२६ सप्टेंबर २०१९

मराठी महत्त्वाचे प्रश्न उत्तरे 26/9/2019


१) केलेले असेल या क्रियापदाचा काळ सांगा?

➡️पूर्ण भविष्यकाळ

२)त्याने आंबा खाल्ला होता.- या वाक्याचा काळ सांगा ?

➡️पूर्ण भूतकाळ

३)मी आंबा खाईन या वाक्याचे साध्या वर्तमान काळाचे रूप सांगा ?

➡️ मी आंबा खातो

४) भूतकाळाचे एकूण किती प्रकार आहेत ?

➡️ चार

५)'धु' या धातू चे भूतकाळी रूप कोणते ?

➡️ धुतला

६)जेव्हा एखाद्या क्रियापदावरून कोणतीही प्रिया एखाद्या काळात नेहमी घडण्याची रीत आहे असा अर्थ व्यक्त होतो तेव्हा त्या काळाला..…..... म्हणतात.

➡️ रिति काळ

७)समर्थ रामदास म्हणतात 'जगी सर्व सुखी असा कोण आहे'.- या वाक्याचा काळ सांगा ?

➡️ वर्तमान काळ

८)मी खेळायला जात होतो या वाक्याचा रीती भूतकाळ कसा होईल ?

➡️मी खेळायला जात असे

९)पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा काळ ओळखा ?

➡️वर्तमानकाळ

१०)खाल्ला होता -या संयुक्त क्रियापदावरून काळाचा कोणता प्रकार तयार होईल ?

➡️पूर्ण भूतकाळ

११)बाबांनी सायकल विकत घेतली होती. या वाक्यातील काळ सांगा ?

➡️पूर्ण भूतकाळ

12)सुर पारंब्यांचा खेळ अलीकडे कुठे दिसला नाही -या वाक्याचा काळ सांगा?

➡️ भूतकाळ

१३) सहलीला जाणार म्हणून तो आनंदाने झोपला होता  - या वाक्याचा काळ कोणता ?

➡️ पूर्ण भूतकाळ

१४) परवा एव्हाना आम्ही सातार्‍याला जात असू -या वाक्याचा काळ सांगा ?

➡️ चालू भविष्यकाळ

१५) प्रजेवर अन्याय झाला होता- या वाक्याचा काळ सांगा ?

➡️ भूतकाळ

१६) आई देवपूजा करीत असेल या वाक्याचा काळ सांगा ?

➡️अपूर्ण भविष्यकाळ

१७) राम सिनेमा पाहतो आहे -वाक्याचा काळ सांगा ?

➡️वर्तमान काळ

१८)त्याचे सांगून झाले आहे वाक्याचा काळ सांगा ?

➡️पूर्ण वर्तमान

१९)उद्या ते येतील या वाक्याचा काळ ओळखा ?

➡️साधा भविष्यकाळ

२०)  मी निबंध लिहितो या वाक्याचा भूतकाळ सांगा ?

➡️मी निबंध लिहिला

२१)  लिहीला, बसला ,होता ,पळाली ,ही क्रियापदाची रूपे कोणत्या काळातील आहेत ?

➡️भूतकाळ

२२)तानाजी शौर्याने लढला -या वाक्याचा काळ ओळखा ?

➡️साधा भूतकाळ

२३) वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून क्रिया कोणत्या वेळी घडते आहे याचा बोध होतो त्याला काय म्हणतात ?

➡️ काळ

२४)क्रिया आता घडत आहे हे जेव्हा क्रियापदाचा रूपावरून कळते तेव्हा कोणता काळ होतो ?

➡️ वर्तमान

२५)वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियांचा बोध होतो तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध होतो त्याला काय म्हणतात ?

➡️काळ

बॉक्सिंगमध्ये विश्वविजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय 'अमीत पंघाल'


✍५२ किलोगटाच्या अंतिम लढतीत उझबेकिस्तानच्या आलिम्पिक विजेत्या शाखोबिदीन झोईरोव्ह याने त्याला ५-० अशी मात दिली. रशियातील एकाटेरिनबर्ग येथे स्पर्धा खेळली गेली.

