०९ ऑक्टोबर २०१९

आर्थिक विषमतेच्याबाबतीत भारत जगात अव्वल स्थानी

♻️ जगाच्या अर्थिक विषमता अहवालातून उत्पन्नाबाबत जागतिक स्तरावर भारताबाबत एक लाजीरवाणी बाब समोर आली आहे. गेल्या दशकांमध्ये जगातील उत्पन्नाच्या पातळीत वाढ झाली त्यामुळे आर्थिक विषमताही निर्माण झाली असून २०१६ मध्ये जगाचे निम्म्यापेक्षा अधिक उत्पन्न हे एकूण लोकसंख्येच्या १० टक्के लोकांकडे गेल्याचे या अहवालातील आकडेवारी सांगते. यामध्ये आर्थिक विषमतेच्याबाबतीत भारत जगात अव्वल स्थानी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

♻️ आर्थिक विषमतेच्या या ट्रेन्डनुसार, जगाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उत्पन्न दिसून येते. यामध्ये युरोपात सर्वाधिक आर्थिक समानता पहायला मिळते, कारण इथल्या लोकसंख्येच्या टॉपच्या १० टक्के लोकांकडे ३७ टक्के उत्पन्नाचा वाटा आहे. तर मध्य आशियात सर्वाधिक आर्थिक विषमता असून इथे लोकसंख्येतील टॉपच्या १० टक्के लोकांकडे ६१ टक्के उत्पन्नाचा वाटा आहे. फर्स्टपोस्टने याबाबत वृत्त दिले आहे.

♻️ यामध्ये भारतातील एकूण लोकसंख्येच्या टॉप १० टक्के लोकांकडे ५५ टक्के उत्पन्नाचा वाटा आहे. देशातील विविध भागातही उत्पन्नामध्ये विषमता दिसून येते. सन १९८० पासून उत्तर अमेरिका, चीन, भारत आणि रशिया या देशांनी वेगाने झालेली आर्थिक विषमता वाढ अनुभवली आहे. या काळात केवळ युरोपमध्येच सातत्याने आर्थिक वाढ झाली होती.

♻️ १९८० च्या काळात युरोप आणि युनायटेड स्टेट्स-कॅनडा रिजनमध्ये आर्थिक विषमतेची एकच पातळी होती. मात्र, आता यामध्ये बदल झाला आहे. १९८०च्या काळात या भागांमध्ये टॉपच्या १० टक्के लोकांकडे ३० टक्के उत्पन्नाचा वाटा होता. या आकडेवारीच्या तुलनेत २०१६ मध्ये युरोपमध्ये ही वाढ केवळ ३४ टक्क्यांवर पोहोचली होती. मात्र, अमेरिकेत ती ४७ टक्क्यांवर जाऊन पोहोचली होती.

♻️ भारतात १९९१ मध्ये झालेल्या आर्थिक उदारीकरणानंतर देशात उच्च उत्पन्न वाढ दिसून आली होती. त्याचबरोबर आर्थिक विषमतेतही वाढ झाली होती. १९९० पर्यंत १ टक्के लोकांकडेच सर्वाधिक उत्पन्न होते. त्यानंतर २०१६ पर्यंत त्यात सातत्याने वाढ होत गेली.

राफेल विमानाची वैशिष्ट्ये

1. राफेलला प्रत्येत मोहिमेवर पाठवता येऊ शकते.

2. 60 हजार फुटांपर्यंत हे विमान उड्डाण करू शकतं. तसंच याची इंधन क्षमता 17 हजार किलो आहे.

हे विमान एका मिनिटात 60 हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकतं. याची इंधन क्षमता 17 हजार किलो आहे.

3. मल्टिरोल फायटर एअरक्राफ्ट म्हणूनही हे विमान ओळखलं जातं. तसंच वेगवेगळ्या हवामानात हे विमान काम करू शकतं.

4. यामध्ये स्काल्प मिसाईल आहे, जे हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे.

5. राफेलची मारक क्षमता 3 हजार 700 किलोमीटरपर्यंत आहे, तर स्काल्पची रेंज 300 किलोमीटर आहे.

6. राफेल विमानाचा वेग 2,223 किलोमीटर प्रति तास आहे.

7. हे अँटी शिप हल्ल्यापासून अणुबॉम्ब हल्ल्यापर्यंत, क्लोज एअर सपोर्ट आणि लेजर डायरेक्ट लॉन्ग रेंज मिसाईल अॅटॅकमध्येही अव्वल आहे.

