१३ ऑक्टोबर २०१९

गंगा नदीतल्या डॉल्फिन मास्यांच्या वार्षिक गणनेस प्रारंभ

- उत्तरप्रदेश वनविभागाच्या सहकार्याने ‘वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर-इंडिया’ (WWF-India) या संस्थेच्या वतीने गंगा नदीतल्या डॉल्फिन मास्यांच्या वार्षिक गणनेचा कार्यक्रम राबविण्यास बिजनौरमध्ये प्रारंभ केला गेला आहे.

- ही गणना हस्तिनापूर वन्यजीवन अभयारण्य आणि नरोरा रामसार स्थळाच्या दरम्यान गंगा नदीच्या वरच्या पात्रात सुमारे 250 किलोमीटर लांबीच्या पात्रात केली जाणार आहे.

▪️ अन्य ठळक बाबी

-गंगा नदीतल्या डॉल्फिन मास्यांची सध्या एकूण संख्या 2500 ते 3000 याच्यादरम्यान आहे, त्यातले 80 टक्क्यांहून अधिक गंगा व त्याच्या उपनद्यात वास्तव्यास आहेत.

- या कार्यक्रमाचा भाग म्हणून राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) याच्यावतीने 12 ऑक्टोबर 2019 रोजी 2030 सालापर्यंत डॉल्फिनची संख्या वाढविण्याच्या उद्देशाने योजना तयार करण्यासाठी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

- ऑक्टोबर 2009 मध्ये भारत सरकारने गंगा नदीतल्या डॉल्फिनला 'राष्ट्रीय जलचर प्राणी' घोषित केले होते.

▪️डॉल्फिन मासा

- हा एक सस्तन प्राणी आहे. डॉल्फिनाचा समावेश अपरास्तनी उपवर्गाच्या सीटॅसिया गणात करण्यात येतो. या गणात व्हेल, शिंशुक (पॉरपॉईज) यांचाही समावेश करतात. सीटॅसिया गणात असलेल्या डेल्फिनिडी कुलामध्ये डॉल्फिनाच्या 17 प्रजाती आणि 40 जाती आहेत. भारताच्या पश्चिम किनाऱ्यालगत सागरात आढळणाऱ्या डॉल्फिनाचे शास्त्रीय नाव ‘टर्सिओप्स ट्रंकेटस’ आहे. स्थानिक मराठी भाषेत याला बुलुंग व मामा असेही म्हणतात. समुद्रकिनाऱ्यालगतच्या उथळ पाण्यात ते आढळतात. मायोसीन कालखंडात (सुमारे 1 कोटी वर्षांपूर्वी) ते उत्क्रांत झाले असावेत, असे मानतात. डॉल्फिन पाण्यात तसेच पाण्याबाहेर राहू शकतो. त्यांची श्रवणेंद्रिये तीक्ष्ण असतात. मनुष्याला ज्या कंप्रतेचा ध्वनी ऐकू येतो त्याहून दहापट कंप्रतेचा ध्वनी त्याला ऐकू येतो.

- गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा, बियास व सतलज या नद्यांमध्ये गोड्या पाण्यातले डॉल्फिन सापडतात. प्लॅटिनिस्टा गँजेटिका आणि प्लॅटिनिस्टा गँजेटिका मायनर या त्यांच्या गोड्या पाण्यातल्या जाती आहेत. शरीरशास्त्रीय दृष्ट्या गंगा नदीतले डॉल्फिन अंध आहेत कारण त्यांच्या डोळ्यात नेत्रभिंग नसते. त्यांना प्रकाशाची दिशा आणि तीव्रतेचे ज्ञान होत असते. हालचाल व शिकारीसाठी ते फक्त प्रतिध्वनी स्थान निर्धारण तंत्राचा वापर करतात. नद्यांवर बांध आणि धरणे यांमुळे ते विखुरले गेले आहेत. डॉल्फिनाच्या संरक्षणासाठी भारत सरकारने चंबळ जल अभयारण्य स्थापन केले आहे.
🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘

महत्त्वाचे प्रश्नसंच

1. काथ ................ या वृक्षापासून बनवितात.
1) साल
2) देवदार
3) हलदू
4) खैर  ✅✅✅

2. गुरुशिखर हे ................ पर्वतातील उंच शिखर आहे. -
1) विंध्य
2) सातपुडा
3) अरवली ✅✅✅
4) हिमालय

