Friday, 20 September 2019

नौदलाची सर्वात मोठी सुकी गोदी मुंबईत

🅱२८ सप्टेंबरला संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

🅱 विमानवाहू युद्धनौकांच्या देखभाल दुरुस्तीसाठी नौदलाची देशातील सर्वात मोठी ‘सुकी गोदी’ मुंबई नौदल गोदी येथे बांधण्यात आली आहे.

🅱पाण्यातच बांधलेली ही देशातील पहिलीच सुकी गोदी आहे.

🅱या गोदीचे उद्घाटन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते २८ सप्टेंबरला होणार आहे.

🅱या गोदीमध्ये एकाच वेळी तीन जहाजांना सामावून घेणे शक्य होणार आहे. त्यासाठी २८१ मीटरच्या गोदीमध्ये ९०, १३५ आणि १८० मीटर अंतरावर वेगवेगळे भाग करण्यात आले आहेत.
🅱भारतीय नौदलाची शान असणारी सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रमादित्य देखील या गोदीत सामावू शकते.

🅱 मुंबईतील नौदलाची सध्याची सुकी गोदी ही वाढत्या नौकांना सामावून घेण्यास अपुरी पडत असल्यामुळे नवीन गोदी बांधण्याचा तसेच सध्याच्या मुंबई नौदल गोदीच्या नूतनीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता.

🅱 त्या अंतर्गतच ही नवीन सुकी गोदी बांधण्यात आली. सुकी गोदी बांधकामासाठी सुमारे एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च झाला आहे.

              🔴 वैशिष्टय़े 🔴
🅱  ८१ मीटर लांब, ४५ मीटर रुंद, १७ मीटर खोल.

🅱 तीन जहाजे एका वेळी सामावून घेण्याची क्षमता.

🅱  तब्बल वीस कोटी लिटर पाणी सामावून घेण्याची क्षमता.

🅱 चार सेकंदाला १० हजार लिटर पाणी उपसणारे आठ पंप, अडीच तासात गोदी रिकामी करण्याची क्षमता.

🅱  पाच लाख मेट्रिक टन काँक्रीटचा वापर, वांद्रे-वरळी सी लिंकच्या दीडपट काँक्रीट.

सिकंदराबाद: ‘ग्रीन प्लॅटिनम रेटिंग’ प्राप्त करणारे देशातले पहिले रेल्वे स्थानक

भारतीय हरित इमारत परिषदेकडून (IGBC) भारतीय रेल्वेच्या सिकंदराबाद स्थानकाला ‘ग्रीन प्लॅटिनम रेटिंग’ प्रदान करण्यात आले आहे. यासह सिकंदराबाद ‘ग्रीन प्लॅटिनम रेटिंग’ प्राप्त करणारे देशातले पहिले रेल्वे स्थानक ठरले.अनेक ऊर्जा बचतीसंबंधी चालविलेले उपक्रम तसेच प्रवाश्यांसाठी दिलेल्या आधुनिक सेवा-सुविधांचा समावेश केल्याने सिकंदराबाद स्थानकाला हा पुरस्कार देण्यात आला आहे. स्थानकावर CO2 संवेदकाने सुसज्जित वातानुकूलित विश्रामगृह, सौर पटले आणि LED दिव्यांचा वापर तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रणाली अश्या विविध यंत्रणा तेथे बसविण्यात आले आहेत.

▪️भारतीय हरित इमारत परिषद (IGBC) बाबत

भारतीय हरित इमारत परिषद (IGBC) हा भारतीय उद्योग परिसंघ (CII) याचा एक भाग आहे. त्याची स्थापना 2001 साली झाली. यात नवीन ग्रीन बिल्डिंग रेटिंग प्रोग्राम विकसित करणे, प्रमाणपत्र सेवा आणि हरित इमारत प्रशिक्षण कार्यक्रम यासारख्या विकसनशील पुढाकारांचा समावेश आहे.

कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात; सरकारचा निर्णय

◾️मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आणि उद्योग क्षेत्राला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने आज महत्वाची घोषणा केली.

◾️कंपनी करात कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गोव्यातील पत्रकार परिषदेत दिली.

◾️कोणत्याही प्रकारची सवलत न घेणाऱ्या कंपन्यांच्या करामध्ये कपात करून दर २२ टक्के करण्यात आले आहेत.

