1) खालीलपैकी किती संमतिदर्शक अव्यये आहे.
हां, जी, जीहां, ठीक, बराय, हाँ, अच्छा
1) सर्व 2) सहा 3) पाच 4) चार
उत्तर :- 1
2) ‘मी निबंध लिहीत असे’ या वाक्यातील काळ ओळखा.
1) अपूर्ण भूतकाळ 2) रीती वर्तमानकाळ
3) रीती भूतकाळ 4) रीती भविष्यकाळ
उत्तर :- 3
3) “हंस” या शब्दाचा विरुध्दलिंगी शब्द शोधा.
1) हंसी 2) हंसा 3) हंसीण 4) हंसीका
उत्तर :- 1
4) रामाहून गोविंदा मोठा आहे.
अधोरेखित शब्दातील विभक्ती प्रत्ययाचा कारकार्थ खालीलपैकी कोणता आहे ?
1) कर्ता 2) संप्रदान 3) अपादान 4) करण
उत्तर :- 3
5) वाक्यप्रकार ओळखा.
आई वडिलांचा मान राखावा.
1) आज्ञार्थी 2) विध्यर्थी
3) संकेतार्थी 4) वरीलपैकी कोणतेही नाही
उत्तर :- 2
6) ‘ळ’ हा .................................. वर्ण मानला जातो.
1) स्वतंत्र 2) महाप्राण
3) संयुक्त स्वर 4) स्वर
उत्तर :- 1
7) ‘मनस् + पटल’ हा कोणत्या संधीयुक्त शब्दाचा विग्रह आहे.
1) मन:पटल 2) मनसपटल
3) मनीपटल 4) म : नटपल
उत्तर :- 1
8) भाववाचक नामाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा.
1) सुंदर – सौंदर्य 2) नवल – नवली
3) शूर – शौर्य 4) गंभीर – गांभीर्य
उत्तर :- 2
9) ‘लोकांनी आपण होऊन श्रमदान केले’ या वाक्यातील आपण या सर्वनामाचा प्रकार ओळखा.
1) अनुसंबंधी सर्वनाम 2) आत्मवाचक सर्वनाम
3) दर्शक सर्वनाम 4) सर्वनामोत्पन्न सर्वनाम
उत्तर :- 2
10) ‘पृथकत्ववाचक’ संख्या विशेषणाचे उदाहरण कोणते ?
1) छपन्न मोती 2) पाचवी खेप
3) थोडी विश्रांती 4) एकेक मुलगा
उत्तर :- 4