Monday, 4 November 2019

One Nation One Fastag

◾️केंद्र सरकारने येत्या १ डिसेंबरपासून देशभरात फास्टॅग सारखी इलेक्ट्रॉनिक टोल वसुली लागू करत आहे. वन नेशन वन फास्टॅग (one nation one fastag) या अंतर्गत वाहनांना फास्टॅग लावण्यात येणार आहेत.

◾️ही स्कीम लागू झाल्यावर संपूर्ण देशभरात कोठेही वाहनांना कॅश दिल्याशिवाय टोल नाक्यावरुन प्रवास करता येणार आहे.

✍ फास्टॅग म्हणजे काय?

◾️फास्टॅग ही एक इलेक्ट्रॉनिक पद्धत आहे. फास्टॅग वाहनांच्या पुढील बाजुला लावले जाणार आहे.

◾️गाडीवर फास्टॅग असल्यास देशभरातील टोल नाक्यांवर कुठल्याही प्रकारचे पैसे न देता वाहन तुम्ही घेऊन जाऊन शकता.

◾️ यामध्ये रेडिओ फ्रिक्वेंसी आयडेंटीफिकेशन (आरएफआयडी) लावलेले असतं. ज्यावेळी वाहन टोल नाक्याच्याजवळ पोहोचतं तेव्हा तेथील सेंसर कारच्या स्क्रीनवर लावलेलं फास्टॅग सेंस करतं आणि तुमच्या अकाऊंटमधून पैसे कट होतात.

◾️त्यामुळे एकदा हे पैसे संपल्यावर तुम्हाला फास्टॅग पुन्हा रिचार्ज करावं लागणार.

✍ कसं मिळणार फास्टॅग?

◾️केव्हायसी (KYC) साठी आवश्यक आयडी प्रूफ म्हणजेच पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स दिल्यावर तुम्हाला फास्टॅग अकाऊंट तयार करता येणार आहे.

✍ काय होणार फायदा?

◾️फास्टॅग वाहनांवर लावले असल्यास टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागणार नाहीत आणि याचा परिणाम म्हणजे टोल नाक्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे.

विज्ञान प्रश्नसंच 5/11/2019

1. वस्तूच्या कंपनामुळे ____ ची निर्मिती होते.

अ. ध्वनी
ब. प्रतिध्वनी
क. अवतरंग
ड. प्रकाश

उत्तर अ. ध्वनी

2. खालील पैकी कशामध्ये ध्वनीचा वेग सर्वात जास्त असेल.

अ. पाणी
ब. वायू
क. लाकडी ठोकळा
ड. निर्वात वातावरण

उत्तर क. लाकडी ठोकळा

3. कार्य करण्यासाठी साठवलेली क्षमता म्हणजे

अ. बल
ब. ऊर्जा
क. शक्ती
ड. गती

उत्तर ब. ऊर्जा

4. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला ?

अ. डाल्टन
ब. चॅडविक
क. रूदरफोर्ड
ड. थॉमसन

उत्तर ब. चॅडविक

5. आधुनिक आवर्तसारणीमध्ये किती आवर्त आहेत ?

अ. आठ
ब. सात
क. नऊ
ड. सहा

उत्तर ब. सात

6. हा वैश्विक द्रावक आहे.

अ. हवा
ब. अल्कोहोल
क. पाणी
ड. रॉकेल

उत्तर क. पाणी

7. ज्वलनासाठी कोणत्या वायूची गरज असते.

अ. ऑक्सीजन
ब. नायट्रोजन
क. सल्फर डाय ऑक्साईड
ड. कार्बन डाय ऑक्साईड

उत्तर अ. ऑक्सीजन

8. वनस्पतीवर अप्रत्यक्षपणे अवलंबून असणारे प्राणी कोणते ?

अ. शाकाहारी
ब. मिश्राहारी
क. कीटकहारी
ड. मांसाहारी

उत्तर ड. मांसाहारी

9. अन्न तयार करण्यासाठी वनस्पतींना कशाची गरज असते?

अ. ऑक्सीजन
ब. सुर्यप्रकाश
क. माती
ड. अंधार

उत्तर ब. सुर्यप्रकाश

10. प्लेगच्या साथीसाठी कोणता प्राणी कारणीभूत असतो ?