8. राफेल विमान 24 हजार 500 किलोपर्यंत वजन घेऊन जाऊ शकतं आणि 60 तासांचं अतिरिक्त उड्डाणही करु शकतं.

भारतातील प्रमुख राष्ट्रीय महामार्ग खालीलप्रमाणे सांगता येतील

● N H 7 --- वाराणसी, नागपूर, हैद्राबाद, बंगलोर, कन्याकुमारी.

● N H 6 --- हाजीरा, नागपूर, रायपूर, कोलकाता.

● N H 5 ---बहरगोरा, भुवनेश्वर, विजयवाडा, चेन्नई.

● N H 15--पठाणकोट, अमृतसर, बिकानेर, कंडला.

● N H 2---- दिल्ली, आग्रा, कानपुर, बरही, कोलकत्ता.

● N H 8----दिल्ली, जयपूर, अहमदाबाद, मुंबई.

● N H 17--पनवेल, मंगलोर, कोझिकोड, एटापल्ली.

● N H 4 ---ठाणे, पुणे, बंगलोर, चेन्नई.

● N H 3 ---आग्रा, इंदोर, नाशिक, मुंबई.

● N H 31--बरही, पुणे, सिलिगुरी, अमिनगाव 

भूगोल प्रश्नसंच

1) तंबाखू बियाण्याच्या उगवणीकरिता सर्वात अनुकूल तापमान ................... होय.
   1) 20ºC    2) 28ºC      3) 32ºC      4) 25ºC
उत्तर :- 2

2) शाश्वत शेतीची मुख्य उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत :
   अ) पर्यावरण संतुलन राखणे.    ब) सामाजिक – आर्थिक समता साध्य करणे.
   क) आर्थिक लाभ मिळवणे.
   1) अ व क बरोबर  2) ब व क बरोबर    3) अ व ब बरोबर    4) सर्व बरोबर
उत्तर :- 4

3) सपासप कापणे व जाळणे हे शेतीचे वैशिष्टय खालीलपैकी कोणत्या हवामान विभागात आढळते ?
   1) विषुववृत्तीय पर्जन्य अरण्यांचा प्रदेश    2) भूमध्य हवामानाचा प्रदेश
   3) मोसमी हवामानाचा प्रदेश      4) सूचिपर्णी वृक्षांच्या अरण्यांचा प्रदेश
उत्तर :- 1

4) पृथ्वी व सूर्य यांच्यातील सरासरी अंतरावरील सूर्याचे पृथ्वीवरील प्रचरण सुमारे .................... असते.
   1) 470 W/m²    2) 770 W/m²    3) 1170 W/m²    4) 1370 W/m²
उत्तर :- 4

5) एखाद्या अक्षवृत्तावर एखाद्या ठिकाणी पोहोचणारी सौरशक्ती वर्षात निरनिराळी असते कारण :
   1) ऋतूपरत्वे सूर्यकिरणांनी पृथ्वीच्या पृष्ठभागाशी केलेला कोन बदलतो.
   2) दिवासाची लांबी बदलते.
   3) सूर्यापासूनचे अंतर बदलते.
   4) वरील सर्व
उत्तर :- 4

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू’ हे उदाहरण कोणत्या अलंकाराचे आहे ?

   1) उपमा    2) उत्प्रेक्षा    3) रूपक      4) अपन्हुती

उत्तर :- 2

2) अभ्यस्त शब्द ओळखा.

   1) तुरट    2) आंबट चिंबट    3) खारट      4) कडवट

उत्तर :- 2

3) स्वातंत्र्य युध्दाच्याकाळात देशभक्तांनी भोगलेल्या तुरुंगवास म्हणजे राष्ट्रहितासाठी दिलेली अग्निपरीक्षाच होती. या विधानातील
    अग्निपरीक्षा या शब्दातून कोणता अर्थ व्यक्त होतो ?

   1) लक्ष्यार्थ    2) वाच्यार्थ    3) वाक्यार्थ    4) शब्दार्थ

उत्तर :- 1

4) पुढीलपैकी न जुळणारा शब्द ओळखा.

   1) दैत्य    2) दानव      3) राक्षस      4) देव

उत्तर :- 4

5) ‘दुष्काळ’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ?

   1) नापीक    2) सुकाळ    3) अवर्षण    4) कोरडा

उत्तर :- 2

6) या टोपीखाली दडलंय काय?

