Sunday, 3 November 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न


1) पुढील वाक्यातील उद्देश्य विस्तार कोणता?
     ‘बाभळीच्या काटेदार फांद्यांनी ती गाडी शिगोशिग भरली होती.’

   1) ती गाडी    2) शिगोशिग    3) भरली होती    4) बाभळीच्या काटेदार फांद्यांनी

उत्तर :- 4

2) ‘आजी दृष्ट काढते’ वाक्यातील प्रयोग ओळखा.

   1) कर्मणी प्रयोग    2) कर्तरी प्रयोग    3) भावे प्रयोग    4) शक्यकर्मणी प्रयोग

उत्तर :- 2

3) ‘चक्रपाणी’ या सामासिक शब्दाचा विग्रह करून समास ओळखा.

   1) मध्यमपद लोपी समास      2) समाहार व्दंव्द
   3) इतरेतर व्दंव्द        4) कोणताही नाही

उत्तर :- 4

4) विरामचिन्हांचा वापर करताना ‘संयोगचिन्हाचा वापर करण्यात येतो.’

   अ) दोन शब्द जोडताना        ब) संबोधनाकरिता वापर केला जातो
   क) दुस-याचे मत अप्रत्यक्षपणे सांगण्यासाठी    ड) ओळीच्या शेवटी शब्द अपूरा राहिल्यास

   1) ब बरोबर    2) ब, ड बरोबर    3) क      4) अ, ड बरोबर

उत्तर :- 4

5) सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी ! (अलंकार ओळखा.)

   1) श्लेष अलंकार    2) यमक अलंकार    3) अतिशयोक्ती अलंकार  4) उपमा अलंकार

उत्तर :- 4 

6) सिध्द शब्द ओळखा.
   1) येऊन    2) ये      3) येवो      4) येणार

उत्तर :- 2

7) ‘चला पानावर बसा’ या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.

   1) व्यागार्थ    2) लक्षार्थ    3) वाच्यार्थ    4) संकेतार्थ

उत्तर :- 2

8) ‘पाणी’ या शब्दाच्या समानार्थी शब्द शोधा :

   1) जल      2) जलद      3) ढग      4) क्षार

उत्तर :- 2

9) ‘अवरोहण’ या शब्दाला विरुध्दार्थी शब्द निवडा.

   1) उन्नत    2) अवनत    3) आरोहण    4) प्रारंभ

उत्तर :- 3

10) ‘फायदा असेपर्यंत सारे गोळा होतात.’ – हा अर्थ स्पष्ट करणारी योग्य म्हण निवडा.

   1) हात ओला तर मित्र भला    2) मूल होईना सवत साहीना
   3) मनास मानेल तोच सौदा    4) फुले वेचली तेथे गोव-या वेचू नये

उत्तर :- 1

महत्वपूर्ण चालू घडामोडी सराव प्रश्नावली

1) धर्म गार्डीयन – 2018 हा संयुक्त लष्करी युध्द सराव खालीलपैकी कोणत्या दोन देशांदरम्यान पार पडला.
   अ) भारत    ब) रशिया    क) जपान    ड) चीन
  1) अ, ब    2) अ, क    3) अ, ड    4) ब, ड
उत्तर :- 2

2) जागतिक स्पर्धात्मकता अहवाल 2018 नुसार खालील प्रथम पाच देशांचा अचूक क्रम निवडा.
   अ) अमेरिका, सिंगापूर, जर्मनी, स्वित्झर्लड, जपान
   ब) अमेरिका, सिंगापूर, जर्मनी, जपान, स्वित्झर्लंड
   क) अमेरिका, सिंगापूर, जपान, जर्मनी, स्वित्झर्लंड
   ड) अमेरिका, सिंगापूर, जपान, स्वित्झर्लंड, जर्मनी
  1) अ      2) ब      3) क      4) ड
उत्तर :- 1