अ. डास
ब. मासे
क. उंदीर
ड. मासे

उत्तर क. उंदीर

महत्वपूर्ण चालू घडामोडी सराव प्रश्नावली 5/11/2019


1) योग्य जोडया निवडा.
   अ) हिट रिफ्रेश    --  सत्या नाडेला
   ब) फॉल्ट लाईन्स    --  रघुराम राजन
   क) एक्झॉम वॉरियर्स    --  नरेंद्र मोदी
   ड) पैजामाज आर फॉर्गिविंग  --  व्टिंकल खन्ना
  1) अ, ब, क    2) अ, क, ड    3) ब, क, ड    4) अ, ब, क, ड
उत्तर :- 4

2) संयुक्त राष्ट्रांनी खालीलपैकी कोणत्या राज्याला जगातला पहिला “ऑरगॅनिक स्टेट” हा बहुमान प्रदान केला.
   1) सिक्कीम    2) ओडीशा    3) मध्यप्रदेश    4) यापैकी नाही
उत्तर :- 1

3) खालील माहितीचा विचार करा.
   अ) दरवर्षी 25 नोव्हेंबर हा दिवस जागतिक महिला अत्याचार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो.
   ब) यंदा या दिनाची संकल्पना Orange the world # Hear me too अशी होती.
  1) अ सत्य    2) अ, ब सत्य    3) ब सत्य    4) अ, ब असत्य
उत्तर :- 2

4) 2018 सालचा शांततेचा नोबेल कांगोचे डॉ. डेनिस मुक्वेगा व इराकचे नादीया मुराद यांना त्यांच्या कोणत्या
     योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आला.
   1) लैंगिक हिंसाचारात बळी पडलेल्या महिल्यांच्या पुनर्वसनासाठी कार्य
   2) दिव्यांग महिला साठी कार्य       3) आदिवासींसाठी कार्य      4) यापैकी नाही
उत्तर :- 1

5) योग्य क्रमानुसार लावा (राज्यांची निर्मिती) :
   अ) मिझोराम    ब) नागालॅण्ड    क) मेघालय    ड) महाराष्ट्र
  1) अ,ड,ब,क    2) ड,ब,क,अ    3) क,ड,ब,अ    4) ड,ब,अ,क
उत्तर :- 2

उत्तरप्रदेश राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री कन्या सुमंगल योजना’

​​

• दिनांक 25 ऑक्टोबर 2019 रोजी उत्तरप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी नव्या ‘मुख्यमंत्री कन्या सुमंगल योजना’ची घोषणा केली.

✅ ठळक मुद्दे :

राज्यातल्या मुलींना सक्षम बनविणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

ज्या कुटुंबात मुलीचा जन्म झाला त्या प्रत्येकाला 15 हजार रुपयांची मदत दिली जाणार.

रक्कम DBT पद्धतीने लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जाणार आहे.

योजनेची रक्कम टप्प्याटप्प्याने हस्तांतरित केली जाणार आहे. मुलीचे लसीकरण, इयत्ता 1, 5, 9 व पदवी मधील त्यांचा प्रवेश असे विविध टप्पे पूर्ण केल्यानंतर रक्कम दिली जाणार.

योजनेसाठी डिजिटल व्यासपीठ देखील तयार करण्यात आले आहे.

✅ उत्तरप्रदेश राज्य :

• उत्तरप्रदेश हे भारताचे उत्तरेकडील एक प्रमुख राज्य आहे.

• लोकसंख्येनुसार उत्तरप्रदेश भारताचे पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरते.

• लखनऊ ही राज्याची राजधानी तर कानपूर हे राज्यातले सर्वात मोठे शहर आहे.

• राज्याची स्थापना 26 जानेवारी 1950 रोजी झाली.

भारत आणि जर्मनी  यांच्यात झालेले सामंजस्य करार

👉जर्मनीच्या चॅन्सेलर डॉ. अँजेला मर्केल यांच्या नेतृत्वात जर्मन प्रतिनिधी मंडळ भारत भेटीवर आले होते.

👉1 नोव्हेंबर 2019 रोजी दोन्ही देशांमध्ये झालेल्या चर्चेनंतर पुढील सामंजस्य करार/करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

✅हेतू दर्शक संयुक्त घोषणापत्र

1.सन 2020 - सन 2024 या काळासाठी होणाऱ्या चर्चांबाबत हेतू दर्शक संयुक्त घोषणापत्र (परराष्ट्र कल्याण मंत्रालय)

2.धोरणात्मक प्रकल्पांवरच्या सहकार्याबाबत हेतू दर्शक संयुक्त घोषणापत्र (रेल्वे मंत्रालय)

