Sunday, 22 September 2019

Current affairs question set

📌भारताचा कॉर्पोरेट कर दरात कपात करत ____ एवढा केला, ज्यामुळे खासगी क्षेत्रासाठी अप्रत्यक्षपणे 1.45 लक्ष कोटी रुपयांचे भांडवल मिळणार.

(A) 24 टक्के
(B) 22 टक्के✅✅✅
(C) 26 टक्के
(D) 28 टक्के

📌कोणते राज्य सरकार सरकारी रुग्णालयात काम करणार्‍या डॉक्टरांच्या खासगी सरावावर बंदी घालणार आहे?

(A) आंध्रप्रदेश✅✅✅
(B) पंजाब
(C) महाराष्ट्र
(D) कर्नाटक

📌कोणत्या राज्यात NTPC भारतातले सर्वात मोठे सौर पार्क तयार करणार?

(A) तामिळनाडू
(B) कोलकाता
(C) राजस्थान
(D) गुजरात✅✅✅

📌खालीलपैकी कोणते विधान ‘INS खंदेरी’ बाबत अचूक नाही?

(A) INS ‘खंदेरी’ स्कॉर्पियन पाणबुडी मझगाव डॉक लिमिटेड (MDL) द्वारे तयार करण्यात आली आहे.

(B) INS ‘खंदेरी’ ही कलवरी श्रेणीतली डिझेल-इलेक्ट्रिक वर चालणारी लढाऊ पाणबुडी आहे

(C) पाणबुडी खंदेरीची संरचना अमेरिकेच्या नेवल ग्रुप या संस्थेने तयार केली आहे.

(D) पाणबुडी खंदेरीचे नाव हिंद महासागरात सापडणार्‍या घातक सॉफिश खंदेरी याच्या नावावरून ठेवले गेले आहे.

📌चीन आणि तैवान यांच्यातल्या तणावावरून तैवान आणि ___ या देशाने त्यांच्यातले राजनैतिक संबंध तोडले.

(A) किरीबाती✅✅✅
(B) फिलीपिन्
(C) जापान
(D) अफगाणिस्तान

📌कोणत्या मंत्रालयाने “नॅशनल एज्युकेशनल अलायन्स फॉर टेक्नॉलॉजी (NEAT) आर्टिफिश्यल इंटेलिजेंस (AI)” या नावाने योजना सादर केली?

(A) इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
(B) मनुष्यबळ विकास मंत्रालय✅✅✅
(C) सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय
(D) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय

📌कोणते ‘सुगम्य भारत अभियान' उद्दीष्ट आहे?

(A) कोणत्याही शासकीय विभागाची माहिती मिळविणे

(B) आधारशी सामाजिक माध्यमे जोडण्यासाठी जेणेकरून एकाच व्यासपीठावर माहिती मिळू शकणार

(C) न्यायालयीन कार्यवाहीसंदर्भातली संपूर्ण माहिती उपलब्ध करून देणे

(D) देशभरात दिव्यांगजनांसाठी अडथळा विरहीत व अनुकूल वातावरण तयार करणे
✅✅✅

अस्मिता लाल’ निर्मितीचा राज्यातील पहिला प्रयोग अकोल्यात

🅾ग्रामीण भागात मासिक पाळी विषयी अनेक गैरसमज असल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. या गंभीर प्रश्नावर काम करण्यासाठी अकोला जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. जनजागृतीपासून ते वापरलेल्या पॅडची विल्हेवाट लावण्यापर्यंतच्या कार्याची साखळी करून त्यावर काम केले जात आहे. अकोल्यातील युवक वर्गाच्या सहकार्यातून सर्वप्रथम ‘रक्तस्राव होण्यात आनंद’ या संगीत अल्बमची निर्मिती करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनीही त्याची दखल घेऊन ते गाणे ट्विट केले. आता महिला बचत गटांच्या सहकार्यातून ‘अस्मिता लाल’ सॅनिटरी नॅपकिन तयार केले जाणार आहेत.