3) खालील माहितीचा विचार करा.
   अ) ज्येष्ठ संगीतकार गीतकार यशवंत देव यांचे 30 ऑक्टोबर 2018 रोजी वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले.
   ब) त्यांचा ओंजळ हा कविता संग्रह प्रसिध्द आहे.
   क) 2012 ला त्यांना गादीमा पुरस्कार मिळाला आहे.
   ड) त्यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
  1) अ, ब, क योग्य    2) अ, क, ड योग्य   
   3) अ, ब, क, ड योग्य    4) ब, क, ड योग्य
उत्तर :- 3

4) खालील माहितीचा विचार करा.
   अ) भारतीय वंशाचे अमेरिकी भौतिकशास्त्रज्ञ प्रा. अभय अष्टेकर यांना आइनस्टाइन पुरस्कार जाहीर झाला.
   ब) गुरुत्वाकर्षण शास्त्राच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तीस दरवर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
   क) 2003 सालापासून हा पुरस्कार दिला जातो.
  1) अ, क सत्य    2) अ सत्य    3) अ, ब सत्य    4) अ, ब, क सत्य
उत्तर :- 4

5) इंदिरा गांधी शांतता पुरस्काराची सुरुवात केव्हापासून  झाली.
   1) 1985    2) 1986    3) 1988    4) 1992
उत्तर :- 2

चालू घडामोडी वन लाइनर्स, 03 नोव्हेंबर 2019.


✳ 02 नोव्हेंबर: पत्रकारांवरील गुन्ह्यांवरील दंड संपविण्याचा आंतरराष्ट्रीय दिन

✳ 05 नोव्हेंबर: जागतिक सुनामी जागृती दिन

✳ एचएम हर्षवर्धन यांनी मिशन इंद्रधनुष 2.0 पोर्टल सुरू केले

✳ कॉर्पोरेट एक्सलन्स 2019 साठी पेप्सी इंडियाने 20 वा यूएस पुरस्कार जिंकला

✳ पवन कपूर यांची युएईमध्ये भारताचे राजदूत म्हणून नेमणूक

✳ टी लठाचे एमडी व धनलक्ष्मी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीनामा

✳ आयआयटी दिल्ली इस्रोच्या सहयोगाने अवकाश तंत्रज्ञान कक्ष स्थापन करणार आहे

✳ भारतीय महिला संघाने इमर्जिंग एशिया चषक 2019 विजेता जिंकला

✳ ओडिशा सरकारने गरीबी कमी करण्यासाठी अभिजीत बॅनर्जी यांच्या जमील गरीबी कृती प्रयोगशाळेसह भागीदारी केली

✳ रजनीकांत यांना 'आयकॉन ऑफ गोल्डन जयंती IFFI 2019' पुरस्काराने गौरविले जाईल

✳ गोव्यात 50 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (आयएफएफआय)

✳ पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 दिवसाच्या थायलंड दौर्‍यावर रवाना झाले

✳ 16 व्या आसियान-भारत समिट थायलँडच्या बँकॉकमध्ये होणार आहे

✳ 14 वेस्ट एशिया आशिया समिट बँकॉक, थायलंड येथे होणार आहे

✳ 35 व्या एशियन समिटची सुरुवात थायलँडच्या बँकॉकमध्ये झाली

✳ 35 व्या एशियन थीम: "टिकाव धैर्याने वाढवण्यासाठी भागीदारी"

✳ एम के गुप्ता आणि एलआयसीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून राज कुमार यांनी पदभार स्वीकारला

✳ कर्टनी वॉल्श यांना वेस्ट इंडीज महिलांसाठी अंतरिम प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले

✳ बिपुल पाठक यांना लेफ्टनंट गव्हर्नर जे अँड के चे प्रधान सचिव म्हणून नियुक्त केले

✳ 9 वा रग्बी विश्वचषक टोकियो, जपानमध्ये पार पडला

✳ दक्षिण आफ्रिकेने 9 वे रग्बी विश्वचषक जिंकण्यासाठी इंग्लंडला 32-12 ने हरविले

✳ दक्षिण आफ्रिका तिसयांदा रग्बी वर्ल्ड चॅम्पियन आहे

✳ बर्मिंघम विद्यापीठात गुरु नानक चेअरचे उद्घाटन

✳ भारत आणि जर्मनीने 17 सामंजस्य करार केले, पाच संयुक्त घोषणांचे एक्सचेंज केले

✳ सुमंत काठपालिया इंडसइंड बँकेचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवडले

