Friday, 18 October 2019

चालू घडामोडी प्रश्नसंच आणि स्पष्टीकरण १९/१०/२०१९

प्र.१) अलीकडेच चर्चेत असलेले ‘लोटस-HR’ हे कशाशी संबंधित आहे?

(अ) औषधी
(ब) जलशुद्धीकरण✅✅✅
(क) तांत्रिक शिक्षण
(ड) खगोलशास्त्र

स्पष्टीकरण : अलीकडेच चर्चेत असलेले ‘लोटस-HR’ हे जलशुद्धीकरण संबंधित आहे.

प्र.२) कोणती योजना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) यासारख्या क्षेत्रात रुची निर्माण करण्यासाठी विद्यार्थिंनींना (महिला) मदत करण्याच्या उद्देशाने आहे?

(अ) सुकन्या समृद्धी
(ब) CBSE उडान योजना
(क) विज्ञान ज्योती✅✅✅
(ड) बेटी बचाओ बेटी पढाओ

स्पष्टीकरण : विज्ञान ज्योती योजना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) यासारख्या क्षेत्रात रुची निर्माण करण्यासाठी विद्यार्थिंनींना (महिला) मदत करण्याच्या उद्देशाने आहे.

प्र.३) ‘बियॉन्ड 2020: ए व्हिजन फॉर टुमारोज इंडिया’ हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

(अ) डॉ. मनमोहन सिंग
(ब) डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम✅✅✅
(क) अटलबिहारी वाजपेयी
(ड) चेतन भगत

स्पष्टीकरण : ‘बियॉन्ड 2020: ए व्हिजन फॉर टुमारोज इंडिया’ हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम हे आहेत.

प्र.४) _ या संस्थेनी ‘साऊथ एशिया इकॉनॉमिक फोकस, मेकिंग (डी)सेंट्रलायझेशन वर्क’ संदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.

(अ) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)
(ब) जागतिक आर्थिक मंच (WEF)
(क) जागतिक बँक✅✅✅
(ड) संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP)

स्पष्टीकरण : जागतिक बँक या संस्थेनी ‘साऊथ एशिया इकॉनॉमिक फोकस, मेकिंग (डी)सेंट्रलायझेशन वर्क’ संदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.

प्र.५) 📌2019 सालाचा बुकर पुरस्कार कोणी जिंकला?

(अ) अॅना बर्न्स आणि सॅली रुनी
(ब) जॉर्ज सौन्डर्स आणि अॅना बर्न्स
(क) पॉल बेटी आणि मार्लन जेम्स
(ड) मार्गारेट अॅटवुड आणि बर्नार्डिन इव्हारिस्टो
      ✅✅✅

स्पष्टीकरण : ) 2019 सालाचा बुकर पुरस्कार मार्गारेट अॅटवुड आणि बर्नार्डिन इव्हारिस्टो यांनी जिंकला.

प्र.६) UNICEF या संस्थेच्या ‘द स्टेट ऑफ वर्ल्ड्स चिल्ड्रेन’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे?

अ) अमेरिकेत बालमृत्यू दर सर्वात कमी आहे.

ब) ‘द स्टेट ऑफ वर्ल्ड्स चिल्ड्रेन’ अहवाल दरवर्षी प्रसिद्ध केला जातो.

(अ) केवळ अ
(भ) केवळ ब✅✅✅
(क) अ आणि ब दोन्ही
(ड) यापैकी एकही नाही

स्पष्टीकरण : UNICEF या संस्थेच्या ‘द स्टेट ऑफ वर्ल्ड्स चिल्ड्रेन’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालाच्या संदर्भात खालीलपैकी ‘द स्टेट ऑफ वर्ल्ड्स चिल्ड्रेन’ अहवाल दरवर्षी प्रसिद्ध केला जातो, हे विधान चुकीचे आहे.

प्र.७) ___ या दिवशी जागतिक विद्यार्थी दिन साजरा केला जातो.

(अ) 10 ऑक्टोबर
(ब) 12 ऑक्टोबर
(क) 13 ऑक्टोबर
(ड) 15 ऑक्टोबर✅✅✅

स्पष्टीकरण : 15 ऑक्टोबर या दिवशी जागतिक विद्यार्थी दिन साजरा केला जातो.

