२५ सप्टेंबर २०१९

देशातील घडलेल्या महत्वपूर्ण प्रथम घटना

• देशातील पहिली संत्रा वायनरी.
:- सावरगाव (नागपूर).

• देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन.
:- पुणे.

• देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात.
:- अरुणाचल प्रदेश.

• देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ.
:- नागपूर.

• देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य.
:- महाराष्ट्र.

• देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य.
:- महाराष्ट्र.

• देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी.
:- चैन्नई.

• देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय.
:- ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे).

• देशातील पहिले दूरदर्शन केंद्र.
:- दिल्ली.

• देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र.
:- पुणे.

• देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य.
:- कर्नाटक.

• देशातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प.
:- ताडोबा (चंद्रपूर).

• देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य.
:- हिमाचलप्रदेश.

• देशातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली.
:- बंगलोर.

• देशातील पहिले नोटा (नकाधिकार) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य.
:- महाराष्ट्र.

• देशातील पहिला घन कचर्यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला आहे.
:-  पुणे.

• देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य.
:- सिक्किम.

• देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य.
:- महाराष्ट्र.

• देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी.
:-  पुणे.

• देशातील पहिले तंबाखूमुक्त गाव.
:- गरिफेमा.

• देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर .
:- झारखंड.

• देशातील पहिले ई – गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य .
:- महाराष्ट्र.

• देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य .
:-  त्रिपूरा.

• देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर.
:- सुरत.

• देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य .
:- आंध्रप्रदेश.

• देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य.
:-  तामिळनाडू.

• देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक.
:-  बंगळूर.

• देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य.
:- आंध्रप्रदेश.

• देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य.
:-  महाराष्ट्र.

• देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प.
:- कांडला (गुजरात).

• देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य.
:- प.बंगाल.

• देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अक्ट (RTS) पास करणारे राज्य.
:-  मध्यप्रदेश.

• देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ.
:- राज्यस्थान.

• देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र.
:- हडपसर (पुणे).

• देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य.
:- हरीयाणा.

• देशातील पहिले स्त्री बटालियन.
:- हडी राणी (राजस्थान).

• देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई – बँकीग सेवा देणारे राज्य.
:- महाराष्ट्र.

• देशातील पहिले ई – पंचायत सुरु करणारे राज्य.
:- महाराष्ट्र.

• देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य.
:-  दिल्ली.

• देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा.
:- नदिया (प.बंगाल).

• देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य.
:-  महाराष्ट्र.

• देशातील पहिला खासगी विमानतळ.
:-  दुर्गापूर (प.बंगाल).

• देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले.
:- दिल्ली.

• देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ.
:- वापी (गुजरात).

• देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य.
:- उत्तराखंड.

• देशातील पहिले जैव – सांस्कृतिक पार्क.
:- भुवनेश्वर.

• देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य.
:- आंध्रप्रदेश.

• देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प.
:- आळंदी.

• देशातील पहिले सॅटेलाईट शहर.
:- पिलखूआ (उत्तरप्रदेश).

• देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज.
:- काटेवाडी.

• देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य.
:- महाराष्ट्र.

• देशातील पहिला निर्मल जिल्हा.
:- कोल्हापूर.

• देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली.
:- भुसावळ – आजदपूर.

• देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी.
:- मुंबई.

• देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संख्येत मतदान अनिवार्य करणारे राज्य.
:- गुजरात.

समाजसुधारक व त्यांचे जन्मस्थळ

• डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महू (मध्यप्रदेश)

• राजर्षी शाहू महाराज- कोल्हापूर

• नाना शंकरशेठ- मुरबाड (ठाणे)

• कर्मवीर भाऊराव पाटील- कुंभोज(कोल्हापूर)

• बाळशास्त्री जांभेकर- पोंभुर्ले (रत्नागिरी)

• महात्मा फुले- पुणे

• महर्षी धोंडो केशव कर्वे- शेरवली (रत्नागिरी)

• गोपाळ गणेश आगरकर- टेंभू (सातारा)

• गोपाळ हरी देशमुख- पुणे

• न्या. महादेव गोविंद रानडे- निफाड (नाशिक)

• सयाजीराव गायकवाड- कवळाणे (नाशिक)

• बाळ गंगाधर टिळक- (रत्नागिरी)

• आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके-
शिरढोण (रायगड)

• आचार्य विनोबा भावे- गागोदे (रायगड)

• स्वा. विनायक दामोदर सावरकर- भगूर (नाशिक)

• सावित्रीबाई फुले- नायगांव (सातारा)

• विठ्ठल रामजी शिंदे- जमखिंडी (कर्नाटक राज्य)

• गोपाळ कृष्ण गोखले- कातलुक (रत्नागिरी)

• विष्णू भिकाजी गोखले- बावधन (सातारा)

• डॉ. पंजाबराव देशमुख- पापळ (अमरावती)

• साने गुरुजी- पालघर (रायगड)

• संत गाडगेबाबा- शेणगांव (अमरावती)

• सेनापती बापट- पारनेर (अहमदनगर)

• संत ज्ञानेश्वर- आपेगाव

• संत एकनाथ- पैठण-

• समर्थ रामदास स्वामी- जांब (जालना)

महाराष्ट्रातील पहिले सुरू झालेले किंवा पहिले झालेले व्यक्ती

1.  महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री

✅.  यशवंतराव चव्हाण

2.  महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल
✅. श्री. प्रकाश

3.  महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका

✅. मुंबई

4. महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र 

✅. मुंबई (1927)

5.  महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र

✅. मुंबई (2 ऑक्टोबर 1972)

5.  महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण

✅. गंगापूर (गोदावरी नदीवर -जि.नाशिक)

7.  महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य

✅. कर्नाळा (रायगड)

8.  महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र 

✅. खोपोली (रायगड)

9..  महाराष्ट्रातील पहिला अनुविद्युत प्रकल्प

✅. तारापुर

10.  महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ 

✅. मुंबई (1957)

11.  महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ

✅. राहुरी (1968 जि. अहमदनगर)

12.  महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना

✅. प्रवरानगर (1950 जि. अहमदनगर)

13.  महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी 

✅. कोल्हापूर जिल्हा विणकर सहकारी संस्था इचलकरंजी

14.  महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प जमसांडे 

✅. देवगड (जि. सिंधुदुर्ग)

15.  महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र 

✅. आर्वी (पुणे)

16.  महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प 

✅. चंद्रपुर

17.  महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक 

✅. दर्पण (1832)

18.  महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले मासिक

✅. दिग्दर्शन (1840)

19.  महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र 

✅. ज्ञानप्रकाश (1904)

20.  महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा

✅. पुणे (1848)

21.  महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा 

✅. सातारा (1961)

22.  महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी 

✅. मुंबई (1854)

23.  महाराष्ट्रचे पहिले पंचतारांकित हॉटेल

✅. ताजमहाल, मुंबई

24.  एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ति

✅. श्री. सुरेन्द्र चव्हाण

25.  भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ति 

✅. महर्षि धोंडो केशव कर्वे

26.  महाराष्टाचे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ति 

✅. श्री. सुरेन्द्र चव्हाण

27.  रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ति

✅. आचार्य विनोबा भावे

28.  महाराष्टाचे पहिले रँग्लर

✅. रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे

29.  महाराष्ट्रातील पहिल्या महिल्या डॉक्टर 

✅. आनंदीबाई जोशी

30.  महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा

✅. वर्धा जिल्हा

31.  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष 

✅. न्यायमूर्ती महादेव रानडे

32.  महाराष्ट्रातील पहिली रेल्वे ( वाफेचे इंजिन ) 

✅. मुंबई ते ठाणे (16 एप्रिल 1853 )

33.  महाराष्ट्रातील पहिली रेल्वे (विजेवरील) 

✅. मुंबई ते कुर्ला (1925)

34महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक 

✅.  सुरेखा भोसले (सातारा)

35.  महाराष्ट्रातील पहिला  संपूर्ण साक्षर जिल्हा

✅. सिंधुदुर्ग

36.  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा

✅. कुसुमावती देशपांडे

37.  महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त 

✅. डॉ. सुरेश जोशी

38.  महाराष्ट्रातील कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग 

✅. वडूज

39.  ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट

✅. श्वास (2004)

40.  राष्ट्रपती पदक प्राप्त दुसरा मराठी चित्रपट 

✅. श्वास

41.  राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट

✅. श्यामची आई

डोनाल्ड ट्रंप यांच्यावर महाभियोगाची प्रक्रिया सुरू


◾️ अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांनी महाभियोग सुरू करण्याची घोषणा केली.

