Monday, 9 September 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न 10/9/2019

1) पुढील शब्दाचे अनेकवचनी रुप ओळखा. – आज्ञा

   1) आज्ञे    2) आज्ञा     
   3) आज्ञी    4) आज्ञाने
उत्तर :- 2

2) ‘देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ?

   1) प्रथमा    2) व्दितीया   
   3) तृतीया    4) सप्तमी

उत्तर :- 3

3) ‘कोणीही गडबड करू नका’ हे वाक्य होकारार्थी करा.

   1) शांत बसणारे गडबड करीत नाहीत    2) गडबड करणारे शांत बसतात
   3) काय ही गडबड !        4) सर्वांनी शांत बसा

उत्तर :- 4

4) ‘पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात’ या वाक्यातील अधोरेखित शब्द .................. चे काम करतात.

   1) उद्देश्यविस्तार  2) उद्देश्य     
   3) क्रियापद    4) विशेषण
उत्तर :- 1

5) खालील वाक्यातील ‘प्रयोग’ ओळखा. – आईने मधुराला बोलावले.

   1) कर्तरीप्रयोग    2) भावे प्रयोग   
   3) कर्मणीप्रयोग    4) संकीर्ण प्रयोग

उत्तर :- 2

5) खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. – ज्याने हे भांडण उरकले, तो माघार घेईल.

   1) दर्शक सर्वनाम    2) संबंधी सर्वनाम   
   3) आत्मवाचक सर्वनाम    4) पुरुषवाचक सर्वनाम

उत्तर :- 2

6) ‘झाड पाडले’ या वाक्यात ‘पाडले’ या क्रियापदाचा प्रकार ओळखा.

   1) संयुक्त क्रियापद    2) प्रयोजक क्रियापद
   3) अनियमित क्रियापद    4) शक्य क्रियापद

उत्तर :- 2

7) ‘मला बोलवत नाही’ अधोरेखित शब्दाचा क्रियापद प्रकार ओळखा.

   1) प्रयोजक      2) शक्य     
   3) सहाय्यक      4) अकर्तृक

उत्तर :- 2

8) पर्यायी उत्तरांतील ‘अवधिवाचक कालवाचक क्रिया – विशेषण’ कोणते ?

   1) दिवसेंदिवस थंडी वाढतच गेली      2) पक्षीण क्षणोक्षणी पडत होती
   3) नेहमी त्यांचे असेच असते      4) तो कैकवेळा सांगूनही आला नाही

उत्तर :- 3

10) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. – कोंडिबा झाडाखाली शांत झोपला होता.

   1) केवलप्रयोगी      2) क्रियाविशेषण   
   3) शब्दयोगी अव्यय    4) नाम

उत्तर :- 3

तेलंगणा राज्यातले पहिले मेगा फूड पार्क निझामाबाद जिल्ह्यात उभारले

तेलंगणा राज्यातले पहिले मेगा फूड पार्क निझामाबाद जिल्ह्यात लक्कमपल्ली (नंदिपेठ मंडल) येथे उभारण्यात आले असून त्याचे 7 सप्टेंबर 2019 रोजी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

‘स्मार्ट अ‍ॅग्रो फूड पार्क प्रायव्हेट लिमिटेड’ नावाचा हा मेगा फूड पार्क उभारल्यामुळे निजामाबाद, निर्मल, जगतील, राजन्ना सिर्सीला कामारेड्डी तसेच महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातल्या लोकांना फायदा होईल.

दि.३१ ऑगस्ट  रोजी प्रकाशित मतदार यादीनुसार

🔸पुरुष मतदार ४ कोटी ६७ लाख  ३७ हजार  ८४१ तर
🔸महिला मतदार ४ कोटी २७  लाख  ५ हजार ७७७ आणि
🔸तृतीयपंथी मतदार २५९३
असे
=एकूण ८  कोटी ९४  लाख ४६  हजार २११  मतदार संख्या आहे

