30 September 2019

मालदीव आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा : मुंबईकर कौशल धर्मामेरने पटकावले विजेतेपद

♻️ भारताचा प्रतिभावान बॅडमिंटनपटू कौशल धर्मामेरने रविवारी मालदीव आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.

♻️ मुंबईच्या २३ वर्षीय कौशलने सिरिल वर्माला अवघ्या ३५ मिनिटांत २१-१३, २१-१८ अशी धूळ चारली.

♻️ कौशलव्यतिरिक्त भारताच्या तीन जोडय़ांना अंतिम फेरीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

♻️ महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी यांना जपानच्या सायाक होबारा आणि नात्सुकी सोनी यांच्याकडून १०-२१, २१-१७, १२-२१ असा पराभव पत्करावा लागला.

♻️ मिश्र दुहेरीत थायलंडच्या चॅलेम्पोन किटामॉन आणि चायनीज कोरेपॅप यांनी भारताच्या साईप्रतीक कृष्णप्रसाद आणि अश्विनी भट्ट यांचा २१-११, २१-१५ असा धुव्वा उडवला.

♻️ पुरुष दुहेरीत अरुण जॉर्ज आणि सनम शुक्ला यांना जपानच्या अग्रमानांकित केचिरो मत्सुई आणि योशिनोरी ताकेहुची यांनी २१-९, २२-२० असे नमवले.

महत्वपूर्ण चालू घडामोडी सराव प्रश्नावली

📌5 सप्टेंबर 2019 रोजी कोणत्या राज्याने संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेबरोबर (UNESCO) भागीदारी केली?

(A) गुजरात
(B) राजस्थान✅✅✅
(C) केरळ
(D) झारखंड

📌नॉर्वे या देशात भारताचे नवे राजदूत कोण असणार आहेत?

(A) सुजाता सिंग
(B) विजय केशव गोखले
(C) डॉ. बी. बाला भास्कर✅✅✅
(D) कृष्ण कुमार

📌दक्षिण आशियातल्या कोणत्या देशाला 3 सप्टेंबर 2019 रोजी जागतिक पशू-आरोग्य संघटनेनी (OIE) एव्हियन इन्फ्लूएंझा (H5N1) या विषाणूपासून मुक्त असल्याचे घोषित केले?

(A) भारत✅✅✅
(B) बांग्लादेश
(C) नेपाळ
(D) पाकिस्तान

📌जागतिक आर्थिक मंचाच्या (WEF) ‘प्रवास व पर्यटन स्पर्धात्मकता अहवाल 2019’ यानुसार कोणता देश आशियातली सर्वाधिक स्पर्धात्मक प्रवास व पर्यटन अर्थव्यवस्था असल्याचे आढळले?

(A) भारत
(B) चीन
(C) जापान✅✅✅
(D) थायलंड

📌कोणता देश जागतिक आर्थिक मंचाच्या (WEF) ‘प्रवास व पर्यटन स्पर्धात्मकता निर्देशांक (TTCI) 2019’ या यादीत प्रथम स्थानी आहे?

(A) जापान
(B) स्पेन✅✅✅
(C) फ्रान्स
(D) जर्मनी

📌जागतिक आर्थिक मंचाच्या (WEF) ‘प्रवास व पर्यटन स्पर्धात्मकता निर्देशांक (TTCI) 2019’ या यादीत भारताचा कोणता क्रमांक आहे?

(A) 25
(B) 34✅✅✅
(C) 35
(D) 24

📌सातवी प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (RCEP) मंत्रिस्तरीय बैठक मंत्री बैठक कुठे आयोजित केली गेली?

(A) थायलंड✅✅✅
(B) मलेशिया
(C) म्यानमार
(D) भारत

📌खालीलपैकी कोणता चंद्रयान-2 मोहिमेचा भाग नाही?

(A) लुनार ऑर्बिटर
(B) विक्रम लँडर
(C) प्रज्ञान रोव्हर
(D) द्रुष्टी दुर्बिण✅✅✅

📌कोणत्या व्यक्तीला इटलीमध्ये व्हॅटिकनच्यावतीने 'लॅम्प ऑफ पीस ऑफ सेंट फ्रान्सिस' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले?

