१३ सप्टेंबर २०१९

MPSC अध्यक्षपदी सतीश गवई यांची नियुक्ती.

प्रभारी अध्यक्ष पदावरून चंद्रशेखर ओक निवृत्त. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्य आणि प्रभारी अध्यक्ष पदावरून चंद्रशेखर ओक  आज निवृत्त झाले असून आयोगाच्या अध्यक्ष पदावर निवृत्त अतिरिक्त मुख्यसचिव सतीश गवई यांची नियुक्ती राज्य सरकारने केली आहे.

    राज्य सरकारच्या सेवेतून 2 वर्षापूर्वी चंद्रशेखर ओक निवृत झाल्यानंतर त्याची लोकसेवा आयोगाच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली  होती. शिवाय अध्यक्ष पदाचा प्रभारी अध्यक्ष पदाची सुत्रही  सोपविण्यात आली होती. आयोगाच्या घटनेत कमीत  कमी 6 वर्ष किंवा वयाची 62 वर्ष पूर्ण होत पर्यन्त कार्यरत राहु शकतात अशी तरतूद आहे. ओक यांना 15 सप्टेंबर रोजी 62 वर्ष पूर्ण होत असल्याने आणि पुढील दोन दिवस सुट्टी असल्याने आज शासनातर्फे ओक यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. आयोगात मिळालेल्या 15 महिन्याच्या कालावधीनंतर ओक आज निवृत झाले असून त्यांनी आपल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.   

लवकरच चलनात येणार 550 रुपयांचं नवीन नाणं

◾️श्री गुरु नानक देव यांच्या 550 व्या प्रकाश पर्वाची जय्यत तयारी सुरु आहे. श्री गुरु नानक देव यांच्या जयंती पर्वानिमित्त केंद्र सरकारकडून 550 रुपयांचं नवीन नाणं जारी करण्यात येणार असल्याची माहिती शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे प्रमुख भाई गोविंदसिंग यांनी दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शीख समुदायाकडून सरकारचे कौतूक करण्यात येत आहे.

◾️केंद्र सरकारला 550 रुपयांच्या नवीन नाण्याच्या डिझाईनसाठी संत शिरोमणी कमेटीने मंजूरी दिली आहे. श्री बेर साहेब सुल्तानपुर लोधी येथे 12 नोव्हेंबर रोजी गुरु नानक यांच्या 550 व्या जयंती मोहत्सवामध्ये केंद्र सरकार या नवीन नाण्याचे अनावरण करण्यात येणार

🔘असे असेल नवीन 550 रुपयांचे नाणे🔘

◾️श्री गुरु नानक देव यांच्या जयंती पर्वानिमित्त केंद्र सरकारकडून 550 रुपयांचं नवीन नाण्यावर प्रथम गुरुद्वारा श्री बेर सुल्तानपूर लोधी यांचा फोटो लावण्याचे शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने सुचवले आहे.

◾️केंद्र सरकारने या नाण्यावरील एका बाजुला गुरुनानक देवजी यांचे जन्मस्थान नानकाना साहिब गुरुद्वाराचा फोटो छापण्याचे ठरवले आहे.

◾️हे नाणे बनवण्यासाठी 50 टक्के लोखंड आणि 40 टक्के तांब्याचा वापर करण्यात येणार आहे. हे नाणे आकाराने 10 रुपयांच्या नाण्यापेक्षा मोठे असेल.

सराव प्रश्नमालिका 13/9/2019

1. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना कोठे केली?
सिंगापूर
टोकिओ
रंगून
बर्लिन

● उत्तर - सिंगापूर

2. इंडिया इंडिपेंडन्स लीगची (भारतीय स्वातंत्र्य संघाची) स्थापना कोणी केली?
सुभाषचंद्र बोस
राशबिहारी बोस
जगन्नाथराव भोसले
कॅप्टन मोहन सिंग

● उत्तर - राशबिहारी बोस

3. ……… या संतांचे गुरू जनार्दन स्वामी होते?
संत ज्ञानेश्वर
संत एकनाथ
संत तुकाराम
संत नामदेव

