Thursday, 26 September 2019

टी -20 इंटरनॅशनलमध्ये दीप्ती शर्मा तीन मेडन फेकणारी पहिली भारतीय ठरली

◾️दीप्ती शर्मा दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात तीन मेडन फेकणारी पहिली भारतीय गोलंदाज ठरली आहे. तिने आठ धावा देऊन एकूण तीन विकेट्स आपल्या नावावर केल्या. या शानदार गोलंदाजीसाठी दीप्ती शर्माला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

◾️ 28 नोव्हेंबर 2014 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

◾️ ती डाव्या हाताची फलंदाज असून डाव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करते.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी 'टीबी हरेल, देश जिंकेल' ही मोहीम राबविली


◾️केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी 'टीबी गमावेल, देश जिंकेल' ही मोहीम राबविली. आरोग्यमंत्री म्हणाले की, भारत दरवर्षी 2025 पर्यंत देशातून टीबी रोगाचा नाश करेल. 

◾️भारतात क्षयरोगामुळे दरवर्षी सरासरी चार लाखाहून अधिक मृत्यू होतात. भारतात २ लाख लाखांहून अधिक टीबीचे रुग्ण आहेत.

◾️गेल्या काही वर्षांपासून टीबीच्या रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. यामुळेच सरकारने टीबी रोगाविरूद्ध व्यापक मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम केवळ टीबी रुग्णांच्या उपचारासाठीच नाही तर देशातून टीबी रोगाचा पूर्णपणे नाश करण्यासाठी आहे. यासाठी सरकार सन 2025 पर्यंत सर्वसमावेशक मोहीम राबवेल.

अडवाणी-मेहता जोडीने 2019 IBSF जागतिक स्नूकर स्पर्धेचे सांघिक विजेतेपद जिंकले

👉मंडाले (म्यानमार) येथे खेळविण्यात आलेल्या ‘2019 IBSF जागतिक स्नूकर’ स्पर्धेच्या सांघिक विजेतेपदावर भारतीय जोडीने नाव कोरले. भारताच्या पंकज अडवाणी आणि आदित्य मेहता यांनी हे विजेतेपद जिंकले.

👉या विजयासह अडवाणीच्या खात्यावर हे 23वे जागतिक जेतेपद जमा झाले आहे. तर आदित्यचे हे पहिले-वहिले विश्वविजेतेपद ठरले.

🌹🌳🌴IBSF विषयी🌴🌳🌹

👉आंतरराष्ट्रीय बिलियर्ड्स आणि स्नूकर महासंघ (IBSF) ही अशी संस्था आहे जी जगभरातल्या नॉन-प्रॉफेशनल स्नूकर आणि इंग्लिश बिलियर्ड्स या क्रिडाप्रकारांवर नियंत्रण ठेवते.

👉1971 साली “वर्ल्ड बिलियर्ड्स अँड स्नूकर कौन्सिल” या नावाने याची स्थापना झाली, ज्याचे 1973 साली नाव बदलून वर्तमान नाव देण्यात आले.

👉संघटनेचे मुख्यालय दुबई (संयुक्त अरब अमिरात) येथे आहे.

16 वर्षीय ग्रेटा  थनबर्ग 'राईट लाईव्हलीहूड'  पुरस्कार जाहीर

👉16 वर्षीय ग्रेटा थनबर्ग हिला राजकीय स्तरावर हवामान बदलाविषयी तातडीने पावले उचलण्यासाठी प्रेरणा दिल्याबद्दल 'राईट लाईव्हलीहूड' या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

👉या पुरस्काराला 'प्रतिनोबेल किंवा पर्यायी नोबेल' म्हणून ओळखले जाते.

👉नोबेल शांतता पुरस्कारासाठीही ग्रेटाला नामांकन देण्यात आले आहे.

👉4 डिसेंबरला म्हणजेच नोबेल पारितोषिक वितरणाच्या सहा दिवस आधी स्टॉकहोम येथे हा पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

🌹🌳🌴ग्रेटा थनबर्ग कोण आहे?🌴🌳🌹

👉ग्रेटा थनबर्गने स्वतःची ओळख 16 वर्षांची पर्यावरणप्रेमी कार्यकर्ता असा करून दिला आहे.