- मुख्य निवडणूक अधिकारी श्री. बलदेव सिंह

न्युझीलंड मध्ये जगातील पहिला कल्याणकारी अर्थसंकल्प सादर

• न्युझीलंडचे अर्थमंत्री ग्रांट रॅाबर्टसन यांनी ३० मे २०१९ रोजी गरीबी, मानसिक आरोग्य, घरगुती हिंसा यासारख्या वाईट प्रवृत्तीना आळा घालण्यासाठी जगातील पहिला कल्याणकारी अर्थसंकल्प सादर केला.
• न्युझीलंड सरकाने हा अर्थसंकल्प देशातील असमानता, गरीबी या आव्हांनाचा सामना करण्यासाठी सादर केला आहे.
• या अर्थसंकल्पात देशाच्या आर्थिक विकास दराला प्राधान्य न देता जनतेच्या कल्याणासाठी प्रधान्य देण्याचे उद्दिष्टे समोर ठेवले आहे. आंतराष्ट्रीय नाणेनिधीच्या मते न्युझीलंडचा आर्थिक विकास दर २०१९ मध्ये २.५% वरून २०२० मध्ये २.९%पर्यंत वाढू शकेल असा अंदाज आहे
• न्यूझीलंडच्या अर्थव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच मानसिक आरोग्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी १.९ अब्ज न्युझीलंड डॉलर एवढा निधी राखून ठेवण्यात आला.
• या अगोदर भूतान या देशाने जगात प्रथमच आनंद निर्देशांक (Happiness Index) ही संकल्पना मांडली होती. याआधारे देशातील किती लोक समाधानाने आयुष्य जगू शकता याचे मापन करण्याचा प्रयत्न प्रथमच करण्यात आला होता. यासाठी २००८ मध्ये नागरिकांच्या आनदांचे मापन करण्यासाठी भूतान ने ग्राॅस नॅशनल हॅपीनेस इंडेक्स प्रकाशित करण्यास सुरुवात केली. त्यानंतर न्युझीलंडने प्रथमच आपल्या अर्थसंकल्पात मोठा वाटा जनतेच्या आंनद आणि कल्याणकारी साठी राखून ठेवण्यचा निर्णय घेतला आहे.

के.शिवन इस्त्रो  चीफ...


🌎माहिती विद्यार्थ्यांनी जरूर वाचावी....

🗣कन्याकुमारी जवळ एका खेड्यात जन्मलेल्या या पोराला आज सगळे इस्रो चा अध्यक्ष म्हणुन ओळखतात पण यांनी अतिशय हालाखीच्या परिस्थिती मध्ये शिक्षण घेतल आहे वडिलांचा शेती हा व्यवसाय होता आणि ते पारंपरिक फक्त दोन टाईम जेवायला मिळाव अशी शेती करायचे.
लहानपणापासून सिवन हे अभ्यासात हुशार होते पण त्यांच्या भावाला वाटायचं हे शेतीचे काम नको म्हणून शाळेत जातो त्यावेळी सिवन धोतर आणि कुडता वापरायचे आणि बिना चप्पलच हिंडायचे.
काॅलेजमध्ये एडमिशन घेताना फिस भरायला पैसे नव्हते तर ते बाजारात जाऊन घरचे आंबे विकायचे आणि पैसे जमा करायचे नंतर मात्र त्यांना स्काॅलरशिप मिळाली आणि काही दानशुर लोकांमुळे त्यांचे हे भोग संपले आणि ते अभ्यास जोमाने करु लागले.
काॅलेज चालू असताना त्यांनी गणितात १०० मार्क मिळाले म्हणुन त्यांचा सत्कार झाला आणि मिळालेल्या पैशातून त्यांनी आयुष्यात प्रथमच चप्पल घेतली नंतर बी.टेक, एम,टेक करत एरोस्पेस इंजिनीअरिंग पुर्ण केली आणि ते वैज्ञानिक झाले.
वाचायला या घटना अतिशय सोप्या वाटतात पण भोग भोगताना एक एक दिवस युगासारखा असतो आज ना उद्या चंद्रयान हा माणुस पाठवल्या शिवाय गप्प बसणार नाही हे सगळ्यांना चांगलच माहिती आहे कारण रात्रंदिवस मेहनत आणि काम इतकच यांना माहिती आहे आपल्या या भारतीय हिरो ची माहिती सगळीकडे जायलाच हवी...