✍या स्पर्धेच्या इतिहासात रौप्यपदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय बॉक्सर ठरला आहे. यापूर्वी भारताने या स्पर्धेत पाच पदके जिंकली आहेत पण ती पाचही कास्यपदके आहेत.

✍यंदाच मनिष कौशिकने जिंकलेल्या कास्यपदकाचाही समावेश आहे आमि मनिष व अमीतच्या यशासह भारताने प्रथमच जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत एकाच वर्षी दोन पदके जिंकण्याची कामगिरी केली आहे.

✍झोईराव्हला या लढतीत पंचांनी ३०-२७, ३०-२७, २९-२८, २९-२८ आणि २९-२८ अशा गुणांनी विजयी घोषित केले.

✍अमीत पंघाल ५-० अशा पराभूत असा दिसत असल्याने लढत एकतर्फी वाटत असली तरी प्रत्यक्षात मात्र अमीतने आलिम्पिक विजेत्याला जोरदार प्रतिकार दिला होता आणि तोडीस तोड लढत झाल्याचे दिसते. विशेषत: दंसऱ्या व तिसऱ्या फेरीत पंघाल प्रभावी दिसलापण पहिल्या फेरीने त्याचा घात केला.

मधुकर कामथ यांची ऑडिट ब्युरो ऑफ सर्किल्सच्या अध्यक्षपदी निवड


🌷डीडीबी मुद्रा गटाचे अध्यक्ष आणि इंटरब्रँड इंडियाचे मार्गदर्शक मधुकर कामथ यांची 2019-20 साठी ऑडिट ब्युरो ऑफ सर्किल्स (एबीसी) चे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. 

🌷कामथ हे अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सी असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्षही राहिले आहेत. 

🌷एबीसी स्थापना 1948 मध्ये झाली आहे

🌷 एबीसी चे मुख्यालय मुंबई मध्ये आहे

मोदींनी परदेश दौरे करण्यापेक्षा मायदेशात थांबून अर्थव्यवस्था सावरावी; ‘फोर्ब्स’मधून टीका

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मायदेशात थांबून भारताच्या गोंधळलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्याचे प्रयत्न करायला हवेत असा टोला ‘फोर्ब्स’मधून लगावण्यात आला आहे. ‘परदेशातील भारतीयांना देशात सगळं ठिक आहे असं सांगत फिरण्याऐवजी मोदींनी देशात थांबून विविध घटकांमधील लोकांमध्ये वाढणारी दरी कमी करण्यासाठी प्रयत्न कराला हवेत,’ असंही ‘फोर्ब्स’च्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेल्या ‘मोदी शूड स्पेण्ड मोअर टाइम अॅट होम’ या लेखात म्हटले आहे.

कोलंबिया विद्यापिठामधील अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापक असणाऱ्या पॅनोस मॉर्डोकोउटास यांनी ‘फोर्ब्स’च्या वेबसाईटवर मोदींच्या अमेरिकेच्या दौऱ्याला सुरुवात करण्याआधी मोदी सरकारच्या धोरणांचा लेखाजोखा मांडणारा लेख लिहिला आहे.

‘एकीकडे मोदी रशियापासून अमेरिकेपर्यंत जगातील सर्वात शक्तीशाली नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत तर दुसरीकडे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मोठी पडझड झाल्याचे चित्र दिसत आहे. मागील काही वर्षांमध्ये भारताचा जीडीपी ८ टक्क्यांवरुन ५ टक्क्यांपर्यंत पडला आहे,’ असं या लेखामध्ये पॅनोस यांनी म्हटलं आहे.

मूकनायक 🌺

🌿डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इ.स. १९२० साली समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी सुरू केलेले मराठी भाषेतील एक पाक्षिक होते. ३१ जानेवारी १९२० रोजी या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. हे पाक्षिक मुंबईहून निघत असे.

