Monday, 23 September 2019

महत्त्वाचे 10 प्रश्न उत्तरे

1) गझनवी क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे?
उत्तर : पाकिस्तान

2) यावर्षीच्या क्रिडा दिनी पंतप्रधान मोदींनी कोणत्या अभियानाची घोषणा केली?
उत्तर : फिट इंडिया अभियान

3) 'बॅटरीवर धावणारी सिटी बस' सेवा भारतात सर्वप्रथम कुठे सुरु झाली?
उत्तर : गांधीनगर (गुजरात)

4) भारतात परकीय गुंतवणूकीला कधीपासून सुरूवात झाली?
उत्तर : सन 1991

5) कोणत्या स्टेडियमच नाव बदलून 'अरुण जेटली स्टेडियम' असे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे?
उत्तर : फिरोजशहा कोटला स्टेडियम (दिल्ली)

6) 'लेमरू हत्ती वन प्रकल्प' कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
उत्तर : छत्तीसगड

7) IAF च्या फ्लाइंग युनिटच्या प्रथम महिला अधिकारी फ्लाइट कमांडर कोण?
उत्तर : शालिजा धामी

8) बहारीन या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणता पुरस्कार दिला आहे?
उत्तर : द किंग हमाद ऑर्डर ऑफ रेनेसेन्स

9) कोणत्या भारतीय खेळाडूने जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पहिले सुवर्णपदक पटकावले?
उत्तर : पी. व्ही. सिंधू

10) "कलवी तोलाईकाच्ची" हि शैक्षणिक दूरदर्शन वाहिनी कोणत्या राज्याने सुरु केली आहे?
उत्तर : तामिळनाडू

प्रश्नसंच 23/9/2019

1. स्कूल ऑफ आर्टिलरी कोठे आहे?
✅.  - देवळाली नाशिक. 

2.  नाशिक कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
✅.  - गोदावरी.

3.   गांगपूर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?
✅  - गोदावरी. 

4.   वारणा नदी कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. - नाशिक. 

5.   कोणत्या फळासाठी नाशिक प्रसिद्ध आहे?
✅. - द्राक्षे.

5.   नाशिक शहर कोणाचे तीर्थक्षेत्र आहे?
✅. - हिंदूचे. 

7.  संरक्षण साहित्य निर्मितीच्या ओझर कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. - नाशिक. 

8.   देवळाली कशासाठी प्रसिद्ध आहे?
✅. - लष्कर छावणी. 

9.  संगमनेर शहर कोणत्या नदीसाठी वसलेले आहे?
✅.  - प्रवरा.

10.  भंडारदरा विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅.  - अहमदनगर. 

11. अहमदनगर जिल्ह्यात सरासरी पाऊस किती पडतो?
✅.  - 55 सें.मी. 

12. अहमदनगर जिल्हा कोणत्या खोर्‍यात वसला आहे?
✅.  - गोदावरी. 

13.  निळवंडे धरण कोणत्या जिल्ह्यात बांधलेले आहे?
✅. - अहमदनगर. 

14.  केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे?
✅.  - जळगाव. 

15.     वरणगाव संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅.  - जळगाव. 

16.  चाळीसगांव-धुळे ब्रॉडगेज कोणत्या जिल्ह्यातून जातो?
✅. - जळगाव. 

17.  उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कोठे आहे?
✅.  - जळगाव. 

18.  जळगाव जिल्ह्यात सरासरी पाऊस किती पडतो?
✅. - 74 सें.मी. 

19.   पश्चिम खानदेश म्हणजेच आत्ताचा कोणता जिल्हा?
✅.  - धुळे. 

20.  सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या जिल्हयांशी संबंधीत आहे?
✅.  - नंदुरबार. 

21.  कोणत्या नदीच्या खोर्‍यात नंदुरबार जिल्हा वसला आहे?
✅.  - तापी. 

22.  नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी प्रमाण किती टक्के आहे?
✅.  - 50%.

23.  धुळे जिल्ह्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो?
✅.  - सूरत-नागपूर.

24. भुसावळ हे रेल्वे स्टेशन कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅.  - जळगाव. 

25.   जळगाव जिल्ह्यातून कोणता लोहमार्ग जातो?
✅. - धुळे-कलकत्ता. 

26.  जळगाव जिल्हा कोणत्या नदीच्या खोर्‍यात वसला आहे?
✅. - तापी. 

