Saturday, 12 October 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) पुढील शब्दाचे अनेकवचनी रुप ओळखा. – आज्ञा

   1) आज्ञे    2) आज्ञा     
   3) आज्ञी    4) आज्ञाने

उत्तर :- 2

2) ‘देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ?

   1) प्रथमा    2) व्दितीया   
   3) तृतीया    4) सप्तमी

उत्तर :- 3

3) ‘कोणीही गडबड करू नका’ हे वाक्य होकारार्थी करा.

   1) शांत बसणारे गडबड करीत नाहीत  
2) गडबड करणारे शांत बसतात

   3) काय ही गडबड !        4) सर्वांनी शांत बसा

उत्तर :- 4

4) ‘पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात’ या वाक्यातील अधोरेखित शब्द .................. चे काम करतात.

   1) उद्देश्यविस्तार  2) उद्देश्य     
   3) क्रियापद    4) विशेषण

उत्तर :- 1

5) खालील वाक्यातील ‘प्रयोग’ ओळखा.

– आईने मधुराला बोलावले.

   1) कर्तरीप्रयोग    2) भावे प्रयोग   
   3) कर्मणीप्रयोग    4) संकीर्ण प्रयोग

उत्तर :- 2

6) ‘विजयनगरच्या साम्राज्याचा जेथे अंत झाला.’ या वाक्यातील उद्देश्य कोणते?

   1) जेथे      2) अंत     
   3) झाला    4) विजयनगरच्या साम्राज्याचा

उत्तर :- 2

7) खालील वाक्याचा प्रयोग सांगा. ‘पारिजातकाची योजना करणारा कवी खरोखरच कल्पक असला पाहिजे.’

   1) कर्तरी प्रयोग    2) भावे प्रयोग    3) कर्मणी प्रयोग    4) संकीर्ण प्रयोग

उत्तर :- 1

8) रिकाम्या जागी अचूक पर्याय शोधा.
     दोन्ही पदे समान दर्जाची असतात त्याला ............................ समास म्हणतात.

   1) व्दंव्द समास    2) बहुव्रीही समास   
   3) कर्मधारय समास  4) मध्यमपदलोपी समास

उत्तर :- 1

9) योग्य जोडया निवडा.

   अ) पूर्ण विराम    - शब्दांचा संक्षेप दाखविण्याकरिता
   ब) स्वल्प विराम    - संबोधन दर्शविताना
   क) अपूर्ण विराम    - वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास

   1) अ      2) अ, ब      3) अ, क      4) सर्व

उत्तर :- 4

10) खाली दिलेल्या शब्दांपैकी अभ्यस्त शब्द ओळखा.

   1) गारगार    2) गिरकी    3) गार      4) गरम

उत्तर :- 1

फोर्ब्स : सर्वात श्रीमंत टॉप-५ यादीत ४ गुजराती:-

रिलायन्सचे मुकेश अंबानी हे लागोपाठ १२ व्या वर्षी पहिल्या स्थानावर कायम
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची फोर्ब्सने यादी जाहीर केली आहे. या यादीत रिलायन्सचे मुकेश अंबानी हे लागोपाठ १२ व्या वर्षी...

फोर्ब्सच्या यादीतील 'टॉप १०'

१) मुकेश अंबानी - एकूण संपत्ती (३.५ लाख कोटी)
२) गौतम अदानी - एकूण संपत्ती (१.१० लाख कोटी)
३) हिंदुजा ब्रदर्स - एकूण संपत्ती (१.०९ लाख कोटी)
४) पालोनजी मिस्त्री - एकूण संपत्ती (१.०५ लाख कोटी)
५) उदय कोटक - एकूण संपत्ती (१.०२ लाख कोटी)
६) शिव नादर - एकूण संपत्ती (१.००८ लाख कोटी)
७) राधाकृष्ण दमानी - एकूण संपत्ती (१.००१ लाख कोटी)
८) गोदरेज फॅमिली - एकूण संपत्ती (८४००० कोटी)
९) लक्ष्मी मित्तल - एकूण संपत्ती (७३५०० कोटी)
१०) कुमारमंगलम बिरला - एकूण संपत्ती (६७२०० कोटी)

जाणून घ्या जगाचा भूगोल :- भूरूपशास्त्र

📚 राज्यसेवा परीक्षेच्या दृष्टीने भूगोल हा विषय अभ्यासणे अगत्याचे ठरते. आज आपण या विषयातील 'भूरूपशास्त्र' हा मुद्दा अभ्यासणार आहोत.

🔍 पृथ्वीवरील उंचसखलतेचा व भूविशेषांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भूरूपशास्त्र होय. हे शास्त्र पृथ्वीच्या पृष्ठभागावरील उंचसखलतेमूळे निर्माण होणाऱ्या भूविशेषांचे वर्णन व विवरण करणारे शास्त्र आहे. भूरूपांचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत :

▪ मैदान : कमी उंची असलेल्या, जमिनीच्या सपाट भागाला मैदान असे म्हणतात.

