०१ सप्टेंबर २०१९

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगत सिंह कोश्यारी यांची नियुक्ती

⚡ सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी कोश्यारी यांची नियुक्ती

💁‍♂ उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर नियुक्ती करण्यता आली आहे.

🔻 कोण आहेत भगत सिंह कोश्यारी? :
भगत सिंह कोश्यारी उत्तराखंडचे दिग्गज भाजप नेते आहेत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. त्यांनी 1977 मध्ये आणीबाणीच्या वेळी तुरुंगवासही भोगला आहे. उत्तराखंड राज्याची निर्मिती झाली तेव्हा ते भाजपचे पहिले प्रदेशाध्यक्ष बनले.

👉 2001 ते 2007 या कालावधीत ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. 2002 ते 2007 पर्यंत त्यांनी विरोधी पक्ष नेते म्हणूनही काम पाहिलं. 2008 ते 2014 पर्यंत ते राज्यसभेत खासदार होते.

💫 *महाराष्ट्रासह एकूण पाच राज्यांना मिळाले नवे राज्यपाल*
1⃣ केरळ : आरिफ मोहम्मद खान
2⃣ राजस्थान : कलराज मिश्र
3⃣ हिमाचल प्रदेश : बंडारू दत्तात्रेय
4⃣ तेलंगणा : तमिलीसाई सुंदरराजन

देशातील राष्ट्रीयीकृत बॅंकांची संख्या आता फक्त बारा

◾️अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दहा राष्ट्रीय बॅंकांचे चार प्रमुख राष्ट्रीय बॅंकांमध्ये विलीनीकरण करण्याची घोषणा केली. यामुळे आता देशात फक्त १२ राष्ट्रीयीकृत बॅंका असतील. या विलीनीकरणामुळे कामगार कपात होणार नसून, कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार नाही. तसेच बचत आणि कर्जवाटप या बॅंकांच्या प्रमुख कामकाजावरही याचा परिणाम होणार नसल्याचा निर्वाळा अर्थमंत्री सीतारामन यांनी दिला.

◾️देशात २७ राष्ट्रीयीकृत बॅंका होत्या. आता या विलीनीकरण प्रक्रियेनंतर फक्त १२ प्रमुख राष्ट्रीयीकृत बॅंका राहतील. यानंतर कोणतेही विलीनीकरण केले जाणार नाही. याशिवाय इंडियन ओव्हरसीज बॅंक, युको बॅंक, बॅंक ऑफ महाराष्ट्र आणि पंजाब अँड सिंध बॅंक या चार बॅंकांच्या कामकाजाचा केंद्रबिंदू विभागीय स्वरूपाचा असल्यामुळे त्यांचा राष्ट्रीय बॅंकेचा दर्जा कायम राखताना कामकाजाच्या प्रादेशिक स्वरूपात बदल न करण्याचे सरकारने ठरविले आहे.

◾️अरुण जेटली यांच्या अर्थमंत्रिपदाच्या काळात बॅंक ऑफ बडोदामध्ये देना बॅंक आणि विजया बॅंकेचे, तर भारतीय स्टेट बॅंकेमध्ये सर्व स्टेट बॅंक समूहांचे विलीनीकरण करण्यात आले होते.

◾️अर्थात, या विलीनीकरण प्रक्रियेमध्ये बॅंक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बॅंक या दोन प्रमुख बॅंकांचे अस्तित्व जैसे थे राखण्याचेही सरकारने ठरविले आहे. या दोन्ही बॅंकांचे देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात असलेले अस्तित्व पाहता त्यांच्या विलीनीकरणाचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले. बॅंक ऑफ इंडियाचा ९३ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय आहे, तर सेंट्रल बॅंकेची उलाढाल ४.६८ लाख कोटी रुपये आहे.

◾️अर्थमंत्र्यांनी बॅंक विलीनीकरणाच्या निर्णयाचे समर्थन करताना पाच ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था साकारण्यासाठीचे हे पाऊल असल्याचा दावा केला. निष्क्रिय बॅंकांमध्ये कामकाज वाढेल आणि मोठ्या बॅंकांना अधिक कर्जवाटप शक्‍य होईल. मात्र २५० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या कर्ज प्रकरणांवर सरकारचे बारकाईने लक्ष राहील, असाही इशारा त्यांनी दिला. बॅंकांचा एनपीए (बुडीत कर्जाचे प्रमाण) ८.६५ लाख कोटी रुपयांवरून ७.९ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आल्याचे सांगितले.

हॅपीनेस इंडेक्समध्ये भारत नवव्या स्थानी: इप्सोस सर्वेक्षण


इप्सोस या मार्केट रिसर्च संस्थेनी त्याचा “ग्लोबल हॅपीनेस सर्व्हे” याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

अहवालाच्या ठळक बाबी

✔️हॅपीनेस इंडेक्सच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 28 जागतिक बाजारपेठांमध्ये भारत नवव्या क्रमांकावर आहे.

✔️यादीत ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा (86%) हे अग्रस्थानी असून जगातले सर्वात आनंदी देश ठरले आहेत.

✔️त्यापाठोपाठ, चीन, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, संयुक्त राज्ये अमेरिका, सौदी अरब आणि  जर्मनी या देशांचा क्रम लागतो आहे. नवव्या क्रमांकावर भारत 77 टक्क्यांसह आहे.

✔️अर्जेटिना 34 टक्क्यांसह यादीत शेवटच्या क्रमांकावर म्हणजेच 27 व्या क्रमांकावर आहे. त्याआधी स्पेन आणि रशिया या देशांची नोंद आहे.

