०८ सप्टेंबर २०१९

ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांचं निधन

◾️ज्येष्ठ वकील आणि माजी कायदामंत्री राम जेठमलानी यांचं रविवारी सकाळी निधन झालं.

◾️ते ९५ वर्षांचे होते. देशातील नामवंत वकील म्हणून जेठमलानी यांची ओळख होती. मागील दोन आठवड्यांपासून ते आजारी होते.

◾️नवी दिल्लीतील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

◾️जेठमलानी यांचा जन्म सध्या पाकिस्तानात असलेल्या बॉम्बे प्रातांतील सिंध विभागात १४ सप्टेंबर १९२३ रोजी झाला होता.

◾️वयाच्या १७व्या वर्षी जेठमलानी यांनी एलएल.बीची पदवी घेतली आणि वकिली सुरू केली.

◾️जेठमलानी यांचा जन्म सध्या पाकिस्तानात असलेल्या सिंध प्रातांतील शिखरापूर येथे १४ सप्टेंबर १९२३ रोजी झाला होता.

◾️फाळणीनंतर त्यांनी मुंबईत वकिलीला सुरूवात केली.

◾️१९५९ मध्ये लढलेल्या के.एम. नानावटी विरूद्ध महाराष्ट्र सरकार या खटल्याने जेठमलानी यांचं नाव चर्चेत आले.

◾️ हा खटला त्यांच्या आयुष्यातील पहिला महत्त्वाचा खटला होता. त्यानंतर २०११ मध्ये राम जेठमलानी यांनी राजीव गांधी हत्येतील आरोपींची बाजू मद्रास उच्च न्यायालयात मांडली होती.

◾️ याबरोबर इंदिरा गांधी यांच्या हत्येतील आरोपींची बाजू त्यांनी मांडली होती.

◾️स्टॉक मार्केट घोटाळ्यातील हर्षद मेहता व केतन पारेख यांचे वकील म्हणून त्यांनी काम केले.

◾️जेठमलानी यांनी संसदेवरील हल्ल्याप्रकरणातील आरोपी अफझल गुरू तसेच गुजरातमधील सोहराबुद्दीन चकमक प्रकरणात अमित शाह यांचा खटला लढवला होता.

◾️जेसिका लाल खून प्रकरणात मनू शर्मा यांची बाजू जेठमलानी मांडली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या बार

◾️असोसिएशनच्या अध्यक्षपदीही जेठमलानी यांची २०१०मध्ये निवड झाली आली होती.

◾️वकिलीबरोबर जेठमलानी यांनी केंद्रातही मंत्री म्हणून काम पाहिले.

◾️ माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात जेठमलानी यांनी कायदा मंत्री आणि नगरविकास मंत्री म्हणून काम केले होते.

रामनाथ कोविंद यांच्या विमानाला पाकच्या हवाई हद्दीत नाकारली परवानगी

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करु शकणार नाही. कोविंद यांच्या विमानाला पाकिस्तानातून उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आली आहे. भारताने केलेली विनंती पाकने फेटाळली आहे. तीन देशांच्या दौऱ्यावर जाणाऱ्या रामनाथ कोविंद यांच्या विमानाला पाकिस्तानातून उड्डाणाची परवानगी द्यावी यासाठी भारताने विनंती केली होती. पण पाकिस्तानने भारताची विनंती फेटाळून लावली आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी शनिवारी ही माहिती दिली. रामनाथ कोविंद सोमवारपासून आईसलँड, स्विर्त्झलँड आणि स्लोव्हेनियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भारतात घडलेल्या दहशतवादी घटनांसंदर्भात ते या देशाच्या प्रमुख नेतृत्वासोबत चर्चा करणार आहेत.

अमेरिकन टेनिस : 38 वर्षांच्या सेरेनाविरुद्ध 19 वर्षांची बियांका सरस

🎾अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या फायनलमध्ये 38 वर्षांच्या सेरेना विल्यम्सला कॅनडाची 19 वर्षांची बियांका आंद्रीस्क्यू भारी पडली.

🎾बियांकाने दोन सेटमध्येच 6-3, 7-5 असा विजय मिळविला.