👉पर्यावरण संवर्धनासाठी तिने गेल्या वर्षी म्हणजेच 2018 साली ऑगस्ट महिन्यात स्वीडनच्या संसदेसमोर आंदोलन सुरू केले होते.

👉 त्यानंतर तिने शुक्रवारी सतत आंदोलने केली आहेत, त्यामुळे वर्षभरात कितीतरी शुक्रवार ती शाळेतही जाऊ शकलेली नाही.

👉या आंदोलनामुळे आंतरराष्ट्रीय माध्यमांनी तिची दखल घेतली आहे.

👉ग्रेटाच्या आंदोलनाला “फ्रायडेज फॉर द फ्युचर” असे नाव मिळाले असून हे आंदोलन विविध देशांमध्ये पोहोचले आहे.

👉जर्मनी, बेल्जियम, ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि जापानमध्ये ही आंदोलने झाली आहेत.

👉 गेल्या शुक्रवारी जवळपास 100 देशांमध्ये हे आंदोलन झाले.

🌹🌳🌴पुरस्कार प्राप्त करणारे इतर🌴🌳🌹

👉यंदाचा 'राईट लाईव्हलीहूड' पुरस्कार:-

1.मानवाधिकार कार्यकर्ते अमीनातौ हैदर (पश्चिम सहारा),

2.वकील असलेले गुओ जिआन्मेई (चीन) आणि

3.ब्राझीलचे हुटुकारा यानोमामी असोसिएशन ही संस्था आणि तिचे प्रमुख दावी कोपेनावा यांना देखील जाहीर झाला आहे.

🌹🌳🌴पुरस्काराविषयी🌴🌳🌹

👉स्विडिश-जर्मन नागरीक असलेले परोपकारी जकोब वॉन यूक्सकुल यांनी नोबेल पुरस्कारांपासून दुर्लक्षित राहिलेल्या लोकांना सन्मानित करण्यासाठी या पुरस्काराची सुरुवात केली होती.

👉1980 साली या पुरस्काराची सुरुवात झाली.

👉बक्षीस म्हणून दरवर्षी चार विजेत्यांना प्रत्येकी दहा लक्ष क्रोनर (जवळपास 73 लक्ष रूपये) दिले जातात.

आशियाई वयोगट जलतरण स्पर्धा : भारताच्या संघाला रीलेमध्ये सुवर्ण

👉आशियाई वयोगट जलतरण स्पर्धेत श्रीहरी नटराज, आनंद अनिलकुमार, साजन प्रकाश आणि वीरधवल खाडे यांनी ४ बाय १०० मीटर पुरुषांच्या फ्रीस्टाइल रीले प्रकारात सुवर्णपदक जिंकून भारताचे खाते उघडले.भारतीय संघाने ३:२३.७२ सेकंद अशी वेळ नोंदवत जेतेपद पटकावले. पाच सेकंदांच्या फरकामुळे रौप्यपदक जिंकणाऱ्या इराणच्या संघाने ३:२८.४६ सेकंद अशी वेळ नोंदवली, तर तिसऱ्या स्थानावरील उझबेकिस्तानच्या संघाने ३:३०.५९ सेकंद वेळेत शर्यत पूर्ण केली.

👉महिलांच्या ४ बाय १०० मीटर रीले प्रकारात भारतीय संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. रुजूता खाडे (५९.८३ सेकंद), दिव्या सतिजा (१:०१.६१ सेकंद), शिवानी कटारिया (५९.५७ सेकंद) आणि माना पटेल (५९.७५ सेकंद) यांचा भारतीय संघात समावेश होता.

👉गट-दोन मुलांच्यांमध्येसुद्धा भारतीय संघाला ४ बाय १०० मीटर रीले प्रकारात रौप्यपदक मिळले. वेदांत माधवन, उत्कर्ष पाटील, साहिल लष्कर आणि शोआन गांगुली यांचा समावेश असलेल्या संघाने ३:४१.४९ सेकंद अशी वेळ नोंदवली.