3. विषुववृत्तीय पट्ट्यातील तापमान कसे असते?
1) वर्षभर कोरडे व उष्ण ✅✅✅
2) पावसाळ्यात दमट व उष्ण
3) वर्षभर उष्ण व दमट
3) हिवाळ्यात दमट व थंड

4. भारताला सर्वाधिक लांबीची सीमा कोणत्या देशाची लागली आहे?
1) पाकिस्तान 
2) चीन
3) बांगला देश ✅✅✅
4) नेपाळ

5. नॅरोगेज या मार्गातील दोन रुळातील अंतर किती से.मी. असते?
1) ६७६ 
2) ७७६ ✅✅✅
3) ५७६
4) ८७६

6. महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता?
1) भंडारा
2) अहमदनगर ✅✅✅
3) कोल्हापूर
4) पुणे

7. मँगनीजाच्या उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते?
1) बिहार
2) झारखंड
3) मध्यप्रदेश
4) छत्तीसगढ ✅✅✅

8.  पेट्रो- रसायन उद्यागाचे कोणते केंद्र आहे.
1) पुणे
2) वडोदरा ✅✅✅
3) ठाणे
4) नेपानगर

9. वनस्पतीच्या अपूर्णावस्थेतील कुजण्याच्या प्रक्रियेस ………… म्हणतात.
1) नत्रयुक्त चक्र
2) हयुमस ✅✅✅
3) पर्यावरण
4) प्रदूषण

10. भूमध्य सामुद्रिक हवामानाच्या प्रदेशात कोणत्या प्रकारची वनस्पती आढळते?
1) साग, आंबा, चिंच, ओक, लार्च 
2) सदाहरित, ओक, ऑलिव्ह, संत्री, द्राक्षे  ✅✅✅
3) नारळ, सुपारी, साग, अक्रोड
4) देवदार, पाइन, स्प्रूस, फर

1)  भारतरत्न मिळवणारी पहिली महिला?
लता मंगेशकर
इंदिरा गांधी 👈
सुब्वालक्ष्मी
लक्ष्मी सहल

2)  WHOकशाशी संबंधित आहे ?
जागतिक आरोग्य संघटना 👈 जागतिक पर्यटन सेवा  जागतिक मानवी संघटना जागतिक शांतता संघटना

3) घटना समितीचे अध्यक्ष कोण?
डॉक्टर राजेंद्र प्रसाद👈
पंडित नेहरू
सरदार पटेल
डॉ बाबासाहेब आंबेडकर

4) विदेशातून पदवी घेणारे  पहिली महिला डॉक्टर कोण?
डॉक्टर आनंदीबाई जोशी👈 डॉक्टर कादम्बिनी गांगुली
डॉक्टर सारिका भोयर
डॉक्टर स्वरूपा बाई

5) कोणत्या पुरस्काराला आशियाई नोबेल म्हणून नोबेल म्हणून संबोधतात? साहित्य अकादेमी
रमन मगसेसे 👈
भारतरत्न
नोबेल पुरस्कार

6) घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण?
के कृष्णमचारी
डॉक्टर राज राधाकृष्णन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर👈
राजेंद्र प्रसाद

7) महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता?
सिंधुदुर्ग 👈
हिंगोली
नंदुरबार
गडचिरोली

8) बासरी वादन कोणाला मानाचा दर्जा दिला जातो? पंडित रविशंकर
पंडित जितेंद्र अभिषेकी पंडित हरिप्रसाद चौरसिया👈 पंडित शिवकुमार शर्मा

9) रजाकार ही संघटना कोणत्या संस्थांशी संबंधित आहे?
जुनागड
छत्तीसगड
काश्मीर
हैदराबाद👈

10) भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण?
सरोजिनी नायडू
  इंदिरा  गांधी
सुलोचना कृपलानी👈
यापैकी नाही

11) सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता?
पद्मश्री
पद्मभूषण
पद्मविभूषण
भारतरत्न👈

12) अमेरिकेतील गदर पक्षाचे संस्थापक कोण?
वि.दा. सावरकर
लाला हरदयाल 👈
स्वामी विवेकानंद
पंडित काशीराम