✳ लेफ्टनंट जनरल अनूप बॅनर्जी यांनी एएफएमएसचे डायरेक्टर जनरल म्हणून पदभार स्वीकारला

✳ आर्मी एव्हिएशन कोर्प्सने 1 नोव्हेंबर 2019 रोजी 34 वा वाढदिवस दिवस साजरा केला

✳ 2020-21 पर्यंत सीआयएल 750 दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन करण्याचे लक्ष्य ठेवते

✳ आयआयटी हैदराबादने जगातील प्रथम क्रमांकाचा भारतीय ब्रेन अटलस विकसित केला

✳ भारताचे विदेशी चलन साठा 442.583 अब्ज डॉलर्सच्या नवीन लाइफटाइम उच्चांकावर पोहोचला

✳ भारत - अमेरिकेची आर्थिक आणि आर्थिक भागीदारी बैठक नवी दिल्ली येथे आयोजित

✳ पंजाब मंत्रिमंडळाने संस्थेचे श्री गुरु नानक देव जी पुरस्कारास ठराव पास केला

✳ जेएमएमने पेमेंट संबंधित सेवांसाठी इंडियन बँक आणि कॅनरा बँकेबरोबर सामंजस्य करार केला

✳ युनेस्कोने मुंबईला युनेस्को क्रिएटिव्ह सिटीझ नेटवर्कचे सदस्य म्हणून नियुक्त केले आहे

✳ युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क आता एकूण 246 शहरांची गणना करते

✳ बुडापेस्ट, हंगेरी येथे अंडर -23 जागतिक स्पर्धा 2019 आयोजित

✳ अंडर -23 वर्ल्ड चॅम्पियनशिप 2019 मध्ये पूजा गहलोतने रौप्यपदक जिंकले

✳ थंनेरी, तामिळनाडू येथे प्रथम मायक्रो कंपोस्टिंग सेंटरचे उद्घाटन झाले

✳ चित्रपट निर्माते चंपक जैन यांचे नुकतेच निधन झाले

✳ 8 नोव्हेंबर रोजी कोलकाता 25 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू होईल

✳ 25 वे कोलकाता चित्रपट महोत्सवात जर्मनी हा फोकस कंट्री आहे

✳ उपराष्ट्रपतींनी गुवाहाटीमध्ये 21 वा उत्तर पूर्व पुस्तक मेळाव्याचे उद्घाटन केले

✳ माद्रिद यूएन हवामान बदल परिषद (सीओपी 25) आयोजित करेल.

उत्तर कोकण, उत्तर-मध्य , महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

🏈🔴अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळं ६ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत  आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह  हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळं पावसामुळं पिकांचे नुकसान झाल्यानं हवालदिल झालेल्या शेतकऱ्याच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. दरम्यान, पुण्यासह औरंगाबाद आणि अन्य भागांत आज संध्याकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली.

🏈🔴राज्यात गेल्या दहा ते पंधरा दिवसां पासून सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतक ऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पावसा ळ्याच्या सुरुवातीला दुष्काळाचं सावट निर्माण झालेल्या मराठवाडा, विदर्भात आता परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मराठवाड्यात सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, उडीद, बाजरी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर विदर्भातील खरीप पिकांबरोबरच रब्बी पिकांचंही मोठे नुकसान झाले आहे. सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे सोयाबीनसह तूर, हरभरा, ज्वारी, कापूस या रब्बीच्या पिकांचे नुकसान झाले आहे. डाळींब, पपई, या फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळं शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. पिकांच्या नुकसानीमुळं उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत आता आणखी भर पडली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या महा चक्रीवादळामुळं बुधवारपासून (६ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबरपर्यंत) उत्तर कोकणसह उत्तर मध्य महाराष्ट्रातील विविध भागांत मेघगर्जनेसह अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

📌📌मच्छिमारांनो, परत फिरा रे....

