Wednesday, 23 October 2019

भूगोल प्रश्नसंच 23/10/2019

1) खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मान्सून प्रकारचा पाऊस पडत नाही ?
   1) पश्चिम पाकिस्तान    2) फीलीपाईन्स    3) दक्षिण व्हिएतनाम    4) मध्य केनिया
उत्तर :- 4

2) भारताव्यतिरिक्त पुढील प्रदेशामध्ये मोसमी वारे वाहतात :
   अ) आफ्रिकेतील गियानाचा किनारा, उत्तर ऑस्ट्रेलियाचा किनारा
   ब) ब्रह्मदेश, थायलंड, लाओस, कंबोडीया व व्हिएतनाम
   क) चीन, दक्षिण जपान      ड) संयुक्त संस्थानाचा मेक्सिकोच्या आखातालगतचा भाग
   1) अ, ब, क बरोबर    2) ब, क, ड बरोबर    3) अ, क, ड बरोबर    4) सर्व बरोबर
उत्तर :- 4

3) तापमानाचे उभे वितरण हे ............................ या घटकावर अवलंबून आहे.
   1) अक्षवृत्ते      2) उंची      3) समुद्र सानिध्य      4) सागरी प्रवाह
उत्तर :- 2

4) जोडया लावा.
   अ) विषुववृत्तीय कमी भाराचा पट्टा    i) या भागातील हवा पृष्ठभागाचे घर्षण व पृथ्वीच्या परिवलनामुळे वर ढकलली जाते.
   ब) मध्य कटिबंधीय जास्त थराचा पट्टा  ii) वर्षभर तापमान 0ºC पेक्षा कमी असते.
   क) उप-ध्रुवीय कमी भाराचा पट्टा    iii) या भागामध्ये वर्षभर सूर्याची किरणे प्रामुख्याने लंबरूप पडतात.
   ड) ध्रुवीय जास्त भाराचा पट्टा    iv) थंड हवा 25º आणि 35º अक्षवृत्तांच्या दरम्यान खाली उतरते.
  अ  ब  क  ड
         1)  i  ii  iv  iii
         2)  iv  ii  iv  iii
         3)  iii  iv  i  ii
         4)  ii  iii  iv  i
उत्तर :- 3

5) खालील विधाने पहा.
   अ) जेट वायुच्या प्रभावामुळे हिवाळयात काश्मिर व हिमाचल प्रदेशात पाऊस आणि हिमालयात बर्फ पडतो.
   ब) हिवाळयात तामिळनाडूमध्ये ईशान्स मान्सून वा-यामुळे पाऊस पडतो.
   क) बंगालमध्ये उन्हाळयात उष्ण हवेचे प्रवाह वाहतात त्यांना कालबैसाखी म्हणतात.
   1) फक्त विधान अ बरोबर आहे.    2) फक्त विधान ब बरोबर आहे.
   3) फक्त विधान क बरोबर आहे.    4) वरील सर्व विधाने बरोबर आहेत.
उत्तर :- 4

1) योग्य जोडया लावा :
  वायू      वातावरणातील शुष्क प्रमाण भाग प्रती दशलक्ष
         अ) नायट्रोजन (N2)    i) 0.007ppm
         ब) हेलियम (He)    ii)0.5ppm
        क) ओझोन (O3)    iii) 780,840.0ppm
         ड) हायड्रोजन (H2)    iv) 5.2ppm
    अ  ब  क  ड
           1)  ii  i  iii  iv
           2)  iv  iii  ii  i
           3)  i  ii  iv  iii
           4)  iii  iv  i  ii
उत्तर :- 4

2) खालील विधानांचा विचार करा.
   अ) एल. निनो प्रवाहाच्या वेळी दक्षिण प्रशांत महासागरातील पृष्ठाभागावरील तापमानात वाढ होते.
   ब) वर्ष 2013-14 मध्ये भारतामध्ये भीषण दुष्काळ होता आणि त्यावेळी एल निनो प्रवाह प्रबळ होता.
         वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त ?
   1) फक्त अ    2) फक्त ब    3) अ आणि ब दोन्हीही    4) अ आणि ब दोन्हीही नाहीत
उत्तर :- 3

3) स्क्वेल / चंडवात (पाऊस व हिम वर्षाबरोबर येणारी वावटळ) ही महाराष्ट्रामध्ये दुर्मिळ आहे, परंतु कधी – कधी ...............
     प्रसंगी येते.
   1) किनारपट्टीवर मान्सून पूर्व काळात आणि मान्सून काळादरम्यान अंतर्गत प्रदेशात.
   2) मान्सून काळात किनारपट्टीवर आणि मान्सून पूर्व काळात अंतर्गत प्रदेशात.
   3) मान्सून नंतरच्या काळात किनारपट्टीवर आणि मान्सून काळादरम्यान अंतर्गत प्रदेशात.
   4) मान्सून नंतरच्या काळात किनारपट्टीवर आणि अंतर्गत प्रदेशात.
उत्तर :- 2

4) नॅशनल सेंटर फॉर मोडियम रेंज वेदर फोरकास्टींग (NCMRWF) याची स्थापना .................. साली नवी दिल्लीत झाली.
   1) 1985    2) 1988      3) 1992      4) 1994 
उत्तर :- 2

5) पाणलोट क्षेत्र आधारित जमीन व पाणी संवर्धन योजना मुख्यत: कशावर आधारित असते ?
   1) पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन तंत्रज्ञान
   2) जमीन आणि माती संवर्धन
   3) पिकांचे नियोजन
   4) जमिनीच्या वापराच्या क्षमतेनुसार वर्गवारी करणे
उत्तर :- 1