प्र.८) कोण WTA टुरवरचे जेतेपद जिंकणारी अमेरिकेची सर्वात तरुण महिला ठरली?

(क) करोलिना प्लिस्कोवा
(ब) नाओमी ओसाका
(क) अॅशले बार्टी
(ड) कोको गॉफ✅✅✅

स्पष्टीकरण : कोको गॉफ हि महिला WTA टुरवरचे जेतेपद जिंकणारी अमेरिकेची सर्वात तरुण महिला ठरली.

प्र.९) __ येथे ‘जागतिक महिला मुष्टियुद्ध अजिंक्यपद 2019’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.

(अ) रशिया✅✅✅
(ब) न्युझीलँड
(क) भारत
(ड) जर्मनी

स्पष्टीकरण : रशिया येथे ‘जागतिक महिला मुष्टियुद्ध अजिंक्यपद 2019’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.

प्र.1०) __ याने ‘डच ओपन 2019’ बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद जिंकले.

(अ) किमर कोपेजन्स
(ब) लक्ष्य सेन✅✅✅
(क) मॅट मोरिंग
(ड) युसुके ओनोडेरा

स्पष्टीकरण : लक्ष्य सेन याने ‘डच ओपन 2019’ बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद जिंकले.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 सराव प्रश्न

1) पुढीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यये व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय नाही?

   1) विनी    2) खेरीज    3) देखील    4) निराळा

उत्तर :- 3

2) अधोरेखित शब्दाची जात ओळखा. – ‘कांगारू म्हणून एक सस्तन प्राणी आहे.’

   1) स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय      2) समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय
   3) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय    4) उद्देश्यबोधक उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 1

3) ठीक ! या अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो.

   1) प्रशंसा    2) विरोध      3) आश्चर्य    4) यापैकी नाही

उत्तर :- 1

4) ‘मी निबंध लिहीत असतो.’ या ‍विधानातील काळाचा प्रकार कोणता ?

   1) साधा वर्तमानकाळ      2) अपूर्ण वर्तमानकाळ
   3) पूर्ण वर्तमानकाळ      4) रीती वर्तमानकाळ

उत्तर :- 4

5) ‘वाघ’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

   1) वाघिण    2) वाघिन    3) वाघ्रीन    4) वाघीण

उत्तर :- 4

6) ‘तो शाळेत पायी गेला’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा.

   1) कर्ता    2) अपादान    3) करण      4) अधिकरण

उत्तर :- 3

7) ‘सर्वांनी सकाळी लवकर उठावे’ ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ?

   1) संकेतार्थी    2) स्वार्थी    3) आज्ञार्थी    4) विध्यर्थी

उत्तर :- 4

8) खालील विधानातील उद्देश्यविस्तार स्पष्ट करणारा शब्द ओळखा.

     ‘शिवाजीचा भाऊ व्यंकोजी तंजावरास गेला.’

   1) व्यंकोजी    2) शिवाजी    3) शिवाजीचा भाऊ  4) तंजावरास

उत्तर :- 3

9) ‘शिपायाकडून चोर धरला गेला.’ हे या प्रयोगातील वाक्य होय.

   1) भावे    2) कर्मकर्तरी    3) कर्तृकर्तरी    4) कर्मणी

उत्तर :- 2

10) ‘पुरणपोळी’ या शब्दाचा अर्थ

   1) पुरण भरलेली पोळी      2) पुरणाची पोळी
   3) पुरण आणि पोळी      4) गूळ घालून केलेली पोळी

उत्तर :- 1

पोलीस भरती साठी महत्वाचे आजार व त्याचे स्त्रोत


स्त्रोत:-आजार

हवेमार्फत पसरणारे आजार:-क्षयरोग, न्यूमोनिया, डांग्या खोकला, कुष्ठरोग,गालफुगी (गालगुंड), गोवर : जर्मन गोवर, इन्फ्ल्युन्झा (फ्ल्यू),सर्दी, पडसे, घटसर्प, अॅथ्रक्स, पोलिओ.