◾️उद्योग क्षेत्राला उभारी देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे.

◾️उत्पादन आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी प्राप्तिकर कायद्यात केलेल्या बदलांची अंमलबजावणी या आर्थिक वर्षापासून करण्यात येणार असून, कोणतीही सवलत न घेणाऱ्या भारतीय कंपन्यांना २२ टक्के कर द्यावा लागेल आणि अधिभार आणि सेस मिळून एकूण २५.१७ टक्के कर द्यावा लागेल.

    💢'मेक इन इंडिया'ला प्रोत्साहन💢

◾️केंद्र सरकारच्या 'मेक इन इंडिया' या घोषणेला बळ देण्यासाठी सरकारनं प्राप्तिकर कायद्यात तरतूद केली आहे.

◾️चालू आर्थिक वर्ष २०१९-२०मध्ये १ ऑक्टोबरनंतर उत्पादन प्रक्रियेत गुंतवणूक करणाऱ्या भारतीय कंपन्यांकडे १५ टक्के दरापासून प्राप्तिकर भरण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे.

◾️ म्हणजेच १ ऑक्टोबर २०१९ किंवा त्यानंतरच्या भरतीय कंपन्यांना १५ टक्के कर भरावा लागेल.

◾️३१ मार्च २०२३पूर्वी उत्पादन घेण्यास सुरुवात केली तर १५ टक्के कर भरावा लागेल.

◾️ सर्व प्रकारचे अधिभार आणि सेस मिळून एकूण १७.१० टक्के प्रभावी दर आकारला जाणार आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

अकोला जिल्ह्यात 'अस्मिता लाल’ निर्मितीचा राज्यातील पहिला प्रयोग

● ग्रामीण भागात मासिक पाळी विषयी अनेक गैरसमज असल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात.

● या गंभीर प्रश्नावर काम करण्यासाठी अकोला जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे.

● जनजागृतीपासून ते वापरलेल्या पॅडची विल्हेवाट लावण्यापर्यंतच्या कार्याची साखळी करून त्यावर काम केले जात आहे.

● अकोल्यातील युवक वर्गाच्या सहकार्यातून सर्वप्रथम ‘रक्तस्राव होण्यात आनंद’ या संगीत अल्बमची निर्मिती करण्यात आली.

●  मुख्यमंत्र्यांनीही त्याची दखल घेऊन ते गाणे ट्विट केले. आता महिला बचत गटांच्या सहकार्यातून ‘अस्मिता लाल’ सॅनिटरी नॅपकिन तयार केले जाणार आहेत.

● २८ मे रोजी मासिक धर्म स्वच्छता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात या प्रश्नावर कार्य करण्याची संकल्पना अकोल्यात पुढे आली.

● सामाजिक कार्य करणाऱ्या अकोल्यातील युवांनी त्यासाठी पुढाकार घेतला.

● सुफी कलाकार, शास्त्रीय संगीताचा विद्यार्थी आणि एमबीबीएस पदवीधर २८ वर्षीय तारिक फैज याने गीत लिहिले.

●  रमिझ राजा याने त्या गाण्याला संगीतबद्ध केले. कृतिका आणि रसिक बोरकर या भगिनींनी ते गाणे गायले. विनाशुल्क हे कार्य करण्यात आले.

● या विषयावर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काम करणारी २२ वर्षीय सांची गजघाटे हिची संकल्पना प्रत्यक्षात साकारली.

इंडियन एअर फोर्सचे पुढचे प्रमुख आरकेएस भदौरिया


● एअर मार्शल आरकेएस भदौरिया भारताचे पुढचे हवाई दल प्रमुख असतील. संरक्षण मंत्रालयाने  ही घोषणा केली.

● सध्या ते एअर फोर्सचे व्हाइस चीफ आहेत.

● त्यांनी फ्रान्सबरोबरच्या राफेल फायटर विमानांच्या खरेदी व्यवहारात महत्वाची भूमिका बजावली होती.

● सध्याचे इंडियन एअर फोर्सचे प्रमुख बी.एस.धनोआ ३० सप्टेंबरला निवृत्त होणार आहेत.

● आरकेएस भदौरिया १९८० साली फायटर पायलट म्हणून एअर फोर्समध्ये रुजू झाले.