🅾२८ मे रोजी मासिक धर्म स्वच्छता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात या प्रश्नावर कार्य करण्याची संकल्पना अकोल्यात पुढे आली. सामाजिक कार्य करणाऱ्या अकोल्यातील युवांनी त्यासाठी पुढाकार घेतला. सुफी कलाकार, शास्त्रीय संगीताचा विद्यार्थी आणि एमबीबीएस पदवीधर २८ वर्षीय तारिक फैज याने गीत लिहिले. रमिझ राजा याने त्या गाण्याला संगीतबद्ध केले. कृतिका आणि रसिक बोरकर या भगिनींनी ते गाणे गायले. विनाशुल्क हे कार्य करण्यात आले. या विषयावर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काम करणारी २२ वर्षीय सांची गजघाटे हिची संकल्पना प्रत्यक्षात साकारली.

🅾अत्याधुनिक पद्धतीने गाणे रेकॉर्डिग करून त्याचे चित्रिकरण करण्यासाठी निधीची समस्या होती. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी युनिसेफशी संपर्क साधला. युनिसेफसह मुंबई येथील माहितीपटाचे निर्माते प्रीतेश पटेल यांनी सहकार्य केले. पुणे जिल्हय़ाच्या भोर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संगीत अल्बमचे २९ ते ३१ जुलै दरम्यान चित्रिकरण करण्यात आले. त्यामध्ये स्थानिक विद्यार्थी व पालकांनाच कलाकार म्हणून संधी मिळाली. तिशीच्या आतील युवांच्या चिकाटीतून ‘खून जिस्म से निकले, तो ये जहाँन चले’ हा संगीत अल्बम तयार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच हे गाणे  ट्विट केले.

न्या. ताहिलरामानी यांचा राजीनामा मंजूर

◾️मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश श्रीमती विजया ताहिलरामानी यांचा राजीनामा स्वीकारण्यात आल्याची माहिती सरकारी अधिसूचनेत देण्यात आली आहे.

◾️६ सप्टेंबरपासून त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला असून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने त्यांची मेघालय उच्च न्यायालयात केलेली बदली रद्द करण्यास नकार दिला होता.

◾️ त्यानंतर त्यांनी मुख्य न्यायाधीश पदाचा राजीनामा दिला.

◾️मद्रास उच्च न्यायालयाच्या हंगामी मुख्य न्यायाधीशपदी आता व्ही. कोठारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◾️मद्रास उच्च न्यायालयातून ताहिलरामानी यांच्या केलेल्या बदलीमुळे चेन्नई व महाराष्ट्रात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात वकिलांकडून निदर्शने करण्यात आली होती.

◾️बदलीच्या निर्णयाचा फेरविचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर ताहिलरामानी यांनी सहा सप्टेंबरला राजीनामा दिला होता.

◾️ त्यांनी हा राजीनामा  राष्ट्रपती कोविंद यांना पाठवला व त्याची प्रत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना पाठवली होती.

◾️गोगोई यांनी ताहिलरामानी यांच्या बदलीची शिफारस केली होती.

◾️ताहिलरामानी यांना गेल्या वर्षी ८ ऑगस्टला बढती देऊ न मद्रास उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश नेमण्यात आले होते.

◾️ २६ जून २००१ रोजी ताहिलरामानी यांना मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमण्यात आले होते.

◾️त्या २ ऑक्टोबर २०२० रोजी निवृत्त होणार होत्या.

◾️त्रिपुरा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदासाठी  न्या. कुरशी यांच्या नावाची शिफारस

◾️त्रिपुरा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्या. अकील कुरेशी यांना बढती द्यावी, अशी शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने केली आहे.

◾️यापूर्वी न्या. कुरेशी यांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्यामध्ये न्यायवृंदाने बदल केला आहे.

