Tuesday, 15 October 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न


1) ‘सरदार व जमीनदार यांचे वर्चस्व असणारे राज्यशासन’ या शब्दसमूहाला खालील योग्य शब्द सांगा.

   1) सावकारशाही    2) राजेशाही   
   3) सामंतशाही      4) जमीनदारशाही

उत्तर :- 3

2) खालीलपैकी शुध्द शब्द कोणता ?

   1) आध्यात्मिक      2) अध्यात्मिक   
   3) आध्यात्मीक      4) अधात्मिक
उत्तर :- 1

3) मराठीत कोणता वर्ण स्वतंत्र मानला आहे ?

   1) क्     2) ण्     3) ळ      4) क्ष्
उत्तर :- 3

4) पुनर् + जन्म हा कोणत्या संधीयुक्त शब्दाचा विग्रह आहे ?

   1) पुर्नजन्म    2) पूर्ण जन्म    3) पुनर्जन्म    4) पुनर्जम्न

उत्तर :- 3

5) अचूक विधाने निवडा.

   अ) शब्द आणि पद हे एकसारखेच आहे.
   ब) शब्दापासून पदे बनतात.
   क) पदापासून शब्द बनतात.
   1) फक्त अ अचूक  2) फक्त अ आणि क अचूक
   3) फक्त ब अचूक    4) फक्त क अचूक

उत्तर :- 3

6) तितिक्षा या शब्दासाठी योग्य शब्दसमूह कोणता?

   1) केलेले उपकार जाणणारा    2) केलेले उपकार न जाणणारा
   3) हालअपेष्टा सहन करण्याचा गुण    4) जाणून घेण्याची इच्छा असणारा

उत्तर :- 3

7) योग्य शब्द निवडा.

   1) अल्पसंख्याक    2) अल्पसंख्यांक   
   3) अल्पसख्यांक    4) अल्पसंख्याकं

उत्तर :- 1

8) पुढील स्वर जोडयातून सजातीय स्वर जोडी ओळखा.

   1) उ – ऊ    2) अ – इ   
   3) इ – ए    4) अ – ई

उत्तर :- 1

9) ‘अंत:करण’ या शब्दाच्या संधीचा खालील योग्य पर्याय निवडा.

   1) अंत: + करण      2) अंतस् + करण   
   3) अत:स् + करण    4) अंतर् + करण

उत्तर :- 4

10) श्रीमंत माणसांना गर्व असतो. – या वाक्यातील विशेषणाचे नाम करा.

   1) श्रीमंतांना गर्व असतो    2) श्रीमंत माणसे गर्विष्ठ असतात
   3) माणसांना गर्व असतो    4) यापैकी नाही

उत्तर :- 1

आजपर्यंतचे नोबेल पुरस्काराचे भारतीय मानकरी


● रवींद्रनाथ टागोर - 1913 - साहित्याचा नोबेल

● चंद्रशेखर व्यंकट रमण-1930 - भौतिकशास्त्र नोबेल

●हरगोविंद खुराणा-1969- वैद्यकशास्त्र नोबेल

●मदर तेरेसा – 1978 -  शांततेचा नोबेल

●सुब्रमण्यम चंद्रशेखर - 1983 - भौतिकशास्त्र नोबेल

●अमर्त्य सेन - 1998 -  अर्थशास्त्र नोबेल

●व्ही.एस.नायपॉल - 2001 - साहित्याचा नोबेल

●व्यंकटरमण रामकृष्णन- 2009- रसायनशास्त्र नोबेल

●कैलाश सत्यार्थी – 2014 - शांततेचा नोबेल

●आर.के.पचौरी - 2015 - शांततेचा नोबेल

●अभिजित बॅनर्जी-2019 - अर्थशास्त्र नोबेल

✅ भारतीयांना प्राप्त नोबेल पारितोषिक:-

साहित्याचा नोबेल - 2
शांतता नोबेल - 3
अर्थशास्त्र नोबेल - 2
वैद्यकशास्त्र नोबेल - 1
भौतिकशास्त्र नोबेल - 3

मरियम थ्रेसियांना ‘संत’ पदवी बहाल


- केरळमधील नन मरियम थ्रेसिया यांच्यासह इतर चार जणांना रविवारी व्हॅटिकन सिटीमध्ये झालेल्या भव्य समारंभात सेंट फ्रान्सिसने संत पदवी दिली. तिच्या मृत्यूनंतर 93 वर्षांनंतर नन मेरी थ्रेसिया यांना ही उपाधी देण्यात आली.
- सिस्टर थ्रेसिया यांचे वयाच्या 50 व्या वषी 8 जून 1926 रोजी निधन झाले होते. महिलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱया मरियम थ्रेसिया यांनी बऱयाच शाळा स्थापन केल्या होत्या. त्यांचा जन्म 3 मे 1876 रोजी झाला होता. विशेष म्हणजे केरळमध्ये सामाजिक उन्नतीसाठी प्रसिद्ध असलेल्या थ्रेसिया यांना ‘मदर तेरेसा’ यांच्यासारखे मानले जाते.
- व्हॅटिकन सिटीच्या सेंट पीटर स्क्वेअरमध्ये नन मरियम थ्रेसिया यांना संत मान देऊन सन्मानित करण्यात आले. सिस्टर थेसिया यांनी 50 वर्षांच्या स्वतःच्या अल्प आयुष्यात मानवतेच्या भल्यासाठी केलेले कार्य जगासाठी अद्भूत उदाहरण आहे असे सांगत स्वतःसाठी नव्हे तर इतरांकरता जगणाऱया असामान्य लोकांची जन्मभूमी आणि कर्मभूमी भारत राहिला आहे.

महत्वपूर्ण चालू घडामोडी सराव प्रश्नावली 15/10/2019

1) जंकफुडवर कर लादणारे भारतातील पहिले राज्य कोणते.
   1) केरळ    2) कर्नाटक    3) गुजरात    4) महाराष्ट्र
उत्तर :- 1

2) खालील माहितीचा विचार करा.
   अ) महाराष्ट्र राज्यातील पहिले मराठी विद्यापीठ वांद्रे येथे सुरू होणार आहे.
   ब) 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
  1) अ, ब सत्य    2) अ सत्य    3) ब सत्य    4) अ, ब सत्य
उत्तर :- 1

3) ‘मिस इंडिया 2018’ चा किताब खालीलपैकी कोणी जिंकला.
   1) मिनाक्षी चौधरी    2) अनुकृती व्यास   
   3) श्रेया राव      4) मानुषी छिल्लर
उत्तर :- 2

4) सामाजिक लेखापरीक्षण कायदा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते.
   1) मेघालय    2) मणीपूर      3) मिझोराम    4) केरळ
उत्तर :- 1

5) स्वाईन फ्लूची मोफत लस देणारे भारतातील पहिले राज्य कोणते.
   1) आसाम    2) गोवा      3) महाराष्ट्र    4) तामीळनाडू
उत्तर :- 3