१४ ऑक्टोबर २०१९

2020 टोकियो ऑलम्पिकसाठी भारत प्रथमच ऑलम्पिक आतिथ्यगृह उघडणार

- टोकियो (जापान) या शहरात होणार्‍या ‘2020 उन्हाळी ऑलम्पिक’ स्पर्धेदरम्यान भारतीय खेळाडूंना आणि काही विशेष अतिथिंच्या सुविधेसाठी ऑलम्पिकच्या इतिहासात भारताने प्रथमच ‘इंडिया हाऊस’ या नावाने एका ऑलम्पिक आतिथ्यगृहाची स्थापना करण्याची घोषणा केली आहे.

▪️आस्थापनेबद्दल

- आरिआके या ठिकाणी उघडण्यात येणाऱ्या इंडिया हाऊसच्या जवळ चार खेळांचे आयोजन स्थळसुद्धा होणार आहे.

- JSW ग्रुप या उद्योग समूहाच्या सहकार्याने भारतीय ऑलम्पिक संघ (IOA) ही सुविधा उभारणार आहे.

- ऑलम्पिकमध्ये भाग घेणार्‍या अनेक देशांचे स्वतःचे आतिथ्यगृह आहेत, पण एखाद्या देशाने आपला सांस्कृतिक वारसा प्रदर्शित करण्याची ही पहिली वेळ ठरणार आहे. यामध्ये भारतीय संस्कृती, कला, पाककृती आणि योग प्रदर्शन या बाबींचा समावेश असणार आहे.

- इंडिया हाऊसमध्ये भारतीय पाहुणचाराबरोबरच भारतीय संघाचे ऑलम्पिकमधले प्रदर्शन आणि भारतीय संघाचा अधिकृत पोशाख याचेही प्रदर्शन घडविले
जाणार. त्याचबरोबर ऑलम्पिक पदक विजेत्या खेळाडूंचा विशेष सन्मान देखील IOA करणार आहे.

- इंडिया हाऊसमध्ये भारतीय खेळाडूंबरोबरच सर्वसामान्य लोकसुद्धा या हाऊसमध्ये येऊ शकणार आहेत. सकाळच्या सत्रात सर्वसामान्यांसाठी हे हाऊस उघडे ठेवण्यात येणार आहे. यादरम्यान योग प्रदर्शनाबरोबरच देशाने विविध खेळात केलेल्या विक्रमांचेही प्रदर्शन केले जाणार आहे.

20 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे 14/10/2019


1.कोणाचा जन्मदिन ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो?

 बालकवी ठोंबरे

 कुसुमाग्रज

 राम गडकरी

 बालगंधर्व

उत्तर : कुसुमाग्रज

 2. सन 2014 ची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा कोणी जिंकली?

 श्रीलंका

 भारत

 ऑस्ट्रेलिया

 बांग्लादेश

उत्तर :श्रीलंका

 3. उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणास आहेत?

 राष्ट्रपती

 राज्यपाल

 अॅटर्नी जनरल

 सरन्यायाधिश

उत्तर :राष्ट्रपती

 4. घटनेच्या कितव्या कलमानुसार जम्मू आणि काश्मिरला खास दर्जा देण्यात आल आहे?

 360

 368

 369

 370

उत्तर :370

 5. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील सदस्यांची संख्या किती आहे?

 238

 250

 78

 288

उत्तर :78

 6. खालीलपैकी कोणाकडून लोकसभा सदस्यांना शपथ दिली जाते?

 पंतप्रधान

 भारताचे सरन्यायाधिश

 लोकसभा सभापती

 राष्ट्रपती

उत्तर :राष्ट्रपती

7. खालीलपैकी कोणती संस्था स्थानिक स्वराज्य संस्था नाही?

 नगरपालिका

 महानगरपालिका

 कटक मंडळ

 राज्य परिवहन महामंडळ

उत्तर :राज्य परिवहन महामंडळ

 8. गावात घडलेल्या गुन्ह्यासंबंधीची कागदपत्रे कोण तयार करतो?