13) राष्ट्रीय सभेच्या पहिली महिला अध्यक्ष कोण?
डॉक्टर ॲनी बेझंट👈
सरोजिनी नायडू
कमलादेवी
सरिता देवी

14) हरिवंश राय बच्चन यांची गाजलेली साहित्यकृती कोणती?
साहित्यरत्नवली
पाठशाला
माझे सत्याचे प्रयोग
मधूशाळा👈

15) भारतीय प्रमाणात संस्था खालीलपैकी कुठे आहे?
कोल्हापूर
मुंबई
नागपूर
दिल्ली 👈


रोहिणी हट्टंगडी यांना विष्णुदास भावे गौरव पदक

- अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्यावतीने यंदाचे विष्णुदास भावे गौरव पदक ज्येष्ठ अभिनेत्री व नाटककार रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर झाले. रंगभूमीदिनी पाच नोव्हेंबरला नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्याहस्ते या 54 व्या पुरस्काराचे वितरण होईल.

- समितीचे अध्यक्ष शरद कराळे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. ते म्हणाले, "नाट्य विद्यामंदिर समितीतर्फे प्रतिवर्षी रंगभूमीदिनी रंगभूमीची प्रदीर्घ सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारास विष्णुदास भावे गौरव पदक देऊन सन्मानित केले जाते. यंदाच्या वर्षी रंगभूमी, चित्रपट, मालिकांमध्ये अनेक वर्षे काम करणाऱ्या अभिनेत्री, ज्येष्ठ नाटककार रोहिणी हट्टंगडी यांना भावे गौरव पदक देण्याचे कार्यकारिणी समितीने एकमताने ठरवले आहे. भावे गौरव पदक, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि रोख पंचवीस हजार रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पाच नोव्हेंबरला रंगभूमीदिनी सायंकाळी 5 वाजता नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्याहस्ते पुरस्काराचे वितरण होईल.''

- ते पुढे म्हणाले, "रोहिणी हट्टंगडी यांच्या वडीलांचे नाव अनंत मोरेश्‍वर ओक तर आईचे निर्मला आहे. पुण्यात भावे स्कुलपासून त्यांच्या अभिनयाचीसुरवात झाली. 1971 मध्ये दिल्लीच्या नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामध्ये अभिनयासाठी त्यांची निवड झाली. तीन वर्षात अनेक भाषांतील नाटकामध्ये कामे केली.

- रिचर्ड स्टॅनबरी निर्मित "गांधी' चित्रपटातील कस्तुरबा च्या भूमिकेतून त्या आंतरराष्ट्रीय चित्रपट जगतात पोहोचल्या. अनेक नाटकातून आणि चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या. सहा तेलगू चित्रपटही केले. हिंदी-मराठी दूरदर्शन मालिकामध्येही त्या दिसतात. हट्टंगडी दांपत्याने "कलाश्रय' ही नाट्याभ्यास करणारी व प्रयोगशीलतेला प्रोत्साहन देणारी संस्था स्थापन केली आहे. फिल्मफेअरसह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.'' समितीचे उपाध्यक्ष विनायक केळकर, कार्यवाह ऍड. विनायक ताम्हनकर, कोषाध्यक्ष मेधाताई केळकर, सदस्य जगदीश कराळे, बलदेव गवळी, विलास गुप्ते
आदी उपस्थित होते.

‘जी-20 ग्लोबल स्मार्ट सिटीज अलायन्स’ यामध्ये भारताचा समावेश

‘जी-20 ग्लोबल स्मार्ट सिटीज अलायन्स’ यामध्ये भारत सामील झाला आहे. स्मार्ट शहरे तंत्रज्ञानाचा जबाबदारीने व नैतिक वापर करण्याच्या दिशेने कार्य करणार्‍या जगातल्या अग्रगण्य शहरांच्या जाळ्यातल्या 15 सदस्यांना सामील झाला आहे.

- जागतिक आर्थिक मंचाचा (WEF) ‘जी-20 ग्लोबल स्मार्ट सिटीज अलायन्स ऑन टेक्नॉलॉजी गव्हर्नन्स’ हा समूह सार्वजनिक जागांवर जोडल्या गेलेल्या उपकरणांच्या वापरासाठी जागतिक मानदंड आणि धोरणांचे मानक तयार करणार आहे.

