Thursday, 3 October 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. – ज्याने हे भांडण उरकले, तो माघार घेईल.

   1) दर्शक सर्वनाम    2) संबंधी सर्वनाम   
   3) आत्मवाचक सर्वनाम    4) पुरुषवाचक सर्वनाम

उत्तर :- 2

2) ‘झाड पाडले’ या वाक्यात ‘पाडले’ या क्रियापदाचा प्रकार ओळखा.

   1) संयुक्त क्रियापद    2) प्रयोजक क्रियापद
   3) अनियमित क्रियापद    4) शक्य क्रियापद

उत्तर :- 2

3) ‘मला बोलवत नाही’ अधोरेखित शब्दाचा क्रियापद प्रकार ओळखा.

   1) प्रयोजक      2) शक्य     
   3) सहाय्यक      4) अकर्तृक
उत्तर :- 2

4) पर्यायी उत्तरांतील ‘अवधिवाचक कालवाचक क्रिया – विशेषण’ कोणते ?

   1) दिवसेंदिवस थंडी वाढतच गेली      2) पक्षीण क्षणोक्षणी पडत होती
   3) नेहमी त्यांचे असेच असते      4) तो कैकवेळा सांगूनही आला नाही

उत्तर :- 3

5) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. – कोंडिबा झाडाखाली शांत झोपला होता.

   1) केवलप्रयोगी      2) क्रियाविशेषण   
   3) शब्दयोगी अव्यय    4) नाम

उत्तर :- 3

6) क्रियापद म्हणजे........................

   1) केवळ क्रियादर्शक शब्द      2) क्रियेबद्दल माहिती सांगणारा शब्द
   3) क्रिया संपविणारा शब्द      4) वाक्य पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द

उत्तर :- 4

7) क्रियाविशेषणाचे प्रकार व उदाहरणे यातील विसंगत जोडी ओळखा.

   अ) स्थलवाचक – लांबून, समोरून, मधून
   ब) कालवाचक – काही, कधीही, क्रमश:
   क) संख्यावाचक – अतिशय, दोनदा, पुष्कळ
   ड) रीतिवाचक – चटकन, आपोआप, भरभर

   1) फक्त अ बरोबर    2) फक्त ब बरोबर    3) फक्त क बरोबर    4) फक्त ड बरोबर

उत्तर :- 2

8) खालील गटातील शब्दयोगी अव्यये नसलेला गट ओळखा.

   1) घरावर, टेबलाखाली, ढगामागे      2) अथवा, किंवा, वा, अगर, की
   3) च, ही, मात्र, देखील, सुध्दा      4) कडून, पेक्षा, साठी, वर

उत्तर :- 2

9) ‘तू वाईट वागतोस म्हणून तुला बोलणी खावी लागतात’ या वाक्यातील ‘म्हणून’ या अव्ययास काय म्हणतात ?

   1) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय    2) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय
   3) उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय      4) कारकबोधक उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 1

10) अयोग्य पर्याय निवडा.

   अ) केवलप्रयोगी अव्ययांना विभक्ती प्रत्यय नसतो.
   ब) केवलप्रयोगी अव्यय वाक्याचा भाग असतात.

   1) अ      2) ब      3) दोन्ही      4) दोन्ही नाही

उत्तर :- 2

चालू घडामोडी प्रश्नसंच 4/10/2019

📌गुगल कंपनीने 1 ऑक्टोबर रोजी डॉ. हर्बर्ट क्लेबर यांच्या उत्कृष्ट योगदानाचा गौरव केला. डॉ. क्लेबर कशासाठी प्रसिद्ध होते?

(A) मानसशास्त्रज्ञ✅✅✅
(B) ऑन्कोलॉजिस्ट
(C) चिकित्सक
(D) कृषीशास्त्रज्ञ

📌कोणत्या विषयाखाली 2 ऑक्टोबर 2019 रोजी केंद्र सरकारच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पर्यटन पर्व 2019’ या कार्यक्रमाला सुरुवात झाली?

