Monday, 30 September 2019

मराठी सराव प्रश्न 1/10/2019


१) खालीलपैकी मृदु वर्ण कोणते?
१) क्            २) ग् ३) च् ४) ट्

२) खालीलपैकी अर्धस्वर कोणते?
१) श्, ष् २) स्, ग्           ३) य्, र् ४) ट्, ठ्

३) व्यंजनामध्ये मुख्यमहाप्राण कोणता?
१) ळ् २) ह् ३) क् ४) च्

४) कंठ तालव्य वर्ण कोणते ते ओळखा?
१) य्, र् २) च्, ह् ३) ए, ऐ ४) त्, थ्

५) कठोर वर्ण ओळखा?
१) ग्, घ् २) ड्, ढ् ३) त्, थ् ४) ब्, भ्

६) प्रद्युन्म या शब्दात व्यंजन किती?
१) आठ २) नऊ ३) सात ४) सहा

७) खालीलपैकी कोणते व्यंजन कंठ्य नाही?
१) घ्          २) ह् ३) ख् ४) म

८) 'गौर्यानंद' या शब्दाचा संधी विग्रह करा?
१) गौरी+आनंद २) गौर+आनंद ३) गोरा+आनंद ४) गोर्य+आनंद

९) 'ईश्वर + इच्छा ' या शब्दाचा संधी करा?
१) ईश्वरइच्छा २) ईश्वरेच्छा ३) ईश्वरिच्छा ४) ईश्वरीच्छा

१०) ' मंत्रालय' या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा?
१) मंत्र+आलय   २) मंत्रा+लय ३) मंत्री+आलय ४) मंत्रा+आलय

११) जगत + ईश्वर या विग्रहाची संधी करा?
१) जगतेश्वर २) जगतईश्वर ३) जगदीश्वर ४) जगदेश्वर

१२) 'वाङनिश्चय' या शब्दाची योग्य फोड करा?
१) वाक् + निःश्चय २) वाग + निश्चय ३) वाङ + निश्चय ४) वाक् + निश्चय

१३) मराठीमध्ये कोणत्या पद्धतीने लिहिल्या जाते?
१) डावीकडून उजवीकडे २) उजवीकडून डावीकडे  ३) डावीकडे डावीकडे  ४) यापैकी नाही

१४) गवीश्वरचा योग्य विग्रह ओळखा?
१) गवी + ईश्वर २) गव् + ईश्वर ३) गो + ईश्वर ४) गवी + श्वर

१५) महोत्सव या संधीची फोड करा?
१) महा + उत्सव २) मही +उत्सव ३) महो + त्सव ४) मह + उत्सव

१६) मातृ + छाया या विग्रहाची संधी करा?
१) मातृछाया      २) मात्रोछाया ३) मातृच्छाया ४) मातृउच्छाया

१७) संधी करा षट् + मास
१) षटमास २) षन्मास ३) षण्मास ४) षंमास

१८) निष्पाप या शब्दचा शब्द संधीनुसार तयार झालेला दुसरा शब्द ?
१) सच्छील २) सच्चरित्र ३)दुष्काळ ४) सदाचार

१९) 'अ' किवा 'आ' पुढे 'ए' किंवा 'ऐ' आल्यास दोहोबद्दल ऐ होतो या नियमात न बसणारा शब्द लिहा ?
१) एकैक २) सदैव ३) गंगैध        ४) मतैक्य

२०) मानु + अंतर या विग्रहाचा संधीयुक्त शब्द कोणता?
१) मानवंतर     २) मनुअंतर     ३) मवंतर ४) मन्वंतर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

⭕उत्तरे:
१) २, २) ३, ३) २, ४) ३ ,५) ३ ,६) ४ ,७) ४, ८) ४, ९) २ ,१०) ४
११) ४ ,१२) ४ ,१३) १ ,१४) ३, १५) १, १६) ३ ,१७) ३ ,१८) ३ ,
१९) ३ ,२०) १

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न


1) ‘ज्येष्ठ नागरिकांचा आदर करा.’ नकारार्थी वाक्य बनवा.

