Monday, 2 September 2019

एका ओळीत सारांश, 3 सप्टेंबर 2019

🌹🌳🌴अर्थव्यवस्था🌴🌳🌹

👉ऑगस्ट 2019 या महिन्यातले वस्तू व सेवा कर (GST) संकलन - 98,202 कोटी रुपये.

👉2 सप्टेंबर रोजी या बँकेनी MSME उद्योगांच्या ग्राहकांना सहकारी तत्वावर कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी ECL फायनान्स या कंपनीबरोबर करार केला - सेंट्रल बँक ऑफ इंडिया.

👉2 सप्टेंबर रोजी फिच सोल्युशन्स या संस्थेद्वारे आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये भारतासाठी अंदाज बांधलेला GDP वृद्धीदर - 6.4 टक्के.

🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹

👉या ठिकाणी 750 मेगावॅट क्षमतेचा गॅस-आधारित वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी बांग्लादेशाच्या सरकारने रिलायन्स पॉवर ऑफ इंडिया या कंपनीशी करार केला - ढाकाजवळील मेघनाहट येथे

👉आग्नेय (दक्षिण-पूर्व) आशियासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) प्रादेशिक समितीच्या 72 व्या सत्राचे या ठिकाणी 2 सप्टेंबर रोजी उद्घाटन झाले - नवी दिल्ली, भारत.

👉आग्नेय (दक्षिण-पूर्व) आशियासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) प्रादेशिक समितीच्या 72 व्या सत्राच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवडले गेलेले व्यक्ती – डॉ. हर्ष वर्धन.

👉फिच सोल्यूशन्स या संस्थेच्या अहवालानुसार, 2025 सालापर्यंत कोकिंग-पद्धतीचा कोळसा आयात करणारा सर्वात मोठा आयातदार देश – भारत (चीनला मागे टाकणार).

👉3 सप्टेंबर 2019 रोजी होणार्‍या ‘असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन बॉडीज’ (A-WEB) याच्या 4व्या आमसभेचा आयोजनकर्ता - भारतीय निवडणूक आयोग (बेंगळुरू येथे)

👉सन 2019-21 या कालावधीसाठी ‘असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन बॉडीज’ (A-WEB) याचा अध्यक्ष – भारत.

🌹🌳🌴व्यक्ती विशेष🌴🌳🌹

👉स्वच्छ भारत अभियानासाठी बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनकडून पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती - पंतप्रधान नरेंद्र मोदी.

🌹🌳🌴क्रिडा🌴🌳🌹

👉शिकागो येथे झालेल्या पहिल्या ऑल इलाइट रेसलिंग (AEW) विश्व विजेतेपद या स्पर्धेचा विजेता - अमेरिकेचा कुस्तीपटू ख्रिस जेरीको.

👉15 वर्षाखालील SAFF चषक 2019 फूटबॉल स्पर्धेचा विजेता संघ - भारत.

🌹🌳🌴राज्य विशेष🌴🌳🌹

👉1 सप्टेंबरपासून 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असलेल्या प्लास्टिकवरील बंदी घालणारा राज्य - उत्तरप्रदेश.

🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹

👉दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ (SAFF) याचे स्थापना वर्ष – सन 1997.

👉असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन बॉडीज (A-WEB) – स्थापना वर्ष: सन 2013 (14 ऑक्टोबर); सचिवालय: सॉन्ग-डो, दक्षिण कोरिया.

👉भारतीय निवडणूक आयोग – स्थापना वर्ष: सन 1950 (25 जानेवारी); सचिवालय: नवी दिल्ली.

👉जागतिक आरोग्य संघटना (WHO) – स्थापना वर्ष: सन 1948 (7 एप्रिल); मुख्यालय: जिनेव्हा, स्वित्झर्लंड.

👉बांग्लादेश - राजधानी: ढाका; राष्ट्रीय चलन: बांग्लादेशी टाका.