(A) पधारो म्हारे देश
(B) देखो अपना देश✅✅✅
(C) टुरिझम रिस्पोंडींग टू द चॅलेंज ऑफ क्लायमेट चेंज अँड ग्लोबल वार्मिंग
(D) वसुधैव कुटुंबकम: इंडिया अँड द वर्ल्ड

📌3 ऑक्टोबर रोजी _ येथे ‘जागतिक आर्थिक मंच’च्या ‘भारत आर्थिक शिखर परिषद’ची 33 वी बैठक आयोजित करण्यात आली आहे.

(A) नवी दिल्ली✅✅✅
(B) मुंबई
(C) हैदराबाद
(D) बेंगळुरू

📌ओडिशाच्या चांदीपूर येथे यशस्वीपणे चाचणी घेण्यात आलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या जमिनी-आवृत्तीची मारा क्षमता ____ एवढी आहे.

(A) 290 किलोमीटर✅✅✅
(B) 450 किलोमीटर
(C) 320 किलोमीटर
(D) 270 किलोमीटर

📌तैवानमध्ये धडकलेल्या _ चक्रीवादळामुळे कमाल 162 किलोमीटर प्रतितास गतीने वारे वाहू लागले, ज्यामुळे अनेक लोक जखमी झालेत आणि हजारो घरे अंधारात गेली व शेतीचे क्षेत्र नष्ट झाले.

(A) पाबुक
(B) मिताग✅✅✅
(C) एलिस
(D) वूटीप

📌नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्स' संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या,

I. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने निर्देशांक प्रसिद्ध केला आहे.

II. या यादीत केरळ आणि बिहार अनुक्रमे प्रथम व तळाशी आहेत.

III. शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात कोणत्याही केंद्रशासित प्रदेशाचे मूल्यांकन केले गेले नाही.

वरती दिलेले कोणते विधान अचूक आहे?

(A) केवळ I
(B) एकही नाही✅✅✅
(C) I आणि II
(D) II आणि III

📌____________________ याच्यावतीने देशभरात 15 दिवस चालणारा “अॅप्रेंटिसशिप पखवाडा’ नावाचा कार्यक्रम राबविण्यास सुरू करण्यात आला आहे.

(A) कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय
✅✅✅
(B) कामगार व रोजगार मंत्रालय
(C) सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय
(D) मनुष्यबळ विकास मंत्रालय

📌_____________ याला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्यावतीने नवी दिल्लीत ‘आरोग्य मंथन’ नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

(A) आयुषमान भारत✅✅✅
(B) स्वच्छ भारत
(C) राष्ट्रीय पोषण मिशन
(D) मिशन इंद्रधनुष

📌NBCC या संस्थेनी राष्ट्रीय क्रिडा विद्यापीठाच्या विकासासाठी क्रिडा मंत्रालयासोबत सामंजस्य करार केला आहे. त्यासंदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या,

I. प्रस्तावित विद्यापीठ अरुणाचल प्रदेशात उभारले जाणार आहे.

II. NBCC ही एक मिनीरत्न कंपनी आहे जी या प्रकल्पांसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार सेवा प्रदान करणार आहे.

III. क्रिडाशास्त्र, क्रिडा चिकित्सा, क्रिडा व्यवस्थापन, क्रिडा प्रशिक्षण व क्रिडा तंत्रज्ञान इत्यादी विषयांमध्ये क्रिडा विषयक शिक्षण देणारे विद्यापीठ अत्याधुनिक असे पहिलेच विद्यापीठ असणार.

वर दिलेले कोणते विधान चुकीचे आहे?

(A) केवळ I
(B) केवळ I आणि II✅✅✅
(C) केवळ II
(D) एकही नाही

नारायण मूर्ती यांना कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार

👉इन्फोसिसचे संस्थापक डॉ. एन. आर. नारायण मूर्ती यांना कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
👉थर्मेक्‍स कंपनीच्या माजी अध्यक्षा अनू आगा यांना रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
👉सन्मानचिन्ह, मानपत्र, अडीच लाख रुपये रोख व रयत वस्त्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

