Sunday, 8 September 2019

चालू घडामोडी वन लाइनर्स, 08 सप्टेंबर 2019.


✳ 08 सप्टेंबर: जागतिक साक्षरता दिन

✳ थीम 2019: "साक्षरता आणि बहुभाषिकता"

✳ 01 सप्टेंबर - 07 सप्टेंबर: राष्ट्रीय पोषण सप्ताह

✳ ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांचे निधन

✳ जल जीवन अभियानात पुढील वर्षात 3.5. Lakh लाख कोटी रुपये खर्च होणार आहेत

✳ गुवाहाटी, आसाममधील उत्तर-पूर्व परिषदेची बैठक

✳ यूएस ओपन 2019 मध्ये बी अँड्रिसकू वुमेन्स सिंगल विजेतेपद

✳ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तालिबान्यांशी शांतता चर्चा रद्द केली

✳ तामिळसाई सौंदराराजन तेलंगणाच्या राज्यपालपदी शपथ घेतली

✳ चंद्रयान 2 विक्रम लँडर स्थित: इसरो

✳ भारत, दक्षिण कोरिया संरक्षण सहकार्य वाढविण्यासाठी 2 सामंजस्य करार

✳ मुलांकडून YouTube डेटा सामायिक करण्यासाठी 170 डॉलर्स दंड देय द्या

✳ भारत-युएस संयुक्त सैन्य सराव 'युध्द अभियान' वॉशिंग्टनमध्ये सुरू झाला

✳ अफगाणिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद नबी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे

✳ बांगलादेशने महिला टी -20 विश्वचषक पात्रता विजेतेपद जिंकले

✳ अपघातग्रस्तांना मोफत उपचार देण्यासाठी ओडिशा

✳ यू19 एशिया कप 2019 मध्ये भारताने पाकिस्तानला 60 धावांनी पराभूत केले

✳ यू19 एशिया चषक 2019 च्या उपांत्य फेरीसाठी भारत पात्रता

✳ अफगाणिस्तानने यू 19 एशिया चषक 2019 च्या उपांत्य फेरीसाठी पात्रता दर्शविली

✳ संजीव शर्मा यांनी 2019-20 हंगामासाठी अरुणाचल प्रशिक्षक म्हणून नेमणूक केली

✳ रजनी शर्मा यांनी दिल्ली महिलांचा वरिष्ठ संघ प्रमुख प्रशिक्षक म्हणून नेमणूक केली

✳ प्रिन्स अब्दुलाझीझ बिन सलमान यांनी सौदीचे ऊर्जामंत्री म्हणून नियुक्ती केली

✳ ओडिया लेखक प्रदीप डॅश सरला पुरस्कार सह कॉन्फरन्स

✳ केरळचा सिफिया हनीफ कॉन्फरर्ड नीरजा भनोट पुरस्कार

✳ छत्तीसगड सरकार औद्योगिक क्षेत्रामधील जमीन वाटपाचे दर 30% कमी करेल

✳ ग्रँड स्वच्छ महोत्सव कार्यक्रम 2019 नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता

✳ पंतप्रधान मोदींनी मेक इन इंडिया इनिशिएटिव्ह अंतर्गत मुंबई मेट्रो कोच सुरू केले

✳ एशियन डेव्हलपमेंट बँक महाराष्ट्रात ग्रामीण रस्ते सुधारित करण्यासाठी 200 मी

✳ पहिली जम्मू व के गुंतवणूकदार समिट - 2019- लेहमध्ये आयोजित

✳ पहिली आयओटी इन मिनी पाईपड वॉटर स्कीम अमिंगगाव येथे सुरू झाली

✳ नवी दिल्लीत आयएएफ कमांडर्स कॉन्फरन्सन्स आयोजित करण्यात आले होते

✳ सहावा भारत-चीन सामरिक आर्थिक संवाद नवी दिल्ली येथे आयोजित

✳ शिक्षकांच्या क्षमता वाढविण्यासाठी सीबीएसई मायक्रोसॉफ्टशी करार करतो

✳ आयसीसीने जोनाथन हॉलची त्याची जनरल सल्लागार व कंपनी सचिव म्हणून नेमणूक केली

✳ चार्ल्स लेकलर इटालियन ग्रां प्री 2019 जिंकला

✳ चौथी हिंद महासागर परिषद 2019 माले, मालदीवमध्ये आयोजित.