◾️डेमोक्रॅट्स म्हणजेच ट्रंप यांच्या प्रतिस्पर्धी पक्षाचे उमेदवार जो बिडेन आणि त्यांचा मुलगा हंटर यांच्याविरुद्धच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी सुरू करावी यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर जेलेन्स्की यांच्यावर दबाव आणल्याचा आरोप राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्यावर आहे.

◾️ट्रंप यांनी या आरोपांचा इन्कार केला आहे. मात्र या प्रतिस्पर्ध्यांसंदर्भात युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा केल्याचं ट्रंप यांनी मान्य केलं आहे

◾️ट्रंप यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावरून हटवण्यासाठी किमान 20 रिपब्लिकन पक्षाच्या खासदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे.

◾️ दुसऱ्या शब्दांत ट्रंप यांच्याच पक्षाच्या 20 खासदारांना पक्षाविरोधात तसंच राष्ट्राध्यक्षांविरोधात बंडखोरी करावी लागेल.

◾️आतापर्यंत अमेरिकेच्या कोणत्याही राष्ट्राध्यक्षांना महाभियोग चालवून पदावरून हटवण्यात आलेलं नाही.

◾️अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ सभागृहात, डेमोक्रॅट्स पक्षाच्या 235 खासदारांपैकी 145 महाभियोगाच्या बाजूने आहेत.

◾️महाभियोग प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात कनिष्ठ सभागृहाने मंजुरी दिली तरी सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचं बहुमत असलेल्या सभागृहात पारित होणं अवघड आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

प्रसिद्ध कॉमेडियन वेणू माधव कालवश

◾️प्रसिद्ध तेलुगू अभिनेते व कॉमेडियन वेणू माधव यांचे वयाच्या ३९व्या वर्षी निधन झाले.

◾️ सिकंदराबादमधील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मूत्रपिंडाशी संबंधित आजाराने ते ग्रस्त होते.

◾️ प्रकृती अधिकच बिघडल्याने २४ सप्टेंबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र २४ तासांच्या आतच त्यांची प्राणज्योत मालवली.

◾️गेल्याच आठवड्यात त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. लवकरात लवकर किडनी प्रत्यारोपण करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.

◾️पण डिस्चार्ज मिळाल्यानंतर दोन दिवसांतच त्यांची तब्येत पुन्हा बिघडली. वेणू माधव यांच्या अकस्मात निधनाने टॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

◾️आंध्र प्रदेशमधील नलगोंडा जिल्ह्यातील कोदाद येथे त्यांचा जन्म झाला.

◾️वेणू माधव यांनी मिमिक्री कलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली आणि त्यानंतर चित्रपटात कॉमेडियन म्हणून पदार्पण केलं.

◾️१९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘संप्रदायम’ या तेलुगू चित्रपटातून त्यांनी पदार्पण केलं.

◾️ वेणू माधव यांनी जवळपास २०० तेलुगू व तामिळ चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

◾️ गेल्या दोन वर्षांत त्यांनी राजकारणातही सहभाग घेतला.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

◾️उस्मानाबादमध्ये होणाऱ्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली आहे. 

📚फादर दिब्रिटो यांची साहित्यसंपदा📚

📌 आनंदाचे तरंग : मदर टेरेसा

📌 ओअसिसच्या शोधात

📌 तेजाची पाऊले

📌 नाही मी एकला

📌 संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची

📌 सुबोध बायबल

📌. सृजनाचा मळा

📌 परिवर्तनासाठी धर्म

📌 ख्रिस्ताची गोष्ट

📌 मुलांचे बायबल

📌. ख्रिस्ती सण आणि उत्सव

📌 पोप जॉन पॉल दुसरे

📌. गोतावळा

📌 गिदीअन

📌. सृजनाचा मोहोर

बंगाल संघटनेच्या अध्यक्षपदी सौरभ गांगुली निश्चित

👉सर्वोच्च पदासाठी एकही प्रतिस्पर्धी नाही, अध्यक्षपदाचा कालावधी मात्र फक्त जुलै 2020 पर्यंतच माजी भारतीय कर्णधार सौरभ गांगुली बंगाल क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी पुन्हा बिनविरोध निवडला जाईल, हे शनिवारी निश्चित झाले. संघटनेच्या निवडणुकीसाठी शनिवारी शेवटच्या दिवशी गांगुलीच्या पाच सदस्यीय पॅनेलविरुद्ध एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे, त्याची फेरनिवड निश्चित मानली जाते.