मोदींना मिळालेले पुरस्कार

◾️पुरस्कार : किंग हमाद ऑर्डर ऑफ रीनेसंस
पुरस्काराचे वैशिष्ट्य : बहरीनमधील तिसरा सर्वोच्च नागरिक पुरस्कार

◾️पुरस्कार : ऑर्डर ऑफ द डिस्टिंगाइश्ड रूल ऑफ इज्जुद्दीन 
पुरस्काराचे वैशिष्ट्य : परदेशी पाहुण्यांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार

◾️पुरस्कार : ऑर्डर ऑफ सेंट ऐंड्रू
पुरस्काराचे वैशिष्ट्य : रशियातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार

◾️पुरस्कार : ऑर्डर ऑफ जायेद
पुरस्काराचे वैशिष्ट्य : संयुक्त अरब अमीरातमधील सर्वोच्च नागरि पुरस्कार

◾️पुरस्कार : ग्रैंड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ फिलिस्तीन
पुरस्काराचे वैशिष्ट्य : ईस्त्राईलतर्फे इतर देशांच्या प्रमुखांना देण्यात येणारा सर्वोच्च नागरि पुरस्कार

◾️पुरस्कार : स्टेट ऑर्डर ऑफ गाजी अमीर अमानुल्लाह खान
पुरस्काराचे वैशिष्ट्य : अफगाणिस्तानकडून देण्यात येणारा सर्वोच्च नागरि पुरस्कार

◾️पुरस्कार : ऑर्डर ऑफ अब्दुलअजीज अल सऊद
पुरस्काराचे वैशिष्ट्य : मुस्लिम नसलेल्या व्यक्तीला सौदी अरेबियाकडून देण्यात येणारा सर्वोच्च नागरि पुरस्कार

◾मोदींना अमेरिका दौऱ्यावेळी बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनतर्फे पुरस्कार

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) कर्मकर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा.

   1) गाय गुराख्याकडून बांधली जाते      2) त्त्वा काय कर्म करिजे लघुलेकराने
   3) शिक्षक मुलांना शिकवितात      4) शिक्षकांनी मुलांना शिकवावे

उत्तर :- 1

2) खालीलपैकी ‘गुळांबा’ या शब्दाचा समास ओळखा.

   1) कर्मधारय      2) तत्पुरुष   
   3) मध्यमपदलोपी    4) बहुव्रीही

उत्तर :- 3

3) खालील वाक्यात शेवटी विरामचिन्हे द्या. – अबब ! केवढी मोठी ही भिंत.

   1) -      2) ?     
   3) !      4) ”

उत्तर :- 3

4) उपमेय असूनही ते उपमेय नाही, तर उपमानच आहे असे सांगितले जाते तेव्हा .................. हा अलंकार होतो.

   1) श्लेष      2) आपन्हुती   
   3) यमक      4) दृष्टांत

उत्तर :- 2

5) ‘तद्भव’ शब्द निवडा.

   1) ओठ    2) आठव   
   3) आयुष्य    4) आठशे

उत्तर :- 1

6) खालील वाक्यातील विशेषणांचा प्रकार ओळखा.

     ‘माझा आनंद व्दिगुणीत झाला.’
   1) पृथकत्ववाचक संख्याविशेषण    2) अनिश्चित संख्याविशेषण
   3) आवृत्तीवाचक संख्याविशेषण    4) सार्वजनिक विशेषण

उत्तर :- 3

7) ‘येते’ या क्रियापदाला मूळ शब्द .................... हा आहे.

   1) ते      2) येते      3) ये      4) येणे

उत्तर :- 3

8) दिलेल्या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.
     जेवताना सावकाश जेवावे.

   1) स्थिती दर्शक    2) गतिदर्शक   
   3) रितीवाचक    4) निश्चयार्थक

उत्तर :- 3

9) ‘ऐवजी’ या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा.

   1) विरोधवाचक    2) विनिमयवाचक   
   3) कैवल्यवाचक    4) तुलनावाचक

उत्तर  :- 2

10) ‘लांबचा प्रवास बसने करावा की कारने’ या वाक्यातील ‘की’ हे अव्यय खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे ?

   1) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय    2) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
   3) स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय      4) उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 1

स्मार्ट सिटीत नागपूर दुसऱ्या स्थानी

दर शुक्रवारी होणाऱ्या कामकाज तपासणी व गुणांकनात नागपूरचे दुसरे स्थान कायम आहे. अहमदाबाद ३७१.१७ गुण घेऊन पहिल्या, तर नागपूर ३६८.५५ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. या दोन शहरांमध्ये गेल्या वर्षभरापासून सर्वोत्कृष्टची स्पर्धा सुरू आहे.