MPSC QUESTIONS SET

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

*प्रश्न पहिला* #Set80
👑 *भारतातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते आहे*👑
अ) शिवसमुद्र ( कर्नाटक)💐

ब) मंडी (हिमाचलप्रदेश)

क) टाटा ( महाराष्ट्र)

ड) शिवसागर (महाराष्ट्र)

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

*प्रश्न दुसरा*
👑 *महाराष्ट्रातील कोणते ठिकाण दक्षिणची काशी म्हणून ओळखले जाते*👑

1) पैठण 💐

2) शिर्डी

3) माहुर

4) शेगाव

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

*प्रश्न तिसरा*
👑 *'आमचे तुरूंगातील 101 दिवस' हे पुस्तक कोणी लिहिले* 

1) आगरकर💐

2) न्या. रानडे

3) चिपळूणकर

4) टिळक

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

*प्रश्न चौथा*
👑 *काळकर्ते म्हणून कोणास ओळखले जाते*

1) गोविंद कुंटे

2) शिवराम महादेव परांजपे 💐

3) भाऊ महाजन

4) वि. स. आपटे

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

*प्रश्न पाचवा*
👑 *'स्त्री धर्म निती' हे पुस्तक कोणी लिहिले*

1) पंडीता रमाबाई 💐

2) मदर तेरेसा

3) अनुताई वाघ

4) सावित्रीबाई फुले

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

*प्रश्न सहावा*
👑 *मुर्तीजापूर येथे 'गोरक्षण' संस्था कोणी उभारली.*

1) विनोबा भावे

2) संत गाडगे महाराज 💐

3) धोंडो केशव कर्वे

4) कर्मवीर भाऊराव पाटील

5) शाहू महाराज

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

*प्रश्न सातवा*
👑 *ज्येष्ठ क्रांतीकारक भूपेंद्रनाथ दत्त हे कोणाचे बंधू होते*

1) स्वामी रामानंदतीर्थ

2) स्वामी विवेकानंद 💐

3) स्वामी दयानंद

4) स्वामी श्रध्दानंद

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

*प्रश्न आठवा*
👑 *' चले जाव ' किंवा        ' छोडो भारत ' आंदोलन सुरू झाले तेव्हा भारताचा व्हाईसराॅय कोण होता*

1) लाॅर्ड लिनलिथगो 💐

2) लाॅर्ड कर्झन

3) पेथिक लाॅरेन्स

4) लाॅर्ड माऊंटबॅटन

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
*प्रश्न नववा*
👑 *सरदार पटेल यांची तुलना कोणाशी केली जाते*

1) नेपोलिअन (फ्रान्स)

2) चर्चिल (इंग्लंड)

3) जोसेफ मॅझिनी (इटली)

4) बिस्मार्क (जर्मनी)💐

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

*प्रश्न दहावा*
👑 *' अ नेशन इन द मेकिंग ' या ग्रंथाचे कर्ते कोण*

1) व्योमेशचंद्र बॅनर्जी

2) सुरेंद्रनाथ बॅनर्जी💐

3) अरविंद घोष

4) सुभाषचंद्र बोस

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

प्रा. मुहम्मद युनुस यांना व्हॅटिकनचा 'लॅम्प ऑफ पीस ऑफ सेंट फ्रान्सिस' पुरस्कार ■


● बांग्लादेशाचे नोबेल पुरस्कार विजेते प्रा. मुहम्मद युनुस यांना व्हॅटिकनचा प्रतिष्ठित 'लॅम्प ऑफ पीस ऑफ सेंट फ्रान्सिस' पुरस्कार दिला गेला आहे.

● हा पुरस्कार सोहळा 3 सप्टेंबर 2019 रोजी इटलीमधील पापल बॅसिलिका ऑफ असिसी या ऐतिहासिक जागी झाला.

★ शांतता व सौहार्द प्रस्थापित करण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला गेला आहे.

❇️ 'लॅम्प ऑफ पीस ऑफ सेंट फ्रान्सिस' पुरस्कार :

▪️ लोकांमध्ये शांतता आणि संवाद वाढविण्याकरिता एखाद्या व्यक्तीने केलेल्या विशिष्ट कामासाठी हा पुरस्कार दिला जातो.

▪️'लॅम्प ऑफ पीस ऑफ सेंट फ्रान्सिस' पुरस्कार सर्वप्रथम 1981 साली पोलिश कामगार नेते लेच वालेसा यांना देण्यात आला होता.

▪️दलाई लामा, मिखाईल गोर्बाचेव्ह आणि अँजेला मर्केल हे इतर काही प्रतिष्ठित व्यक्ती आहेत ज्यांना यापूर्वी हा पुरस्कार मिळालेला आहे.

ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांचं निधन

◾️ज्येष्ठ वकील आणि माजी कायदामंत्री राम जेठमलानी यांचं रविवारी सकाळी निधन झालं.

