Monday, 21 October 2019

चालू घडामोडी प्रश्नसंच

📌‘IMNEX-2019’ नावाचा भारत आणि म्यानमार यांच्यादरम्यानचा संयुक्त सागरी सराव _ येथे आयोजित करण्यात आला.

(A) कोची
(B) विशाखापट्टणम✅✅✅
(C) मुंबई
(D) कन्याकुमारी

📌कोणत्या ठिकाणी सातव्या “लष्करी जागतिक खेळ”चे आयोजन केले गेले?

(A) बिजींग
(B) वुहान(चीन)✅✅✅
(C) मुंगियॉंग
(D) सोची

📌___ या दिवशी जागतिक सांख्यिकी दिन साजरा केला जातो.

(A) 20 सप्टेंबर
(B) 20 ऑक्टोबर✅✅✅
(C) 21 ऑक्टोबर
(D) 19 ऑक्टोबर

📌____ या देशात चौथी ‘भारत-ASEAN व्यवसाय शिखर परिषद’ भरविण्यात आली.

(A) मलेशिया
(B) चीन
(C) फिलीपिन्स✅✅✅
(D) इंडोनेशिया

📌‘एकुव्हेरिन 2019’ हा भारत आणि _ या देशांदरम्यानचा संयुक्त सराव आहे.

(A) मलेशिया
(B) मालदीव✅✅✅
(C) सिंगापूर
(D) ओमान

📌कोणती कंपनी 9 लक्ष कोटी रुपये बाजार भांडवलाचा आकडा पार करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली?

(A) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस
(B) रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड✅✅✅
(C) इन्फोसिस
(D) बजाज फायनान्स

📌अंतराळात क्रिस्टिना कोच आणि जेसिका मीर या दोन महिला अंतराळवीरांनी संपूर्णपणे स्त्रियांचा स्पेसवॉक करून इतिहास रचला. हा स्पेसवॉक _ या संस्थेनी आयोजित केला होता.

(A) NASA✅✅✅
(B) ESA
(C) JAXA
(D) ISA

📌भारताचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे उत्तराधिकारी म्हणून कोणाची शिफारस केली गेली आहे?

(A) न्या. चोकलिंगम नागप्पन
(B) न्या. चेलमेश्वर
(C) न्या. शरद बोबडे✅✅✅
(D) न्या. अर्जन कुमार सिक्री

📌11वी ‘अणुऊर्जा परिषद’  या देशात आयोजित केली गेली.

(A) दक्षिण कोरिया
(B) भारत✅✅✅
(C) फ्रान्स
(D) इंग्लंड

📌ईशान्येकडील कोणत्या राज्यात तिसर्‍या ‘शिरूई लिली महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले?

(A) मिझोरम
(B) मणीपूर✅✅✅
(C) नागालँड
(D) मेघालय

📌‘ईस्टर्न ब्रिज-5’ हा भारत आणि __ या देशादरम्यानचा संयुक्त हवाई सराव आहे.

(A) ओमान✅✅✅
(B) संयुक्त अरब अमिराती
(C) इस्त्राएल
(D) जापान

तुम्हाला हे ठाऊक आहे का ?? साहीत्यिक व टोपण नावे

🌷विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज

🌷 राम गणेश गडकरी - गोंविदाग्रज ( कवी म्हणून हे नाव )

🌷 कृष्णाजी केशव दामले- केशवसुत ( कवितेचे जनक  )

🌷 राम गणेश गडकरी - बाळकराम ( विनोद लेखनासाठी )

🌷 गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी

🌷 शंकर काशिनाथ गर्गे - दिवाकर ( नाट्यछटाकार )

🌷 माधव त्र्यंबक पटवर्धन- माधव ज्यूलियन

🌷 काशिनाख हरी मोडक - माधवानुढ

🌷 चिंतामणी त्र्यंबक खानोलकर - आरतीप्रभू

🌷 आत्माराम रावजी देशपांडे- अनिल

🌷 त्र्यंबक बापूजी ठोबंरे - बालकवी - निसर्गकवी

🌷 दत्तात्रय कोंडे घाटे- दत्त

🌷 गिरीश कानेटकर - गिरीश

🌷 सेतुमाधवराव पगडी  - कृष्णकुमार

🌷 प्रल्हाद केशव आत्रे- केशवकुमार

🌷 वसंत मंगळवेढेकर - राजा मंगळवेढेकर

🌷 जयंत दळवी - ठणठणपाळ

🌷 माणिक शंकर गोडघाटे- कवी ग्रेस

🌷दिनकर दत्तात्रेय भोसले - चारूता सागर

🌷 नारायण मुरलीधर गुप्ते - कवी " बी "