यापूर्वी नागपूर शहर वर्षभर पहिल्या क्रमांकावर होते. उत्तरप्रदेशातील कानपूर हे शहर यापूर्वी १३ व्या क्रमांकावर होते. आता या शहराने आठव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. याचाच अर्थ या शहरानेही स्मार्ट सिटीच्या कामात नव्या कल्पनांचा समावेश केला आहे. नागपूर शहराचा स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या कामात बराच वेग आहे.

भरतवाडा, पुनापूर व पारडी या भागात स्मार्ट सिटीचे काम सुरू झाले आहे. अनेक कामांच्या निविदा प्रक्रिया निघाल्या आहेत. शहरात स्मार्ट अॅण्ड सेफ सिटीचा प्रयोगही बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे. संपूर्ण शहर सीसीटीव्हीच्या नजरेखाली आहे. पोलिसांनाही या प्रकल्पात मोठे सहकार्य मिळत आहे. ठिकठिकाणी स्मार्ट सिटी म्हणून करण्यात आलेल्या उपाययोजनांचा लाभ मोठ्या संख्येत नागपूरकर करीत आहे. एवढेच नव्हे तर गेल्या काही दिवसात स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील अनेक उद्यानांमध्ये नागरिकांसाठी ग्रीन जीम व इतर अत्यावश्यक सेवा पुरविल्या जात आहे. यामुळे स्मार्ट सिटीच्या संकल्पना राबविण्यात उपराजधानी देशात अव्वल ठरत आहे.

केंद्र सरकारच्या नगरविकास विभागातील पथक दर शुक्रवारी देशभरातील स्मार्ट सिटी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत गुणांकन देत असते. त्यानुसार, नागपूर शहराचा क्रमांक दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. अहमदाबाद व नागपूर अशीच स्पर्धा देशपातळीवर सुरू आहे. तिसऱ्या क्रमांकावरील रांचीला ३१३.३७ आणि चौथ्या स्थानावरील भोपाळ शराला ३१२.४५ गुण आहे.

महत्त्वाचे आयोग

● विमल जालन:-
रिझर्व्ह बँकेने सर्व खर्च, तरतुदी व सर्व देणी दिल्यानंतर उरणाऱ्या या निधीवर केंद्र सरकारचा हक्क असतो. या पार्श्वभूमीवर आर्थिक भांडवल आराखड्याचा आढावा घेऊन यातील नेमका किती निधी सरकारच्या तिजोरीत वर्ग करता येईल, हे निश्चित करण्यासाठी केंद्र सरकाने विमल जालन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली
( राखीव निधीबाबत निर्णय घेण्यासाठी यापूर्वी व्ही. सुब्रमण्यम (१९९७),उषा थोरात (२००४) आणि वाय. एच. मालेगाम (२०१३) अशा तीन समित्या नेमण्यात आल्या होत्या. तातडीचा निधी म्हणून रिझर्व्ह बँकेच्या एकूण मालमत्तेच्या १८ टक्के निधी राखीव ठेवावा,अशी शिफारस थोरात समितीने केली होती. तर, हा निधी १२ टक्के असावा असे सुब्रमण्यम समितीने सुचविले होते.)

● व्ही. जी. कन्नन समिती :-
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बँकांच्या एटीएम व्यवहाराकरिता लागू असलेल्या शुल्काचा आढावा घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेने इंडियन बँक्स असोसिएशन या देशाच्या बँकिंग जगताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. जी. कन्नन यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची समितीची स्थापन केली.

● न्या. रोहिणी:-
इतर मागास जाती/समुदायांमध्ये लाभांचे समान वितरण होण्याची आवश्यकता लक्षात घेऊन संविधानाच्या 340 कलमाअंतर्गत, न्या. रोहिणी आयोग केंद्र सरकाने नेमला हा आयोग केंद्रीय सुचीमधल्या इतर मागास वर्गातल्या उप वर्गीकरणाच्या मुद्याची समीक्षा करणार आहे.

● नंदन निलेकणी :-
देशातील डिजिटल पेमेंटची सद्यस्थिती जाणून या पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय समितीवर नेमणूक केली आहे. तसेच डिजिटल पेमेंट पद्धती अधिक बळकट व सुरक्षित करण्यासाठी आणखी काय करण्याची आवश्यकता आहे, याचा ही समिती आढावा घेईल. निलेकणी यांच्याशिवाय आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर एच. आर. खान, किशोर सन्सी, अरुणा शर्मा, संजय जैन यांचा समावेश आहे.