🎾 दुसऱ्या सेटमध्ये 1-5 अशा पिछाडीवरून सेरेनाने सलग चार गेम जिंकले. त्यावेळी तिने आशा पल्लवित केल्या होत्या.

🎾मात्र 11व्या गेममध्ये काही फटके चुकल्यानंतरही बियांकाने सर्व्हिस राखली. त्यानंतर सेरेनाने एक बिनतोड सर्व्हिस करत एक चॅम्पियनशिप पॉईंट वाचवला, पण बियांकाने ऐतिहासिक सुवर्णसंधी निसटू दिली नाही.

🎾या पराभवामुळे सेरेनाची विश्वविक्रमाची बरोबरी करण्याची प्रतीक्षा लांबली आहे.

🎾ऑस्ट्रेलियाच्या मार्गारेट कोर्ट यांचा 24 ग्रॅंड स्लॅम विजेतेपदांचा उच्चांक आहे. सेरेना त्यापासून एकच करंडक दूर आहे.

🎾सेरेनाला गेल्या दोन मोसमांत विम्बल्डन आणि अमेरिकन या स्पर्धांच्या फायनलमध्ये पराभूत व्हावे लागले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

झिम्बाब्वे देशाचे पहिले पंतप्रधान आणि नंतर अध्यक्ष झालेले रॉबर्ट मुगाबे यांचे निधन



झिम्बाब्वे स्वतंत्र झाल्यानंतर त्या देशाचे पहिले पंतप्रधान आणि नंतर अध्यक्ष अशी रॉबर्ट मुगाबे यांची ओळख. त्यांनी लोकशाही व समेटाचे आश्वासन देऊन सत्ता हस्तगत केली; पण नंतर ते देशाच्या कुठल्याही अपेक्षा पूर्ण करू शकले नव्हते. त्यांच्या निधनाने झिम्बाब्वेतील ३७ वर्षांच्या दडपशाहीचा कालखंड पडद्याआड गेला आहे.

हरारेजवळच्या कुटामा मिशन येथे १९२४ साली कॅथलिक कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वयाच्या १७ व्या वर्षी ते शिक्षक झाले.

नंतर मार्क्‍सवादाकडे झुकलेल्या मुगाबेंनी द. आफ्रिकेतील फोर्ट हारे विद्यापीठातून शिक्षण घेतले. तिथे द. आफ्रिकेतील राष्ट्रवादी नेत्यांशी त्यांच्या भेटीगाठी झाल्या. त्यातून त्यांना प्रेरणा मिळाली.

घाना येथे अध्यापन करीत असताना मुगाबेंवर तिथले क्रांतिकारी नेते क्वामे एन्क्रुमाह यांचा प्रभाव पडला. नंतर ते ऱ्होडेशियात परतले आणि स्वातंत्र्यलढय़ात सहभागी झाले. दहा वर्षे तुरुंगवासात राहिले.

स्मार्ट सिटी क्रमवारीत गेल्या आठवडय़ात दुसऱ्या क्रमांकावर असलेले नागपूर शहर आता पहिल्या क्रमांकावर आले आहे.

👉अहमदाबाद दुसऱ्या स्थानावर आहे.

🎯नागपूर महापालिकेला‘बेस्ट सस्टेनेबल अ‍ॅण्ड लिव्हेबल’पुरस्कार

शाश्वत विकासाच्या दृष्टीने नागपूर महापालिकेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. याच उपक्रमाची दखल घेत महापालिकेला पाचव्या ‘अटल शास्त्र मार्केनॉमी’ पुरस्कार २०१९ या सोहळ्यामध्ये ‘बेस्ट सस्टेनेबल, लिव्हेबल, ग्रीन, क्लिन अ‍ॅण्ड इक्ल्यूझिव इन्फ्रा सिटी’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई येथील इंडियन र्मचट चेंबर येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात महापालिकेचा गौरव करण्यात आला. याच समारंभात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनाही सन्मानित करण्यात आले. बांगर यांना ‘मार्केनॉमी इन्फ्रा लिडरशीप अर्बन म्युनिसिपल इन्फ्रा अ‍ॅण्ड स्मार्ट सिटी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दोन्ही पुरस्कार स्वीकारले. सर्व संकल्पना, उपक्रमांची योग्य अंमलबजावणी करुन नागरिकांच्या जीवनात सुलभता आणण्यासाठी प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या महत्त्वपूर्ण कार्याचा हा सन्मान आहे, अशा शब्दांत महापौर नंदा जिचकार यांनी प्रशासनाच्या कार्याचे कौतुक केले.