हे असणार अंतराळात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर


✍भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रो या ऐतिहासिक घटनेच्या सर्व घडामोडींसंदर्भात अपडेट्स देत आहे. असे असतानाच दुसरीकडे इस्त्रो गगनयान या महत्वकांशी मोहिमेच्या तयारीला लागले आहेत. गगनयान मोहिमेद्वारे भारत पहिल्यांदा स्वबळावर आपला अंतराळवीर अवकाशात पाठवणार आहे.

✍२०२२ पर्यंत किंवा त्याआधी ही मोहिम यशस्वी करण्याचे लक्ष्य इस्त्रोने समोर ठेवले आहे. यासाठी वैमानिकांना प्रशिक्षण देणारे ‘ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटर’ही बंगळुरुमध्ये सुरु करणार आहे. या मोहिमेमध्ये अंतराळात जाण्यासाठी अंतराळवीर निवडण्याची जबाबदारी भारतीय वायू सेनेकडे देण्यात आली आहे. विशेष म्हणजे एकीकडे इस्त्रो  “चांद्रयान-२” चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवणार असतानाच वायू सेनेनेही गगनयान मोहिमेसाठी काही वैमानिकांची अंतराळात जाण्यासाठी निवड करत या मोहिमेच्या प्रत्यक्ष कामाचा श्रीगणेशा केला आहे.

✍डिसेंबर २०२० मध्ये मानविरहीत यान अवकाशात पाठवल्यानंतर जुलै २०२१ च्या आसपास मानवरहित यान गगनयान मोहिमेअंतर्गत अंतराळात पाठवण्यात येईल. या मोहिमेमध्ये अंतराळात पाठवण्यासाठी वायू सेनेने वैमानिकांच्या निवडीचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. गगनयान मोहिमेअंतर्गत अंतराळात जाणासाठी निवडण्यात आलेल्या पहिल्या तुकडीतील वैमानिकांच्या निवडीसंदर्भातील माहिती वायू सेनेने आपल्या ट्विटर अकाऊण्टवरुन दिली आहे.

✍‘भारतीय वायू सेनेने इन्सटीट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसीनमध्ये भारतीय अंतराळवीरांची निवड करण्याचा पहिला टप्पा पार पाडला आहे. निवड करण्यात आलेल्या वैमानिकांना कठोर अशा शारीरिक व्यायाम चाचण्या, प्रयोगशाळेतील चाचण्या, त्यांच्या हृदयाची तपासणी, वैद्यकीय तपासणी आणि वेगवेगळ्या स्तरांवरील मानसिक चाचण्या घेण्यात आल्या आहेत,’ असे वायू सेनेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

इस्रोचं नासाकडून कौतुक भविष्यात सोबत काम करण्याची तयारी.

✍चंद्राच्या जमिनीपासून अवघ्या काही अंतराच्या उंचीवर असताना चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरशी इस्रोचा संपर्क तुटला अन् त्याचसोबत कोट्यवधी भारतीयांच्या काळजाचा ठोकाही चुकला.

✍तसेच संपर्क तुटला असला तरीही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) चांद्रयान-2 मोहिमेचे आणि शास्त्रज्ञांच्या ध्येयवाद व चिकाटीचे जगभरातील अनेक देशांकडून, नागरिकांकडून कौतुक केले जात असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. अशातच जगातील सर्वोच्च अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’नेही इस्रोच्या या दैदिप्यमान कामगिरीची दखल घेतलीये.

✍“चांद्रयान मोहिमेचा तुमचा प्रवास आमच्यासाठी प्रेरणादायी आहे”, अशा शब्दांमध्ये नासाने इस्रोचं आणि भारतीय शास्त्रज्ञांचं कौतुक केलं आहे. याशिवाय भविष्यात अंतरळामध्ये संयुक्तरित्या काम करण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे.

✍तर दरम्यान, “चांद्रयान-2 मोहिमेची 95 टक्के उद्दिष्ट्ये साध्य झाली आहेत. लँडर चांद्रभूमीवर सुरक्षित उतरू शकले नाही, बाब गौण आहे,” अशी प्रतिक्रिया इस्रोचे माजी अध्यक्ष जी. माधवन नायर यांनी दिली आहे.