● डॉ. तात्याराव लहाने:-
रॅगिंग प्रतिबंधक कायद्यात रॅगिंगला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक तरतुदी करण्यासाठी वैद्यकीय संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली

● श्याम तागडे :-
अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम , १९८९ मधील कलम १५ अन्वये अत्याचार झालेल्या पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी. प्रधान सचिव श्याम तागडे यांच्या अध्यक्षतेखाली १३ सदस्य समिती गठित करण्यात आली.

● डॉ. शीतल आमटे – करजगी अभ्यासगट :-
मियावाकी या जपानी वनस्पती शास्त्रज्ञाने कमी जागेमध्ये घनवन (Dense Forest) संकल्पना विकसित केली असून जागतिक स्तरावर हा प्रकल्प रूजत आहे. महाराष्ट्रातील सध्याचे २० टक्क्यांचे वनक्षेत्र ३३ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी वन विभागाने लोकसहभागातून ५० कोटी वृक्षलागवडीचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. या मोहिमेत मियावाकी घनवन प्रकल्पाची आनंदवन प्रकल्प म्हणून अंमलबजावणी करण्यासंदर्भात वन विभागास शिफारसी करण्यासाठी डॉ. शीतल आमटे – करजगी यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

● बाबा कल्याणी:-
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील वाणिज्य विभागाने भारतातील सेझ धोरणाचा अभ्यास करण्याकरीता भारत फोर्ज लिमिटेडचे’ प्रमुख आणि व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी यांच्या अध्यक्षतेखाली सेझ संबंधितांचा गट स्थापन केला

● सुशील मोदी :-
वस्तू व सेवा कर लागू केल्यानंतर सोसाव्या लागलेल्या महसूल तुटीवर उपाययोजना करून कर संकलन वाढविण्याचे प्रयत्न करण्यासाठी जीएसटी परिषदेने सुशील मोदी यांच्या अध्यक्षेतेखाली ७ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली

● दीपाली मोकाशी:-
प्रज्वला योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य महिला आयोगाने दीपाली मोकाशी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे.आयोग महिला संरक्षणाबरोबर “प्रज्वला योजने”च्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात देखील उतरत आहे.

● विवेक पंडीत:-
आदिवासीसाठी कल्याणकारी योजनांचे पुनरावलोकन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आमदार विवेक पंडीत यांच्या अध्यक्षतेखाली १७ सदस्यीय समितीची स्थापना केली.

सुरक्षित शहर निर्देशांक 2019

●निर्देशांक जारी करणारी संस्था - The Economist Intelligence Unit

●5 खंडातील एकूण 60 देशांच्या शहरांचा अभ्यास

●जगातील सर्वात सुरक्षित शहर - टोकियो (निर्देशांकात प्रथम स्थानी)

●द्वितीय स्थान - सिंगापूर

●तृतीय स्थान - ओसाका

🏅 भारतातील मुंबई 45 व्या स्थानी
🏅दिल्ली - 52 व्या स्थानी

●4 निकषांच्या आधारे निर्देशांक काढला जातो.
1. डिजिटल सुरक्षा
2. पायाभूत संरचनांची सुरक्षितता
3. आरोग्य सुरक्षितता
4. व्यक्तिगत संरक्षण

मनोज नरवणे यांनी स्वीकारली लष्कर उपप्रमुखपदाची सूत्रे.



✔️लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आज लष्कर उपप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली.

✔️ विद्यमान लष्करप्रमुख बिपीन रावत 31 डिसेंबरला सेवानिवृत्त होणार असून त्यानंतर वरिष्ठ कमांडंट या नात्याने पदाच्या शर्यतीत नरवणे आघाडीवर असणार आहेत.

✔️तसेच लेफ्टनंट जनरल डी.अंबू शनिवारी लष्कर उपप्रमुख या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.

✔️तर लष्कराच्या पूर्वेकडील कमांडचे प्रमुख म्हणून मनोज नरवणे चार हजार किलोमीटरच्या भारत-चीन सीमेवर तैनात होते.

✔️ 37 वर्षांच्या सेवेत त्यांनी अनेक कमांडचे नेतृत्व केले आहे. जम्मू-काश्मीर आणि पूर्वेकडील दहशतवादी कारवायांच्या विरोधात त्यांनी लढा दिला आहे.