कवकांमुळे (Fungus) होणारे आजार:-रिंगवर्म, मदूरा फूट, अॅथलेट फूट, धोबी ईच, गजकर्ण नायटा, चिखल्या.

कृमींमुळे (Worms) होणारे आजार:-अस्करियासिस, अंकिलोस्टोमियासिस, टिनीयोसिस, नारू (ड्रॅकयूनक्युलस मेडीनेसीस), विविध कृमी संसर्गामुळे होणारे (गोलकृमी, अंकुश कृमी) रक्तक्षय, हत्तीरोग – (फायलेरिया) (नूचेरिया बॅन्क्रोप्टी, बी.मालायी).

आनुवंशिक आजार:-हिमोफिलीया (रक्त न गोठणे), मधुमेह (डायबेटीस), दमा (अस्थमा), रंग आंधळेपणा, अल्बींनिझम

काही महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटना

                ★G- 4 संघटना★

●सदस्य देश - ब्राझील , भारत , जर्मनी , जपान
●उद्देश - संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत स्थायी स्थान प्राप्त करणे

                  ★G-5 संघटना★
●सदस्य देश - भारत, चीन, ब्राझील, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका
●उद्देश - वेगाने विस्तारित होणाऱ्या आर्थिक जगतात परस्पर साहाय्य व सहयोग याद्वारे विकास साध्य करणे.
      
                 ★G-6 संघटना★
●सदस्य देश - अमेरिका , युनायटेड किंगडम , फ्रांस , जर्मनी , इटली , जपान
  
                ★G-7 संघटना★
●सदस्य देश- अमेरिका , फ्रांस , इटली , कॅनडा , जपान , जर्मनी , युनायटेड किंगडम
--------------------------------------------------------

मराठमोळे शरद बोबडे देशाचे नवे सरन्यायाधीश ...?

◾️ विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई पुढील महिन्यात म्हणजेच 17 नोव्हेंबरला निवृत्त होत आहे.

◾️त्यामुळे आता मराठमोळे शरद बोबडे देशाचे नवे सरन्यायाधीश होण्याची शक्यता आहे. खुद्द रंजन गोगोई यांनी केंद्र सरकारला नवे सरन्यायाधीश म्हणून एस ए बोबडे यांचं नाव सुचवलं आहे.

◾️न्यायमूर्ती बोबडे सध्या रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या विशेष पीठाचे सदस्य आहेत. याशिवाय अनेक मोठ्या निकालांमध्ये त्यांचा समावेश होता.

◾️याआधी यशवंत विष्णू चंद्रचूड हे सरन्यायाधीश होणारे पहिले मराठमोळे व्यक्ती होते. ते सर्वाधिक काळ म्हणजेच 7 वर्ष 4 महिने सरन्यायाधीश पदावर कार्यरत होते.

📌  न्यायमूर्ती शरद बोबडे यांचा
   अल्पपरिचय  💢

◾️ न्यायमूर्ती अरविंद शरद बोबडे (एस. ए. बोबडे) यांचा जन्म 24 एप्रिल, 1956 रोजी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये झाला.

◾️नागपूर विद्यापीठातून त्यांनी बीए आणि एलएलबीची पदवी घेतली.

◾️1978 मध्ये न्यायमूर्ती बोबडे यांनी बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्रमध्ये सामील झाले.

◾️ यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात कायद्याची प्रॅक्टिस केली, तर 1998 मध्ये वरिष्ठ वकील बनले.

◾️ 2000 मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर ते मध्य प्रदेश हायकोर्टाचे न्यायमूर्ती बनले.

◾️2013 मध्ये सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलं.

◾️ न्यायमूर्ती एस. ए. बोबडे 23 एप्रिल, 2021 रोजी निवृत्त होणार आहेत.

◾️ 18 नोव्हेंबर रोजी न्यायमूर्ती बोबडे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेऊ शकतात. विद्यमान सरन्यायाधीशांच्या शिफारशींना केंद्राची मंजुरी मिळाल्यानंतर प्रक्रिया सुरु होईल.

📌कोणत्या मोठ्या निकालांमध्ये न्यायमूर्ती एस ए बोबडे यांचा समावेश?