इंटरनेट मिळविणे हा मूलभूत हक्क आहे: केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय

इंटरनेटची उपलब्धता हा घटनेच्या कलम 21 अन्वये शिक्षणाचा मूलभूत हक्क तसेच गोपनीयतेच्या अधिकाराचा भाग असल्याचा निर्णय 19 सप्टेंबर 2019 रोजी एका सुनावणीदरम्यान केरळ उच्च न्यायालयाने दिला. न्यायालयाने हे स्पष्ट केले की शिस्तीची अंमलबजावणी करणे याचा अर्थ विद्यार्थ्यांचे ज्ञान मिळवण्याचे मार्ग अडवून ठेवणे असा होत नाही.

त्यामुळे इंटरनेटची उपलब्धता हा मानवी अधिकार घोषित करणारे केरळ हे पहिले राज्य ठरणार आहे.

इतर निर्णय

🔸महाविद्यालयीन विद्यार्थी प्रौढ असल्यामुळे पालकांच्या विनंतीवरूनही अशा प्रकाराचे निर्बंध लादता येणार नाहीत.

🔸महाविद्यालयीन वसतिगृहांमध्ये अभ्यासाच्या वेळी मुलींना मोबाईल फोनवर इंटरनेट मिळविण्यापासून रोखले जाऊ शकत नाही.

पार्श्वभूमी

कोझीकोड येथील श्री नारायण गुरु महाविद्यालयाने महाविद्यालयाच्या वसतिगृहासाठी ठरविलेल्या निश्चित तासाबाहेर मोबाइल फोन वापरल्यामुळे वसतिगृहामधील फाहीमा शिरीन ह्या विद्यार्थिनीला बाहेर काढले होते. त्यानंतर याचिकाकर्त्याने वसतिगृहाच्या या नियमांना आव्हान दिले होते की महिला विद्यार्थी वयस्क असल्याने मोबाइल फोन वापरण्याच्या तिच्या स्वातंत्र्यात अडथळा आणण्याचा कोणालाही अधिकार नाही.

विद्यार्थ्यांकडून होत असलेल्या मोबाइल फोनच्या गैरवापराविषयी पालकांच्या विनंतीनंतर ही बंदी आणण्यात आल्याचे महाविद्यालयाने म्हटले.

डिसेंबर २०२१ मध्ये भारत अवकाशात माणूस पाठवणार

◾️भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोला चांद्रयान-२ च्या लँडर बरोबर संपर्क प्रस्थापित करता आला नाही.

◾️चंद्रावर रात्र सुरु झाल्यामुळे आता हा संपर्क कधीच होऊ शकत नाही.

◾️ लँडर आणि त्यामध्ये असलेल्या रोव्हरचे आयुष्य १४ दिवसांचे होते.

◾️ ७ सप्टेंबरला इस्रोने चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा केलेला प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही.

◾️दरम्यान इस्रोचे अध्यक्ष सिवन यांनी भारताच्या भविष्यातील योजनांबद्दल माहिती दिली आहे.

◾️डिसेंबर २०२० मध्ये मानवी अवकाश विमान स्पेसमध्ये पाठवण्याची योजना आहे. ही मानवरहित मोहिम असेल. 

◾️जुलै २०२१ मध्ये मानवी अवकाश विमानाची दुसरी चाचणी असेल असे सिवन यांनी आयआयटी भुवनेश्वरच्या पदवीदान समारंभात सांगितले.

◾️डिसेंबर २०२१ मध्ये आपल्या स्वत:च्या रॉकेटमधून पहिला भारतीय अवकाशात पाठवण्याचे लक्ष्य आहे. त्यासाठी इस्रोमध्ये काम सुरु आहे असे सिवन म्हणाले.

◾️चांद्रयान २ मोहिमेत ९८ टक्के यश मिळाले आहे.

◾️विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षमतेचे सादरीकरण ही दोन उद्दिष्टये असल्यामुळे आम्ही या मोहिमेत ९८ टक्के यश मिळाले हे सांगत आहोत. तंत्रज्ञान क्षमतेच्या सादरीकरणात आम्ही मोठया प्रमाणात यशस्वी ठरलो आहोत असे सिवन म्हणाले.

◾️गगनयान मिशन देशासाठी खूप महत्वाचे असून त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाला चालना मिळेल.