 तलाठी

 कोतवाल

 ग्रामसेवक

 पोलिस पाटील

उत्तर :पोलिस पाटील

 9. महाराष्ट्राच्या पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते आहे?

 पोलीस महानिरीक्षक

 पोलीस महासंचालक

 पोलीस आयुक्त

 अपर पोलीस महासंचालक

उत्तर :पोलीस महासंचालक

 10. खालीलपैकी कोणास ‘स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक’ असे म्हटले जाते?

 लॉर्ड रिपन

 लॉर्ड लिटन

 लॉर्ड डफरीन

 लॉर्ड कर्झन

उत्तर :लॉर्ड रिपन

 11. ‘संवादकौमुदी’ या पाक्षिकातुन सतीच्या अनिष्ट रूढीविरुद्ध लिखाण कोणी केले?

 राजा राममोहन रॉय

 महात्मा ज्योतीबा फुले

 ईश्वरचंद्र विद्यासागर

 स्वामी दयानंद सरस्वती

उत्तर :राजा राममोहन रॉय

 12. मंडालेच्या तुरुंगात असतांना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला?

 आर्टिक होम इन दी वेदाज

 गीतारहस्य

 ओरायन

 प्रतियोगीता सहकार

उत्तर :गीतारहस्य

 13. खालीलपैकी कोणता मुगल सम्राट शेवटचा आहे?

 अकबर

 बाबर

 जहांगीर

 औरंगजेब

उत्तर :औरंगजेब

 14. एका संख्येमध्ये त्या संख्येच्या 1/5 मिळविल्यानंतर मूळ सख्या व येणारी संख्या यांचे गुणोत्तर प्रमाण किती राहील?

 6:5

 1:2

 5:2

 5:6

उत्तर :5:6

 15. अशी संख्या सांगा जिच्यामध्ये 19 वेळा बेरीज मिळवली असता येणारी संख्या 420 राहील?

 19

 20

 21

 15

उत्तर :21

 16. एक घर 2250 रु. विकल्यामुळे एका व्यक्तीस 10% तोटा सहन करावा लागला. त्यात 8% नफा मिळविण्यासाठी घर कितीला विकावे लागेल?

 2700 रु.

 2500 रु.

 2000 रु.

 यापैकी नाही

उत्तर :2700 रु.

 17. मधुने इंग्रजीत 60 पैकी 42, गणितात 75 पैकी 57, मराठीत 80 पैकी 56 आणि शास्त्रात 50 पैकी 32 गुण मिळविले तर तिचा कोणता विषय सर्वात चांगला आहे.

 इंग्रजी

 गणित

 शास्त्र

 मराठी

उत्तर :गणित

 18. 38 मुलींच्या वर्गात 6 मुली गैरहजर होत्या, उरलेल्या पैकी 12.50 टक्के मुली गृहकार्य करण्यास विसरल्या तर किती मुलींनी गृहकार्य केले?

 28

 24

 32

 36

उत्तर :28

 19. 2000 रु. द.सा.द.शे. 10% दराने 3 वर्षाचे सरळव्याज व चक्रवाढव्याज यांच्यातील फरक किती?

 50 रु.

 67 रु.

 62 रु.

 57 रु.

उत्तर :62 रु.

 20. 21 मीटर त्रिजेच्या वर्तुळावर मैदानात 5 फेर्‍या मारल्यास एकूण किती अंतर तोडले जाईल?

 210 मी.

 132 मी.

 660 मी.

 105 मी.

उत्तर :660 मी.

चालू घडामोडी प्रश्नसंच 14/18/2019


📌कोणते राज्य सरकार राज्यामधील मुलींच्या सक्षमीकरणासाठी कन्याश्री विद्यापीठाची स्थापना करणार आहे?