✍तर, इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला असला तरी पुढचे 14 दिवस विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल असे इस्रोचे प्रमुख के.सिवन यांनी स्पष्ट केले आहे.

गगनयानसाठी प्राथमिक निवड प्रक्रिया पूर्ण

🅾भारतीय व्यक्तीस अवकाशात पाठवण्याच्या गगनयान या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी अवकाशवीरांची निवड करण्याच्या प्रक्रियेचा पहिला टप्पा भारतीय हवाई दलाने पूर्ण केला असून त्यात टेस्ट पायलट  (वैमानिकां)ची निवड करण्यात आली आहे.

🅾या सर्व उमेदवारांच्या शारीरिक चाचण्या घेण्यात आल्या, रेडिओलॉजी चाचण्या, प्रयोगशाळेतील चाचण्या, वैद्यकीय चाचण्या, मानसिक चाचण्यांची पूर्तता करण्यात आल्याचे हवाई दलाने म्हटले आहे. प्राथमिक टप्प्यात २५ जणांची निवड केली असून यातून आणखी चाळण्या लावून २-३ संभाव्य अवकाशवीरांची निवड केली जाणार आहे.

🅾यासंदर्भात इस्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या मोहिमांत टेस्ट पायलटचीच निवड केली जाते असा जगातील समानव मोहिमांतील अनुभव आहे. यातून निवड केलेल्या व्यक्तींना नोव्हेंबरनंतर प्रशिक्षणासाठी रशियात पाठवले जाणार आहे.

मालदीवमध्ये चौथी ‘हिंद महासागर परिषद’ संपन्न


🎆 मालदीव या देशाची राजधानी माले या शहरात 3 आणि 4 सप्टेंबर 2019 रोजी ‘हिंद महासागर परिषद 2019’ पार पडली.  

🎆 "हिंद महासागर प्रदेश सुरक्षित करणे: पारंपारिक आणि पारंपारिक आव्हाने" या विषयाखाली ही परिषद भरविण्यात आली होती.

🎆 मालदीव सरकार आणि सिंगापूरचे एस. राजरत्नम स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने इंडिया फाउंडेशनतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

🎆 परिषदेत भारताच्यावतीने परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर उपस्थित होते.

            ⭕️ हिंद महासागर  ⭕️

🎆 भारतीय महासागर किंवा हिंद महासागर हा पृथ्वीवर असलेला तिसरा सर्वात मोठा महासागर आहे. हिंद महासागर भारताच्या दक्षिणेला आहे.  

🎆 हिंद महासागर आशियाच्या दक्षिण भागामध्ये आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान पसरलेला आहे.

🎆 हिंद महासागराचा बहुतेक भाग पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात येतो. त्याच्या उत्तरेला भारतीय उपमहाद्वीप, दक्षिणेला अंटार्टिका, पश्चिमेला आफ्रिका आणि पूर्वेकडे इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया आहे.

🎆 हा प्रदेश नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध असून वैश्विक जलवाहतुकीच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा आहे. येथे जागतिक पातळीवर 40% तेलाचे उत्पादन, मासेमारी सुमारे 15% होते. येथे अनेक महत्त्वाचे धातू आढळून येतात

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न


1) ‘हळद लागणे’ या वाक्प्रचाराचा पुढीलपैकी कोणत्या घटनेशी संबंध आहे?

   1) विवाह    2) बाळाचा जन्म    3) वैधव्य      4) गृहप्रवेश

उत्तर :- 1

2) पुढे दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. – ‘दुस-यावर उपकार करणारा.’

   1) परावलंबी    2) पुरोगामी    3) पराधीन    4) परोपकारी

उत्तर :- 4

3) व्याकरणाच्या नियमानुसार बरोबर शब्द कोणता ते लिहा.

   1) आकुंचन    2) आंकुचन    3) आकूंचन    4) अकुंचन

उत्तर :- 1

4) ‘श’, ‘ष’, ‘स’, ही .................. व्यंजने आहेत.