🔶पांडुरंग नंदराम भटकर नावाच्या महार जातीच्या शिक्षित तरुणाने या पाक्षिकाचे संपादक केले. कारण आंबेडकर हे सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करीत होते. त्यामुळे त्यांना उघडपणे संपादकपदावर कार्य करणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी मूकनायकाच्या व्यवस्थापकपदी ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांची नेमणूक केली होती. पहिल्या अंकातील 'मनोगत' नावाचा अग्रलेख आंबेडकरांनी स्वतः लिहिला होता. पुढील तेरा अंकातही त्यांनी लेख लिहिले. मूकनायकासाठी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी २,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली होती.

🌿आंबेडकरांनी मूकनायक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले, कारण मराठीच त्यावेळेची सामान्य जनतेची भाषा किंवा लोकभाषा होती आणि बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र (कर्मभूमी) महाराष्ट्र होते. तसेच तेव्हा महाराष्ट्रातील दलित जनता जास्त शिकलेली नव्हती, ती केवळ मराठीच समजू शकत होती.

🔶या पाक्षिकाचा मुख्य उद्देश दलित, गरीब व शोषित लोकांच्या व्यथा त्यांचा आवाज सरकारपर्यंत आणि इतर जनतेपर्यंत पोहचवणे हा होता. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखांमधून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायावर प्रकाश टाकून त्या समाजाच्या उन्नतीसाठी तत्कालिन ब्रिटिश सरकारला काही उपाययोजना सुचवल्या. अस्पृश्यांचा उद्धार किंवा विकास होण्यासाठी अस्पृश्यांनी राजकिय सत्ता व शैक्षणिक ज्ञान मिळवणे गरजेचे आहे, असे त्यांना नेहमी वाटत असे.

🌿 ५ जुलै १९२० रोजी आंबेडकर पुढील शिक्षणासाठी लंडनला रवाना झाले. त्यानंतर ३१ जुलै १९२० पासून मूकनायकाचे संपादक पद ज्ञानेश्वर ध्रुवनाथ घोलप यांच्याकडे आले.

🔶सध्या मूकनायकाचे १९ अंक उपलब्ध आहेत. त्यांत आंबेडकरांनी वैचारिक लिखाण केले.

🌿 मूकनायक या पत्राने सामाजिक व धार्मिक क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रातही अस्पृश्यांनी बलवत्तर स्थान निर्माण केले पाहिजे ही जाणीव निर्माण केली. 'मूकनायक' पत्रात विविध विचार, वर्तमानसार, निवडक पत्रातील उतारे, क्षेम, समाचार, कुशल प्रश्न, शेला पागोटे ही सदरे होती. 'मूकनायक' एप्रिल १९२३ मधे बंद पडले.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) खालीलपैकी किती संमतिदर्शक अव्यये आहे.

     हां, जी, जीहां, ठीक, बराय, हाँ, अच्छा

   1) सर्व      2) सहा      3) पाच      4) चार
उत्तर :- 1

2) ‘मी निबंध लिहीत असे’ या वाक्यातील काळ ओळखा.

   1) अपूर्ण भूतकाळ    2) रीती वर्तमानकाळ 
   3) रीती भूतकाळ    4) रीती भविष्यकाळ

उत्तर :- 3

3) “हंस” या शब्दाचा विरुध्दलिंगी शब्द शोधा.

   1) हंसी    2) हंसा      3) हंसीण      4) हंसीका

उत्तर :- 1

4) रामाहून गोविंदा मोठा आहे.

     अधोरेखित शब्दातील विभक्ती प्रत्ययाचा कारकार्थ खालीलपैकी कोणता आहे ?

   1) कर्ता    2) संप्रदान    3) अपादान    4) करण

उत्तर :- 3

5) वाक्यप्रकार ओळखा.
     आई वडिलांचा मान राखावा.

   1) आज्ञार्थी    2) विध्यर्थी   
   3) संकेतार्थी    4) वरीलपैकी कोणतेही नाही

उत्तर :- 2

6) ‘पुस्तक’ हा शब्द मराठीत कोणत्या लिंगात वापरतात?

   1) नपुंसकलिंग      2) पुल्लिंग   
   3) स्त्रीलिंगी      4) पुल्लिंग व स्त्रीलिंग

उत्तर :- 1

7) स, ला, ते-स, ला, ना, ते, हे कोणत्या दोन विभक्तींचे प्रकार आहेत ?

