडय़ा मातीत सेंद्रिय घटक आणि नायट्रोजनचा अभाव असतो. त्यात मॅग्नेशिअम, लोह, अ‍ॅल्युमिनिअम संयुगे आढळतात. या मातीचा रंग त्यात असलेल्या लोहाच्या अंशामुळे लाल, तांबूस किंवा पिवळसर दिसतो.

पिके : पाणी व खतांचा योग्य पुरवठा केल्यास या मातीत विविध प्रकारची पिके घेता येतात. नाचणी, भात, तंबाखू, भाजीपाला या पिकांना ही माती अधिक उपयुक्त आहे. या मातीत भुईमूग, ऊस, रताळी यांची लागवड केली जाते.

महाराष्ट्रातील तांबडी व पिवळसर माती :

महाराष्ट्रातील अतिशय जुन्या अशा िवध्ययन आणि कडाप्पा तसेच आíकयनकालीन गॅ्रनाइट व नीस खडकांवर विदारण क्रिया होऊन तांबडी माती तयार झालेली आहे. महाराष्ट्रातील तांबडी व पिवळसर माती मर्यादित प्रदेशात पसरलेली आहे. सहय़ाद्रीच्या पर्वतमय भागात विशेषत: उत्तर कोकणालगत तसेच विदर्भाच्या पूर्व भागात वर्धा व वैनगंगा नद्यांच्या खोऱ्यात तांबडी व पिवळसर माती आढळते.

पर्वतीय मृदा :

हिमालयाच्या पर्वतरांगा, सह्य़ाद्रीचा घाटमाथा, पूर्व घाट आणि द्वीपकल्पीय भारताच्या अरण्याच्या प्रदेशात ही माती आढळते. दगड-गोटय़ांच्या मिश्रणातून पर्वतीय व डोंगराळ प्रदेशातील माती तयार झालेली असते. उत्तराखंडातील तराईच्या भागात अरण्याचे प्रमाण जास्त आहे. यामुळे येथे पर्वतीय माती आढळते. या जमिनीत पोटॅश, फॉस्फरस आणि चुनखडीचे प्रमाण कमी असते. चांगल्या उत्पन्नासाठी जमिनीला खतांचा पुरवठा करावा लागतो. अरण्यांचे प्रकार जास्त असल्याने जमिनीला सेंद्रिय द्रव्यांचा पुरवठा होतो. चहा, कॉफी, फळझाडे, मका, गहू, बार्ली यांच्या लागवडीसाठी ही जमीन पोषक आहे.

वाळवंटी मृदा :

अतिउष्णता, कोरडे हवामान, अत्यल्प पर्जन्य यामुळे प्रदेशातील खडकांचे अपक्षय होऊन वाळू व रेती तयार होते. राजस्थानमधील अरवली पर्वताच्या पश्चिमेकडील संपूर्ण भागात वालुकामय माती आहे. पंजाब व हरियाणाचा दक्षिण भाग, गुजरातमधील सौराष्ट्र व कच्छच्या भागात ही माती पसरलेली आहे.

गुणधर्म : या मातीत विरघळलेले क्षार अधिक प्रमाणात असतात. हय़ुमसचे प्रमाण कमी असते. ओलावा धरून ठेवण्याची क्षमता कमी असते, फॉस्फेटचे प्रमाण जास्त असते, परंतु नायट्रोजनचे प्रमाण कमी असते.

पिके : कृत्रिम जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध केल्यास या जमिनीतून विविध पिके घेता येतात.

केंद्र सरकारच्या नव्या नेमणूका

♻️ NSG चे महासंचालक : अनूप कुमार सिंग

♻️ महालेखा नियंत्रक : JPS चावला

♻️ चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे (COSC) नवे अध्यक्ष : लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत

♻️ भारताचे हवाई दल प्रमुख : एअर मार्शल RKS भदौरिया

♻️ UIDAI CEO : पंकज कुमार

♻️ ऊर्जा विभागाचे सचिव : संजीव नंदन सहाय

♻️ कर्मचारी निवड आयोगाचे अध्यक्ष : ब्रज राज शर्मा

♻️ सिमा व्यवस्थापन विभागाचे सचिव : नागेंद्र नाथ

♻️ राज्य सचिवालय परिषदेचे सचिव : संजीव गुप्ता

♻️ सार्वजनिक उपक्रम विभागाचे सचिव : शैलेश

♻️ अल्पसंख्याक प्रकरणांचे सचिव : प्रमोद कुमार दास

♻️ दिपमचे सचिव : तुहीन कांत पांड्ये

♻️ कॅबिनेट सचिवालयातील सचिव : राजेश भूषण

♻️ रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव : लीना नंदन

♻️ कर्मचारी व प्रशिक्षण मंत्रालयाचे विशेष सचिव व आस्थापना अधिकारी : प्रदिप कुमार त्रिपाठी

♻️ सरकारने 1987 च्या बॅचच्या 13 IAS अधिकार्यांना बढती दिली आहे.

चालू घडामोडी प्रश्नसंच 6/11/2019

📍 कैस सईद ह्यांनी _ या देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.

(A) ट्युनिशिया✅✅
(B) अल्जेरिया
(C) नायजेरिया
(D) मलेशिया

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 ऑक्टोबर 2019 मध्ये भारतीय रेल्वेने _ उपनगर रेल्वे जाळ्यात “वन टच ऑटोमॅटिक टिकिट व्हेंडिंग मशीन’ प्रस्थापित केल्या.

(A) कोलकाता उपनगर रेल्वे
(B) मुंबई उपनगर रेल्वे✅✅
(C) दिल्ली उपनगर रेल्वे
(D) चेन्नई उपनगर रेल्वे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 __ या दिवशी ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिन 2019’ साजरा करण्यात आला.

(A) 25 ऑक्टोबर✅✅
(B) 24 ऑक्टोबर
(C) 26 ऑक्टोबर
(D) 27 ऑक्टोबर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 क्रेडिट सुइस या संस्थेनी जाहीर केलेल्या वार्षिक ‘जागतिक संपत्ती अहवाला’विषयी खाली दिलेली विधाने विचारात घ्या.

I. अमेरिका जगात अग्रस्थानी असलेल्या 10% टक्के धनाढ्य लोकांमध्ये समाविष्ट असलेल्या धनाढ्य लोकांची सर्वाधिक संख्या असलेला देश ठरला.

II. क्रेडिट सुइस ग्रुप ही अमेरिकेतली बहुराष्ट्रीय गुंतवणूक बँक आणि वित्तीय सेवा कंपनी आहे.

III. भारतीय लक्षाधीशांची लोकसंख्या 759 एवढी आहे.

वरीलपैकी कोणते विधान अचूक आहे?

(A) I आणि II
(B) I आणि III
(C) II आणि III
(D) केवळ III✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणता देश ब्रह्मांड किरणांच्या उत्पत्तीचा आणि विश्वाचा अभ्यास करण्यासाठी “लार्ज हाय-अल्टीट्यूड एयर शॉवर ऑब्जर्व्हेटरी” या नावाचे एक विशाल ब्रह्मांड किरण निरीक्षण केंद्र तयार करीत आहे?

(A) संयुक्त राज्ये अमेरिका
(B) ऑस्ट्रेलिया
(C) चीन✅✅
(D) भारत

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) याच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली?

(A) सुखबीर सिंग संधू
(B) अरविंद सिंग✅✅
(C) गुरुप्रसाद महापात्रा
(D) अनुज अग्रवाल

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...