   1) अर्धश्वर    2) कठोर      3) घर्षक      4) मृदू

उत्तर :- 3

5) ‘यशोधन’ या शब्दाचा संधी प्रकार ओळखा.

   1) स्वरसंधी    2) व्यंजनसंधी    3) विसर्गसंधी    4) पूर्वरूपकसंधी

उत्तर :- 3

6) ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग, वचन, विभक्ती यानुसार कोणताही बदल घडून येत नाही, अशा शब्दांना ............. म्हणतात.

   1) अविकारी    2) विकारी    3) पद      4) यापैकी नाही

उत्तर :- 1

7) खालील शब्दांपैकी ‘भाववाचक नाम’ ओळखा.

   1) माधुर्य    2) फुले      3) हसवणारा    4) सुंदर

उत्तर :- 1

8) ‘आपण’ या सर्वनामाचा अर्थ जेव्हा ‘स्वत:’ असा होतो, तेव्हा ते ................. सर्वनाम असते.

   1) पुरुषवाचक    2) दर्शक      3) आत्मवाचक    4) प्रश्नार्थक

उत्तर :- 3

9) ‘रस्त्याच्या बाजूने काही मुले चालली होती’ या वाक्यात आलेल्या विशेषणाच्या बाबतीत पुढील कोणते विधान बरोबर आहे.

   1) हे गणनावाचक संख्याविशेषण आहे    2) हे क्रमवाचक संख्याविशेषण आहे
   3) हे पृथकत्ववाचक संख्याविशेषण आहे    4) हे अनिश्चितवाचक संख्याविशेषण आहे

उत्तर :- 4

10) खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही.

   1) पेरणे    2) उपरणे    3) वेचणे      4) उपणणे

उत्तर :- 2

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न


1) पुढील शब्दसमुहातील ध्वन्यार्थ ओळखा. – ‘हात कापून देणे’

   1) मदत करणे    2) लेखी करार करून घेणे   
   3) धीर सोडणे    4) हात आखडणे

उत्तर :- 2

2) वेगळा अर्थ असलेला शब्द निवडा.

   1) सदन    2) कानन      3) भुवन      4) भवन

उत्तर :- 2

3) खालील पर्यायी उत्तरांतील ‘विरुध्दार्थी शब्द’ असलेले पर्याय उत्तर कोणते ?

   अ) मित्र    I) रवी
   ब) अनुज    II) अग्रज
   क) आदित्य    III) सविता
   ड) भानू    IV) भास्कर

उत्तर :- 2

4) पुढील विधानाला जी म्हण योग्य असेल असा पर्याय ओळखा.

     काव्यगायनासाठी मित्राला नेल्यावर तो सारखा डुलक्या घेत होता, म्हणतात ना ....................

   1) पालथ्या घडयावर पाणी    2) गाढवाला गुळाची चव काय ?

   3) पिकते तेथे विकत नाही    4) दुष्काळात तेरावा महिना
उत्तर :- 2

5) ‘निवडणुकीसाठी उभे राहणे’ या वाक्प्रचार कोणत्या भाषेतून मराठीत आला ?

   1) इंग्रजी    2) संस्कृत    3) फ्रेंच      4) तुर्की

उत्तर :- 1

6) ‘सरदार व जमीनदार यांचे वर्चस्व असणारे राज्यशासन’ या शब्दसमूहाला खालील योग्य शब्द सांगा.

   1) सावकारशाही    2) राजेशाही   
   3) सामंतशाही      4) जमीनदारशाही

उत्तर :- 3

7) खालीलपैकी शुध्द शब्द कोणता ?

   1) आध्यात्मिक      2) अध्यात्मिक   
   3) आध्यात्मीक      4) अधात्मिक

उत्तर :- 1

8) मराठीत कोणता वर्ण स्वतंत्र मानला आहे ?

   1) क्      2) ण्     3) ळ      4) न्

उत्तर :- 3

9) पुनर् + जन्म हा कोणत्या संधीयुक्त शब्दाचा विग्रह आहे ?

   1) पुर्नजन्म    2) पूर्ण जन्म    3) पुनर्जन्म    4) पुनर्जम्न

उत्तर :- 3

10) अचूक विधाने निवडा.

