१४ सप्टेंबर २०१९

U-19 आशिया कपः भारताची जेतेपदाला गवसणी

🅱 अत्यंत चुरशीच्या सामन्यात अथर्व अंकोलेकरने घेतलेल्या ५ बळींच्या जोरावर भारताने बांगलादेशला ५ धावांनी पराभूत करत १९ वर्षांखालील आशिया चषकाचे विजेतेपद मिळवले आहे.

🅱भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये अखेरचा सामना कोलंबो येथे रंगला होता.

🅱आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी १०६ धावांचे आव्हान ठेवले होते.

🅱 या सामन्यात बांगलादेश सहज विजय मिळवेल, असेच सर्वांना वाटले होते. मात्र, डावखुरा फिरकीपटू अथर्व अंकोलेकरने २८ धावांत टिपलेल्या ५ गड्यांमुळे भारताने जेतेपदावर नाव कोरले.

🅱बांगलादेशचा संपूर्ण संघ १०१ धावांवर बाद झाला.

🅱 दरम्यान, १९ वर्षांखालील भारतीय संघाची सुरुवात खराब झाली.

🅱नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा भारताचा निर्णय चुकीचा ठरला.

🅱अखेर भारताचा संपूर्ण संघ ३२.४ षटकामध्ये १०६ धावाच करू शकला.

प्रश्नसंच 14/9/2019

📌बॉम्बे रक्तगटाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान अचूक नाही?

i) ‘बॉम्बे रक्तगट’ सर्वप्रथम 1952 साली मुंबईत (तेव्हाचे बॉम्बे) डॉ वाय. एम. भेंडे यांनी शोधला.

ii) त्यात ‘अॅंटीजेन H’ घटक असतो.

iii) दक्षिण आशियामध्ये त्याची प्रकरणे सर्वाधिक आढळून येतात.

iv) त्यात H अँटीबॉडी हे घटक असतात.

(A) केवळ (i), (ii), (iii)
(B) केवळ (ii)✅✅✅
(C) केवळ (iv)
(D) केवळ (i) आणि (iv)

📌MPATGM याचे पूर्णनाव काय आहे?

(A) मल्टी पर्पज अँटी-टँक जिओ मिसाईल
(B) मॅन पोर्टेबल अँटी-टँक जिओ मिसाईल
(C) मल्टी पर्पज अँटी-टँक गाईडेड मिसाईल
(D) मॅन पोर्टेबल अँटी-टँक गाईडेड मिसाईल ✅✅✅

📌कोणत्या व्यक्तीने पंतप्रधानांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे?

(A) विनीत जैन
(B) जयदीप शंकर
(C) अजय कुमार
(D) पी. के. सिन्हा✅✅✅

📌कोणत्या व्यक्तीची पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) राजीव कुमार
(B) कलराज मिश्रा
(C) डॉ. प्रमोद कुमार मिश्रा✅✅✅
(D) विजय कुमार

📌‘टाइम्स हायर एज्युकेशन (THE) विश्व विद्यापीठ क्रमवारीता 2020’ या यादीत कोणत्या विद्यापीठाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे?

(A) ऑक्सफोर्ड विद्यापीठ✅✅✅
(B) कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
(C) केंब्रिज विद्यापीठ
(D) मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी

📌कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय दक्षिण-दक्षिण सहकार्य दिन’ पाळला जातो?

(A) 11 सप्टेंबर
(B) 12 सप्टेंबर✅✅✅
(C) 13 सप्टेंबर
(D) 10 सप्टेंबर

📌कोणत्या ठिकानांदरम्यान दक्षिण आशिया प्रदेशातली पहिली क्रॉस-बॉर्डर पेट्रोलियम प्रॉडक्ट पाइपलाइन आहे?

(A) मोतिहारी आणि अमलेखगंज✅✅✅
(B) सबा आणि सारवाक
(C) हजीरा आणि विजयपूर
(D) ताशकंद आणि बिश्केक

पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा अमृत महोत्सव - प्रा. हरी नरके

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७४ वर्षांपुर्वी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. [ १३ सप्टेंबर १९४५] { काही पुस्तकांमध्ये ही स्थापना ८ जुलै १९४५ ला झाल्याचीही नोंद आहे} हे संस्थेचे अमृत महोत्सवी वर्ष.

● या संस्थेने आजवर अनेक गुणवंत विद्यार्थी घडवले. अनेक मान्यवरांना संस्थेकडून खूप काही मिळाले.

