🔗 तलाठी परीक्षा २०१९ स्कोर लिस्ट (Score List)
👇👇👇👇👇👇👇👇
🔗 तलाठी परीक्षा २०१९ स्कोर लिस्ट (Score List)
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत LEARNING व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा उपक्रम म्हणजे " यशाचा राजमार्ग" या मोफत शैक्षणिक WebSite वर आपणा सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन असेल.हे पहिलं असं मराठी WebSite आहे कि ज्यातून UPSC, MPSC, पोलीस भरती, RRB, SSC आणि BANKING साठी मराठीतुन मार्गदर्शन केलं जाईल.
✍राज्यभरातील तब्बल 20 हजार महसूल कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. मागच्या पाच वर्षात राज्य शासनाने 19 मागण्यांपैकी एकाही मागणीचा विचार न केल्याने महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचं हत्यार उपसलं आहे.
✍अंशदायी पेन्शन योजनेऐवजी जुनीच पेन्शन योजना कायम ठेवणे, महसूल सहाय्यक पदनाम करणे, लोकसेवा भरतीत 5 टक्के जागा राखीव ठेवणे या प्रमुख मागण्यांसह इतर 16 मागण्यांसाठी राज्यभरातील महसूल कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आंदोलन केली.
✍मात्र याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने आजपासून राज्यातील सर्वच तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत.ऐन निवडणुकांच्या तोंडावर या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने प्रशासनाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
1. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील भूमीहिन मेंढपाळ कुटुंबांसाठी अर्धबंदिस्त, बंदिस्त, मेंढीपालनासाठी जागा उपलब्ध करुन देणे किंवा जागा खरेदीसाठी अनुदान तत्वावर अर्थसहाय्य देणे.
2. वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या भटक्या जमाती-क या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाच्या स्वयं योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र योजना कार्यान्वित करणे.
3. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांत प्रवेश देणे.
4. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना पहिल्या टप्प्यात 10,000 घरकुले बांधून देणे.
5. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील आवश्यक असलेल्या परंतु अर्थसंकल्पित निधी उपलब्ध नसलेल्या योजना / कार्यक्रम राबविण्यासाठी न्युक्लिअस बजेट योजना.
6. राज्यातील भटक्या जमाती-क या प्रवर्गातील व्यक्ती सदस्य असलेल्या सहकारी सूत गिरण्यांना भागभांडवल मंजूर करणे.
7. केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत भटक्या जमाती-क या प्रवर्गातील नवउद्योजकांना सहाय्य करण्यासाठी मार्जिन मनी उपलब्ध करुन देणे.
8. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील मेंढपाळ कुटुंबांना पावसाळ्यात चराईकरिता जून ते सप्टेंबर या 04 महिन्यांसाठी चराई अनुदान देणे.(प्रायोगिक तत्वावर)
9. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील होतकरु बेरोजगार पदवीधर युवक युवतींना स्पर्धा परिक्षेसाठी परीक्षापूर्व निवासी प्रशिक्षण.
10. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील बेरोजगार युवक-युवतींना स्पर्धा परिक्षेसाठी परिक्षा शुल्कात आर्थिक सवलती लागू करणे.
11. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील बेरोजगार युवक युवतींना लष्करातील सैनिक भरती व राज्यातील पोलीस भरतीसाठी आवश्यक ते मूलभूत प्रशिक्षण देणे.
12. ग्रामीण परिसरातील कुक्कुटपालन संकल्पनेंतर्गत भटक्या जमाती (क) या प्रवर्गातील जमातीसाठी 75 टक्के अनुदानावर चार आठवडे वयाच्या सुधारित देशी (सीएआरआय- मान्यता प्राप्त) प्रजातीच्या 100 कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अर्थसहाय्य.
13. नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर व अमरावती या महसूली विभागांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी भटक्या जमाती-क प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करणे.
▫️कोकण प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) कर्नाळा, फनसाड रायगड.
०२) तुंगारेश्वर, तानसा ठाणे.
०३) मालवण. सिंधुदुर्ग.
🔸पुणे प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) भिमाशंकर अभयारण्य. पुणे व ठाणे.
०२) कोयना अभयारण्य. सातारा.
०३) सागरेश्वर अभयारण्य. सांगली.
०४) राधानगरी अभयारण्य. कोल्हापुर.
०५) मयुरेश्वर सूपे अभयारण्य. पुणे
🔸नाशिक प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) रेहेकुरी अभयारण्य. अहमदनगर.