   1) प्रथमा व व्दितीया    2) व्दितीया व चतुर्थी 
   3) व्दितीया व तृतीया    4) व्दितीया व सप्तमी

उत्तर :- 2

8) ‘गुलाबाची फुले वेगवेगळया रंगाची असतात’ ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ?

   1) केवल वाक्य      2) संयुक्त वाक्य   
   3) मिश्र वाक्य      4) प्रश्नार्थी वाक्य

उत्तर :- 1

9) ‘अशा प्रकारचे अनेक विचार आकाशातील सृष्टीचे सौंदर्य पाहून त्याचे मनन करणा-याच्या मनात येतील’ या वाक्यातील
     ‘विधेयविस्तार’ ओळखा.

   1) विचार    2) अशा प्रकारचे अनेक
   3) येतील    4) आकाशातील सृष्टीचे सौंदर्य पाहून त्याचे मनन करणा-याच्या मनात

उत्तर :- 4

10) माझ्याकडून कॉफी घेतली गेली, प्रयोग ओळखा.

   1) कर्मणी प्रयोग      2) भावे प्रयोग   
   3) कर्तरी प्रयोग      4) संकीर्ण प्रयोग

उत्तर :- 1

परदेशी विद्यार्थ्यांत नेपाळ आघाडीवर

🔰परदेशी विद्यार्थ्यांकडून उच्च शिक्षणासाठी सर्वाधिक पसंती कर्नाटक राज्याला मिळत असून

🔰नेपाळ आणि अफगाणिस्तानमधूनही मोठ्या प्रमाणात परदेशी विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी भारतात येत आहेत, अशी माहिती मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिली आहे.

🔰परदेशातून उच्चशिक्षणासाठी भारतात येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलांची संख्या मुलींच्यापेक्षा जास्त असून परदेशी विद्यार्थ्यांकडून 'बीटेक' करण्याला अधिक पसंती दिली जात असून त्यानंतर 'बीबीए' कोर्सला पसंती मिळत आहे.

🔰अशा प्रकारे उच्चशिक्षण घेणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या अंदाजे ४७ हजार आहे.

👉राज्यनिहाय आकडेवारी पाहिल्यास

🔰कर्नाटक राज्यात सर्वाधिक १० हजार २३ परदेशी विद्यार्थी
👉 महाराष्ट्र (५००३ विद्यार्थी),
👉पंजाब (४५३३),
👉उत्तर प्रदेश (४५१४),
👉 तमिळनाडू (४१०१),
👉 हरियाणा (२८७२),
👉दिल्ली (२१४१),
👉गुजरात (२०६८) आणि
👉तेलंगणा (२०२०) यांचा क्रमांक लागतो.

🔰जगभरातील तब्बल १६४ देशांतून परदेशी विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी भारतात येतात.

🔰यामध्ये प्रमुख दहा देशांतील विद्यार्थ्यांचे प्रमाण ६३.७ टक्के आहे. यातही शेजारील
🔰नेपाळ देशातून  सर्वाधिक  २६.८८ टक्के आहे.त्याखालोखाल
👉अफगाणिस्तान (९.८ टक्के),
👉बांगलादेश (४.३८),
👉सुदान (४.०२),
👉भूतान (३.८२) आणि
👉नायजेरिया (३.४) असे विद्यार्थ्यांचे प्रमाण आहे.

🔰मनुष्यबळ विकास मंत्रालयाने केलेल्या अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण २०१८-१९ मधून ही माहिती समोर आली आहे.

👉अमेरिकेतील विद्यार्थ्यांचे प्रमाण ३.२ टक्के असून
👉येमेन (३.२),
👉श्रीलंका (२.६४) आणि इराण (२.३८) या प्रमाणात विद्यार्थी येथे उच्च शिक्षणासाठी येतात.

👉सर्वाधिक परदेशी विद्यार्थी नेपाळमधील असले तरी

🔰पीएचडी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये इथिओपिया (२९५) आणि येमेन (१४९) येथील विद्यार्थी अधिक आहेत.