सराव प्रश्नसंच

📍जागतिक जल दिन 2019 याचा विषय काय आहे?

A. लिव्हिंग नो वन बिहाइंड
B. नेचर फॉर वॉटर
C. व्हाय वेस्ट वॉटर?
D. बेटर वॉटर, बेटर जॉब्स
--------------------------------------------------------------

स्पष्टीकरण = (A) लिव्हिंग नो वन बिहाइंड

पाणी (जल) हा जीवनाचा स्त्रोत आहे. पाण्याचे महत्त्व टिकवून ठेवण्याकरिता दरवर्षी 22 मार्च रोजी जागतिक जल दिन (World Water Day) जगभरात पाळला जातो.

यावर्षी हा दिवस “लिव्हिंग नो वन बिहाइंड” या विषयाखाली पाळला गेला.
--------------------------------------------------------------

📍क्षयरोग हा कोणत्या प्रकाराचा आजार आहे?

A. कमतरतेसंबंधी रोग

B. संसर्गजन्य रोग

C. अनुवांशीक रोग

D. शरीर रचनेसंबंधीचा रोग

--------------------------------------------------------------

स्पष्टीकरण = (B) संसर्गजन्य रोग

क्षयरोग हा एक संसर्गजन्य रोग आहे.

क्षयरोग हा ‘मायकोबॅक्‍टेरियम टयुबरक्‍युलॉसिस’ नावाच्‍या जीवाणूंमुळे होणारा आजार आहे.

तो मुख्‍यत्‍वे करुन फुफुसाचा आजार आहे. शरीराच्‍या इतर अवयावांनाही (उदा. मज्जासंस्‍था, रक्‍ताभिसरण संस्‍था, त्‍वचा, हाडे इ.) तो होवू शकतो.

क्षयरोग कोणत्‍याही वयाच्‍या व्‍यक्‍तीला होऊ शकतो. क्षयरोग हा अनुवंशिक आजार नाही.
--------------------------------------------------------------

📍गोलन हाईट या प्रदेशावर ...... चे सार्वभौमत्व मान्य करण्याची अमेरिकेची योजना आहे.

A. सुदान

B. युगांडा

C. इस्राएल

D. पॅलेस्टाईन

--------------------------------------------------------------
स्पष्टीकरण =(C) इस्राएल

राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडलेला प्रस्ताव अमेरिकेच्या संसदेनी मंजूर करीत गोलन हाईट या विवादीत प्रदेशावर इस्राएलचे सार्वभौमत्व मान्य केले.

गोलन हाईट हे मोठे खडकाळ पठार असून ते सिरियाच्या नैऋत्य दिशेला आहे.

हा मध्य पूर्व प्रदेशातल्या लेवेंतमधील एक विवादित क्षेत्र आहे, हा भाग जवळपास 1,800 चौ. किलोमीटरच्या क्षेत्रात पसरलेला आहे.
--------------------------------------------------------------

📍कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून दरवर्षी ‘जागतिक आनंद अहवाल’ प्रसिद्ध केला जातो?

A.   संयुक्त राष्ट्रसंघ

B.   जागतिक बँक

C.   जागतिक आर्थिक मंच

D.   आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

--------------------------------------------------------------
स्पष्टीकरण = (A) संयुक्त राष्ट्रसंघ

संयुक्त राष्ट्रसंघाकडून ‘जागतिक आनंद अहवाल 2019’ प्रसिद्ध करण्यात आला आहे.

सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, देशाचे उच्च सकल स्थानिक उत्पन्न (GDP) असले तरी आणि दरडोई उत्पन्न जास्त असले तरीही ते सर्वाधिक आनंदी देश नाहीत.