● भदौरिया यांच्याकडे ४२५० तासांपेक्षा जास्तवेळ उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांना फायटर, ट्रान्सपोर्ट विमानांसह २६ वेगवेगळया प्रकारच्या विमान उड्डाणाचा अनुभव आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय वंशाच्या लोकांनी सर्वाधिक संख्येनी स्थलांतरण केले: संयुक्त राष्ट्रसंघ

संयुक्त राष्ट्रसंघाने ‘इंटरनॅशनल मायग्रेंट स्टॉक 2019’ हे शीर्षक असलेला एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर होणार्‍या स्थलांतरणाविषयीची माहिती देण्यात आली आहे. आज विविध कारणांमुळे लोक परदेशात वास्तव्य करताना आढळून येते.

अहवालाच्या मते, आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या स्थलांतरित लोकांमध्ये 2019 साली भारतीय नागरिकांची सर्वाधिक संख्या असून आज 17.5 दशलक्ष भारतीय वंश असलेले नागरिक परदेशात वास्तव्यास आहेत आणि या संख्येच्या बाबतीत भारत हा सर्व देशांमध्ये अग्रगण्य देश ठरला आहे.

भारतापाठोपाठ द्वितीय क्रमांकावर मेक्सिको (11.8 दशलक्ष), त्यानंतर चीन (10.7 दशलक्ष), रशिया (10.5 दशलक्ष), सिरिया (8.2 दशलक्ष), बांग्लादेश (7.8 दशलक्ष), पाकिस्तान (6.3 दशलक्ष), युक्रेन (5.9 दशलक्ष), फिलिपिन्स (5.4 दशलक्ष) आणि अफगाणिस्तान (5.1 दशलक्ष) या देशांचा क्रम लागतो आहे. या पहिल्या 10 देशांमधून सर्व आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांपैकी एक तृतीयांश लोक परदेशात आहेत.

अहवालातल्या ठळक बाबी👇👇

🔸जागतिक पातळीवर स्थलांतरितांची संख्या अंदाजे 272 दशलक्षांवर पोहोचली आहे.

🔸2019 साली भारतात 5.1 दशलक्ष परदेशी लोक आहेत. सन 2010 ते सन 2019 या कालावधीत भारतातल्या एकूण लोकसंख्येचा हिस्सा म्हणून परदेशी स्थलांतरितांचा वाटा 0.4 टक्के एवढा स्थिर आहे. भारतात 2,07,000 निर्वासित आहेत. आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांमध्ये त्यांचा वाटा चार टक्के आहे.

🔸भारतातल्या आंतरराष्ट्रीय स्थलांतरित लोकांमध्ये 48.8 टक्के महिला आहेत आणि एकूणच परदेशी लोकांचे सरासरी वय 47.1 वर्षे आहे. भारतात बांग्लादेश, पाकिस्तान आणि नेपाळ या देशांमधून सर्वाधिक लोक आले आहेत.

🔸प्रादेशिकदृष्ट्या, युरोपमध्ये आंतरराष्ट्रीय स्थलांतरित लोकांचे सर्वाधिक प्रमाण आहे, जे की 82 दशलक्ष एवढी लोकसंख्या आहे. त्यानंतर उत्तर अमेरिका (59 दशलक्ष) आणि उत्तर आफ्रिका व पश्चिम आशिया (49 दशलक्ष) यांचा क्रम लागतो आहे.

🔸सर्व आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांपैकी जवळपास 19 टक्के (म्हणजेच 51 दशलक्ष) लोक एकट्या संयुक्त राज्ये अमेरिका या देशात वास्तव्यास आहेत. त्यापाठोपाठ जर्मनी आणि सौदी अरब (प्रत्येकी 13 दशलक्ष) द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर असून त्यामागे रशिया (12 दशलक्ष), ब्रिटन (10 दशलक्ष), संयुक्त अरब अमिरात (9 दशलक्ष), फ्रान्स, कॅनडा व ऑस्ट्रेलिया (प्रत्येकी 8 दशलक्ष) आणि इटली (6 दशलक्ष) या देशांचा क्रम लागतो.

🔸भौगोलिक प्रदेशांनुसार, ओशिनिया (ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह) यामध्ये आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांची लोकसंख्या सर्वाधिक असून त्यानंतर उत्तर अमेरिका (16.0 टक्के), लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन (1.8 टक्के), मध्य व दक्षिण आशिया (1.0 टक्का) आणि पूर्व व आग्नेय आशिया (0.8 टक्के) असा क्रम लागतो आहे.