🔰पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या परदेशी विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक ७३.४ टक्के आहे.

🔰 त्या तुलनेत पदव्युत्तरचे शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण १६.१५ टक्के असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे.

👉बीटेकला पसंती

🔰परदेशी विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती 'बीटेक'ला मिळत असून ८,८६१ विद्यार्थ्यांनी या कोर्ससाठी प्रवेश घेतला आहे. त्याखालोखाल
👉बीबीए (३३५४),
👉बीएससी (३३२०),
👉बीए (२२२६) या कोर्सला पसंती मिळत आहे.

🔰पदवीपूर्व अभ्यासक्रमामध्ये बी. फार्म., बीसीए, नर्सिंग आणि बीडीएस या कोर्सना विशेष पसंती मिळत आहे.

जलतरण रिलेमध्ये भारताला सुवर्णपदक

भारतीय जलतरणपटूंनी दहाव्या आशियाई वयोगट जलतरण स्पर्धेत मंगळवारी येथे 100 मीटर फ्री स्टाईल प्रकारात आपला दबदबा कायम राखताना सुवर्णपदकाची कमाई केली.

याशिवाय महिलांच्या रिले संघाला मात्र रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

याशिवाय बालगटातूनही भारताला एक रौप्यपदक मिळाले.

वीरधवल खाडे, श्रीहरी नटराजन, आनंद अनिलकुमार आणि सजन प्रकाश या भारतीय रिले संघातील जलतरणपटूंनी 4 बाय 100 मीटर स्पर्धेत 3:23.72 सेकंदाची वेळ नोेंदवून सुवर्णपदकावर नाव कोरले.

इराणच्या संघाने भारतापेक्षा 5 सेकंद कमी म्हणजे 3:28.46 अशी वेळ नोंदवली.

उझबेकिस्तानच्या संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.त्यांनी 3:30.59 अशी वेळ दिली.

मुकेश अंबानी आठव्यांदा सर्वाधिक श्रीमंत भारतीय


◾️रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी सलग आठव्यांदा भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

◾️आयआयएफल वेल्थ हुरून इंडिया रिचने ही श्रीमंत व्यक्तीची यादी प्रसिद्ध केली आहे.

◾️ मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ही ३ लाख ८० हजार ७०० कोटी रुपये इतकी आहे.

◾️लंडनस्थीत असलेले एस. पी. हिंदुजा अँड फॅमिली या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

◾️१ लाख ८६ हजार ५०० कोटी रुपयांची संपत्ती त्यांच्याकडे आहे.

◾️विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी हे १ लाख १७ हजार १०० कोटींच्या संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहे.

◾️ IIFL च्या नवीन यादीनुसार, भारतीय श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी वाढ झाली आहे.

◾️ या यादीत १ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या भारतीयांची संख्या वाढून ती आता ९५३ झाली आहे.

◾️२०१८ मध्ये ही संख्या ८३१ इतकी होती. आर्सेसर मित्तलचे अध्यक्ष आणि सीईओ एल. एन. मित्तल हे चौथ्या क्रमांकावर आहेत.

◾️ त्यांची संपत्ती १ लाख ७ हजार ३०० कोटी रुपये इतकी आहे.

◾️गौतम अदानी हे पाचव्या स्थानावर आहेत. त्यांची संपत्ती ९४ हजार ५०० कोटी रुपये इतकी आहे.

◾️श्रीमंत व्यक्तीच्या यादीत आणखी १० जणांचा समावेश आहे.

◾️यामध्ये
📌उदय कोटक (९४ हजार १०० कोटी), 📌सायरस एस. पुनावाला (८८ हजार ८०० कोटी),
📌सायरस पालोनजी मिस्त्री ( ७६ हजार ८०० कोटी),
📌शापूर पालोनजी (७६ हजार ८०० कोटी) आणि
📌दिलीप संघवी (७१ हजार ५००) दहाव्या स्थानावर आहे.

◾️विशेष म्हणजे सर्व श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत २ टक्क्यांनी यावर्षी वाढ झाली आहे.