प्रश्नावली - गणित 21/10/2019

(1) 970 रुपयांत 50 रुपयांच्या जास्तीत जास्त किती नोटा येतील? (२०१७)
(1) 17
(2) 18
(3) 19
(4) 20

स्पष्टीकरण- 970 : 50 = भागाकार 19 बाकी 2
ंम्हणून 50 रुपयांच्या जास्तीत जास्त 19 नोटा येतील.
पर्याय 3 बरोबर आहे.
—————————————————
(2) धनेशजवळ 50, 20, 10 व 5 रुपयांच्या समान नोटा आहेत. एकूण रक्कम 1020 रु. असल्यास धनेशजवळ 50 रु. च्या किती नोटा आहेत?
(1) 50
(2) 12
(3) 68
(4) 34

स्पष्टीकरण- 50+20+10+5=85 ने 1020 रु. ला भागू
1020 : 85=12 : 50 रु. च्या 12 नोटा आहेत.
पर्याय क्र. 12 बरोबर
————————————————————-
(3) सुुशांतने रु. 35, 5 पैसे ही रक्कम 35.5 रु. अशी लिहिली, तर त्या दोन रकमांमध्ये किती फरक पडेल? (2017)
(1) 45 पैसे
(2) 55 पैसे
(3) 50 पैसे
(4) काहीही फरक पडणार नाही.

स्पष्टीकरण- 35 रु. 5 पैसे आहे, पण लिहिली 35.5 रु. म्हणजे 35 रु. 50 पैसे म्हणून फरक 35 रु. 50 पै.- 35 रु. 5 पैसे.
पर्याय क्र. 1 बरोबर
——————————————————
(4) धनेशने 50 व 100 रुपयांच्या प्रत्येकी 8 नोटा बॅँकेत देऊन त्या रकमेच्या 10 च्या नोटा मागितल्या, तर त्याला 10 रुपयांच्या किती नोटा मिळतील? (2018)
(1) 80
(2) 100
(3) 120
(4) 110

स्पष्टीकरण- 50७8 = 400, 100७8 = 800
800+ 400= 1200 रु., एकूण रक्कम आहे.
आता 10 रुपयांच्या नोटासाठी 1200 - 10 = 120 नोटा आहेत.
पर्याय क्र. 3 बरोबर
——————————————————————--
(5) 5 रु., 10 रु व 20 रु. मूल्यांच्या प्रत्येकी किती समान एकत्र केल्यास 875 रु. होतील?
(1) 25
(2) 50
(3) 21
(4) 35

स्पष्टीकरण- 5+10+20- 35 रु. होतात.
875 - 35 =25 नोटा घ्याव्या लागतात.
पर्याय क्र. 1 बरोबर
——————————————————
नमूना प्रश्न :-

(1) एक पुस्तक व एक वही यांची एकूण किंमत 64 रु. आहे. पुस्तकांची किंमत वहीच्या किंमतीपेक्षा 18 रुपयांनी जास्त आहे. तर 2 वह्यांची किंमत किती होईल?
(1) 41 रु. (2) 23 रु. (3) 36 रु. (4) 46 रु.

(2) प्रदीपजवळ 1०० रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या पावपट नोटा 500 रुपयांच्या, निमपट नोटा 50 रुपयांच्या व दुप्पट नाणी 1 रुपयाची असे मिळून एकुण 10080 रु. आहेत, तर प्रदीपजवळ 100 रुपयांच्या किती नोटा आहेत ?
(1) 20 (2) 30 (3) 40 (4) 50

(3) 300 रुपयांत 20 रुपयांच्या किती नोटा येतील?
(1) 20 (2) 40 (3) 15 (4) 6000

(4) अथर्वने सुयशकडून 2 रुपयांची 80 नाणी घेतली व तिला 5 रुपयांची 32 नाणी दिली. 5 रुपयांची 32 नाणी देऊन त्याने आर्यनकडून 10 रुपयांची 15 नाणी घेतली. ही सर्व नाणी त्याने मिलिंदला दिली. तर एकूण रकमेत काही रक्कम कमी आढळली तर खालीलपैकी कोणी रक्कम कमी किंवा जास्त दिली.?
(1) सुयश (2) आर्यन (3) मिलिंद (4) अथर्व