🔸बहुतेक आंतरराष्ट्रीय स्थलांतरित उप-सहारा आफ्रिका (89 टक्के), पूर्व व आग्नेय आशिया (83 टक्के), लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन (73 टक्के), मध्य व दक्षिण आशिया (63 टक्के) या प्रदेशातून आहेत.

🔸सन 2010 ते सन 2017 या कालावधीत निर्वासित लोक आणि आश्रय शोधणार्‍या लोकांची जागतिक संख्या सुमारे 13 दशलक्ष इतकी वाढली असून एकूण लोकसंख्येत एक चतुर्थांशने वाढ झाली आहे.

🔸निर्वासित आणि आश्रय शोधणार्‍या जागतिक लोकसंख्येपैकी सुमारे 46 टक्के उत्तर आफ्रिका आणि पश्चिम आशियामध्ये आहेत.

प्राचीन भारताचा इतिहास : हडप्पा संस्कृती

📚 स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने इतिहासाचा अभ्यास करताना हडप्पा संस्कृतीला ओलांडून पुढे जाता येत नाही. परीक्षेत प्राचीन भारताच्या इतिहासात या अनुषंगाने प्रश्न विचारले जाऊ शकतात.

👉 या संस्कृतीचे प्रथम अवशेष हडप्पा येथे सापडले म्हणून नव्यानेच शोधलेल्या या संस्कृतीला 'हडप्पा संस्कृती' असे म्हणतात. ही संस्कृती प्रामुख्याने सिंधू नदीच्या प्रदेशात केंद्रित असल्याने तिला 'सिंधू संस्कृती' असेही म्हणतात.

🕰 *कालखंड :* हि संस्कृति ताम्रयुगातील मानली जाते. संशोधकांच्या मते हि संस्कृति सुमारे 5 हजार वर्षांपूर्वीची आहे. इ.स. पूर्व 3500 ते इ.स. पूर्व 2600 हा कालखंड प्रारंभिक हडप्पा संस्कृतीचा तसेच इ.स. पूर्व 2600 ते 2800 हा कालखंड परिक्पव हडप्पा संस्कृतीचा होता.

🔍 *संस्कृतीचा शोध :* इ.स. 1920 च्या सुमारास लाहोर-मुलतान रेल्वे मार्गाचे काम सुरू असताना काही प्राचीन विटांचे अवशेष सापडले. सिंधू संस्कृतीच्या अस्तित्वाचा पुरावा दयाराम सहानी यांनी 1921 मध्ये शोधला. त्याच वर्षी पंजाबातील हडप्पा येथे प्रायोगिक उत्खनन झाले. राखालदास बॅनर्जी यांनी मोहेंजोदडोचा शोध लावला. यामुळे पुरातत्त्व खात्याने याचा शोध घेण्यासाठी सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली विस्तृत उत्खनन सुरू केले आणि एक प्राचीन संस्कृती प्रकाशात आली. अशाच प्रकारच्या संस्कृतीचे अवशेष पश्चिम भारतात कालीबंगन, धोळावीरा, सुरकोटडा, लोथल, दायमाबाद इ. ठिकाणी मोठ्या प्रमाणात सापडले.

🗓 *कालमापनानुसार कालखंड :* या संस्कृतीच्या कोटदिजी, हडप्पा, लोथल इ. स्थळांचा कालखंड कार्बन-14 पद्घतीनुसार निश्चित करण्यात आलेला आहे. त्यानुसार आणि मोहेंजोदडो व हडप्पा येथे सापडलेल्या काही अवशेषांच्या व मध्यपूर्वेतील विशेषतः मेसोपोटेमियातील अवशेषांच्या तुलनात्मक अभ्यासानुसार तसेच आतापर्यंत झालेल्या उत्खननांवरुन सिंधु संस्कृतीचे स्थूलमानाने तीन कालखंड पडतात :

*1. आद्य सिंधू* (इ. स. पू. 3200 – 2600),
*2. नागरी सिंधू* (इ. स. पूर्व 2600 – 2000) आणि
*3. उत्तर सिंधू* (इ. स. पूर्व 2000 – 1500)

