1) ‘सरदार व जमीनदार यांचे वर्चस्व असणारे राज्यशासन’ या शब्दसमूहाला खालील योग्य शब्द सांगा.
1) सावकारशाही 2) राजेशाही
3) सामंतशाही 4) जमीनदारशाही
उत्तर :- 3
2) खालीलपैकी शुध्द शब्द कोणता ?
1) आध्यात्मिक 2) अध्यात्मिक
3) आध्यात्मीक 4) अधात्मिक
उत्तर :- 1
3) मराठीत कोणता वर्ण स्वतंत्र मानला आहे ?
1) क् 2) ण् 3) ळ 4) क्ष्
उत्तर :- 3
4) पुनर् + जन्म हा कोणत्या संधीयुक्त शब्दाचा विग्रह आहे ?
1) पुर्नजन्म 2) पूर्ण जन्म 3) पुनर्जन्म 4) पुनर्जम्न
उत्तर :- 3
5) अचूक विधाने निवडा.
अ) शब्द आणि पद हे एकसारखेच आहे.
ब) शब्दापासून पदे बनतात.
क) पदापासून शब्द बनतात.
1) फक्त अ अचूक 2) फक्त अ आणि क अचूक
3) फक्त ब अचूक 4) फक्त क अचूक
उत्तर :- 3
https://t.me/CompleteMarathiGrammar
6) खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. – ज्याने हे भांडण उरकले, तो माघार घेईल.
1) दर्शक सर्वनाम 2) संबंधी सर्वनाम
3) आत्मवाचक सर्वनाम 4) पुरुषवाचक सर्वनाम
उत्तर :- 2
7) ‘झाड पाडले’ या वाक्यात ‘पाडले’ या क्रियापदाचा प्रकार ओळखा.
1) संयुक्त क्रियापद 2) प्रयोजक क्रियापद
3) अनियमित क्रियापद 4) शक्य क्रियापद
उत्तर :- 2
8) ‘मला बोलवत नाही’ अधोरेखित शब्दाचा क्रियापद प्रकार ओळखा.
1) प्रयोजक 2) शक्य
3) सहाय्यक 4) अकर्तृक
उत्तर :- 2
9) पर्यायी उत्तरांतील ‘अवधिवाचक कालवाचक क्रिया – विशेषण’ कोणते ?
1) दिवसेंदिवस थंडी वाढतच गेली 2) पक्षीण क्षणोक्षणी पडत होती
3) नेहमी त्यांचे असेच असते 4) तो कैकवेळा सांगूनही आला नाही
उत्तर :- 3
10) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. – कोंडिबा झाडाखाली शांत झोपला होता.
1) केवलप्रयोगी 2) क्रियाविशेषण
3) शब्दयोगी अव्यय 4) नाम
उत्तर :- 3