(A) अजय बंगा
(B) मुहम्मद युनुस✅✅✅
(C) अफ्रोझी युनुस
(D) वेरा फोरोस्टेन्को

चालू घडामोडी प्रश्नसंच 30/9/2019

📌चीफ ऑफ स्टाफ कमिटी (COSC) याच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली?

(A) बी. सुरेश
(B) बिपिन रावत✅✅✅
(C) नितेश साहा
(D) राजीव सिन्हा

📌'राईट लाईव्हलीहूड' या पुरस्काराच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या आणि अचूक विधान ओळखा.

1. पुरस्काराला "पर्यायी नोबेल पुरस्कार" म्हणून ओळखले जाते.

2. 2019 साली हा पुरस्कार केवळ ग्रेटा थनबर्ग यांना देण्यात आला.

(A) केवळ 1✅✅✅
(B) केवळ 2
(C) 1 आणि 2 दोन्ही
(D) ना 1 ना 2

📌असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) याचे नवीन अध्यक्ष कोण आहेत?

(A) दिनबंधू महापात्रा
(B) निलेश शाह✅✅✅
(C) अरुंधती भट्टाचार्य
(D) चंदा कोचर

📌_____ ने कृष्णविवराचे नवीन दृष्य-स्वरूप प्रसिद्ध केले आहे.

(A) CNSA
(B) JAXA
(C) ISRO
(D) NASA✅✅✅

📌आंतरराष्ट्रीय अणुशस्त्रे निरस्त्रिकरण दिन कधी साजरा केला जातो?

(A) 20 सप्टेंबर
(B) 21 सप्टेंबर
(C) 26 सप्टेंबर✅✅✅
(D) 25 सप्टेंबर

📌न्यूयॉर्क येथे आयोजित गोलकीपर्स ग्लोबल गोल अवॉर्ड्सच्या वितरण सोहळ्यात  ‘चेंजमेकर’ पुरस्कार कोणाला दिला गेला?

(A) लिडियन नादस्वरम
(B) कॅमेलिया कैथी खरबींगर
(C) पायल जांगिड✅✅✅
(D) ग्रेटा थनबर्ग

📌कोणत्या ठिकाणी ‘गांधी पीस गार्डन’चे उद्घाटन झाले?

(A) भारत
(B) न्यूयॉर्क✅✅✅
(C) दक्षिण आफ्रिका
(D) कॅनडा

📌_______ हे वर्ष जगभरातून क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे जागतिक लक्ष्य आहे.

(A) 2022
(B) 2020
(C) 2025
(D) 2030✅✅✅

📌_ ह्यांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) याचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

(A) एस. एस. मल्लिकार्जुन राव
(B) अर्जित बसू
(C) क्रिस्टलिना जॉर्जिवा✅✅✅
(D) दिनबंधु महापात्रा

📌आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी नवी दिल्लीत _______ मोहीम राबविण्यास सुरुवात केली.

(A) टीबी हटाओ, देश बचाओ
(B) टीबी हारेगा, देश जीतेगा✅✅✅
(C) इट्स टाइम
(D) प्रोटेक्टिंग पीपल फ्रॉम टीबी


📌26 सप्टेंबर 2019 रोजी पाळण्यात आलेल्या जागतिक सागरी दिनाचा विषय काय होता?

(A) एम्पोवरींग विमेन इन द मेरीटाईम कम्यूनिटी✅✅✅

(B) ईफ यू वांट पीस अँड डेवलपमेंट, वर्क फॉर सोशल जस्टीस

(C) पार्टीसीपेशन

(D) क्लायमेट अॅक्शन फॉर पीस

चालु घडामोडी - 29 सप्टेंबर 2019

🔶 29 सप्टेंबर: जागतिक हृदयदिन

🔶 थीम 2019: "माझे हृदय, आपले हृदय"

🔶 इंदूर विमानतळास सर्वोत्कृष्ट पर्यटक अनुकूल विमानतळ प्रदान करण्यात आला

Open कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेमधून परुपल्ली कश्यप आउट