◾️ते ९५ वर्षांचे होते. देशातील नामवंत वकील म्हणून जेठमलानी यांची ओळख होती. मागील दोन आठवड्यांपासून ते आजारी होते.

◾️नवी दिल्लीतील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

◾️जेठमलानी यांचा जन्म सध्या पाकिस्तानात असलेल्या बॉम्बे प्रातांतील सिंध विभागात १४ सप्टेंबर १९२३ रोजी झाला होता.

◾️वयाच्या १७व्या वर्षी जेठमलानी यांनी एलएल.बीची पदवी घेतली आणि वकिली सुरू केली.

◾️जेठमलानी यांचा जन्म सध्या पाकिस्तानात असलेल्या सिंध प्रातांतील शिखरापूर येथे १४ सप्टेंबर १९२३ रोजी झाला होता.

◾️फाळणीनंतर त्यांनी मुंबईत वकिलीला सुरूवात केली.

◾️१९५९ मध्ये लढलेल्या के.एम. नानावटी विरूद्ध महाराष्ट्र सरकार या खटल्याने जेठमलानी यांचं नाव चर्चेत आले.

◾️ हा खटला त्यांच्या आयुष्यातील पहिला महत्त्वाचा खटला होता. त्यानंतर २०११ मध्ये राम जेठमलानी यांनी राजीव गांधी हत्येतील आरोपींची बाजू मद्रास उच्च न्यायालयात मांडली होती.

◾️ याबरोबर इंदिरा गांधी यांच्या हत्येतील आरोपींची बाजू त्यांनी मांडली होती.

◾️स्टॉक मार्केट घोटाळ्यातील हर्षद मेहता व केतन पारेख यांचे वकील म्हणून त्यांनी काम केले.

◾️जेठमलानी यांनी संसदेवरील हल्ल्याप्रकरणातील आरोपी अफझल गुरू तसेच गुजरातमधील सोहराबुद्दीन चकमक प्रकरणात अमित शाह यांचा खटला लढवला होता.

◾️जेसिका लाल खून प्रकरणात मनू शर्मा यांची बाजू जेठमलानी मांडली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या बार

◾️असोसिएशनच्या अध्यक्षपदीही जेठमलानी यांची २०१०मध्ये निवड झाली आली होती.

◾️वकिलीबरोबर जेठमलानी यांनी केंद्रातही मंत्री म्हणून काम पाहिले.

◾️ माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात जेठमलानी यांनी कायदा मंत्री आणि नगरविकास मंत्री म्हणून काम केले होते.

रामनाथ कोविंद यांच्या विमानाला पाकच्या हवाई हद्दीत नाकारली परवानगी

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करु शकणार नाही. कोविंद यांच्या विमानाला पाकिस्तानातून उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आली आहे. भारताने केलेली विनंती पाकने फेटाळली आहे. तीन देशांच्या दौऱ्यावर जाणाऱ्या रामनाथ कोविंद यांच्या विमानाला पाकिस्तानातून उड्डाणाची परवानगी द्यावी यासाठी भारताने विनंती केली होती. पण पाकिस्तानने भारताची विनंती फेटाळून लावली आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी शनिवारी ही माहिती दिली. रामनाथ कोविंद सोमवारपासून आईसलँड, स्विर्त्झलँड आणि स्लोव्हेनियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भारतात घडलेल्या दहशतवादी घटनांसंदर्भात ते या देशाच्या प्रमुख नेतृत्वासोबत चर्चा करणार आहेत.

अमेरिकन टेनिस : 38 वर्षांच्या सेरेनाविरुद्ध 19 वर्षांची बियांका सरस

🎾अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या फायनलमध्ये 38 वर्षांच्या सेरेना विल्यम्सला कॅनडाची 19 वर्षांची बियांका आंद्रीस्क्यू भारी पडली.

🎾बियांकाने दोन सेटमध्येच 6-3, 7-5 असा विजय मिळविला.

🎾 दुसऱ्या सेटमध्ये 1-5 अशा पिछाडीवरून सेरेनाने सलग चार गेम जिंकले. त्यावेळी तिने आशा पल्लवित केल्या होत्या.

🎾मात्र 11व्या गेममध्ये काही फटके चुकल्यानंतरही बियांकाने सर्व्हिस राखली. त्यानंतर सेरेनाने एक बिनतोड सर्व्हिस करत एक चॅम्पियनशिप पॉईंट वाचवला, पण बियांकाने ऐतिहासिक सुवर्णसंधी निसटू दिली नाही.