◾️ सुप्रीम कोर्टाने आधार कार्डसंदर्भात दिलेल्या आदेशात न्यायमूर्ती एस. एस. बोबडे यांचाही समावेश होता. आधार कार्डशिवाय कोणताही भारतीय नागरिक सुविधांपासून वंचित राहू शकत नाही, असं मत सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात नोंदवलं होतं. या खंडपीठात न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती चेलमेश्वर आणि न्यायमूर्ती नागप्पन यांचा समावेश होता.

◾️सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात जे लैंगिक अत्याचाराचं प्रकरण समोर आलं होतं, त्याचा तपास सुप्रीम कोर्टाचेच तीन न्यायमूर्ती करत होते. या खंडपीठात न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, एन व्ही रमण आणि इंदिरा बॅनर्जी यांचा समावेश होता.

◾️ नोव्हेंबर, 2016 मध्ये तीन मुलांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने दिल्ली-एनसीआरमध्ये फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली होती. या निकालात न्यायमूर्ती एस. ए. बोबडेही सामील होते. त्याच्यासोबत या खंडपीठात तत्कालीन सरन्यायाधीश टीएस ठाकूर, न्यायमूर्ती एके सीकरी हे देखील होते.

◾️ मागील चाळीस दिवसांपासून रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणाती दररोज सुनवाणी करणाऱ्या पाच न्यायमूर्तींच्या विशेष पीठात एस ए बोबडेही सहभागी होते.

राज्य अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धा : जान्हवीला सुवर्ण

🔷वरळी येथील महाराष्ट्र रायफल संघटनेच्या नेमबाजी केंद्रावर सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात महिला गटामध्ये रायगडच्या जान्हवी खानविलकरने सुवर्णविजेती कामगिरी केली.

🔷तिने २५०.४ गुणांची कमाई केली. याच गटात रौप्य जिंकणाऱ्या पुण्याच्या नंदिता सुळने कनिष्ठ तसेच युवा गटात मात्र पहिला क्रमांक मिळवला.

🔷निकाल :१० मीटर एअर रायफल (महिला) : १. जान्हवी खानविलकर, २. नंदिता सुळ, ३. नेहा चाफेकर; १० मीटर एअर रायफल ज्युनियर (महिला) : १. नंदिता सुळ, २. भार्गवी कासार, ३. रिशिमा कानडे (पुणे); युवा गट : १. नंदिता सुळ, २. रितुल कुंडले, ३. भार्गवी कासार.

मधुकर कामथ यांची ऑडिट ब्युरो ऑफ सर्किल्सच्या अध्यक्षपदी निवड


🔰डीडीबी मुद्रा गटाचे अध्यक्ष आणि इंटरब्रँड इंडियाचे मार्गदर्शक मधुकर कामथ यांची 2019-20 साठी ऑडिट ब्युरो ऑफ सर्किल्स (एबीसी) चे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

🔰कामथ हे अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सी असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्षही राहिले आहेत.

🔰एबीसी स्थापना 1948 मध्ये झाली आहे. एबीसी चे मुख्यालय मुंबई मध्ये आहे.

🔰मधुकर कामथ हे एक्सएलआरआय, जमशेदपूर आणि चेन्नईच्या लोयोला महाविद्यालयाचे प्रतिष्ठित विद्यार्थी आहेत.

🔰त्याला जाहिरात उद्योगातील चार दशकांहून अधिक काळचा अनुभव आहे आणि त्यांनी आताच्या मुद्राने डीडीबी मुद्रा ग्रुपमध्ये पंचवीस वर्षे पूर्ण केली आहेत.

🔰एएएआय लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड श्री मधुकर कामथ यांना 6 सप्टेंबर 2019 रोजी मुंबई येथे दिला.

NITI आयोगाच्या ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2019’मध्ये कर्नाटक अव्वल

राष्ट्रीय भारत परिवर्तन संस्था (NITI) आयोगाने या वर्षीचा ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2019’ प्रसिद्ध केले आहे. ही यादी तयार करण्यात इंस्टीट्यूट फॉर कॉम्पटेटिवनेस या संस्थेनी नॉलेज पार्टनर म्हणून काम केले.