(A) केरळ
(B) पश्चिम बंगाल✅✅✅
(C) ओडिशा
(D) आसाम

📌कोणत्या ठिकाणी दीनदयाल अंत्योदय योजनेच्या अंतर्गत ‘SARAS आजिविका मेला’ आयोजित केले गेले आहे?

(A) सूरजकुंड, हरियाणा
(B) इंडिया गेट लॉन, दिल्ली✅✅✅
(C) रामलीला मैदान, दिल्ली
(D) काला घोडा परिसर, मुंबई

📌अंतराळातल्या उपग्रहांना सेवा देण्यासाठी प्रथमच कोणते अंतराळयान प्रक्षेपित करण्यात आले?

(A) ISA-1
(B) MEV-1✅✅✅
(C) Miraj VI
(D) MES-1

📌कोणत्या राज्यात भारताचे पहिले-वहिले ‘गारबेज कॅफे’ उघडले गेले?

(A) मध्यप्रदेश
(B) उत्तरप्रदेश
(C) छत्तीसगड✅✅✅
(D) आंध्रप्रदेश

📌कोणत्या खेळाडूने 59व्या राष्ट्रीय खुल्या क्रिडा स्पर्धेत महिलांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले?

(A) अन्नू राणी✅✅✅
(B) शर्मिला कुमारी
(C) प्रिती सिंग
(D) अंजू राणी

📌‘न्यू वर्ल्ड हेल्थ’ अहवालानुसार मुंबई जगातले  सर्वात श्रीमंत शहर आहे.

(A) 25 वे
(B) 22 वे
(C) 12 वे✅✅✅
(D) 18 वे

📌शांती आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी अबी अहमद अली ह्यांना शांतीसाठीचा 100 वा नोबेल पुरस्कार देण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली. ते  या देशाचे पंतप्रधान आहेत.

(A) सोमालिया
(B) इथिओपिया✅✅✅
(C) केनिया
(D) दक्षिण सुदान

कोमोरोस देशाला 20 दशलक्ष डॉलरची LoC वाढवून देण्याची घोषणा

उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू ह्यांनी 11 ऑक्टोबर 2019 रोजी कोमोरोस देशाला भेट दिली. संरक्षण आणि सागरी सहकार्य क्षेत्रात दोन्ही देशातले द्वैपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी भारताने कोमोरोसला 20 दशलक्ष डॉलर एवढी पत मर्यादा (लाइन ऑफ क्रेडिट) वाढवून देण्याची घोषणा केली.

कोमोरोस देशाचे राष्ट्रपती अझाली असौमनी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर ही घोषणा करण्यात आली.

अन्य ठळक बाबी

✍दोन्ही देशात संरक्षण सहकार्य, शिक्षण, आरोग्य आणि संस्कृती या क्षेत्रांमध्ये विविध क्षेत्रात सहा करार झाले आहेत. एका करारानुसार भारत कोमोरोसला 2 दशलक्ष डॉलरची पतमर्यादा (LoC) देणार.

✍यावेळी उपराष्ट्रपतींना कोमोरोसचा “द ऑर्डर ऑफ ग्रीन क्रीसेंट” नावाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.

✍राजधानी मोरोनी येथे 18 मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी भारताने 41.6 दशलक्ष डॉलरची मदत केली आहे.

✍आंतरराष्ट्रीय सौर युती कार्याचौकट करारावर (International Solar Alliance Framework Agreement) स्वाक्षरी करण्याचा कोमोरोसने निर्णय घेतला आहे.

कोमोरोस देश

कोमोरोस हा हिंद महासागरातला आफ्रिकेच्या पूर्व किनार्‍याजवळचा एक द्वीप-देश आहे. कोमोरोस आफ्रिका खंडातला तिसरा सर्वांत छोटा देश आहे. मोरोनी ही देशाची राजधानी आहे. कोमोरियन, फ्रेंच, अरबी या देशाच्या अधिकृत भाषा आहेत. कोमोरियन फ्रँक हे राष्ट्रीय चलन आहे.