27.  महाराष्ट्रात दुसर्‍यांदा प्रवेश करणारी नदी जळगाव जिल्ह्यातून जाते ती कोणती?
✅. - तापी. 

28.  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे?
✅. - नाशिक. 

29.  मराठी चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची कर्मभूमी कोणत्या जिल्ह्यात येते?
✅.  - नाशिक. 

30. सिन्नर कशासाठी प्रसिद्ध आहे?
✅. - विडी उद्योग. 

महत्त्वाचे प्रश्नसंच


प्रश्न 1.
भारतीय राष्ट्रीय पंचांगात लीप वर्ष असेल तेव्हा वर्षा ची सुरुवात कोणत्या दिवशी केली जाते ?
👉 उत्तर :- ⚫  21 मार्च

प्रश्न 2.
विजयनगर चा सम्राट कोण होता?
👉 उत्तर : - 🔴 कृष्णदेवराय

प्रश्न 3.
अहमदनगर ही कोणाची राजधानी होती?
👉 उत्तर :- ⚫️ निजामशहा ची

प्रश्न 4.
शहाजी राजेंनी पुणे जहागिरीची जबाबदारी दादोजी कोंडदेव यांच्या वरती कोठे जातांना सोपविली होती.
👉 उत्तर :- ⚫️ कर्नाटकात जाताना

प्रश्न 5.
शिवाजी महाराज यांच्या मंत्रिमंडळात सेनापती हे पद कोणाकडे होते.
👉 उत्तर : - 🔴 हंबीरराव मोहिते यांचे कडे

प्रश्न 6.
सूर्याजी मालुसरे यांनी कोणता गड सर केला?
👉 उत्तर : - 🔴 कोंढाणा

प्रश्न 7
सज्जनांना राखावे,दुर्जनांना ठेचावे, हा बाणा कोणत्या राजाचा होता ?
👉 उत्तर : - ⚫️ शिवरायांचा

प्रश्न 8.
सरनोबत यांना......... म्हणून संबोधले जाते?
👉 : - उत्तर ⚫️ पायदळाचे प्रमुख

प्रश्न 9.
पुरंदरचे किल्लेदार कोण होते?
👉 उत्तर : - 🔴 मुरारबाजी

प्रश्न 10.
शिवजन्मापूर्वी महाराष्ट्रात देशमुख,देशपांडे हे कोण होते?
👉 उत्तर : - 🔴  वतनदार

प्रश्न 11.
वैयक्तीक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते .
👉 उत्तर :- ⚫  आचार्य विनोबा भावे

प्रश्न 12.
"भारतीय राज्य घटना"कोणत्या तारखेस अंमलात आली?
👉 उत्तर : - 🔴 26 जानेवारी 1950

प्रश्न 13.
या शास्त्रज्ञाने 1905 साली अनूयुगाचा पाया रचला ?
👉 उत्तर :- ⚫️ अल्बर्ट आईन्सटाईन

प्रश्न 14.
"जन गण मन" हे आपले राष्ट्रगीत आहे.हे गीत ......... यांनी लिहिले
👉 उत्तर :- ⚫️ रवींद्रनाथ टागोर

प्रश्न 15 ........... हा पंचायती राज व्यवस्थेचा पायाभूत घटक आहे.
.
👉 उत्तर : - 🔴 ग्राम पंचायत

प्रश्न 16 ........... हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे.?
👉 उत्तर : - 🔴 शेकरू

प्रश्न 17.
क्षेत्रफळाच्या दुष्टीने महाराष्ट्रातील ........ हा जिल्हा सर्वात लहान आहे ?
👉 उत्तर : - ⚫️ मुंबई शहर

प्रश्न 18.
"1857 चे स्वातंत्र्य समर" हा ग्रंथ कोणी लिहिला?
👉 : - उत्तर ⚫️ वि.दा.सावरकर

प्रश्न 19.
अधांसाठी लिपी चा खालीलपैकी कोणी शोध लावला?
👉 उत्तर : - 🔴 ब्रेल लुईस

प्रश्न 20.
महाराष्ट्र राज्यात 'तंटामुक्ती' गाव योजना खालीलपैकी कोणी सुरू केली .?
👉 उत्तर : - 🔴 आर.आर.पाटील
      
प्रश्न 21.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मतानुसार कोणता मूलभूत हक्क भारताच्या संविधानाचा आत्मा आहे?
👉 उत्तर :- ⚫ घटनात्मक न्यायालयिन दाद मागण्याचा हक्क