   1) उभयान्वयी अव्यय    2) शब्दयोगी अव्यय   
   3) क्रियाविशेषण अव्यय    4) केवलप्रयोगी अव्यय

उत्तर :- 2

7) ‘मरावे परी किर्तीरुपे उरावे !’ या वाक्यातील ‘परी’ या शब्दाने कोणते उभयान्वयी अव्यय सुचित होते.

   1) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय    2) न्युनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
   3) स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय      4) उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 2

8) केवलप्रयोगी अव्ययांचे एकूण प्रकार किती ?

   1) सात    2) आठ     
   3) नऊ    4) दहा

उत्तर :- 3

9) खालील वाक्यातील काळ ओळखा.

     ‘मधू लाडू खात जाईल’
   1) साधा भविष्यकाळ    2) अपूर्ण भविष्यकाळ
   3) पूर्ण भविष्यकाळ    4) रीती भविष्यकाळ

उत्तर :- 4

10) पुढील शब्दाचे लिंग ओळखा. – विदुषी

   1) पुल्लिंगी    2) नपुंसकलिंगी   
   3) स्त्रीलिंगी    4) यापैकी नाही

उत्तर :- 3

कॉर्पोरेट कर 22% एवढा कमी करण्याचा सरकारचा निर्णय

✍देशातल्या अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे.

✍या प्रयत्नाचा भाग म्हणूनच केंद्रीय अर्थ मंत्रालयाने कॉर्पोरेट कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

✍कोणत्याही प्रकारची सवलत न घेणाऱ्या कंपन्यांच्या करामध्ये कपात करून दर 22 टक्के करण्यात आले आहेत.

✍उत्पादन आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी प्राप्तिकर कायद्यात केलेल्या बदलांची अंमलबजावणी या आर्थिक वर्षापासून करण्यात येणार असून, कोणतीही सवलत न घेणाऱ्या भारतीय कंपन्यांना 22 टक्के कर द्यावा लागणार आणि अधिभार आणि सेस मिळून एकूण 25.17 टक्के कर द्यावा लागणार.

✍मात्र याचा लाभ लगेच मिळणार नाही. घरगुती सामानापासून इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत अनेक वस्तूंचे दर या करकपातीमुळे कमी होतील, मात्र त्याची अंमलबजावणी तातडीने होणार नाही.

✍करकपातीमुळे कंपन्यांच्या हाती जो पैसा वाचणार, त्याचा उपयोग कंपन्या आधी उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी करणार.

चालू घडामोडी प्रश्नसंच

📌39 व्या जागतिक कवी परिषदेचे उद्घाटन ____ येथे झाले.

(A) भोपाळ
(B) नवी दिल्ली
(C) भुवनेश्वर✅✅✅
(D) आग्रा

📌भारताच्या मदतीने कोणत्या देशात उभारण्यात आलेल्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा 8 ऑक्टोबर रोजी पेट्रोलियम व नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला?

(A) मंगोलिया✅✅✅
(B) कंबोडिया
(C) लाओस
(D) व्हिएतनाम

📌उत्सवाच्या वेळी वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कोणत्या संस्थेने ‘हरित फटाके’ विकसित केले?

(A) IIT कानपूर
(B) CSIR✅✅✅
(C) IISc बेंगळुरू
(D) IIT खडगपूर

📌भारताने कोणत्या शेजारच्या देशात कोस्टल सर्व्हिलन्स रडार यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) श्रीलंका
(B) बांग्लादेश✅✅✅
(C) मालदीव
(D) पाकिस्तान

📌संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी युद्धात मृत्यूमुखी पडलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना दिली जाणारी आर्थिक मदत चार पट वाढविण्यास मान्यता दिली. हा निधी _ अंतर्गत देण्यात येणार.

(A) आर्मी बॅटल कॅज्युएलिटीज
वेलफेयर फंड✅✅✅
(B) राष्ट्रीय संरक्षण कोष
(C) लष्कर केंद्रीय कल्याण कोष
(D) यापैकी नाही

📌21 ऑक्टोबर 2019 रोजी _ सर्व महिला असलेल्यांचा स्पेसवॉक आयोजित करणार आहे.

(A) युरोपियन स्पेस एजन्सी (ESA)
(B) जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी (JAXA)
(C) NASA (नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिसट्रेशन)✅✅✅
(D) ISA (इस्त्राएल स्पेस एजन्सी)

📌UNESCO ने आदिवासी लोकांसाठीचे राजदूत म्हणून __ यांची नेमणूक केली.

(A) कॅमेरून डायझ
(B) युना किम
(C) मिली बॉबी ब्राउन
(D) यलिट्झा एपारीसिओ✅✅✅

📌जागतिक अधिवास दिन _ या दिवशी साजरा केला जातो.