विज्ञान प्रश्नसंच 14/10/2019

1) वॉटर हिटरचे कुंतल (Coil) कशापासून बनवितात.

   1) तांबे      2) लोखंड    3) शिसे      4) टंगस्टन

उत्तर :- 1

2) ज्या संयुगांचे घटक गुणधर्म व संयुग गुणधर्म सारखे नसतात अशा संयुगांना ..................... असे म्हणतात.

   1) सहसंयुज संयुग  2) आयनिक संयुग    3) वरील दोन्ही    4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 2

3) अयोग्य जोडी ओळखा.

   अ) मत्स्य    -  शीत रक्ताचे प्राणी
   ब) उभयचर    -  शीत रक्ताचे प्राणी
   क) सरीसृप    -  शीत रक्ताचे प्राणी
   ड) पक्षी    -  उष्ण रक्ताचे प्राणी
   इ) सस्तन प्राणी    -  उष्ण रक्ताचे प्राणी

   1) यापैकी नाही    2) अ, ब, ड, इ    3) अ, क, ड, इ    4) अ, ब, क, इ

उत्तर :- 1

4) उष्मागतिकीच्या दुस-या नियमाचे सूत्र कोणते ?

   1) dQ = Tds    2) ds = Tdq    3) Tdu = dq    4) यापैकी नाही

उत्तर :- 1

5) आयनिक संयुगात घटक मूलद्रव्याचे गुणधर्म सारखे नसतात कारण की ................

   1) या संयुगात भिन्न मूलद्रव्य एकत्र येतात.
   2) या संयुगात सारखे मूलद्रव्य एकत्र येतात.
   3) यामध्ये सारखे संयुग एकत्र येतात.
   4) एकही कारण योग्य नाही.

उत्तर :- 1

भूगोल प्रश्नसंच 14/10/2019

1) भूपृष्ठाकडे येणा-या सौर ऊर्जेपैकी किती टक्के ऊर्जा ढगांमुळे परावर्तीत होते ?
   1) 27%    2) 34%      3) 51%      4) 17%
उत्तर :- 1

2) अटलांटिक व पॅसिफिक महासागरांप्रमाणे हिंदी महासागरातील सागरी प्रवाहचक्र नियमितपणे व अखंड गतीने कार्यरत राहात
     नाही, कारण :
   1) 25 अंश उत्तर अक्षवृत्तापलीकडे भुभाग भूखंडाने व्यापलेला आहे.
   2) प्रचलित वा-यांचा समुद्रप्रवाहाच्या दिशेवर परिणाम होतो.
   3) हिंदी महासागरावर ऋतुमानानुसार मोसमी वा-यांची दिशा बदलते.
   4) वरील सर्व
उत्तर :- 4

3) खालील विधाने पहा :
   अ) फिलीपाइन्सच्या किना-यावरील वादळांना टायफून्स म्हणतात.
   ब) व्हिक्टर, कतरीना ही हरीकेन-चक्री वादळाची नावे आहेत.
   क) युएसएच्या फ्लॉरिडा किना-याजवळ निर्माण होणा-या वादळांना टोरनॅडो म्हणतात.
   1) फक्त विधान अ बरोबर आहे.    2) विधाने अ आणि ब बरोबर आहेत.
   3) विधाने ब आणि क बरोबर आहेत.  4) विधाने अ, ब आणि क बरोबर आहेत.
उत्तर :- 4

4) .............. च्या परिणामने इलेक्ट्रोमॅग्नेटिक उत्सजर्नाचे विखरणे वातावरण करत असते.
   1) उत्सर्जनाचा वेग    2) त्याची वारंवारिता
   3) त्याची तीव्रता    4) वरील सर्व
उत्तर :- 4

5) महाराष्ट्र राज्य हे एकूण 9 कृषि हवामान विभागांमध्ये .................. च्या आधारावर विभागलेले आहे.
   1) पर्जन्य, तापमान, मृदा प्रकार व वनस्पती      2) पर्जन्य, तापमान व वनस्पती
  3) पर्जन्य, मृदा प्रकार व वनस्पती        4) पर्जन्य, तापमान व मृदा प्रकार
उत्तर :- 3

जीएसटी महसूल वाढविण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी सरकारने समिती नेमली.