🎾या पराभवामुळे सेरेनाची विश्वविक्रमाची बरोबरी करण्याची प्रतीक्षा लांबली आहे.

🎾ऑस्ट्रेलियाच्या मार्गारेट कोर्ट यांचा 24 ग्रॅंड स्लॅम विजेतेपदांचा उच्चांक आहे. सेरेना त्यापासून एकच करंडक दूर आहे.

🎾सेरेनाला गेल्या दोन मोसमांत विम्बल्डन आणि अमेरिकन या स्पर्धांच्या फायनलमध्ये पराभूत व्हावे लागले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

झिम्बाब्वे देशाचे पहिले पंतप्रधान आणि नंतर अध्यक्ष झालेले रॉबर्ट मुगाबे यांचे निधन



झिम्बाब्वे स्वतंत्र झाल्यानंतर त्या देशाचे पहिले पंतप्रधान आणि नंतर अध्यक्ष अशी रॉबर्ट मुगाबे यांची ओळख. त्यांनी लोकशाही व समेटाचे आश्वासन देऊन सत्ता हस्तगत केली; पण नंतर ते देशाच्या कुठल्याही अपेक्षा पूर्ण करू शकले नव्हते. त्यांच्या निधनाने झिम्बाब्वेतील ३७ वर्षांच्या दडपशाहीचा कालखंड पडद्याआड गेला आहे.

हरारेजवळच्या कुटामा मिशन येथे १९२४ साली कॅथलिक कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वयाच्या १७ व्या वर्षी ते शिक्षक झाले.

नंतर मार्क्‍सवादाकडे झुकलेल्या मुगाबेंनी द. आफ्रिकेतील फोर्ट हारे विद्यापीठातून शिक्षण घेतले. तिथे द. आफ्रिकेतील राष्ट्रवादी नेत्यांशी त्यांच्या भेटीगाठी झाल्या. त्यातून त्यांना प्रेरणा मिळाली.

घाना येथे अध्यापन करीत असताना मुगाबेंवर तिथले क्रांतिकारी नेते क्वामे एन्क्रुमाह यांचा प्रभाव पडला. नंतर ते ऱ्होडेशियात परतले आणि स्वातंत्र्यलढय़ात सहभागी झाले. दहा वर्षे तुरुंगवासात राहिले.

स्मार्ट सिटी क्रमवारीत गेल्या आठवडय़ात दुसऱ्या क्रमांकावर असलेले नागपूर शहर आता पहिल्या क्रमांकावर आले आहे.

👉अहमदाबाद दुसऱ्या स्थानावर आहे.

🎯नागपूर महापालिकेला‘बेस्ट सस्टेनेबल अ‍ॅण्ड लिव्हेबल’पुरस्कार

शाश्वत विकासाच्या दृष्टीने नागपूर महापालिकेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. याच उपक्रमाची दखल घेत महापालिकेला पाचव्या ‘अटल शास्त्र मार्केनॉमी’ पुरस्कार २०१९ या सोहळ्यामध्ये ‘बेस्ट सस्टेनेबल, लिव्हेबल, ग्रीन, क्लिन अ‍ॅण्ड इक्ल्यूझिव इन्फ्रा सिटी’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई येथील इंडियन र्मचट चेंबर येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात महापालिकेचा गौरव करण्यात आला. याच समारंभात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनाही सन्मानित करण्यात आले. बांगर यांना ‘मार्केनॉमी इन्फ्रा लिडरशीप अर्बन म्युनिसिपल इन्फ्रा अ‍ॅण्ड स्मार्ट सिटी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दोन्ही पुरस्कार स्वीकारले. सर्व संकल्पना, उपक्रमांची योग्य अंमलबजावणी करुन नागरिकांच्या जीवनात सुलभता आणण्यासाठी प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या महत्त्वपूर्ण कार्याचा हा सन्मान आहे, अशा शब्दांत महापौर नंदा जिचकार यांनी प्रशासनाच्या कार्याचे कौतुक केले.

सराव प्रश्नसंच

📍जागतिक जल दिन 2019 याचा विषय काय आहे?

A. लिव्हिंग नो वन बिहाइंड
B. नेचर फॉर वॉटर
C. व्हाय वेस्ट वॉटर?
D. बेटर वॉटर, बेटर जॉब्स
--------------------------------------------------------------

स्पष्टीकरण = (A) लिव्हिंग नो वन बिहाइंड

पाणी (जल) हा जीवनाचा स्त्रोत आहे. पाण्याचे महत्त्व टिकवून ठेवण्याकरिता दरवर्षी 22 मार्च रोजी जागतिक जल दिन (World Water Day) जगभरात पाळला जातो.

