Wednesday, 4 September 2019

राष्ट्रीय शिक्षक दिन

👉भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन याच्या स्मृतीप्रत्यर्थ त्यांचा जन्मदिन संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा करतात.

👉कारण डॉ. राधाकृष्णन यांनी 1909 ते 1948 वर्षं पर्यंत म्हणजे 40 वर्षे शै‍क्षणिक क्षेत्रात शिक्षकाचा कार्यभार सांभाळला . 

👉त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 साली आंध्र राज्यातील चितुर जिल्ह्यातील "तिरूताणी" या गावी वैष्णव कुटुंबात झाला.

👉 प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावी झाले व पुढील शिक्षण तिरुपती या गावी झाले. त्यांचे शिक्षण लुथरम मिशन हायस्कूल मध्ये झाले.

👉नंतर उच्च माध्यमिक शिक्षण मद्रास येथील ख्रिश्चन कॉलेजात. तत्त्वज्ञान विषय घेऊन ते प्रथम क्रमांकाने पास झाले व एम्.ए. साठी नितीशास्त्र विषय घेतला.

👉1908 साली त्यांनी एम.ए.साठी प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांनी वेदांत या विषयावर पुस्तक लिहीले.

👉मद्रास येथे प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये तर्कशास्त्राचे प्राध्यापक म्हणून 1917 पर्यंत कार्य केले.

👉१९२० साली त्यांचे पुस्तक ' द प्लेस आँफ रिलीजन इन कंटेम्पररी फिलाँसाँपी ' प्रकाशित झाले. तसेच त्यांनी ' कल्की 'पुस्तक प्रकाशित केले.

👉डॉ. राधाकृष्णन यांनी आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून १९३१ ते १९३६ पर्यंत पदभार सांभाळला.

👉 1939 मध्ये आंध्र विद्यापिठाने त्यांना डी. लिट. ही पदवी दिली.

👉1931 साली इंग्लॅडने डॉ. राधाकृष्णन यांना सर ही मानाची पदवी बहाल केली.

👉त्यांच्या वाढत्या गुणांमुळे, प्रगतीमुळे 1946ते 1949 या काळात भारतीय राज्य घटना समितीचे सभापती म्हणून निवड झाली.

👉1952 साली भारताचे पहिली निवडणूक होऊन उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. त्याच वेळी ते दिल्ली विद्यापीठाचे कुलपती होते.

👉त्याचप्रमाणे 1939 ते 48 बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे कुलपती होते.

👉1957 च्या दुसर्‍या सार्वत्रिक निवडणुकीत ते पुन्हा उपराष्ट्रपती झाले.

👉उत्कृष्ट कार्य कर्तृत्त्वामुळे त्यांना 1954 साली भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला.

👉13 मे 1962 साली डॉ. राधाकृष्णन यांची राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली. 1967 साली निवृत्त झाले.

👉 त्यानंतर आंध्रराज्यातील तिरूपती या गावी 24 एप्रिल 1975 रोजी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.

रोजगार निर्मितीत ‘मुद्रा योजना’ अपयशी; पाच लाभार्थ्यांपैकी एकानेच सुरू केला व्यवसाय

🔺 केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण केले.

◾️देशातील बेरोजगारी वाढल्याची माहिती राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या अहवालातून समोर आली होती. यावर उतारा म्हणून मोदी सरकारने मुद्रा योजनेतून निर्माण झालेल्या रोजगार निर्मितीची आकडेवारी समोर आणण्याचे काम हाती घेतले होते. त्यासाठी एक पाहणीही करण्यात आली. या पाहणीत रोजगार निर्मिती करण्यात मुद्रा योजना अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे.

देशात गेल्या ४५ वर्षांतले बेरोजगारीचे प्रमाण २०१७-१८ मध्ये सर्वाधिक होते, असे राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या अहवालात नमूद करण्यात आले होते. २०१७-१८ मध्ये बेरोजगारीचा दर ६.१ टक्के होता. त्याचबरोबर १९७२-७३ नंतर बेरोजगारीचे हे सर्वाधिक प्रमाण असल्याचे आयोगाने अहवालात म्हटले होते. या अहवालावर सारवासारव करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान मुद्रा योजनेतून निर्माण झालेल्या रोजगार निर्मितीची आकडेवारी समोर आणणार होते. यासाठी केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण केले.