🔷 वस्तू व सेवा कराचा महसूल वाढविण्यासाठी उपाय सुचविण्यासाठी सरकारने अधिका of्यांची एक समिती गठीत केली आहे.

🔷राज्यस्तरीय जीएसटी आयुक्त आणि केंद्र सरकारच्या अधिका comp्यांचा समावेश असलेल्या पॅनेलला कर महसूलतील घट रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना सुचवा आणि महसूल वसुली सुधारण्यासाठी कोणती पावले उचलली जावीत यासाठी सुचवण्यास सांगितले आहे.

🔷अर्थ मंत्रालयाने एका आदेशात म्हटले आहे की समितीला विस्तृत सुधारणांचा विचार करण्यास सांगितले गेले जेणेकरून सूचनांची विस्तृत यादी पुढे येऊ शकेल.

🔷जीएसटीमधील प्रणालीगत बदलांचा विचार करण्यास पॅनेलला सांगण्यात आले आहे ज्यांचा गैरवापर रोखण्यासाठी धनादेश व शिल्लक आवश्यक आहेत, ऐच्छिक अनुपालन सुधारण्याचे उपाय तसेच धोरणात्मक उपाय आणि कायद्यातील बदल.

🔷या पॅनेलमध्ये महाराष्ट्र, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि पंजाबचे जीएसटी आयुक्त तसेच केंद्र सरकारचे अधिकारी, जीएसटीचे प्रधान आयुक्त आणि सहसचिव (महसूल) यांचा समावेश आहे.

🔷सप्टेंबरमध्ये जीएसटी संकलनात ही चाल आहे…

पोलीस भरती परीक्षासाठी महत्वाची माहिती

                  
1】महाराष्ट्राची पर्यटन राजधानी .
~औरंगाबाद .

2】पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा .
~सिंधुदुर्ग

3】आदिवासी जिल्हा .
~नंदुरबार .

4】पहिला पर्यटन जिल्हा .
~सिंधुदुर्ग .

5】तलावांचा जिल्हा .
~गोंदिया.

6】क्रीडानगरी .
~पुणे

7】विद्येचे माहेरघर [आयटी हब ].
~पुणे .

8】मराठवाड्याचे हृदय .
~औरंगाबाद.

9】 महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी .
~कोयना नदी .

10】जलक्षेत्राच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रकल्प .
~नाथ सागर (पैठण).

11】भारतातील पहिले पुस्तकाचे गाव
~भिलार ( जिल्हा सातारा)[ 1 मे 2017 पासून ब्रीद वाक्य : "आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने".]

12】 सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प .
~कोयना प्रकल्प .

13】 सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प .
~जायकवाडी.

14】 राज्यातील पहिला साखर कारखाना (1919 ).
~बेलापूर शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज हरेगाव (जिल्हा अहमदनगर).

15】 सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा .
~अहमदनगर( आता 2018 मध्ये सोलापूर मध्ये सर्वाधिक साखर कारखाने आहेत).

16】 सर्वात मोठा साखर कारखाना .
~वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना सांगली.

17】 राज्यातील पहिला सहकारी साखर कारखाना (1948). ~विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना लोणी-बुद्रुक प्रवरानगर( जिल्हा अहमदनगर)

18】राज्यातील पहिला पवन विद्युत प्रकल्प.
~ जमसंडे -देवगड (सिंधुडूर्ग) .

19】आशियातील सर्वात जास्त क्षमतेचा (545 मेगावॅट) पवन ऊर्जा प्रकल्प.
~ ब्राह्मणवेल धूळे.

20】राज्यातील पहिले पक्षी अभयारण्य .
~कर्नाळा (रायगड).

21】सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध शहर .
~नाशिक.