🌹🌳🌴कुशाग्रला दुहेरी सुवर्ण🌴🌳🌹

👉भारताच्या कुशाग्र रावतने दोन सुवर्णपदकांची कमाई केली.

👉पुरुषांच्या २०० मीटर प्रकारात रावतने १:५२.३० सेकंदांनिशी सुवर्णपदक जिंकले, तर आनंद अनिलकुमारने १:५२.१९ सेकंदांसह कांस्यपदक पटकावले. सिरियाच्या अब्बास ओमरला कांस्यपदक मिळाले.

👉आणि नंतर  ८०० मीटर स्पर्धेत कुशाग्रने ८:१०.०५ सेकंदांसह सुवर्णपदकावर नाव कोरले.

लष्करप्रमुख आज CCSचा पदभार स्वीकारणार

👉भारताचे लष्करप्रमुख बिपीन रावत हे आज 'चीफ ऑफ स्टाफ कमेटी'च्या (CCS) अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत.

👉या पदाची जबाबदारी स्वीकारण्याची ही अखेरची वेळ असणार आहे.

👉कारण, मोदी सरकारने नुकतीच चीफ ऑफ संरक्षण स्टाफ (सीडीएस) पदाची स्थापणा करणार असल्याची घोषणा केली होती.

👉बीपीन रावत हे आज हवाई दलप्रमुख बी. एस. धनोआ यांच्याकडून पदाचा कार्यभार स्वीकारतील.

👉हवाईदल प्रमुख बी. एस. धनोआ यांची मे २०१९ रोजी चीफ ऑफ स्टाफ कमेटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

👉नौदलप्रमुख सुनील लांबा हे निवृत्त झाल्यानंतर धनोआ यांनी त्यांच्याकडून पदाचा कार्यभार स्वीकारला होता.

👉चीफ ऑफ स्टाफ कमेटीच्या सदस्यांत लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या प्रमुखांचा समावेश असतो. वरिष्ठ अध्यक्षांची या पदावर नियुक्ती करण्यात येते.

👉तिन्ही सैन्य दलात समन्वय करण्याचे काम तसेच देशावर बाहेरील संकटाचा सामना करण्यासाठी रणनिती तयार करण्याची जबाबदारी चीफ ऑफ स्टाफ कमेटीच्या अध्यक्षांवर असते.

२३ वर्षांच्या मेहनतीनंतर वैज्ञानिकांनी शोधलं ‘लाल भेंडी’चं नवं वाण


👉भारतामधील कृषी संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांना एक मोठे यश मिळाले आहे. जवळजवळ २३ वर्षांच्या मेहनतीनंतर भारतीय वैज्ञानिकांनी भेंडीचा नवा वाण तयार करण्यात यश मिळाले आहे.

👉भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेच्या (आयआयव्हीआर) वैज्ञानिकांना हे यश मिळाले आहे. विशेष म्हणजे या भेंडीचा रंग लाल आहे. याच लाल रंगामुळे भेंडीचे नाव 'काशी लालिमा' असं ठेवण्यात आलं आहे.

👉उत्तर प्रदेशमधील वाराणसीतील भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेला भेंडीचे नवे वाण शोधण्यात आलेले यश हे अनेक अर्थांने महत्वाचे आहे.

👉या नव्या प्रजातीच्या भेंडीमध्ये अँटीऑक्सिडंट, लोह आणि कॅल्शियमचे प्रमाण अधिक आहे. सामान्य भेंडीपेक्षा या भेंडीची किंमत अधिक असणार आहे. ही भेंडी सुरुवातील सामान्यांना शंभर ते पाचशे रुपये किलो दराने उपलब्ध होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

👉भारतामध्ये पारंपारिक हिरव्या भेंडीचे उत्पादन घेतले जाते. लाल रंगाची भेंडी सध्या पश्चिमात्य देशांमध्ये पिकवली जाते.

👉भारतामध्ये काही प्रमाणात या भेंडीची आयात केली जाते. मात्र आता भारतीय वैज्ञानिकांनी या भेंडीचा नवा वाण शोधून काढल्याने आता या भेंडीचे देशातच उत्पादन घेणे शक्य होणार आहे.