▪ टेकडी : आजूबाजूच्या सपाट जमिनीपेक्षा उंच असलेल्या भागाला टेकडी असे म्हणतात.

▪ डोंगर : तीव्र उत्तर असलेल्या आणि टेकाडीपेक्षाही उंच असलेल्या जमिनीच्या भागाला डोंगर म्हणतात.

▪ पर्वत : डोंगरापेक्षाही जास्त उतार असणाऱ्या जमिनीच्या उंच भागाला पर्वत असे म्हणतात.

▪ शिखर : डोंगराचा अथवा पर्वताचा माथ्याकडे अरुंद होत गेलेला भाग म्हणजे शिखर होय.

▪ पठार : आजूबाजूच्या भूभागापेक्षा उंच असलेला परंतु माथ्याचा भाग सपाट असलेल्या जमिनीच्या भागाला पठार म्हणतात.

▪ दरी : पर्वत किंवा डोंगरामधील लांब पसरलेल्या खोल भागास दरी असे म्हणतात.

▪ खिंड : दोन डोंगर किंवा पर्वतांच्या मधील कमी उंचीच्या अरुंद भागाला खिंड असे म्हणतात.

▪ बेट : सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेल्या भूभागाला बेट असे म्हणतात.

जगातील खनिज संपत्ती व उत्पादन करणार्‍या देशांबद्दल माहिती

खनिज संपत्ती:-उत्पादन करणारे देश

कोळसा दगडी(उत्पादन):-चीन, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन.

कोळसा दगडी(वापर करणारे):-चीन, अमेरिका, भारत, रशिया.

अभ्रक:-भारत, द.आफ्रिका, घाना.

क्रोमियस:-द.आफ्रिका, रशिया, र्होडेशिया, फिलिपाईन्स.

जस्त:-अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पेरु.

टिन:-मलेशिया, जर्मनी, चीन, बोलीव्हीया, रशिया, बेल्जियम.

टंगस्टन:-चीन, द.कोरिया, रशिया.

तांबे:-अमेरिका, झाम्बिया, चिली, झाईरे, भारत.

तेल, खनिज:-रशिया, कुवेत, अमेरिका, इरान, सौदी अरेबिया, इराक, कतार.

निकेल:-कॅनडा, अमेरिका, न्यू कॅलिडोंनिया.

बॉक्साईट:-ऑस्ट्रेलिया, जमैका, गिनी, फ्रांस, भारत.

सोने:-द.आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा.

युरेनियम:-द.आफ्रिका, झायरे, कॅनडा, भारत.

पारा:-इटली, स्पेन, अमेरिका.

मंगल (मॅगनीज):-रशिया, द.आफ्रिका, ब्राझिल.

लोहखनिज(साठे):-अमेरिका, कॅनडा, ब्राझिल, भारत, रशिया.

लोहखनिज (उत्पादन):-रशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका.

शिसे:-ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, स्पेन, रशिया.

भूगोल प्रश्नसंच 12/10/2019

1) भूपृष्ठावरील काही पदार्थ, साधारणत: खडक आणि खनिज पदार्थ ................. मुळे प्रतिदिप्तीत होतात किंवा सदृश्य प्रकाशमान
     होतात.
   1) अवरक्त प्रारण    2) औष्णिक प्रारण   
   3) सूक्ष्मतरंग प्रारण    4) जंबुपार प्रारण
उत्तर :- 4

2) मध्य कटिबंधातील आवर्ताचा व्यास :
   1) उष्ण कटिबंधातील आवर्ताच्या व्यासाइतका असतो.
   2) कधी उष्ण कटिबंधातील आवर्ताच्या व्यासापेक्षाही कमी तर कधी जास्त असतो.
   3) उष्ण कटिबंधातील आवर्ताच्या व्यासापेक्षा जास्त असतो.
   4) उष्ण कटिबंधातील आवर्ताच्या व्यासापेक्षा कमी असतो.
उत्तर :- 3

3) विषुववृत्तीय मैदानात नेहमी येणारा अनुभव
   1) दैनिक तापमान कक्षेत मोठा फरक    2) गडगडाटासह जोरदार पाऊस
   3) वेगवान वारे          4) थंड रात्री
उत्तर :- 2

4) रॉकीजमधील अतिशुष्क व उष्ण वारा म्हणजे :
   1) फॉन    2) लू      3) चिनूक      4) मिस्ट्रल
उत्तर :- 3

5) खालीलपैकी कोणत्या महिन्यात विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा 5 अंशांनी उत्तरेकडे सरकतो ?
   1) जून      2) सप्टेंबर    3) डिसेंबर    4) मार्च
उत्तर :- 1

चालू घडामोडी वन लाइनर्स, 12 ऑक्टोबर 2019.