रयत शिक्षण संस्थेचा शंभरावा वर्धापन दिन शुक्रवारी साजरा होणार आहे. हा कार्यक्रम कर्मवीर समाधी परिसराच्या प्रांगणात पार पडणार आहे. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय, रयत परिवाराचे माजी कार्याध्यक्ष डॉ. एन. डी. पाटील, विद्यमान कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, उप कार्याध्यक्ष भगीरथ शिंदे, सहसचिव (माध्यमिक) विजय सावंत, सहसचिव (प्राथमिक) विलास महाडिक उपस्थित राहणार आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या प्रगतीची वाटचाल उलघडून दाखवणारा रयत शिक्षण पत्रिका या कर्मवीर विशेषांकाचे प्रकाशन शरद पवार व डॉ. एन. डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे

बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी विजयादशमीच्या मुहुर्तावर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ४ ऑक्टोबर १९१९ रोजी काले (ता. कराड) येथे सत्यशोधक समाज परिषदेत रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यात ७३७ शाखा १३५५३ सेवकांचे ज्ञानदान व ४५८०४४ विद्यार्थी इतका मोठा पसारा असणारी ही संस्था आशिया खंडातील सर्वात मोठी संस्था समजली जाते. रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयांनी 'नॅक'ची प्रतिष्ठित नामांकने प्राप्त केली असून शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र साताऱ्यात सुरू होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

समाज/सभा स्थापना संस्थापक

१) आत्मीय 1815  राजा राममोहनराय सभा (कलकत्ता)

२) ब्राम्हो   1828  राजा राममोहनराय समाज (कलकत्ता)

३) मानवधर्म  1844  दा. पां.तर्खडकर सभा (सुरत)

४) परमहंस   1848  दा. पां. तर्खडकर सभा (मुंबई)

५) प्रार्थना    1867 तर्खडकर बंधू समाज (मुंबई)

६) सत्यशोधक    1873  म. फूले समाज (पुणे)

७) आर्य      1875  स्वा. द. सरस्वती समाज (मुंबई,लाहोर)

८) आर्य म.    1882    पंडिता रमाबाई समाज (मुंबई,पूणे)

९) रामकृष्ण   1897   स्वा. विवेकानंद मिशन    

१०) देव समाज - शिवनारायण अग्निहोत्री

११) वेद समाज - श्रीधरलू नायडू

दुसरी पंचवार्षिक योजना  (१९५६- १९६१ )

दुसरी ही पंचवार्षिक योजना आहे ज्यात उद्योग, विशेषत: जड उद्योगाकडे लक्ष देण्यात आले आहे. आधीच्या योजनेच्या विरूद्ध, ज्यात प्रामुख्याने कृषी क्षेत्राकडे लक्ष न देता दुसर्‍या योजनेत औद्योगिक उत्पादनांच्या घरगुती उत्पादनास प्रोत्साहन देण्यात आले.  1953 मध्ये भारतीय सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रशांत चंद्र महालनोबिस यांनी विकसित केलेल्या आर्थिक विकासाचे मॉडेल म्हणून विशेषतः सार्वजनिक क्षेत्राचा विकास झाला. योजनेच्या उत्पादक क्षेत्रात आपोआप गुंतवणूकीचे चांगल्या वाटप निश्चित करण्यासाठी दीर्घावधीची आर्थिक वाढ जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केला गेला. यामध्ये ऑपरेशन रिसर्च आणि ऑप्टिमायझेशनच्या कला तंत्राच्या प्रचलित स्थितीचा तसेच इंडियन स्टॅटॅटिकल इंस्टीट्यूटमध्ये विकसित केलेल्या सांख्यिकी मॉडेलच्या कादंबरीतील अनुप्रयोगांचा उपयोग केला गेला. योजना ही बंद अर्थव्यवस्था आहे ज्यात मुख्य व्यवसाय क्रियाकलाप आयात भांडवली वस्तूंवर केंद्रित असेल, प्राप्त झाले भिलाई, दुर्गापूर, राउरकेला इत्यादी पाच स्टील गिरण्यांमध्ये जलविद्युत आणि अवजड प्रकल्प उभारण्यात आले. कोळशाचे उत्पादन वाढविण्यात आले. ईशान्य दिशेला रेल्वे लाईन जोडल्या गेल्या. 1948 मध्येअणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून जहांगीर भाभा यांच्या बरोबर होमीची स्थापना झाली. टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही एक संशोधन संस्था म्हणून स्थापन केली गेली. हुशार तरुण विद्यार्थ्यांना शोधण्याच्या उद्देशाने  1957 मध्ये एक टॅलेंट सर्च आणि शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरू करण्यात आला होता आणि कामाचे क्षेत्र अणुऊर्जाशी संबंधित होते. भारतातील दुस Five्या पंचवार्षिक योजनेंतर्गत एकूण 48 कोटी रुपये देण्यात आले. ही रक्कम विविध क्षेत्रांमध्ये वाटप केली गेली: खाण आणि उद्योग समुदाय आणि कृषी विकास विद्युत आणि सिंचन सामाजिक सेवा दळणवळण आणि वाहतूक संकीर्ण
 आणि वास्तविक वाढ' 27.27%
या योजनेस भौतिक साहित्य देखील म्हणतात