- स्मार्ट सिटी तंत्रज्ञान रहदारी कमी करण्यास, गुन्हेगारीशी लढा देण्यास, नैसर्गिक आपत्तींशी जुळवून घेण्यासाठी आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यास मदत करते. मात्र योग्य काळजी न घेतल्यास हे तंत्रज्ञान विशेषत: गोपनीयता आणि सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण धोका ठरते.

📌युतीचा इतिहास

- जून 2019 मध्ये जपानच्या ओसाका शहरात जी-20 शिखर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने या युतीची स्थापना करण्यात आली. युतीमध्ये जगातल्या अग्रगण्य शहरांचे जाळे आणि तंत्रज्ञान प्रशासन संघटनांमधील 15 सदस्य आहेत. जागतिक आर्थिक मंच युतीचे सचिवालय म्हणून काम करते.

- ग्लोबल स्मार्ट सिटीज अलायन्सच्या संस्थात्मक भागीदारांमध्ये सन 2019 आणि सन 2020 मध्ये जी-20 समूहाच्या राष्ट्रांचा समावेश आहे, ज्यामध्ये जापान, सौदी अरब; भारताचे स्मार्ट सिटी मिशन; सिटीज फॉर ऑल; सिटीज टुडे इंस्टीट्यूट; कॉमनवेल्थ लोकल गव्हर्नमेंट फोरम; कॉमनवेल्थ सस्टेनेबल सिटीज नेटवर्क; कनेक्टेड प्लेसेस कॅटापूल्ट; डिजिटल फ्यूचर सोसायटी; ICLEI – लोकल गव्हर्नमेंट फॉर सस्टेनेबिलिटी; इंटरनॅशनल टेलीकम्यूनीकेशन यूनियन; ओपन अँड एगाईल स्मार्ट सिटीज; स्मार्ट सिटी एक्सपो वर्ल्ड कॉंग्रेस; यूनायटेड सिटीज अँड लोकल गव्हर्नमेंट; व्हॉट वर्क्स सिटीज; वर्ल्ड इकनॉमिक फोरम; आणि वर्ल्ड एनेबल यांचा समावेश आहे.

- भागीदार 2 लक्षाहून अधिक शहरे आणि स्थानिक सरकार, आघाडीच्या कंपन्या, स्टार्टअप उद्योग, संशोधन संस्था आणि नागरी संस्था यांचे प्रतिनिधित्व करतात.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) पुढील शब्दाचे अनेकवचनी रुप ओळखा. – आज्ञा

   1) आज्ञे    2) आज्ञा     
   3) आज्ञी    4) आज्ञाने

उत्तर :- 2

2) ‘देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ?

   1) प्रथमा    2) व्दितीया   
   3) तृतीया    4) सप्तमी

उत्तर :- 3

3) ‘कोणीही गडबड करू नका’ हे वाक्य होकारार्थी करा.

   1) शांत बसणारे गडबड करीत नाहीत  
2) गडबड करणारे शांत बसतात

   3) काय ही गडबड !        4) सर्वांनी शांत बसा

उत्तर :- 4

4) ‘पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात’ या वाक्यातील अधोरेखित शब्द .................. चे काम करतात.

   1) उद्देश्यविस्तार  2) उद्देश्य     
   3) क्रियापद    4) विशेषण

उत्तर :- 1

5) खालील वाक्यातील ‘प्रयोग’ ओळखा.

– आईने मधुराला बोलावले.

   1) कर्तरीप्रयोग    2) भावे प्रयोग   
   3) कर्मणीप्रयोग    4) संकीर्ण प्रयोग

उत्तर :- 2

6) ‘विजयनगरच्या साम्राज्याचा जेथे अंत झाला.’ या वाक्यातील उद्देश्य कोणते?

   1) जेथे      2) अंत     
   3) झाला    4) विजयनगरच्या साम्राज्याचा

उत्तर :- 2

7) खालील वाक्याचा प्रयोग सांगा. ‘पारिजातकाची योजना करणारा कवी खरोखरच कल्पक असला पाहिजे.’

   1) कर्तरी प्रयोग    2) भावे प्रयोग    3) कर्मणी प्रयोग    4) संकीर्ण प्रयोग

उत्तर :- 1

8) रिकाम्या जागी अचूक पर्याय शोधा.
     दोन्ही पदे समान दर्जाची असतात त्याला ............................ समास म्हणतात.