कामगार मंत्रालयाने केलेल्या पाहणीतून मुद्रा योजनेतून समाधानकारक रोजगार निर्मिती झाले नसल्याचे दिसून आले आहे. हा अहवाल अद्याप प्रकाशित करण्यात आलेला नसून, द इंडियन एक्स्प्रेसने याचा वृत्तांत प्रसिध्द केला आहे. पंतप्रधान मुद्रा योजना सर्वे असे या पाहणीचे नाव होते. कामगार मंत्रालयाअतंर्गत येणाऱ्या कामगार विभागाने हे सर्वेक्षण केले आहे. मुद्रा योजनेच्या पाच लाभार्थ्यांपैकी एकाच लाभार्थ्याने म्हणजे २०. ६ टक्के लोकांनीच उद्योग सुरू केला असून, उर्वरित चार जणांनी जुन्याच व्यवसायात पैसा गुंतवला आहे. यातून केवळ दहा टक्के रोजगार निर्माण झाला असल्याचे अहवालात म्हटले आहे.

“एप्रिल २०१५ ते डिसेंबर २०१७ या काळात १.१२ कोटी अतिरिक्त नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. यापैकी ५१.०६ लाख नोकऱ्या स्वयंरोजगारातून निर्माण झाल्या आहेत. तर ६०.९४ लाख पगारी कर्मचारी आहेत. मुद्रा योजना लागू केल्यानंतरच्या ३३ महिन्यांत मुद्रा योजनेतून वाटण्यात आलेल्या कर्जातून केवळ दहा टक्के रोजगार निर्माण झाला आहे” असे अहवालात नोंदवण्यात आले आहे.

२७ मार्च २०१९ रोजी सर्वेक्षण
अहवालाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. “एप्रिल-नोव्हेंबर २०१८ या कालावधीत मुद्रा योजनेतंर्गत ९७ हजार लोकांना कर्जाचा लाभ देण्यात आला आहे. बालक, युवा आणि तरुण या तिन्ही गटांमध्ये योजनेच्या माध्यमातून ५.७१ लाख कोटी कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. वर्ष २०१७-१८मध्ये बालक गटाच्या माध्यमातून ४२ टक्के, कुमार गटात ३४ टक्के आणि तरुण गटातून २४ टक्के कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. यात ६६ टक्के रोजगार निर्मिती बालक गटातून झाली आहे. त्यानंतर युवक गटातून १८.८५ टक्के तर १५.५१ रोजगार तरुण गटातून निर्माण झाला आहे. याच कालावधीत कृषि क्षेत्रात २२.७७ टक्के रोजगार निर्माण झाला असून, उत्पादन क्षेत्रात १३.१० लाख नोकऱ्या निर्माण झाला आहे” असे अहवालात म्हटले आहे. इंडियन एक्स्प्रेसने कामगार आणि रोजगार मंत्रालयाला मुद्रा योजनेविषयी काही प्रश्न विचारले होते. त्यावर मंत्रालयाकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.

पंतप्रधान आजपासून रशिया दौर्‍यावर


◾️ ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम तसेच भारत-रशिया वार्षिक बैठकीत सहभाग घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, बुधवारपासून रशिया दौर्‍यावर रवाना होत आहेत. भारत-रशिया वार्षिक बैठकीत रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन हेही सहभागी होणार असल्याने या बैठकीला महत्व आले आहे. भारत आणि रशिया यांच्यादरम्यानचे संबंध नव्या उंचीवर नेण्यासाठी विविध क्षेत्रातील करार केले जाणार आहेत. 

हायड्रोकार्बन क्षेत्रातील सहयोगाबाबत होणार्‍या उच्चस्तरीय बैठकीत दोन्ही देशांतले या क्षेत्रातले तज्ज्ञ सहभागी होतील. रशियन हायड्रोकार्बन क्षेत्रात आगामी काळात व्यापक प्रमाणावर काम करण्याची भारताची इच्छा आहे. दुसरीकडे रशियाकडून एलएनजी वायू खरेदी करण्याचा सौदा मोदी यांच्या दौर्‍यावेळी केला जाण्याची शक्यता आहे. काही क्षेत्रांमध्ये रशियाला कुशल कामगारांची वाणवा भासत आहे. त्याची पूर्तता करण्यास भारत उत्सूक आहे.