   अ) शब्द आणि पद हे एकसारखेच आहे.
   ब) शब्दापासून पदे बनतात.
   क) पदापासून शब्द बनतात.

   1) फक्त अ अचूक  2) फक्त अ आणि क अचूक
   3) फक्त ब अचूक    4) फक्त क अचूक

उत्तर :- 3

मानव संसाधन विकास मंत्रालयाने IIT-मद्रास, IIT-खडगपूर सहित 5 विद्यापीठांना ‘प्रतिष्ठित संस्था’ दर्जा


केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने आयआयटी मद्रास, बनारस हिंदू विद्यापीठ, आयआयटी खडगपूर, दिल्ली विद्यापीठ आणि हैदराबाद विद्यापीठ या पाच सार्वजनिक विद्यापीठांना प्रतिष्ठित संस्था (IoE) म्हणून जाहीर करण्याचे आदेश जारी केले आहेत.

🎯मुख्य वैशिष्ट्ये :

• मानव संसाधन विकास मंत्रालयाने विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि सशक्त तज्ज्ञ समितीच्या सल्ल्यानुसार ही संस्था प्रतिष्ठित संस्था (आयओई) योजना राबविण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत.

🎯खाजगी विद्यापीठे :

• वर उल्लेखलेल्या सार्वजनिक विद्यापीठांव्यतिरिक्त, मानव संसाधन विकास मंत्रालयाने अमृता विश्वविद्यापीठम (तमिळनाडू), वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (तमिळनाडू), जामिया हमदर्द (नवी दिल्ली), कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी (ओडिशा), भारती इन्स्टिट्यूट, सत्य भारती फाउंडेशन (मोहाली) या 5 खाजगी विद्यापीठांना ‘प्रतिष्ठित संस्था’ दर्ज्यासाठी तयारी दाखविण्यासाठी हेतूपत्र पाठविले.

• या संस्थांना ‘प्रतिष्ठित संस्था’ म्हणून शैक्षणिक कामे सुरू करण्याची तयारी सादर करणे आवश्यक आहे.

💁‍♂‘प्रतिष्ठित संस्था’ दर्जा रद्द झालेली विद्यापीठे :

• ओपी जिंदल युनिव्हर्सिटी (हरियाणा) आणि शिव नादर युनिव्हर्सिटी (उत्तर प्रदेश) या दोन विद्यापीठांच्या संदर्भात राज्य सरकारला खासगी विद्यापीठे म्हणून राज्य विद्यापीठांचा दर्जा संपुष्टात आणण्यासाठी राज्य विधानसभेत कायदे करण्यासंदर्भात पत्रे देण्यात आले.

• राज्य विद्यापीठांविषयी, अण्णा विद्यापीठ (तामिळनाडू) आणि जाधवपूर विद्यापीठ (पश्चिम बंगाल) यांचीही राज्य सरकार आणि अधिकार समितीने निवड केली.

• त्यांना आयओई योजनेंतर्गत दिलेल्या योगदानाबद्दलची वचनबद्धता दर्शविण्यास सांगण्यात आले आहे.

नामांकित योजनेच्या संस्था बद्दल :

• स्व. अरुण जेटली यांनी 2016 च्या अर्थसंकल्पीय भाषणात जाहीर केल्याप्रमाणे उच्च शैक्षणिक संस्थांना जागतिक स्तरीय शिक्षण आणि संशोधन संस्था बनण्यास मदत करण्यासाठी केंद्र सरकारची वचनबद्धता राबविण्यासाठी हे सुरू केले गेले आहे.

• या योजनेंतर्गत 10 सार्वजनिक आणि 10 खासगी संस्था जागतिक स्तरीय शिक्षण व संशोधन संस्था म्हणून ओळखल्या जातील.

• त्यानुसार, विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सार्वजनिक संस्था आणि यूजीसी (विद्यापीठ म्हणून मान्यताप्राप्त संस्था) विद्यापीठांसाठी युजीसी (सरकारी शैक्षणिक संस्थांची घोषणा संस्था म्हणून प्रसिद्धी) मार्गदर्शक तत्त्वे, 7 सप्टेंबर, 2017 रोजी अधिसूचित केली आहेत.