🔶 जपानच्या केंटो मोमोटाने कोरिया ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

India's कल्ली पुरी यांना 'इंडियाज मोस्ट पॉवरफुल वुमन इन मीडिया' पुरस्काराने गौरविण्यात आले

Bengal बेंगळुरू येथे १० वी एशियन एज ग्रुप चँपियनशिप

Qatar वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेची सुरुवात डोहा, कतार येथे होईल

Ute दुती चंद वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमधून बाहेर

Lo खेलो इंडिया अ‍ॅथलीट्ससाठी शासकीय मंजूरी 7.87 कोटी

🔶 आर्यना सबलेन्का वॉन वुहान ओपन टेनिस शीर्षक 2019

🔶 अमित शहा गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून खाली उतरले

Real बाफटा पुरस्कारासाठी रियल काश्मीर एफसी नामित डॉक्युमेंटरी

PAN आधारशी पॅन जोडण्याची तारीख 31 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली: सरकार

🔶 भारताची मिश्रित रिले टीम टोकियो ऑलिम्पिक २०२० साठी पात्र ठरली

🔶 भारताची मिश्र रिले टीम वर्ल्ड thथलेटिक्स सी च्या शिपशिप अंतिम फेरीत पोहोचली

🔶 भारतीय विमानतळ प्राधिकरण सर्व विमानतळांमध्ये कार्गो कॉम्प्लेक्स स्थापित करेल

London लंडनमध्ये 31 व्या जागतिक सिंधी कॉंग्रेसचे आयोजन

2nd सौरव गांगुलीने दुस 2nd्यांदा कॅब अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला

🔶 राष्ट्रपती राम नाथ कोविंद झारखंडच्या 3-दिवसीय भेटीवर

Ternal परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी वॉशिंग्टन डी.सी. भेट दिली

🔶 ओडिशाचा तपन कुमार मिश्रा सर्वोत्कृष्ट पर्यटक मार्गदर्शक पुरस्कार

🔶 खासदार बिर्ला मेमोरियल पुरस्कार २०१ Than थानू पद्मनाभन यांच्या हस्ते होणार आहे

Adam 2019 रामानुजन पुरस्कार अ‍ॅडम हार्परला देण्यात येईल

Lected निवडलेल्या होमेने ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून सैफ अली खानची घोषणा केली

🔶 सौदी अरेबिया सरकारने सार्वजनिक वर्तन कोड जारी केला

Bu ब्यूनस आयर्स एटीपी चॅलेन्जरमध्ये सेमीफायनलमध्ये सुमित नागल वादळ

🔶 जागतिक पर्यटन मार्ट नवी दिल्ली, भारत येथे आयोजित

🔶 आसाम सरकारने "आपणार घर" योजना सुरू केली

🔶 प्रा ओबैदुल्लाह फहाद यांना १th वा शाह वलीउल्ला पुरस्कार प्रदान.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) खालील विधानातील ‘उद्देश्य’ कोणते ओळखा.

     मला आपल्यासमोर चार शब्दांपेक्षा अधिक लांब भाषण करवत नाही.
   1) भाषण    2) समोर      3) अधिक    4) करवत नाही

उत्तर :- 1

2) आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवावे हे ................ या प्रयोगातील वाक्य आहे.

   1) कर्मणी    2) कर्तरी      3) संकरित    4) भावे

उत्तर :- 4

3) पुढील समास कोणत्या प्रकारचा आहे ? – पुरणपोळी

   1) मध्यमपदलोपी समास      2) तत्पुरुष समास 
   3) अव्ययीभाव समास      4) व्दंव्द समास

उत्तर :- 1

4) वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात ?

   1) अर्धविराम    2) स्वल्पविराम    3) संयोगचिन्ह    4) अपूर्णविराम

उत्तर :- 4

5) ‘ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू’
     या काव्य ओळीत कोणत्या अलंकाराचा उपयोग केला आहे ?

   1) उपमा    2) रूपक      3) उत्प्रेक्षा    4) अनन्वय

उत्तर :- 3

6) पुढीलपैकी ‘अभ्यस्त’ शब्द कोणता?