● उत्तर - संत एकनाथ

4. ज्ञानेश्वर महाराजांचा ग्रंथ कोणता?
ज्ञानेश्ररीची शुध्द प्रत
भावार्थ रामायण
मनाचे श्लोक
ज्ञानेश्वरी
● उत्तर - ज्ञानेश्वरी

5. पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युध्दात अतिशुरपणे दीर्घकाळ कोण लढले?
तात्या टोपे
राणी लक्ष्मीबाई
शिवाजी महाराज
नानासाहेब पेशवे

● उत्तर - तात्या टोपे

6. भारतात आल्यानंतर गांधीजीनी पहिली चळवळ कोठे घडवून आणली?
बाडोंली
खेडा
चंपारण्य
चौरीचौरा

● उत्तर - चंपारण्य

7. पुणे समाचार हे दैनिक कोणी सुरू केले?
बाबा पद्मजी
गो.ग. आगरकर
शि.म. परांजपे
श्रीधर व्यंकटेश केतकर

● उत्तर - श्रीधर व्यंकटेश केतकर

8. अक्कलकोटच्या युवराजांना शिकवण्यासाठी सरकारने कोणाची नेमणूक केली हाती?
नाना जगन्नाथ शंकरशेठ
बाळशास्त्री जांभेकर
विष्णूशास्त्री पंडित
विष्णूबुवा ब्रह्मचारी

● उत्तर - बाळशास्त्री जांभेकर

9. खालीलपैकी योग्य जोडी कोणती?
बार्डोली सत्याग्रह - सरदार वल्लभभाई पटेल
असहकार चळवळ - लोकमान्य टिळक
चंपारण्य सत्याग्रह - गो.कृ.गोखले
रामकृष्ण मिशन द्यानंद सरस्वती

● उत्तर - बार्डोली सत्याग्रह - सरदार वल्लभभाई पटेल

10. र्इष्ट असेल ते बोलणार,  साध्य असेल ते करणार हे कोणत्या नियतकालिकाचे ब्रीदवाक्य?
केसरी
मराठा
ज्ञानोदय
सुधारक (गो.ग आगरकर)

● उत्तर - सुधारक (गो.ग आगरकर)

नुकत्याच आलेल्या ग्लोबल रँकिंग 2020 च्या टॉप - 300 मध्ये भारतातील एकाही विद्यापीठाच्या नावाचा समावेश नाही

◾️2012 नंतर ही पहिली क्रमवारी आहे ज्यात टॉप 300 मध्ये भारतातील एकही विद्यापीठ नाही. परंतू भारताने ओवरऑल रँकिंगमध्ये 2018 च्या तुलनेत आपली क्रमवारी सुधारली आहे, यंदा या क्रमवारीत भारतीय विद्यापीठाची संख्या जास्त आहे.

◾️2018 साली या यादीत 49 संस्थांना स्थान मिळाले होते. तर यंदा 56 संस्थाना स्थान मिळाले आहे. परंतू याच यादीत चीनच्या विद्यापीठांची संख्या जास्त आहे.

◾️चीनचे Tsinghua विद्यापीठ ग्लोबल रँकिंगमध्ये 23 व्या स्थानी आहे तर Peking 24 व्या स्थानी.

◾️ही रँकिंग टाइम्स हायर एज्युकेशनची वर्ल्ड यूनिवर्सिटी रँकिंग 2020 आहे. ही रँकिंग शैक्षणिक संस्थाचे प्रदर्शन आणि शैक्षणिक स्तर यावर आधारित असते. यात 92 देशांच्या एकूण 1,300 विद्यापीठांचा समावेश आहे.

🔘 कोणतीही आहेत सर्वश्रेष्ठ विद्यापीठ 🔘

◾️मागील चार वर्षांपासून यूनिवर्सिटी ऑफ ऑक्सफोर्ड पहिल्या स्थानी आहे. यंदा देखील तीच यूनिवर्सिटी पहिल्या स्थानी आहे. अशियातील फक्त 2 विद्यापीठ सर्वश्रेष्ठ यादीत वरच्या क्रमांकावर आहेत, परंतू त्या देखील चीनमधील आहेत.