(A) 7 ऑक्टोबर✅✅✅
(B) 9 ऑक्टोबर
(C) 6 ऑक्टोबर
(D) 8 ऑक्टोबर

सागरी माहिती सामायिक करण्यास भारताचे IFC-IOR केंद्र कार्यरत

👉 भारतीय नौदलाच्या ‘इन्फॉर्मेशन फ्यूजन सेंटर – इंडियन ओशन रीजन (IFC-IOR)’ या विभागाने हिंद महासागरातून होणार्‍या सागरी क्रियाकलापांविषयीची माहिती सामायिक करण्यास सुरुवात केली आहे.

👉 ‘गोवा मेरीटाईम कॉन्क्लेव्ह 2019’ या परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी IOR क्षेत्रातल्या देशांना या सुविधेचा उपयोग करून घेण्याविषयी प्रस्ताव मांडला.

✅ ‘IFC-IOR’ विषयी :

▪️डिसेंबर 2018 मध्ये गुरुग्राम (गुडगाव) येथे भारतीय नौदलाच्या ‘इन्फॉर्मेशन फ्यूजन सेंटर – इंडियन ओशन रीजन (IFC-IOR)’ या विभागाचे उद्घाटन करण्यात आले होते.

▪️भागीदार देश आणि बहुराष्ट्रीय संस्थांच्या सहयोगाने सागरासंबंधी जागृती वाढविण्यास आणि विशेषकरून व्यवसायिक मालवाहू जहाजांसंबंधी माहिती सामायिक करण्याच्या उद्देशाने हे केंद्र उघडण्यात आले.

▪️हे केंद्र आपत्ती निवारणासाठी देखील कार्य करीत आहे.

▪️केंद्राचे आतापर्यंत 18 देश आणि 15 बहुराष्ट्रीय / सागरी सुरक्षा केंद्रांशी संबंध जोडले गेले आहेत.

▪️हिंद महासागराच्या सागरी क्षेत्रात पाळत ठेवण्यासाठी उपग्रहांचे एक जाळे तयार करण्यासाठी भारत आणि फ्रान्स एकत्र कार्य करीत आहेत.

▪️हिंद महासागरी क्षेत्रामधून (IOR) जगातला जवळपास 75% पेक्षा जास्त समुद्री व्यापार आणि जागतिक तेलाचा 50% व्यापार होतो.

Important Question 9/10/18

Q1. अशियातील सर्वात मोठे चर्च कोठे आहे?.
✅.   - गोवा

 

Q2. यातील कोणता अवयव एंडोक्राइन आणि एक्सोक्राइन ग्रंथींचे कार्य करते?.
✅.  - स्वादुपिंड

 

Q3. कलमकारी कोणत्या राज्यातील वैशिष्ठ्यपूर्ण 'हस्तशिल्प' कला आहे?
✅ - आंध्रप्रदेश

 

Q4. कोणत्या प्रकारच्या जीवांना फुफ्फुस नसते?
✅. - मासे

 

Q5. व्हाइट टॉवर आणि लेटाइन टॉवर कोणत्या स्मारकाचे भाग आहेत?
✅.   - टॉवर ऑफ लंडन

 

Q6. वि दा सावरकर यांना कोणत्या तुरूंगात जन्मठेपेची शिक्षा भोगायला ठेवले होते?
✅.  - सेल्यूलर जेल

 

Q7. बनारस हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना कोणी केली होती?
✅.   - पंडित मदनमोहन मालविय

 

Q8. भारतातील कोणत्या राज्याच्या राजधानीत चारबाघ रेल्वे स्टेशन आहे?
✅.   - लखनौ (U. P.)

 

Q9. बंगालच्या एशियाटीक सोसायटीचे संस्थापक कोण होते?
✅.  - सर विल्यम्स जॉन्स

 

Q10. पॉपीर आणि चालो नृत्य कोणत्या राज्यातील आहे?
✅.  - अरूणाचल प्रदेश

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे ‘ई-दंत सेवा’ संकेतस्थळ

◾️केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मुख-आरोग्याच्या संदर्भात ज्ञानाच्या प्रसारासाठी एक संकेतस्थळ तयार केले आहे.

◾️केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते 7 ऑक्टोबर 2019 रोजी ‘ई-दंत सेवा’ या नावाने एक संकेतस्थळ आणि एका मोबाइल अॅपचे उद्घाटन करण्यात आले आहे.