   1) ज्येष्ठ नागरिकांचा मान राखा      2) ज्येष्ठ नागरिकांचा अपमान करू नका
   3) ज्येष्ठ नागरिकांना आदराने वागवा    4) ज्येष्ठ नागरिकांचा अनादर करू नका

उत्तर :- 4

2) ‘शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो’ या वाक्यातील ‘विधानपूरक’ ओळखा.

   1) शरद    2) चांदणे     
   3) गुलमोहर    4) मोहक 

उत्तर :- 4

3) ‘रामाकडून रावण मारला गेला.’ या प्रयोगाचे नाव सांगा ?

   1) कर्तरी प्रयोग    2) कर्मणी प्रयोग   
   3) भावे प्रयोग    4) संकीर्ण प्रयोग
उत्तर :- 2

4) ‘मीठभाकर’ या समाहार व्दंव्द समासाचा विग्रह कसा आहे ?

   1) मीठ किंवा भाकरी      2) मीठ घालून केलेली भाकरी
   3) मीठ, भाकरी व तत्सम पदार्थ    4) भाकरी आणि मीठ

उत्तर :- 3

5) खालील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह निवडा. – केवढी शुभवार्ता आणलीस तू

   1) ,      2) .     
   3) ?      4) !

उत्तर :- 4

6) ‘गुळगुळीत’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा.

   1) रेखीव    2) ओबडधोबड   
   3) पारथर्शी    4) खरखरीत

उत्तर :- 4

7) ‘प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच’ या अर्थाची म्हण ओळखा.
   1) घरोघर मातीच्या चुली      2) जेवीन तर तुपाशी नाही तर उपाशी
   3) चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे  4) गाडयाबरोबर नळयाची यात्रा

उत्तर :- 3

8) ‘आज पाऊस पडावा’ – वाक्यप्रकार ओळखा.

   1) केवल    2) मिश्र     
   3) संयुक्त    4) गौण

उत्तर :- 1

9) ‘दुस-याच्या अंकित असणारा’ – या शब्दसमूहासाठी खाली दिलेल्या शब्द समुहातील लागू पडणा-या शब्दसमूहाचा अचूक पर्याय
      लिहा.

   1) पाताळयंत्री      2) बोकेसंन्यशी   
   3) ताटाखालचे मांजर    4) उंटावरचा शहाणा

उत्तर :- 3

10) शुध्द स्वरूप ओळखा.
   1) पुनजर्न्म    2) पूनर्जन्म   
   3) पुनर्जन्म    4) पूर्नजन्म

उत्तर :- 3

आजचे प्रश्न 1/10/2019

📌कोणत्या व्यक्तीची पुण्यतिथी ‘जागतिक रेबीज दिन’ म्हणून पाळला जाता?

(A) लुईस पाश्चर✅✅✅
(B) चार्ल्स डार्विन
(C) स्टीफन हॉकिंग
(D) मायकेल फॅराडे
-------------------------------
📌मध्यप्रदेश सरकारने घोषणा केल्याप्रमाणे ‘भोपाळ मेट्रो रेल’चे नाव काय आहे?

(A) राजा विक्रम
(B) अशोक
(C) राजा भोग✅✅✅
(D) कैलास
---------------------------------------
📌तामिळनाडू क्रिकेट संघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहेत?

(A) रुपा गुरुनाथ✅✅✅
(B) संध्या मजुमदार
(C) लोपामुद्रा भट्टाचारजी
(D) शांता रंगास्वामी
----------------------------------------
📌कोणत्या भारतीय कंपनीला ‘यूनायटेड नेशन्स ग्लोबल क्लायमेट अॅक्शन अवॉर्ड’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) विप्रो
(B) एचसीएल
(C) झेनपॅक
(D) इन्फोसिस✅✅✅
-----------------------------------
📌कोणता आपत्कालीन क्रमांक दिल्ली सरकारने अग्निशमन, रुग्णवाहिका आणि पोलीस आपत्कालीन सेवांसाठी कार्यरत केला?