◾️नवीन शोध लावण्याबरोबर धोके पत्करण्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.

◾️तुम्ही धोके पत्करले नाहीत तर आयुष्यात महत्वपूर्ण ठरणारे यश मिळवता येणार नाही असे सिवन म्हणाले.

चौथ्या औद्योगिक क्रांतीचे केंद्र भारतात स्थापन होणार


वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) ने भारतात चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठीचे केंद्र स्थापन करण्याची घोषणा 11 ऑक्टोबर 2018 रोजी केली.

📍चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी केंद्र

📍हे केंद्र महाराष्ट्रात स्थापन केले जाईल.

या केंद्राने ड्रोन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता व ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे तीन प्रकल्प सुरूवातीला हाती घेतले आहेत.

हे केंद्र केंद्रशासनाच्या सहकार्याने नवीन तंत्रज्ञानासाठी धोरण आराखडे व तत्वे तयार करण्याचे काम करेल.

या कामात उद्योग, अॅकॅडमीक्स, स्टार्ट अप्स व आंतरराष्ट्रीय संघटना यांच्यामधील तज्ज्ञांकडून साहाय्य घेतले जाईल.

WEF ने सुरूवातीला महाराष्ट्र व आंध्रप्रदेश या राज्यांशी नवीन तंत्रज्ञानात्मक पुढाकारासाठी भागीदारी केली आहे. यापुढे अजून इतर राज्यांशी भागीदारीसाठी WEF प्रयत्न करेल.

हा प्रकल्प संपूर्ण भारतभर व जगभर लागू होईल. WEF च्या जागतिक नेटवर्कचा भाग म्हणून भारतातील हे केंद्र सॅन फ्रान्सिको, टोकयो, बीजींग या केंद्राच्या समवेत कार्यरत राहील.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

राष्ट्रपतींकडून सर्वोच्च न्यायालयात चार नवीन न्यायाधीशांच्या नियुक्तीस मान्यता

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्वोच्च न्यायालयात चार नवीन न्यायाधीशांच्या नियुक्तीस मान्यता दिली आहे. त्यात न्यायमूर्ती कृष्णा मुरारी, न्यायमूर्ती एस. रवींद्र भट्ट, न्यायमूर्ती व्ही. राम सुब्रमण्यम आणि न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांचा समावेश आहे.

नवीन न्यायाधीशांच्या नियुक्तीबरोबरच सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या आता 34 झाली आहे. ही संख्या सर्वोच्च न्यायालयाच्या क्षमतेनुसार आहे आणि प्रथमच ती सर्वाधिक संख्या आहे.

अलीकडेच संसदेने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची क्षमता 31 वरून 34 केली. सर्वोच्च न्यायालय कॉलेजियमद्वारे नुकत्याच केंद्राकडे पाठविलेल्या न्यायाधीशांच्या शिफारसीला केंद्र सरकारने मान्यता दिली. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची एकूण संख्या दहा टक्‍क्‍यांपर्यंत वाढवण्याचे विधेयक नुकतेच लोकसभा आणि राज्यसभेने मंजूर केले.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) खालीलपैकी षष्ठी विभक्तीचे प्रत्यय ओळखा.

   1) स, ला, ना, ते    2) चा, ची, चे, च्या   
   3) त, इ, आ    4) ने, ए, शी, नी

उत्तर :- 2

2) ‘किती उंच पर्वत आहे हा !’ विधानार्थी वाक्य करा.

   1) कोण  म्हणेल हा पर्वत उंच नाही    2) हा पर्वत लहान थोडाच आहे
   3) पर्वत किती उंच आहे ?      4) हा पर्वत खूप उंच आहे

उत्तर :- 4

3) उद्देश्य व विधेय हे ................. चे घटक होत. वरील रिकाम्या जागेत अचूक पर्याय भरा.

   1) वाक्या    2) अर्थप्रकाश   
   3) अर्था    4) वाक्य प्रयोगा

उत्तर :- 1

4) शिपायाकडून चोर पकडला गेला. – या वाक्यातील प्रयोग ओळखा.