👉बंगाल क्रिकेट संघटनेची 85 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. 28 सप्टेंबर रोजी होत आहे. त्यावेळी या निवडीवर शिक्कामोर्तब होईल. अर्थात, गांगुलीची नव्या अध्यक्षपदाची मुदत मात्र जुलै 2020 पर्यंतच असणार आहे.

👉जगमोहन दालमिया यांचे निधन झाल्यानंतर 2015 मध्ये गांगुली बंगाल क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी विराजमान झाला. त्यापूर्वी 2014 मध्ये तो संयुक्त सचिवपदी कार्यरत होता. यामुळे जुलै 2020 मध्ये कोणत्याही पदावर कार्यरत राहण्याची त्याची 6 वर्षांची कारकीर्द पूर्ण होईल आणि याचमुळे जुलैपर्यंतच त्याला अध्यक्षपदी कार्यरत राहता येणार आहे.

👉एप्रिलनंतर पुन्हा संभ्रम

👉सध्याच्या घडीला अधिकृत नेंदीनुसार, गांगुली अन्य कोणत्याही पदावर कार्यरत नाही. दिल्ली कॅपिटल्सचा तो प्रवर्तक म्हणून कार्यरत होता. पण, यंदाच्या आयपीएलनंतर त्याने या पदाचा राजीनामा दिला. अर्थात, पुढील आवृत्तीत त्याला दिल्ली कॅपिटल्समधील कार्यभार नव्याने स्वीकारता येऊ शकेल. असे केल्यास तो एप्रिलपासून बंगाल क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी कायम राहू शकेल का, हे मात्र पहावे लागेल.

👉दालमियांचे चिरंजीव अभिषेक नव्या निवडीनुसार संयुक्त सचिवऐवजी सचिव असतील तर टाऊन क्लबचे देब्राता दास संयुक्त सचिव असणार आहेत. बंगाल क्रिकेट संघटनेसाठी यापूर्वी पाच उपाध्यक्ष असायचे. पण, आता केवळ एकच उपाध्यक्ष असणार आहे. अनुभवी प्रशासक नरेश ओझा हे आता उपाध्यक्षपदी विराजमान होतील. देबाशिष गांगुली खजिनदारपदी रुजू होतील.

👉तर अध्यक्षपदी अभिषेक दालमिया

👉जुलै पेक्षा पूर्वी गांगुलीने अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तर अभिषेक दालमिया अध्यक्षपदाची सूत्रे घेतील, असे संकेत आहेत. अभिषेक दालमियांनी युवा प्रशासक या नात्याने आपल्या कामगिरीची मोहोर यापूर्वीच उमटवली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य संघटनांच्या निवडणुकीवरील बंधने शुक्रवारी शिथिल केली. त्यानंतर विविध संघटनांच्या कार्यकारिणी निवडीला वेग येणे अपेक्षित आहे.

👉काही दिवसांपूर्वी प्रशासक समितीने कूलिंग ऑफ पिरेड कसे मोजले जाईल, याचा तपशील जाहीर केला होता. त्यानंतर गांगुलीच्या पात्रतेविषयी संभ्रम निर्माण झाला होता. कारण, अध्यक्षपदी विराजमान होण्यापूर्वी 2014 मध्ये त्याने तीन वर्षांसाठी कार्यकारिणी सदस्य म्हणून काम पाहिले होते. बंगाल क्रिकेट संघटनेची शेवटची वार्षिक सर्वसाधारण सभा जगमोहन दालमिया यांच्या पर्वात 2015 मध्ये झाली आणि दालमिया त्यावेळी सलग आठव्यांदा बिनविरोध निवडले गेले होते. 2016 मध्ये लोढा समितीच्या अहवालानुसार बंगाल क्रिकेट संघटनेने वार्षिक सर्वसाधारण सभा रद्द केली होती.

👉बंगाल क्रिकेट संघटना पॅनेल

👉अध्यक्ष : सौरभ गांगुली, उपाध्यक्ष : नरेश ओझा, सचिव : अभिषेक दालमिया, संयुक्त सचिव : देब्राब्रता दास, खजिनदार : देबाशिष गांगुली.