- या अभ्यासात नवकल्पनात्मक शोधांसाठी वातावरण तयार करण्यासाठी भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला आहे. त्यामुळे या प्रयत्नांमध्ये येणारी आव्हाने आणि अडथळे दूर करून आर्थिक वाढीसाठी धोरणे आखण्यास मदत मिळते.

- मनुष्यबळ, गुंतवणूक, ज्ञानी कामगार, व्यवसायासाठी वातावरण, सुरक्षितता व कायदेशीर वातावरण, नॉलेज आउटपुट आणि नॉलेज डिफ्यूजन अश्या सात स्तंभावर हा अभ्यास केला गेला आहे.

▪️ठळक बाबी

- कर्नाटक हे नवकल्पनात्मक शोधाच्या क्षेत्रात भारतातले अव्वल राज्य ठरले. पायाभूत सुविधा, ज्ञानी कामगार, नॉलेज आऊटपुट आणि व्यवसायासाठी वातावरण या क्षेत्रात राज्याने सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

- शीर्ष 10 मध्ये समाविष्ट होणारी इतर राज्ये (अनुक्रमे) - तामिळनाडू, महाराष्ट्र, तेलंगणा, हरियाणा, केरळ, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात आणि आंध्रप्रदेश.

- ईशान्य व डोंगराळ राज्यांमध्ये अव्वल ठरलेले – सिक्किम राज्य. (त्यापाठोपाठ हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मणीपूर, जम्मू व काश्मीर ही अव्वल पाच राज्ये)
केंद्रशासित प्रदेश / शहर राज्ये / छोट्या राज्यांमध्ये अव्वल ठरलेले - दिल्ली. (त्यापाठोपाठ चंदिगड, गोवा, पुडूचेरी, अंडमान व निकोबार बेटे)
दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा आणि उत्तरप्रदेश ही उपलब्धतेला उपयोगी बाबींमध्ये रूपांतरित करण्यासाठी सर्वात कार्यक्षम राज्ये ठरली.

- मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्य जरी तिसर्‍या क्रमांकावर असले तरीही राज्याने नवकल्पक शोधकार्यांसाठी मनुष्यबळ, गुंतवणूक, ज्ञानी कामगार, व्यवसायासाठी वातावरण, सुरक्षितता व कायदेशीर वातावरण या क्षेत्रांमध्ये सर्वोत्कृष्ट सक्षम वातावरण बनविल्याचे आढळून आले आहे.
—————————————-——

पाकिस्तान ‘ग्रे’ लिस्टमध्ये.

◾️ दहशतवाद्यांना होणारा अर्थपुरवठा आणि हवाला व्यवहारांवर लक्ष ठेवणाऱ्या पॅरिसस्थित आर्थिक कृती पथकाने (एफटीएफ) पाकिस्तानला पुन्हा एकदा ग्रे लिस्टमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

◾️पाकिस्तानने दहशतवाद्यांना होणारा अर्थपुरवठा वेळेत रोखला नाही तर त्याला काळ्या यादीमध्ये टाकण्यात येईल, असा इशारा या संघटनेकडून देण्यात आला आहे. 

◾️‘एफटीएफ’च्या पाचदिवसीय खुल्या अधिवेशनामध्ये हा निर्णय घेण्यात आला. या संघटनेकडूनच अन्य वैश्‍विक वित्तीय संघटनांना देखील नोटीस पाठविण्यात आली असून, या संघटनांनी २०२० पर्यंत पाकिस्तानला केली जाणारी मदत थांबवावी, असा इशारा देण्यात आला.

अयोध्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण, १५ नोव्हेंबरपूर्वी होणार अंतिम निर्णय

🅾_नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टामध्ये अयोध्या-बाबरी मशीद प्रकरणाची आज सुनावणी पूर्ण झाली. तब्बल 40 दिवस याप्रकरणी रोज सुनावणी सुरु होती, आज अंतिम सुनावणी होऊन दोन्ही पक्षांचा युक्तीवाद आज पूर्ण झाला.