   1) कर्तरी    2) सकर्मक कर्तरी   
   3) नवीन कर्मणी    4) भावे

उत्तर :- 3

5) खालील पर्यायी उत्तरांतील योग्य उत्तर कोणते ?

     ‘अव्ययीभाव समासात .............................’

   1) पहिले पद प्रुख    2) दुसरे पद प्रमुख
   3) दोन्ही पदे प्रमुख    4) तिसरे पद प्रमुख

उत्तर :- 1

6) खालील वाक्यात शेवटी विरामचिन्हे द्या. – सुनील शाळेला का जात नाही.
   1) .      2) ?     
   3) !      4) :

उत्तर :- 2

7) ‘कुल’ या शब्दाचे शब्दसाधित रूप कोणते होईल ?
   1) कुळाचार    2) कुळकर्णी   
   3) कुलटा    4) कुलीन

उत्तर :- 4

8) योग, रूढी, योगरूढ हे कोणत्या शब्दशक्तीचे प्रकार आहेत ?
   1) अभिधा    2) लक्षणा   
   3) व्यंजना    4) गौणी

उत्तर :- 1

9) ‘सूर्य’ या अर्थी पुढील शब्द वापरत नाही.
   1) रवि      2) आदित्य   
   3) भानू    4) सुधांशू

उत्तर :- 4

10) विधायक च्या विरुध्द
   1) विनायक    2) विघातक   
   3) वैधानिक    4) संकट

उत्तर :- 2 

९३ व्या साहित्य संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो


🅱उस्मानाबाद येथील नियोजित ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली.

🅱 निमंत्रक संस्था असल्याने मराठवाडा साहित्य परिषदेने एकाही साहित्यिकाचे नाव सुचवले नाही.

🅱साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीबाबत अखिल उस्मानाबाद येथे रविवारी पार पडलेल्या भारतीय साहित्य महामंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

🅱महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ या घटक संस्थांसह संलग्नित संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

🅱घटक संस्थांनी वेगवेगळ्या साहित्यिकांची नावे अध्यक्षपदासाठी सुचवण्यात आली होती. 

🅱साहित्य संमेलनाची निमंत्रक संस्था मराठवाडा साहित्य परिषदेची शाखा असल्यामुळे ‘मसाप’ने नाव सूचवण्यात आले नाही.

🅱📚दिब्रिटो यांची कारकिर्द 📚🅱

🅱फादर फ्रान्सिस दिब्रिटो साहित्य आणि सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत.

🅱 ‘सुवार्ता’ मासिकाच्या माध्यमातून त्यांनी जनजागृतीपर लेखन केले आहे.

🅱 ‘सुबोध बायबल – नवा करार’ या ग्रंथासाठी दिब्रिटो यांना साहित्य अकादमीचा उत्कृष्ट अनुवादासाठीचा पुरस्कार मिळाला आहे.

🅱१५ व्या मराठी ख्रिती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे.

🅱‘संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची’, ‘आनंदाचे अंतरंग’, ‘तेजाची पाऊले’, ‘परिवर्तनासाठी धर्म’, ‘ओअॅसिसच्या शोधात’, ‘सृजनाचा मळा’, ‘नाही मी एकला’, ‘सृजनाचा मोहोर’, ‘गोतावळा’ आदी ग्रंथ प्रकाशित आहेत.

🅱वसई येथे वास्तव्य असलेले फादर दिब्रिटो यांनी मराठी साहित्यात धर्म आणि वैचारिक लेखनाद्वारे मौलिक भर घातली आहे. 

जागतिक कुस्ती स्पर्धा: आवारेने कांस्यपदक जिंकले

भारताचा युवा कुस्तीपटू राहुल आवारेने जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं आहे. त्यामुळे भारताच्या खात्यात पाचवं पदक आलं आहे. राहुलने ६१ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकण्याची कामगिरी केली आहे.