🏈🔴अरबी समुद्रात  आलं आहे. समुद्रामध्ये वाऱ्याचा वेग अधिक असणार आहे. त्यामुळं मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रात गेलेल्या मच्छिमारांना पुन्हा किनाऱ्यावर येण्याच्या सूचनाही सरकारनं दिल्या आहेत. तसंच योग्य त्या उपाययोजनांसह सज्ज राहण्याच्या सूचना संबंधित विभागातील सर्व यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. मदतीसाठी मंत्रालयातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

📌📌पुणे, औरंगाबादेत जोरदार पाऊस

🏈🔴पुणे आणि औरंगाबादमध्ये आज संध्याकाळी जोरदार पाऊस पडला. पुण्यातील कात्रज, बिबवेवाडी, वानवडी, धनकवडी, सहकार नगर भागात मुसळधार पाऊस कोसळला. सासवड आणि पुरंदर भागातही पाऊस सुरू आहे. तर औरंगाबादमधील काही भागांतही पावसानं हजेरी लावली.

सराव प्रश्नसंच - भूगोल 9/11/2019


● माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?

अ. सातारा
ब. नाशिक
क. रायगड
ड. पुणे

उत्तर - क. रायगड

● मुळशी धरण कोणत्या नदीवर आहे

अ. मुळा
ब. तापी
क. गोदावरी
ड. कृष्णा

उत्तर - अ. मुळा

● महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते?

अ. पुणे विद्यापीठ
ब. मुंबई विद्यापीठ
क. शिवाजी विद्यापीठ
ड. नागपूर विद्यापीठ

उत्तर - ब. मुंबई विद्यापीठ

● महाराष्ट्राचे क्षेत्रफळ एकूण किती चौ. किमी आहे?

अ. 307713
ब. 407434
क. 503932
ड. 603832

उत्तर - अ. 307713

● महाराष्ट्राचा लोकसंख्या बाबतीत भारतात कितवा क्रमांक लागतो?

अ. पहिला
ब. दुसरा
क. तिसरा
ड. चौथा

उत्तर - ब. दुसरा

● चिकूचे उत्पादन सर्वाधिक कोठे होते?

अ. रायगड
ब. ठाणे
क. पालघर
ड. नाशिक

उत्तर - क. पालघर

● महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक जास्त लोकसंख्या आहे?

अ. रायगड
ब. पुणे
क. नागपूर
ड. ठाणे

उत्तर - ड. ठाणे

● कोणत्या जिल्ह्यात तुषार सिंचनाचे प्रमाण सर्वाधिक आहे?

अ. पुणे
ब. नाशिक
क. नागपूर
ड. कोल्हापूर

उत्तर - ब. नाशिक

● महाराष्ट्रात सर्वात जास्त विहीरी कोणत्या जिल्ह्यात आहेत?

अ. अहमदनगर
ब. पुणे
क. सोलापूर
ड. रायगड

उत्तर - अ. अहमदनगर

● सेवाग्राम आश्रम कोणत्या ठिकाणी आहे?

अ. पुणे
ब. सांगली
क. वर्धा
ड. अहमदनगर

उत्तर - क. वर्धा

राज्यांत नाही एकही मानसिक हॉस्पिटल

देशभरात मानसिक रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असूनही देशातील 13 राज्यात एकही मानसिक  हॉस्पिटल नाही. यामध्ये सहा राज्य व सात केंद्रशासीत प्रदेशांचा समावेश असल्याचे WHO च्या अहवालातून आले समोर. देशात साधारण 15 कोटी लोकांना मानसिक आजार असून त्यांना उपचाराची गरज आहे.

▪ *राज्य* : हरियाणा, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, सिक्किम, मिझोराम व छत्तीसगड या राज्यात हॉस्पिटल नाही.
▪ *केंद्रशासित प्रदेश* : चंदीगड, दादर व नगर हवेली, पाँडेचरी, दमन दीव, लक्षद्वीप, अंदमान निकोबार आणि लडाख.

WHO रिपोर्ट:

●  24 राज्यात व केंद्र शासित प्रदेशात मेंटल हॉस्पिटल, लोकसंख्येच्या तुलनेत हे अत्यल्प आहेत.
●  बिहार, ओडिशा, पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश व दिल्ली या राज्यात फक्त एक-एक हॉस्पिटल आहे.
●  पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त मेंटल हॉस्पिटल आहेत.