📍 *सुरुवात व ऱ्हास :* आद्य सिंधु कालखंडातील स्थळे सिंधपासून सरस्वतीच्या खोऱ्यात अधिक आहेत. नागरी सिंधू काळातील पुराव्यांचा विचार करता या काळात वेगाने सांस्कृतिक बदल घडून आले; तर उत्तर सिंधू काळात सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासास सुरुवात झाली

हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये*
💁‍♂ हडप्पा संस्कृतीच्या व्याप्तीइतकीच या संस्कृतीची प्राचीनताही लक्षात ठेवण्यासारखी आहे. हि संस्कृती सर्वात प्राचीन व विकसित संस्कृती होती. तिची वैशिष्टये पाहुयात

▪ *नगररचना :* हडप्पा संस्कृतीची नगररचना व स्थापत्य अत्यंत प्रगत होते. घरे, तटबंदी, सांडपाण्याची व्यवस्था, स्नानगृहे, धान्याची कोठारे, जहाजाची गोदी इत्यादी घटक पाहता हडप्पाकालीन संस्कृतीच्या प्रगत स्थापत्याची कल्पना येते. हडप्पाकालीन नगराची विभागणी प्रशासकीय इमारती व लोकवस्ती अशा दोन घटकांत करण्यात आलेली होती. शहराच्या लोकवस्तीचा भाग बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे किंवा जाळीप्रमाणे विविध प्रभागांमध्ये विभागला होता. नगर बांधणीसाठीच्या विटा 4:2:1 (लांबी:रुंदी:उंची) या प्रमाणातच असत.

▪ *घरे :* हडप्पा संस्कृतीत प्रत्येक प्रभागात 20 ते 30 घरे असत. ती पक्क्या विटांची असून प्रशस्त होती. प्रत्येक घरामध्ये स्नानगृह(बाथरूम) असे. काही घरांच्या परसात विहिरी आढळल्या आहेत. घरांच्या मध्यभागी, जसे आजही वाड्यांच्या व इतर भारतातील पारंपरिक घरांमध्ये असते, तसे.अंगण असे. घरे एक किंवा दोन मजली असत.

▪ *तटबंदी :* हडप्पाकालीन नगरांना संरक्षक तटबंदी असे. तटबंदी रुंद असून तिचे बांधकाम पक्क्या विटांचे असे. तटबंदीला बुरूज होते. यावरून हडप्पा संस्कृतीने नगराच्या संरक्षणाकडे लक्ष दिल्याचे दिसते.

▪ *रस्ते :* शहराच्या प्रभागाकडून जाणारे रस्ते मुख्य रस्त्यांना जोडलेले असत. रस्ते पुरेसे रुंद असून ते एकमेकांना काटकोनांत छेदणारे होते. रस्त्यांच्या कडेला सापडलेल्या लाकडांच्या अवशेषांवरून रस्त्यांवर दिवाबत्तीची सोय असावी असे दिसते.

▪ *सांडपाण्याची व्यवस्था :* हडप्पा संस्कृतीत सांडपाणी व पावसाचे पाणी गावाबाहेर वाहून नेण्यासाठी एक मीटर खोल भुयारी गटारांची व्यवस्था होती. ही गटारे दगड व पक्क्या विटांनी बांधलेली होती. कोणत्याही समकालीन संस्कृतीमध्ये न आढळणारी सांडपाण्याची व्यवस्था हडप्पा संस्कृतीत पाहावयास मिळते.

▪ *महास्नानगृह :* मोहनजोदडो येथे सार्वजनिक स्नानगृहे होती. येथे एका भव्य स्नानगृहाचे अवशेष सापडले. या स्नानगृहाची लांबी 12 मीटर, रुंदी 7 मीटर आणि खोली 2.5 मीटर आहे. याच्या बाहेरच्या भिंती 7 ते 8 फूट रुंदीच्या असून कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था होती. स्नानगृहाचे वापरलेले पाणी बाहेर सोडण्याची व शुद्ध पाणी आत आणण्याची व्यवस्था केलेली होती. यावरून हडप्पा संस्कृतीतील लोक आरोग्याबाबत किती दक्ष होते हे दिसून येते.

💁‍♂ *समाजरचना :* हडप्पा संस्कृतीत कुटुंबसंस्था महत्त्वाची होती. नगररचनेच्या अवशेषांवरून समाजात राज्यकर्त्यांचा वर्ग, व्यापारी वर्ग व सर्वसामान्यांचा वर्ग असल्याचे दिसते. नद्यांच्या काठी सुपीक प्रदेशात ही संस्कृती विकसित झालेली असल्याने शेती हा समाज जीवनाचा मुख्य भाग होता.