विशेषतः हिरे निर्मिती क्षेत्रात भारत रशियाला मदत करु शकतो. या संदर्भातही मोदी यांच्या दौर्‍यावेळी चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. अफगाणिस्तानमधील एकूण परिस्थितीवर मोदी आणि पुतिन यांच्यादरम्यान चर्चा होणार असल्याचेही समजते.

राष्ट्रीय आंदोलन की महत्वपूर्ण घटनाएं


►1904 ➖ भारतीय विश्वविद्यालय अधिनियम पारित
►1905 ➖ बंगाल का विभाजन
►1906 ➖ मुस्लिम लीग की स्थापना
►1907 ➖ सूरत अधिवेशन, कांग्रेस में फूट
►1909 ➖ मार्ले-मिंटो सुधार
►1911 ➖ ब्रिटिश सम्राट का दिल्ली दरबार
►1916 ➖ होमरूल लीग का निर्माण
►1916 ➖ मुस्लिम लीग-कांग्रेस समझौता (लखनऊ पैक्ट)
►1917 ➖ महात्मा गाँधी द्वारा चंपारण में आंदोलन
►1919 ➖ रौलेट अधिनियम
►1919 ➖ जलियाँवाला बाग हत्याकांड
►1919 ➖ मांटेग्यू-चेम्सफोर्ड सुधार
►1920 ➖ खिलाफत आंदोलन
►1920 ➖ असहयोग आंदोलन
►1922 ➖ चौरी-चौरा कांड
►1927 ➖ साइमन कमीशन की नियुक्ति
►1928 ➖ साइमन कमीशन का भारत आगमन
►1929 ➖ भगतसिंह द्वारा केन्द्रीय असेंबली में बम विस्फोट
►1929 ➖ कांग्रेस द्वारा पूर्ण स्वतंत्रता की माँग

►1930 ➖ सविनय अवज्ञा आंदोलन
►1930 ➖ प्रथम गोलमेज सम्मेलन
►1931 ➖ द्वितीय गोलमेज सम्मेलन
►1932 ➖ तृतीय गोलमेज सम्मेलन
►1932 ➖ सांप्रदायिक निर्वाचक प्रणाली की घोषणा
►1932 ➖ पूना पैक्ट
►1942 ➖ भारत छोड़ो आंदोलन
►1942 ➖ क्रिप्स मिशन का आगमन
►1943 ➖ आजाद हिन्द फौज की स्थापना
►1946 ➖ कैबिनेट मिशन का आगमन
►1946 ➖ भारतीय संविधान सभा का निर्वाचन
►1946 ➖ अंतरिम सरकार की स्थापना
►1947 ➖ भारत के विभाजन की माउंटबेटन योजना
►1947 ➖ भारतीय स्वतंत्रता प्राप्ति