🔶 टॉप 5 विद्यापीठे 🔶

1. यूनिवर्सिटी ऑफ ऑक्‍सफोर्ड (ब्रिटेन)

2. कॅलिफोर्निया इंस्‍टिट्यूट ऑफ टेक्‍नोलॉजी (अमेरिका)

3. यूनिवर्सिटी ऑफ कैम्ब्रिज (ब्रिटेन)

4. स्‍टँडफोर्ड यूनिवर्सिटी (अमेरिका)

5. मेसाचुसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (अमेरिका)

टॉप - 500 मध्ये भारतीय विद्यापीठांना स्थान -

◾️टॉप - 300 मध्ये भारतीय विद्यापीठांनी आपले स्थान निर्माण केले नसले तरी टॉप - 500 मध्ये भारतातील 6 विद्यापीठांनी स्थान मिळवले आहे.

◾️यात इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, रोपड पहिल्या 350 मध्ये आहे. तर इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरु टॉप 500 मध्ये आहे. IIT दिल्ली, IIT खडकपूर आणि जामिया मिल्लिया सह काही विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) कोणतेही काम करण्याचे टाळत राहणे, पुढे पुढे ढकलत राहणे म्हणजेच –

   1) धरसोड करणे    2) टंगळमंगळ करणे    3) सोडून देणे    4)  पुढे पुढे जाणे

उत्तर :- 2

2) ‘नेहमी घरात बसून राहणारा’ या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा.

   1) परात्म      2) ऐतखाऊ      3) घरकोंबडा    4) एकलकोंडा

उत्तर :- 3

3) खालील शब्दांमधून व्याकरणदृष्टया योग्य शब्द शोधा.

   1) अमिबा      2) अमीबा      3) अब्मिबा    4) अम्बिमा

उत्तर :- 1

4) खालील स्वर कोणत्या गटात मोडतात ? – अ, आ, इ, ई, उ, ऊ ...............

   1) सजातीय      2) विजातीय      3) संयुक्त      4) –हस्व

उत्तर :- 1

5) खालीलपैकी कोणत्या शब्दात व्यंजन संधी साधली आहे ?

   1) कवीश्वर      2) दुरात्मा      3) सज्जन    4) गणेश

उत्तर :- 3

6) योग्य पर्याय निवडा.

   अ) विकारी शब्दाचा लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होतो.
   ब) अविकारी शब्दाच्या लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होत नाही.

   1) अ      2) दोन्ही      3) ब      4) दोन्ही नाही

उत्तर :- 2

7) ‘सैनिकांचे शौर्य पाहून देशास अभिमाने वाटतो.’ अधोरेखित शब्दाचा नामप्रकार ओळखा.

   1) भाववाचक    2) सामान्यनाम    3) क्रियावाचक    4) धातुसाधित

उत्तर :- 1

8) सर्वनामाचे एकूण मूळ ............ प्रकार पडतात. रिकाम्या जागी अचूक पर्याय शोधून लिहा.

   1) नऊ    2) तीन      3) चार      4) सात

उत्तर :- 1

9) ‘नागपूरची संत्री’ हे कोणते विशेषण आहे ?

   1) सर्वनाम साधित विशेषण    2) धातुसाधित विशेषण
   3) अव्ययवसाधित विशेषण    4) नामसाधित विशेषण

उत्तर :- 4

10) ‘तू एवढया भाकरी कराव्यात’ – या वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा आख्यात ओळखा.

   1) आख्यात    2) वाख्यात    3) ताख्यात    4) लाख्यात

उत्तर :- 2

काश्मीरप्रश्नी मध्यस्थी नाहीच, संयुक्त राष्ट्राचा पाकला दणका

 📌काश्मीरप्रकरणी जगभरातून पाठिंबा मिळविण्यात आलेल्या पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रानेही दणका दिला आहे.

📌भारत आणि पाकिस्तानने हा विषय चर्चेने सोडविण्याचा सल्ला देत संयुक्त राष्ट्राने काश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची पाकिस्तानची मागणी फेटाळून लावली आहे.