प्रश्न 22.
कोणत्या घटनादुरुस्तीनुसार संविधानामध्ये मुलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला?
👉 उत्तर : - ⚫️ 42 वी घटनादुरुस्ती नूसार

प्रश्न 23.
राष्ट्रपतीला त्यांच्या पदावरुन दूर करण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते?
👉 उत्तर:- ⚫ महाभियोग

प्रश्न 24.
राज्यपाल या पदासाठी आवश्यक   किमान वयोमर्यादा किती वयाची असते?
👉उत्तर:- 35 वर्षे

प्रश्न 25.
व्यक्ती स्वातंत्र्याच्या विकासाकरिता घटनेतील महत्त्वाची तरतूद कोणती?
👉:-  ⚪ मुलभूत हक्क

प्रश्न 26.
मूलभूत हक्कावर गदा आल्यास प्रथम कोठे दाद मागता येते?
👉:- 🔵 सर्वाच्च न्यायालय

प्रश्न 27.
राष्ट्रपतीवर महाभियोग खटला कोठे चालतो?
👉:- राज्यसभेत

प्रश्न 28.
खालीलपैकी कोणता अधिकार लोकसभेचा महत्वाचा अधिकार मनाला जातो?
👉उत्तर:- 🔵मंत्रीमंडळावर नियंत्रण ठेवणे

प्रश्न 29.
भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावाने कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे?
👉:- 🔴 न्याय

प्रश्न 30.
महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सभासद संख्या किती आहे?
👉:-⚫ 288

प्रश्न 41.
नदी जोड योजनेस कोणते नाव दिले आहे
👉 उत्तर :- ⚫ अमृतक्रांती

प्रश्न 42.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे(RPi) अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजीक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?.
👉 उत्तर : - 🔵 greatest leaders

प्रश्न 43.
भारताची आघाडीची महिला कुस्ती पटू विनेशा फोगट ने जागतिक कुस्ती अजिंक्य पद स्पर्धेत कोणत्या पदकाची कमाई केली?
👉 उत्तर : - ⚪ कास्य पदक

प्रश्न 44.
2019 सालचा सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी आयफा ( ifa )पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे?
👉 उत्तर : - 🔴 राजी

प्रश्न 45.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री?
👉 उत्तर : - 🔵 आलिया भट(राजी)

प्रश्न 46.
सर्वोत्कृष्ट अभिनेता?
👉 उत्तर : - ⚫️ रणवीर सिंग(पदमावत)

प्रश्न 47.
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक?
👉 उत्तर : - ⚪ श्रीराम राघवणं(अंधाधून)

प्रश्न 48.
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री?
👉 उत्तर : - 🔵 आदिती राव हैदरी (पदमावत)

प्रश्न 49.
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता?
👉 उत्तर : - ⚫️ विकी कौशल (संजू)

प्रश्न 71.
महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे.?
👉 उत्तर :- 🔴 नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण

प्रश्न 72.
सायमन कमिशन ची स्थापना कधी झाली?
👉उत्तर :- ⚫️ 1927

प्रश्न 73.
भारतीय राष्ट्रवादाचे जनक:
👉 उत्तर :- 🔴 सुरेंद्रनाथ चटर्जी

प्रश्न 74.
महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी
👉 उत्तर :- 🔴 हरावत

प्रश्न 75.
दोन्ही हंगामांमध्ये येणारे पिक कोणते?
👉 उत्तर :- 🔴 ज्वारी

प्रश्न 76.
भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार
👉 उत्तर :- 🔴 विक्रम साराभाई

प्रश्न 77.
सर्वात उत्तरेकडील नदी कोणती
👉 उत्तर :- ⚫️ सिंधू

प्रश्न 78.
शून्याचा शोध कोणी लावला
👉 उत्तर :- 🔴 आर्यभटट
 
प्रश्न 79.
महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता
👉 उत्तर :- 🔴 अहमदनगर जिल्हा

प्रश्न 81.
गडचिरोलीवरून नागपूर कडे जातांना खालीलपैकी कोणत्या नद्या लागतात
👉उत्तर :-🔴 कठाणी - खोब्रागडी

प्रश्न 82.
"रैला" कशाचा प्रकार आहे?
👉उत्तर :-⚫️नृत्य

प्रश्न 83.
खालीलपैकी कोणती भाषा गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने बोलली जात नाही?
👉उत्तर :- 🔴 तामिळ