*कुछ महान कार्यों से सम्बंधित व्यक्ति🎓*

1. ब्रह्मा समाज – राजाराममोहन राय

2. आर्य समाज – स्वामी दयानंद सरस्वती

3. प्रार्थना समाज – आत्माराम पांडुरंग

4. दीन-ए-इलाही, मनसबदारी प्रथा – अकबर

5. भक्ति आंदोलन – रामानुज

6. सिख धर्म – गुरु नानक

7. बौद्ध धर्म – गौतमबुद्ध

8. जैन धर्म – महावीर स्वामी

9. इस्लाम धर्म की स्थापना, हिजरी सम्वत – हजरत मोहम्मद साहब

10. पारसी धर्म के प्रवर्तक – जर्थुष्ट

11. शक सम्वत – कनिष्क

12. मौर्य वंश का संस्थापक – चन्द्रगुप्त मौर्य

13. न्याय दर्शन – गौतम

14. वैशेषिक दर्शन – महर्षि कणाद

15. सांख्य दर्शन – महर्षि कपिल

16. योग दर्शन – महर्षि पतंजली

17. मीमांसा दर्शन – महर्षि जैमिनी

18. रामकृष्ण मिशन – स्वामी विवेकानंद

19. गुप्त वंश का संस्थापक – श्रीगुप्त

20. खालसा पन्थ – गुरु गोविन्द सिंह

21. मुगल साम्राज्य की स्थापना – बाबर

22. विजयनगर साम्राज्य की स्थापना – हरिहर व बुक्का

23. दिल्ली सल्तनत की स्थापना – कुतुबुद्दीन ऐबक

24. सतीप्रथा का अंत – लॉर्ड विलियम बेंटिक

25. आंदोलन : असहयोग,सविनय अवज्ञा, खेडा, चम्पारन, नमक, भारत छोडो – महात्मा गाँधी

26. हरिजन संघ की स्थापना – महात्मा गाँधी

27. आजाद हिंद फ़ौज की स्थापना – रास बिहारी बोस

28. भूदान आंदोलन – आचार्य विनोबा भावे

29. रेड क्रॉस – हेनरी ड्यूनेंट

30. स्वराज पार्टी की स्थापना – पंडित मोतीलाल नेहरु

31. गदर पार्टी की स्थापना – लाला हरदयाल

32. ‘वन्देमातरम्’ के रचियता – बंकिमचन्द्र चटर्जी

33. स्वर्ण मंदिर का निर्माण – गुरु अर्जुन देव

34. बारदोली आंदोलन – वल्लभभाई पटेल

35. पाकिस्तान की स्थापना – मो० अली जिन्ना

36. इंडियन एसोशिएशन की स्थापना – सुरेन्द नाथ बनर्जी

37. ओरुविले आश्रम की स्थापना- अरविन्द घोष

38. रुसी क्रांति के जनक – लेनिन

39. जामा मस्जिद का निर्माण – शाहजहाँ

40. विश्व भारती की स्थापना – रवीन्द्रनाथ टैगोर

41. दास प्रथा का उन्मूलन – अब्राहम लिंकन

42. चिपको आंदोलन – सुंदर लाल बहुगुणा

43. बैकों का राष्ट्रीकरण – इंदिरा गाँधी

44. ऑल इण्डिया वीमेन्स कांफ्रेंस की स्थापना – श्रीमती कमला देवी

45. भारत की कम्युनिस्ट पार्टी की स्थापना – एम०एन० राय

46. नेशनल कांफ्रेंस की स्थापना – शेख अब्दूल्ला

47. संस्कृत व्याकरण के जनक – पाणिनी

48. सिख राज्य की स्थापना – महाराजा रणजीत सिंह

49. भारत की खोज – वास्कोडिगामा

महाराष्ट्रातील वनसंपदा


🍀 महाराष्ट्रातील एकुण क्षेत्रफळा पैकी वनांखालील क्षेत्र  21.10 % आहे.

🍀 भारताच्या वनक्षेत्रापैकी महाराष्ट्रात 8.7 % वने आहेत.

🍀 सर्वाधिक क्षेत्र वनांखाली असणारा जिल्हा गडचिरोली आहेत.

🍀 महाराष्ट्रातील सर्वात कमी जंगले लातुर मध्ये आहेत.

🍀 सागाची उत्कृष्ट जंगले चंद्रपूर ( बल्हारशा ) येथे सापडतात.

🍀 संत तुकाराम वन ग्राम योजनेची सुरुवात 2006-07 मध्ये झाली.

🍀 महाराष्ट्र वनविकास मंडळाची स्थापना 1974 नागपूर येथे झाली.

जपानचे टोकियो जगात सर्वात सुरक्षित शहर


💁‍♂ राजधानी दिल्लीचा 53 वा क्रमांक

▪️जगातील सर्वात सुरक्षित शहरांची यादी एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. या यादीत जपानच्या टोकियो शहराने अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर या यादीत देशाची राजधानी दिल्लीला चक्‍क 53 वा क्रमांक मिळाला आहे.

▪️इकॉनॉमिक्‍स या साप्ताहिकाच्या चमूने याचे सर्वेक्षण केले असून सर्वेक्षणात बऱ्याच शहरांना आपला या अगोदरचा क्रमांक गमवावा लागला आहे.

▪️ यात हॉंगकॉंग शहराची 20 क्रमांकावर घसरण झाल्याचे पहायला मिळाले. तर वॉशिंग्टन शहराने आपली सुरक्षेची पातळी वाढवून 10 व्या क्रमांकावर मजल मारली आहे.

✅ जगातील पाच खंडातील 60 शहरांचा या यादीत समोवश करण्यात आला आहे.