178 वर्ष जुनी ‘थॉमस कुक’ ही ब्रिटिश प्रवासी  कंपनी बंद पडली

👉ब्रिटनची 178 वर्ष जुनी ट्रॅव्हल कंपनी थॉमस कुक आपला व्यवसाय बंद करत आहे, अशी घोषण कंपनीने केली आहे.

👉आर्थिक संकटात सापडल्यामुळे कंपनीने सध्या व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

👉 कंपनीने सर्व हॉलिडे, फ्लाईट बुकिंग रद्द केले आहेत.

👉व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी 25 कोटी अमेरिकी डॉलरची गरज आहे.

👉थॉमस कुक कंपनी अचानक बंद होणार असल्याने जगभरात फिरायला गेलेले जवळपास 1.50 लक्ष लोक जिथे-तिथे अडकले आहेत.

👉याशिवाय जगभरातली 22 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्याही धोक्यात आल्या आहेत. यामध्ये 9 हजार कर्मचारी ब्रिटनमधील आहेत.

👉थॉमस कुकची सन 1841 मध्ये स्थापना झाली.

👉 1855 साली कंपनीने पहिली ऐसी ऑपरेटर सुविधा प्रवाशांसाठी सुरु केली, जी ब्रिटिश प्रवाशांना एस्कॉर्ट ट्रिपवर युरोपीयन देशात घेऊन जात होती.

👉त्यानंतर 1866 साली कंपनीने अमेरिका ट्रिप आणि 1872 साली संपूर्ण जगात कंपनीने आपली सेवा सुरु केली.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘गडी गायरानात गुरे घेऊन गेला आहे.’ वरील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारात येतो?

   1) सामासिक शब्द    2) अभ्यस्त शब्द   
   3) तत्सम शब्द      4) तद्भव शब्द
उत्तर :- 1

2) योग्य विरामचिन्हे दिलेले वाक्य ओळखा.

   1) सोड, मला ! तो जोराने ओरडला      2) ‘सोड मला’, तो जोराने ओरडला
   3) “सोड मला !” तो जोराने ओरडला    4) “सोड मला”, तो जोराने ओरडला

उत्तर :- 2

3) देशी शब्द शोधा.

   1) धडधड    2) धोंडा     
   3) धाक    4) धोरण

उत्तर :- 2

4) ‘अभिधा शक्तीचे’ उदाहरण असलेले वाक्य पर्यायी उत्तरांतील कोणते आहे ?

   1) काय गाढव आहे !        2) मला फार भूक लागली
   3) शेजारच्या गावी आम्ही नदीवरून जातो    4) ‘मुलांनो, आता दिवे लागणीची वेळ झाली.’

उत्तर :- 2

5) ‘अचूक’ या शब्दाला समानार्थी पर्यायी शब्द शोधा.

   1) अगम्य    2) नेमका     
   3) अचानक    4) नीट

उत्तर :- 2

6) ‘तो गावोगाव भटकत फिरला’ या वाक्यातील अधोरेखित शब्दातील क्रियाविशेषण अव्यय कोणते?

   1) साधित क्रियाविशेषण अव्यय      2) सामासिक क्रियाविशेषण अव्यय
   3) सिध्द क्रियाविशेषण अव्यय      4) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय

उत्तर :- 2

7) योग्य शब्दयोगी अव्ययाचा वाक्यात उपयोग करा.

     डोळयांनी .................. पाहून देव दिसत नाही, अंत: चक्षूंनी पहावा लागतो.

   1) सुध्दा    2) फक्त      3) केवळ      4) पण

उत्तर :- 3

8) पण, परंतु, परी, किंतु, तरी हे शब्द उभयान्वयी अव्ययांच्या कोणत्या प्रकारातील आहे ?

   1) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय    2) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय
   3) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय    4) उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 3

9) योग्य पर्याय निवडा.

   अ) केवलप्रयोगी अव्यय अविकारी असतात.
   ब) केवलप्रयोगी अव्यये वाक्याचा भाग नसतात.
   1) अ      2) ब      3) दोन्ही      4) दोन्ही नाही

उत्तर :- 3

10) खालीलपैकी रीति भूतकाळाचे वाक्य कोणते ?

   1) तो रोज व्यायाम करत असतो.      2) तो रोज व्यायाम करतो.
   3) तो रोज व्यायाम करत होता.      4) तो रोज व्यायाम करत असे.

उत्तर :- 4

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...