पहिली पंचवार्षिक योजना-  (1951–1956)

पहिले भारतीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू 8 डिसेंबर 1951 रोजी भारतीय संसदेसमोर पहिली पंचवार्षिक योजना सादर केली. ही योजना प्रामुख्याने धरणे व सिंचन गुंतवणूकीसह कृषीभिमुख क्षेत्रावर लक्ष केंद्रित करते. कृषी क्षेत्रात भारताचे विभाजन आणि त्वरित लक्ष देण्याची गरज सर्वात कठीण मानली गेली. ही योजना हेराल्ड-डोमर मॉडेलवर आधारित होती. एकूण 2068 अब्ज (1950 विनिमय दरामध्ये अमेरिकन 23.6 अब्ज डॉलर्स) नियोजित. अर्थसंकल्प सात व्यापक क्षेत्रासाठी देण्यात आले: सिंचन आणि ऊर्जा (२.2.२ टक्के), कृषी व समुदाय विकास (१.4..4 टक्के), वाहतूक व दळणवळण (२ percent टक्के), उद्योग (.4..4 टक्के), सामाजिक सेवा (१.6..64 टक्के), जमीन पुनर्प्राप्ती (1.१ टक्के) आणि इतर क्षेत्र आणि सेवांसाठी (२. 5 टक्के). या टप्प्यातील महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे राज्यातील सर्व आर्थिक क्षेत्रात सक्रिय भूमिका. त्यावेळी अशी भूमिका योग्य होती कारण स्वातंत्र्यानंतर लवकरच भारताला मूलभूत भांडवल आणि कमी क्षमता यासारख्या समस्यांचा सामना करावा लागला. उद्दिष्टाचा वाढीचा दर वार्षिक सकल उत्पन्नाच्या (जीडीपी) वाढीच्या 2.1% होता, साध्यित विकास दर 3.6% होता. निव्वळ देशांतर्गत उत्पादनात 15% वाढ झाली आहे. मान्सून चांगला होता आणि तुलनेने जास्त पीक उत्पादन होते, उत्पादन साठा वाढत होता आणि दरडोई उत्पन्न होते, त्यात 8% वाढ झाली. लोकसंख्येच्या वेगाने वाढ झाल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न दरडोई उत्पन्नापेक्षा अधिक वाढली आहे. याच काळात भाक्रा नांगल धरण आणि हिराकुड धरणासह अनेक पाटबंधारे प्रकल्प सुरू झाले. जागतिक आरोग्य संघटनेने भारत सरकारसमवेत मुलांचे आरोग्य आणि बालमृत्यू यांचे प्रमाण कमी केले, अप्रत्यक्षपणे लोकसंख्या वाढीस हातभार लागला.  1956 च्या नियोजन कालावधीच्या शेवटी, पाच तंत्रज्ञान संस्था म्हणून भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) सुरू केली गेली. विद्यापीठ अनुदान आयोगाने निधीची काळजी घेतली आणि संबंधित क्षेत्रासाठी देशात उच्च शिक्षण दृढपणे स्थापित केले गेले. दुस Five्या पंचवार्षिक योजनेच्या मध्यभागी अस्तित्त्वात आलेल्या पाच पोलाद प्रकल्पांनी सुरूवातीच्या करारावर सही केली. ही योजना हेराल्ड-डोमर मॉडेलवर आधारित होती.