राज्यांतील हॉस्पिटल संख्या:

*1.* महाराष्ट्र - 4
*2.* गुजरात - 4
*3.* उत्तर प्रदेश - 3
*4.* केरळ - 3
*5.* मध्य प्रदेश - 2
*6.* झारखंड - 2
*7.* कर्नाटक - 2
*8.* राजस्थान - 2

देशभरात हॉस्पिटलसह डॉक्टरांची संख्याही खूप कमी आहे. एक लाख रुग्णसंख्येमागे तीन डॉक्टर आहेत. आरोग्याच्या बजेटपैकी फक्त 0.06 टक्के रक्कम खर्च केली जाते. त्यामुळे 80 टक्के रुग्णांना देशात उपचार मिळत नाही.

बेरोजगारी दर 8.5 टक्क्यांवर

भारतातील बेरोजगारीचा दर गेल्या तीन वर्षांतील उच्चांकावर 8.5 टक्क्यांपर्यंत (ऑक्टोबर) वाढला आहे.  सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) या संस्थेने नुकतीच बेरोजगारीची आकडेवारी जाहीर केली आहे.

देशातील उद्योगांना मंदीने ग्रासल्यामुळे ऑगस्टनंतर प्रथमच देशातील बेरोजगारीचे प्रमाण आठ टक्क्यांवर गेले आहे. सप्टेंबरमध्ये बेरोजगारीचा दर 7.2 टक्के होता. वाढत्या बेरोजगारीमुळे सरकारपुढे नवे संकट उभे राहिले आहे.

चालू घडामोडी प्रश्न 3/11/2019

• कोणत्या सरकारी योजनेच्या अंतर्गत पाच किलोग्राम वजनी एलपीजी गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिले जाणार आहे? :- प्रधानमंत्री उज्वला योजना

• भारत सरकार कोणत्या शहरात आंतराष्ट्रीय लवाद केंद्राची स्थापना केली जाणार आहे:- नवी दिल्ली

• भारतातल्या जलमार्गांद्वारे प्रथमच वाहतूक केली जात असून -----------या देशांकडे माल पाठवला जात आहे - भुतान आणि बांग्लादेश.

• 12 जुलै रोजी भारताने बंदी घातली बंडखोर संस्था - शिख फॉर जस्टिस.

•  -------या वैमानिकांनी उत्तर व दक्षिण ध्रुवांना प्रदक्षिणा घालत केवळ 46 तास, 39 मिनिट आणि 38 सेकंदात 24,966 मैल प्रवास करून जगभरात सर्वात वेगवान प्रवास करण्याचा विश्वविक्रम रचला - हामिश हार्डिंग (लंडन) आणि कर्नल टेरी विरट्स (नासाचा अंतराळवीर).

•  2020 साली दिल्या जाणाऱ्या ‍आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिकाच्या निर्णय समितीमध्ये निवड झालेले भारतीय लेखक------ हे आहेत - जीत थाईल.

• ऑस्ट्रेलियाच्या-------- या गोलंदाजाने 27 वा बळी घेत एकाच विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक बळी घेण्याच्या 12 वर्षांपूर्वीचा ग्लेन मॅक्ग्राथचा विक्रम मोडला - मिशेल स्टार्क.

• 2020 सालापर्यंत जगातला सर्वात तरुण देश कोणता – भारत

• रेल्वे महामंडळ परिसरात अनधिकृतरित्या सिलबंद जलपेय विक्रीवर निर्बंध आणण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने चालविलेले अखिल भारतीय कारवाई अभियान - ‘ऑपरेशन थर्स्ट

• 10 जुलैला घेतलेल्या निर्णयानुसार केंद्रीय मंत्रिमंडळाने या दलाला संघटीत गट ‘ए’ चा दर्जा देण्यास मंजुरी दिली - भारतीय रेल्वे सुरक्षा दल (RPF).