● विशेषत: औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयातून दलित [आंबेडकरी] साहित्याचे शिल्पकार म्हणता येतील अशा दिग्गजांची जडणघडण झाली. संस्थेच्या नव्या शाखा निघाल्या. संस्थेचे आकारमान वाढले. विद्यार्थी तसे प्राध्यापकांची संख्या वाढली. उपक्रम वाढले. इमारती वाढल्या.

● डॉ. बाबासाहेबांनी ते एल्फिन्स्टन महाविद्यालयात शिकत असतानाच आपण शिक्षण संस्था काढायची, तिचे महाविद्यालय गुणवंत-नामवंत असेल अशी उभारणी करायची असे मनाशी ठरवले होते.

● बी.ए.च्या परिक्षेत त्यांच्या वर्गात पहिल्या आलेल्या गजेंद्रगडकरांनाच त्यांनी पुढे आपल्या महाविद्यालयात पहिले प्राचार्य म्हणून नियुक्त केले.

● समाजातील खूप नामवंत आणि गुणवंत असलेल्या व्यक्तींना आपल्या संस्थेत आवर्जून बोलावून घेतले.

● प्राचार्य म.भि.चिटणीस, प्राचार्य म.ना.वानखडे, मधू दंडवते, भालचंद्र फडके, रा.ग.जाधव, वा.ल.कुलकर्णी, मे.पु.रेगे, शां.शं.रेगे, स.गं.मालशे आदींची निवड करताना त्यांनी निवडलेली माणसं किती भली होती याची खात्री पटते.

● २० जुलै १९४२ रोजी डॉ. बाबासाहेब व्हॉईसरायच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झाले. त्यांच्याकडे दहा मोठया खात्यांचा कार्यभार होता. त्यांनी अनुसुचित जातींसाठी केंद्रीय नोकर्‍यांमध्ये ८.३३ टक्के आरक्षणाची तरतूद करून घेतली.

● लवकरच त्यांच्या लक्षात आले की, शिक्षणाअभावी अनुसुचित जातींमधून पात्र उमेदवार मिळायला अडचण येते. त्यांनी तातडीने शिक्षण संस्था उभारणीला सुरूवात केली.

● मंत्रालयासमोरच्या शासकीय बराकींमध्ये संस्थेचे वर्ग भरत असत. मुंबईत तेव्हा नोकरी करून शिकणार्‍या गरिब, होतकरू मुलांमुलींसाठी सकाळचे एकही महाविद्यालय नव्हते. ती उणीव बाबासाहेबांनी भरून काढली.

● फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि विनोदी लेखक बाळ गाडगीळ हे गरिब ब्राह्मण कुटुबांतले. गाडगीळ नोकरी करून शिकले ते बाबासाहेबांच्या या महाविद्यालयामुळे. यांनी आपले आत्मचरित्र बाबासाहेबांना अर्पण केलेले आहे.

● अशा असंख्य ज्ञात अज्ञातांच्या वाटचालीत पीपल्स एज्युकेशनने शिक्षणाची सावली दिली.

● बाबासाहेबांची आपला अफाट ग्रंथसंग्रह पीपल्सच्या ग्रंथालयांना दिला.

● पालीभाषा, बौद्ध संस्कृती, आधुनिक ज्ञानविज्ञान या बाबतीत ही संस्था अग्रेसर राहावी असे त्यांचे स्वप्न होते.

ब्रिटनचे ऑक्सफोर्ड विद्यापीठ सर्वोत्तम विद्यापीठ

लंडनच्या ‘टाइम्स’ या संस्थेच्यावतीने ‘टाइम्स हायर एज्युकेशन (THE) विश्व विद्यापीठ क्रमवारीता 2020’ प्रसिद्ध करण्यात आली आहे.

भारतीय विज्ञान संस्था (IISc), बेंगळुरू आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), रोपार या केवळ दोन भारतीय संस्थांनी या यादीत प्रथम 350 क्रमांकामध्ये जागा मिळविलेली आहे. मात्र या यादीत कोणत्याही भारतीय संस्थेला प्रथम 300 मध्ये जागा मिळविण्यात यश आलेले नाही. या दोन संस्थांनी समान गुणासह संयुक्तपणे क्रमांक ‘301-350’ या गटात जागा मिळविलेली आहे.

