०३ ऑक्टोबर २०१९

इम्फाळ येथील राष्ट्रीय क्रिडा विद्यापीठाच्या संदर्भात क्रिडा मंत्रालयाचा NBCC सोबत सल्लागार करार

✍NBCC (इंडिया) लिमिटेड या संस्थेनी केंद्रीय युवा कल्याण व क्रिडा मंत्रालयाच्या क्रिडा विभागासोबत एक सामंजस्य करार केला आहे, ज्याच्या अंतर्गत मणीपूर राज्याच्या इम्फाळ या शहरात ‘राष्ट्रीय क्रिडा विद्यापीठ’ याच्या विकासासाठी प्रकल्प व्यवस्थापनाच्या बाबतीत सल्लागार सेवा प्रदान केली जाणार आहे.

✍या विद्यापीठामुळे क्रिडा क्षेत्रातले शास्त्र, चिकित्सा, तंत्रज्ञान, व्यवस्थापन आणि प्रशिक्षण अश्या विविध विषयांच्या शिक्षणास प्रोत्साहन मिळणार. हे एक राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र म्हणून देखील काम करेल. प्रकल्पाची अंदाजे किंमत 400 कोटी रुपये असणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
   🌸NBCC (इंडिया) बाबत🌸
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✍NBCC (इंडिया) लिमिटेड ही भारत सरकारच्या मालकीचा सार्वजनिक क्षेत्रातला नवरत्न उपक्रम आहे. त्याचे कार्य संपूर्ण भारतात आणि परदेशात देखील पसरलेले आहे. त्याची स्थापना 1960 साली झाली आणि त्याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे. ही संस्था अभियांत्रिकी खरेदी व बांधकाम क्षेत्रात आपली सल्लागार सेवा प्रदान करते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

‘एफई बेस्ट बँक्स’ पुरस्काराने निपुणतेचा सन्मान

  बँक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल इंडसइंड बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश सोबती यांना एक्स्प्रेस समूहातील ‘फायनान्शियल एक्स्प्रेस’द्वारे   आयोजित सोहळ्यात जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

-  बजाज फिनसव्‍‌र्हचे व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यांना ‘बँकर ऑफ द इयर’ने गौरविण्यात आले.

-  देशाच्या बँक, वित्त क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मानाचा समजले जाणाऱ्या ‘एफई बेस्ट बँक्स’ पुरस्कारांचे वितरण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते येथे झाले. यावेळी एक्स्प्रेस समूहाचे अध्यक्ष विवेक गोएंका उपस्थित होते. ‘एजीएस’ प्रस्तुत, रुणवाल व केसरी सहयोगी भागीदार असलेल्या तसेच ईवाय हे ‘नॉलेज प्रोव्हायडर’ असलेल्या या पुरस्कार सोहळ्यात विविध गटात बँक, वित्त तसेच सेवा उत्पादन, तंत्रस्नेही वित्तीय मंचांना सन्मानित करण्यात आले.

- रमेश सोबती हे जीवनगौरव पुरस्काराचे तर बजाज समूहातील बजाज फिनसव्‍‌र्हचे व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज हे ‘बँकर ऑफ द इयर’चे मानकरी ठरले. राष्ट्रीयीकृत बँक, खासगी बँक व विदेशी बँक गटात अनुक्रमे इंडियन बँक, एचडीएफसी बँक आणि एचएसबीसी बँक विजेत्या ठरल्या.

--  इक्विटास स्मॉल फायनान्स बँक ही लहान वित्त बँकांच्या गटातील तर बजाज फायनान्स व क्रेडिटएक्सेस ग्रामीण हे गैर बँकिंग वित्त कंपनी गटात अव्वल ठरले. गृह कर्ज उत्पादन श्रेणीत स्टेट बँक, बचत उत्पादन श्रेणीत कोटक महिंद्र बँक सर्वोत्कृष्टतेच्या मानकरी ठरल्या. तंत्रस्नेही वित्तीय मंचांच्या गटात (डिजिटल बँक) अ‍ॅक्सिस बँक व (फिनटेक) रेझरपे, क्रेडिटविद्या, लोन फ्रेम, अ‍ॅको जनरल इन्शुरन्स, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) हे पुरस्कारपात्र ठरले.
——————————————————————--

महत्त्वाचे प्रादेशिक पुरस्कार

● महाराष्ट्र भूषण पुरस्कार :-
२०१५:- बाबासाहेब पुरंदरे
२०११:- डॉ. अनिल काकोडकर
२०१०:- जयंत नारळीकर

● लता मंगेशकर पुरस्कार :-
२०१८:- विजय पाटील
२०१७:- पुष्पा पागधरे
२०१६:- उत्तमसिंग