(A) 122
(B) 199
(C) 202
(D) 112✅✅✅

समाज/सभा स्थापना संस्थापक

१) आत्मीय 1815  राजा राममोहनराय सभा (कलकत्ता)

२) ब्राम्हो   1828  राजा राममोहनराय समाज (कलकत्ता)

३) मानवधर्म  1844  दा. पां.तर्खडकर सभा (सुरत)

४) परमहंस   1848  दा. पां. तर्खडकर सभा (मुंबई)

५) प्रार्थना    1867 तर्खडकर बंधू समाज (मुंबई)

६) सत्यशोधक    1873  म. फूले समाज (पुणे)

७) आर्य      1875  स्वा. द. सरस्वती समाज (मुंबई,लाहोर)

८) आर्य म.    1882    पंडिता रमाबाई समाज (मुंबई,पूणे)

९) रामकृष्ण   1897   स्वा. विवेकानंद मिशन    

१०) देव समाज - शिवनारायण अग्निहोत्री

११) वेद समाज - श्रीधरलू नायडू

​​महाराष्ट्राची ‘शालेय’ गुणवत्ता घसरली

👉शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेच्या बाबतीत महाराष्ट्राची घसरण झाली असून, वीस मोठ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र तीनवरून सहाव्या क्रमांकावर फेकला गेला आहे.

👉सन २०१५-१६ हे आधारवर्ष मानून केलेल्या शैक्षणिक गुणवत्ता मापनात

👉केरळचा अव्वल क्रमांक कायम असून,

👉उत्तर प्रदेश शेवटच्या क्रमांकावर आहे.

👉नीती आयोग, मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि जागतिक बँक यांच्या प्रयत्नांतून तयार झालेल्या या अहवालात
👉वीस मोठ्या राज्यांचा एक गट,
👉आठ लहान राज्यांचा दुसरा गट आणि
👉सात केंद्रशासित प्रदेशांचा तिसरा गट अशी वर्गवारी आली आहे.

👉शैक्षणिक गुणवत्तेच्या मूल्यांकनासाठी दोन श्रेण्या करण्यात आल्या.

👉पहिल्या श्रेणीत शैक्षणिक स्तर, शिक्षणाची संधी, समानता, पायाभूत सोयी-सुविधा यांच्या निष्पत्तीचा आढावा घेण्यात आला, तर

👉दुसऱ्या श्रेणीत या निष्पत्तींना चालना देणाऱ्या प्रशासकीय अंमलबजावणीच्या प्रक्रियांचे निकष निश्चित करण्यात आले. विविध सर्वेक्षणे,राज्यांनी दिलेली माहिती आणि त्रयस्थ पाहणी यांसह ३३ निकषांच्या आधारे राज्यांचे मूल्यांकन करण्यात आले आहे.

जगातील प्रमुख शहरे - सराव प्रश्न

१] निळी मशिद या शहरात आहे?
१] इस्लामाबाद २] बगदाद ३] लाहोर ४] इस्तांबूल

२] या शहराला जपानचे व्हेनिस म्हटले जाते?
१] टोकियो २] ओसाका ३] शांघाई ४] नागासाकी

३] हे येशू ख्रिस्ताचे जनस्थान आहे?
१] बोगोर २] क्योटो ३] बेथलहेम ४] बीजिंग

४] महमंद यांची कबर या शहरात आहे?
१] इस्लामाबाद २] बगदाद ३] मदिना ४] मक्का

५] सोन्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध शहर हे आहे?
१] हरारे २] कैरो ३] इस्तांबूल ४] पर्थ

६] हे शहर हिऱ्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे?
१] पर्थ २] किंबर्ली ३] हेरात ४] केप केनेडी

७] जगातील सर्वात मोठी हिऱ्याची बाजारपेठ आहे?
१] पर्थ २] आटपर्व ३] हेरात ४] केप केनेडी

८] जगातील सर्वात मोठे फुलांचे लिलाव केंद्र हे आहे?
१] बोगोटा २] ऍमस्टरडॅम ३] बोस्टन ४] पर्थ

९] जगातील सर्वात मोठे ग्रंथालय या शहरात आहे?
१] लंडन २] मॉस्को ३] पर्थ ४] मँचेस्टर

१०] विंड सिटी म्हणून या शहराला संबोधले जाते?
१] जेरुसलेम २] ऑक्सफर्ड ३] बोगोटा ४] शिकागो

उत्तरे
१] ४, २] २, ३] ३, ४] ३, ५] १, ६] २, ७] २, ८] २, ९] २, १०] ४

मालदीव आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा : मुंबईकर कौशल धर्मामेरने पटकावले विजेतेपद

♻️ भारताचा प्रतिभावान बॅडमिंटनपटू कौशल धर्मामेरने रविवारी मालदीव आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.