• जागतिक स्तरावरील शिक्षण आणि संशोधन संस्था होण्यासाठी एचआयई सक्षम करण्यासाठी नियामक रचना प्रदान करणे. यामुळे सामान्य भारतीयांसाठी उच्च गुणवत्तेच्या शिक्षणाची सोय करण्याची क्षमता वाढेल.

✍पार्श्वभूमी :

• इन्स्टिट्यूट ऑफ एमिनेन्स (प्रतिष्ठित संस्था) योजनेंतर्गत पहिल्या फेरीत 6 संस्थांची IoE म्हणून निवड झाली :

(1) सार्वजनिक श्रेणी –

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी), बंगळुरू

मनिपाल उच्च शिक्षण अकादमी (एमएएचई), मनिपाल

भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), दिल्ली

(2) खाजगी श्रेणी –

बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्सेस (बीआयटीएस), पिलानी

भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), मुंबई

ग्रीनफिल्ड प्रकारांतर्गत जिओ इन्स्टिट्यूट

• सार्वजनिक संस्थांना आयओई घोषित केले गेले, तर खासगी संस्थांना लेटर ऑफ इंटेंट (एलओआय) देण्यात आले आहेत. आत्तापर्यंत, आयओई म्हणून 16 संस्था नामांकित आहेत, त्याखेरीज आणखी 4 संस्था जिथे राज्य सरकारची पुष्टीकरण आणि वचनबद्धतेची प्रतीक्षा आहे.

WEFच्या प्रवास व पर्यटन स्पर्धात्मकता निर्देशांकात भारत 34 व्या क्रमांकावर


जागतिक आर्थिक मंचाने (WEF) त्याचा ‘प्रवास व पर्यटन स्पर्धात्मकता अहवाल’ प्रसिद्ध केला आहे, ज्यात जागतिक पातळीवर पर्यटनासंबंधीची 140 देशांची क्षमता नमूद करण्यात आली आहे.

अहवालात प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘प्रवास व पर्यटन स्पर्धात्मकता निर्देशांक (TTCI) 2019’ या यादीत भारत आपल्या समृद्ध नैसर्गिक आणि सांस्कृतिक संसाधनांमुळे सहा जागांची उडी घेत 34 व्या क्रमांकावर आला आहे.

मुख्य बाबी👇👇👇

🔸भारत यादीतल्या अव्वल 35 देशांमध्ये असणारा एकमेव अल्प-मध्यम उत्पन्न असलेला देश आहे. हवाई पायाभूत सुविधा (33) आणि भू आणि बंदरे पायाभूत सुविधा (28), आंतरराष्ट्रीय मुक्तता (51), नैसर्गिक (14) आणि सांस्कृतिक संसाधने (8) या घटकांच्या बाबतीत भारताने चांगली प्रगती दर्शविलेली आहे.

🔸यादीत स्पेन हा देश अव्वल स्थानावर आहे. त्याच्यापाठोपाठ फ्रान्स, जर्मनी आणि जापान या देशांचा क्रमांक लागतो आहे.

🔸या वर्षीच्या क्रमवारीत आशिया-प्रशांत क्षेत्र प्रवास व पर्यटन स्पर्धात्मकता या बाबतीत सर्वाधिक वेगाने वाढणार्‍या क्षेत्रापैकी एक होता. जापान हे देश आशियातली सर्वाधिक स्पर्धात्मक प्रवास व पर्यटन अर्थव्यवस्था ठरली असून त्याचा जगभरात चौथा क्रमांक लागतो आहे.

WEF बाबत

जागतिक आर्थिक मंच (World Economic Forum) हे एक स्विस ना-नफा प्रतिष्ठान आहे. याचे संस्थापक क्लाउस श्वाब यांनी सन 1971 मध्ये युरोपियन मॅनेजमेंट फोरम या नावाने स्थापना केली. याचे मुख्यालय जिनेव्हा, स्वीत्झर्लंड येथे आहे. ही सार्वजनिक-खासगी सहकार्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून स्विस प्रशासनाकडून मान्य करण्यात आलेली आहे.

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...