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) थरथर, चुरचुर, खळखळ, सळसळ, ओरड, पीक – हे शब्द कोणते धातू आहेत ?
   1) कृतिवाचक धातू    2) अकर्मक धातू    3) उभयविध क्रियापदे    4) सकर्मक क्रियापदे

उत्तर :- 2

2) खालील वाक्य हे कोणत्या ‘स्थानिक क्रियाविशेषणाचे’ उदाहरण आहे.

     ‘ती काय माती गाते !’

   1) विशेषण      2) नाम      3) कृदंत        4) उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 2

3) दिलेल्या शब्दातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.

    ‘आज्ञेबरहुकूम’

   1) हेतुवाचक      2) योग्यतावाचक    3) संबंधवाचक      4) भागवाचक

उत्तर :- 2

4) मधूला गोरी नि शिकलेली वधू पाहिजे या वाक्यातील ‘नि’ हे अव्यय कोणते ?

   1) विकल्प बोधक    2) समुच्चय बोधक    3) परिणाम बोधक      4) न्युनत्व बोधक

उत्तर :- 2

5) काल म्हणे मुलांनी गडबड केली. या वाक्यातील अव्ययाचा प्रकार सांगा.

   1) संबोधनदर्शक      2) व्यर्थ उद्गारवाची    3) संमती दर्शक      4) यापैकी नाही

उत्तर :- 2

6) जेव्हा वर्तमान काळाबरोबर क्रिया करण्याचा हेतू समजतो तेव्हा  तो .............. वर्तमानकाळ होतो.

   1) पूर्ण वर्तमानकाळ    2) रीती वर्तमानकाळ
   3) अपूर्ण वर्तमानकाळ    4) उद्देश वर्तमानकाळ

उत्तर :- 4

7) पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.

   अ) अकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप आ – कारांत होते.
   ब) अकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप एकवचनात ए – कारांत होते.

   1) केवळ अ बरोबर    2) केवळ ब बरोबर    3) अ आणि ब बरोबर    4) अ आणि ब चूक

उत्तर :- 3

8) खालीलपैकी अनेक वचनी नामे ओळखा.

   अ) रोमांच      ब) हाल      क) शहारे        ड) डोहाळे
   1) फक्त क आणि ड    2) फक्त अ, क आणि ड  3) वरील सर्व      4) फक्त अ आणि ब

उत्तर :- 3

9) कर्मणी प्रयोगात कर्म हे ..................... विभक्तीत असते.

   1) प्रथमा      2) व्दितीया    3) तृतीया      4) चतुर्थी

उत्तर :- 1

10) ‘माणूस जातो. त्याची कीर्ति मागे उरते.’ या वाक्याचे संयुक्त वाक्य कसे होईल ?

   1) माणूस गेला तरी त्याची कीर्ति मागे उरते      2) माणूस जातो. कीर्ति उरते
   3) कीर्ति उरली, माणूस उरला        4) यापैकी काहीही नाही