पाटा गोल्ड पुरस्कारांमध्ये केरळ पर्यटनाचा मोठा विजय

◾️केरळ टूरिझमने पॅसिफिक एशिया ट्रॅव्हल असोसिएशन (पाटा) सुवर्ण पुरस्कारांमध्ये तीन पुरस्कार जिंकून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपले नाव निश्चित केले आहे.

◾️गुरुवारी कझाकस्तानमधील नूर-सुलतान (अस्ताना) येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याचे पर्यटनमंत्री कडकंपल्ली सुरेंद्रन आणि पर्यटन संचालक पी. बाला किरण यांना मारिया हेलेना डी सेन्ना फर्नांडिस, डायरेक्टर, मकाऊ शासकीय पर्यटन कार्यालय आणि डॉ. मारिओ यांनी हा पुरस्कार दिला.

◾️एक सुवर्ण पुरस्कार कुमारसकोम येथे महिलांनी त्याच्या जबाबदार पर्यटन मिशन अंतर्गत चालवलेल्या वंशीय खाद्यपदार्थ उपाहारगृहात मिळाला.

◾️इतर दोन सुवर्ण पुरस्कार अनुक्रमे केरळ टूरिझम 'कम आऊट अँड प्ले' या जाहिरात मोहिमेसाठी आणि वेबसाइट (www.keralatourism.org) साठी होते.

◾️स्टार्क कम्युनिकेशनद्वारे ही जाहिरात मोहीम राबविली जात असताना केरळ टूरिझम वेबसाइट इनव्हिस मल्टिमीडियाने डिझाइन केली व देखरेख केली.

दिवीज शरणला सेंट पीटर्सबर्ग स्पर्धेचे विजेतेपद

◾️भारताचा दिवीज शरण आणि स्लोव्हेकियाचा इगोर झेलेने या जोडीने सेंट पीटर्सबर्ग एटीपी टेनिस स्पर्धेच्या पुरूष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात रविवारी त्यांनी इटालियन जोडी मॅट्टियो बेरेंटीनी व सिमोन बोलेल्ली यांना ६-३, ३-६, १०-८ अशी मात दिली.

◾️या विजेतेपदाने दिवीज व इगोर जोडीला २५० एटीपी गुणांची कमाई झाली आहे. ३३ वर्षीय दिवीजचे हे दुहेरीचे पाचवे विजेतेपद असून त्याने यंदा रोहन बोपन्नाच्या जोडीने पुण्यात महाराष्ट्र ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावून यंदाची सुरूवात यशस्वी केली होती. यंदा त्याने महाराष् ओपनशिवाय निंगबो चॅलेंजर स्पर्धासुद्धा जिंकली आहे.

◾️उपांत्य फेरीत दिवीज व इगोर या जोडीने अग्रमानांकित निकोला मेक्तीक व फ्रँको स्कुगोर या क्रोएशियन जोडीला ७-५, ६-१ असा पराभवाचा धक्का दिला होता.

राहुलने कांस्य जिंकले, भारताला पाचवं पदक

◾️भारताचा युवा कुस्तीपटू राहुल आवारेने  कांस्यपदक जिंकलं आहे. त्यामुळे भारताच्या खात्यात पाचवं पदक आलं आहे.

◾️राहुलने ६१ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकण्याची कामगिरी केली आहे.

◾️कझाकिस्तानच्या नूर सुल्तान येथे ब्रॉन्ज मेडल सामन्यात राहुल आवारेने अमेरिकेचा कुस्तीपटू टायलर ली ग्राफ याला पराभूत केलं. दरम्यान, ऑलिम्पिकच्या न येणाऱ्या गटात राहुलनं पदक पटकावलं आहे. त्यामुळे या पदकानंतरही तो टोकियो ऑलिम्पिकमध्ये क्वालिफाय होणार नाही. या आधी दीपक पुनियाने ८६ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई केली होती. नूर-सुलतान, कझाकिस्तान येथे सुरू असलेल्या या जागतिक कुस्ती स्पर्धेतून विनेश फोगट, बजरंग पुनिया, दीपक पुनिया, रवी दाहिया यांनी २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवला आहे.

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...