प्रश्न 84.
लिएंडर पेस हा खेळाडू कोणत्या खेळाशी निगडीत आहे?
👉उत्तर :- ⚫️ लाँन टेनिस

प्रश्न 85.
भारतातील सर्वात लांब नदी कोणती ?
👉उत्तर :- 🔴 गंगा

प्रश्न 86.
ईटीयाडोह धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
👉 उत्तर :- ⚫️ भंडारा

प्रश्न 87.
बिडी बनविण्यासाठी खालीलपैकी कोणत्या झाडांची पाने वापरली जातात?
👉उत्तर :- ⚫️ तेंदू

प्रश्न 88.
वनहक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रांमपंचायत कोणती ?
👉उत्तर :- 🔴 लेखामेंढा

प्रश्न 89.
छत्तीसगडची राजधानी कोणती आहे?
👉उत्तर :- ⚫️ रायपूर

प्रश्न 90.
"विंग्ज ऑफ फायर" या पुस्तकाचे लेखक ................. आहेत?
👉 उत्तर :- 🔴 ए.पी.जे.अब्दूल कलाम

प्रश्न 91.
हॉकीचा जादूगार कोणास म्हंटले जाते.
👉 उत्तर :- ⚫  ध्यानचंद

प्रश्न 92.
स्व. राजीव गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव काय?
👉 उत्तर : - 🔴 विरभूमी

प्रश्न 93.
मुस्लिम लीग ची स्थापना कधी झाली?
👉 उत्तर :- ⚫️ सन 1906

प्रश्न 94.
लिबिया ची राजधानी कोणती.
👉 उत्तर :- ⚫️ त्रिपोली

प्रश्न 95.
संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोठे आहे.
👉 उत्तर : - 🔴 न्यूयॉर्क

प्रश्न 96.
कोणता दिवस भारतात हिंदी दिन साजरा केला जातो?
👉 उत्तर : - 🔴 14 सप्टेंबर

प्रश्न 97.
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र सुरु करण्यात आले आहे ?
👉 उत्तर : - ⚫️ पाडेगाव

प्रश्न 98.
( ISRO ) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने जाहीर केले आहे की संस्था ‘SpaceIL’ या संस्थेसोबत करार करणार आहे.; ‘SpaceIL’ कोणत्या देशाचे अवकाश केंद्र आहे?
👉 : - उत्तर ⚫️ इस्त्राएल

प्रश्न 99.
कोणत्या राज्य सरकारने इनोव्हेशन व्हिजन मोहिमेअंतर्गत 'जन सुचना पोर्टल'चा आरंभ केला?
👉 उत्तर : - 🔴 राजस्थान

प्रश्न 100.
भारतीय कंपनीद्वारे भारतात प्रथमच मेरीटाइम कम्युनिकेशन सर्विसेस कुठे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत?
👉 उत्तर : - 🔴  मुंबई, महाराष्ट्र

प्रार्थना समाजाची स्थापना व तत्त्वज्ञान

🌸दादोबा पांडूरंग व डॉ. आत्माराम पांडूरंग यांच्या पुढाकाराने ३१ मार्च १८६७ मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापन करण्यात आला. प्रार्थना समाजाचे तत्त्वज्ञान पुढीलप्रमाणे होते.

🌸परमेश्वर एक असून तो विश्वाचा निर्माता आहे. तो निराकार आहे. तो दयाळू आहे. तो सर्वांवर प्रेम करतो.

🌸सत्य, सदाचार व भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग आहेत. या मार्गानेच गेल्यानंतर तो प्रसन्न होतो.

🌸प्रार्थनेमुळे भौतिक फलप्राप्ती होत नाही, मात्र प्रार्थनेमुळे आध्यात्मिक उन्नती होते.

🌸परमेश्वर अवतार घेत नाही. त्याने कोणताही धर्मग्रंथ लिहिला नाही.

🌸मूर्तिपूजा परमेश्वरास मान्य नाही.

🌸सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. म्हणूनच सर्वांनी बंधुत्त्वाच्या भावनेने एकमेकांशी व्यवहार करावा.

🔶प्रार्थना समाजाचे कार्य🔶

🌺प्रार्थना समाजाने अस्पृश्यता निर्मूलन, स्त्रीशिक्षण, विधवा विवाह, आंतरजातीय विवाह इत्यादी क्षेत्रात बहुमोल कामगिरी केली. श्री. आर. जी. भांडारकर व न्यायमूर्ति महादेव गोविंद रानडे हे प्रार्थना समाजाचे मुख्य आधारस्तंभ होते.