यावर्षी हा दिवस “लिव्हिंग नो वन बिहाइंड” या विषयाखाली पाळला गेला.
--------------------------------------------------------------

📍क्षयरोग हा कोणत्या प्रकाराचा आजार आहे?

A. कमतरतेसंबंधी रोग

B. संसर्गजन्य रोग

C. अनुवांशीक रोग

D. शरीर रचनेसंबंधीचा रोग

--------------------------------------------------------------

स्पष्टीकरण = (B) संसर्गजन्य रोग

क्षयरोग हा एक संसर्गजन्य रोग आहे.

क्षयरोग हा ‘मायकोबॅक्‍टेरियम टयुबरक्‍युलॉसिस’ नावाच्‍या जीवाणूंमुळे होणारा आजार आहे.

तो मुख्‍यत्‍वे करुन फुफुसाचा आजार आहे. शरीराच्‍या इतर अवयावांनाही (उदा. मज्जासंस्‍था, रक्‍ताभिसरण संस्‍था, त्‍वचा, हाडे इ.) तो होवू शकतो.

क्षयरोग कोणत्‍याही वयाच्‍या व्‍यक्‍तीला होऊ शकतो. क्षयरोग हा अनुवंशिक आजार नाही.
--------------------------------------------------------------

📍गोलन हाईट या प्रदेशावर ...... चे सार्वभौमत्व मान्य करण्याची अमेरिकेची योजना आहे.

A. सुदान

B. युगांडा

C. इस्राएल

D. पॅलेस्टाईन

--------------------------------------------------------------
स्पष्टीकरण =(C) इस्राएल

राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडलेला प्रस्ताव अमेरिकेच्या संसदेनी मंजूर करीत गोलन हाईट या विवादीत प्रदेशावर इस्राएलचे सार्वभौमत्व मान्य केले.

गोलन हाईट हे मोठे खडकाळ पठार असून ते सिरियाच्या नैऋत्य दिशेला आहे.

हा मध्य पूर्व प्रदेशातल्या लेवेंतमधील एक विवादित क्षेत्र आहे, हा भाग जवळपास 1,800 चौ. किलोमीटरच्या क्षेत्रात पसरलेला आहे.
--------------------------------------------------------------

📍कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून दरवर्षी ‘जागतिक आनंद अहवाल’ प्रसिद्ध केला जातो?

A.   संयुक्त राष्ट्रसंघ

B.   जागतिक बँक

C.   जागतिक आर्थिक मंच

D.   आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

--------------------------------------------------------------
स्पष्टीकरण = (A) संयुक्त राष्ट्रसंघ

संयुक्त राष्ट्रसंघाकडून ‘जागतिक आनंद अहवाल 2019’ प्रसिद्ध करण्यात आला आहे.

सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, देशाचे उच्च सकल स्थानिक उत्पन्न (GDP) असले तरी आणि दरडोई उत्पन्न जास्त असले तरीही ते सर्वाधिक आनंदी देश नाहीत.

लोकांचा आनंदीपणा देशातले कायदे आणि नियमांशी निगडीत आहे.

--------------------------------------------------------------

📍‘जागतिक आनंद अहवाल 2019’ यामध्ये भारताचा कोणता क्रमांक आहे?

A.   140

B.   99

C.   97

D.   130

--------------------------------------------------------------

स्पष्टीकरण = (A) 140

संयुक्त राष्ट्रसंघाकडून ‘जागतिक आनंद अहवाल 2019’ प्रसिद्ध करण्यात आला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी भारत सात स्थानांनी खाली घसरत 140 व्या क्रमांकावर आहे.
--------------------------------------------------------------

📍कोणत्या मध्य आशियाई देशाच्या राजधानीचे नाव बदलून ‘नुरसुलतान’ असे ठेवण्यात आले आहे?

A.   कझाकीस्तान

B.   किर्गिझस्तान

C.   ताजिकीस्तान

D.   तुर्कमेनिस्तान

--------------------------------------------------------------

स्पष्टीकरण = (A) कझाकीस्तान

कझाकीस्तानचे राजधानी शहर असलेल्या ‘अस्ताना’ याचे नाव बदलून ‘नुरसुलतान’ असे नामकरण करण्यात आले आहे.

‘नुरसुलतान’ या शब्दाचा अर्थ कझाक भाषेत "प्रकाशाचा राजा" असा होतो.

अंतरिम राष्ट्रपती कासीम-जोमर्त तोकाएव्ह यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी संसदेत मांडलेल्या प्रस्तावाला काही तासाभरातच मंजूर करण्यात आले.