▪️प्रथम 10 सर्वोत्तम विद्यापीठे (अनुक्रमे) -

1) ऑक्सफोर्ड विद्यापीठ, ब्रिटन.
2) ऑक्सफोर्ड विद्यापीठ, कॅलिफोर्निया इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अमेरिका)
3) केंब्रिज विद्यापीठ (ब्रिटन)
4) स्टॅनफोर्ड विद्यापीठ (अमेरिका)
5) मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अमेरिका)
6) प्रिन्सटन विद्यापीठ (अमेरिका)
7) हार्वर्ड विद्यापीठ (अमेरिका)
8) येल विद्यापीठ (अमेरिका)
9) शिकागो विद्यापीठ (अमेरिका)
10) इम्पीरियल कॉलेज लंडन (ब्रिटन)

जागतिक क्रमवारीत भारताची उपस्थिती सुधारली असून गतवर्षी केवळ 49 संस्था यादीत समाविष्ट होत्या मात्र यंदा 56 संस्थांचा क्रमांक लागला आहे.

नवीन IIT इंदौर या संस्थेचे 351-400 गटात स्थान आहे, जेव्हा की जुन्या संस्था 401-500 गटात आढळून येत आहेत. पंजाब विद्यापीठ, चंदीगड 601-800 या गटात कायम असून IIT गांधीनगर नव्यानेच 501-600 या गटात प्रवेश केला आहे.

जागतिक क्रमवारीत समाविष्ट केल्या गेलेल्या भारतीय संस्थांच्या संख्येमुळे, भारत हा आशिया खंडात पाचव्या स्थानावर असून जापान आणि चीन अव्वल आहेत.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘सरदार व जमीनदार यांचे वर्चस्व असणारे राज्यशासन’ या शब्दसमूहाला खालील योग्य शब्द सांगा.

   1) सावकारशाही    2) राजेशाही   
   3) सामंतशाही      4) जमीनदारशाही

उत्तर :- 3

2) खालीलपैकी शुध्द शब्द कोणता ?
   1) आध्यात्मिक      2) अध्यात्मिक   
   3) आध्यात्मीक      4) अधात्मिक

उत्तर :- 1

3) मराठीत कोणता वर्ण स्वतंत्र मानला आहे ?

   1) क्‍      2) ण्‍      3) ळ      4) क्ष्‍
उत्तर :- 3

4) पुनर् + जन्म हा कोणत्या संधीयुक्त शब्दाचा विग्रह आहे ?

   1) पुर्नजन्म    2) पूर्ण जन्म    3) पुनर्जन्म    4) पुनर्जम्न

उत्तर :- 3

5) अचूक विधाने निवडा.

   अ) शब्द आणि पद हे एकसारखेच आहे.
   ब) शब्दापासून पदे बनतात.
   क) पदापासून शब्द बनतात.
   1) फक्त अ अचूक  2) फक्त अ आणि क अचूक
   3) फक्त ब अचूक    4) फक्त क अचूक

उत्तर :- 3

https://t.me/CompleteMarathiGrammar

6) खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. – ज्याने हे भांडण उरकले, तो माघार घेईल.

   1) दर्शक सर्वनाम    2) संबंधी सर्वनाम   
   3) आत्मवाचक सर्वनाम    4) पुरुषवाचक सर्वनाम

उत्तर :- 2

7) ‘झाड पाडले’ या वाक्यात ‘पाडले’ या क्रियापदाचा प्रकार ओळखा.

   1) संयुक्त क्रियापद    2) प्रयोजक क्रियापद
   3) अनियमित क्रियापद    4) शक्य क्रियापद

उत्तर :- 2

8) ‘मला बोलवत नाही’ अधोरेखित शब्दाचा क्रियापद प्रकार ओळखा.

   1) प्रयोजक      2) शक्य     
   3) सहाय्यक      4) अकर्तृक

उत्तर :- 2

9) पर्यायी उत्तरांतील ‘अवधिवाचक कालवाचक क्रिया – विशेषण’ कोणते ?

   1) दिवसेंदिवस थंडी वाढतच गेली      2) पक्षीण क्षणोक्षणी पडत होती
   3) नेहमी त्यांचे असेच असते      4) तो कैकवेळा सांगूनही आला नाही

उत्तर :- 3

10) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. – कोंडिबा झाडाखाली शांत झोपला होता.

   1) केवलप्रयोगी      2) क्रियाविशेषण   
   3) शब्दयोगी अव्यय    4) नाम

उत्तर :- 3

प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीत पुन्हा ‘सम-विषम

📌नवी दिल्ली प्रचंड प्रमाणात वाढलेले वायू प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री यांनी शुक्रवारी विविध उपाययोजनांची घोषणा केली.

📌 त्यात प्रामुख्याने खासगी वाहनांसाठी योजनेची पुन्हा अंमलबजावणी केली जाणार आहे.