📌 विशेष म्हणजे भारताने विनंती केली तरच या प्रश्नात मध्यस्थी करणार असल्याचं संयुक्त राष्ट्राने स्पष्ट केल्याने पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे.

📌संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी पाकिस्तानची ही मागणी फेटाळून लावली आहे.

📌 यूएनचे सेक्रेटरी जनरलचे प्रवक्ते स्टिफन दुजारिक यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मध्यस्थेबाबतची आमची भूमिका कायम आहे.

📌 त्यात काही बदल होणार नाही. तसेच संयुक्त राष्ट्राच्या महासचिवाने दोन्ही देशांच्या सरकारशी संपर्कही साधला आहे, असं दुजारिक यांनी स्पष्ट केलं.

📌दोन्ही देशांनी काश्मीरचा मुद्दा शांततेत आणि चर्चेने सोडवावा. दोन्ही देशांना काश्मीरवर शांततेनेच तोडगा काढावा लागेल, असंही संयुक्त राष्ट्राने म्हटलं आहे.

📌काश्मीरचा मुद्दा हा द्विपक्षीय

ईशान्येकडील राज्यांचा विशेष दर्जा हटवण्याचा कोणताही विचार नाही : अमित शाह

🔰आसाममध्ये नुकतीच एनआरसीची पहिली यादी जाहीर करण्यात आली. पहिली यादी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी आसामचा दौरा केला. नॉर्थ ईस्ट काऊन्सिलच्या बैठकीसाठी शाह उपस्थित होते. ईशान्येकडील राज्यांना विशेष दर्जा देणाऱ्या ३७१ व्या कलमाला संविधानात विशेष स्थान आहे आणि भाजपा सराकर त्याचा सन्मान करते, असे शाह यावेळी म्हणाले.

🔰भारतीय संविधानात ईशान्येकडील राज्यांना देण्यात आलेल्या विशेषाधिकाऱ्यांच्या ३७१ व्या कलमाला विशेष स्थान देण्यात आले असून भाजपा त्याचा आदर करते. भाजपा सरकार यामध्ये कोणताही बदल करणार नाही. जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देण्यात आलेले कलम ३७० मधील तरतुदी या तात्पुरत्या स्वरूपाच्या होत्या. कलम ३७० आणि कलम ३७१ या दोन्हींमध्ये मोठा फरक असल्याचे शाह यांनी नमूद केले. जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० हटवल्यानंतर कलम ३७१ बाबतही अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या. या कलमांतर्गत भारतीयांना त्या ठिकाणी संपत्ती खरेदी करता येत नाही, असंही ते म्हणाले.

राष्ट्रीय निवड चाचणी नेमबाजी स्पर्धा - नेमबाज मेहुली घोषला दुहेरी विजेतेपद

पश्चिम बंगालच्या मेहुली घोष हिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात वरिष्ठ आणि कनिष्ठ गटातही बाजी मारत राष्ट्रीय निवड चाचणी नेमबाजी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

अनहद जावंडा आणि पारुल कुमार यांनी अनुक्रमे पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात आणि ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकाराचे विजेतेपद मिळवले. डॉ. कर्णी सिंह शूटिंग रेंजवर झालेल्या या स्पर्धेत मेहुलीने महिलांच्या गटात निर्विवाद वर्चस्व गाजवले. तिने १० मीटर एअर रायफलमध्ये मध्य प्रदेशच्या श्रेया अगरवाल हिच्यावर मात करत २५२ गुणांनिशी विजेतेपद संपादन केले. श्रेयाला २५१.२ गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेली राजस्थानची अपूर्वी चंडेला २२९.३ गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिली.

कनिष्ठ गटात, मेहूलीने पंजाबच्या खुशी सैनी हिचे आव्हान मोडीत काढत २५२.२ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. खुशीने २४८.८ गुणांसह रौप्यपदक प्राप्त केले. मध्य प्रदेशची मानसी कठैत २२७.५ गुणांसह तिसरी आली. अनहद याने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात ऑलिम्पियन गुरप्रीत सिंग याला मागे टाकत सुवर्णपदक मिळवले. केरळचा थॉमस जॉर्ज तिसरा आला.