💃 *वेशभूषा-केशभूषा :* हडप्पा संस्कृतीमधील मातीच्या भांड्यांवर मिळालेले कापडाचे ठसे, मृण्मयमूर्तीवर दाखवलेले वस्त्र, उत्खननात मिळालेल्या विविध आकारांच्या सुया यावरून लोकांना वेशभूषेचे ज्ञान असल्याचे समजते. तसेच तत्कालीन मूर्तींवरून केशभूषेची माहिती मिळते. पुरुष दाढी कोरत, मधोमध भांग पाडत तर स्त्रिया विविध प्रकारची केशरचना करत.

💄 *सौंदर्यप्रसाधने :* हडप्पाकालीन संस्कृतीच्या उत्खननात एक शृंगारपेटी मिळाली. यामध्ये आरसे, हस्तिदंती कंगवे, केसासाठी आकडे, पिना, ओठ व भुवया रंगवण्यासाठी लागणाऱ्या विविध रंगाच्या कांड्या मिळाल्या. हडप्पाकालीन लोकांना सौंदर्यप्रसाधनांप्रमाणेच अलंकाराची आवड होती. उत्खननामध्ये मण्यांचे व सोन्याचे हार, बांगड्या, अंगठ्या, वाक्या, कमरपट्टा इत्यादी अलंकार मिळाले तसेच नर्तकीचा ब्राँझचा पुतळा मिळाला.

🎲 *करमणुकीची साधने :* हडप्पाकालीन लोकांची सोंगट्या, फासे ही करमणुकीची साधने होती. नृत्य, गायन, शिकार व प्राण्यांच्या झुंजी इत्यादींमधून करमणूक केली जाई. लहान मुलांसाठी भाजक्या मातीची सुबक खेळणी बनवली जात असे. डोक्याची पुढेमागे हालचाल करू शकणारा बैल, बैलगाडी, पक्ष्यांच्या अाकाराच्या शिट्या, खुळखुळे इत्यादींचा यात समावेश होतो.

⛪ *धर्मकल्पना :* लोकांची प्रामुख्याने शेतीवरती उपजीविका असल्याने लोक भूमातेस मातृदेवता मानत. त्यांच्या धार्मिक जीवनात निसर्गशक्तीस महत्त्वाचे स्थान होते. सूर्य, जल, अग्नी, वृक्ष यांची ते पूजा करत. कालिबंगन येथे सापडलेल्या अग्निकुंडावरून ते अग्निपूजा करत असल्याचे दिसते. निसर्गदेवतेप्रमाणेच पशुपती, नाग, वृषभ म्हणजे बैल यांचीही ते पूजा करत होते. लोक मूर्तिपूजक होते, मात्र हडप्पा संस्कृतीत मंदिरे आढळली नाहीत. तेथील लोक मृतदेहाचे विधिपूर्वक दफन करत. दफन करतेवेळी त्यांच्या सोबत अलंकार व भांडी ठेवली जात.

🥗 *आहार :* लोकांचा प्रमुख आहार गहू होता. त्याचबरोबर जव, तीळ, वाटाणा, यांसारखी धान्ये सुद्धा पिकवीत असत. खजुराचा उपयोगही ते अन्न म्हणून करीत असत. येथील लोक दुधासाठी जनावरेही पळत असल्याचं पुराव्यावरून सिद्ध झालं आहे.

🧸 *खेळणी :* मुलांच्या खेळण्यात हत्ती, निरनिराळे प्राणी, तसेच चाकांच्या मातीच्या गाड्या इ. आढळून आल्या. त्यामुळे प्रत्यक्षात वाहतुकीला योग्य अशा गाड्या अस्तित्वात असाव्यात असा तर्क केला जातो.

📐 *वजन आणि मापे :* येथील लोक अनेक प्रकारच्या वजनांचा उपयोग करीत. त्यांत दोराने उचलण्याच्या वजनापासून ते सोनाराने उपयोगात आणलेल्या लहानशा वजनापर्यंतचा समावेश होता.वजन माप हे 16 च्या पटितील होते. 0.8565 हे वजन कमीत कमी होते व 274.938 हे जास्तीत जास्त होते.