   1) व्दंव्द समास    2) बहुव्रीही समास   
   3) कर्मधारय समास  4) मध्यमपदलोपी समास

उत्तर :- 1

9) योग्य जोडया निवडा.

   अ) पूर्ण विराम    - शब्दांचा संक्षेप दाखविण्याकरिता
   ब) स्वल्प विराम    - संबोधन दर्शविताना
   क) अपूर्ण विराम    - वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास

   1) अ      2) अ, ब      3) अ, क      4) सर्व

उत्तर :- 4

10) खाली दिलेल्या शब्दांपैकी अभ्यस्त शब्द ओळखा.

   1) गारगार    2) गिरकी    3) गार      4) गरम

उत्तर :- 1

फोर्ब्स : सर्वात श्रीमंत टॉप-५ यादीत ४ गुजराती:-

रिलायन्सचे मुकेश अंबानी हे लागोपाठ १२ व्या वर्षी पहिल्या स्थानावर कायम
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची फोर्ब्सने यादी जाहीर केली आहे. या यादीत रिलायन्सचे मुकेश अंबानी हे लागोपाठ १२ व्या वर्षी...

फोर्ब्सच्या यादीतील 'टॉप १०'

१) मुकेश अंबानी - एकूण संपत्ती (३.५ लाख कोटी)
२) गौतम अदानी - एकूण संपत्ती (१.१० लाख कोटी)
३) हिंदुजा ब्रदर्स - एकूण संपत्ती (१.०९ लाख कोटी)
४) पालोनजी मिस्त्री - एकूण संपत्ती (१.०५ लाख कोटी)
५) उदय कोटक - एकूण संपत्ती (१.०२ लाख कोटी)
६) शिव नादर - एकूण संपत्ती (१.००८ लाख कोटी)
७) राधाकृष्ण दमानी - एकूण संपत्ती (१.००१ लाख कोटी)
८) गोदरेज फॅमिली - एकूण संपत्ती (८४००० कोटी)
९) लक्ष्मी मित्तल - एकूण संपत्ती (७३५०० कोटी)
१०) कुमारमंगलम बिरला - एकूण संपत्ती (६७२०० कोटी)

जाणून घ्या जगाचा भूगोल :- भूरूपशास्त्र

📚 राज्यसेवा परीक्षेच्या दृष्टीने भूगोल हा विषय अभ्यासणे अगत्याचे ठरते. आज आपण या विषयातील 'भूरूपशास्त्र' हा मुद्दा अभ्यासणार आहोत.

🔍 पृथ्वीवरील उंचसखलतेचा व भूविशेषांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भूरूपशास्त्र होय. हे शास्त्र पृथ्वीच्या पृष्ठभागावरील उंचसखलतेमूळे निर्माण होणाऱ्या भूविशेषांचे वर्णन व विवरण करणारे शास्त्र आहे. भूरूपांचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत :

▪ मैदान : कमी उंची असलेल्या, जमिनीच्या सपाट भागाला मैदान असे म्हणतात.

▪ टेकडी : आजूबाजूच्या सपाट जमिनीपेक्षा उंच असलेल्या भागाला टेकडी असे म्हणतात.

▪ डोंगर : तीव्र उत्तर असलेल्या आणि टेकाडीपेक्षाही उंच असलेल्या जमिनीच्या भागाला डोंगर म्हणतात.

▪ पर्वत : डोंगरापेक्षाही जास्त उतार असणाऱ्या जमिनीच्या उंच भागाला पर्वत असे म्हणतात.

▪ शिखर : डोंगराचा अथवा पर्वताचा माथ्याकडे अरुंद होत गेलेला भाग म्हणजे शिखर होय.

▪ पठार : आजूबाजूच्या भूभागापेक्षा उंच असलेला परंतु माथ्याचा भाग सपाट असलेल्या जमिनीच्या भागाला पठार म्हणतात.

▪ दरी : पर्वत किंवा डोंगरामधील लांब पसरलेल्या खोल भागास दरी असे म्हणतात.

▪ खिंड : दोन डोंगर किंवा पर्वतांच्या मधील कमी उंचीच्या अरुंद भागाला खिंड असे म्हणतात.

▪ बेट : सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेल्या भूभागाला बेट असे म्हणतात.

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...