Q.1) अग, ग ..... विंचू चावला
देवा रे देवा ..... विंचू चावला
आता काय मी करू ..... विंचू चावला
अग, ग ..... विंचू चावला
अग बया, बया ..... विंचू चावला
वरील भारुड रचना खालीलपैकी कोणी लिहिली .(MPSC 2016)
A) संत ज्ञानेश्वर
B) संत एकनाथ
C) संत जनाबाई
D) संत तुकाराम
उत्तर : B) संत एकनाथ
Q.2) मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते? (MPSC 2010)
A) नागरी
B) मोडी
C) संस्कृत
D) देवनागरी
उत्तर : D) देवनागरी
Q.3) देवनागरी लिपी लिहीण्याची पद्धत स्पष्ट करणारे वाक्य शोधा. (MPSC 2010)
A) देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत डावीकडून उजवीकडे अशी आहे.
B) देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत वरून खाली आहे.
C) देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत उजवीकडून डावीकडे आहे.
D) देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत वर्तुळाकार आहे.
उत्तर : A) देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत डावीकडून उजवीकडे अशी आहे.
Q.4) देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या? (MPSC 2012 )
A) मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत
B) मराठी, हिंदी, कानडी, इंग्रजी
C) मराठी, तेलगू, हिंदी, संस्कृत
D) मराठी, कानडी, गुजराती, बंगाली
उत्तर : A) मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत
Q.5) देवनागरी लिपी आदर्श लिपी मानण्याचे कारण सांगा. (MPSC 2010)
A) देवनागरी लिपीत वर्णाला स्वतंत्र चिन्हाने दाखवता येत नाही.
B) देवनागरी लिपीत उच्चारण्यात येणारा प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने दाखविता येते.
C) देवनागरी लिपीत ध्वनीला स्वतंत्र चिन्ह नसते.
D) देवनागरी लिपीत एका वर्णाला दोन ध्वनी असतात.
उत्तर : B) देवनागरी लिपीत उच्चारण्यात येणारा प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने दाखविता येते.
Q.6) पर्यायी उत्तरांतून योग्य ते पर्यायी उत्तर शोधा.
" भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते" कारण - (MPSC 2015)
A) भाषेच्या प्रवाहात वळणे नसतात.
B) भाषेमध्ये बदल होत जातात.
C) भाषेच्या व्याकरणांच्या नियमांना मुरड घालावी लागत नाही
D) भाषेचा प्रवाह अखंड चालू नसतो.
उत्तर : B) भाषेमध्ये बदल होत जातात.
Q.7) "कान फुटले तुहे का तोंडाले कुलुप लावले कोण?"
हे वाक्य कोणत्या बोलीभाषेतील आहे? (महा.टीईटी-16)
A) अहिराणी
B) वऱ्हाडी
C) वारली
D) झाडबोली
उत्तर : B) वऱ्हाडी
Q.8) ऋ बदद्ल अ, ई, उ, र हे पर्याय स्विकारण्याची प्रवृत्ती कोणत्या भाषेपासून घेतली? (महा.सेट-2015)
A) कन्नड भाषेपासून
B) अपभ्रशं भाषेपासून
C) तामिळ भाषेपासून
D) संस्कृत भाषेपासून
उत्तर : B) अपभ्रशं भाषेपासून
Q.9) सुरावली हे कोणत्या प्रकाराच्या स्वनिमाचे उदाहरण आहे? (महा.सेट-2015)
A) खंडित
B) खंडाधिष्टीत
C) महाप्राण
D) सघोष
उत्तर : B) खंडाधिष्टीत
Q.10) स्वन म्हणजे काय? (महा.सेट-2015)
A) अक्षर
B) भाषेत वापरला जाणारा ध्वनी
C) ध्वनी
D) उच्चार
उत्तर : B) भाषेत वापरला जाणारा ध्वनी
Q.11) वामन पंडिताने भगवत गीतेवर कोणती टिका लिहिलेली आहे? (महा.सेट-2015)
A) भावार्थदिपीका
B) यथार्थदिपीका
C) गीतागौरव
D) उध्दवगीता
उत्तर : B) यथार्थदिपीका
Q.12) मराठी पहिला दिवाळी अंक कोणी प्रकाशित केला? (महा.सेट-2015)
A) बाळशास्त्री जांभेकर
B) रा.भी.गुंजीकर
C) का.र.मित्र
D) वि.सि.गुर्जर
उत्तर : C) का.र.मित्र
Q.13) पुढीलपैकी कोणता विशेष प्रमाण भाषेचा नाही? (महा.सेट-2015)
A) निरनिराळ्या गटांकडून परस्पर संपर्कासाठी वापर
B) लेखन व्यवहारात प्राधान्य
C) अनौपचारिक संदर्भातील वापर
D) औपरारिक संदर्भातील वापर
उत्तर : C) अनौपचारिक संदर्भातील वापर
Q.14) मराठीतील भाषांतरीत साहित्यातील सुची कोणी केली? (महा.सेट-2015)
A) मृणालिनी गटकरी
B) विना मुळे