लोकांचा आनंदीपणा देशातले कायदे आणि नियमांशी निगडीत आहे.

--------------------------------------------------------------

📍‘जागतिक आनंद अहवाल 2019’ यामध्ये भारताचा कोणता क्रमांक आहे?

A.   140

B.   99

C.   97

D.   130

--------------------------------------------------------------

स्पष्टीकरण = (A) 140

संयुक्त राष्ट्रसंघाकडून ‘जागतिक आनंद अहवाल 2019’ प्रसिद्ध करण्यात आला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी भारत सात स्थानांनी खाली घसरत 140 व्या क्रमांकावर आहे.
--------------------------------------------------------------

📍कोणत्या मध्य आशियाई देशाच्या राजधानीचे नाव बदलून ‘नुरसुलतान’ असे ठेवण्यात आले आहे?

A.   कझाकीस्तान

B.   किर्गिझस्तान

C.   ताजिकीस्तान

D.   तुर्कमेनिस्तान

--------------------------------------------------------------

स्पष्टीकरण = (A) कझाकीस्तान

कझाकीस्तानचे राजधानी शहर असलेल्या ‘अस्ताना’ याचे नाव बदलून ‘नुरसुलतान’ असे नामकरण करण्यात आले आहे.

‘नुरसुलतान’ या शब्दाचा अर्थ कझाक भाषेत "प्रकाशाचा राजा" असा होतो.

अंतरिम राष्ट्रपती कासीम-जोमर्त तोकाएव्ह यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी संसदेत मांडलेल्या प्रस्तावाला काही तासाभरातच मंजूर करण्यात आले.

तिसरे अफगाण युद्ध : (१९१९).

● पहिल्या दोन युद्धांत इंग्रजांनी अफगाणिस्तानावर स्वारी केली होती. तिसऱ्या वेळी मात्र अफगाणिस्तानने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले.

● अमीर अमानुल्ला  याने अफगाण लोकांच्या दडपणामुळे १९१९ च्या एप्रिल महिन्यात ब्रिटिश प्रदेशावर आक्रमण केले.
हे युद्ध फक्त दोनच महिने चालू होते.

● अफगाण लोकांनी खैबर खिंडीतून पेशावरच्या परिसरात हल्ले केले. इंग्रजांनी विमानासारख्या आधुनिक साधनांचा वापर केल्यामुळे ते यशस्वी झाले.

● १९१९ च्या नोव्हेंबर महिन्यात तह झाला. अफगाणिस्तानला परराष्ट्रीय धोरणाच्या बाबतीत स्वातंत्र्य मिळाले.

● इंग्रजांकडून अमीराला मिळणारे आर्थिक साहाय्य बंद झाले. या युद्धानंतर इंग्रज अफगाण संबंध सुधारले.

पहिले अफगाण युद्ध : (१८३८–१८४२).

● अफगाणिस्तानातून रशिया हिंदुस्थानावर स्वारी करील, अशी धास्ती इंग्रजांना वाटत होती.

● त्यातून इराणच्या शाहाने रशियाच्या मदतीने अफगाणिस्तानातील हेरातला १८३७ मध्ये वेढा दिल्यामुळे इंग्रजांना रशियाचे आक्रमण होणार, याची खात्री वाटली व त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न चालू केले.

● याच सुमारास रणजितसिंगाने घेतलेला पेशावर प्रांत परत जिंकून घेण्यासाठी अफगाणिस्तानच्या दोस्त महंमदाने इंग्रजांकडे मदत मागितली. इंग्रजांनी नकार दिल्यामुळे दोस्त महंमद रशियाकडे गेला.

● आपल्या वर्चस्वाखाली राहील असा अमीर अफगाणिस्तानात असावा, म्हणून गव्हर्नर जनरल ऑक्लंडने रणजितसिंग व शाह शुजा यांबरोबर त्रिपक्षीय तह करुन शाह शुजाला अफगाणिस्तानचे अमीरपद देण्याचे ठरविले.

● दरम्यान १८३८ मध्ये हेरातचा वेढा उठला होता. तरीही ऑक्लंडने शाह शुजाला गादीवर बसविण्यासाठी सर जॉन किन व सर कॉटन यांना सैन्य देऊन काबूलास रवाना केले.

