Tuesday, 3 September 2019

भारतातला सर्वाधिक लांबीचा विद्युतीकृत रेल बोगदा आंध्रप्रदेश राज्यात

1 सप्टेंबर 2019 रोजी उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी आंध्रप्रदेश राज्यात देशातल्या सर्वाधिक लांबी असलेल्या विद्युतीकृत रेल बोगद्याचे उद्घाटन केले.

आंध्रप्रदेश राज्याच्या चेरलोपल्ली आणि रापुरू या स्थानकांच्यादरम्यान तयार करण्यात आलेला हा 6.6 किलोमीटर लांबीचा बोगदा ओबुलावरीपल्ली-व्यंकटाचलम रेलमार्गाचा एक भाग आहे. हा बोगदा न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (NATM) वापरुन 'घोड्याची नाल'च्या आकारात बनविला गेला आहे. बोगद्याची उंची 6.5 मीटर एवढी आहे.

नव्याने बांधण्यात आलेला हा बोगदा कृष्णापट्टनम बंदर आणि दुर्गम भागांच्या दरम्यान मालवाहतूक करण्यासाठी अखंड रेल जोडणी प्रदान करणार आहे.

ओबुलावरीपल्ली-व्यंकटाचलम दरम्यानच्या 112 किलोमीटर लांबीच्या विद्युतीकृत रेल्वेमार्गामुळे प्रवासाची वेळ 5 तासांनी कमी होण्यास मदत होणार आहे. सध्या, गाडीला कृष्णापट्टनम बंदर ते ओबुलावरीपल्ली पर्यंत जाण्यासाठी 10 तास लागतात

मराठी व्याकरण प्रश्नमालिका 3/9/2019

1. या ठिकाणी माझे काय काम?
उद्गारवाचक 
नकरार्थी
प्रश्नार्थक
होकारार्थी

* उत्तर - प्रश्नार्थक

2. ‘पाणउतारा करणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा .
पाणी उतारावर वाहणे
पायऱ्या उतरणे
पाय उतार होणे
अपमान करणे

* उत्तर - अपमान करणे

3. अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा दाढी धरणे
पकडून ठेवणे
कचाट्यात पकडण
आळवणी करणे
शरण आणणे

* उत्तर - आळवणी करणे

4. केशवकुमार हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे?
त्र्यंबक बापुजी ठोंबरे
कृष्णाजी केशव दामले
राम गणेश गडकरी
प्रल्हाद केशव अत्रे

* उत्तर -प्रल्हाद केशव अत्रे

5. ..... जळले तरी पीळ जात नाही.
दोरखंड
चऱ्हाट
घर
सुंभ

* उत्तर - सुंभ

6. मी घरीच शिकलो
अकर्मक कर्तरी
सकर्मक कर्तरी
सकर्मक भावे
अकर्मक भावे

* उत्तर - अकर्मक कर्तरी

7. मी पुस्तके वाचली
कर्मणी प्रयोग
कर्तरी प्रयोग
भावे प्रयोग
यापैकी नाही

* उत्तर -  कर्मणी प्रयोग

8. 'हात दाखविणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा.
कर्तबगारी दाखविणे
फसविणे
प्रकृती दाखविणे
हात दाखऊन भविष्य पाहणे

* उत्तर -  फसविणे

9. रात्र संपता संपत नाही
साधा वर्तमान काळ
अपूर्ण वर्तमानकाळ
साधा भूतकाळ
अपूर्ण भूतकाळ

* उत्तर -  अपूर्ण वर्तमानकाळ

10. कपिलाषष्टीचा योग - या शब्दाचा अर्थ कोणता?
ऋणानुबंध
दुर्मिळ योग
योगायोगाने होणारी भेट
कपिल मुनींचा जन्मदिवस

* उत्तर - दुर्मिळ योग
----------------------------------------------------------

सुवर्ण'सिंधू : जागतिक स्पर्धेत जेतेपद पटकावणारी पहिली भारतीय

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या सिंधूने यावेळी जेतेपदाचा दुष्काळ संपवला. तिने जपानच्या नोझोमी ओकुहाराला नमवून सुवर्णपदक नावावर केले.

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्मपदक जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. या विजयासह सिंधूने 2017च्या जागतिक स्पर्धेतील अंतिम फेरीतील पराभवाची परतफेड केली. या स्पर्धेत सिंधूच्या नावे आता एक सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्य अशी पाच पदकं झाली आहेत.

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदकविजेते भारतीय
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
1983 - प्रकाश पादुकोण
( पुरुष एकेरी) - कांस्यपदक

2011 - ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा
( महिला दुहेरी) - कांस्यपदक

2013 - पी. व्ही. सिंधू
( महिला एकेरी) - कांस्यपदक

2014 - पी. व्ही. सिंधू
( महिला एकेरी) - कांस्यपदक

2015 - सायना नेहवाल
( महिला एकेरी) - रौप्यपदक

2017 - पी. व्ही. सिंधू
( महिला एकेरी) - रौप्यपदक

2017- सायना नेहवाल
( महिला एकेरी) - कांस्यपदक

2018 - पी. व्ही. सिंधू
( महिला एकेरी) - रौप्यपदक

2019 - बी साई प्रणित
( पुरुष एकेरी) - कांस्यपदक
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...