🅾सुनावणी सुरु होताच एका वकिलाने अधिकची मुदत मागितली असता सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आजच सुनावणी पूर्ण होईल असं सांगता वकिलाचा हस्तक्षेप फेटाळला. कोर्टात सुनावणी सुरु असता अखिल भारतीय हिंदू महासभेचे वकील विकास सिंह यांनी सादर केलेला नकाशा ज्येष्ठ वकील राजीव धवन यांनी फाडला. राजीव धवन हे मुस्लिम पक्षाचे वकील आहेत.

🅾किशोर कुणाल यांच्या अयोध्या रिविजिटेड या पुस्तकातील हा राम मंदिराचा नकाशा होता. या नकाशाच्या मदतीने विकास सिंह त्यांचा मुद्दा मांडत असता नकाशा फाडण्यात आल्याने कोर्टात वादविवाद झाला. मध्यस्थ समितीकडून सुप्रीम कोर्टात अहवाल सादर करण्यात आला.

🅾हा खटला संवेदनशील असल्याने अयोध्येत कलम 144 लागू करण्यात आला आहे, तर 200 शाळा दोन महिने बंद राहणार आहेत. वृत्तवाहिन्यांवरील चर्चांवरही बंदी घालण्यात आली आहे. अयोध्या  17 नोव्हेंबरपूर्वी येण्याची शक्यता आहे. 23 दिवसांनी या प्रकरणाचा अंतिम निर्णय होणार आहे. सुनावणी ज्या सरन्यायाधीसांसमोर सुरु आहे त्या खंडपीठाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई हे 17 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत._

चालू घडामोडी वन लाइनर्स, 18 ऑक्टोबर 2019.

✳ एनआयटीआय आयुोगानं 1 लेव्हल इंडिया इनोव्हेशन इंडेक्स जारी केला

✳ कर्नाटक नीती आयोगाचे इंडिया इनोव्हेशन इंडेक्स अव्वल स्थानी

✳ नितीयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये तामिळनाडू दुसर्‍या क्रमांकावर आहे

✳ नितीयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये महाराष्ट्र तिसरा क्रमांकावर आहे

✳ नितीयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये तेलंगणा चौथा क्रमांक लागतो

✳ नितीयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये हरियाणाचा पाचवा क्रमांक लागतो

✳ नितीयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये केरळ सहाव्या क्रमांकावर आहे

✳ नितीयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये उत्तर प्रदेश 7 व्या क्रमांकावर आहे

✳ नितीयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये पश्चिम बंगालचा आठवा क्रमांक लागतो

✳ नितीयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये गुजरातचा 9 वा क्रमांक आहे

✳ नीति आयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये आंध्र प्रदेश दहाव्या क्रमांकावर आहे

✳ नीति आयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये पंजाबचा ११ वा क्रमांक आहे

✳ नितीयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये ओडिशाचा 12 वा क्रमांक आहे

✳ नितीयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये राजस्थानचा 13 वा क्रमांक आहे

✳ नितीयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये मध्य प्रदेश 14 व्या क्रमांकावर आहे

✳ नीति आयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये छत्तीसगडचा 15 वा क्रमांक आहे

✳ नीति आयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये बिहारचा 16 वा क्रमांक आहे

✳ नीति आयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये झारखंडचा 17 वा क्रमांक आहे

✳ जीतन पटेल यांनी इंग्लंडचा फिरकी गोलंदाजी सल्लागार म्हणून नेमणूक केली

✳ गुस लोगीने विंडीज महिला क्रिकेट संघाचा अंतरिम मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमणूक केली

✳ हुरुन रिसर्च इन्स्टिट्यूटने हुरुन ग्लोबल युनिकॉर्न लिस्ट 2019 जाहीर केली

✳ चीनने हरुन ग्लोबल युनिकॉर्न लिस्ट 2019 मध्ये अव्वल स्थान प्राप्त केले

✳ हुरन ग्लोबल युनिकॉर्न लिस्ट 2019 मध्ये अमेरिकेचा दुसरा क्रमांक आहे

✳ हुरन ग्लोबल युनिकॉर्न लिस्ट 2019 मध्ये भारताचा तिसरा क्रमांक आहे

✳ आरसीबी क्रीडा मसाज थेरपिस्ट म्हणून नवनीता गौतम यांची नेमणूक केली

✳ आरसीबी सहाय्यक स्टाफमध्ये महिला नियुक्त करण्यासाठी पहिला आयपीएल टीम बनला

✳ व्हेनेझुएलाची निवड संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेवर झाली