कझाकिस्तानच्या नूर सुल्तान येथे ब्रॉन्ज मेडल सामन्यात राहुल आवारेने अमेरिकेचा कुस्तीपटू टायलर ली ग्राफ याला पराभूत केलं. दरम्यान, ऑलिम्पिकच्या न येणाऱ्या गटात राहुलनं पदक पटकावलं आहे. त्यामुळे या पदकानंतरही तो टोकियो ऑलिम्पिकमध्ये क्वालिफाय होणार नाही. या आधी दीपक पुनियाने ८६ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई केली होती. नूर-सुलतान, कझाकिस्तान येथे सुरू असलेल्या या जागतिक कुस्ती स्पर्धेतून विनेश फोगट, बजरंग पुनिया, दीपक पुनिया, रवी दाहिया यांनी २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवला आहे.

ऐतिहासिक: बॉक्सर अमितला जागतिक रौप्य

भारताचा बॉक्सर अमित पंघलची यंदाच्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतील घोडदौड शनिवारी रौप्यपदकासह संपष्टात आली. ५२ किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये शनिवारी उझ्बेकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता बॉक्सर शाखोबिदिन झॉयरोव्हने त्याच्यावर सरशी साधत जगज्जेतेपदाचा मान संपादला. अमितने फायनलमध्ये केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा, लढतीतमधील त्याची आक्रमकता पाहून अंतिम फेरीचा ५-० हा स्कोअर फसवा वाटतो. मात्र कुस्ती आणि बॉक्सिंगमधील तांत्रिक गुणांचा थांग खुद्द खेळाडूंनाही लागत नाही.

जागतिक स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारणारा, रौप्यपदकाची कमाई करणारा दुसरा सीडेड अमित पंघल हा भारताचा पहिलाच बॉक्सर ठरला आहे. त्याआधी मनीष कौशिकने ६३ किलो वजनी गटात ब्राँझपदकाची कमाई केली आहे.

अमितची उंची तशी बॉक्सरला साजेशी नाही; पण आपल्या उजव्या हाताच्या ठोश्याने तो उंचपुऱ्या प्रतिस्पर्ध्याच्यादेखील नाकीनऊ आणतो. शनिवारी पार पडलेल्या फायनलमध्येही तसेच चित्र दिसले. त्याचा प्रतिस्पर्धी झॉयरोव्ह उंचपुराच होता. तरीदेखील छोट्याचणीच्या अमितचे ठोशे अचूक लागत होते. त्यात अमितच्या तुलनेत झॉयरोव्हची शरीरयष्टीही पिळदार आहे. मात्र तांत्रिकदृष्ट्या भारताचा एशियाड आणि आशियाई विजेता बॉक्सर अमित कमीच पडला.

मुळचा रोहतकचा असलेल्या अमितने राष्ट्रीय विजेता झाल्यापासून मागे वळून बघितले नाही. २०१७मध्ये त्याने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत ब्राँझची कमाई केली आणि अमितच्या आंतरराष्ट्रीय यशाचा सिलसिला सुरू झाला.

या स्पर्धेच्याआधी भारताला जागतिक स्पर्धेत एकपेक्षा जास्त पदके जिंकणे जमले नव्हते. जे अमित आणि मनीषमुळे शक्य झाले. २००९मध्ये विजेंदर, २०११मध्ये विकास क्रिशन, २०१५मध्ये शिव थापा आणि २०१७मध्ये गौरव बिधुरीने जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत ब्राँझपदके पटकावली आहेत.

▪️दष्टिक्षेप

१) जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतील ५२ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत शनिवारी अमित पंघलला ऑलिम्पिक विजेत्या झोयरोव्हकडून पराभव पत्करावा लागला.

२) जागतिक कुस्ती स्पर्धेत किमान उपविजेता ठरलेला अमित हा पहिला भारतीय बॉक्सर ठरला आहे. या स्पर्धेत प्रथमच भारताला दोन पदके लाभली हे विशेष.

३) मनीष कौशिकने ६३ किलो वजनी गटात यंदा ब्राँझपदकाची कमाई केली आहे.

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...