​​​​ मोदींचे आमसभेत २७ सप्टेंबरला भाषण

◾️पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या ७४व्या सत्रात भाषण करणार आहेत.

◾️मोदी यांच्या या आठवडाभराच्या दौऱ्यामध्ये विविध द्विपक्षीय आणि बहुस्तरीय चर्चा-बैठकांमध्ये सहभागी होणार आहेत.

◾️मोदी यांच्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही २७ सप्टेंबर रोजी आमसभेत भाषण देणार आहेत.

◾️आमसभा २४ ते ३० सप्टेंबर या काळात होणार आहे.

◾️या सत्रामध्ये ११२ देशांचे प्रमुख, ४८ देशांतील सरकारांचे प्रमुख आणि ३० परराष्ट्रमंत्री आमसभेत भाषण करतील.

◾️दरम्यान, बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनतर्फे नरेंद्र मोदी यांना 'ग्लोबल गोलकीपर अवार्ड'ने गौरवण्यात येणार आहे.

◾️मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानासाठी त्यांचा हा गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय, मोदी २२ सप्टेंबर रोजी ह्युस्टनला पोहोचण्याची शक्यता असून, तेथे भारतीय-अमेरिकन नागरिकांसमोर भाषण करणार आहेत.

◾️ या सभेला ५० हजारांपेक्षा जास्त भारतीय हजर राहण्याची शक्यता आहे.

‘राष्ट्रीय पशूरोग नियंत्रण कार्यक्रम’ला सुरुवात झाली

√दिनांक 11 सप्टेंबर 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मथुरा (उत्तरप्रदेश) येथे पाय व मुखरोग (FMD) आणि ब्रुसेलोसिस अश्या रोगांना लक्ष्य करीत देशव्यापी ‘राष्ट्रीय पशूरोग नियंत्रण कार्यक्रम’ याचा आरंभ करण्यात आला.

√केंद्र सरकारने या योजनेसाठी येत्या पाच वर्षांच्या कालावधीसाठी म्हणजेच 2024 सालापर्यंत 12,652 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

■कार्यक्रमाविषयी

√प्राण्यांमध्ये आढळून येणार्‍या पाय व मुखरोग (FMD) या धोकादायक रोगाला प्रतिबंध करण्यासाठी देशभरातल्या गुरे, म्हशी, मेंढ्या, शेळ्या आणि डुकरे अश्या 500 दशलक्षाहून अधिक जनावरांचे लसीकरण करणे हे या कार्यक्रमाचे लक्ष्य आहे. शिवाय ब्रुसेलोसिस रोगाविरूद्धच्या लढाईत दरवर्षी 36 दशलक्ष गायीच्या मादा वासरांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट आहे.

■कार्यक्रमाचे दोन घटक –

√2025 सालापर्यंत रोगांवर नियंत्रण आणणे

✅ 2030 सालापर्यंत पाय व मुखरोगांचे (FMD) निर्मूलन करणे

गुरे, म्हशी, मेंढ्या, शेळ्या आणि डुकर इत्यादी पशूंमध्ये पाय व मुखरोग (FMD) आणि ब्रुसेलोसिस हे रोग सामान्यपणे आढळून येतात. जर दुधावर असलेले पशू रोगाची लागण झाली असेल तर शंभर टक्क्यांपर्यंत दुधाचे नुकसान होऊ शकते जे जवळपास चार ते सहा महिने टिकू शकते. त्यामुळे उत्पादकाला अत्याधिक नुकसानीला सामोरे जावे लागते. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम राबवविला जात आहे.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

■अनुसूचित जातीतील विध्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी

🔸दरवर्षी २५ हजार विध्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट.

🔸प्रति विद्यार्थी 43 हजार ते 60 हजार रुपये वार्षिक अनुदान

🔸DBT द्वारे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात होते अनुदानाचे वितरण