📌 येत्या ४ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत वाहनांवर निर्बंध आणणाऱ्या या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.

📌सम-विषम योजनेनुसार, ज्या वाहनांचा नोंदणी क्रमांक सम आहे ती वाहने केवळ सम तारखेलाच, तर ज्या वाहनांची नोंदणी क्रमांक विषम आहे ती वाहने केवळ विषम तारखेलाच रस्त्यावर चालवता येऊ शकतील.

📌 विषम क्रमांकांच्या गाड्या ५, ७, ११, १३, आणि १५ तारखेला रस्त्यांवर धावू शकतील, तर सम क्रमांकांच्या गाड्या ४, ६, ८, १२ आणि १४ तारखेला रस्त्यांवर धावू शकणार आहेत.

📌 या योजनेची विस्तृत माहिती नागरिकांना लवकरच सांगितली जाईल, असे केजरीवाल यांनी सांगितले.

📌याआधी सन २०१६ मध्ये जानेवारी आणि एप्रिल महिन्यात केजरीवाल सरकारने दिल्लीमध्ये सम-विषम योजनेची अंमलबजावणी केली होती.

📌नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना तेव्हा प्रत्येकी दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला होता.

📌शिवाय दुचाकी आणि महिला वाहनचालकांना या नियमातून सूट देण्यात आली होती. दिल्लीमधील प्रदूषणाची पातळी ११ महिने कमी असते, मात्र नोव्हेंबरमध्ये ती कमालीची वाढते.

📌कारण या महिन्यात शेजारच्या पंजाब, हरयाणा या राज्यांमध्ये पिकांची कापणी केल्यानंतर उरलेले भुसकट मोठ्या प्रमाणात जाळले जाते.

📌त्यामुळे दिल्लीच्या आकाशात अक्षरश: धुराचे ढग दाटून येतात. या प्रदूषणामुळे दिल्ली शहर गॅस चेंबर बनते, असे केजरीवाल यांनी सांगितले.

📌केंद्र सरकार तसेच पंजाब आणि हरयाणा राज्य सरकारे भुसकट जाळण्याचे प्रकार रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांना दिल्ली सरकार शक्य ती सर्व मदत करेल, असेही केजरीवाल म्हणाले. 

📌सात कलमी कृती कार्यक्रम प्रचंड प्रमाणात वाढलेले वायू प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी शुक्रवारी सम-विषम योजनेसह सात कलमी कृती कार्यक्रमाची घोषणा केली. त्यामध्ये प्रदूषणरोधक मास्कचे मोठ्या प्रमाणात वाटप करणे, रस्ते झाडण्यासह रस्त्यांवर पाणी शिंपडणे, वृक्ष लागवड आणि शहरातील प्रदूषणयुक्त प्रमुख १२ ठिकाणी विशेष योजना राबवणे या उपाययोजनांचा समावेश आहे.

📌या व्यतिरिक्त दिवाळीमध्ये फटाक्यांचा वापर करू नये, असे आवाहन नागरिकांना करताना केजरीवाल म्हणाले की, दिवाळीच्या पूर्वसंध्येला सरकारतर्फे लेझर शोचे आयोजन केले जाईल.

बी. एन. युगंधर यांचे निधन

🔰माजी प्रशासकीय अधिकारी आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांचे वडील बी. एन. युगंधर यांचे शुक्रवारी दुपारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.

🔰सन १९६२च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या युगंधर यांनी

🔰दिवंगत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या कार्यकाळात पंतप्रधान कार्यालयात सेवा बजावली होती.

🔰मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीचे संचालक म्हणून देखील त्यांनी काम केले होते.

🔰युगंधर यांनी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयात सचिव पदाची जबाबदारी पार पाडली होती.

🔰नियोजन आयोगाचे सदस्य असताना त्यांनी अपंगत्वाचा मुद्दा नियोजनामध्ये समाविष्ट करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

🔰आयएएस अधिकाऱ्यांमध्ये युगंधर हे अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व होते

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून पद्म पुरस्कारांसाठी नऊ महिला खेळाडूंची शिफारस


 
◾️नवी दिल्ली :  सहा वेळची जागतिक अजिंक्यपद विजेती बॉक्सर मेरी कोमची केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून यंदाच्या पद्मविभूषण पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. भारतरत्ननंतर देशातल्या दुसऱ्या सर्वोच्च पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेली मेरी कोम ही पहिली महिला खेळाडू ठरली आहे.