▪️या सर्वेक्षणासाठी शहरातील डिजीटल आणि अत्याधुनिक सुविधा, आत्पकालिन यंत्रणा आणि वैयक्‍तिक सुरक्षा यांचा विचार करण्यात आला होता.

▪️2017 मध्ये झालेल्या सर्वेक्षणात हॉंगकॉंगचे स्थान 9 व्या क्रमांकावर होते परंतू, मागील तीन वर्षापासून हॉंगकॉंगचा सुरक्षास्तर ढासळत जात असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

हवाई दलात दाखल झाले अपाचे हेलिकॉप्टर; जाणून घ्या वैशिष्ट्ये


🚁 भारतीय हवाई दलाची ताकद आज आणखी वाढली आहे.

🚁अमेरिकन बनावटीची आठ नवी लढाऊ हेलिकॉप्टर्स हवाई दलाच्या सेवेत दाखल झाली आहेत.

🚁 दोन मिसाईल पॉड्ससह ही हेलिकॉप्टर्स शस्त्रूच्या ठिकाणांना बेचिराख करू शकतात.

‼️हवाई दलाकडे येणार २२ हेलिकॉप्टर्स‼️

🚁भारताने २०१५मध्ये अमेरिकेच्या बोइंग कंपनीशी अशा प्रकारच्या हेलिकॉप्टर खरेदीसाठी कोट्यवधी रुपयांचा करार केला होता.

🚁या करारामध्ये शत्रूवर आग ओकणाऱ्या अशा २२ हेलिकॉप्टर्सचा समावेश आहे. ही हेलिकॉप्टर्स सध्याच्या घडीला जगातील सर्वांत अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स आहेत.

🚁पहिल्या टप्प्यात आठ हेलिकॉप्टर्स भारताच्या हवाई दलात दाखल झाली आहेत. करारानुसार २०२०पर्यंत सर्व २२ हेलिकॉप्टर्स भारताच्या हवाई दलात दाखल होणार आहे.

‼️कोणत्या देशांकडे आहे अपाचे हेलिकॉप्टर?‼️

🚁भारती हवाई दलात पहिल्यांदाच अपाचे हे अत्याधुनिक समाविष्ट होत आहे. पण, जगातील अनेक देशांकडे ही हेलिकॉप्टर्स  आहेत.

🚁यात अमेरिका, इजिप्त, ग्रीस, इंडोनेशिया, इस्राईल, जपान, कुवैत, नेदरलँड, कतार, सौदी अरेबिया, दक्षिण कोरिया, ब्रिटन, यूएई आणि सिंगापूरसह एकूण १५ देशांकडे अपाची हेलिकॉप्टर आहेत.

   ‼️कोठे झाला होता वापर?‼️

🚁दहशतवादाविरोधातील सर्वांत मोठी कारवाई अमेरिकेने पाकिस्तानात केली होती.

🚁अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला त्याच्या घरात घुसून ठार करण्यात आले होते. त्या मोहिमेत अमेरिकेने अपाची हेलिकॉप्टरचा वापर केला होता.

‼️काय आहेत अपाचे हेलिकॉप्टरची वैशिष्ट्ये?‼️

🚁एका वेळी ५०० किलोमीटरपर्यंत उड्डाण करण्याची क्षमता
🚁साडे तीन तास हवेत राहण्याची हेलिकॉप्टरची इंधन क्षमता
🚁प्रति तास २८९ किलोमीटर वेगाने उड्डाण शक्य
🚁३० एमएम गनमधून एका वेळी १२०० राऊंट फायर करणारी गन
🚁 १९ मिसाईल्स कॅरी करून शकणारी दोन मिसाईल पॉड्स
🚁 लेझर सिस्टम-सेंसर आणि नाईट व्हिजन सिस्टमचा समावेश
🚁 त्यामुळे अंधारातही शत्रूवर हल्ला कररण्याची हेलिकॉप्टरची क्षमता

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मागासवर्गीयांच्या शिष्यवृत्तीसाठी राज्याला केंद्राकडून 650 कोटी

👩‍🎓 राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी केंद्राचा वाटा म्हणून साडेसहाशे कोटी रुपयांचा निधी देण्यास केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली, अशी माहिती राज्याचे समाजकल्याणमंत्री सुरेश खाडे यांनी दिली.

👩‍🎓यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकार केंद्राकडे तातडीने पाठवेल, असेही त्यांनी सांगितले. 