दत्तक वारसा नामंजूर तत्वानुसार महाराष्ट्रातील खालसा संस्थाने

1. सातारा (1848 साली - देशातील खालसा झालेले प्रथम संस्थान)

2. नागपूर (1854 साली खालसा - भोसले संस्थान)
3. कोल्हापूर

4. सावंतवाडी

5. इचलकरंजी

6. गगनबावडा (महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस दिन - जवळपास 129 दिवस याच ठिकाणी)

7. कापशी

8. कागल

9. विशाळगड

लसिथ मलिंगाने रचला इतिहास

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला सर्वाधिक विकेट्स घेणारा जगातला पहिला गोलंदाज ठरला. मलिंगाने (36 वर्षीय) पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळताना हा इतिहास रचला. यासह मलिंगाने सर्वाधिक विकेट्सच्या बाबतीत पाकिस्तानचा गोलंदाज शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडला

टॉप 3 गोलंदाज

लसिथ मलिंगा : 74 सामने I 99 विकेट्स, शाहिद आफ्रिदीने : 99 सामने I 98 विकेट्स, शाकिब अल हसन : 72 सामने 88 विकेट्स

आर.अश्विन टॉपवर : भारतीय संघातर्फे टी-20 त सर्वाधिक विकेट्सचा विक्रम आर.अश्विनच्या नावावर असून त्याने 46 सामन्यात 52 गडी टिपले आहेत

प्राचीन भारताचा इतिहास :

▪️सिंधू संस्कृती

1) समांतर चतुर्भुज आकाराचा हडप्पाचा गढ ४६० गज (४१८ मीटर) लांब, २१५ गज (१९५ मीटर) रुंद व १७ गज (१५ मीटर) उंच होता.

2) सिंधू संस्कृतीची लिपी ही चित्रलिपी होती. ज्याच्यात ६०० पेक्षा जास्त चित्राक्षर व ६० मुळाक्षरे होती.

3) १९२५ साली अर्नेस्ट मैक च्या नेतृत्वाखाली चन्हुदडो नावाच्या शहराचे उत्खनन केले गेले. या शहरात गढ नाही.

4) नाळ, डाबरकोट, राखीगढी, बनवली, रंगपूर, लोथल, आम्री, कुल्ली, राणा घुन्डाई, अंजिरा, गुमला, देस मोरासी घुन्डाई, मुन्डीगाक, दिप्लबंगा, सहर-ए-सोख्ता, बामपूर व क्वेट्टा या ऐतिहासिक स्थळी सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत.

5) १९६१ साली राजस्थानातील कालीबंगा येथे बी.बी. लाल आणि बी.के. थापड यांच्या निर्देशनाखाली उत्खनन करण्यात आले. उत्खननात खालील भागात पूर्व-सिंधू संस्कृतीचे अवशेष तर वरील पृष्ठभागात सिंधू संस्कृतीचे अवशेष मिळाले. येथील शहर आणि गडाच्या चारही बाजूंनी तटबंदी होती.

6) रंगनाथ राव यांच्या निदर्शनाखाली १९५३-५४ मध्ये गुजरात मधील रंगपूर येथे सिंधुकालीन स्थळाचे उत्खनन करण्यात आले. येथे कच्च्या विटांचे गड, नाल्या, मातीची भांडी, दगडांचे फलक इत्यादी गोष्टी मिळाल्या. परंतु देवींच्या मूर्ती व मुद्रा सापडल्या नाही.

7) प्राचीन काळी लोथल हे शहर समुद्रकिनाऱ्यावर स्थित होते. त्याच्या उत्खननात जहाज बांधणी कारखान्याचे अवशेष सापडले. यावरून असे समजले कि लोथलचे नागरिक पश्चिम आशियाशी व्यापार करत होते.

8) गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील सूरकोटडा या ठिकाणचे उत्खनन कार्य १९६४ मध्ये जगतपति जोशी यांच्या निर्देशनाखाली केले गेले.

9) सिंधू संस्कृतीचे उत्खनन करत असताना २४२ फुट लांब आणि ११२ फुट रुंदीची एक विशाल इमारत सापडली. त्या इमारतीच्या भिंतीची रुंदी सुमारे ५ फुट होती.

10) सिंधू संस्कृतीत काही मूर्ती सापडल्या. ज्याच्या मध्य भागात सूर्याची प्रतिमा होती. यावरून समजण्यात आले कि त्या काळात सूर्य पूजा प्रचलित होती.