०२) माळढोक पक्षी अभयारण्य. सोलापुर &
अहमदनगर.
०३) कळसुबाई व हरिश्चंद्र अभयारण्य. अहमदनगर.
०४) यावल अभयारण्य. जळगांव.
०५) अनेर धरण अभयारण्य. नंदुरबार.
🔹औरंगाबाद प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) जायकवाडी पक्षी अभयारण्य. औरंगाबाद
व नगर.
०२) नायगांव मयुर अभयारण्य बीड.
०३) येडशी रामलिंग घाट अभयारण्य.
उस्मानाबाद.
०४) गवताळा औटरम घाट अभयारण्य. औरंगाबाद
व जळगांव.
🔻अमरावती प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) ढाळकोळकाज/मेळघाट, वाणअभयारण्य.
अमरावती.
०२) काटेपूर्णा अभयारण्य. वाशिम.
०३) पैनगंगा अभयारण्य. नांदेड व यवतमाळ.
०४) अंबाबर्वा, ज्ञानगंगा, लोणार अभयारण्य
बुलढाणा.
०५) नर्नाळा अभयारण्य. अकोला.
०६) टिपेश्वर अभयारण्य. यवतमाळ.
नागपुर प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) नागनागझिरा गोंदिया
०२) बोर. वर्घा व नागपुर
०३) अंधारी चंद्रपुर
०४) चपराळा, भांबरागड. गडचिरोली....
1) ‘दास’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.
1) दाशी 2) दासी 3) माळीण 4) मादी
उत्तर :- 2
2) पुढीलपैकी अनेकवचनी नाम ओळखा.
अ) शहारे ब) हाल क) केळे ड) रताळे.
1) अ आणि ब 2) अ आणि ड 3) अ, क आणि ड 4) फक्त ड
उत्तर :- 1
3) ‘कुत्रा’ या नामाचे सामान्यरूप काय होईल ?
1) कुत्र्या 2) कुत्री 3) कुत्रे 4) कुत्रि
उत्तर :- 1
4) मराठीत एकूण किती विभक्ती मानल्या आहेत ?
1) सात 2) नऊ 3) आठ 4) दहा
उत्तर :- 3
5) विध्यर्थी वाक्य कोणते ते ओळखा.
1) जर ढग दाटले तर पाऊस पडेल 2) पाऊस पडेल
3) पाऊस पडला असता तर बरे झाले असते 4) पाऊस पडण्याची शक्यता आहे का ?
उत्तर :-2
6) एक विशाल मंदिर तयार झाले. या वाक्यातील अधोरेखित शब्द ................. आहेत.
1) उद्देश्य 2) विधेय 3) उद्देश्यविस्तार 4) विधेयविस्तार
उत्तर :- 3
7) ‘राजा प्रधानाला बोलावतो’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
1) कर्तरी 2) कर्मणी 3) भावे 4) कर्मकर्तरी
उत्तर :- 1
8) ‘नवरात्र’ या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल ?
1) नौ रात्रीचा समूह 2) नव रात्रींचा समूह 3) नऊ रात्रींचा समूह 4) नवरात्रौत्सव
उत्तर :- 3
9) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
“वाक्य व त्याचा अर्थ पूर्ण झाला म्हणजे ................ येतो.”
1) अर्धविराम 2) अपूर्णविराम 3) स्वल्पविराम 4) पूर्णविराम.
उत्तर :- 4
10) ‘पाठीवरी वेणी नच, नागीणच काळी’ – या वाक्यातील अलंकार ओळखा.
1) व्यतिरेक 2) अपन्हुती 3) उत्प्रेक्षा 4) यमक
उत्तर :- 2
विक्रम लँडरचा संपर्क २.१ कि.मी.वर तुटला, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सीवन यांनी दिली. साठी संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे लागले होते. अखेरचा 'पंधरा मिनिटांचा थरार' म्हणवला गेलेला घटनाक्रम लीलया पार पाडण्यासाठी सज्ज झालेल्या 'विक्रम'चे चंद्रावतरण पाहण्यासाठी अवघा देश जागा होता.