◾️नेत्रहीन व्यक्तींसाठी देखील याच्यासंदर्भात ब्रेल लिपीत एक पुस्तिका आणि ध्वनीफिती प्रकाशित करण्यात आले आहे. तसेच गर्भवती महिला आणि बालकांसाठी एका पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले.

             📌ठळक वैशिष्ठ्ये

◾️‘ई-दंत सेवा’ हे पहिले-वहिले राष्ट्रीय डिजिटल व्यासपीठ आहे, ज्याद्वारे मुखा-संबंधी आरोग्याविषयी माहिती प्रदान केले जाते.

◾️अखिल भारतीय वैद्यकीय शास्त्र संस्था (AIIMS) आणि इतर भागधारकांसह मंत्रालयाच्या या पुढाकाराने मुखासंबंधी आरोग्य राखण्याविषयी महत्त्व लोकांना समजून घेण्यास मदत होणार आहे.

◾️संकेतस्थळावर 2014 साली चालू झालेल्या राष्ट्रीय मुख-आरोग्य कार्यक्रमाविषयी माहिती, सर्व दंत-विषयक सुविधांची आणि महाविद्यालयांची तपशीलवार यादी, शैक्षणिक माहिती आणि संपर्क साहित्य आणि 'सिम्प्टंस चेकर' या नावाचे एक साधन आहे जे आरोग्याच्या समस्येबाबत लक्षणे याबाबत माहिती पुरविते.  

◾️तसेच बचाव करण्याचे मार्ग, उपचार पद्धती आणि सर्वात जवळची उपलब्ध दंत सुविधा (सार्वजनिक आणि खासगी दोन्ही) शोधण्यासाठी निर्देशित करते.

सरकार उभारणार 1 हजार 400 किलोमीटरची ‘ग्रीन वॉल’ ऑफ इंडिया

☘ केंद्र सरकारने देशातील पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि हरित क्षेत्र वाढवण्यासाठी 1 हजार 400 किलोमीटर लांबीची ‘ग्रीन वॉल’ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

☘आफ्रिकेत सेनेगल पासून जिबूतीपर्यंत तयार करण्यात आलेल्या हरित पट्ट्याच्या धर्तीवर

☘ गुजरातपासून दिल्ली-हरियाणाच्या सीमेपर्यंत ‘ग्रीन वॉल ऑफ इंडिया’ उभारण्यात येणार आहे.

☘ ही ग्रीन वॉल लांबीला 1 हजार 400 किलोमीटर तर रूंदीला 5 किलोमीटर इतकी असणार आहे.

☘वातावरणातील बदलांशी सामना करण्यासाठी आफ्रिकेत अशी भिंत उभारण्यात आली आहे.

☘याला ‘ग्रेट ग्रीन वॉल ऑफ सहारा’ असंही म्हटलं जातं.

☘सध्या हा प्रकल्प सुरूवातीच्या टप्प्यात आहे. जर हा प्रकल्प पूर्ण झाला तर भविष्यकाळात वाढत्या प्रदुषणाला रोखण्यासाठी याकडे एक उदाहरण म्हणून पाहता येऊ शकते.

☘थार वाळवंटातून ही भिंत विकसित केली जाणार आहे.

☘याव्यतिरिक्त
  📌गुजरात,
  📌राजस्थान,
  📌 हरियाणा ते दिल्लीपर्यंत
परसलेल्या अरावली डोंगरावरील कमी होणाऱ्या हरित पट्ट्याच्या संकटावरही मात करता येऊ शकते.

☘ग्रीन वॉल ऑफ इंडियामुळे पश्चिम भारत आणि पाकिस्तानातील वाळवंटातून दिल्लीपर्यंत येणारी धूळही रोखण्यात मदत मिळणार आहे.

☘ भारतातील कमी होणारा हरित पट्टा आणि वाढतं वाळवंट रोखण्यासाठी ही कल्पना संयुक्त राष्ट्रांच्या कॉन्फरन्समधून मिळाली आहे.

☘आफ्रिकेतील ग्रेट ग्रीन वॉलवर एका दशकापूर्वी काम सुरू करण्यात आलं होतं. परंतु अनेक देशांचा सहभाग आणि त्यांच्या निरनिराळ्या कार्यप्रणालींमुळे अद्यापही ते पूर्ण होऊ शकले नाही.

☘भारत सरकार आपली ही कल्पना 2030 पर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने सध्या काम करत आहे. या अंतर्गत 26 दशलक्ष हेक्टर जमिन प्रदूषणमुक्त करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे.

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...