इम्फाळ येथील राष्ट्रीय क्रिडा विद्यापीठाच्या संदर्भात क्रिडा मंत्रालयाचा NBCC सोबत सल्लागार करार

✍NBCC (इंडिया) लिमिटेड या संस्थेनी केंद्रीय युवा कल्याण व क्रिडा मंत्रालयाच्या क्रिडा विभागासोबत एक सामंजस्य करार केला आहे, ज्याच्या अंतर्गत मणीपूर राज्याच्या इम्फाळ या शहरात ‘राष्ट्रीय क्रिडा विद्यापीठ’ याच्या विकासासाठी प्रकल्प व्यवस्थापनाच्या बाबतीत सल्लागार सेवा प्रदान केली जाणार आहे.

✍या विद्यापीठामुळे क्रिडा क्षेत्रातले शास्त्र, चिकित्सा, तंत्रज्ञान, व्यवस्थापन आणि प्रशिक्षण अश्या विविध विषयांच्या शिक्षणास प्रोत्साहन मिळणार. हे एक राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र म्हणून देखील काम करेल. प्रकल्पाची अंदाजे किंमत 400 कोटी रुपये असणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
   🌸NBCC (इंडिया) बाबत🌸
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✍NBCC (इंडिया) लिमिटेड ही भारत सरकारच्या मालकीचा सार्वजनिक क्षेत्रातला नवरत्न उपक्रम आहे. त्याचे कार्य संपूर्ण भारतात आणि परदेशात देखील पसरलेले आहे. त्याची स्थापना 1960 साली झाली आणि त्याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे. ही संस्था अभियांत्रिकी खरेदी व बांधकाम क्षेत्रात आपली सल्लागार सेवा प्रदान करते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

‘एफई बेस्ट बँक्स’ पुरस्काराने निपुणतेचा सन्मान

  बँक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल इंडसइंड बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश सोबती यांना एक्स्प्रेस समूहातील ‘फायनान्शियल एक्स्प्रेस’द्वारे   आयोजित सोहळ्यात जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

-  बजाज फिनसव्‍‌र्हचे व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यांना ‘बँकर ऑफ द इयर’ने गौरविण्यात आले.

-  देशाच्या बँक, वित्त क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मानाचा समजले जाणाऱ्या ‘एफई बेस्ट बँक्स’ पुरस्कारांचे वितरण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते येथे झाले. यावेळी एक्स्प्रेस समूहाचे अध्यक्ष विवेक गोएंका उपस्थित होते. ‘एजीएस’ प्रस्तुत, रुणवाल व केसरी सहयोगी भागीदार असलेल्या तसेच ईवाय हे ‘नॉलेज प्रोव्हायडर’ असलेल्या या पुरस्कार सोहळ्यात विविध गटात बँक, वित्त तसेच सेवा उत्पादन, तंत्रस्नेही वित्तीय मंचांना सन्मानित करण्यात आले.

- रमेश सोबती हे जीवनगौरव पुरस्काराचे तर बजाज समूहातील बजाज फिनसव्‍‌र्हचे व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज हे ‘बँकर ऑफ द इयर’चे मानकरी ठरले. राष्ट्रीयीकृत बँक, खासगी बँक व विदेशी बँक गटात अनुक्रमे इंडियन बँक, एचडीएफसी बँक आणि एचएसबीसी बँक विजेत्या ठरल्या.

--  इक्विटास स्मॉल फायनान्स बँक ही लहान वित्त बँकांच्या गटातील तर बजाज फायनान्स व क्रेडिटएक्सेस ग्रामीण हे गैर बँकिंग वित्त कंपनी गटात अव्वल ठरले. गृह कर्ज उत्पादन श्रेणीत स्टेट बँक, बचत उत्पादन श्रेणीत कोटक महिंद्र बँक सर्वोत्कृष्टतेच्या मानकरी ठरल्या. तंत्रस्नेही वित्तीय मंचांच्या गटात (डिजिटल बँक) अ‍ॅक्सिस बँक व (फिनटेक) रेझरपे, क्रेडिटविद्या, लोन फ्रेम, अ‍ॅको जनरल इन्शुरन्स, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) हे पुरस्कारपात्र ठरले.
——————————————————————--