● सिंधच्या अमीराचा विरोध असतानाही इंग्रज सैन्याची एक तुकडी फिरोझपूरहून सिंध, बोलन खिंड, बलुचिस्तान या मार्गाने कंदाहार येथे पोहचली.

● शाह शुजाचा मुलगा तैमूर याच्या नेतृत्वाखाली शीख सैनिक व इंग्रज अधिकारी वॉड यांची दुसरी तुकडी पंजाब, पेशावर, खैबरखिंड या मार्गाने कंदाहारला पोहोचली.

● इंग्रजांनी १८३९ च्या एप्रिल महिन्यात कंदाहार, जुलैत गझनी आणि ऑगस्टमध्ये काबूल घेतले. दोस्त महंमद बूखाऱ्याला पळाला. त्यानंतर इंग्रजांनी त्याला कलकत्त्यात कैदेत ठेवले.

● इंग्रजांनी शाह शुजाला गादीवर बसवून त्याच्या संरक्षणासाठी तेथे फौज ठेवली. त्यामुळे अफगाण चिडले.

● दोस्त महंमदाचा मुलगा अकबरखान याने बंड करून १८४१ मध्ये बर्न्स, मॅकनॉटन व इतर अधिकारी यांचे खून केले.

● त्यानंतर मेजर हेन्री पॉटिंजर आला. त्याने पूर्वी झालेला तह अंमलात आणून जलालाबाद, गझनी व कंदाहार ही स्थळे सोडून देण्याचे ठरविले. परत जाणाऱ्या इंग्रजांची अफगाणांनी खैबर खिंडीत कत्तल केली. बाहेरूनही मदत मिळण्यास इंग्रजांना अडचण पडू लागली.

● गव्हर्नर जनरल नॉर्थब्रुकने सैनिकांना माघार घेण्यास सांगितले. अखेरीस खजिना व तोफा अफगाणांच्या स्वाधीन करून इंग्रजांनी माघार घेतली.

● या युद्धामुळे इंग्रजांचा काहीच फायदा झाला नाही. ज्या शाह शुजासाठी इंग्रजांनी अफगाणिस्तानात सैन्य पाठविले, त्याचाच अफगाणांनी खून केला.

● ऑक्लंडच्या आक्रमक धोरणामुळे निष्कारण पैसा खर्च होऊन २०,००० लोक मृत्युमुखी पडले.

दुसरे अफगाण युद्ध : (१८७५–१८७९).

● इंग्लंड व रशिया यांत अफगाणिस्तानात आपापले वर्चस्व स्थापन करण्याची स्पर्धा होती. यातूनच दुसरे अफगाण युद्ध उद्भवले.

● वारसाहक्काच्या भांडणाचा निकाल लागून १८६८ मध्ये शेरअली हा अमीर झाला.

● रशियाचे मध्य आशियात वर्चस्व वाढल्यामुळे शेरअलीने इंग्रजांकडे मदत मागितली परंतु इंग्रजांच्या धरसोडीमुळे त्याने रशियाबरोबर मैत्रीची याचना केली.

● रशियाचा वकील काबूलला जाताच गव्हर्नर जनरल लॉर्ड लिटनने शेरअलीस आपलाही वकील काबूल येथे ठेवून घेण्याचा आग्रह धरला.

● शेरअलीने ही विनंती नाकारताच गव्हर्नर जनरल लॉर्ड लिटनने त्याविरुद्ध युद्ध पुकारले.

● जनरल रॉबर्ट, जनरल स्ट्यूअर्ट व सॅम ब्राउन हे खैबर खिंडीतून अफगाणिस्तानात पोहोचले.

● इंग्रजांनी कंदाहार घेताच शेरअली रशियाच्या हद्दीत पळाला. त्याचा मुलगा याकूबखान याने इंग्रजांबरोबर १८७९ मध्ये गंदमक येथे तह केला.

● या तहानुसार इंग्रज वकील काबूल येथे रहावयाचा होता. कुर्रम, पिशी आणि तिवी ही ठिकाणे इंग्रजांच्या ताब्यात आली.