3.ग्रीन अर्बन मोबॅलिटीसाठी इंडो-जर्मन भागीदारीकरिता हेतू दर्शक संयुक्त घोषणापत्र (गृहनिर्माण व नागरी कल्याण मंत्रालय)

4.कृत्रिम बुद्धीमत्तेबाबत संशोधन व विकासासाठी संयुक्त सहकार्यासाठी हेतू दर्शक संयुक्त घोषणापत्र (विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय)

5.सागरी कचरा रोखण्यासंदर्भात सहकार्य करण्याविषयी हेतू दर्शक संयुक्त घोषणापत्र (गृहनिर्माण व नागरी कल्याण मंत्रालय)

6.ISRO आणि जर्मन एरोस्पेस सेंटर यांच्यात कर्मचारी आदान-प्रदान करण्याविषयीच्या व्यवस्थेची अंमलबजावणी

7.हवाई वाहतूक क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत हेतू दर्शक संयुक्त घोषणापत्र

8.आंतरराष्ट्रीय स्मार्ट सिटी नेटवर्क सहकार्याबाबत हेतू दर्शक संयुक्त घोषणापत्र

9.कौशल्य विकास व व्यवसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण सहकार्याबाबत हेतू दर्शक संयुक्त घोषणापत्र

10.स्टार्टअप क्षेत्रात आर्थिक सहकार्य दृढ करण्याबाबत हेतू दर्शक संयुक्त घोषणापत्र

11.कृषी बाजार विकासाबाबत द्विपक्षीय सहकार्य प्रकल्प उभारण्याबाबत हेतू दर्शक संयुक्त घोषणापत्र

12.दिव्यांगत्व प्राप्त झालेल्यांसाठी व्यवसायामुळे उद्‌भवणारे रोग, पुनर्वसन या क्षेत्रात सामंजस्य करार

13.आंतरदेशीय, किनारी, सागरी तंत्रज्ञान या क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करार

14.वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान संशोधन सहकार्याला प्रोत्साहन देऊन विस्तार करण्यासाठीचा सामंजस्य करार

15.आयुर्वेद, योग आणि ध्यानधारणा यामध्ये शैक्षणिक सहकार्य करण्याबाबतचा सामंजस्य करार

16.उच्च शिक्षण क्षेत्रात भारत-जर्मनी भागीदारी याची मुदत वाढवणारा सामंजस्य करार

17.भारताची नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ ॲग्रीकल्चर एक्सेंटेंशन मॅनेजमेंट (MANAGE) आणि जर्मनीची DEULA कृषी अकादमी यांच्यामध्ये कृषी तंत्रज्ञान आणि व्यवसायिक प्रशिक्षणाबाबत सामंजस्य करार

18.सिमेन्स इंडिया लिमिटेड आणि MSDE आणि जर्मन सरकारचे शाश्वत विकासासाठी आर्थिक सहकार्य आणि कौशल्य विकास मंत्रालय यांच्यात हेतू दर्शक संयुक्त घोषणापत्र

19.संग्रहालय क्षेत्रात सहकार्याबाबतचा सामंजस्य करार

20.अखिल भारतीय फुटबॉल संघटना (AIFF) आणि जर्मनीची DFB फुटबॉल संघटना यांच्यात सामंजस्य करार

21.इंडो-जर्मन मायग्रेशन अँड मोबिलिटी पार्टनर्शिप कराराचे मुख्य घटक याच्या संदर्भात हेतू दर्शक घोषणापत्र

👉जर्मनी हा युरोप खंडाच्या मध्यभागी असलेला एका देश आहे. देशाची राजधानी बर्लिन हे शहर आहे आणि युरो हे राष्ट्रीय चलन आहे. येथे प्रामुख्याने जर्मन भाषा बोलली जाते.

भारतात वाढतोय स्तनाचा कर्करोग

◾️भारतात दिवसेंदिवस महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढू लागले आहे.

◾️पूर्वी
📌एक लाख महिलांमागे १५ रुग्ण आढळत असे.
📌आता हेच प्रमाण लाखामागे ३५ झाले आहे.

◾️यामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे. ‘ग्लोबोकॅन’ या संस्थेने केलेल्या अभ्यासातून ही बाब उघड झाली आहे.

◾️जागरूकतेचा अभाव, शेवटच्या टप्प्यात निदान होणे, उपचारासाठीच्या अपुऱ्या सुविधा, तरुण महिलांमध्ये वाढते प्रमाण आदी बाबींमुळे स्तन कर्करोग हे एक मोठे आव्हान आहे.