महत्त्वाचे प्रादेशिक पुरस्कार

● महाराष्ट्र भूषण पुरस्कार :-
२०१५:- बाबासाहेब पुरंदरे
२०११:- डॉ. अनिल काकोडकर
२०१०:- जयंत नारळीकर

● लता मंगेशकर पुरस्कार :-
२०१८:- विजय पाटील
२०१७:- पुष्पा पागधरे
२०१६:- उत्तमसिंग

● जनस्थान पुरस्कार :-
२०१९:- वसंत डहाके
२०१७:- डॉ. विजय राजाध्यक्ष
२०१३:- भालचंद्र नेमाडे

● गदिमा पुरस्कार :-
२०१८:- सई परांजपे
२०१७:- प्रभाकर जोग
२०१६: सुमन कल्याणपूरकर

● राजश्री शाहू पुरस्कार:-
२०१९:- अण्णा हजारे
२०१८:- पुष्पा भावे
२०१७:- डॉ रघुनाथ माशेलकर

● पुण्यभूषण पुरस्कार:-
२०१९:- डॉ. गो. ब. देगुलरकर
२०१८:- प्रभा अत्रे
२०१७:- डॉ. के. एच. संचेती

● ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार :-
२०१८:- किसन महाराज साखरे
२०१७:- ह. भ. प. निवृत्ती महाराज वक्ते
२०१६:- डॉ. उषा माधव देशमुख

● चतुरंग जीवनगौरव पुरस्कार:-
२०१८:- सुहास बाहुलकर
२०१७:- डॉ. गो. ब. देगलूरकर
२०१६:- सदाशिव गोरक्षकर

● यंशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार:-
२०१८:- डॉ. रघुराम राजन

● मास्टर दीनानाथ मंगेशकर(जीवनगौरव पुरस्कार ):-
२०१९;- सलीम खान

● कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार :-
२०१८:- वेद राही
२०१७:- डॉ. एच.एस. शिवप्रकाश
२०१६:- विष्णू खरे

--------------------------------------------------------

स्वच्छता सर्वेक्षणात राजस्थानमधील तीन रेल्वे स्थानकांनी स्वच्छतेसाठी सर्वोत्कृष्ट

♻️ मुंबईतील ३ उपनगरीय स्थानकेही अव्वल

♻️ रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी बुधवारी जाहीर केलेल्या रेल्वेच्या स्वच्छता सर्वेक्षणात राजस्थानमधील तीन रेल्वे स्थानकांनी स्वच्छतेसाठी सर्वोत्कृष्ट पुरस्काराचा मान मिळवला. उपनगरीय स्थानकांमध्ये हा मान मिळवणाऱ्यांत मुंबईतील ३ स्थानके आहेत.

♻️ रेल्वेच्या देशभरातील ७२० स्थानकांपैकी जयपूर, जोधपूर व दुर्गापुरा या तीन स्थानकांनी यादीत पहिल्या तीन क्रमांकांवरील स्थान पटकावले. १०९ उपनगरीय स्थानकांपैकी मुंबईतील अंधेरी, विरार व नायगाव ही तीन स्थानके पहिल्या तीन क्रमांकांची ठरली.

♻️ रेल्वेचा विभागनिहाय विचार करता, उत्तर पश्चिम रेल्वेने पहिला क्रमांक मिळवला. त्याखालोखाल दक्षिण पूर्व मध्य रेल्वे आणि पूर्व मध्य रेल्वे यांचा अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक

♻️ २०१६ सालापासून रेल्वे देशभरातील ४०७ महत्त्वाच्या स्थानकांच्या स्वच्छतेबाबत तटस्थ यंत्रणेकडून अंकेक्षण करून त्यांची क्रमवारी जाहीर करत असते.

♻️ या वर्षी याचा ७२० स्थानकांपर्यंत विस्तार करण्यात येऊन पहिल्यांदाच उपनगरीय स्थानकांचाही समावेश.

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...