मेरी कोमसह यंदा 9 महिला खेळाडूंची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करण्यात आली आहे. त्यात जागतिक सुवर्णविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचं नाव पद्मभूषण पुरस्कारासाठी सुचवण्यात आलं आहे. स्वित्झर्लंडच्या बेसिलमध्ये नुकत्याच झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूनं पहिल्यांदाच भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. हैदराबादच्या या सुवर्णकन्येला 2015 साली पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता.

याशिवाय क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, पैलवान विनेश फोगाट, टेबल टेनिसपटू  मनिका बत्रा, भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल, नेमबाज सुमा शिरुर, गिर्यारोहक ताशी आणि नुंगशी मलिक या जुळ्या बहिणींची पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

36 वर्षांची मेरी कोम पद्मविभूषण पुरस्काराचा मान मिळवणारी एकूण चौथी तर पहिली महिला क्रीडापटू ठरणार आहे. याआधी 2007 साली ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद, 2008 साली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सर एडमंड हिलरी यांना पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.

विक्रमी सहा वेळा जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा जिंकणाऱ्या मणिपूरच्या सुपरमॉम मेरी कोमला 2013 साली पद्मभूषण तर 2016 साली पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

पद्म पुरस्कारासाठी शिफारस झालेल्या या सर्व खेळाडूंची नावं पद्म पुरस्कार समितीकडे पाठवली जाणार आहेत. त्यातून प्रजासत्ताक दिनाआधी पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात येईल.

अरुणाचल प्रदेश : चीन सीमेवर प्रथमच भारतीय लष्कर करणार मोठा युद्धाअभ्यास



🔺 पाच हजार जवानांसह वायुसेनेचाही असणार सहभाग

◾️भारतीय लष्कराकडून वायुसेनेबरोबर चीनच्या सीमेवर ऑक्टोबर महिन्यात मोठा युद्धाअभ्यास केला जाणार आहे. भारतीय सेनेच्या एकमेव ’17 – माउंटन स्ट्राइक कोर’चे पाच हजार जवान अरूणाचल प्रदेशात होणाऱ्या या मोठ्याप्रमाणावरील युद्धाअभ्यासात सहभागी होणार आहेत. चीनच्या सीमेवर भारतीय सेनेचा हा पहिलाच युद्धाअभ्यास असणार आहे. या ठिकाणी युद्धजन्य परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी जवानांना तैनात केले जाणार आहे.

यासाठी नवनिर्मित ’17 – माउंटन स्ट्राइक कोर’ कडून पाच ते सहा महिन्यांपासून ईस्टर्न कमांड अंतर्गत तयारी केली जात आहे. सेनेच्या सुत्रांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार युद्धाअभ्यासात तेजपूरमधील 4 कोर तुकड्यांना सेनेच्या रक्षणासाठी एका अतिउच्च ठिकाणी तैनात केले जाणार आहे. यामध्ये ’17 – माउंटन स्ट्राइक कोर’ च्या अडीच हजारपेक्षा जास्त जवानांना वायुसेना युद्धाअभ्यासासाठी एअरलिफ्ट करणार आहे. या युद्धाअभ्यासादरम्यान स्ट्राइक कोरचे जवान, 4 कोरच्या जवानांवर हवाई हल्ला करणार आहेत.

ANI Digital


Indian Army troops along with Air Force will carry out a massive war game in Arunachal Pradesh in October where Forces will be deployed to practice real war-like situation on Eastern Front

१०:४२ म.पू. - ११ सप्टें, २०१९

या युद्धाअभ्यासासाठी वायुसेना पश्चिम बंगालमधील बगदोगरा येथून सैनिकांना एअरलिफ्ट करणार आहे. यासाठी वायुसेना सी-17 ग्लोबमास्टर, सी-130 जे सुपर हरक्युलिस आणि एएन-32 या विमानांचा वापर करणार आहे. ज्यामुळे लवकरात लवकर युद्ध क्षेत्राच्या ठिकाणी सैन्य तैनात करता येणार आहे.

याशिवाय या युद्धाअभ्यासात ’17 – माउंटन स्ट्राइक कोर’ च्या हॉवित्झर तोफांबरोबर रणगाडे आणि लष्कराच्या लढाऊ तुकड्यांचा शस्त्रसज्जतेसह समावेश असणार आहे. या युद्धाअभ्यासाचे आयोजन चीन बरोबर पर्वतीय क्षेत्रात युद्धासाठी ’17 – माउंटन स्ट्राइक कोर’ ला अधिक सक्षम बनवण्यासाठी केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...