🌺न्या. रानडे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करुन भारतीय जनतेत राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार केला. त्यांनी विधवा विवाह मंडळ स्थापन केले.

🌺ना. म. जोशी यांनी “सोशल सर्व्हिस लीग” स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले.

🌺देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी “सर्व्हंटस ऑफ इंडिया सोसायटी” ही संस्था स्थापन केली. या संघटनेने अस्पृश्यता निर्मूलनच्या क्षेत्रात फार मोलाचे कार्य केले.

🌺अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन” ही संस्था स्थापन केली. या संघटनेने अस्पृश्यता निवारणाच्या क्षेत्रात फार मोलाचे कार्य केले.

🌺प्रार्थना समाजाच्या वतीने पंढरपूर येथे “अनाथ बालकाश्रम” काढण्यात आला. समाजाच्या गरजेच्या दृष्टीने ही भरीव कामगिरी होती.

🌺मुलींच्यासाठी स्वतंत्र शाळा सुरु केल्या. “आर्य महिला समाज” ही स्त्रियांसाठी कार्य करणारी संस्था चालू करण्यात आली.

🌺४ मे १८७३ रोजी प्रार्थना समाजाने “सुबोध पत्रिका” हे त्यांचे मुखपत्र सुरु केले होते. या मुखपत्रातून सामाजिक व राजकीय विचार मांडले जात होते.

🌺मजुरांच्यासाठी पहिली रात्रशाळा मुंबईमधील चेऊलवाडी येथे भिकोबा लक्ष्मण चव्हाण यांच्या पुढाकाराने इ. स. १८७६ मध्ये काढण्यात आली होती. त्यानंतर मुंबईच्या इतर भागात देखील रात्रशाळा काढण्यात आल्या.

🌺इ. स. १८९० रोजी मुंबईतील मदनपुरा येथे अस्पृश्यांसाठी शाळा काढण्यात आली.

🌺इ. स. १८७६-७७ च्या दुष्काळाच्या वर्षी प्रार्थना समाजाने दुष्काळ पीडितांसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले होते. अशा रीतीने प्रार्थना समाजाने एक भरीव सामाजिक कार्य केल्याचे आढळते.

🌺प्रार्थना समाजाची तत्वे पटवून देण्यासाठी, या समाजाबद्दल लोकांना असलेल्या निरनिराळ्या शंकाचे निरसन करण्यासाठी न्या. रानडे यांनी “एकेश्वरनिष्ठांची कैफियत” हा विचार प्रवर्तक ग्रंथ लिहीला.

🔶प्रार्थना समाजाच्या कार्याचे मूल्यमापन🔶

🌺प्रार्थना समाजाला चांगले नेतृत्व लाभूनही ठराविक शहरापुरतेच त्याचे कार्य पोहचू शकले. त्याचे कारण म्हणजे त्यातील सुधारक मिशनऱ्यांचे अनुकरण करीत होते. त्यामुळे हिंदूना त्यांच्या कार्याविषयी कधीच आपुलकी वाटली नाही.

मुंबईच्या एशियाटिक सोसायटीचे पुनर्मुद्रणामध्ये योगदान

आंतरजातीय विवाह, विधवा पुनर्विवाह, अल्पवयीन विवाहाला विरोध, हुंडा प्रथेला बंदी आणि अस्पृश्यता निवारण अशा विविध क्षेत्रांत देशाच्या पारतंत्र्याच्या काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळात समाज प्रबोधन आणि समाज सुधारणेमध्ये मूलगामी स्वरूपाचे योगदान देणाऱ्या ‘प्रार्थना समाज’ या संस्थेचा इतिहास नव्या स्वरूपात अभ्यासकांसाठी खुला होणार आहे. प्रार्थना समाजाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून प्रार्थना समाजाच्या इतिहासाचे पुनर्मुद्रण करण्यामध्ये मुंबईच्या एशियाटिक सोसायटीने योगदान दिले आहे. सामाजिक सुधारणेचा दस्तऐवज लवकरच खुला होणार आहे.