● अफगाणांना हा तह मान्य नसल्यामुळे त्यांनी काही इंग्रज अधिकाऱ्यांचे खून केले व याकूबखानला कैद केले. त्याचा भाऊ अयूबखान याने बंड करुन इंग्रज फौजेचा मैवंद येथे पराभव केला.

● शेवटी गव्हर्नर जनरल रिपनने शेरअलीचा पुतण्या अब्दुर रहमान याच्याशी तह करुन दुसरे अफगाण युद्ध थांबविले.

● इंग्रजांनी अमीराकडून खंडणी घेऊन गंमडकच्या तहाने सोडलेला प्रदेश परत मिळविला.

● या युद्धामुळे इंग्रजांचे वर्चस्व अफगाणिस्तानात स्थापन होऊन रशियाच्या आक्रमक धोरणाला पायबंद बसला.

पुढचे १४ दिवस विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल – इस्रो प्रमुख

📌चंद्रावर लँडिंगच्या अंतिम टप्प्यामध्ये असताना विक्रम लँडरचा इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला

📌 तरी पुढचे १४ दिवस विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल असे इस्रोचे प्रमुख के.सिवन यांनी शनिवारी सांगितले.

📌लँडर बरोबर जो संपर्क तुटला त्यासाठी मिशनच्या शेवटच्या टप्प्यात चुकीच्या पद्धतीने झालेली अंमलबजावणी जबाबदार असल्याचे सिवन म्हणाले.

📌विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किलोमीटर अंतरावर असताना संपर्क तुटला. शेवटच्या टप्प्यात योग्य पद्धतीने प्रक्रिया पार पडली नाही.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मद्रास हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीश विजया के. ताहिलरमानी यांनी बदलीविरोधात राजीनामा दिला.


✍सुप्रीम कोर्टाच्या कॉलिजीअमने त्यांची बदली मेघालय उच्च न्यायालयात केली होती. त्याच्याविरोधात विजया ताहिलरमानी यांना आपला राजीनामा राष्ट्रपती कोविंद यांच्याकडे पाठवला. राजीनाम्याची एक प्रत सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्याकडे पाठवण्यात आली आहे.

✍न्या. ताहिलरमानी यांची २६ जून २००१ मध्ये मु्ंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमणूक करण्यात आली होती. तर, १२ ऑगस्ट २००८ रोजी मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी त्यांची नेमणूक करण्यात आली होती. न्या. ताहिलरमानी या २ ऑक्टोबर २०२०मध्ये निवृत्त होणार आहेत. मात्र, वर्षभरापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला. न्या. ताहिलरमानी आणि न्या. गीता मित्तल या देशातील २५ उच्च न्यायालयात या दोन महिला मुख्य न्यायाधीशपदी आहेत.

✍सरन्यायाधीश रंजन गोगई यांच्या अध्यक्षतेखालील कॉलेजिअममध्ये न्या. एस.ए. बोबडे, एन.व्ही. रमना, अरुण मिश्रा आणि आर.एफ. नरीमन यांचा समावेश होता. मेघालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. ए.के. मित्तल यांची बदली मद्रास हायकोर्टात करण्यात आली.

ISSF World Cup 2019: विजेते

- Elavenil Valarivan
सुवर्ण पदक: महिला 10 मी रायफल

- अभिषेक वर्मा
सुवर्ण पदक: पुरूष 10 मी पिस्तूल

- मनू भाकर आणि सौरभ चौधरी
सुवर्ण पदक: संयुक्त 10 मी पिस्तूल

- यशस्वीनी देसवाल आणि अभिषेक वर्मा
रौप्य पदक: संयुक्त 10 मी पिस्तूल

- अंजूम मुदगल आणि दिव्यांश पनवर
कांस्य पदक: संयुक्त 10 मी रायफल

- अपूर्वी चंडेला आणि दिपक कुमार
सुवर्ण पदक: संयुक्त 10 मी रायफल

- यशस्वीनी सिंग देसवाल
सुवर्ण पदक: महिला 10 मी पिस्तूल

- संजीव राजपूत
रौप्य पदक: पुरूष 50 मी रायफल 3 Position

- सौरभ चौधरी
कांस्य पदक: पुरूष 10 मी पिस्तूल

वाहतुकीचे नवे नियम त्वरित लागू न करण्याचा पंजाब सरकारचा निर्णय

रस्त्यावरील अपघाती मृत्यू रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरामध्ये 1 सप्टेंबरपासून नवीन मोटार वाहन कायदा लागू केला आहे. नव्या वाहतूक नियमांचा भंग केल्यास वाहनधारकांना अधिक दंड भरावा लागत आहे.