👩‍🎓राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाच्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आज गेहलोत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.

👩‍🎓केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, राज्यमंत्री अविनाश महातेकर व अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत राज्याला केंद्राकडून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या निधीबाबत चर्चा झाली.

👩‍🎓याबाबत राज्याची मागणी मान्य करत वर्ष 2019-20 साठी केंद्र आणि राज्य शासनाच्या 60:40 प्रमाणातील वाट्यानुसार केंद्राकडून 650 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. 

👩‍🎓दलित अत्याचार प्रतिबंधक (ऍट्रॉसिटी) कायद्यांतर्गत आंतरजातीय विवाह व अत्याचार प्रतिबंधासाठी केंद्राने द्यायचा उर्वरित 30 कोटींचा निधी येत्या आठवडाभरात राज्याला हस्तांतरित करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

वर्ल्डकप नेमबाजीत भारत नंबर वन; ५ सुवर्ण

 🏆पुढील वर्षी होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांकडून अपेक्षा बऱ्याच उंचावल्या आहेत.

🏆रिओत झालेल्या वर्ल्डकप नेमबाजीत भारताने ५ सुवर्ण आणि प्रत्येकी २ रौप्य व ब्राँझपदकांसह अव्वलस्थान मिळविल्यामुळे भारतीय नेमबाजांवरचा विश्वास आता आणखी वाढला आहे.

🏆या वर्षीच्या चार वर्ल्डकपमध्ये भारताने एकूण २२ पदकांची कमाई केली आहे.

🏆त्यातच १० मीटर एअर रायफल नेमबाजी महिला गटाच्या जागतिक क्रमवारीत भारताच्या अपूर्वी चंडेला, अंजुम मुदगिल आणि वलरिव्हन एलावेलिन यांनी पहिले तीन क्रमांक पटकाविल्यामुळे एकूणच भारताने नेमबाजीत जागतिक स्तरावर पहिले स्थान मिळविले आहे.

🏆भारताचे युवा नेमबाज मनू भाकेर आणि सौरभ चौधरी यांनी आयएसएसएफ वर्ल्डकप नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तुलच्या मिश्र गटात सुवर्णयश पटकावले.

🏆याच प्रकारात भारताच्या यशस्विनी देसवाल आणि अभिषेक वर्माने रौप्यपदकाची कमाई केली.

🏆मिश्रच्या एअर पिस्तुलच्या फायनलमध्ये मनू-सौरभ जोडीने शेवटपर्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत आपलेच सहकारी यशस्विनीसिंग देसवाल-अभिषेक वर्माला १७-१५ असे नमविले.

🏆मनू आणि सौरभ दोन्ही सतरा वर्षांचे आहेत. अंतिम फेरीत अनेक चढ-उतार बघायला मिळाले. मनू-सौरभ सुरुवातीला ३-९ने पिछाडीवर होते.

🏆यानंतर ते ७-१३ आणि ९-१५ असे पिछाडीवर पडले होते. मात्र, त्यांनी हार मानली नाही. यानंतरच्या सलग चार फेऱ्या जिंकून त्यांनी प्रतिस्पर्धी जोडीला निष्प्रभ केले. तत्पूर्वी, पात्रतेच्या दुसऱ्या फेरीत मनू-सौरभ जोडीने ४०० पैकी ३९४ गुणांची कमाई केली.

🏆अखेरच्या सीरिजमध्ये तर या जोडीने प्रत्येकी १०० गुण मिळवले. यशस्विनी आणि अभिषेक जोडीने ३८६ गुण मिळवून दुसरे स्थान पटकावले होते. यातील अव्वल आठ जोड्या अंतिम फेरीत दाखल झाल्या.

🏆मनू-सौरभ जोडीने वर्ल्डकपमधील एअर पिस्तुलमध्ये चारही सुवर्णपदके आपल्या नावे केले आहेत.

     🥇वर्ल्डकपमध्ये भारताचे वर्चस्व🥇

🏆या वर्षाच्या चारही वर्ल्डकपमध्ये भारतीय नेमबाजांनी निर्विवाद वर्चस्व राखले.

🏆ब्राझीलमध्ये झालेल्या या वर्ल्डकपमध्येही भारतीय नेमबाजांनी आपला दबदबा राखला.