👉'आयआयव्हीआर'मध्ये १९९५-९६ पासून या भेंडीसंदर्भात संशोधन सुरु होते. मात्र २३ वर्षांनंतर या प्रयत्नांना यश मिळाले आहे. या भेंडीचे बियाने डिसेंबर महिन्यांपासून शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन नियमांत बदल

👉१ ऑक्टोबर २०१९ पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमधील बदलांचा हा नवा नियम लागू होणार आहे.

👉केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन नियमांमध्ये काही महत्वपूर्ण बदल केले असून याचा लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांना कुटुंबियांना होणार आहे. सरकारने केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) नियम, १९७२ मधील ५४ व्या नियमांत बदल केला आहे. त्यामुळे सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या फॅमिली पेन्शनमध्ये वाढ होणार आहे. १ ऑक्टोबर २०१९ पासून हा नवा नियम लागू होणार आहे.

👉यापूर्वी, सरकारी सेवेत असताना सात वर्षापेक्षा कमी कालावधीत जर कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला ३० टक्के फॅमिली पेन्शन मिळत होती. म्हणजेच कर्मचाऱ्याला कमीत कमी ७ वर्षांची सेवा पूर्ण करणे अनिवार्य होते, त्यानंतरच त्याच्या कुटुंबाला ५० टक्के पेन्शनचा फायदा मिळत होता. मात्र, आता नव्या बदलानुसार, ती ५० टक्के करण्यात आली आहे. ही पेन्शन संबंधीत कर्मचाऱ्याच्या शेवटच्या वेतनाच्या ५० टक्के असेल. सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नींच्या हिताच्या दृष्टीने सरकारने हा निर्णय घेतला आहे, फायनान्शिअल एक्प्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.

👉केंद्र सरकारने केलेल्या बदलानुसार, जर कोणत्याही केंद्रीय कर्मचाऱ्याचा १ ऑक्टोबर २०१९ पूर्वी १० वर्षांत मृत्यू झाला असेल तर त्याच्या कुटुंबाला वाढीव पेन्शनचा फायदा मिळेल. यासाठी ७ वर्षांच्या सेवेची अट रद्द करण्यात आली आहे. तसेच ही फॅमिली पेन्शन मिळवण्यासाठी कुटुंबियांना इतरही काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे. तसेच कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या विभाग प्रमुखांच्या सहीनंतरच ग्रॅच्युटीची रक्कम निश्चित केली जाणार आहे.

👉याबाबत स्पष्टीकरण देताना केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाने म्हटले की, केंद्रीय सेवेत रुजू झाल्यानंतर करिअरच्या कमी कालावधीत जर एखादा कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना वाढीव दराने फॅमिली पेन्शनचा लाभ मिळू शकत नव्हता. मात्र, आता नव्या बदलामुळे अशा परिस्थितीत संबंधित कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे.

मतदानाबाबत जनजागृतीसाठी माधुरी दीक्षित सदिच्छादूत

👉विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी ‘चला मतदान करू या’ असे आवाहन करीत अभिनेत्री माधुरी दीक्षित, महाराष्ट्र भूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवत जनजागृतीच्या प्रचारात उतरले आहेत.

👉लोकसभा निवडणुकीत अन्य राज्यांच्या तुलनेत राज्यातील मतदानाची टक्केवारी कमी होती. त्याचप्रमाणे सन २०१४च्या विधानसभा निवडणुकीतही राज्यात ६०.३२ टक्के मतदान झाले होते, तर लोकसभा निवडणुकीत ६०.७९ मतदान झाले होते.