🏠 *घरगुती उपकरणे :* कुंभाराच्या चाकावर बनवलेली सुंदर मातीची भांडी येथे आढळली. त्यांवर नक्षीकाम केलेले होते. याशिवाय तांबे, ब्रांझ आणि चांदीची भांडी सापडली, परंतु याचे प्रमाण मात्र अत्यल्प होते.

🚢 *जहाजाची गोदी :* लोथल येथील उत्खननामध्ये एका प्रचंड गोदीचे अवशेष सापडले. या गोदीची लांबी 270 मीटर तर रुंदी 37 मीटर आहे. या गोदीवरून जहाजबांधणी, व्यापार, व्यापारीमार्ग यांची माहिती या संस्कृतीमधील लोकांना होती असे दिसून येते. येथे सापडलेल्या एका मुद्रेवर जहाजाचे चित्र कोरले आहे. तसेच लोथल येथे पक्क्या विटांनी बांधलेली धान्य कोठारे सापडली आहेत. यावरून कृषी व व्यापार क्षेत्रातील त्यांची प्रगती लक्षात येते.

📶 *समाजरचना :* हडप्पा संस्कृतीत कुटुंबसंस्था महत्त्वाची होती. नगररचनेच्या अवशेषांवरून समाजात राज्यकर्त्यांचा वर्ग, व्यापारी वर्ग व सर्वसामान्यांचा वर्ग असल्याचे दिसते. नद्यांच्या काठी सुपीक प्रदेशात ही संस्कृती विकसित झालेली असल्याने शेती हा समाज जीवनाचा कणा होता.

मुंबई आयआयटी देशात प्रथम

◾️क्यूएसच्या 2020 च्या या जागतिक क्रमवारीत आयआयटी मुंबई 111 ते 120 च्या क्रमवारीत असून देशभरात अव्वल क्रमांक मिळवला आहे.

◾️भारतातील पदवीधर रोजगार मिळवून देणार्‍या शैक्षणिक संस्थांमध्ये मुंबई विद्यापीठानेही सातवा क्रमांक पटकवला आहे.

◾️क्यूएस वर्ल्ड रँकिंगकडून कोणत्या शैक्षणिक संस्थेकडून विद्यार्थ्यांना सर्वाधिक रोजगार प्राप्त करून दिला जातो याविषयीची जागतिक क्रमवारी जाहीर केली. यामध्ये क्यूएस वर्ल्ड रँकिंग या जागतिक मानांकन संस्थेच्या रोजगारक्षम पदवी देणार्‍या शैक्षणिक संस्था - 2020 च्या क्रमवारीत आयआयटी मुंबईने आपले स्थान कायम राखत विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यात यशस्वी झाली आहे.

◾️माजी विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी आयआयटीला 66.9 गुण मिळाले आहेत. क्यूएस रँकिंगमध्ये जरी आयआयटी मुंबई ही संस्था पहिल्या शंभरीत नसली तरी भारतातील रोजगारक्षम पदवीसाठीची पहिल्या क्रमांकाची शैक्षणिक संस्था ठरली आहे. मुंबई विद्यापीठातील भारतातील सातव्या क्रमांकाची संस्था होण्याचा मान मिळाला असून जागतिक क्रमवारीत 251 ते 300 च्या क्रमवारीत आहे.

◾️जगातील 758 शैक्षणिक संस्थांचे सर्वेक्षण केले. विशेष म्हणजे क्रमवारीतील पहिले तीन क्रमांक हे अमेरिकेतील शैक्षणिक संस्थांनी पटकाविले आहेत.

◾️मॅसॅच्युसेट्स विद्यापीठ पहिले, स्टँनफोर्ड विद्यापीठ दुसरे, कॅलिफोर्निया विद्यापीठ तिसर्‍या स्थानावर आहेत. आयआयटी मुंबईची 111-120 या स्थानी आहे. आयआयटी बॉम्बेचा रँकिंग स्कोअर 100 पैकी 54- 55. 1 इतका आहे.

◾️आपल्या एम्प्लॉयर्ससोबत भागीदारीचा 51.6 इतका आहे, तर एम्प्लॉयर रेप्युटेशनसाठी 67. 8 गुण प्राप्त केल्याचे क्यूएस रँकिंगमध्ये दिसून येत आहे