त्यामुळे 5 सप्टेंबर 2019 रोजी पंजाब राज्याने नवीन मोटार वाहन नियम त्वरित लागू न करण्याचा निर्णय घेतला. पंजाबसहित इतरही काही राज्यांनी असा निर्णय घेतला आहे, ज्यात राजस्थान, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, तेलंगणा, ओडिशा आणि गुजरात या राज्यांचा समावेश आहे. दिल्लीने देखील अद्याप नवे नियम अधिसूचित केले नाहीत.

नवे नियम
नव्या मोटार वाहतूक कायद्यातल्या 63 तरतुदी लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारने अधिसूचना काढली आहे. संसदेच्या दोन्ही सदनात मोटार वाहतूक दुरुस्ती विधेयक संमत करण्यात आले होते. वाहतूक नियमांचा भंग केल्यास आकारला जाणारा दंड आता भरघोस वाढवण्यात आला आहे. यात कमीत कमी म्हणजे 500 रु.पये दंड हा रस्ते नियम तोडण्यासाठी असून जास्तीत जास्त म्हणजे 25 हजार रु.पये दंड आहे तसेच अल्पवयीन मुला-मुलीने वाहन चालवून गुन्हा केल्यास मालक वा पालकाला तीन वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे.

🔸रस्ते नियमांचा भंग – जुना दंड: 100 रु., नवीन दंड 500 रु.

🔸प्रशासनाचा आदेशभंग - जुना दंड 500 रु., नवीन दंड 2000 रु.

🔸परवाना नसलेले वाहन चालवणे – जुना दंड: 500 रु., नवीन दंड: 5000 रु.

🔸पात्र नसताना वाहन चालवणे - जुना दंड: 500 रु., नवीन दंड: 10000 रु.

🔸वेगमर्यादा तोडणे – जुना दंड: 400 रु., नवीन दंड: 2000 रु.

🔸धोकादायक वाहन चालवणे - जुना दंड: 1000 रु., नवीन दंड: 5000 रु.

🔸दारू पिऊन वाहन चालवणे – जुना दंड: 2000 रु., नवीन दंड: 10000 रु.

🔸वेगाने वाहन चालवणे - जुना दंड: 500 रु., नवीन दंड: 5000 रु.

🔸विनापरवाना वाहन चालवणे – जुना दंड: 5000 रु., नवीन दंड: 10000 रु.

🔸सीटबेल्ट नसणे – जुना दंड: 100 रु., नवीन दंड: 1000 रु.

🔸दुचाकीवर दोनपेक्षा जास्त व्यक्ती – जुना दंड: 100 रु., नवीन दंड: 2000 रु.

🔸अ‍ॅम्ब्युलन्ससारख्या महत्त्वाच्या वाहनांना रस्ता न देणे – नवीन दंड: 10000 रु.

🔸विमा नसताना वाहन चालवणे – जुना दंड: 1000 रु., नवीन दंड: 2000 रु.

🔸अल्पवयीन मुला-मुलींकडून गुन्हा — 25000 रु. दंड व मालक/पालक दोषी: 3 वर्षे तुरुंगवास

​​खासदार सुप्रिया सुळे देशात पुन्हा अव्वल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची पुन्हा एकदा 'उत्कृष्ट संसदपटू' म्हणून निवड करण्यात आली आहे. सतराव्या लोकसभेच्या पहिल्या सत्रात सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून सुळे यांची निवड करण्यात आली आहे,

2019 मध्ये झालेल्या 17 व्या लोकसभेच्या निवडणुकीत सुळे यांनी बारामतीमधून विजय मिळवला होता. संसदेच्या पहिल्या सत्रांमध्ये सुळे यांनी 34 चर्चासत्रांत भाग घेतला. चार खासगी विधेयके मांडली. 147 प्रश्‍न उपस्थित केले आहेत. पहिल्या सत्रांमध्ये खा. सुळे यांची संसदेतील उपस्थिती 100 टक्के राहिली आहे.