   1) दररोज    2) रात्रंदिवस    3) अभ्यास    4) यापैकी कोणताही नाही

उत्तर :- 4

7) ‘ढळला रे ढळला दिन सख्या, संध्या भिवविती हदया’ या काव्यपंक्तीतील ‘दिन ढळला’ या शब्दसमूहाचा ध्वन्यार्थ सांगा.

   1) दिवस मावळला  2) सूर्य बुडाला    3) आयुष्य संपत आले  4) दिवस संपला

उत्तर :- 3

8) खालील शब्दांपैकी विसंगत शब्द कोणता ?

   1) वाट      2) पंथ      3) रस्ता      4) पथ

उत्तर :- 2

9) ‘नैसर्गिक’ या शब्दाच्या उलट अर्थाचा शब्द निवडा.

   1) प्राकृतिक    2) स्वाभाविक    3) कृत्रिम      4) सृष्टी

उत्तर :- 3

10) ‘बादरायण संबंध असणे’ चा योग्य अर्थ निवडा.

   1) घनिष्ठ मैत्री असणे      2) दुरान्वयाने संबंध असणे
   3) ओढून ताणून संबंध  लावणे    4) शत्रूत्व असणे

उत्तर :- 3

तृतीयपंथी मतदार नोंदणीत मुंबई उपनगर ठरले अव्वल

◾️राज्यातील एकूण ३६ जिल्ह्यांपैकी पुणे जिल्हा पुरुष आणि महिला मतदार संख्येत आघाडीवर आहे तर तृतीयपंथी मतदार नोंदणीत मुंबई उपनगर अव्वल स्थानी आहे.

◾️ राज्यातील एकूण ३६ जिल्ह्यांपैकी पुणे जिल्हा पुरुष आणि महिला मतदार संख्येत आघाडीवर आहे तर तृतीयपंथी मतदार नोंदणीत मुंबई उपनगर अव्वल स्थानी आहे.

◾️ राज्यात ३१ आॅगस्ट २०१९ पर्यंत ४ कोटी ६७ लाख ३७ हजार ८४१ पुरुष मतदार, ४ कोटी २७ लाख ५ हजार ७७७ महिला तर २ हजार ५९३ तृतीयपंथी अशा एकूण ८ कोटी ९४ लाख ४६ हजार २११ मतदारांची नोंदणी झाली आहे.

◾️तृतीयपंथी वर्गवारीमध्ये मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण ५२७ तृतीयपंथी मतदार आहेत.

◾️पुणे जिल्ह्यात एकूण ४० लाख १९ हजार ६६४ पुरुष मतदार तर ३६ लाख ६६ हजार ७४४ महिला मतदार आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण ३९ लाख २९ हजार २३२ पुरुष मतदार तर ३२ लाख ९७ हजार ६७ महिला मतदार आहेत.

◾️ठाणे जिल्ह्यात एकूण ३४ लाख ४७ हजार १४८ पुरुष मतदार आणि २८ लाख ८१ हजार ७७७ महिला मतदार आहेत.

◾️तृतीयपंथी वर्गवारीमध्ये
📌 मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण ५२७ तृतीयपंथी मतदार,
📌ठाणे जिल्ह्यात ४६० आणि
📌पुणे जिल्ह्यात २२८ तृतीयपंथी मतदारांची नोंद करण्यात आली आहे.

◾️ लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील एकूण मतदारांमध्ये २१ लाख १५ हजार ५७५ एवढी वाढ झाली आहे.

◾️ लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात एकूण ८ कोटी ७३ लाख ३० हजार ४८४ मतदार होते तर आता ३१ आॅगस्टपर्यंत ८ कोटी ९४ लाख ४६ हजार २११ एवढी मतदार नोंदणी झाली आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Latest post

2025 चालू घडामोडी

1) जागतिक ऍथलेटिक्सने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत जगातील नंबर एकचा भालाफेकपटू कोण ठरला आहे ? ✅ नीरज चोप्रा 2) नीरज चोप्रा किती गुणसंख्या...