🏆मंगळवारी संपलेल्या या वर्ल्डकपमध्ये भारताने पाच सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन ब्राँझ, अशी एकूण नऊ पदके पटकावली. या वर्ल्ड कपमध्ये इतर देशांच्या नेमबाजांना एक सुवर्णपदकाच्या वर कमाई करता आली नाही.

🏆भारताने या वर्षातील चारही वर्ल्डकपमध्ये मिळून २२ पदकांची कमाई केली आहे. गेल्या वर्षी भारताने वर्ल्डकपमध्ये एकूण १९ पदके मिळवली होती.

            🥇पदकतक्ता🥇

देश.  सुवर्ण रौप्य ब्राँझ एकूण

भारत ५  २.   २.   ९

चीन १    २    ४    ७

क्रोएशिया १.  १   ०   २

ब्रिटन १.   १    ०.   २

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

जम्मू-काश्मिरात पंच, सरपंचांना विमासुरक्षा

💢जम्मू आणि काश्मिरातील गावांचे सरपंच आणि पंच (पंचायतींचे सदस्य) यांना पोलिस संरक्षण दिले जाणार असून त्यांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे विमा कवच पुरवले जाणार आहे.

💢केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मिरातील पंच व सरपंचांच्या शिष्टमंडळाला मंगळवारी हे आश्वासन दिले.

💢या शिष्टमंडळाने मंगळवारी येथे शहा यांची भेट घेतली.

💢 'आम्हाला सुरक्षा पुरवण्याची विनंती गृहमंत्र्यांना केली. त्याप्रमाणे प्रशासन सुरक्षा पुरवेल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे,' असे कुपवाडा जिल्ह्यातील सरपंच मिर जुनैद यांनी भेटीनंतर सांगितले.

💢 तर सर्व पंच व सरपंचांना दोन लाखांचे विमा संरक्षण देण्याचे आश्वासनही गृहमंत्र्यांनी दिल्याचे श्रीनगर जिल्ह्यातील हरवान गावचे सरपंच झुबेर निषाद भट यांनी सांगितले.

💢जम्मू-काश्मिरात येत्या १५ ते २० दिवसांत मोबाइलचे नेटवर्क पुन्हा प्रस्थापित होईल, असे गृहमंत्र्यांनी सांगितल्याचेही भट म्हणाले.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

ऑलिम्पिकमधील भारताचे नववे स्थान निश्चित


✍यशस्वीनी सिंह देसवालने ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पध्रेत माजी ऑलिम्पिक आणि विश्वविजेत्या युक्रेनच्या ऑलिना कोस्टिव्हायशवर मात करीत महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक मिळवले.
याचप्रमाणे ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेसाठी भारताचे नववे स्थान निश्चित केले.

✍22 वर्षीय माजी कनिष्ठ विश्वविजेत्या यशस्विनीने आठ खेळाडूंचा समावेश असलेल्या अंतिम फेरीत 236.7 गुणांची  कमाई केली. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या ऑलिनाने 234.8 गुणांसह रौप्यपदक मिळवले, तर सर्बियाच्या जस्मिना मिलाव्होनोव्हिचने 215.7 गुणांसह  कांस्यपदक मिळवले.

चालू घडामोडी प्रश्नसंच 4/9/2019

📌कोणत्या भारतीय खेळाडूला पहिल्या-वहिल्या AIPS एशिया पुरस्कार सोहळ्यात महिला गटात ‘सर्वोत्तम आशियाई खेळाडू’ म्हणून गौरविण्यात आले?

(A) पी. व्ही. सिंधू
(B) स्मृती मंधाना
(C) हरमनप्रीत कौर
(D) मेरी कोम✅✅✅

📌भारतातले सर्वाधिक उंचीवर उभारलेले स्काय सायकलिंग ट्रॅक कुठे बांधण्यात आला आहे?

(A) मनाली✅✅✅
(B) लेह
(C) लाहौल
(D) स्पीती

📌इप्सोस या संस्थेनी प्रसिद्ध केलेल्या “ग्लोबल हॅपीनेस सर्व्हे” याच्या हॅपीनेस इंडेक्समध्ये कोणता देश अग्रस्थानी आहे?