● जनस्थान पुरस्कार :-
२०१९:- वसंत डहाके
२०१७:- डॉ. विजय राजाध्यक्ष
२०१३:- भालचंद्र नेमाडे

● गदिमा पुरस्कार :-
२०१८:- सई परांजपे
२०१७:- प्रभाकर जोग
२०१६: सुमन कल्याणपूरकर

● राजश्री शाहू पुरस्कार:-
२०१९:- अण्णा हजारे
२०१८:- पुष्पा भावे
२०१७:- डॉ रघुनाथ माशेलकर

● पुण्यभूषण पुरस्कार:-
२०१९:- डॉ. गो. ब. देगुलरकर
२०१८:- प्रभा अत्रे
२०१७:- डॉ. के. एच. संचेती

● ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार :-
२०१८:- किसन महाराज साखरे
२०१७:- ह. भ. प. निवृत्ती महाराज वक्ते
२०१६:- डॉ. उषा माधव देशमुख

● चतुरंग जीवनगौरव पुरस्कार:-
२०१८:- सुहास बाहुलकर
२०१७:- डॉ. गो. ब. देगलूरकर
२०१६:- सदाशिव गोरक्षकर

● यंशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार:-
२०१८:- डॉ. रघुराम राजन

● मास्टर दीनानाथ मंगेशकर(जीवनगौरव पुरस्कार ):-
२०१९;- सलीम खान

● कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार :-
२०१८:- वेद राही
२०१७:- डॉ. एच.एस. शिवप्रकाश
२०१६:- विष्णू खरे

--------------------------------------------------------

स्वच्छता सर्वेक्षणात राजस्थानमधील तीन रेल्वे स्थानकांनी स्वच्छतेसाठी सर्वोत्कृष्ट

♻️ मुंबईतील ३ उपनगरीय स्थानकेही अव्वल

♻️ रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी बुधवारी जाहीर केलेल्या रेल्वेच्या स्वच्छता सर्वेक्षणात राजस्थानमधील तीन रेल्वे स्थानकांनी स्वच्छतेसाठी सर्वोत्कृष्ट पुरस्काराचा मान मिळवला. उपनगरीय स्थानकांमध्ये हा मान मिळवणाऱ्यांत मुंबईतील ३ स्थानके आहेत.

♻️ रेल्वेच्या देशभरातील ७२० स्थानकांपैकी जयपूर, जोधपूर व दुर्गापुरा या तीन स्थानकांनी यादीत पहिल्या तीन क्रमांकांवरील स्थान पटकावले. १०९ उपनगरीय स्थानकांपैकी मुंबईतील अंधेरी, विरार व नायगाव ही तीन स्थानके पहिल्या तीन क्रमांकांची ठरली.

♻️ रेल्वेचा विभागनिहाय विचार करता, उत्तर पश्चिम रेल्वेने पहिला क्रमांक मिळवला. त्याखालोखाल दक्षिण पूर्व मध्य रेल्वे आणि पूर्व मध्य रेल्वे यांचा अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक

♻️ २०१६ सालापासून रेल्वे देशभरातील ४०७ महत्त्वाच्या स्थानकांच्या स्वच्छतेबाबत तटस्थ यंत्रणेकडून अंकेक्षण करून त्यांची क्रमवारी जाहीर करत असते.

♻️ या वर्षी याचा ७२० स्थानकांपर्यंत विस्तार करण्यात येऊन पहिल्यांदाच उपनगरीय स्थानकांचाही समावेश.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘आम्ही भारतीय नागरिक भारताशी प्रामाणिक आहोत’ या वाक्याती उद्देश ओळखा.

   1) आम्ही भारतीय नागरिक    2) भारतीय नागरिक
   3) आज भारताशी      4) प्रामाणिक आहोत

उत्तर :- 1

2) ‘तो प्रसंग अत्यंत हदयद्रावक होता’ – या वाक्यातील प्रयोग ओळखा.

   1) भावे प्रयोग    2) सकर्मक कर्तरी प्रयोग   
   3) कर्मणी प्रयोग    4) अकर्मक कर्तरी प्रयोग

उत्तर :- 4

3) पुढील शब्दाचा समास ओळखा – ‘अनंत’

   1) नत्र बहुव्रीही समास    2) व्दिगू समास   
   3) समाहार व्दंव्द – समास  4) मध्यमपदलोपी समास

उत्तर :- 1

4) ‘बापरे .................. केवढा ‘मोठा हा साप’ या वाक्यात गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल ?

   1) पूर्णविराम    2) उद्गारवाचक चिन्ह   
   3) अर्धविराम    4) प्रश्नचिन्ह

उत्तर :- 2

5) ‘ज-स-ज-स-य-ल-ग’ हे खालीलपैकी कोणत्या वृत्ताचे गण आहेत ?