इतिहासाचे अभ्यासक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी इतिहास विभागप्रमुख डॉ. राजा दीक्षित यांनी ‘प्रार्थना समाजाचा इतिहास’ या ९० वर्षांपूर्वीच्या ग्रंथाच्या संपादनाची जबाबदारी स्वीकारली आहे. ‘प्रार्थना समाजाचा इतिहास’ हा सुमारे सातशे पृष्ठांचा मूळ ग्रंथ समाजाच्या हीरकमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून १९२७ मध्ये प्रकाशित झाला होता. आता प्रार्थना समाजाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून मुंबई येथील एशियाटिक सोसायटीने या इतिहासाचे पुनर्मुद्रण करण्याचा संकल्प केला आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद काळे आणि ग्रंथ प्रकाशन समितीच्या अध्यक्ष डॉ. मीना वैशंपायन यांनी या नव्या स्वरूपातील ग्रंथाला प्रस्तावना लिहिण्यासंदर्भात माझ्याशी संपर्क साधला होता. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून केवळ प्रस्तावना लिहिण्यापेक्षाही संपादन करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ही जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपविली असल्याचे डॉ. राजा दीक्षित यांनी सांगितले. डॉ. दीक्षित यांनी यापूर्वी तेलंगणा येथील मराठी साहित्य परिषदेतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘समग्र सेतू माधवराव पगडी’ या दहा खंडांच्या बृहत प्रकल्पातील पगडी यांच्या इतिहासविषयक लेखनाच्या दोन खंडांचे संपादन केले आहे.

भारताचे माजी सलामीवीर माधव आपटे यांचे निधन

माजी कसोटीपटू आणि भारताचे माजी सलामीवीर फलंदाज माधव आपटे यांचे सोमवारी पहाटे सहा वाजता निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. भारताकडून सात कसोटी सामने खेळणाऱ्या माधव आपटे यांनी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

माधव आपटे यांनी मुंबई संघातून पदार्पण करत रणजी सामन्यात सौराष्ट्रविरूद्ध शतक ठोकलं होत. त्यानंतर १९५२-५३ या काळात त्यांनी सात कसोटी सामन्यात भारताच प्रतिनिधीत्व केलं होतं. त्यावेळी पाकिस्तानविरूद्ध झालेल्या दोन कसोटी सामन्यासाठी माधव आपटे यांची भारतीय संघात निवड झाली. यावेळी त्यांनी उत्तम खेळ केला. त्यामुळे नंतर झालेल्या वेस्ट इंडिच दौऱ्यासाठीही त्यांची निवड झाली होती. पाच सामन्यांच्या मालिकेत आपटे यांनी सलामीला खेळताना एक शतक आणि अर्धशतकांसह ५१.११ च्या सरासरीने ४६० धावा केल्या होत्या.

या दौऱ्यात त्यांनी केलेली खेळी गाजली होती. वेस्ट इंडिजच्या गोलदांजाची धुलाई करत माधव आपटे यांनी १६३ धावांची खेळी केली. पाॅली उमरीगर यांच्यानंतर सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ते ठरले होते. हा विक्रम १८ वर्ष त्यांच्या नावावर होता. या दौऱ्यानंतर त्यांना पुन्हा भारतीय संघात स्थान मिळालं नाही. दरम्यान, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळताना त्यांनी ६७ सामन्यात ३३३६ धावा केल्या आहेत. यात सहा शतक त्यांनी झळकावली होती. क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि मुंबईचे नगरपाल या दोन्ही पदावर त्यांनी काम केले होते. माधव आपटे यांनी ‘अ‍ॅझ लक वुड हॅव इट’ हे आत्मचरित्र लिहिले. या पुस्तकात “निवड समितीचे लाला अमरनाथ यांनी आपल्या वडिलांना दिल्लीतील कोहिनूर मिलच्या व्यवसायात भागीदार करून घेण्याची मागणी केली होती. वडिलांनी नकार दिल्याने आपली निवड होऊ शकली नाही,” असा गौप्यस्फोट माधव आपटे यांनी केला होता.

क्रिकेटच्या सर्व प्रकारातील गुरू अशीच त्यांची ओळख होती. त्यांनी जात, धर्म, लिंग, गरीब-श्रीमंत या भेदांपलीकडे जाऊन उदयोन्मुख खेळाडूंना मार्गदर्शन केलं. त्यांचा स्वभावही खेळासारखीचं खिलाडूवृत्तीचा होता. त्यामुळे क्रिकेटपासून ते उद्योग क्षेत्रात त्यांचा मित्र परिवार होता. एका खेळाडू बरोबरचं यशस्वी उद्योजक म्हणूनही ते परिचित होते.

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...