✳ प्रथम राष्ट्रीय हिंदी विज्ञान लेखक परिषद लखनौमध्ये सुरू झाली

✳ टेनिस प्लेयर शलेह बार्टी जिंकला '' डॉन '' पुरस्कार

✳ हरजीत कौर जोशी यांना शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची सीएमडी नियुक्त केले

✳ पहिल्यांदा 'इंडिया इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह ट्रेड फेअर' चे उद्घाटन नवी दिल्ली येथे झाले

✳ व्ही.पी. एम. वेंकैया नायडू यांना 'ग्रीन क्रिसेन्टचा क्रम' हा कोमोरोजचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून गौरविण्यात आले

✳ विराट कोहली कर्णधार म्हणून 40 आंतरराष्ट्रीय शतके फटकावणारा वेगवान गोलंदाज ठरला

✳ विराट कोहली विश्व टेस्ट  स्पर्धेत डबल शतक झळकावणारा पहिला कर्णधार ठरला

✳ विराट कोहली स्कोअर करण्यासाठी चौथा वेगवान फलंदाज ठरला
कसोटी क्रिकेटमध्ये 7000 धावा

✳ विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये 250 धावा फटकावणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला

✳ विराट कोहली 21000 आंतरराष्ट्रीय धावांचा वेग गाठायचा

✳ विराट कोहली 7 कसोटी डबल शतके ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला

✳ अनिल कुंबळे यांना किंग्ज इलेव्हन पंजाबचे प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले गेले आहे

✳ *2019 नोबेल शांतता पुरस्कार*

✳ 2019 नोबेल पीस पुरस्कार इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली यांना प्रदान

✳ अबी अहमद अली हा नोबेल पुरस्कार मिळालेला पहिला इथिओपियन आहे

✳ ऑगस्टमध्ये औद्योगिक उत्पादन 1.1% घटले: सरकारी डेटा

✳ सेफ एफ अंडर -15 महिला फुटबॉल स्पर्धेची सुरुवात भूतानमध्ये

✳ एसएएफएफ अंडर -15 महिला फुटबॉल सीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

✳ फोर्ब्सने भारत 2019 मध्ये फोर्ब्स सर्वात श्रीमंत व्यक्तीची यादी जाहीर केली

✳ मुकेश अंबानी यांनी फोर्ब्स मधील सर्वात श्रीमंत व्यक्तीची यादी केली

✳ गौतम अदानी भारतातील फोर्ब्स सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत दुसरा या क्रमांकावर आहे

✳ हिंदुजा ब्रदर्स भारतातील फोर्ब्स सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत तिसरा या क्रमांकावर आहे

✳ फोर्ब्स रिचेस्ट पर्सन इन इंडियाच्या यादीत पल्लनजी मिस्त्री चौथे स्थानावर आहेत

✳ फोर्ब्स सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीमध्ये उदय कोटक पाचव्या क्रमांकावर आहे

✳ शिव नादर भारतातील फोर्ब्स सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे

✳ आर दमानी भारतातील फोर्ब्स सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत 7 व्या क्रमांकावर आहे

✳ गोदरेज भारतातील फोर्ब्स सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत आठवा क्रमांक आहे

✳ फोर्ब्स सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीमध्ये लक्ष्मी मित्तल 9 व्या क्रमांकावर आहे

✳ कुमार बिर्ला भारतातील फोर्ब्स सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत दहाव्या क्रमांकावर आहे

✳ फोर्ब्स रिचेस्ट पर्सन इन इंडियाच्या यादीमध्ये अझीम प्रेमजी 17 व्या क्रमांकावर आहे

✳ ओकाया पॉवर ग्रुपने रणवीर सिंगला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून स्वाक्षरी केली

✳ पाम तेलाची आयात, मलेशियामधील इतर वस्तूंवर भारत निर्बंध घालणार आहे

✳ 59 व्या राष्ट्रीय मुक्त अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेची सुरुवात रांचीमध्ये

✳ भारत महिला एसएला दुसर्‍या वनडेमध्ये 5 विकेट्सने हरवले

✳ व्ही. कोहली 3 नेशन्स विरुद्ध स्लॅम डबल टन्स

✳ कर्नाटकातील दिग्गज सैक्सोफोनिस्ट के गोपाळनाथ यांचे निधन

✳ पर्यावरणवादी चंडी प्रसाद बॅग इंदिरा गांधी पुरस्कार.

20 महत्त्वाचे सराव प्रश्नउत्तरे, नक्की सोडवा

1. खालील संख्यामाला पूर्ण करा

8,3,16,6,24,9,32,?