11) भारतात मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे साधारणतः १.५ करोड वर्षापूर्वीचे आहेत. भारतीय लोकांचे निग्रीटो, प्राचीन ऑस्ट्रेलियन, काकेशसी, व मेंगोलाईड्स असे चार मूळ वांशिक उपप्रकार पडतात.

12) अलाहाबाद जवळील सराय नाहर राय, बालाईखोर व लेखनिया येथे मानवी शरीराचे सांगाडे सापडले आहेत. मोठी उंची, चपटे नाक व रुंद चेहरा ही यांची विशेषता होती. हे सांगाडे मध्य पाषाणकालीन असावेत.

13) सिंधू नदीची उपनदी असलेल्या सोहन नदीच्या किनाऱ्यावर पूर्व पाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष सापडले. म्हणून याला सोहन संस्कृती असेसुद्धा म्हटले जाते.

14) हडप्पा संस्कृतीत देवीची पूजा केली जात असे. हडप्पा संस्कृतीत कुत्रा, मांजर आणि घोड्याच्या शरीराचे अवशेष मिळाले आहेत.

15) सिंध प्रदेश हा कापूस उत्पादन करणारा प्रदेश होता. म्हणून ग्रीकांनी याला सिडोन असे नाव दिले होते.

16) हडप्पामध्ये चांदीची आयात अफगाणिस्तान, दक्षिण भारत, इराण व अरबस्थानातून केली जात असे. निर्माण कार्यासाठी लागणारा लाज्बर्द बदक्शां येथून, फिरोजा इराण मधून, जबूमणि महाराष्ट्रातून, मुंगा आणि लाल सौराष्ट्र व पश्चिम भारतातून तसेच 'हरा पत्थर' मध्य आशियातून आयात केला जात असे.

17) राजस्थानातील अहाड संस्कृती ताम्रयुगीन होती. मातीची घरे, ताम्र भांडी, भातशेती ही या २००० वर्षापूर्वीच्या संस्कृतींची विशेषता होती.

18) माळवा या ताम्र पाषाण कालीन संस्कृतीची चिन्हे नव्दातौली येथून प्राप्त झाली आहेत.
-----------------------------------------------------------

मुख्यमंत्र्यांची यादी

🔴 महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री

▪️यशवंतराव चव्हाण
(मे १, १९६० - नोव्हेंबर १९, १९६२)

▪️मारोतराव कन्नमवार
(नोव्हेंबर २०,१९६२ - नोव्हेंबर २४, १९६३)

▪️वसंतराव नाईक
(डिसेंबर ५, १९६३ - फेब्रुवारी २०, १९७५)

▪️शंकरराव चव्हाण
(फेब्रुवारी २१, १९७५ - मे १७, १९७७)

▪️वसंतदादा पाटील
(मे १७, १९७७ - जुलै १८, १९७८)

▪️शरद पवार
(जुलै १८, १९७८ - फेब्रुवारी १७, १९८०)

▪️अब्दुल रहमान अंतुले
(जून ९, १९८० - जानेवारी १२, १९८२)

▪️बाबासाहेब भोसले
(जानेवारी २१, १९८२ - फेब्रुवारी १, १९८३)

▪️वसंतदादा पाटील
(फेब्रुवारी २, १९८३ - जून १,१९८५ )

▪️शिवाजीराव निलंगेकर
(जून ३, १९८५ - मार्च ६, १९८६)

▪️शंकरराव चव्हाण
(मार्च १२, १९८६ - जून २६, १९८८)

▪️शरद पवार
(जून २६, १९८८ - जून २५, १९९१)

▪️सुधाकरराव नाईक
(जून २५, १९९१ - फेब्रुवारी २२, १९९३)

▪️शरद पवार
(मार्च ६, १९९३ - मार्च १४, १९९५)

▪️मनोहर जोशी
(मार्च १४, १९९५ - जानेवारी ३१, १९९९)

▪️नारायण राणे
(फेब्रुवारी १, १९९९ - ऑक्टोबर १७, १९९९)

▪️विलासराव देशमुख
(ऑक्टोबर १८, १९९९ - जानेवारी १६, २००३)

▪️सुशील कुमार शिंदे
(जानेवारी १८, २००३ - ऑक्टोबर ३०, २००४ )

▪️विलासराव देशमुख
(नोव्हेंबर १, २००४ - डिसेंबर ५, इ.स. २००८)

▪️अशोक चव्हाण
(डिसेंबर ५, इ.स. २००८ - नोव्हेंबर ९, इ.स. २०१०)

▪️पृथ्वीराज चव्हाण
(नोव्हेंबर १०, इ.स. २०१० - सप्टेंबर १६, इ.स. २०१४)

▪️देवेंद्र फडणवीस (३१ ऑक्टोबर, इ.स. २०१४ - विद्यमान

एव्हरेस्टवर जगातले सर्वात उंचीवरचे हवामान केंद्र उभारले.