(A) ऑस्ट्रेलिया
(B) ग्रेट ब्रिटन
(C) कॅनडा
(D) (A) आणि (C)✅✅✅

📌इप्सोस या संस्थेनी प्रसिद्ध केलेल्या “ग्लोबल हॅपीनेस सर्व्हे” याच्या हॅपीनेस इंडेक्समध्ये भारताचा कोणता क्रमांक आहे?

(A) 5 वा
(B) 18 वा
(C) 9 वा
(D) 22 वा

📌29 ऑगस्ट 2019 रोजी आशियाई विकास बँक (ADB) याच्या अध्यक्षांनी भारत सरकारच्या नवीन प्रमुख उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी सन 2020 ते सन 2022 या काळात ___ हून अधिकचे कर्ज देण्याचे आश्वासन दिले.

(A) 12 अब्ज डॉलर✅✅✅
(B) 22 अब्ज डॉलर
(C) 32 अब्ज डॉलर
(D) 52 अब्ज डॉलर

📌टाइम मासिकाद्वारे प्रसिद्ध झालेल्या 'जगातील सर्वात मोठी ठिकाणे २०१' 'कोणत्या क्रमांकावर आहेत?

(A) कॅम्प अ‍ॅडव्हेंचर (रोनेडे, डेन्मार्क)
(B) मोरी बिल्डिंग डिजिटल आर्ट म्युझियम (टोकियो, जपान)
(C) जियोसी जियोथर्मल सी बाथ्स (हुसविक, आइसलँड)✅✅✅
(D) डिस्नेलँडमधले स्टार वॉर्स: गॅलेक्सीज एज (अॅनाहिम, कॅलिफोर्निया)

📌रशियाच्या कझान शहरात ‘वर्ल्ड स्किल्स 2019’ या स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले?

(A) प्रणव उदयराक नुतलापती
(B) श्वेता रतनपुरा
(C) संजय प्रामणिक
(D) अश्वथा नारायण सनागवारापू✅✅✅

📌भारतात ‘राष्ट्रीय पोषण माह’ म्हणून कोणत्या महिना साजरा करण्याची घोषणा केली गेली?

(A) जुलै 2019
(B) ऑगस्ट 2019
(C) सप्टेंबर 2019✅✅✅
(D) ऑक्टोबर 2019

📌फिच सोल्यूशन्स या संस्थेच्या अहवालानुसार, कोणता देश 2025 सालापर्यंत कोकिंग-पद्धतीचा कोळसा आयात करणारा सर्वात मोठा आयातदार देश बनणार?

(A) फ्रान्स
(B) जापान
(C) भारत✅✅✅
(D) चीन

📌इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने "बिल्ड फॉर डिजिटल इंडिया" उपक्रम राबविण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञान कंपनीबरोबर भागीदारी केली आहे?

(A) गुगल✅✅✅
(B) मायक्रोसॉफ्ट
(C) अॅमेझॉन
(D) फेसबुक

📌कोणता संघ 15 वर्षाखालील SAFF चषक 2019 फूटबॉल स्पर्धेचा विजेता आहे?

(A) म्यानमार
(B) पाकिस्तान
(C) भारत✅✅✅
(D) नेपाळ

📌1 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या फेरबदलात राष्ट्रपतींनी राजस्थान, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, केरळ आणि तेलंगणा या राज्यांसाठी नव्या राज्यपालांच्या नियुक्तीची घोषणा केली. त्यासंदर्भात चुकीची ‘राज्य-राज्यपाल’ जोडी शोधा.

(A) राजस्थान - कलराज मिश्रा
(B) महाराष्ट्र – भगत सिंग कोश्यारी
(C) हिमाचल प्रदेश - बंडारू दत्तात्रेय
(D) केरळ - तमिलीसाई सौंदराराजन✅✅

📌कोणत्या भारतीय नेमबाजाने ISSF विश्वचषक IV 2019 या स्पर्धेत महिला गटात 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले?

(A) यशस्वीनी देसवाल✅✅✅
(B) ईशा सिंग
(C) करनी सिंग
(D) निशिता चौकी

📌अर्थमंत्रालयाच्या माहितीनुसार ऑगस्ट 2019 या महिन्यामध्ये वस्तू व सेवा कराचे (GST) किती संकलन झाले?

(A) रु. 1.02 लक्ष कोटी
(B) रु. 17,733 कोटी
(C) रु. 98,202 कोटी✅✅✅
(D) रु. 48,958 कोटी