👉या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने राज्यभर मतदारजागृती उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

👉राज्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची सदिच्छादूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित, पद्मभूषण आणि महाराष्ट्रभूषण सन्मानित अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, अभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, डॉ. निशिगंधा वाड,  उषा जाधव, क्रिकेटपटू स्मृती मानधना, अर्जुन पुरस्कारविजेती धावपटू ललिता बाबर, जलतरणपटू वीरधवल खाडे, नेमबाज राही सरनोबत, तृतीयपंथी कार्यकर्त्यां गौरी सावंत, दिव्यांग कार्यकर्ता नीलेश सिंगीत यांचा यामध्ये समावेश आहे. चित्रफितीच्या माध्यमातून लोकशाही प्रक्रिया आणि देशाच्या विकासात जागरूक मतदारांच्या भूमिकेचे महत्त्व हे सदिच्छादूत समजावून सांगणार आहेत.

माजी फ्रान्सचे अध्यक्ष जॅक चिरॅक याचे निधन.

◾️ जॅक चिरॅक याचे 26 सप्टेंबर 2019 रोजी निधन झाले.

◾️ जॅक चिरॅक यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1932 रोजी झाला.

◾️ चिरॅक दोन वेळा अध्यक्ष म्हणून काम करत होते.

◾️ चिराक हे 17 मे 1995 ते 16 मे 2007 पर्यंत राज्याचे प्रमुख होते.

◾️ यापूर्वी ते 1974 ते 1976 आणि 1986 ते 1988 पर्यंत फ्रान्सचे पंतप्रधान होते.

◾️ तसेच 1977 ते 1995 पर्यंत ते पॅरिसचे महापौर होते.

                  🎇  फ्रान्स  🎇

◾️ अध्यक्ष: इमॅन्युएल मॅक्रॉन

◾️ पंतप्रधान: इडोवर्ड फिलिप

◾️ राजधानी: पॅरिस

◾️ चलन: युरो (€)

◾️ राष्ट्रीय भाषा: फ्रेंच

मराठी महत्त्वाचे प्रश्न उत्तरे 26/9/2019


१) केलेले असेल या क्रियापदाचा काळ सांगा?

➡️पूर्ण भविष्यकाळ

२)त्याने आंबा खाल्ला होता.- या वाक्याचा काळ सांगा ?

➡️पूर्ण भूतकाळ

३)मी आंबा खाईन या वाक्याचे साध्या वर्तमान काळाचे रूप सांगा ?

➡️ मी आंबा खातो

४) भूतकाळाचे एकूण किती प्रकार आहेत ?

➡️ चार

५)'धु' या धातू चे भूतकाळी रूप कोणते ?

➡️ धुतला

६)जेव्हा एखाद्या क्रियापदावरून कोणतीही प्रिया एखाद्या काळात नेहमी घडण्याची रीत आहे असा अर्थ व्यक्त होतो तेव्हा त्या काळाला..…..... म्हणतात.

➡️ रिति काळ

७)समर्थ रामदास म्हणतात 'जगी सर्व सुखी असा कोण आहे'.- या वाक्याचा काळ सांगा ?

➡️ वर्तमान काळ

८)मी खेळायला जात होतो या वाक्याचा रीती भूतकाळ कसा होईल ?

➡️मी खेळायला जात असे

९)पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा काळ ओळखा ?

➡️वर्तमानकाळ

१०)खाल्ला होता -या संयुक्त क्रियापदावरून काळाचा कोणता प्रकार तयार होईल ?

➡️पूर्ण भूतकाळ

११)बाबांनी सायकल विकत घेतली होती. या वाक्यातील काळ सांगा ?

➡️पूर्ण भूतकाळ

12)सुर पारंब्यांचा खेळ अलीकडे कुठे दिसला नाही -या वाक्याचा काळ सांगा?

➡️ भूतकाळ

१३) सहलीला जाणार म्हणून तो आनंदाने झोपला होता  - या वाक्याचा काळ कोणता ?

➡️ पूर्ण भूतकाळ

१४) परवा एव्हाना आम्ही सातार्‍याला जात असू -या वाक्याचा काळ सांगा ?

➡️ चालू भविष्यकाळ

१५) प्रजेवर अन्याय झाला होता- या वाक्याचा काळ सांगा ?

➡️ भूतकाळ

१६) आई देवपूजा करीत असेल या वाक्याचा काळ सांगा ?

➡️अपूर्ण भविष्यकाळ

१७) राम सिनेमा पाहतो आहे -वाक्याचा काळ सांगा ?