♻️ मुंबईच्या २३ वर्षीय कौशलने सिरिल वर्माला अवघ्या ३५ मिनिटांत २१-१३, २१-१८ अशी धूळ चारली.

♻️ कौशलव्यतिरिक्त भारताच्या तीन जोडय़ांना अंतिम फेरीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

♻️ महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी यांना जपानच्या सायाक होबारा आणि नात्सुकी सोनी यांच्याकडून १०-२१, २१-१७, १२-२१ असा पराभव पत्करावा लागला.

♻️ मिश्र दुहेरीत थायलंडच्या चॅलेम्पोन किटामॉन आणि चायनीज कोरेपॅप यांनी भारताच्या साईप्रतीक कृष्णप्रसाद आणि अश्विनी भट्ट यांचा २१-११, २१-१५ असा धुव्वा उडवला.

♻️ पुरुष दुहेरीत अरुण जॉर्ज आणि सनम शुक्ला यांना जपानच्या अग्रमानांकित केचिरो मत्सुई आणि योशिनोरी ताकेहुची यांनी २१-९, २२-२० असे नमवले.

महत्वपूर्ण चालू घडामोडी सराव प्रश्नावली

📌5 सप्टेंबर 2019 रोजी कोणत्या राज्याने संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेबरोबर (UNESCO) भागीदारी केली?

(A) गुजरात
(B) राजस्थान✅✅✅
(C) केरळ
(D) झारखंड

📌नॉर्वे या देशात भारताचे नवे राजदूत कोण असणार आहेत?

(A) सुजाता सिंग
(B) विजय केशव गोखले
(C) डॉ. बी. बाला भास्कर✅✅✅
(D) कृष्ण कुमार

📌दक्षिण आशियातल्या कोणत्या देशाला 3 सप्टेंबर 2019 रोजी जागतिक पशू-आरोग्य संघटनेनी (OIE) एव्हियन इन्फ्लूएंझा (H5N1) या विषाणूपासून मुक्त असल्याचे घोषित केले?

(A) भारत✅✅✅
(B) बांग्लादेश
(C) नेपाळ
(D) पाकिस्तान

📌जागतिक आर्थिक मंचाच्या (WEF) ‘प्रवास व पर्यटन स्पर्धात्मकता अहवाल 2019’ यानुसार कोणता देश आशियातली सर्वाधिक स्पर्धात्मक प्रवास व पर्यटन अर्थव्यवस्था असल्याचे आढळले?

(A) भारत
(B) चीन
(C) जापान✅✅✅
(D) थायलंड

📌कोणता देश जागतिक आर्थिक मंचाच्या (WEF) ‘प्रवास व पर्यटन स्पर्धात्मकता निर्देशांक (TTCI) 2019’ या यादीत प्रथम स्थानी आहे?

(A) जापान
(B) स्पेन✅✅✅
(C) फ्रान्स
(D) जर्मनी

📌जागतिक आर्थिक मंचाच्या (WEF) ‘प्रवास व पर्यटन स्पर्धात्मकता निर्देशांक (TTCI) 2019’ या यादीत भारताचा कोणता क्रमांक आहे?

(A) 25
(B) 34✅✅✅
(C) 35
(D) 24

📌सातवी प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (RCEP) मंत्रिस्तरीय बैठक मंत्री बैठक कुठे आयोजित केली गेली?

(A) थायलंड✅✅✅
(B) मलेशिया
(C) म्यानमार
(D) भारत

📌खालीलपैकी कोणता चंद्रयान-2 मोहिमेचा भाग नाही?

(A) लुनार ऑर्बिटर
(B) विक्रम लँडर
(C) प्रज्ञान रोव्हर
(D) द्रुष्टी दुर्बिण✅✅✅

📌कोणत्या व्यक्तीला इटलीमध्ये व्हॅटिकनच्यावतीने 'लॅम्प ऑफ पीस ऑफ सेंट फ्रान्सिस' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले?

(A) अजय बंगा
(B) मुहम्मद युनुस✅✅✅
(C) अफ्रोझी युनुस
(D) वेरा फोरोस्टेन्को

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...