● एव्हरेस्ट या जगातल्या सर्वोच्च शिखरावर जगातले सर्वात उंचीवरचे हवामान केंद्र उभारण्यात आले आहे.

● नॅशनल जियोग्राफिक सोसायटी आणि त्रिभुवन विद्यापीठ येथील शास्त्रज्ञांनी तेथे एका अंतराने दोन हवामान केंद्रांची स्थापना केली आहे.

● एक केंद्र 8,430 मीटर (27,657 फूट) आणि दुसरे 7,945 मीटर (26,066 फूट) उंचीवर उभारण्यात आले आहे. तसेच, आणखी तीन केंद्र उभारले जात आहे.

● जागतिक तापमान वाढीचा हिमनद्यांवर कसा प्रभाव पडतो याचा अभ्यास करण्यासाठी लागणारी माहिती गोळा करण्याचा उद्देश आहे.

● हिमालय ही आशिया खंडात पसरलेली जगातली सर्वांत उंच पर्वतरांग आहे.

●  हिमालय पर्वतरांगा भारतीय उपखंडाला तिबेटच्या पठारापासून वेगळे करते. येथे ‘एव्हरेस्ट’ (उंची 8848 मीटर) हे जगातले सर्वोच्च शिखर आहे. ह्या पर्वतरांगेची लांबी 2400 किलोमीटर पेक्षाही जास्त आहे.

● ही पर्वतरांग भारत, पाकिस्तान, नेपाळ, चीन, भुटान या देशांमधून जाते.

मराठी व्याकरण प्रश्नमालिका 2/9/2019


1. या ठिकाणी माझे काय काम?
उद्गारवाचक 
नकरार्थी
प्रश्नार्थक
होकारार्थी

* उत्तर - प्रश्नार्थक

2. ‘पाणउतारा करणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा .
पाणी उतारावर वाहणे
पायऱ्या उतरणे
पाय उतार होणे
अपमान करणे

* उत्तर - अपमान करणे

3. अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा दाढी धरणे
पकडून ठेवणे
कचाट्यात पकडण
आळवणी करणे
शरण आणणे

* उत्तर - आळवणी करणे

4. केशवकुमार हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे?
त्र्यंबक बापुजी ठोंबरे
कृष्णाजी केशव दामले
राम गणेश गडकरी
प्रल्हाद केशव अत्रे

* उत्तर -प्रल्हाद केशव अत्रे

5. ..... जळले तरी पीळ जात नाही.
दोरखंड
चऱ्हाट
घर
सुंभ

* उत्तर - सुंभ

6. मी घरीच शिकलो
अकर्मक कर्तरी
सकर्मक कर्तरी
सकर्मक भावे
अकर्मक भावे

* उत्तर - अकर्मक कर्तरी

7. मी पुस्तके वाचली
कर्मणी प्रयोग
कर्तरी प्रयोग
भावे प्रयोग
यापैकी नाही

* उत्तर -  कर्मणी प्रयोग

8. 'हात दाखविणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा.
कर्तबगारी दाखविणे
फसविणे
प्रकृती दाखविणे
हात दाखऊन भविष्य पाहणे

* उत्तर -  फसविणे

9. रात्र संपता संपत नाही
साधा वर्तमान काळ
अपूर्ण वर्तमानकाळ
साधा भूतकाळ
अपूर्ण भूतकाळ

* उत्तर -  अपूर्ण वर्तमानकाळ

10. कपिलाषष्टीचा योग - या शब्दाचा अर्थ कोणता?
ऋणानुबंध
दुर्मिळ योग
योगायोगाने होणारी भेट
कपिल मुनींचा जन्मदिवस

* उत्तर - दुर्मिळ योग
----------------------------------------------------------