✔️विशेष म्हणजे, 2019 साली आनंदीपणाची पातळी कमी झाली. भारतासाठी या पातळीत सहा टक्क्यांची घसरण झाली आहे. सन 2018 मधील 83 टक्क्यांवरून 2019 साली ही पातळी 77 टक्क्यांवर आली आहे.

अहवालानुसार, जेव्हा आनंद हा घटक लक्षात घेतला जातो तेव्हा भारतीय नागरिक चांगली आर्थिक परिस्थिती आणि शारीरिक सुदृढता हे दोन घटक आनंद मानण्याचे सर्वात मुख्य कारणे मानतात. तर वैयक्तिक सुरक्षा आणि सुरक्षितता, मित्र आणि जीवनावर नियंत्रण असल्याची भावना ही भारतीयांची आनंदी राहण्याविषयीचे इतर प्रमुख कारक आहेत, असे नव्या सर्वेक्षणातून आढळून आले आहे.

महिलांच्या बेरोजगारीचे प्रमाण पुरुषांपेक्षा दुपटीहून अधिक



🔺 भारतातील २०० प्रकारच्या नोक ऱ्यातील कर्मचारी भरतीची माहिती एका संस्थेकडून घेण्यात आली,

👉 पीटीआय | August 31, 2019

◾️नवी दिल्ली : भारतात महिलांमधील बेरोजगारीचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत त्यांची शैक्षणिक पात्रता बरोबरीची असूनही दुपटीहून अधिक आहे,असे एका अभ्यासात दिसून आले आहे.
‘जेंडर इनक्लुजन इन हायरिंग इन इंडिया’ या शीर्षकाखाली हार्वर्डचे विद्यार्थी राशेल लेव्हेनसन व लायला ओकेन यांनी संशोधन निबंध सादर केला असून त्यात म्हटले आहे,की  देशात ८.७ टक्के सुशिक्षित स्त्रिया बेरोजगार आहेत; तुलनेने चार टक्के पुरुषांना नोक ऱ्या नाहीत.

महिलांचा निर्णय व त्यांची नोकरी शोधण्याची क्षमता यावर परिणाम करणारे घटक वेगळे असतात. लिंगभेदामुळे उच्च शिक्षित स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत नोक ऱ्या मिळण्यास कठीण जाते. भारतातील २०० प्रकारच्या नोक ऱ्यातील कर्मचारी भरतीची माहिती एका संस्थेकडून घेण्यात आली, त्यात २०१६-२०१७  दरम्यान कर्मचाऱ्यांच्या भरतीचे स्वरूप त्यातून स्पष्ट झाले. २११०४ उमेदवारांनी वेगवेगळ्या कामांसाठी एकूण २८६९९१ अर्ज केले होते. कर्मचारी भरती व्यवस्थापक व कर्मचारी बाजारपेठ तज्ज्ञ यांच्याशी चर्चा केली असता असे दिसून आले की, अजूनही नोकरी देताना भारतात लिंगभेदाचा परिणाम होत आहे. पात्रता व अनुभव, पर्याय, अर्ज प्रक्रिया यात महिलांना अडचणी आल्याचे दिसून आले. जर भारतातील नोकऱ्यांत महिलांना योग्य स्थान मिळाले तर देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न हे २७ टक्के वाढू शकते.

बहुराष्ट्रीय कंपन्यांत भेदभाव कमी
अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी महिलांना योग्य ते स्थान दिले असून भेदभाव कमी केला आहे. नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या महिलांची संख्या वाढवणे व त्यातून निवड करणे यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे महत्त्वाचे  आहे. उमेदवारांमध्ये विविधता असणे हे लहान, मध्यम व मोठय़ा उद्योगांनाही फायद्याचे आहे,असे मत शॉर्टलिस्टचे सहसंस्थापक सिमॉन देसजार्डिन यांनी व्यक्त केले. कर्मचारी भरती करताना क्षमता मापन, कामाचे अचूक वर्णन, लिंगभाव टाळणारी प्रक्रिया यांचा समावेश करण्याची गरज आहे.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर; 'भोंगा' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

📚राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले मराठी चित्रपट

▪️सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - भोंगा

▪️पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट-पाणी

▪️सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- स्वानंद किरकिरे (चुंबक)

▪️सर्वोत्कृष्ट डेब्यू दिग्दर्शक - सुधाकर रेड्डी (नाळ)

▪️सर्वोत्कृष्ट बालकलाकार- श्रीनिवास पोकळे (नाळ)

📚हिंदी चित्रपट

▪️सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट-अंधाधुन

▪️सर्वोत्कृष्ट संगीत-पद्मावत

▪️सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पद्मावत)- अरिजीत सिंह

▪️सर्वोत्कृष्ट अभिनेता- आयुष्मान खुराना (अंधाधुन),विकी कौशल (उरी)

▪️सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन- कृती महेश मिद्या व ज्योती तोमर (पद्मावत चित्रपटातील घूमर गाण्यासाठी)

▪️सर्वोत्कृष्ट साऊंड डिझायनर- उरी

▪️सर्वोत्कृष्ट ॲक्शन चित्रपट- केजीएफ

▪️सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- पॅडमॅन

▪️पुरेपूर मनोरंजन करणारा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट- बधाई हो

▪️सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- सुरेखा सिक्री (बधाई हो)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- आदित्य धर (उरी)

सर्वोत्कृष्ट ॲडाप्टेट स्क्रीनप्ले- अंधाधुन

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...