22】 दक्षिणेची काशी .
~पैठण .

23】दक्षिणेची गंगा.
~ गोदावरी नदी

24】राज्यातील एकमेव व शिवछत्रपती मंदिर .
~सिंधुदुर्ग किल्ला

25】 सात बेटावर वसलेले शहर .
~मुंबई .

26】देशातील पहिले मातीचे धरण .
~गंगापूर (नाशिक ).

27】विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना .
~जिजामाता सहकारी साखर कारखाना दुसरबीड (बुलढाणा).

28】स्वतंत्र जल धोरण स्वीकारणारे देशातील  पहिले राज्य .
~महाराष्ट्र .

29】मराठवाड्यातील आठवा [8 वा]जिल्हा .
~हिंगोली (1999).

30】 मधुमक्षिका पालन केंद्र.
~ महाबळेश्वर .

31】कापसाची महत्त्वाची बाजारपेठ .
~अमरावती .

32】भारताची आर्थिक राजधानी .
~मुंबई .

33】अतिपूर्वेकडील आदिवासी जमात .
~माडिया -गोंड .

34】संतांची भूमी .
~गोदावरी नदीचे खोरे .

35】राज्यातील सर्वात मोठा रेल्वेचा बोगदा (देशातील दुसऱ्या क्रमांकावर ).
~कोकण रेल्वे मार्गावर कुरबुडे येथे रत्नागिरी .

36】संपूर्ण जिल्ह्यात  इ-फेरफार सुरु करणारा राज्यातील पहिला जिल्हा .
~अकोला .

37】देशातील पहिले स्वयंचलित हवामान केंद्र .
~डोंगरगाव (नागपूर 5 मे 2017 ).

38】राज्यातील पहिले शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल (मेडिकल हब ).
~जळगाव येथे नियोजित .

39】महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल .
~श्री .प्रकाश .

40】महाराष्ट्र विधानसभेचे पहिले सभापती .
~सयाजी लक्ष्मण सिलम.

41】 महाराष्ट्र विधान परिषदेचे पहिले सभापती.
~ भोगीलाल धीरजलाल लाला.

42】 मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय न्यायाधीश .
~नानाभाई हरिदास .

43】राज्यातील पहिला मेगा टेक्स्टाईल पार्क.
~ नांदगाव पेठ (अमरावती ).

44】राज्यातील पहिले मेगा फूड पार्क (1 मार्च 2018)
~ देगाव (सातारा) .

45】महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना.
~शिरपूर (जिल्हा धुळे)

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘पिवळी गाय दूध देते’ या वाक्यातील उद्देश्य ओळखा.

   1) गाय      2) पिवळी    3) दूध      4) देते

उत्तर :- 1

2) प्रयोग ओळखा – “तो बैल बांधतो” हे या प्रयोगातील वाक्य होय.

   1) कर्तरी प्रयोग    2) भावे प्रयोग    3) कर्मणी प्रयोग    4) संकीर्ण प्रयोग
उत्तर :- 1

3) वैकल्पिक व्दंव्द समासाचे उदाहरण ओळखा.

   1) मीठभाकर    2) गजानन    3) पापपुण्य    4) यापैकी कोणताच पर्याय नाही

उत्तर :- 3

4) यातील कोणते विरामचिन्ह अपसारण चिन्ह आहे ?

   1) .      2)  ?      3) “     “      4) –

उत्तर :- 4

5) ‘उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन आले असता ............... अलंकार होतो.’

   1) व्यतिरेक    2) अपन्हुती    3) अनन्वय    4) श्लेष

उत्तर :- 1

6) खालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे ?

   1) तंबाखू    2) किल्ली    3) दादर      4) हापूस

उत्तर :- 2

7) शब्द उच्चारल्याबरोबर विशिष्ट वस्तू-पदार्थ डोळयासमोर येतो. ही ती शब्दशक्ती म्हणजे –

   1) लक्षणा    2) व्यंजना    3) निरूढा    4) अभिधा

उत्तर :- 4

8) ‘पती’ या शब्दाच्या समानार्थी शब्द पुढील पर्यायातून निवडा :

   1) प्रियकर    2) भ्रतार      3) जिवलग    4) सखा

उत्तर :- 2

9) ‘फिकट’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा.

