1) ‘सरदार व जमीनदार यांचे वर्चस्व असणारे राज्यशासन’ या शब्दसमूहाला खालील योग्य शब्द सांगा.
1) सावकारशाही 2) राजेशाही
3) सामंतशाही 4) जमीनदारशाही
उत्तर :- 3
2) खालीलपैकी शुध्द शब्द कोणता ?
1) आध्यात्मिक 2) अध्यात्मिक
3) आध्यात्मीक 4) अधात्मिक
उत्तर :- 1
3) मराठीत कोणता वर्ण स्वतंत्र मानला आहे ?
1) क् 2) ण् 3) ळ 4) क्ष्
उत्तर :- 3
4) पुनर् + जन्म हा कोणत्या संधीयुक्त शब्दाचा विग्रह आहे ?
1) पुर्नजन्म 2) पूर्ण जन्म 3) पुनर्जन्म 4) पुनर्जम्न
उत्तर :- 3
5) अचूक विधाने निवडा.
अ) शब्द आणि पद हे एकसारखेच आहे.
ब) शब्दापासून पदे बनतात.
क) पदापासून शब्द बनतात.
1) फक्त अ अचूक 2) फक्त अ आणि क अचूक
3) फक्त ब अचूक 4) फक्त क अचूक
उत्तर :- 3
6) तितिक्षा या शब्दासाठी योग्य शब्दसमूह कोणता?
1) केलेले उपकार जाणणारा 2) केलेले उपकार न जाणणारा
3) हालअपेष्टा सहन करण्याचा गुण 4) जाणून घेण्याची इच्छा असणारा
उत्तर :- 3
7) योग्य शब्द निवडा.
1) अल्पसंख्याक 2) अल्पसंख्यांक
3) अल्पसख्यांक 4) अल्पसंख्याकं
उत्तर :- 1
8) पुढील स्वर जोडयातून सजातीय स्वर जोडी ओळखा.
1) उ – ऊ 2) अ – इ
3) इ – ए 4) अ – ई
उत्तर :- 1
9) ‘अंत:करण’ या शब्दाच्या संधीचा खालील योग्य पर्याय निवडा.
1) अंत: + करण 2) अंतस् + करण
3) अत:स् + करण 4) अंतर् + करण
उत्तर :- 4
10) श्रीमंत माणसांना गर्व असतो. – या वाक्यातील विशेषणाचे नाम करा.
1) श्रीमंतांना गर्व असतो 2) श्रीमंत माणसे गर्विष्ठ असतात
3) माणसांना गर्व असतो 4) यापैकी नाही
उत्तर :- 1