C) विना आलासे
D) सु. रा. चुनेकर
उत्तर : B) विना मुळे
Q.15) ब्राम्ही लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केली? (जि.नि.स.परभनी-2015)
A) विलीयम जोश
B) जेम्स प्रीसेप
C) जॉन मार्सल
D) चॉल्स मॅके
उत्तर : B) जेम्स प्रीसेप
Q.16) महानुभवानी आपले वाङ्मय कोणत्या सांकेतिक लिपीत लिहिले आहे? (महा.सेट-2015)
A) ब्राम्ही लिपी
B) खरोष्टी लिपी
C) सकळ लिपी
D) मोडी लिपी
उत्तर : C) सकळ लिपी
Q.17) भाषा हा शब्द संस्कृतमधील ...........धातुपासून आला आहे. (तलाठी, धुळे-2010)
A) भाषिक
B) भाषा
C) बोलणे
D) भाष्
उत्तर : D) भाष्
Q.18) भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला __ म्हणतात. (डीएमईआर, लि.टं-15)
A) व्याकरण
B) भाषाशास्त्र
C) लिपी
D) बाराखडी
उत्तर : A) व्याकरण
Q.19) काही काळ मराठी भाषेला मुरड घालून लिहिण्याची पद्धत अस्तित्वात होती, तिला ___ लिपी म्हणतात. (समाजकल्याण, पुणे-2014)
A) अर्धमागधी
B) देवनागरी
C) पाली
D) मोडी
उत्तर : D) मोडी
Q.20) विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते? (जि.प. चंद्रपूर-2014)
A) मित्र
B) भाषा
C) भावना
D) समाज
उत्तर : B) भाषा
Q.21) मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने __ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. (जि.प.भंडारा-2015)
A) रंगनाथ पठारे
B) नरेंद्र जाधव
C) श्याम मनोहर
D) यापैकी नाही
उत्तर : A) रंगनाथ पठारे
Q.22) कोणता घटक भाषेत वापरला जात नाही? (लिपिक, वर्धा-2015)
A) रूप
B) रूपिका
C) स्वन
D) स्वनिम
उत्तर : D) स्वनिम
Q.23) मराठी भाषा कोणत्या कुळातील आहे? (लिपिक, वर्धा-2015)
A) इंडो-युरोपियन
B) द्रविड भाषाकुल
C) ऑस्ट्रो-ओशियायी
D) सिनो-तिबेटीयन
उत्तर : A) इंडो-युरोपियन
Q.24) स्वनिमाचे भाषेतील कार्य कोणते ? (लिपिक, वर्धा-2015)
A) पुरकविनियोग
B) अर्थविभेदकता
C) शब्दसिद्धी
D) नाशिक्यरंजन
उत्तर : B) अर्थविभेदकता
Q.25) स्वनिम ही एक आदर्श कल्पना असून स्वनानंतर हे त्याचे काय आहे? (लिपिक, वर्धा-15)
A) प्रात्यक्षिक
B) समांतर
C) व्यंजन
D) अर्थांतर
उत्तर : A) प्रात्यक्षिक
Q.26) बोलण्याची प्रक्रिया अर्थाकडून ध्वनीनिर्मितीकडे जात असते, तर ऐकण्याची प्रक्रिया ध्वनी ग्रहणाकडून अर्थाकडे जात असते? (लिपिक, वर्धा-2015)
A) संपूर्ण विधान चूक
B) पूर्वाध चूक उत्तरार्ध बरोबर
C) संपूर्ण विधान बरोबर
D) पूर्वाध बर
Q.34) मराठी भाषेचे पाणीनी कोणाला म्हणतात? (ग्रामसेवक बुलढाणा 2014)
A) बाळशास्त्री जांभेकर
B) दादोबा पांडूरंग तर्खडकर
C) मो.के. दामले
D) यापैकी नाही
उत्तर : B) दादोबा पांडूरंग तर्खडकर
Q.35) विभावरी शिरुळकर कोणत्या लेखिकेचे टोपणनाव आहे? (म्हाडा लि.टं. - 2015)
A) दुर्गा भागवत
B) इंदिरा संत
C) मालती बेडेकर
D) संजीवनी मराठे
उत्तर : C) मालती बेडेकर
Q.36) "माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।''
असे मराठीचे वर्णन खालीलपैकी कोणी केले आहे? (म. पो. लातूर 2013)
A) संत ज्ञानेश्वर
B) संत एकनाथ
C) संत तुकाराम
D) संत रामदास
उत्तर : A) संत ज्ञानेश्वर
Q.37) मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते? (लिपिक वाशिम -2012)
A) बाळशास्त्री जांभेकर
B) दादोबा पांडूरंग
C) विष्णू शास्त्री चिपळूनकर
D) यापैकी नाही
उत्तर : C) विष्णू शास्त्री चिपळूनकर
Q.38) वि.वा.शिरवाडकर कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? (म. पो. अकोला- 2013)
A) कुसुमाग्रज
B) ग्रेस
C) गोंविदाग्रज
D) बालकवी
उत्तर : A) कुसुमाग्रज
Q.39) मराठी भाषा दिन म्हणून कोणता दिन साजरा केला जातो? (म्हाडा व.लि. -2015)
A) २७ फेब्रुवारी
B) २८ फ़ेब्रुवारी
C) १ मार्च
D) २ मार्च
उत्तर : A) २७ फेब्रुवारी
Q.40) 'ळ' हा वर्ण मराठी भाषेमध्ये कोणत्या भाषेतून आला आहे? (महा.सेट. -2015)
A) प्राकृत
B) द्रविड
C) आर्य
D) आसामि
उत्तर : B) द्रविड