   1) मंदाक्रांता    2) वसंततिलका     
   3) शिखरिणी    4) पृथ्वी

उत्तर :- 4

6) या टोपीखाली दडलंय काय?

   1) उभयान्वयी अव्यय    2) शब्दयोगी अव्यय   
   3) क्रियाविशेषण अव्यय    4) केवलप्रयोगी अव्यय

उत्तर :- 2

7) ‘मरावे परी किर्तीरुपे उरावे !’ या वाक्यातील ‘परी’ या शब्दाने कोणते उभयान्वयी अव्यय सुचित होते.

   1) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय    2) न्युनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
   3) स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय      4) उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 2

8) केवलप्रयोगी अव्ययांचे एकूण प्रकार किती ?

   1) सात    2) आठ     
   3) नऊ    4) दहा

उत्तर :- 3

9) खालील वाक्यातील काळ ओळखा.
     ‘मधू लाडू खात जाईल’

   1) साधा भविष्यकाळ    2) अपूर्ण भविष्यकाळ
   3) पूर्ण भविष्यकाळ    4) रीती भविष्यकाळ

उत्तर :- 4

10) पुढील शब्दाचे लिंग ओळखा. – विदुषी

   1) पुल्लिंगी    2) नपुंसकलिंगी   
   3) स्त्रीलिंगी    4) यापैकी नाही

उत्तर :- 3

चालू घडामोडी प्रश्नसंच

📌कोणत्या ठिकाणी इंडियन ऑइल कंपनीने प्लास्टिकच्या कचर्‍यापासून रस्ता तयार केला आहे?

(A) मुरादाबाद
(B) फरीदाबाद✅✅✅
(C) बरेली
(D) नागपूर

📌कोणती व्यक्ती जगातली सर्वाधिक श्रीमंत महिला म्हणून ‘फोर्ब्स 400 लिस्ट’ या शीर्षकाखाली नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या यादीत अग्रस्थानी आहे?

(A) ज्युलिया कोच
(B) अ‍ॅलिस वॉल्टन✅✅✅
(C) जॅकलिन मार्स
(D) क्रिस्टी वॉल्टन

📌वीजनिर्मिती प्रकल्पांना होणार्‍या कोळश्याच्या पुरवठ्यावर नजर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कोणते डिजिटल व्यासपीठ सुरू केले आहे?

(A) उज्ज्वल
(B) प्रकाश✅✅✅
(C) रोशनी
(D) त्रिनेत्र

📌लोकांमध्ये आर्थिक आणि डिजिटल साक्षरता निर्माण करण्यासाठी HDFC बँकेनी _ नावाने एक उपक्रम राबवविण्यास सुरूवात केली आहे.

(A) प्रगती रथ✅✅✅
(B) उडान
(C) ज्ञान रथ
(D) उद्यम रथ

📌___ या तारखेला जागतिक पशू दिन साजरा केला जातो.

(A) 3 ऑक्टोबर
(B) 7 ऑक्टोबर
(C) 4 ऑक्टोबर✅✅✅
(D) 10 ऑक्टोबर

📌कोणत्या देशाने ‘मिनिटेमन III’ नावाच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली?

(A) उत्तर कोरिया
(B) चीन
(C) अमेरिका✅✅✅
(D) इराण

📌केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) _ जलविद्युत प्रकल्पावर पाळत ठेवण्याची घोषणा केली आहे.

(A) बागलीहार जलविद्युत प्रकल्प✅✅✅
(B) किशनगंगा जलविद्युत प्रकल्प
(C) पाकल दुल प्रकल्प
(D) सलाल जलविद्युत प्रकल्प

📌दोहा (कतार) येथे जागतिक क्रिडा अजिंक्यपद 2019 या स्पर्धेमध्ये 800 मीटर हेप्टाथलॉन या शर्यतीचे सुवर्णपदक कोणी जिंकले?

(A) कटारिना जॉनसन थॉम्पसन✅✅✅
(B) व्हेरेना प्रीनर
(C) नाफिसातौ थियाम
(D) लॉरा मुइर

📌भारत आणि कझाकस्तान या देशांचा “KAZIND-2019” नावाचा लष्करी सराव _____ येथे आयोजित करण्यात आला आहे.

(A) राजस्थान
(B) उत्तराखंड✅✅✅
(C) हिमाचल प्रदेश
(D) केरळ

📌चीनच्या “DF-41” संदर्भात खाली दिलेल्यापैकी कोणते विधान चुकीचे आहे?

I) “DF-41” म्हणजे डॉन्कफेन्क-41 होय.

II) “DF-41” हे पृथ्वीवरचे सर्वात शक्तिशाली आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असल्याचे मानले जाते.

(A) केवळ I✅✅✅
(B) केवळ II
(C) केवळ I आणि II
(D) सर्व बरोबर आहेत

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...