(5) राजूभार्इंनी आपल्याजवळील 1000 रुपये रकमेच्या 1/8 रुपये आपल्या मोठ्या मुलास व आपल्या दोन मुलींना प्रत्येकीस सहलीसाठी दिले. एकूण तिघांना मिळून किती रुपये दिले?
(1) 250 (2) 375 (3) 400 (4) 125

(6) संग्रामजवळ 10 रुपये किमतीच्या, 5 रुपये किमतीच्या आणि 20 रुपये किमतीच्या अनुक्रमे 10, 10, 15 नोटा असल्यास त्याच्याजवळील एकूण रक्कम किती?
(1) 470 रु. (2) 360 रु. (3) 440 रु. (4) 395 रु.

(7) श्रावणीकडे 5 रु. व 10 रु.च्या समान नोटा आहेत. त्यांची एकूण किंमत दीडशे रुपये असल्यास श्रावणीकडे एकूण किती नोटा आहेत?
(1) 5 (2) 10 (3) 2 (4) 20

(8) सम्यककडे 10 रुपयांच्या नाण्यांच्या रकमेच्या दुप्पट रक्कम 20 रुपयांच्या नाण्यांची रक्कम आहे. 10 रुपयांची नाणी 24 असल्यास त्याच्याकडील 20 रुपयांच्या नोटांचा संख्या किती?
(1) 48 (2) 44 (3) 30 (4) 24

(9) 5254 रुपयांत 50 रु.च्या 5 नोटा, 1 रु. च्या 4 नोटा व उरलेल्या 100 रु. च्या नोटा आहेत, तर 100 रु. च्या नोटांची संख्या किती?
(1) 50 (2) 55 (3) 56 (4) 52

(10) सृष्टीकडे 10 व 20 रुपयांच्या समान नोटा आहेत. त्याची एकूण रक्कम 900 रुपये असल्यास 10 रुपयांच्या नोटांची एकूण रक्क्म किती?
(1) 300 रु. (2) 600 रु. (3) 400 रु. (4) 500 रु.

(11) 192 रुपयांत 5 रु., 2 रु., व 1 रु.च्या समान संख्येत एकूण नोटा किती आहेत.?
(1) 24 (2) 72 (3) 48 (4) यापैकी नाही

(12) अडीच रुपये म्हणजे किती पैसे?
(1) 2500 पैसे (2) 150 पैसे (3) 750 पैसे (4) 250 पैसे

(13) सव्वा रुपया + साडेतीन रुपये = किती?
(1) 4 रु. 75 पै. (2) 5 रु. 75 पै. (3) 3 रु. 75 पै. (4) 4 रु. 75 पै.
————————————————————--
————————————————————--
उत्तर सूची :-

(1) 4 (2) 3 (3) 3 (4) 2 (5) 2 (6) 1 (7) 4 (8) 1 (9) 1 (10) 1 (11) 3 (12) 4 (13) 1

वेग, वेळ आणि अंतर विषयी संपूर्ण माहिती

नमूना पहिला –

उदा.  300 मीटर लांबीच्या ताशी 72 कि.मी. वेगाने जाणार्‍या आगगाडीच्या एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल?

45 से.

15 से.

25 से.

35 से.

उत्तर : 15 से.

क्लृप्ती :-एका तासाचे सेकंद = 3600 व 1 कि.मी. = 1000 मी. 3600/1000=18/5, या आधारे वेग व वेळ काढताना 18/5 ने गुणा व अंतर काढताना 5/18 ने गुणा. खांब ओलांडण्यास लागणारा वेळ = गाडीची लांबी/ताशी वेग × 18/5 ∶:  300/72×18/5=15 सेकंद

 नमूना दूसरा –

उदा. ताशी 40 कि.मी. वेगाने जाणार्‍या 400 मीटर लांबीच्या मालगाडीस 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल?

1मि. 12से.

1मि. 25से.

36से.

1मि. 10से.

उत्तर : 1मि. 12से.

क्लृप्ती :-एकूण कापावयाचे अंतर = गाडीची लांबी + पूलाची लांबी = 400+400 =800 मि.
पूल ओलांडण्यास लागणारा वेळ = गाडीची लांबी + पूलाची लांबी/ताशी वेग × 18/5

 नमूना तिसरा –

उदा. ताशी 54 कि.मी. वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेंकदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी किती?

