*काटकोन ञिकोण*
~~~~~~~~~~~~~
*ज्या ञिकोणाचा एक कोन 90° चा /काटकोन असतो त्या ञिकोणास काटकोन ञिकोण म्हणतात*
=============================
*काटकोन ञिकोणाची वैशिष्ट्ये*
1] *एक कोन 90° चा* असतो.
2] इतर दोन कोन *लघुकोन असुन एकमेकांचे कोटीकोन* असतात
3] *90° कोन* समोरील बाजूला कर्ण म्हणतात .
4 ] काटकोन ञिकोणात *सर्वात मोठी बाजू कर्ण*असते
==============================
*काटकोन ञिकोण* आकृती
A
|\
| \
| \
| \
| \
| \ *कर्ण*
| \
| 90° \
|_________\
B C
काटकोन करणाऱ्या बाजू...
AB व BC
*कर्ण* = AC
*पायथागोरसचा प्रमेय*....
" *काटकोन ञिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजू च्या वर्गाच्या बेरजेइतका असतो* "
( कर्ण)² = (एक बाजू )² + ( दुसरी बा.)²
AC² = AB² + BC²
~~~~~~~~~~~~~
प्रश्न
काटकोन ञिकोणात बाजू
6 सेमी , 8 सेमी असतील तर कर्ण किती असेल ?
*स्पष्टीकरण*
==========
*काटकोन ञिकोण* आकृती
A
|\
| \
| \
| \
| \
| \ *कर्ण*
8 | \
| 90° \
|_________\
B 6 C
काटकोन करणाऱ्या बाजू...
AB व BC
*कर्ण* = AC
*पायथागोरसचा प्रमेय*....
" *काटकोन ञिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजू च्या वर्गाच्या बेरजेइतका असतो* "
( कर्ण)² = (एक बाजू )² + ( दुसरी बा.)²
AC² = AB² + BC²
=8²+6²
=64+36=100
Taking square root
*AC=10cm*
==============================
[ 2 ] प्रश्न क्रमांक ....002
काटकोन ञिकोणात बाजू
7 सेमी , व कर्ण 25 सेमी असतील तर दुसरी बाजू किती असेल ?
*स्पष्टीकरण*
~~~~~~~~
*काटकोन ञिकोण* आकृती
A
|\
| \
| \
| \
| \
| \ *25कर्ण*
? | \
| 90° \
|_________\
B 7 C
काटकोन करणाऱ्या बाजू...
AB व BC
*कर्ण* = AC =25
*पायथागोरसचा प्रमेय*....
" *काटकोन ञिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजू च्या वर्गाच्या बेरजेइतका असतो* "
( कर्ण)² = (एक बाजू )² + ( दुसरी बा.)²
AC² = AB² + BC²
25² =AB² + 7²
AB² = 625 - 49
AB² = 576
AB = 24 ✅
==============================
*पायथागोरस ञिकुट*
================
ज्या तीन संख्या पायथागोरस चा प्रमेय नुसार.....असतील त्या पायथागोरस ञिकुट असे म्हणतात .
*उदाहरणार्थ*
➡ ( 6, 8 , 10)
➡ ( 7, 24 , 25 )
➡ ( 5 , 12 , 13 )
➡ ( 12 , 16 , 20 )
अशी असंख्य ञिकुट सांगता येतील .
============================
3n , 4n , 5n ....
5n , 12n , 13n......
8n , 15n , 17n.....
7n , 24n , 25n......
12n , 35n , 37n....
9n , 40n , 41n.....
11n , 60n , 61n......
n = 1 , 2 , 3 , 4.....कोणत्याही ही किंमत ठेवून असंख्य ञिकुट मिळतील..