 40

 12

 18

 48

उत्तर :12

 2. खालीलपैकी कोण गटात बसत नाही.

 मुंबई

 कोलकाता

 चेन्नई

 नागपूर

उत्तर :नागपूर

 3. जर CLOCK =44

 TIME=47 तर WATCH=?

 45

 55

 52

 50

उत्तर :55

 4. NIA या संज्ञेचे विस्तारीत स्वरूप कोणते?

 नॅशनल इन्फोर्मेशन एजन्सी

 नॅशनल इट्रोगेशन एजन्सी

 नॅशनल इन्व्हेस्टीगेशन एजन्सी

 नॅशनल इन्शुरन्स एजन्सी

उत्तर :नॅशनल इन्व्हेस्टीगेशन एजन्सी

 5. कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीचे कार्य करणार्‍या —– यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो?

 गाडगे महाराज

 तुकडोजी महाराज

 विनोबा भावे

 साने गुरुजी

उत्तर :तुकडोजी महाराज

 6. —- यांनी 1928 मध्ये अमरावती मधील अंबादेवीचे देऊळ अस्पृश्यासाठी प्रवेश मुक्त व्हावं म्हणून सत्यग्रह केला?

 भाऊसाहेब हिरे

 डॉ. पंजाबराव देशमुख

 यशवंतराव चव्हाण

 विनोबा भावे

उत्तर :डॉ. पंजाबराव देशमुख

 7. भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण?

 विनोबा भावे

 महर्षी कर्वे

 लोकमान्य टिळक

 महात्मा गांधी

उत्तर :विनोबा भावे

 8. जन्मदर म्हणजे एका वर्षातील दर —- व्यक्तीमागील जन्माचे प्रमाण होय.

 एक हजार

 शंभर

 दहा हजार

 लक्ष

उत्तर :एक हजार

 9. ——- हा भारतातील सर्वात प्राचीन उद्योग होय?

 लोह-पोलाद उद्योग

 सुती कापड उद्योग

 साखर उद्योग

 ताग उद्योग

उत्तर :सुती कापड उद्योग

 10. भारतातील रूपयाच्या तुलनेत खालीलपैकी कोणत्या चलनाची किंमत सर्वाधिक आहे अथवा कोणते चलन सर्वाधिक महाग आहे?

 येन

 मार्क

 रियाल

 पौंड-स्टर्लिंग

उत्तर :पौंड-स्टर्लिंग

 11. पर्यावरणास हानी न पोहचविणार्‍या उत्पादनास कोणते प्रमाणपत्र दिले जाते?

 युरो-1

 अॅगमार्क

 इकोमार्क

 आयएसओ

उत्तर :इकोमार्क

 12. —— हा शासकीय महसुलाचा महत्वाचा स्त्रोत होय.

 शासकीय उद्योगांचा नफा

 कर योजना

 सार्वजनिक ठेवी

 परकीय कर्जे

उत्तर :कर योजना

 13. स्वरूप लक्षात घेता ‘नाबार्ड’ या संस्थेचे वर्णन तुम्ही खालीलपैकी कोणत्या शब्दात कराल?

 महामंडळ

 परिषद

 बँक

 मंडळ

उत्तर :बँक

 14. स्टॉक एक्सचेंजवर कोणत्या संस्थेचे नियंत्रण असते?

 भारतीय रिझर्व्ह बँक

 सेबी

 भारत सरकारचा वित्त विभाग

 महाराष्ट्र सरकारचा वित्त विभाग

उत्तर :सेबी

 15. भारतीय प्रमाण वेळ ग्रीनीच वेळेच्या —— आहे.

 4.5 तास पुढे

 4.5 तास मागे

 5.5 तास पुढे

 5.5 तास मागे

उत्तर :5.5 तास पुढे

 16. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र अभयारण्यास —– अभयारण्य या नावानेही ओळखले जाते?

 ढाकणा-कोलकाझ

 सागरेश्वर

 माळढोक पक्षी

 नागझीरा

उत्तर :ढाकणा-कोलकाझ

17. 12.3×10.5=?

 12.915

 129.15

 1291.5

 12915

उत्तर :129.15

 18. महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठे धावते?

 कोल्हापूर-गोंदिया

 पुणे-मुंबई

 मुंबई-कोल्हापूर

 मुंबई-नागपूर

उत्तर :कोल्हापूर-गोंदिया

 19. —– ही आदिवासी जमात मेळघाट डोंगररांगामध्ये बहूसंख्येने राहते.

 भिल्ल

 वारली

 कोरकू

 गोंड

उत्तर :कोरकू

 20. महाकवी कालिदासाचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कोठे आहे?

 रामटेक

 सावनेर

 उमरेड

 उरण

उत्तर :रामटेक

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...