➡️वर्तमान काळ

१८)त्याचे सांगून झाले आहे वाक्याचा काळ सांगा ?

➡️पूर्ण वर्तमान

१९)उद्या ते येतील या वाक्याचा काळ ओळखा ?

➡️साधा भविष्यकाळ

२०)  मी निबंध लिहितो या वाक्याचा भूतकाळ सांगा ?

➡️मी निबंध लिहिला

२१)  लिहीला, बसला ,होता ,पळाली ,ही क्रियापदाची रूपे कोणत्या काळातील आहेत ?

➡️भूतकाळ

२२)तानाजी शौर्याने लढला -या वाक्याचा काळ ओळखा ?

➡️साधा भूतकाळ

२३) वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून क्रिया कोणत्या वेळी घडते आहे याचा बोध होतो त्याला काय म्हणतात ?

➡️ काळ

२४)क्रिया आता घडत आहे हे जेव्हा क्रियापदाचा रूपावरून कळते तेव्हा कोणता काळ होतो ?

➡️ वर्तमान

२५)वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियांचा बोध होतो तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध होतो त्याला काय म्हणतात ?

➡️काळ

बॉक्सिंगमध्ये विश्वविजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय 'अमीत पंघाल'


✍५२ किलोगटाच्या अंतिम लढतीत उझबेकिस्तानच्या आलिम्पिक विजेत्या शाखोबिदीन झोईरोव्ह याने त्याला ५-० अशी मात दिली. रशियातील एकाटेरिनबर्ग येथे स्पर्धा खेळली गेली.

✍या स्पर्धेच्या इतिहासात रौप्यपदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय बॉक्सर ठरला आहे. यापूर्वी भारताने या स्पर्धेत पाच पदके जिंकली आहेत पण ती पाचही कास्यपदके आहेत.

✍यंदाच मनिष कौशिकने जिंकलेल्या कास्यपदकाचाही समावेश आहे आमि मनिष व अमीतच्या यशासह भारताने प्रथमच जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत एकाच वर्षी दोन पदके जिंकण्याची कामगिरी केली आहे.

✍झोईराव्हला या लढतीत पंचांनी ३०-२७, ३०-२७, २९-२८, २९-२८ आणि २९-२८ अशा गुणांनी विजयी घोषित केले.

✍अमीत पंघाल ५-० अशा पराभूत असा दिसत असल्याने लढत एकतर्फी वाटत असली तरी प्रत्यक्षात मात्र अमीतने आलिम्पिक विजेत्याला जोरदार प्रतिकार दिला होता आणि तोडीस तोड लढत झाल्याचे दिसते. विशेषत: दंसऱ्या व तिसऱ्या फेरीत पंघाल प्रभावी दिसलापण पहिल्या फेरीने त्याचा घात केला.

मधुकर कामथ यांची ऑडिट ब्युरो ऑफ सर्किल्सच्या अध्यक्षपदी निवड


🌷डीडीबी मुद्रा गटाचे अध्यक्ष आणि इंटरब्रँड इंडियाचे मार्गदर्शक मधुकर कामथ यांची 2019-20 साठी ऑडिट ब्युरो ऑफ सर्किल्स (एबीसी) चे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. 

🌷कामथ हे अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सी असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्षही राहिले आहेत. 

🌷एबीसी स्थापना 1948 मध्ये झाली आहे

🌷 एबीसी चे मुख्यालय मुंबई मध्ये आहे

मोदींनी परदेश दौरे करण्यापेक्षा मायदेशात थांबून अर्थव्यवस्था सावरावी; ‘फोर्ब्स’मधून टीका

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मायदेशात थांबून भारताच्या गोंधळलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्याचे प्रयत्न करायला हवेत असा टोला ‘फोर्ब्स’मधून लगावण्यात आला आहे. ‘परदेशातील भारतीयांना देशात सगळं ठिक आहे असं सांगत फिरण्याऐवजी मोदींनी देशात थांबून विविध घटकांमधील लोकांमध्ये वाढणारी दरी कमी करण्यासाठी प्रयत्न कराला हवेत,’ असंही ‘फोर्ब्स’च्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेल्या ‘मोदी शूड स्पेण्ड मोअर टाइम अॅट होम’ या लेखात म्हटले आहे.