उत्तर :- 1

इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्र


१) तत्त्वबोधिनी पत्रिका - रविंद्रनाथ टागोर
२) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी
३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी
४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल
५) न्यू इंडिया - अ‍ॅनी बेझंट
६) यंग इंडिया - महात्मा गांधी
७) इंडियन मिरर - डी. डी. सेन
८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो
९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी
१०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू
११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू
१२) अल-हिलाल - मौलाना आझाद
१३) अल-बलाघ - मौलाना आझाद
१४) कॉमन विल - अ‍ॅनी बेझंट
१५) भारतमाता - अजित सिंग
१६) हिंदू - सी.सुब्रण्यम अय्यर
१७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद
१८) सोमप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर
१९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय
२०)  गंभीर इशारा - वि. दा. सावरकर
२१) संवाद कौमुदी - राजा राममोहन राय
२२) बॉम्बे क्रॉनिकल - फिरोजशहा मेहता
२३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय
२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा
२६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल
२७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा
२८) कॉमरेड - मोहम्मद अली जव्हार
२९) हमदर्द - मोहम्मद अली जव्हार
३०) गदर - लाला हरदयाल
३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय
३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय
३३) उदबोधन - स्वामी विवेकानंद
३४) प्रबुद्ध भारत - डॉ. आंबेडकर
३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल
३६) किर्ती - संतोषसिह
३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त
३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन
३९) बांग्लाकथा - सुभाषचंद्र बोस
४०) इंडिया - सुब्रण्यम भारती
४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी
४२) इंडियन फिल्ड - किशोरीचंद मित्र
४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली
४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास
४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल
४६) जन्मभूमी  - पट्टाभि सितारामय्या
४७) मुंबई समाचार - फरदुनजी
४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय
४९) लीडर - पं. मदनमोहन मालवीय
५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान
५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज)
५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)
५३) वंदे मातरम् - अरविद घोष (कोलकता)
५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब)
५५) वदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस)
५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी (गुजराती)
५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष
५८) संध्या - ब्रह्मबांधव उपाध्याय
५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष
६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू
६१) क्रांती - मिरजेकर, जोगळेकर व घाटे
६२) प्रताप (दैनिक) - गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर)
६३) मुकनायक - डाॅ. आंबेडकर
६४) बहिष्कृत भारत - डाॅ. आंबेडकर
६५) जनता - डाॅ. आंबेडकर
६६) केसरी - लोकमान्य टिळक
६७) मराठा - लोकमान्य टिळक
६८) हास्य संजीवनी - विरेशलिंगम पंतलु
६९)शालापत्रक - विष्णूशास्त्री चिपळूणकर
७०) प्रभाकर - भाऊ महाजन
७१) धुमकेतू - भाऊ महाजन
७२) ज्ञान दर्शन - भाऊ महाजन
७३) दिनबंधू - कृष्णराव भालेकर
७४) दिग्दर्शन - बाळशास्त्री जांभेकर
७५) प्रगती - त्र्यंबक शंकर शेजवलकर
७६) हरिजन - महात्मा गांधी
७७) संजीवनी - कृष्णकुमार मित्र

​​देशातली ‘पशुधन गणना 2019’

देशातल्या पशू संख्येची आकडेवारी स्पष्ट करणारी 20वी ‘पशुधन गणना’ याचा अहवाल केंद्र सरकारने प्रसिद्ध केला आहे.

अहवालात असे दिसून आले आहे की, देशात दुभत्या जनावरांची संख्या वाढत असून देशी आणि क्रॉस-ब्रीड मादा गुराढोरांची संख्या वाढत आहे.

🏆 ताज्या आकडेवारीनुसार -

• सन 2019 मध्ये एकूणच पशुधनाची संख्या 535.78 दशलक्ष एवढी होती.

• मुख्यत: मेंढ्या व बकरींच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे आढळून आले आहे.

• गेल्या वर्षांत घट झाल्यानंतर एकूण जनावरांची संख्या किरकोळ वाढलेली आहे.

• देशी जनावरांच्या संख्या सन 2012 पासून स्थिर आहे.

• सन 2019 मध्ये गुराढोरांची संख्या 192.49 दशलक्ष होती (2012च्या गणनेच्या तुलनेत 0.8 टक्क्यांची वाढ). ही वाढ मुख्यत: क्रॉस-ब्रीड गुरांच्या वाढीमुळे झाली आहे ज्यामुळे दुधाचे प्रमाण जास्त आहे.

• मादा क्रॉस-ब्रीड गुराढोरांची संख्या 46.95 दशलक्षांवर गेली. देशी मादा गुराढोरांची संख्या 98.17 दशलक्ष झाली आहे. म्हशींची संख्या 109.85 दशलक्ष एवढी झाली.

• दुभत्या जनावरांच्या संख्येत 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

• सन 2018-19 मध्ये भारतात एकूण 188 दशलक्ष टन दूध उत्पादन झाले. त्यात क्रॉस-ब्रीड प्राण्यांचे जवळपास 28 टक्के योगदान होते, असा अंदाज आहे.

• घरामागच्या अंगणात होणार्‍या कुक्कुटपालनात वाढ दिसून आली आहे. सन 2019 मध्ये कोंबड्यांची संख्या 851.18 दशलक्ष इतकी होती (2012च्या तुलनेत 17 टक्क्यांनी वाढ).

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...