   1) फुकट    2) बिकट      3) गडद      4) चिक

उत्तर :- 3

10) ‘ज्याच्या अंगी सामर्थ्य आहे तो इतरांवर अंमल गाजवतो’ – या आशयासाठी पुढील कोणती म्हण योग्य आहे ?

   1) पाचामुखी परमेश्वर      2) गाव करील ते राव काय करील
   3) दिव्या खाली अंधार      4) बळी तो कान पिळी

उत्तर :- 4

जपानला 'हगिबीस' चक्रीवादळाचा तडाखा,

◾️ टोकियो : मागील 60 वर्षांमधील सर्वात शक्तीशाली चक्रीवादळाने जपानची राजधानी टोकियोच्या समुद्रकिनाऱ्यावर धडक दिली आहे. वादळादरम्यान टोकियो आणि आसपासच्या परिसरात झालेला जोरदार पाऊस आणि तुफान वाऱ्यामुळे जपानला अक्षरश: झोडपून काढलं आहे. या चक्रीवादळामध्ये आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत, तर 17 जण बेपत्ता आहेत. जपानी सरकारने आतापर्यंत एक लाख लोकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर केलं आहे.

👉फिलिपिन्स या देशात या चक्रीवादळाला 'हगिबीस' असे नाव दिले आहे. तिथल्या स्थानिक भाषेत 'हगिबीस'चा अर्थ वादळी वारे असा आहे. गेल्या सहा दशकांमध्ये असे चक्रीवादळ आले नव्हते. 1958 साली अशा चक्रीवादळाने जपानमध्ये थैमान घातले होते. त्यावेळी तब्बल 1200 हून अधिक लोकांना त्यांचे प्राण गमवावे लागले होते. तर हजारो लोकांना बेघर व्हावं लागलं होतं. 'हगिबीस' वादळादरम्यान वारे तब्बल 216 किमी प्रति तास इतक्या वेगाने वाहत होते. त्यामुळे रस्त्यांवरील मोठी वाहनेदेखील दूरवर फेकली गेली. वादळाने टोकियोमध्ये हाहःकार उडवला आहे.

टोकियोमधल्या हवामान विभागाने 'हगिबिस' वादळाची पूर्वसूचना दिली होती. त्यामुळे सरकारने नागरिकांचे स्थलांतर सुरु केले. तसेच नागरिकांनी पाणी आणि अन्नाचा साठा करून ठेवला होता. त्यामुळे मोठी हानी टळली. दरम्यान वादळाची भिती अद्याप टळलेली नाही. टोकियो, गनामा, सैटामा, कानागावा, फुकुशिमा शहरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान शिझुओका भागाला 5.3 रिष्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला.

'आपण याआधी कधीच पाहिला नसेल, असा मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी तयार रहा, तसेच सुखरुप राहण्यासाठी खबरदारी घ्या, असा इशारा स्थानिक हवामान विभागाने दिला आहे.

हवामान विभागाने सांगितले आहे की, हगिबीसमुळे जपानमधील अनेक नद्यांना पूर येऊ शकतात, समुद्रकिनाऱ्यांना सर्वाधिक धोका आहे. तसेच अनेक ठिकाणी भूस्खलनाची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टीवर राहणाऱ्या लाखो लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

उपाययोजना म्हणून जपानी सरकारने विमानसेवा बंद ठेवली आहे. दोन हजार विमान उड्डाणे रद्द केली आहेत. तसेच रेल्वेसेवादेखील बंद ठेवण्यात आली आहे. चित्रपटगृह, शॉपिंग मॉल्स, कारखाने, शाळा, महाविद्यालये बंद ठेवली आहेत. तसेच लोकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...