◾️ ‘‘‘ग्लोबोकॅन’च्या अहवालानुसार सन २०१८ मध्ये भारतात
📌 एक लाख ६२ हजार महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले.

◾️२०१८ मध्ये या रोगाने देशात ८७ हजार महिल्या मृत्युमुखी पडल्या.

◾️ पुण्यात २०१८ मध्ये सुमारे ९००० व्यक्तींना कर्करोगाचे निदान झाले. त्यापैकी १४०० रुग्ण हे स्तनाच्या कर्करोगाचे असल्याचे आढळून आले आहेत.’’

◾️‘मॅमोग्राफी’ चाचणी आवश्‍यक
यावर उपाययोजना करण्यासाठी वेळेत निदान होणे आवश्‍यक आहे.

◾️ कारण, पहिल्या टप्प्यात या रोगाचे निदान झाल्यास मृत्यूचे प्रमाण ३० टक्‍क्‍यांनी कमी होऊ शकते.

◾️यासाठी ४५ ते ५० वर्षे वयोगटातील महिलांनी ‘मॅमोग्राफी’ चाचणी करणे आवश्‍यक आहे.

जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम भारतात, जानेवारीमध्ये होणार उद्घाटन

जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम हे भारतात उभारलं जात आहे.

जानेवारी २०२० पर्यंत अहमदाबादच्या सरदार पटेल स्टेडियमचं बांधकाम पूर्ण होणार आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या मैदानात भारत विरुद्ध जागतिक-११ असा टी-२० सामना खेळवण्याचा बीसीसीआयचा मानस आहे.

मोटेरा नावाने प्रसिद्ध असलेल्या या मैदानात भारताची शेवटची वनडे मॅच २०१४ साली श्रीलंकेविरुद्ध झाली होती. यानंतर या स्टेडियमच्या पुनर्बांधणीला सुरुवात झाली.

सध्या ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सर्वाधिक ९० हजार प्रेक्षक बसू शकतात.

तर कोलकात्याचं ईडन गार्डन ६६,००० प्रेक्षक क्षमतेसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. १८५३ साली मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड बांधण्यात आलं होतं.

जानेवारी २०१८ मध्ये या स्टेडियमचं भूमीपूजन झालं होतं.

गुजरात क्रिकेट असोसिएशननं लार्सन ऍण्ड टर्बो (एल ऍण्ड टी) या कंपनीला हे स्टेडियम बांधण्याचं कंत्राट दिलं. हे स्टेडियम बांधण्यासाठी शापूरजी पालनजी आणि नागार्जून कन्स्ट्रक्शन या दोन कंपन्यांनीही अर्ज केले होते.

जगप्रसिद्ध आर्किटेक्चर फर्म एमएस पॉप्युलसनं या स्टेडियमचं डिझाईन केलं आहे. याच फर्मनं मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडचंही डिझाईन केलं होतं.

हे स्टेडियम उभारण्यासाठी अंदाजे ७०० कोटी रुपयांचा खर्च आला आहे. हे नवं क्रिकेट स्टेडियम ६३ एकर परिसरात पसरलं आहे.

या स्टेडियममध्ये ५० रूम असलेलं क्लब हाऊस, ७६ कॉरपोरेट बॉक्स, ४ ड्रेसिंग रूम, क्रिकेटपटूंसाठी ३ प्रॅक्टिस ग्राऊंड, इनडोर क्रिकेट अॅकेडमी, ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल, ३ हजार चारचाकी आणि १० हजार दुचाकींसाठी पार्किंगची व्यवस्था असेल.

मोटेरा स्टेडियमचा इतिहास

१९८३ साली मोटेरा स्टेडियम बांधण्यात आलं होतं. १९८७ साली सुनिल गावसकर यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये १० हजार रन याच मैदानात पूर्ण केल्या.

त्यावेळी टेस्ट क्रिकेटमध्ये १० हजार रन पूर्ण करणारे गावसकर हे पहिले क्रिकेटपटू बनले. यानंतर ७ वर्षांनी कपिल देव यांनी रिचर्ड हॅडलींचा ४३१ विकेटचा विश्वविक्रम मोडीत काढला.

१९९९ साली सचिन तेंडुलकरनं त्याच्या टेस्ट कारकिर्दीतलं पहिलं द्विशतक याच मैदानात केलं होतं.

१९८२ साली बांधण्यात आलेल्या या मैदानाची प्रेक्षक क्षमता ४९ हजार एवढी होती. १९८३ साली या मैदानात भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये पहिली टेस्ट मॅच खेळवण्यात आली.

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...