गेल्या लोकसभेत सुळे यांनी 1181 प्रश्‍न विचारले होते, तर 22 खासगी विधेयके मांडली होती. 152 वेळा चर्चेत सहभाग नोंदवला होता. तसेच संसदेत 100 टक्के हजेरी लावली होती. गेल्या संसदेतमधील खासदारांची हजेरी 80 टक्के होती.

चालू घडामोडी प्रश्नसंच

📌कोणत्या भारतीय राज्याने ‘सिस्टर स्टेट’ या संदर्भात संयुक्त राज्ये अमेरिकेच्या डेलावर राज्याबरोबर एक सामंजस्य करार केला?

(A) राजस्थान
(B) गुजरात✅✅✅
(C) पंजाब
(D) आसाम

📌झिम्बाब्वे या देशाच्या माजी राष्ट्राध्यक्षाचे 6 सप्टेंबर 2019 रोजी निधन झाले. त्या व्यक्तीचे नाव काय होते?

(A) एमर्सन मनांगग्वा
(B) सिबुसीसो मोयो
(C) कनान बनाना
(D) रॉबर्ट मुगाबे✅✅✅

📌कोणत्या साली संयुक्त राष्ट्रसंघ समुद्र कायदा परिषद (UNCLOS) हा करार अस्तित्वात आला?

(A) सन 1958
(B) सन 1984
(C) सन 1994✅✅✅
(D) सन 1999

📌कोणत्या सार्वजनिक बँकेनी ESICच्या सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यांना त्याची थेट ई-देयक सेवा प्रदान करण्यासाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) सोबत करार केला?

(A) कॅनरा बँक
(B) युनियन बँक ऑफ इंडिया
(C) इंडियन बँक
(D) भारतीय स्टेट बँक✅✅✅

📌“युद्ध अभ्यास 2019” हा भारत आणि ___ या देशांच्या दरम्यानचा एक संयुक्त लष्करी सराव आहे, ज्याची सुरुवात 5 सप्टेंबर 2019 रोजी झाली.

(A) ब्रिटन
(B) संयुक्त राज्ये अमेरिका✅✅✅
(C) युरोपीय संघ
(D) रशिया

📌कसोटी क्रिकेटच्या इतिहासातला सर्वात तरुण कर्णधार कोण ठरला आहे?

(A) सरफराज अहमद
(B) अँड्र्यू स्ट्रॉस
(C) रशीद खान✅✅✅
(D) टटेंडा तायबू

📌वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर (WWF) या आंतरराष्ट्रीय संस्थेचे स्थापना वर्ष कोणते आहे?

(A) सन 1961✅✅✅
(B) सन 1971
(C) सन 1981
(D) सन 1991

📌कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने भारतीय गेंड्याच्या संवर्धनार्थ जागरूकता वाढविण्यासाठी WWF इंडिया या संस्थेसोबत भागीदारी केली आहे?

(A) विराट कोहली
(B) रोहित शर्मा✅✅✅
(C) कपिल देव
(D) हरभजन सिंग

📌कोणत्या शहरात असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन इलेक्शन बॉडीज (A-WEB) या संस्थेचे कायमस्वरूपी सचिवालय आहे?

(A) नवी दिल्ली, भारत
(B) सोल, दक्षिण कोरिया✅✅✅
(C) टोकियो, जापान
(D) बिजींग, चीन

📌मास्टरकार्ड इंक या संस्थेच्या वार्षिक क्रमावारीनुसार कोणते शहर जगातले सर्वाधिक भेट दिले गेलेले शहर आहे?

(A) बँकॉक✅✅✅
(B) पॅरिस
(C) लंडन
(D) जयपूर

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...