कोलंबिया विद्यापिठामधील अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापक असणाऱ्या पॅनोस मॉर्डोकोउटास यांनी ‘फोर्ब्स’च्या वेबसाईटवर मोदींच्या अमेरिकेच्या दौऱ्याला सुरुवात करण्याआधी मोदी सरकारच्या धोरणांचा लेखाजोखा मांडणारा लेख लिहिला आहे.

‘एकीकडे मोदी रशियापासून अमेरिकेपर्यंत जगातील सर्वात शक्तीशाली नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत तर दुसरीकडे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मोठी पडझड झाल्याचे चित्र दिसत आहे. मागील काही वर्षांमध्ये भारताचा जीडीपी ८ टक्क्यांवरुन ५ टक्क्यांपर्यंत पडला आहे,’ असं या लेखामध्ये पॅनोस यांनी म्हटलं आहे.

मूकनायक 🌺

🌿डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इ.स. १९२० साली समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी सुरू केलेले मराठी भाषेतील एक पाक्षिक होते. ३१ जानेवारी १९२० रोजी या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. हे पाक्षिक मुंबईहून निघत असे.

🔶पांडुरंग नंदराम भटकर नावाच्या महार जातीच्या शिक्षित तरुणाने या पाक्षिकाचे संपादक केले. कारण आंबेडकर हे सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करीत होते. त्यामुळे त्यांना उघडपणे संपादकपदावर कार्य करणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी मूकनायकाच्या व्यवस्थापकपदी ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांची नेमणूक केली होती. पहिल्या अंकातील 'मनोगत' नावाचा अग्रलेख आंबेडकरांनी स्वतः लिहिला होता. पुढील तेरा अंकातही त्यांनी लेख लिहिले. मूकनायकासाठी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी २,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली होती.

🌿आंबेडकरांनी मूकनायक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले, कारण मराठीच त्यावेळेची सामान्य जनतेची भाषा किंवा लोकभाषा होती आणि बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र (कर्मभूमी) महाराष्ट्र होते. तसेच तेव्हा महाराष्ट्रातील दलित जनता जास्त शिकलेली नव्हती, ती केवळ मराठीच समजू शकत होती.

🔶या पाक्षिकाचा मुख्य उद्देश दलित, गरीब व शोषित लोकांच्या व्यथा त्यांचा आवाज सरकारपर्यंत आणि इतर जनतेपर्यंत पोहचवणे हा होता. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखांमधून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायावर प्रकाश टाकून त्या समाजाच्या उन्नतीसाठी तत्कालिन ब्रिटिश सरकारला काही उपाययोजना सुचवल्या. अस्पृश्यांचा उद्धार किंवा विकास होण्यासाठी अस्पृश्यांनी राजकिय सत्ता व शैक्षणिक ज्ञान मिळवणे गरजेचे आहे, असे त्यांना नेहमी वाटत असे.

🌿 ५ जुलै १९२० रोजी आंबेडकर पुढील शिक्षणासाठी लंडनला रवाना झाले. त्यानंतर ३१ जुलै १९२० पासून मूकनायकाचे संपादक पद ज्ञानेश्वर ध्रुवनाथ घोलप यांच्याकडे आले.

🔶सध्या मूकनायकाचे १९ अंक उपलब्ध आहेत. त्यांत आंबेडकरांनी वैचारिक लिखाण केले.

🌿 मूकनायक या पत्राने सामाजिक व धार्मिक क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रातही अस्पृश्यांनी बलवत्तर स्थान निर्माण केले पाहिजे ही जाणीव निर्माण केली. 'मूकनायक' पत्रात विविध विचार, वर्तमानसार, निवडक पत्रातील उतारे, क्षेम, समाचार, कुशल प्रश्न, शेला पागोटे ही सदरे होती. 'मूकनायक' एप्रिल १९२३ मधे बंद पडले.

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...