✳ लिबियाची निवड संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेवर झाली

✳ ब्लू स्टार रोप्स विराट कोहलीच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त

✳ पीव्ही सिंधू, समीर, प्रणीथ क्रॅश आऊट ऑफ डेन्मार्क ओपन

✳ 2023 मध्ये पुरुषांच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने इंडियाने बोली लावली

✳ भारत - ओमानमधील संयुक्त विमानाचा अभ्यास "ईस्टर्न ब्रिज-व्ही"

✳ एशिया हेल्थ -2019  परिषद नवी दिल्ली येथे आयोजित

✳ मध्य प्रदेशात 10 वा राष्ट्रीय संस्कृती महोत्सव 2019 आयोजित.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 सराव प्रश्न

1) विरुध्दार्थी अर्थ लिहा. – ‘अग्रज’

   1) वंशज    2) पूर्वज      3) मनोज      4) अनुज

उत्तर :- 4

2) रिकाम्या जागी योग्य म्हण लिहा.
     काय नाही आजच्या वर्तमानपत्रात ? लेख, अग्रलेख, वृत्तांत आणि सारे काही. तरी कशाचा प्रभाव मात्र नाही. यालाच म्हणतात,
     ‘......................’

   1) बडा घर अन् पोकळ वासा        2) एक ना धड भाराभार चिंध्या
   3) गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता    4) मियाँ मूठभर दाढी हातभर

उत्तर :- 2

3) ‘अल्लाची गाय’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.

   1) अतिशय धूर्त      2) अतिशय श्रीमंत   
   3) अतिशय गरीब    4) अतिशय भाग्यवान

उत्तर :- 3

4) ‘हालअपेष्टा सहन करण्याचा गुण’ या शब्दसमूहाबद्दल समूहदर्शक शब्द कोणता ?

   1) स्थितप्रज्ञता    2) हिंमत     
   3) तितिक्षा    4) शौर्य

उत्तर :- 3

5) खालीलपैकी शुध्द  शब्द कोणते ?

   1) चिंचा, खिंड, टिंब    2) चींच, खींड, टिंब   
   3) चिंच, खिंड, टिंब    4) चींच, खींड, टींब

उत्तर :- 3

5) ‘काल मी मावळणारा सूर्य पाहिला’ या वाक्यातील ‘मावळणारा’ या विशेषणाचा प्रकार कोणता?

   1) सिध्द विशेषण    2) क्रमवाचक विशेषण    3) गुण विशेषण    4) साधित विशेषण

उत्तर :- 4

6) ‘आई त्या मुलाला हसविते’ हे उदाहरण क्रियापदाच्या कोणत्या प्रकारात मोडते ?

   1) प्रयोजक      2) शक्य      3) अनियमित    4) सहायक

उत्तर :- 1

8) क्रियाविशेषण अव्यय व त्यांचे प्रकार यांच्या जोडया लावा.

   अ) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय    1) पलीकडे
   ब) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय    2) मोजके
   क) रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय    3) क्षणोक्षणी
   ड) परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय    4) सावकाश

  अ  ब  क  ड

         1)  2  4  1  3
         2)  3  1  4  2
         3)  4  2  3  1
         4)  1  3  2  4

उत्तर :- 2

9) योग्य पर्याय निवडा.

   अ) च, देखील, ना, मात्र, पण, ही, ही शुध्द शब्दयोगी अव्यये आहेत.
   ब) शुध्द शब्दयोगी अव्यये शब्दाला जोडून येताना मागील शब्दांची सामान्यरूपे होत नाही.

   1) अ      2) ब      3) दोन्ही      4) दोन्ही नाही

उत्तर :- 3

10) दोन नामे, वाक्ये किंवा एकवर्गीय शब्द जोडणा-या शब्दाला कोणते अव्यय म्हणतात ?

   1) उभयान्वयी अव्यय    2) शब्दयोगी अव्यय   
   3) केवलप्रयोगी अव्यय    4) क्रियाविशेषण अव्यय

उत्तर :- 1

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...