540मी.

162मी.

270मी.

280मी.

उत्तर : 270 मी.

सूत्र :- गाडीची लांबी = वेग × वेळ × 5/18 = 54×18×5/18 = 270 मी.

 नमूना चौथा –

उदा. 800 मी. अंतर 72 सेकंदात ओलांडांनार्‍य गाडीचा ताशी वेग किती कि.मी. ?

54 कि.मी.

40 कि.मी.

50 कि.मी.

60 कि.मी.

उत्तर : 40 कि.मी.  

क्लृप्ती :-वेग = अंतर/वेळ ×18/5 = 800/72 × 18/5 = 40 (वेग काढताना 18/5 ने गुणणे)

 नमूना पाचवा –

उदा. मुंबईला नागपूरला जाणार्‍या दोन गाड्यांपैकी ताशी 60 कि.मी. वेगाने जाणारी पहिली गाडी सकाळी 7.30 वाजता सुटली. त्यानंतर त्याच दिवशी त्याच मार्गाने दुसरी गाडी ताशी 75 कि.मी. वेगाने सकाळी 8.30 वाजता सुटली, तर त्या एकमेकीस किती वाजता भेटतील?

दु.12 वा.

12.30 वा.

1.30 वा.

11.30 वा.

उत्तर : 12.30 वा.

क्लृप्ती :-भेटण्यास दुसर्‍या गाडीला लागणारा वेळ = वेळेतील फरक × पहिल्या गाडीचा/वेगातील फरक = 1 तास×60/75-60 = 60/15 = 4 तास

 नमूना सहावा –

उदा. मुंबई ते गोवा हे 540 कि.मी. अंतर. मुंबईहून सकाळी 8.30 वा. सुटलेल्या ताशी 60 कि.मी. वेगाने जाणार्‍या गाडीची त्याचवेळी गोव्याहून सटलेल्या ताशी 75 कि.मी. वेग असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल?

दु.12.30 वा.

दु.12वा.

दु.1.30 वा.

दु.1वा.

उत्तर : दु.12.30वा.

क्लृप्ती :- लागणारा वेळ = एकूण अंतर/दोन गाड्यांच्या वेगांची बेरीज

 नमूना सातवा –

उदा. ताशी 60 कि.मी. सरासरी वेगाने जाणारी आगगाडी, जर ताशी 75 कि.मी. वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 48 मिनिटे लवकर पोहचली, तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला?

300 कि.मी.

240 कि.मी.

210 कि.मी.

270 कि.मी.

उत्तर : 240 कि.मी.

स्पष्टीकरण :-60 व 75 चा लसावी = 300
300 ÷ 60 = 5 तास     :: 60 मिनिटे फरक = 60×5=300 कि.मी.
300 ÷ 75 = 4 तास     :: 48 मिनिटे फरक = 4×60 = 240 कि.मी.

11व्या अणूऊर्जा परिषदेचे डॉ. जितेंद्र सिंग यांच्या हस्ते उद्‌घाटन

- शांततापूर्ण वापरासाठी भारताच्या अणुऊर्जेचा वापर करण्याचे होमी भाभा यांचे स्वप्न पूर्ण करु शकलो असे केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी म्हटले आहे. सरकारने विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये अणुऊर्जेचा वैविध्यपूर्ण वापर केल्याचे त्यांनी सांगितले. ते आज नवीन दिल्लीत 11व्या अणुऊर्जा परिषदेच्या उद्‌घाटन प्रसंगी बोलत होते.

- देशात वैज्ञानिक प्रति आवड निर्माण करण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलल्याचे ते म्हणाले. यापूर्वी अणुऊर्जा प्रकल्प केवळ दक्षिण भारतापर्यंतच मर्यादित होते, मात्र आता देशाच्या विविध भागांमध्ये अणु प्रकल्प सरकार स्थापन करत आहेत, असे त्यांनी सांगितले. याचा एक भाग म्हणून हरियाणातील गोरखपूर येथे अणु ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यात आले असल्याचे सांगितले.

- अणुऊर्जेच्या वापरासंबंधी जनतेमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. देशाच्या वाढत्या ऊर्जा विषयक गरजा पूर्ण करण्यासाठी अणुऊर्जा हा महत्वपूर्ण स्रोत असल्याचे त्यांनी सांगितले.

- या परिषदेत विविध संकल्पनांवर आधारीत सत्रं घेण्यात आली.