रात्री एक वाजून ४५ मिनिटांनी विक्रम लँडरने चंद्रावर उतरण्यास सुरुवात केली. इस्रोच्या शास्त्रज्ञांसह संपूर्ण देशातील जनता ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी सज्ज झाले होते. चंद्राच्या पृष्ठभागापासून यानाचं अंतर जसजस कमी होत होतं. तसं सर्वांची धाकधूक वाढली होती. संपूर्ण देशावासीयांचा उत्साह शिगेला गेला होता. सेंटरमधील शास्त्रज्ञ विक्रम लँडरच्या मार्गक्रमणावर बारकाईने लक्ष ठेऊन होते. एक वाजून ५३ मिनिटांनी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार होते. मात्र, चांद्रयान अवघे २.१ कि.मी.वर असताना विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटला आणि शास्त्रज्ञांबरोबरच संपूर्ण देशाचा श्वास रोखला गेला. यावेळी उपस्थित असलेल्या यांनी शास्त्रज्ञांना धीर दिला.
जीवनात चढ-उतार येत असतात. संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभा आहे. तुम्ही विज्ञानाची आणि पर्यायाने देशाची सेवा केली आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे. गेल्या तीन वर्षांपासून या मोहिमेसाठी खडतर मेहनत घेतली आहे. आतापर्यंत तुम्ही यशस्वी कामगिरी केली आहे. धीर सोडू नका. संपर्क तुटला म्हणून खचून जाऊ नका. तुम्ही केलेले काम छोटे नाही. इस्त्रो प्रमुखांनी पुन्हा संपर्क होऊ शकतो, असे सांगितले आहे. तुमच्या मेहनतीनेच पुन्हा एकदा देशाची मान उंचावेल. पुढील कामगिरीसाठी तुम्हाला शुभेच्छा, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर पंतप्रधान मोदींनी के. सीवन यांची पाठ थोपटत त्यांनाही धीर दिला.
निश्चित संकेत प्राप्त होईपर्यंत ठोस निष्कर्ष काढता येणार नाही. विक्रम लँडरकडे २.१ कि.मी. पर्यंतचा डेटा उपलब्ध आहे. त्याचा अभ्यास केला जाईल. संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती 'इस्रो'कडून देण्यात आली.
दरम्यान, पृथ्वीपासून तीन लाख ८४ हजार किलोमीटर दूर चांद्रभूमीवरील धुरळा उडवत 'विक्रम लँडर' चंद्रावर कसा उतरतो आणि आजवर कोणताही देश न पोचलेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ भागात भारतीय तिरंगा कधी फडकतो याची उत्सुकता आणि चर्चा शुक्रवारी दिवसभर होती. अखेरचा 'पंधरा मिनिटांचा थरार' म्हणवला गेलेला घटनाक्रम लीलया पार पाडण्यासाठी सज्ज झालेल्या 'विक्रम'चे चंद्रावतरण पाहण्यासाठी अवघा देश जागा होता. रात्री १२ वाजल्यापासून चांद्रयान-२ बद्दलची उत्सुकता वाढली होती. ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान मोदी इस्रो सेंटरमध्ये दाखल झाले.
'चांद्रयान-२'चा चंद्राच्या दिशेने प्रवास २२ जुलैला सुरू झाला असून, आतापर्यंतचे सर्व टप्पे व्यवस्थित पार पडले आहेत. या मोहिमेतील अचूकतेद्वारे भारताने अवकाश तंत्रज्ञानातील आपल्या क्षमतेचे दर्शन साऱ्या जगाला घडविले आहे. सन २०१६ मध्ये रशियाने लँडर देण्यात असमर्थता दर्शवल्यावर तीन वर्षांच्या विक्रमी काळात 'इस्रो'ने स्वदेशी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर लँडर आणि रोव्हर विकसित केले. 'चांद्रयान-२'च्या रूपाने इस्रोने भारतीय भूमीवरून आतापर्यंतचे सर्वाधिक वजनाचे यशस्वी प्रक्षेपण केले आणि कोणताही अनुभव नसताना पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने लँडर आणि रोव्हरला चांद्रभूमीवर उतरवण्यासाठी प्रयत्न केले.
चंद्रापासून ३५ किमी अंतरावर असलेले 'विक्रम लँडर' १५ मिनिटांत चंद्रस्पर्श करील. या प्रक्रियेला 'इस्रो'चे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी '१५ मिनिटांचा थरार' असे संबोधले. 'नवजात बाळ अचानक कुणी तुमच्या हाती सोपवावे, अशीच ही स्थिती आहे. हे बाळ इकडे-तिकडे दुडदुडेल. पण तुम्हाला त्याला सांभाळायचे आहे. 'लँडर' आमच्यासाठीही असेच बाळ आहे,' असे सिवन म्हणाले.
१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...